...और गिटार.. ६ ..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
6 Apr 2011 - 1:30 pm

मराठेसोबतचा हवा तसा मोका आला होता पण मला हवी होती तशी मनाची शांती नव्हती. माझी खूपच फाटली होती. आत्ता जाधव निघून गेला असला तरी तो आता मला तसा सुका सोडणार नव्हता.

तरीपण आत्ता मराठे माझ्यासोबत चालत होती. माझ्याकडे अर्धा तास होता आणि मी काही ना काही बोलणार होतो. जसा विषय वाढत जाईल तसं बोलता बोलता मी तिला स्पष्ट विचारणार होतो. मी वेगवेगळे शब्द काढून ठेवले होते.

म्हणजे ,मी तुझ्यात इन्व्हॉल्व आहे, नुसती मैत्री दोस्ती वाटत नाहीये, तुझं आधी कोणाशी काही असेल तरी बिंधास सांग, तुझा नो असेल तरी पण मैत्री तशीच राहील, आमच्या घरच्यांकडून काही प्रॉब्लेम येणार नाही, मी कितीपण थांबायला तयार आहे..असं खूप काही काही..

तिच्यासोबत चालत राहिलो आणि खूप वेळ झाला तरी थंड शांतता.

"कसा वाटला प्रोग्रॅम?", मी काहीतरी सुरुवात व्हावी म्हणून म्हटलं.. नाहीतर तेच्यायला तिच्या घरापर्यंत असेच स्मशानशांततेत पोचायचो आणि नुसतंच गुडनाईट व्हायचं. मग चाललो आम्ही एकटे घरी ल्यूना डुरकवत.

आता मराठेकडून माझ्यासाठी काय कौतुकाचा शब्द येतो त्याची मी वाट बघायला लागलो.

ती खुदकन हसली आणि म्हणाली, "तू खरंच वाजवत होतास गिटार की नुसतीच धरुन उभा होतास?"

मी दचकलोच. इतका पोपट होईल अशी जरासुद्धा कल्पना नव्हती.

"म्हणजे काय? वाजवत होतो की.. उगाच कशाला उभा राहीन?", मी म्हणालो.

"काय माहीत.. उगीच स्टाईल मारायला असेल..", ती आणखी हसत म्हणाली.

"कोणावर..",

"मला काय माहीत कोणावर ते?.. हीही..", मराठे

आता ते हसणं टिपिकल मुलींसारखं व्हायला लागलं होतं. फिस्स फिस्स करुन. टर उडवल्यासारखं.

मी खूपच नर्व्हस झालो. मला जे बोलायचं होतं ते बोलायला खरं तर सुरुवात चांगली झाली होती. तुझ्यावरच स्टाईल मारत होतो अशी हलकीफुलकी स्टार्ट घेता आली असती. पण तिचं हसणं मला उगीच भेवडवायला लागलं.

"गिटार जाऊ दे..", मी म्हणालो.. "मला तुझ्याशी निवांत बोलायचंय.."

"अं? कशाबद्दल? "

"असंच.."

"मग बोल ना..आत्ता निवांतच आहे की..", पुन्हा तेच हसणं.

"मी तुला मागे बोललो ना की मला तुझ्यात इंट्रेस्ट आहे.."

"......"

"......"

फ्रीजमधे साचलेल्या घट्ट बर्फासारखी शांतता तोडायला हवी होती.

"मला त्याविषयीच तुला विचारायचं होतं", मी धीर करुन म्हणालो..

मराठे गप्पच..तिच्या एकूण विषय लक्षात आला होता. आता मूळ प्रश्न विचारून झाला होता. त्याच्या नंतरची सारवासारव, लिंपालिंपी करणं भाग होतं.. मग मी घाईघाईने पुढे म्हणालो..

"नाही म्हणजे मला तशी घाई काही नाही..नंतरही हा विषय बोलला तरी चालेल..मी आपलं सहज म्हटलं..म्हणजे तुझं इथे कॉलेजात शेवटचं वर्ष आहे ना..मग कुठे गेलीस की कधी भेटशील काय माहीत..म्हणजे तुला नको असेल तर नको..तसं काय कंपल्शन नाही..तुझं काही दुसरं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. . उलटा मदत करीन तुला त्यात पण..म्हणजे फ्रेंडशिपमधे याचा काही फरक होणार नाही.. तुलापण नाय ना होणार काही फरक?..आपण म्हटलं फ्रँक बोलूया.."

