अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार....
सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...
गेल्या रविवारी लोकसत्तेत लोकरंग मध्ये महामहोपाध्याय द वा पोतदारांच्या सर्किटपणाबद्दल त्यांनी लिहिलेला लेख हा वाचाच....
आणि हा लेख वाचून मजा आली असेल तर आजच्या १७ एप्रिलच्या लोकसत्तेत पत्रकार अरविंद कुलकर्णी यांनी लिहिलेली प्रतिक्रियाही वाचा...
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layou...
मज्जा आहे....
केसरी आफिसात महामहोपाध्याय संपादकांसमोर त्यांची अर्धा तास शिकवणी घेत आहेत हा प्रसंग सूपर्हिट आहे...
प्रतिक्रिया
17 Apr 2011 - 11:38 pm | श्रावण मोडक
मास्तर,
संदर्भातील या शब्दरचनेतून किती बाण मारलेत! आवडले. :)
17 Apr 2011 - 11:53 pm | शिल्पा ब
दोन्ही लेख भारी.
18 Apr 2011 - 11:44 am | Nile
गमतीदार. यावरुन आठवले, साहित्यिक गप्पा जयवंत या दळवींच्या पुस्तकातील गमतीजमती वाचनीय आहेत.
18 Apr 2011 - 10:17 am | llपुण्याचे पेशवेll
वा वा वा मास्तर चांगली माहीती शेअर केलीत. असो.
अवांतरः जालावर वावरल्यानंतर कोणाची मळमळ नक्की कशी कुठे बाहेर पडेल याचा नेम नाही हे आम्ही आता चांगले जाणून चुकलो आहोत. :)
18 Apr 2011 - 10:44 am | पिवळा डांबिस
मास्तर,
श्री अशोक जैन यांचा मूळ लेख आणि त्यावर आलेली प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत!!!!
हे उपलब्ध करून दिल्याबद्दल तुम्हाला पानसुपारी, श्रीफळ आणि अंगवस्त्र अर्पण!!!
कृपया स्वीकार करावा!!!!
:)
31 Jul 2012 - 2:58 pm | विजुभाऊ
ठ्यॉ .............
18 Apr 2011 - 10:57 am | चिंतामणी
अरविंद कुलकर्णी यांनी म्हणले आहे की "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला" हे म्हणणे बरोबर आहे. श्री.अशोक जैन यांच्यासारख्या वरीष्ठ पत्रकाराने असे लेखन केले आहे हे बघून वाईट वाटले. म.म.द.वा.पोतदार हे विव्दान होते, इतीहास संशोधमम्हणुन मोठे नाव आणि दबदबा होता त्यांचा. मा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवाजीच्या इतिहासाबद्दल म. म. द. वा. पोतदार यांना लिहायला सांगितलं होतं.
पण मार्मीक बोलण्यातसुद्धा पुढे होते. त्यांचा एक प्रसीध्द किस्सा सांगतो.
म.म.द.वा.पोतदार हे कुलगुरू असताना पदवीदान समारंभात "मेरीट लिस्ट"मधे मुली जास्त आहेत असे त्यांच्या लक्षात आले. भाषणात त्यांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की "मुलींनी मेरीट लिस्टमधे बाजी मारली आहे." तेंव्हा मुलींच्या बाजुने टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. एक क्षण थांबुन मुलांकडे बघीतले आणि म्हणाले "मुलांनो तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. या हुषारमुली तुम्हालाच मिळणार आहेत." त्यानंतर मुलांच्याबाजुकडुन टाळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला हे सांगायची जरूरी नाही.
18 Apr 2011 - 11:17 am | चिंतामणी
ह.ह.पु.वा.
(पिवळा डांबिस- जरा सांभाळुन रहा. भडकमकर मास्तर आता तुमची शिकवणी घेणार.)
18 Apr 2011 - 11:43 am | रमताराम
एकुण काय यत्र तत्र सर्वत्र मूर्तिभंजनाचीच चलती आहे. अजून 'दत्त्या पोद्दार' असा सन्मानजनक उल्लेख झालेला नाही हे त्यांचे नशीब म्हणायचे की आपल्या मूर्तिभंजनाच्या यादीत पोतदारांचा नंबर अजून वर आलेला नाही कोणास ठाऊक.
