चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -३

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
12 May 2011 - 12:21 am

भाग - १

भाग - २

>>नशिब बलवत्तर म्हणून नव्या एसी बस ज्या ईंग्रजी मधे ईलेक्ट्रॉनिक बोर्डमधे स्टॉपचे नावे दाखवतात त्यातली एक मिळाली. माझे हॉटेल ज्या एरिआ मधे आहे त्या स्टॉपचं नाव त्यात होतं.

बस फारच छान होती. चेन्नईमधल्या दमट हवामानात एसी बसमधे बसण्याचं सुख काय वर्णावं?
असो, बसमधे बसलो. (हो, बसायला जागा मिळाली. इथे एसी बस बर्‍यापैकी रिकाम्या असतात. ;) ) कंडक्टरला फक्त स्टॉपचं नाव सांगितलं आणी पैसे दिले, तिकिट घेतलं आणि काचेतुन रस्त्यावरची गंमत पहात बसलो. त्यात बसमधे चढणारे, उतरणारे लोकं पहात होतो.

लोकं काळे असतात इथपर्यंतच माझी माहिती होती, पण काही लोकं करपलेले देखील असतात असा मला आज पदोपदी साक्षात्कार होत होता. त्यात काही लोक बसमधे चढल्यावर हातातलं सामान बाजुला ठेवुन खाली वाकुन दोन्ही हाताने लुंगी वर उचलायचे आणि कुठुनतरी तिकिटाचे पैसे काढायचे, मला ते दृष्य बघुन "ठराविक" लोकं राग आल्यावर रस्त्यात टाळ्या वाजवत असे करतात त्यांची आठवण झाली. पण काय करणार ज्याची त्याची संस्कृती.. मी आपला स्टॉप ची वाट बघत बसलो. तेवढ्यात विश्वनाथ मेहेंदळे काकांचा फोन आला, आता बसमधे बोलावं की नाही असा विचार मनात आला, कारण मी तामिळ नाही असे समजल्यावर कुणीतरी मला मारायचा असा संशय आला, कारण काही लोकांचे पुर्वानुभव. भित भित मी फोन घेतला. शक्य तितक्या कमी आवाजात बोललो. हा कॉल संपत नाही तोवर लगेच दुसरा फोन कॉल. शेवटी मोबाईल केकटायचा थांबला. आणि मी प्रसन्न मुद्रेने काचेतुन बाहेर पाहिले आणि मला एसीमधे मला घाम फुटला. मी कुठे आलोय कळत नव्हते. बसने एका पुलावरुन वळण घेतले होते आणि एका सुनाट रस्त्यावर धावत होती.

समोरच्या सिटवर एकजण बिहारी भाषेत फोनवर बोलत होता, मी त्याला माझ्या स्टॉपबद्द्ल विचारलं, तो पण नविन होता, म्हणाला कि त्याला फक्त त्याचा स्टॉप माहित आहे. मी धीर करुन उठलो आणि कंडक्टरला विचारलं, त्याला विंग्रजी आणि हिंदी समजेना, एवढचं लक्षात आलं की स्टॉप बराच मागे राहिलाय. बरं उतरावं तर कुठे? सगळा सुनाट रस्ता जवळ लॅपटॉप, गळ्यात चेन. गजबजलेल्या स्टॉपची वाट बघत उभा राहिलो. थोरईपक्कम नावाच्या चौकात धीर करुन उतरलो.

मनात भयंकर चीड्चीड आणि डोक्यात भिती असा मी असामी हरवलो होतो. कुणाला फोन करु? काय करु? काही समजेना. जस्ट डायलला फोन केला, टॅक्सीचा नंबर घेतला. मला पत्ता सांगता येईना, मी दारुच्या नशेत फोन केलाय कदाचित असा समज झाल्याने समोरच्याने कॉल कट केला. एक दोन मित्रांना फोन करुन पाहिला पण कुणालाच काही मदत करता येईना.

एक तरूण बाजुने चालत होता, मी त्याला गाठलं आणि माझी परिस्थिती सांगितली. माझ्याकडे वरुन खालपर्यंत पहात तो म्हणाला कि तो तांबरम पर्यंत ट्रेनने जाणार आहे, तिथुन मला रिक्शा मिळेल. मी त्याच्यावर पुर्ण विश्वास टाकुन बरोबर चालु लागलो. त्याने माझं तिकिट काढल, मला गर्दितुन वाट काढुन दिली, ट्रेनमधे बसायला जागा शोधली, गप्पा मारल्या आणि कुठ्ल्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता मला तांबरमच्या रिक्शा स्टँडपर्यंत सोडवायला आला, रिक्षावाल्याशी बोलुन मला रिक्शात बसवले आणि हसतमुखाने सी यु अगेन असं म्हणत निघुन गेला. तामिळ होता. मी होटेलवर पोहोचल्यावर मी त्याचे मनापासून आभार मानले. माझ्या मदतीला देवच धावून आला होता नक्कीच.

