उपाय सुचवाल ?

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
11 Mar 2011 - 4:26 pm

मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

समाजराहणीराहती जागासल्लामदत

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

11 Mar 2011 - 4:29 pm | सुहास..

नानाला विचारा !!

बरेच बोके आणि नख काढण्यार्‍या मांजरी सरळ केल्यात त्याने ;)

सचिन भालेकर's picture

12 Oct 2012 - 7:46 am | सचिन भालेकर

गाडी विकुन टाका........ :)

स्वैर परी's picture

11 Mar 2011 - 4:31 pm | स्वैर परी

गाडीच्या प्लॅस्टिक अंथरुन त्यावर फेव्हिकॉल लावुन ठेवा आणि कव्हर टाका. बोका त्यावर बसला कि त्याला चिकट चिकट काहीतरी जाणवेल. मग तिथुन निघुन तो जिथे बसेल, तिथे चिकटुन राहिल.
शिवाय पुन्ह कधी बसायाला/झोपायला येणार नाही , बाईकवर!

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 4:36 pm | उगा काहितरीच

फेव्हिकॉल फार लवकर सुकतं!

गुंड्या बावळा's picture

12 Mar 2011 - 9:25 am | गुंड्या बावळा

तुम्ही पण बोका पाळा, जो शेजार्याँना त्रास देईल,....

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 9:40 am | पिवळा डांबिस

तुमची हरकत नसेल तर मला पाळा!!
मी तेव्हढ्यासाठी फेंदारलेल्या मिशा वाढवायला तयार आहे....
तुम्हाला त्रास देणार्‍या बोक्याची सॉलिड वाट लावतो!! (खरं तर सॉलिड मारतो असंचं म्हणणार होतो
पण संपादकीय धोरण वगैरे हॅ हॅ हॅ...)
मानधनाची अपेक्षा नाही...
पण आम्हाला दर दिवशी नॉनव्हेज आणि वीकांताला शिवास लागते हे लक्षात असू द्या म्हणजे झालं!!!!
;)

टारझन's picture

12 Mar 2011 - 9:52 am | टारझन

=)) =)) =)) =)) आगायायाया ... एकदम मुक्तहस्त चित्रकला चाललीये पिडा .. क्या खाया क्या है ?

म्याच आहे ५ तासांनी .. :)

विनायक बेलापुरे's picture

11 Mar 2011 - 4:36 pm | विनायक बेलापुरे

हरकत नाही. एकदा शेजार्‍याला सडकून बघा. ;)

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 4:41 pm | उगा काहितरीच

प्रयत्न झालेला आहे! यश नाही!!

विनायक बेलापुरे's picture

11 Mar 2011 - 4:54 pm | विनायक बेलापुरे

हरकत नाही. एकाच प्रयत्नात यश नाही येत कधी कधी.
बोक्यालाच घरातून बाहेर पडायची दहशत बसेल तोपर्यंत प्रयत्न सुरु ठेवा.

धमाल मुलगा's picture

11 Mar 2011 - 4:55 pm | धमाल मुलगा

काय फिस्स्स्सकन हसलोय राव! :D
ह्यॅ:! हे आमचे विनायकरावही जरा डेंजरफुलच हैत राव. कधी कसला यॉर्कर टाकतील नेम नाही.

अवांतरः तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे.

रमताराम's picture

11 Mar 2011 - 5:23 pm | रमताराम

तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे.
एका संन्याशाची गोष्ट आठवली (ओशोंनी सांगितली असावी बहुधा.). एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले.

तर हे असं असतं बघा. काहीही पाळण्यापूर्वी आधी विचार करा हा प्रेमळ सल्ला.

निवेदिता-ताई's picture

11 Mar 2011 - 6:22 pm | निवेदिता-ताई

हा हा हा ..............

सुहास..'s picture

11 Mar 2011 - 4:42 pm | सुहास..

तुम्ही मांजर पाळा ;)

सूर्यपुत्र's picture

11 Mar 2011 - 7:47 pm | सूर्यपुत्र

असेच म्हणणार होतो...

किंवा पेट्रोलची नळी इंजनातून काढून ठेवा. पेट्रॉल कोक बारीक चालू ठेवा. बॉका बसताक्क्षणी पेट्रोलला काडी लावा. गॉका आणि बॉडी दोन्हींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होयेल.... ;)

-सूर्यपुत्र.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार

गाडी विका.

टारझन's picture

11 Mar 2011 - 5:18 pm | टारझन

अन्यथा सगळ्या समस्यांवर एकंच उपाय आहे .. जग सोडा :) रामबाण इलाज !!