जिवंत असताना ज्याच्यासमोर आपले फारसे चालत नसे अशी एखादी व्यक्ती वर गेल्यावर त्याचे मूर्तिभंजन करण्याच्या भेकडपणाला बरीच मोठी परंपरा आहे. अगदी जीएंच्या मृत्यूनंतर दळवी, व.दि. कुलकर्णींच्या मृत्यूनंतर द. भि. कुळकर्णी यांनी त्या त्या व्यक्तिमत्त्वावर जी टीका केली आहे अथवा झालेल्या मतभेदांच्या मुद्यांबाबत आपणच कसे बरोबर होतो हे लिहिले आहे हे पाहता ही क्षुद्रता आपल्या रक्तातच असावी असे वाटू लागले आहे.
केसरी आफिसात महामहोपाध्याय संपादकांसमोर त्यांची अर्धा तास शिकवणी घेत आहेत हा प्रसंग सूपर्हिट आहे...
अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी. भापो हा शद्बप्रयोग सांगितला असता तरी चालले असते.
18 Apr 2011 - 1:00 pm | योगप्रभू
<<अरेच्या, शुद्धलेखन फाट्यावर मारण्याची गोष्ट आहे हे त्यांना सांगितले का नाही जैन यांनी.>>
काय बिशाद होती अशोक जैन यांची केसरीतील धुरीणांना असले काही बाष्कळ बोलून दाखवण्याची? केसरीत भाषा परंपरा कसोशीने जपली जाते. बडोदा किंवा गोवा या गावांची नावे आजही पूर्वीच्या बडोदे, गोवे या स्टाईलनेच लिहिली/उच्चारली जातात. समजा अशोक जैन यांनी हे वाक्य कै. चंद्रकांत घोरपडे यांच्यासारख्या कठोर शिस्तीच्या संपादकांपुढे बोलून दाखवले असते तर काय प्रसंग ओढवला असता?
भाषेच्या छटा समजून न घेता आलंकारिक शब्दांचा सोस धरला, की कधीतरी अशी फजिती होते. एक साहित्यिक चक्क आपल्या कादंबरीत शृंगारिक वर्णन लिहिताना 'नायिकेचे नितंब तिच्या कंचुकीतून डोकावत होते' असे लिहून मोकळे झाले होते. तो किस्सा 'ठणठणपाळ' या पुस्तकात वाचल्याचे आठवते.
एक ज्येष्ठ मराठी नेते प्रथमच लोकसभेत गेले तेव्हा त्यांनी अध्यक्षांना मराठी पद्धतीने 'अध्यक्ष महाराज' असे संबोधले. त्यावर सभागृह हसायला लागले आणि अध्यक्षांचा चेहरा गोरामोरा झाला. हिंदीमध्ये किंवा उत्तर भारतात स्वयंपाक्याला 'महाराज' म्हणतात. लोकसभा अध्यक्षांना 'अध्यक्ष महोदय' असे म्हणण्याची प्रथा आहे.
लिहायचे/बोलायचे असते एक आणि शब्द उच्चारतात भलताच. यालाच इंग्रजीत 'मॅलाप्रॉपिझम' म्हणतात.
31 Jul 2012 - 7:38 pm | यकु
________/\______
हर हर हर
1 Aug 2012 - 9:48 am | विजुभाऊ
हर हर हर......
कोण कुठे काय नेसेल ते सांगता येत न्है.
18 Apr 2011 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा
मज्जा आली मास्तर. धन्यु.
18 Apr 2011 - 2:01 pm | पक्का इडियट
अनेकांनी लेखन करणे बंद केले तरी चालण्यासारखे आहे हे सिद्ध.
18 Apr 2011 - 5:47 pm | चतुरंग
यांचा लेख अगदीच बालिश वाटला, कुठल्यातरी लहान मुलाने दोन यत्ता मोठ्या भावाच्या तक्रारी कराव्यात तसला.
असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच!
अरविंद कुळकर्णींनी त्यांच्या प्रतिक्रियेत चांगला समाचार घेतला आहे!
-रंगा
19 Apr 2011 - 1:16 am | भडकमकर मास्तर
असा लेख मास्तरांनी रेकमेंड करावा हे आश्चर्यच!