रात्रीचे साडे दहा- अकरा वाजले होते. मी फारच थकलो होतो. दोन थंड बीयर प्याव्यात अशी ईच्छा झाली. म्यानेजरला विचारलं तर वाकडे, काळे दात दाखवत हॅ हॅ हॅ करत म्हणाला की "यन्ना सार, फुड नो अव्हेलबल धिस टाईम, बीयर ईल्ला".
"च्यामारी, ह्या शहराला मेट्रो सिटीचा दर्जा कुणी दिला" असा विचार करत मी जेवणाच्या शोधात बाहेर पडलो.

एक हॉटेलवजा दुकान चालु होतं, वर्दळ होती. टेबल पकडला, मेन्यु कार्ड पासून बोर्डवर सगळीच जिलेबी, चित्रं मदतीला आली. चित्र आणि समोरचं जेवण यातला फरक पाहुन मला मिपावरचे आयडी आणि प्रत्यक्ष माणूस यातला फरक आठवला. ;)
एका चित्राकडे बोट दाखवून मी ऑर्डर दिली. माझ्या पुढ्यात केळीचे पान फेकण्यात आले. फटाफट २-३ वाटया, भात समोर येवुन माझ्या चाळवलेल्या भुकेला वाकुल्या दाखवू लागला. "नाईलाज" या प्रकाराचं उत्तर कुणालाही सापडलेलं नसाव.

मी पानात भातसदृश प्रकार ओतला, दुर्बुद्धी म्हणून चमचा मागवला. आधीच वैतागलेला वेटर, मी जणू त्याचा महिन्याचा पगार मागितला अशा आविर्भावात त्याने मला चमच्याला आत्महत्या करावीशी वाटावी असा चमच्याचा अपमान आणून दिला. मी तो बाजुला ठेवला आणि ओरपायला सुरुवात केली. सगळे लोकं माझ्याकडे पहायला लागले, मला कळेना. येणारा जाणारा मला एखादा एलीयन सारखा पहात होता. बाजुच्या टेबलावर एक भारदस्त मिशीवाला रेडा माझ्याकडे वाकुन वाकुन पहात होता. मला पुन्हा घाम फुटला, झक मारली आणि इथे आलो असा विचार करत मला जेवण गिळलंही जाईना. शेवटी मधेच ऊठलो, हात धुण्यासाठीच्या जागी अंधुकशा आरशात मी स्वतःला पाहिलं, सगळं ठीक होतं. पुन्हा ओरपायला सुरुवात, पण नजरा माझ्याकडेच. अशा परिस्थित काय करायचं असतं हे अशी परिस्थिती कधी न आल्याने माहित नव्हतं.

टेबलं रिकामी नसल्याने माझ्या समोर एक जोडपं येवून बसलं. त्यांच्या पुढ्यात पानं फेकली गेली. ती काळीभोर सुंदरी माझ्या पानाकडे पहात राहुन राहुन हसायला लागली. आता मात्र हद्द झाली. (सहाजिक हो, मुलगी कशीही असली तरी मेल इगो अशा प्रकाराने हर्ट होतोच ना. कधी कधी काळ्या बेंद्र्या बेढब पोरी उगाचच आपण जवळुन जात असताना, आपल्या मनात काहीच नसताना, आपल्याकडे पाहुन उगाच ओढणी किंवा पदर सावरतात तेव्हा जसा होतो तसा ;) )

पण हा ईगो त्या दोघांनी जेवायला सुरुवात केल्यावर मावळला. मला माझी चूक लक्षात आली होती. समोर फेकलेलं केळीचं पान दुमडलेलं होतं, ते उघडुन सुलट्या पानावर भात घ्यायचा असतो. मी मात्र दुमडलेल्या अर्ध्या पानावर, उलट्या बाजुवर भात आणि सांबार ओरपत होतो. पुढचं जेवण तसंच ठेवुन परत हाटेलात आलो, वपुर्झा बरोबर आणलं आहे लक्षात आलं, चला, आजची रात्र सुखी झाली.

क्रमशः

आपला,
मराठमोळा

समाजजीवनमानप्रवासनोकरीप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभो's picture

12 May 2011 - 12:56 am | प्रभो

मस्त रे...आता पुढचे भाग तु बिज्जी व्हायच्या आत लिहून टाक बघू पटापट... :)

इंटरनेटस्नेही's picture

12 May 2011 - 4:19 am | इंटरनेटस्नेही

.