पंगा's picture

12 Mar 2011 - 8:58 am | पंगा

जग सोडा :) रामबाण इलाज !!

त्यांना बोक्यावर इलाज हवाय. हँगओव्हरवर नव्हे.

एक मस्त गुब्गुबित मांजर पाळा ,अन तिला गाडिपासुन दुर बांधा ,तिथेच झोपायला काहीतरी टाका... :)

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2011 - 4:47 pm | नगरीनिरंजन

कव्हरखाली पाण्याने भरलेले दोन टब ठेवत चला सीटवर. आठवडाभर असं केल्यावर बोका फिरकणार नाही याची खात्री बाळगा.

sagarparadkar's picture

11 Mar 2011 - 4:47 pm | sagarparadkar

एक दिवस पाण्याची बादली घेवून लपून / दबा धरून बसा. बोका येउन गाडीच्या कव्हरमधे जाऊन झोपला, की हळूच पुढे जाऊन एका हातानी त्याला कव्हरमधेच जाम धरून ठेवा, आणि दुसर्‍या हाताने बादलीतले पाणी त्याच्या अंगावर ओता.
:) :) :)

सलग २/३ दिवस हाच नित्यक्रम चालू ठेवा. मग परिणाम पहा.

स्वतन्त्र's picture

11 Mar 2011 - 4:49 pm | स्वतन्त्र

पहिले गाडीला कवर घट्ट बांधा जेणेकरून बोका आता शिरणार नाही.

त्यानंतर गाडीच्या टाकीवर आणि सीटच्या भागावर,दुधवाले दुधाच्या पिशव्या ठेवायला वापरतात तसल्या लाम्बुकळे टाक्या पाणी भरून ठेवा.

बोका पाण्यात बसूच/ झोपू शकणार नाही !

करून तर पहा !

नितिन थत्ते's picture

11 Mar 2011 - 4:57 pm | नितिन थत्ते

कुत्रा पाळा.

sagarparadkar's picture

11 Mar 2011 - 4:57 pm | sagarparadkar

वरील प्रमाणे जलतत्वाचे उपाय करून झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी गाडीवर बसण्यापूर्वी रेनकोटची पँट वापरायला विसरू नये. नाहीतर बोक्याच्या ऐवजी आपलीच फजिती व्हायची :) हलकेच घ्या ... :)

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2011 - 5:01 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ

वाचनीय धागा
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत

असहकार's picture

11 Mar 2011 - 5:06 pm | असहकार

डांबर गोळ्या ठेवा,(napha balls/ odonil)

पप्पू's picture

11 Mar 2011 - 5:09 pm | पप्पू

शेजार्याला एकदा बोच्कारा !!!!!!!!!!!!!!!

पप्पू's picture

11 Mar 2011 - 5:10 pm | पप्पू

तुमच्या गाडीचे कवर एकदा त्यांच्या गाडीला घाला

ज्ञानेश...'s picture

11 Mar 2011 - 5:13 pm | ज्ञानेश...

अ)गाडी साईड स्टँडवर लावा. बोका पडेल.

किंवा

ब)बोक्याची नखे कापा.

पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे शेजार्‍यासाठी सुन्दरसे घर बान्धून द्या! ;)

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 5:25 pm | उगा काहितरीच

उत्तम आहे !!पण मिच त्या घरात जानार नाही का ?
दुस-याला घर बांधुन द्यायची आवास योजना सुचतेय का एखादी?

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 5:20 pm | उगा काहितरीच

अ)
--> गाडी साईड स्टँडवरच असते!

ब)
-->शक्य नाही!!

रमताराम's picture

11 Mar 2011 - 5:27 pm | रमताराम

चुचु पण डु आय डी घेऊन आली आहे की तिने ******क धाग्यांचे क्लासेस चालू केले आहेत? (नाहीतरी बुटिक, किराणा मालाचे दुकान नि हाटेलाचे दिवाळे काढल्यावर काही नवा रोजगार चालू केल्याचे ऐकिवात नाही.) हल्ली अशा धाग्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे असे निरीक्षण आहे.

प्रीत-मोहर's picture

11 Mar 2011 - 8:02 pm | प्रीत-मोहर

ररा आजोबा इन्श्योरन्स पॉलिसी घेत्लीत का तुम्ही...?

अरुण मनोहर's picture

11 Mar 2011 - 5:29 pm | अरुण मनोहर

>>गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)<<

हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते.