पुढची चंपी अधिक समजून घेण्यासाठी आधीचा लेख वाचणे आवश्यकच आहे ना...
19 Apr 2011 - 4:15 am | चतुरंग
समजलं, आधीचा माझा टीकेचा सूर मी मागे घेतो! :)
-रंगा
18 Apr 2011 - 6:29 pm | प्रदीप
जैनांचे दिवाळी अंकातील गेल्या काही वर्षांतील लेख वाचून माझे त्यांच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत झाले होते. मी त्यांचे काहीही वाचायचे सोडून दिले होते. कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता. तेव्हा मनाशी म्हटले, शेवटी माणसाने आयुष्यभर पोटासाठी दिल्लीतील थर्ड रेट पोलिटिकल शेनॅनिगन्स पाहून, त्यांच्यावरच लिहीत राहिले की असे होत असावे. कोण जाणे, त्यांच्या जागी मी असतो तर माझेही असेच काही झाले असते, हातातून नुसते कळकट्टच निघत राहीले असते काही ना बाही.
ह्या माझ्या त्यांच्याविषयीच्या कडवट मतामुळे तो लेख मी वाचला नव्हता, पण भडकमकर मास्तरांनी लक्ष वेधल्यावर मुद्दाम वाचला. माझे मत काही चुकीचे नव्हते असा दुजोरा ह्या लेखावरून पुन्हा मिळाला. अरविंद कु़ळकर्ण्यांनी त्यांची जाहीर 'चंपी' केली आहे, त्यामुळे तरी ते सुधारतील अशी आशा आहे., खात्री देता येत नाही. उभारीचे आयुष्य 'राजधानीतील हालचालींवर' नजर ठेवल्यावर काय होणार माणसाचे!!
पण ह्याचबरोबर म. म. दत्तो वामनांचा तिरसटपणा अत्यंत खटकला, विशेषतः युनिव्हर्सिटीतील घरात मुलाखतीसाठी सकाळी साडेसहा वाजता या,हे सांगतांना केलेला उर्मटपणा, नंतर त्यावेळी जैनांच्या अंगावर खेकसणे, इ. हे सगळे खरे असेल तर, ते वाईटच होते असेच म्हटले पाहिजे. एखादी व्यक्ति आवडत नसेल तर इतका पाणउतारा करण्याची जरूरी नाही. फार फार तर जैनांच्या दैनिकाच्या संपादकास 'ह्या व्यक्तिस मला भेटावेसे वाटत नाही' असे हळूवारपणे (!) सूचित करता आले असते, नाही? का मराठी विद्वानजनांकडून अशी नम्र वागणूक अपेक्षिणे हाच मुळी गुन्हा आहे?
18 Apr 2011 - 7:42 pm | रमताराम
तुमच्या पहिल्या दोन परिच्छेदांशी सहमत. ढळत्या वयात माणूस चळतो तसे काहीसे झाले असावे जैनांचे.
पोतदारांच्याबाबत तुमची अपेक्षा अस्थानी नाही. परंतु त्यांना ओळखणारे अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांबद्दल सांगतीलच. ते सर्वगुणसंपन्न होते असा कोणाही सुज्ञाचा दावा असणार नाही. सामान्यपणे असा संकेत असतो की मृत व्यक्तीबद्दल 'फक्त' वाईट बाजूने लिहू नये. याचे साधे कारण म्हणजे प्रतिवाद करण्यास ती जिवंत नसते, नि अन्य कोणी त्यांच्या बाजूने तसे करेल याची शाश्वती असत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधी काही प्रतिवाद्य,विवाद्य वा क्वचित धडधडीत खोटे मुद्देही प्रस्थापित होउन जाउ शकतात. आज अशा मूर्तिभंजनाची मुळीच वानवा नाही.