गणेशा's picture

12 May 2011 - 2:47 pm | गणेशा

छान ...

लिहित रहा... वाचत आहे...

चेन्नईत माझ्यावर गुदरलेल्या अश्याच प्रसंगाच्या जुन्या आठवणी उफाळुन आल्या. :)

प्रीत-मोहर's picture

12 May 2011 - 3:51 pm | प्रीत-मोहर

मी चाललेय चेन्नै ला :

रेवती's picture

12 May 2011 - 6:42 pm | रेवती

वाचतिये.
छान लिहिताय.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 May 2011 - 7:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>कारण मी तामिळ नाही असे समजल्यावर कुणीतरी मला मारायचा असा संशय आला. कारण काही लोकांचे पुर्वानुभव.
च्यामारी !! चेन्नई हे बऱ्यापैकी सुरक्षित आहे असे ऐकून होतो. कुणाचे अनुभव खरे ते देव जाणे. तुला चांगला अनुभव आला मात्र. बाकी चेन्नईमध्ये कुणी फक्त हिंदी बोलला म्हणून मार खाल्ल्याचे ऐकले नाही बाबा. (हा पूर्वग्रह म्हणावा का? बाकी, पूर्वग्रह या विषयावर पुढेमागे चर्चा करू एकदा ;-) )

>>माझ्या मदतीला देवच धावून आला होता नक्कीच.
अरे अनुभव (उच्चारी अन्भव) म्हणतात त्याला. तू कुठल्या बाबांचा भक्त नाहीस वाटते ? साईबाबा, सत्यसाईबाबा, नरेंद्र महाराज, गेलाबाजार बापू (गांधी नाही, युद्ध माझा राम... त्यातले) यातील कुणीही असा टेम्पररी अवतार घेऊन भक्तांच्या मदतीला धावून जातात असे ऐकले आहे.

केळीच्या पानाचा प्रसंग भन्नाट रे.. आधी कधी खाल्ले नव्हतेस केळीच्या पानावर? तुम्हा पुण्या-मुंबईकडच्या लोकांना गावी नेले पाहिजे एकदा. ;-)

सुहास..'s picture

12 May 2011 - 10:21 pm | सुहास..

हा हा हा !!!

निनाद's picture

13 May 2011 - 4:43 am | निनाद

विविध प्रकारचा प्रिज्युडाइस पाहून कसेतरी झाले. उदा.

पण काही लोकं करपलेले देखील असतात

किंवा

कधी कधी काळ्या बेंद्र्या बेढब पोरी

या विचारांमधून मराठी माणूस कधी बाहेर येणार आहे हा प्रश्नच आहे. याचे पर्यावसन अमेरिकेत काळ्या रंगाच्या लोकांना 'कल्लू' असे म्हणून मग मार खाण्या पर्यंत झालेले ऐकले आहे.

कातडीचा रंग कुणी मागून घेत नसतो मराठमोळा साहेब, त्याच त्या विषयावरचे घासून रंग उडालेले विनोद अजून किती काळ मराठी वाचकांनी सहन करायचे?

शिवाय

त्यात काही लोक बसमधे चढल्यावर हातातलं सामान बाजुला ठेवुन खाली वाकुन दोन्ही हाताने लुंगी वर उचलायचे आणि कुठुनतरी तिकिटाचे पैसे काढायचे, मला ते दृष्य बघुन "ठराविक" लोकं राग आल्यावर रस्त्यात टाळ्या वाजवत असे करतात त्यांची आठवण झाली. पण काय करणार ज्याची त्याची संस्कृती..

ज्याची त्याची संस्कृती... ? हे लेखन आक्षेपार्ह आहे.

दक्षिण भारतात राहणे इतके नकोसे असेल तर जायचेच कशाला तेथे?

आत्मशून्य's picture

13 May 2011 - 8:06 am | आत्मशून्य

फक्त लेखक एका नवख्या ठीकाणी असताना ज्या परीस्थीतीतून गेला ते वाचताना त्याची मनस्थीती व झालेली कोंडी याबाबत थोडी गंमत मात्र वाटली. बाकी अजूनही तेथील लोक त्यांच्या पारंपारीक पोशाखास देत असलेले महत्व नक्कीच कौतूकास्पद आहे.

या विचारांमधून मराठी माणूस कधी बाहेर येणार आहे हा प्रश्नच आहे. याचे पर्यावसन अमेरिकेत काळ्या रंगाच्या लोकांना 'कल्लू' असे म्हणून मग मार खाण्या पर्यंत झालेले ऐकले आहे.