असो. बोक्याला मांजरीचे आमिष दाखवून पार्लर मधे घेऊन जा आणि (त्याची) सगळी नखे कापून घ्या.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 5:38 pm | परिकथेतील राजकुमार

असे करा... तुम्ही एकदा शेजार्‍याचा पलंगावर जावुन झोपा.

रमताराम's picture

11 Mar 2011 - 5:42 pm | रमताराम

बोक्याला तुमच्या पलंगावर आणून झोपवा आणि तुम्ही स्वतः कव्हरमधे जाऊन झोपा.

नि३'s picture

11 Mar 2011 - 5:46 pm | नि३

कहर्..आहे.

हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते.

आणि समजा जर कव्हरला कुलूप असेल तर बोका कसा आत घुसु शकतो??

Point to be noted mylord.

आणि हे लिहीता लिहीता सुचले कि,एखादे कुलूप वाले कव्हर मिळत असेल तर बघा.

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 5:50 pm | उगा काहितरीच

कव्हरला कुलुप लावता येत नाही. कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी !

कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी !

एवीतेवी पेट्रोल जाणारच आहे किमान कव्हर न टाकुन टाकीवरले/सिटवरील ओरखडे वाचवावे आणी हो कव्हर पण जाऊ शकते ना चोरी तर तेही वाचेल.

त्याबरोबर पेट्रोल पण वाचवायचे असेल तर गाडी empty करुन ठेवा म्हणजे पेट्रोल पण वाचेल.

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 6:09 pm | उगा काहितरीच

अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!!

अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!!

हा हा...हा..

ब्लेडचे ओरखडे कोण करतो आता?? बोका??..?

तुमचा प्रश्न बदला मग आता..तुम्हाला बोका as well as जो कोणी ब्लेडचे ओरखडे करतो त्यावर ऊपाय पाहीजे.

निवेदिता-ताई's picture

11 Mar 2011 - 6:28 pm | निवेदिता-ताई

चालू दे ...........छान चाललय??????
त्या बोक्याला पकडा................आणी लांब गावाबाहेर सोडुन या....शेजार्याच्या नकळत...

१) बोक्याच्या गळ्यात घंटा बांधा..
त्यामूळे बोका आलेला कळेल..

२)पहारा करा

३) नेमबाजी शिकुन घ्या..बोक्यावर दगड मारायला उपयोग होइल

४) "बोक्या सातबंडे" चा सल्ला घ्या... ;)

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 5:59 pm | उगा काहितरीच

१)
-->मांजराच्या ( मर्जार कुळाच्या कोनत्याही सदस्याच्या) गळ्यात घंटा कोण बांधनार ?
२)
-->जमनार नाही ! ( मी गुर्खा नाही हो!!!)
३)
-->गाडीला लागला तर ?
४)
-->कुठे मिळतात हे ? मिपा वर आहेत का ?

पाहुन मन व्याकुळ झाले.गाडी पार्किग करण्यासाठी जागा नसताना कशासाठी गाडी घेतलीत?
सदर शेजारी देखिल सरकारी निवास्थानात राहत असेल तर सरकारी निवास्थानात पाळीव प्राणी पाळता येतात का ह्याची चौकशी करा. बोक्याचा त्रास होत असेल तर पाजंरपोळात जावुन तक्रार करा व बोका पकडुन नेण्याची व्यवस्था करा.तसे नसेल तर बोका पकडुन खाणारे लोक तुमच्या गावात/शहरात कुठे राहतात ह्याचा शोध घ्या व त्याना सुपारी द्या.

नितिन थत्ते's picture

11 Mar 2011 - 6:18 pm | नितिन थत्ते

असेच करा.

बोक्यांना मेनका गांधी + न्यायालय यांचे संरक्षण नाहीये.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 6:20 pm | परिकथेतील राजकुमार

बोक्यांना मेनका गांधी + न्यायालय यांचे संरक्षण नाहीये.

त्यामुळेच आमच्या नानाचे मिपावर हालहाल होतात :(

उगा काहितरीच's picture

11 Mar 2011 - 6:20 pm | उगा काहितरीच

कॉलेज भरपुर लांब आहे हो ! ऑटोत जायची लाज वाटते, बाकी कोणतेच वाहन उपलब्ध नाही ( बस , ट्रेन , जहाज,हॅलीकॉप्टर, विमान, हॉव्हरक्रॉफ्ट, जेटपॅक, सायकल, बेलगाडी, इ इ ) आणि हो आमच्याकडे बोका खात नाहीत (मिपावर पाकक्रुती टाका म्हनावं)

gogglya's picture

29 May 2015 - 12:41 pm | gogglya

ती पाक्रु अन्डे घालून कशी करायची हे पण लिहा...