मला धाप लागली. तिने आता काहीतरी बोलून मला थांबवायची अत्तिशय गरज होती. मी सुसाट बोलत सुटलो होतो..

ती एकदम गंभीर झाली. आम्ही चालणं थांबवलं. माझं बोलणं मात्र थांबवेना.. उतारावर सायकलचा ब्रेक तुटावा तसं झालेलं. मी तिला नॉर्मलवर आणण्यासाठी बोलतच राहिलो.

"म्हणजे मी काय तुझ्या मागे फिरणार किंवा तुला माझा काही त्रास होणार असं नाहीच आहे. तू हवं तर घरी बोल. माझ्याही घरुन काही प्रॉब्लेम येणार नाही. तुझी करीयर पूर्ण करेपर्यंत मी हवं तर काहीच बोलत नाही या विषयावर..पण मला.."

"थांब जरा.." तिने खाडकन म्हटलं.." मला नाही शक्य, तू म्हणतोस ते.."

मी फटका खाल्ल्यासारखा बोलायचा थांबलो. का शक्य नाही? असं मला विचारायचं होतं. पण घसा सुकला होता. काल केलेली खर्जात आवाज लावून तिच्याशी बोलण्याची प्रॅक्टिस बेकार झाली होती. "का?" एवढंच मी विचारलं पण आवाज खर्जाऐवजी चिरका आला.

"माझ्या मनात कोणीतरी आहे आणि मी ठरवूनही दुसर्‍या कोणाचा विचार करु शकत नाहीये.."

मी एकदम गप्प झालो. आता लिंपालिंपीची पाळी तिची होती.

"प्लीज तू मनावर घेऊ नको. तुझ्यात काही प्रॉब्लेम नाही रे. मी कोणाच्याच बाबतीत असा विचार करु शकत नाहीये. खूप प्रयत्न केला मी.."

असं सेंटी काहीतरी मराठे माझ्याशी पहिल्यांदाच बोलत होती.

"का..? कोण आहे तुझ्या मनात?"

"जाऊ दे ना... सोड... जे होणारच नाही त्याबद्दल कशाला बोलायचं..?"

"तरी पण सांग. मित्र तर मानतेस ना आपल्याला..? तेवढा हक्क आहे ना मला?", मी उगाच म्हटलं. तशी गाढ मैत्री कुठे झाली होती अजून. पण मला तो कोण आहे ते काहीही करुन कळायला हवं होतं. नायतर आधीच झालेल्या डोक्यातल्या शेणात किडे झाले असते.

"सांग..प्लीज..दुसर्‍या गावात आहे का कोणी कुठे?", माझा धीर सुटत चालला..

"नाही रे. मी सरांच्यात इन्व्हॉल्व आहे..", मराठे म्हणाली.."प्लीज कुठे बोलणार नाहीस ना?"

माझ्यावर डोक्यात वीज कोसळली.. "कोण सर? कराटेसर?"

"हं"..

फुकणीच्याने दावा साधला होता.. फसवलं होतं लहान पोरीला आपली बॉडी दाखवून..

"कधीपासून? कसं झालं..?", मी चाचरत म्हणालो.

"दोनतीन महिने झाले..", ती म्हणाली.

मला एकदम "दोनतीन महिने" शब्दांनी धस्स झालं. मग लक्षात येऊन थोडा स्थिर झालो.

"म्हणजे सर काही बोलले का तुला? की वन सायडेड?"

"मला नक्की सांगता नाही येत, पण सरांसोबत मला खूप बरं वाटतं. त्यांची पर्सनॅलिटी आवडते. ते माझ्याशी खूप छान बोलतात."

"छान म्हणजे? काय बोलतात?", मी सरांना तिच्यासमोर शिव्या तरी कशा घालू. अवघड दुखणं झालं.

"म्हणजे माझ्याबद्दल विचारतात. पुढच्या करियरविषयी. ब्लॅक बेल्ट मिळवून देतो म्हणतात.."