मग प्रश्न असा की असे अवगुण सांगायचेच नाहीत का? तर उत्तर असे की जरूर सांगावेत. पण मग आपले लिखाण ज्याला 'डेफिनिटिव बायॉग्रफी' म्हणतात त्या स्वरूपाचे असावे नि त्यात त्या व्यक्तीच्या गुणावगुणांचा साधार नि सप्रमाण उहापोह करावा. केवळ वाईट वाजूवर लेख लिहिणे हे विकृत मनाचे लक्षण आहे. ते ही मान्य करता आले असते जर त्यांच्या एखाद्या विवाद्य मताचे, तत्त्वाचे खंडन म्हणून आले असते तर. एखाद्या दिवंगत प्रतिष्ठित विद्वानाला जेवणनंतर पार्श्वभागाला हात पुसायची सवय होती ही माहिती आज देण्याने कोणाच्याही ज्ञानात काडीचीही भर पडत नसते. मग हे असले लिखाण - ज्याला निव्वळ मनोरंजन मूल्य आहे - छापावे/लिहावेच कशाला.
18 Apr 2011 - 8:01 pm | प्रदीप
जैनांच्या लेखनाविषयी माझे मत मी नोंदवलेले आहेच, तेव्हा त्यांच्या लेखनाचे समर्थन मी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण मला वाटते तुम्ही इथे त्या लेखाचा संदर्भ लक्षात घेतलेला दिसत नाही. लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे. अशा लेखनाचा जीव तेव्हढाच, त्यातून एखाद्या व्यक्तिचा चहूं अंगानी घेतलेला आढावा येथे अपेक्षित नाही. ह्या सदरातील लिखाण केवळ मनोरंजनात्मक आहे. ह्यापुढे जाऊन अधिक सखोल लिखाण जैनांकडून मलातरी कुठेही अपेक्षित नाही.
मात्र मी वर म्हटल्याप्रमाणे जैनांनी कथित केलेली कहाणी खरी असल्यास तिरसटपणा, व कमालीच्या उर्मटपणाबद्दल दत्तो वामनांचा निषेध करावयास व्हावा. पण पुन्हा-- जैनांसारख्याकडून गंभीर लिखाणाची अपेक्षा करू नये, त्याच थाटात मराठी विद्वद्जनान्कडून सौजन्याची करू नये.
जाता जाता, म. मंच्या शिवचरित्राचे पुढे झाले तरी काय? म्हणजे ते अनेक वर्षे 'इन द मेकिंग' होते असे सत्तरीच्या दशकात बरेच गाजल्याचे आठवते. त्यापुढील काही नक्की माहिती नाही.
18 Apr 2011 - 8:20 pm | रमताराम
लोकरंगच्या पुरवणीत 'सर्किट' नामक सदरात हा लेख समाविष्ट आहे. तेव्हा काही व्यक्तिंच्या विक्षिप्तपणाविषयीच इथे लिहीले जाणार आहे.
असे असेल तर सुमार केतकरांच्या तावडीतून सुटल्यावर लोकसत्ता मधे सुधारणा होईल अशी अपेक्षा होती ती फोल ठरून नेमके उलट घडते आहे असे म्हणावे लागेल. मनोरंजनासाठी मूर्तिभंजनाचे काम नियमाने करत जावे नि आपल्या वाचकांनी क्षुद्रतेने ते मिटक्या मारीत वाचावे नि एकमेकाला रेकमेंड करत जावे हे आपल्या समाजाच्या सुमार मानसिकतेचे नि अधःपाताचे लक्षण आहे. देव त्यांचे भले करो.
19 Apr 2011 - 12:01 pm | मृत्युन्जय
आयला आजकाल ररांशी बर्याच वेळा सहमत व्हावे लागते आहे.
अतिशय संतुलित वाटले दोन्ही प्रतिसाद.
18 Apr 2011 - 8:03 pm | प्रदीप
.
19 Apr 2011 - 1:23 am | भडकमकर मास्तर
कारण लेखात ते नेहमी कुणा न कुणाची टिंगलच करीत असत असे मला वाटले. इतक्या वर्षांच्या पत्रकारितेनंतर ह्या माणसास आदराने लिहावे अशी कुणीही व्यक्ति कशी भेटली नाही, असा प्रश्न मला खरोखरीच त्यांचे अलिकडचे लेख वाचून पडला होता.
अगदी अगदी .. हेच .. आणि दिल्लीतल्या राजकारणाला अति पाहिल्यामुळे माणसाचं असं होत असावं हे निरेक्षण इन्ट्रेष्टिंग....
18 Apr 2011 - 9:20 pm | राजेश घासकडवी
गमतीदार. मला ते मूर्तीभंजन वाटलं नाही. एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं.