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2011 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

एक काम करा... उद्या संध्याकाळी भेटा. मी चार पाच मैतर गोळा करतो आमचे मिपावाले. त्यांना घोट घोट पाजा.. बोका आणि बोक्याचा मालक दोघांचा त्रास संपवतो.

वेळ पडली तर तुमचा पण अवतार संपवतो ;)

इरसाल's picture

11 Mar 2011 - 6:50 pm | इरसाल

तिथे पुपा लावा ' बोक्यांना बसायला सक्त मनाई आहे. बसल्यास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). बोका जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल.

त्या बोका पकडुन न्या म्हणण्याचा अवकाश लगेच येवुन जाळे लावुन जातात.
पारधी लोक देखिल बोके पकडुन नेतात.

नगरीनिरंजन's picture

11 Mar 2011 - 9:59 pm | नगरीनिरंजन

वैदु लोक खातात बोके-मांजरी.

मस्त कलंदर's picture

11 Mar 2011 - 7:35 pm | मस्त कलंदर

यावरून नरेशकुमारांचा 'बायकोला काय भेटवस्तू द्यावी' धागा आठवला. त्यांनी प्रत्येक सल्ल्याला भिरकावलं होतं तसेच हे 'उगाच काहीतरी' पण करत आहेत..

बाकी, अशा धाग्यांकरता मालकांनी खिशातले (पदरचे पैसे म्हटलं नाहीय) पैसे खर्चून खफची सोय केली आहे असं ऐकिवात आहे.. खरं खोटं नीलकांत जाणे.

ह्या आल्या लगेच मिपाच्या कैवारी..
तिकडे शिणियर लोकं म्हणतात की मिपावर पुर्वी सारखा धुडगुस होत नाही.
आता तुम्ही स्वतः धुडगुस घालुन मिपाच जुन वातावरण परत आणत नाही. वर जो कोणी असा प्रतत्न करतोय तर त्याच्या तंगड्या खेचायला लागलात.
....कस होणार मिपाचं ?

नरेशकुमार's picture

14 Mar 2011 - 9:23 am | नरेशकुमार

गैरसमज झाला आहे.
माझी पोस्ट निट वाचली असती तर जी काही उत्तरे आली ती मला नको होति हे अगोदरच पोस्ट मधे सांगितले गेले होते. तरी सुद्धा ति लोकांनी तशिच उत्तरे दिलि. पुढे काही अवांतर प्रतिसादामुळे त्याला वेगळेच रुप आले.
संपादकांना याबाबत विचारना केली होति. उत्तर आलेले नाही. पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट मी सिरियसली काढ्ली होति. काही जनांनि विचित्र प्रतिसाद देउन त्याला ग्रहन लावले. आनि ति पोस्ट उडाली.

जाउदे. तो विशय नको.
पन कोनी एकाच्या प्रामानीक भावनांना चेश्टेचे रुप का देतो देव जाने.

नाही आवडत तर त्याकडे दुर्लक्श करावे. कोनि कोनाला बळजबरी करत नाही इथे प्रतिसाद द्यायला.
पन उगा मन दुखावतील असे प्रतिसाद कोनी देउ नयेत. प्रत्येकाच्या भावनांचि कदर करता येत नसेल तर निदान दुखावु नयेत.

तसे हि ( उपाय सुचवाल ? प्रेषक 'उगा काहितरीच') पोस्ट मला व्यकित्गत आवडली नाही,
पन उगा त्याला नावे ठेवन्याचा मला अधिकार नाही. म्हनुन मि प्रतिसादही दिला नाही.

अवांतर : मि बायकोला भेट वस्तु घेउन दिलि. एक बॉडी (बॅक, फूट ) मसाजर घेउन दिले. नोंद घ्यावी.
पुढिल प्रतिसाद गमतिने घेने : (ते मी सुद्धा वापरतोच, पन नाव बायकोचे. कशी काय वाट्ली आयडीया ?)

पुन्हा एकदा सांगतो ति पोस्ट मी सिरियसली काढ्ली होति.