"पण हे.. म्हणजे ते इन्व्हॉल्वचं वगैरे काही बोलले का?"

"नाही. त्यांचं तर लग्न झालंय, तुला माहीतेय. पण बायको त्यांच्यासोबत राहात नाही असं ते म्हणाले..त्यांचे खूप पर्सनल प्रॉब्लेम आहेत लग्नामधे. ते सगळं माझ्याशी बोलतात.."

आयचा.. सर गुरुघंटाल मनुष्य वाटतच होता मला..ते खरं निघालं..पूर्णपणे जाळ्यात वेढली होती मराठेला त्याने..बायको जवळ राहत नाही..आणि काय काय सांगितलं असेल कोण जाणे भडव्याने.

"अगं. हे बघ. तुला आत्ता पटणार नाही, मला माहीत आहे..पण या सगळ्यातून तुला त्रासच होईल..सरांची नियत चांगली आहे असं खरंच वाटतंय का तुला?"

"तुला असंच वाटणार रे..सगळे त्यांच्याविषयी घाणेरडं बोलतात..तू पण बोलतोस..तुला कसं सांगू? सर खूप चांगले आहेत. आणि या फीलिंग्ज खर्‍या आहेत अशी माझी खात्री आहे. मी त्या घालवू नाही शकत"

मी अर्थात तोंडात बोळा घातल्यासारखा निरुत्तर झालो. बोळ्याऐवजी इथे नरड्यात निखारा कोंबलाय असं वाटायला लागलं. थंड पाणी हवं होतं. पण इथे ते मिळणार नव्हतं...अजून सोसायला हवं होतं..

गप्पपणे चालत आम्ही तिच्या घरापाशी पोचलो. ती नुसतीच "बाय" करुन गेली. खरंच ती गेल्याचं यावेळी कळलंही नाही.
मला दिसत होतं एवढंच की मी पुरता शेणात गेलो होतो. मराठेकडून लाथ मिळाली होती. त्याउप्पर डोक्यात गोळी घालावी तशी सरांविषयीची न्यूज तिने मला सांगितली होती. जाधव डूख धरून निघून गेला होता. तो नक्कीच दिवसरात्र आता मला तुडवण्याची वाट बघणार होता.

आणि या सर्वात मराठेची कायम मनाशी धरलेली सोबत सुटली होती..

घराकडे जाताना ल्यूना पादल्यासारखे आवाज करत होती. भिकारचोट.

(पुढच्या सिक्वेलपर्यंत समाप्त..किंवा पॉज..)

वाङ्मयभाषाशिक्षणमौजमजाप्रकटनआस्वाद

प्रतिक्रिया

सातबारा's picture

6 Apr 2011 - 1:40 pm | सातबारा

गवि, काय लिहीता राव तुम्ही !

तोडलत.
जाम उत्सुकता लागून राहिली होती. सर्व भाग आधाशासारखे वाचले.
खासच !

पैसा's picture

6 Apr 2011 - 1:42 pm | पैसा

खरं तर या भागाच्या शेवटी क्रमशः असतं तर आवडलं असतं.

अतिषय छान .. आणि कलाटनी ही जबरीच ..

"तुला असंच वाटणार रे..सगळे त्यांच्याविषयी घाणेरडं बोलतात..तू पण बोलतोस..तुला कसं सांगू? सर खूप चांगले आहेत. आणि या फीलिंग्ज खर्‍या आहेत अशी माझी खात्री आहे. मी त्या घालवू नाही शकत"

सगळ्या मुलींचे चुकीच्या गोष्टीत असेच म्हणने असते असे माझे मत ... तो कराटे सर तर मला पण आवडत नाहीये ... बिच्चारा हिरो ...

५ व्या भागा नंतर जेव्हड्या पटकन हा भाग आला तसाच वेग पुढच्या भागांसाठी रहावा ही मनोमन इच्छा ..

लिहित रहा .. वाचत आहे ..

स्पा's picture

6 Apr 2011 - 2:07 pm | स्पा

घराकडे जाताना ल्यूना पादल्यासारखे आवाज करत होती. भिकारचोट.

__/\__

गवि तेवढं क्रमश: टाका पटकन

मस्तच ...

