रागांचा महासागर आता एका क्लिकवर

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
30 Jun 2011 - 8:28 pm

बाराशे रागांचा डेटाबेस आणि सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध करून देणारी 'ओशन ऑफ रागाज्' ही वेबसाइट म्हणजे संगीतप्रेमींसाठी तसेच अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. यामुळे भारतीय संगीतातील सगळी घराणी जवळ आली आहेत. त्याविषयी...
[ सौजन्यः म. टा. ]

टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झालेले गदे यांचा हा वैयक्तिक संग्रह वेबसाइटवर आल्यामुळे आता सर्वांसाठी खुला झाला आहे. आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रहाचे रुपांतर 'ओशन ऑफ रागाज्' मध्ये करण्यासाठी त्यांना दीड वर्ष लागलं. गदे सांगतात, 'माझंही 'संगीत प्रभाकर' परीक्षेपर्यंत संगीताचं शिक्षण झालेलं आहे. पण नोकरीमुळे गाण्यासाठी वेळ देता येत नसे याची खंत वाटायची. गाणं पुढे नेता आलं नसलं तरी किमान गाण्याच्या सतत सानिध्यात राहावं म्हणून मग मी संग्रह करू लागलो. माहिती जमा करीत गेलो. ऑडिओ क्लिप्स जमवल्या. शेवटी माझ्या संग्रही एवढी माहिती जमली की आता या माहितीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे असा विचार मनात आला. संगीत म्हणजे आनंद आहे. हा आनंद इतरांनाही मिळावा असा विचार करीत असताना वेबसाइटची कल्पना सुचली.'

संकेतस्थळ : http://oceanofragas.com/home.aspx

कलासंगीतलेखमाध्यमवेधमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

30 Jun 2011 - 8:38 pm | आनंदयात्री

हात्त तिचायला. शेण खाल्ले डॉट नेट डेवलपरने !! साईट एरर फेकायला लागली की हो मालक ?

असो, आमचा इनोबा म्हणतो, या साल्या शास्त्रीय संगीतात इतके राग आहेत की रागच येतो !!

>>>>या साल्या शास्त्रीय संगीतात इतके राग आहेत की रागच येतो !!
मला पण! राग वगिरे आपल्याला काही कळत नाही... माझ्यासाठी बीजगणित आणि रागदारी सारखीच अवघड आहे. पण ऐकायला बरं वाटतं कधी कधी.
असो. रागेच्छूकांना साईट्वर गाणी ऐकता येत नसतील तर संबंधीत संस्थळ मालकाचा मोबाईल नंबर तिथे उपलब्ध आहे.

आनंदयात्री's picture

30 Jun 2011 - 8:53 pm | आनंदयात्री

आता उघडतेय. जेव्हा तुम्ही धागा टाकला तेव्हा तेव्हा साईट उघडत नव्हती. असो.

साईट छान आहे, साईट मागचा हेतु खचितच कौतुकास्पद आहे. एवढ्यामोठ्या कार्यासाठी लागणार्‍या मेहनतीचा अंदाज आहे, आणि इतका मोठा संग्रह जमविणे त्याची इंन्वेंटरी मॅनेज करणे हेही ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही. यासाठी साइटमालकाचे मी मनापासून आभार मानतो.

ही माहिती उपलब्ध करुन दिल्याबद्दल यकुंचेही थोडेथोडके आभार :)

धन्यवाद.

कस्च..कस्चं..
मी आपली सहज डकवा डकवी केली.. :)

संपत's picture

30 Jun 2011 - 8:46 pm | संपत

साईट ओपन होत नाहीये .. शुल्लक एर्रर आहे... होइल सॉल्वड
.
रागाबद्दल मल जास्त काहीच माहित नाही.. उगाच एखादी कविता चालीत कोणी म्हंटली कि तोअच आपले सांगनार ही ह्या रागात म्हणता येते आहे.. अमक आणि तमक. कसली बंदीश आणि कसले काय माहितच नाहि.

थोडेफार उगाचच आपले 'पक्ष्यांचे ठसे' हे सुधीर मोघेंचे पुस्तक घेवुन कवितेत वापरलेला राग शिकण्याचा प्रयत्न केला होता.

हि सर्व माहिती मराठीत असली तर छान वाटले.
साईट्स चय प्रतिक्षेत.

धन्यवाद.

निमिष ध.'s picture

30 Jun 2011 - 10:19 pm | निमिष ध.

संपत यांनी दिलेला दुवा चालतो आहे. सुरवात तर चांगली वाटते आहे. बर्याच दिवसांमध्ये कधी तरी रागांबद्दल वाचायची इच्छा होती ती इथे पूर्ण होईल असे वाटते. नुसते ऐकणे वेगळे आणि थोडी माहिती घेऊन ऐकणे वेगळे.

कालच बघितली. चांगली वाटली. सवडीने वेळ काढून बघतो..

- पिंगू

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Jul 2011 - 11:42 am | मिसळलेला काव्यप्रेमी

शतःश धन्यवाद!!
संस्थळ बघितल्यावर त्यासाठी लागलेली मेहनत स्पष्ट जाणवते.
आणि असे काम करणार्‍यांना सलाम!!

फार सुंदर संस्थळ.
यशवंत एकनाथ यांचे आभार!!

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 7:50 pm | धमाल मुलगा

बहोत खूब..बहोत खूब मित्रा!

काय सुंदर संकेतस्थळ आहे. 'नादखुळा' हा शब्द चपखल बसेल असं अगदी.

यशवंता, भावा लै लै आभार.

मुलूखावेगळी's picture

1 Jul 2011 - 9:27 pm | मुलूखावेगळी

धन्यवाद
साइट मस्तच

निल्या१'s picture

2 Jul 2011 - 12:38 am | निल्या१

यशवंत छान लिंक दिल्या बद्दल आभारी आहे. सर्च इनोवेटिव आहे पण सर्व भाग क्लिक करण्याजोगे नसल्याने गोंधळ वाढतो. डाउनलोड फिचर सर्वात आवडले. साईट छान आहे.

रागावर आधारित हिंदी व मराठी गाणी, विविध रागांचे स्वरूप, त्यांच्या बंदिशी, बंदिशीचे अर्थ, तालाचे प्रकार, विविध घराणी, गायक या संबंधात प्रचंड प्रमाणात माहिती असलेले स्वरगंगा हे संकेत स्थळ सर्वांना ठाऊक असेलच. ज्यांना माहिती नाही त्यांना हा दुवा उपयुक्त ठरू शकतो.

http://www.swarganga.org/

चतुरंग's picture

2 Jul 2011 - 5:02 pm | चतुरंग

संकलनात भरपूर मेहनत घेतलेली आहे.
संकेतस्थळावर वावरुन बघत आहे. धन्यवाद हो यशवंतबुवा! :)

-रंगा