18 Apr 2011 - 11:23 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
19 Apr 2011 - 11:55 am | रमताराम
तुमच्या मताचा आदर ठेवून तीव्र असहमती - पुन्हा एकदा - दर्शवतो.
एखाद्या असामान्य व्यक्तिमत्वाला त्याच्या विक्षिप्तपणामुळे माणूसपणाचा पोत यावा तसं वाटलं.
कोण हे दत्तो वामन पोतदार हो?
प्रश्न आश्चर्यकारक वाटला तरी हा प्रश्न बहुसंख्यांना असेल याची जवळ्जवळ खात्रीच आहे. विचाराचे इंद्रिय जागृत - म्हणजे परंपराप्रधान देशात जितके होऊ शकेल तितके - झालेल्या वयातील (साधारण १४ ते ३० हा 'तरुण' म्हटला जाणारा वयोगट समजू या) किती जणांना म्.म. पोतदार ठाऊक आहेत, ठाऊक असलेल्या किती जणांना त्यांना नक्की महामहोपाध्याय का म्हटलं जातं हे ठाऊक आहे, हे ठाऊक असलेल्या किती जणांनी त्यांनी लिहिलेलं काही वाचलं आहे? ही शेवटची शक्यता फारच कमी मुळात जिथे ललित लिखाण कष्ट घेऊन वाचण्याची मारामार तिथे संशोधनात्मक नि वैचारिक लिखाण वाचतो कोण? आपण ज्याला मागील पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार म्हणतो त्यात पोतदारांसारख्या विद्वानांच्या विद्वत्तेचा समावेश मागील पिढीतील किती आईबापांनी, शिक्षकांनी केला हो? अशा स्थितीत वर उल्लेख केलेल्या पिढीला त्यांची ओळखच मुळी अशा लेखातून होत असेल तर या व्यक्तिमत्त्वाबद्दल केवळ हीच माहिती घेऊन ते पुढे जाणार आहेत. थोडक्यात पूर्वीच्या काळी अनेक चक्रम लोक होते त्यातील एक ही एकमेव ओळख पुढे शिल्लक राहील. त्यांच्या आईबापांनी पोतदारांबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही तर हे कशाला करतील. जागतिकीकरण नि स्पर्धेच्या युगात त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याने आयुष्यात काय फायदा होणार आहे. कॉफी टेबल पुस्तकातील किश्श्यांप्रमाणे असले फुटकळ किस्सेच एकमेकाबरोबर शेअर केले जाणार आहेत. वार्यावरची वरात मधला तपकिरीचा विक्रेता म्हणतो तसे 'आम्हाला सस्त्यात मजा पाहिजे' मग त्यासाठी मूर्तिभंजन करावे लागले तरी बेहत्तर.
काळाचे संदर्भही पुसट होत गेल्याने जे पुढे चालते ते हे असे अपुरे असते. याचा अतिशय परिणामकारक वापर काही संघटनांनी स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांच्या बाबत परिणामकारकपणे केला आहे. त्याची काटेरी फळे आज आपण पाहतो आहोत. ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच.
मुळात विद्वानांबद्दलचे असे किस्से चवीने वाचण्यात, चित्रपटातील नट-नट्यांच्या भानगडींबद्दल गॉसिप करण्यात तुम्हा आम्हा सामान्य माणसाला आनंद वाटतो. यात त्यांचे साधेसुधे माणूस असणे दिसते वगैरे समर्थन दिले तरी मूळ कारण त्यांच्याबद्दलची असूया असते. यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते. त्यानिमित्ताने या आपल्याहून वर गेलेल्या व्यक्तींना खाली खेचून आपल्या पातळीवर आणल्याचे समाधान लाभते इतकेच.
19 Apr 2011 - 12:00 pm | यशोधरा
+१
19 Apr 2011 - 1:41 pm | पक्का इडियट
+२
नेमके विश्लेषण.
19 Apr 2011 - 2:17 pm | अर्धवट
>>ज्या नेत्याच्या मृत्युनंतर चाळीस वर्षांनी आपण जन्मलो, ज्या काळाच्या संदर्भात विचार करण्यासाठी आवश्यक अभ्यास तर सोडाच, किमान माहिती देखील आपण घेतली नाही अशा व्यक्तिमत्त्वांबद्दल अद्वातद्वा बोलायला आज लोक धजावतात ते असल्या शेलक्या प्रचारामु़ळेच.