पण मी म्हंतो, ही काय जागा अहे का सिरियस होण्याची?? असल्या गोष्टी व्य. नि. करुन विचारायच्या. असं फेपरात छापुन का विकायचं? त्यात पुन्हा भेळ-वडापावचे मसाले लागले की चविष्ट होणार. लोक बोटं / जिभल्या चाटत खाणार....
असो. मी त्यावेळी मिपावर सक्रिय नव्हतो. मजा आली असती वाचायला.
आतातरी ह. घ्यायला शिका !!!!
-------------------------------
(मिळालेल्या मौक्याचा फायदा उठवणारा)

नरेशकुमार's picture

14 Mar 2011 - 11:30 am | नरेशकुमार

अहो मि दुसर्‍यांचे हलकेच घेतले होते पन आमचे जड झाले होते.
जाउद्या हो तो विशय.

का लोकं गडे मुडदे उखडतात ठावुन नाय राव.
सोडा राव. विशय क्लोज

योगी९००'s picture

11 Mar 2011 - 7:42 pm | योगी९००

पुढील उपाय करून पहा

उपाय एक :
१) एक टोपली घ्या.
२) नंतर एका बाजूने टोपली उचलून ती एका काडीच्या सपोर्टवर उलटी ठेवा.
३) अशा एका काडीच्या सपोर्टवर असलेल्या उलट्या टोपलीत एका बशीत दुध ठेवा.
४) काडीला दोरा बांधा आणि त्या दोर्‍याचे दुसरे टोक पकडून लांबवर लपून रहा.
५) बोका दुध प्यायला आत शिरला की त्या दोरीने काडी ओढून बोक्याला उलट्या टोपलीत पकडा.
६) नंतर आतमध्ये हात घालून बोक्याकडून थोडे बोचकरून आणि चावून घ्या. या बेसिस वर पोलिसाकडे तक्रार करा आणि शेजारी आणि बोक्याला पोलिसांच्या ताब्यात द्या.

उपाय दोन :
१) बोका जेथे झोपतो तेथे रोज नवनवीन मांजरीचे चित्र लावा.
२) काही दिवसांनी मग बोक्याला ओकं बोकं वाटायला लागेल. मग तुम्हीच मांजराचे कातडे पांघरा.
२) बोक्याला वरील कातडे पांघरून भुलवा. (पुढची जबाबदारी तुमची...)

उपाय तीन :
१) टॉम आणि जेरी मधील जेरीला बोलवा. तो आपोआप बोक्याला बदडेल.
२) टॉम आणि जेरी मधील बाकीची कॅराक्टर्स (सिंह, हत्ती, कुत्रा वगैरे...जे जेरीचे मित्र असतात) त्यांना बोलवा आणि त्यांचे बोक्याशी भांडण लावून द्या.
३) ट्विव्टी बर्ड ला बोलवा.

उपाय चार :
तुम्हीच एक बोका पाळा. त्याचे वरील बोकाळलेल्या बोक्याशी भांडण लावून द्या. तुमच्या बोक्याला वरील बोक्याची झोपायची जागा allocate करा आणि मजा पहा.