अजून १ शंका
जाधव ला पटवून, हिरो कराटे सरांचा ब्यांड वाजवतो का काय?

प्रचेतस's picture

6 Apr 2011 - 2:04 pm | प्रचेतस

गवि फारच छान लिहिताय तुम्ही. प्रकरणाला एकदम वेगळंच वळण दिलंत. त्या वळणावरून आता आम्हाला लवकरात लवकर फिरवून आणा.

आदिजोशी's picture

6 Apr 2011 - 2:26 pm | आदिजोशी

हान तिज्यायला :)

प्रीत-मोहर's picture

6 Apr 2011 - 2:48 pm | प्रीत-मोहर

ओ पॉज का केलत? चला पट्दिशी क्रमशः टाका लेखाखाली....

सौप्र's picture

8 Apr 2011 - 9:54 pm | सौप्र

हेच म्हणतो

असुर's picture

6 Apr 2011 - 3:07 pm | असुर

आयला, जिथेतिथे हे सर लोक का मधे येतात राव?? की पोरींना असले विनयशील/ब्लॅकबेल्ट सरच आवडतात? असं असेल तर पोरांनी काय करायचं?
गवि, केव्हढे प्रश्न पाडलेत तुम्ही? सोडवा आता हे सगळे प्रश्न!!

"बरसात चांदण्यांची" या सुशिंच्या पुस्तकाची राहून राहून आठवण होतेय. तुमच्या लिखाणालाही तसाच स्पीड आणि तशीच डेप्थ आहे. जियो गवि!!!

--असुर

परिकथेतील राजकुमार's picture

6 Apr 2011 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार

की पोरींना असले विनयशील/ब्लॅकबेल्ट सरच आवडतात?

काही मुलींना फक्त 'विनय सर' आवडतात ;)

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 5:33 pm | वपाडाव

आता नेटाने नेट-सेट देउन, एखाद्या कॉलेजात जाउन लेक्चरर व्हावे असे वाटुन गेले आहे.

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 4:12 pm | धमाल मुलगा

शेवटी 'शाळा'च झाली म्हणायचं की राव! :(

आनंदयात्री's picture

6 Apr 2011 - 8:18 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. बाकी कडक झालीये लेखमाला. संपवलत, आता उद्या काय वाचायला मिळणार याची हुरहुर नाही :(

आचारी's picture

6 Apr 2011 - 4:42 pm | आचारी

लै भारी !! तोडलस मित्रा !!

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 5:31 pm | वपाडाव

हेच तर नव्ह्तं पायजे ना....
मायला त्या कराटे सरांच्या...
आत्ता जौन मुस्काट फोडु आपण...

मायला मला वाटलं तुमी ५० फक्त च्या लग्नाला जोडगोळीनं येताय क काय आर्शिवाद द्यायला...(माहिती आहे.. हे आशिर्वाद असं लिहिल्या जातं)
पण ह्या मास्तराच घोडं मारलं...

मागच्या प्रतिसादात शिरोडकर लिहुन चुक केल्यासारखं वाट्टंय...

तुम्ही नुसतेच प्रश्न निर्माण करून ठेवलेत.
ते काही नाही. लवकर पुढं काय झालं ते लिहा.
इतके भाग वाचकांनी धीर धरला आणि शेवटी हाती काहीच न लागल्यामुळे वैताग आलाय.;)

फक्त "और गिटार" संपलं असलं तरी मराठे,केळकर,परांजप्या,जाधव आणि सर अजून आहेतच. आणखीही खूप काही.सध्या पॉज आहे फक्त. डाव खतम नाही.सर्व वाचकांना "इन्व्हॉल्व"मेंटबद्दल असंख्य धन्यवाद..पुढचा सिक्वेल लवकरच येईल.