>>यात अप्रत्यक्षपणे 'निदान आम्ही बरे' हे न उच्चारलेले आत्मसमर्थन असते.
एकदम पट्या..
(मी आधी प्रतिसादाची लांबी पाहुन खाली 'इंद्रा' अशी सही आहे का ते पाहिलं. म्हातार्याचं नाव बघुन गोंधळात पडलो. असो.)
19 Apr 2011 - 6:41 pm | राजेश घासकडवी
थोर व्यक्तींचे पाय मातीचे असतात हे दाखवण्याचा, त्यांच्याबाबतीत निरर्थक वैयक्तिक चर्चा करण्याकडे कल असतो हे बरोबर आहे. पण प्रत्येकच अशा उल्लेखात त्या व्यक्तीची नाचक्की करणं नसतं. असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो.
म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे. या प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने बघा. 'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.' असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा.
आणि कितीही प्रयत्न केले तरी शेवटी काही थोर व्यक्तींचा विसर पडणार हे निश्चित.
19 Apr 2011 - 8:05 pm | रमताराम
असूया वगैरे शब्द तुम्ही भावनेच्या भरात वापरले असं गृहीत धरतो.
नाही मुळीच भावनेच्या भरात वापरलेले नाहीत. I mean it. अर्थात ते सर्वसाधारण विधान आहे (म्हणजे वैयक्तिक टीका नाही) हे लक्षात आले असावे हे गृहित धरतो.
म्हणजे मूर्तीभंजनापेक्षा ती कालौघात विरत चालली आहे हे तुमचं खरं दुःख आहे.
आमच्या मूळ मुद्याला बगल देऊन केलेल्या या अवांतराबद्दल आभार. फक्त त्यांचा विक्षिप्तपणा ही त्यांची ओळख शिल्लक राहण्यापेक्षा कालौघात ही मूर्ती विरून गेल्यास आम्हाला अत्यानंदच होईल.
'चला या निमित्ताने या पीढीला ते नाव तरी माहीत झालं, "कोणीतरी थोर होता बहुधा, आणि थोडा विक्षिप्त होता. कोण होता हे जाणून घ्यायला आवडेल"असं कुतुहल तरी निर्माण झालं.'
असं घडेल याची तिळमात्रही शक्यता आहे असं आम्हाला वाटंत नाही. का ते - तुम्ही ज्याला वळसा घालून पुढे आलात त्या - मागच्या प्रतिसादात आलेलं आहेच.
असा विचार करा व त्यांच्यावर एक लेख लिहा.
सूचनावजा आदेशाबद्दल आभार. पण मूर्तीभंजन इतरांनी करावे नि आम्ही ते निस्तरत जावे हे करत बसलो तर सारे आयुष्य हेच करत बसावे लागेल. कारण मूर्तिभंजकांची संख्या प्रचंड आहे आणि ते करायला अभ्यास वा विचार लागत नाही. त्यामुळे अशा लेखांची वारंवारता नि लिहिणार्यांची प्रसवक्षमता अमर्याद आहे. जालावर असे बरेच अनुभव आमच्या गाठीला आहेत जे फारसे उत्साहवर्धक नाहीत.
20 Apr 2011 - 11:48 am | llपुण्याचे पेशवेll
रराशी १०००% सहमत आहे.
21 Apr 2011 - 11:51 am | पक्का इडियट
पूर्णपणे सहमत.
18 Apr 2011 - 10:12 pm | धनंजय
गमतीदार प्रसंग. थोरामोठ्यांच्या (आणि तसेच छोट्यांच्या) व्यवहारातील तपशील बघता असल्या प्रकारची उदाहरणे भरपूर सापडतील, असे वाटते.
जैनांनी शीर्षक "महामहोपाध्याय पोतदारांबाबत विक्षिप्त चुटके" असे दिले असते, तर जास्त शोभले असते. "अहाहा महामहोपाध्याय" मध्ये "महामहोपाध्याय हे बिरुद शोभत नाही" असा काही वास आहे. पण त्या पदवीसाठी पठन-पाठन-मौलिक लेखन हे तीन निकष म. म. का. वा अभ्यंकरांनी सांगितले आहेत; विक्षिप्तपणा असून-नसून पदवी रास्त असण्याशी देणेघेणे नाही.