कातडीचा रंग कुणी मागून घेत नसतो मराठमोळा साहेब, त्याच त्या विषयावरचे घासून रंग उडालेले विनोद अजून किती काळ मराठी वाचकांनी सहन करायचे?

याला देखील जनराईलज्ड करुन प्रिज्युडाइस सेटेन्स मारणे म्हणतात, असो ;)

ज्याची त्याची संस्कृती !! (च्यायला आमचा नान्या कुठे गेला ;) )

दक्षिण भारतात राहणे इतके नकोसे असेल तर जायचेच कशाला तेथे >>>

लेखन दक्षिण भारत या विषयावर आहे की चैन्नई या शहराबद्दल आहे ?

कै च्या कै कळवळा येतो राव काही लोकांना ;)

कालिन्दि मुधोळ्कर's picture

13 May 2011 - 9:20 am | कालिन्दि मुधोळ्कर

आपण ज्या शहरात राहिला तेथिल स्थानिकांच्या रंगाबद्द्ल आणि वेशभूशेबद्दल आपली मुकताफळे वाचून गोविंदाग्रजांनी महाराश्ट्राला "दगडांच्या देशा" का म्ह्टले असावे याचा अंदाज आला.

तमिळ न बोलल्याने चेन्नईत मारल्याचे मला तरी ऐकिवात नाही (वास्तव्य ५ वर्षे). तो प्रकार मुंबईतले मराठी लोक करतात असे ऐकून आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 May 2011 - 1:05 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>आपण ज्या शहरात राहिला तेथिल स्थानिकांच्या रंगाबद्द्ल आणि वेशभूशेबद्दल आपली मुकताफळे वाचून गोविंदाग्रजांनी महाराश्ट्राला "दगडांच्या देशा" का म्ह्टले असावे याचा अंदाज आला.
तुम्ही पण वरील वाक्याच्या उत्तरार्धात त्याच धर्तीवर विधान केले आहे की.

>>तमिळ न बोलल्याने चेन्नईत मारल्याचे मला तरी ऐकिवात नाही (वास्तव्य ५ वर्षे). तो प्रकार मुंबईतले मराठी लोक करतात असे ऐकून आहे
मराठी न बोलल्याबद्दल मुंबईत कुणाला मारल्याचे माझ्याही ऐकिवात नाही (वास्तव्य २५+ वर्षे). तसे केले तर अर्ध्या तासात मारणाऱ्याचाच हात दुखून येईल. मुंबईकर मराठी लोक पण बाहेर हिंदीच फाडत असतात. तुम्ही हिंदी बातम्यांच्या वाहिन्यांवर विश्वास ठेवता असे दिसते. ;-)

टीप :- इथे मी ममोच्या विधानाला पाठींबा देत आहे असे नाही

कालिन्दि मुधोळ्कर's picture

13 May 2011 - 8:25 pm | कालिन्दि मुधोळ्कर

>>तुम्ही पण वरील वाक्याच्या उत्तरार्धात त्याच धर्तीवर विधान केले आहे की.

मान्य आहे.

स्पा's picture

13 May 2011 - 7:39 pm | स्पा

मस्तच ... ममो.. निरीक्षण शक्ति, अफाट

मराठमोळा's picture

24 May 2011 - 3:16 am | मराठमोळा

कमीत कमी विनोदबुद्धी असलेले प्रतिसाद पाहून अंमळ मजा आलेली आहे. :)

हा धागा विरंगुळा सदरात आहे, असे विनोद केवळ विनोद म्हणूनच केले जातात याची नोंद घ्यावी (आमच्याही कातडीचा रंग काळाच आहे.) बाकी फक्त कळवळा लिहिणारे दुसर्‍याच्या संस्कृतीबद्द्ल किती कृतीशील असतात हे म्हणजे नेते लोकांनी केलेल्या भाषणासारखे आहे, बाकी आमच्या कृतीबद्दल बोलाल तर आम्ही तिथली संस्कृती आणि लोकं यांना समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि आजही तिथले (हो, तिथले, मित्र आमचे खास आहेत. इथे सांगावसं वाटत नाही पण सांगतो, तिथले खास खाद्यपदार्थ घेऊन केवळ आमच्यासाठी एक जण बरेचसे पैसे खर्च करून मुंबईला आला होता.. ).. असो..
पण मी पुलंशी तुलना करायच्या लायकीचाही नाही पण लेखक स्वतःचे वाईट अनुभवाचे लेख कधी कधी गंमत म्हणुन मांडतो.

असो,
बाकी पुन्हा केव्हातरी.