विजुभाऊ's picture

6 Apr 2011 - 6:02 pm | विजुभाऊ

तुमची ल्यून लैच भारी रे भाऊ
मूड बघून आवाज करते

हरिप्रिया_'s picture

6 Apr 2011 - 6:17 pm | हरिप्रिया_

सही लिहिता तुम्ही...
क्रमशः असल की पुढचा भाग लवकर हवा असतो आम्हाला...
आणि आता तुमचा समाप्त किंवा पॉज पाहून क्रमशः टाका आणि मग लवकरात लवकर पुढचा भाग टाका अस वाटत आहे...
तरी पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

मुलूखावेगळी's picture

6 Apr 2011 - 6:26 pm | मुलूखावेगळी

अ‍ॅट द एन्ड
देवदास बनाया आपने...... :(

स्मिता.'s picture

6 Apr 2011 - 6:57 pm | स्मिता.

अहो गवि दा, किती इंटरेस्ट घेऊन वाचत होते मी सर्व भाग आणि तुम्ही समाप्त लिहून टाकलत!
सर्व भाग लई भारी होते. वाचताना वाटत होतं की माझ्या कॉलेजातच हे सगळं घडतंय.
आणखी लिहा.

छान लिहिले आहे..
शेवट काहीस अपेक्षित होता.
आवडली कथा.

५० फक्त's picture

6 Apr 2011 - 7:16 pm | ५० फक्त

गवि, एक वेगळाच टर्न दिलात शेवटी. पण सत्यप्रेमकथा या अशाच असतात.

आवडला गिटार ते कराटेचा प्रवास अतिशय छान होता.

तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Apr 2011 - 8:32 pm | निनाद मुक्काम प...

गवी
पुढच्या सिझन ची वाट पाहत आहे .

भडकमकर मास्तर's picture

6 Apr 2011 - 9:55 pm | भडकमकर मास्तर

ये ब्बात.. मस्त आहे..
आता आलं लक्षात
तुम्ही आता कादंबर्‍यांची प्रकरणं तयार कय्ताय.... मस्त ..
भारी कादंबरी होतेय तयार...
मी विकत घेऊन वाचेन...

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2011 - 7:41 pm | नगरीनिरंजन

अयसा हय क्या? तर मग गवि माझी मागणी नोंदवून घ्या लगेच!

शिल्पा ब's picture

6 Apr 2011 - 11:06 pm | शिल्पा ब

मस्त.

किशोरअहिरे's picture

7 Apr 2011 - 1:50 am | किशोरअहिरे

लवकर टाका पुढचा भाग..
वाट बघतोय :)

स्पंदना's picture

7 Apr 2011 - 4:15 am | स्पंदना

मस्तच!

चिगो's picture

8 Apr 2011 - 7:29 pm | चिगो

गवि, पैले तर सलाम कुबुल करा तुम्ही.. "और गिटार" एकदमच अधाश्यासारखी वाचुन संपवली. खुपच झक्कास आहे. खरोखर बरेच दिवसांनी अस्सल लिखाण वाचायला मिळालं. सुशि माझे आवडते लेखक आहे, आणि असुर प्रतिक्रियेत बोललाय तसं, तुम्ही त्यांच्या काही राडा+ हळुवार प्रेमकथांची आठवण करुन देताय..
धन्यवाद... आमचे मिपाव्यसन सार्थकी लावताय तुम्ही...

दाद्या, पायजेल तेवढा वेळ घे लिव्हायला पन पोरगी आपल्या हिरोला मिळायला पायजेल बग !

सुनील's picture

9 Apr 2011 - 5:31 am | सुनील

छान लेखमाला!

किशोरअहिरे's picture

12 Apr 2011 - 1:22 am | किशोरअहिरे

गवि.. तुम्ही हे लेखन ईतरत्र पण प्रकाशित करत आहात का?
मी आणखी एका संकेत स्थळावर हीच कथा कॉपी पेस्ट केलेली पाहिली
"नचिकेत गद्रे" ह्या आय डी खाली.. हा तुमचा आयडी आहे का?

गवि. पॉज किंवा समाप्ती नको राव. पुढचा सिक्वेल लवकर येउ द्या.

- सूर्य.

स्वाती दिनेश's picture

21 Apr 2011 - 12:58 pm | स्वाती दिनेश

एकदम झक्कास!
'शाळा' आणि 'दुनियादारी' आठवत राहिली वाचताना..
आवारगी आणि गिटार आत्ताच वाचून संपवली, पुढच्या सिक्वलची फार वाट पहायला लावू नका गवि,
स्वाती