18 Apr 2011 - 11:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जैन यांचा लेख मूर्तीभंजन नाही, असं वाटणारी मी एकटीच नाही हे वाचून बरं वाटलं.
सहमत आहे.
कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिसादात्/प्रतिवादात तीन चुका असल्याचा उल्लेख केला आहे. मला तरी त्यात एकच चूक दाखवलेली सापडली. असो.
18 Apr 2011 - 10:19 pm | प्रियाली
पोतदारांच्या विक्षिप्तपणाचे चुटके आवडले. त्यातून त्यांचा अभ्यासूपणा किंवा विद्वत्ता कमी जास्त होते असे वाटत नाही. थँक्यूचा किस्सा तर मस्तच. एखाद्याच्या अंगावर वसकन ओरडून त्याला जेरीस आणण्यापेक्षा बरा. तसाही तो लेख सर्किट या सदराखाली आहे त्यामुळे त्याविषयी फार काही वाटले नाही. अशाप्रकारचे विद्वज्जनांचे खरे-खोटे किस्से प्रसिद्ध असतातच. उदा. न्यूटनचा मांजराविषयी, अत्र्यांचे (किंवा त्यांच्या नावावर खपवलेले) वाह्यात विनोद, किशोरकुमारचा विक्षिप्तपणा वगैरे वगैरे.
18 Apr 2011 - 10:20 pm | रेवती
दोन्ही दुवे वाचले.
पहिल्या ष्टोरीनंतर एवढेच वाटले की चला, विचित्र अनुभव काही फक्त आपल्यालाच येत नसतात.;)
दुसर्या ष्टोरीत घेतलेला समाचार जास्त आवडला. खरंतर जयंतराव टिळकांनी आपल्या माणसाची चूक मान्य करायला हवी होती......लगेच! पण मजा वाटली.
18 Apr 2011 - 11:55 pm | चिंतातुर जंतू
पुण्यात कुणाच्या विक्षिप्तपणाबद्दलचे किस्से सांगून त्याचा अपमान करता येतो असे वाटणे हे एक नवलच म्हणायचे. तद्वत "पोतदारांना हास्यास्पद करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न' वगैरे मुद्दे गैरलागू ठरावेत. याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे.
19 Apr 2011 - 12:00 am | मुक्तसुनीत
याउलट 'आजकाल एवढ्यातेवढ्याशाने भावना भडकवून घेण्याच्या खुळापोटी पुण्यात विक्षिप्तपणाचे अधःपतन झाले आहे' असे अरण्यरुदन या धाग्याच्या निमित्ताने करावेसे वाटू लागले आहे.
लई भारी ! :)
19 Apr 2011 - 12:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-D
एक जुना धागा या निमित्ताने आठवला. समाजात विक्षिप्तांची संख्या वाढावी - अरुण टिकेकर
19 Apr 2011 - 1:14 am | चिंतामणी
अरुण टिकेकरांच्या लेखाच्या सुरवातीलाच त्यांनी म्हणले आहे कीप्रवाहाविरुद्ध पोहणार्या विक्षिप्तांची संख्या कमी होत आहे.
वरील अनेक (कुत्सीत) प्रतिसादात त्या उलट मत प्रदर्शन आहे. यामुळे वरील लेखाचा दाखला येथे गैरलागू आहे.
19 Apr 2011 - 8:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
इथले कोणते प्रतिसाद कुत्सित आहेत ते मला समजलं नाही. काही प्रतिसाद माझ्या विचारांसारखे आहेत काही वेगळा विचार करणारे आहेत. पण कुत्सितपणाचा काय संबंध?
विक्षिप्त या शब्दावरून सदर लेख आठवला. एकच शब्द दोन्हीकडे वापरला आहे हे साम्य. चिंतामणी अंकल, माझ्या वरच्या प्रतिसादासाठी आणखी गाईडची गरज पडली तर माझी खरडवही आहेच.
19 Apr 2011 - 2:11 pm | विजुभाऊ
ठेवीले अनंते तैसेची रहावे.
अधूनमधून मात्र प्रयत्न करावे.
अप्रेजलसाठी.....वर्षाकाठी