गुंड्या बावळा's picture

12 Mar 2011 - 9:34 am | गुंड्या बावळा

वास्तविकत: आपलेच नाव jerry हवे,.....,.
तो JERYA तुमच्या कडेच शिकत असेल :-D

रामदास's picture

11 Mar 2011 - 8:16 pm | रामदास

सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. याचा अर्थ बोका एकटा झोपत नाही.टाकीवर पुरेशी पकड (ग्रीप)न मिळाल्याने ओरखळे उठतात. काही दिवसानी ओरखळ्यांची नवलाई संपली की तो गपगुमान झोपून राहील. या बाबतीत दुय्यम स्वरुपाचे असे काही प्रश्न मनात येतात. तो झोपण्यापूर्वी वेगवेगळे आवाज काढतो का ? तसे असेल तर प्रकरण नविन आहे. आवाज नसेल तर भाटी जुनीच आहे असे समजा. सिटवर सकाळी केस मिळतात का ते बघा. कदाचीत भाटी येत नसेल पण बोका दाढी करत असेल .केस आढळले नाहीत तर तो बोका नसून भाटी आहे असे समजा .भाटी बोक्यापेक्षा वस्ताद असते आणि तिची नखे तिक्ष्ण असतात. नखांवरून भाटी आहे की बोका ते समजते. अंगपरीक्षा करावयाचा प्रयत्न करू नये.काहीवेळा गळ्यापर्यंत उडी मारून जुगुलर का काहीशा नावाची नस पकडते.जुगुलरचा आणि जुगण्याचा काही संबंध नाही.त्या नसा वेगळ्या . त्यांची नावे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला विचारावी. पराचा अभ्यास बरा आहे असे म्हणतात बॉ. पूर्वी धम्याला पण मांजरी पाळण्याचा षौक होता म्हणे. पण त्याला नोकरी लागली .त्याखेरीज मिपावर एक कृष्णमार्जार प्रेमी नावाचा मुलग्या आहे. त्याला विचारा. तूर्तास त्या मार्जारावर लक्ष ठेवा . ते आत झोपले की वरून मच्छरदाणी घाला. नंतर सिटवर (गाडीच्या ) पाणी ओता. हे पाणी ओतण्यापूर्वी कोसला नावाची एक कादंबरी वाचा. त्यात मांजर हाकलण्या/पकडण्यासाठी एक आख्खा धडा आहे. ह्या धड्यामुळे ते लेखक अजूनही बोक्यासारखी मिशी ठेवतात. हां तर मी सांगत होतो ते पाणी ओतण्यासाठी .पाणी ओतले की कुत्र्याचा पण मूड जातो.पूर्वी असं काही आमच्या घराच्या समोर असं काही आलं की आमचा गडी पाणी ओतायचा ते आठवलं. हां तर मच्छरदाणी. काळ्या रंगाची नको. फार पूर्वी गिरणगावात एकाच रुम मध्ये दोन कुटुंब राहयची तेव्हा काळ्या मच्छरदाणीचा वापर केला जायचा. मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल. पाणे ओतल्यावर मार्जार बाहेर येईल .त्याची नखे मच्चारदाणीत अडकतील .मग मच्छरदाणीमें मांजर. त्यानंतर पुण्यात असाल तर लकडीपुलावर जा. लकडीपूल माहीती नसेल तर मिपावर एक लेख आला होता लकडीपूलाचा तो वाचा. तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की दुचाकी वाहनाला प्रवेश नाही. नो प्रॉब्लेम तुम्ही सरकारी नोकर आहात. तुम्हाला कोणीच प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला प्रश्न पडला तर तर ....मिपावर पुढचा धागा टाका.

ठॉ ठॉ ठॉ...
रामदास काका फुल फार्मात.. =))

मैत्र's picture

14 Mar 2011 - 2:51 pm | मैत्र

फुल्ल्ल्ल फॉर्मात....

मेलो.... लोक खरोखर पहायला लागले वेड्यासारखं हसताना पाहून.. अ श क्य ...

पैसा's picture

11 Mar 2011 - 8:34 pm | पैसा

रामदास काका सांगतात तसं करा. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. बोक्याशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर मासे खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण गाडीची/कव्हराची वाट लावणार नाही.

मस्त कलंदर's picture

11 Mar 2011 - 8:40 pm | मस्त कलंदर

नुसती हसतेय खो खो...

निवेदिता-ताई's picture

11 Mar 2011 - 10:14 pm | निवेदिता-ताई

:)

धमाल मुलगा's picture

11 Mar 2011 - 8:47 pm | धमाल मुलगा

मेलो मेलो मेलो....ठार मेलो!

रामदासकाकांचा आयडी हॅक झालाय वाटतं. ;)
पण ..अर्रर्र...नाही नाही...नीट लक्ष देऊन बारीक वाचलं तर पेश्शल पंचेस घावले! काका (ऑन द) रॉक्स...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2011 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Mar 2011 - 12:19 am | मिसळलेला काव्यप्रेमी

ज ह ब ह र्‍या........
फुटलो....... =)) =))

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2011 - 3:18 am | पिवळा डांबिस

टिचला बोक्याचा मायना!!!!
;)

धमाल मुलगा's picture

15 Mar 2011 - 7:24 pm | धमाल मुलगा

आता मात्र ठार मेलो !
=)) =)) =)) =))

संदीप चित्रे's picture

12 Mar 2011 - 3:27 am | संदीप चित्रे

जियो रामदास :)

सहज's picture

12 Mar 2011 - 9:51 am | सहज

साहीत्यसूर्य!!

दंडवत!

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2011 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

__/\__

रामदासकाका सकाळ सार्थकी लागली आज.

अगगागागा रामदास काकांनी एक प्रतिसादात बर्याच जणांचा गेम वाजवला

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2011 - 4:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्याच जणांचा गेम वाजवला

क्काय? रामदासकाका ....

प्रीत-मोहर's picture

12 Mar 2011 - 1:05 pm | प्रीत-मोहर

ठ्ठो ठो ......

कॉफी नाकातोंडात गेली ना काका

कॉम्पुटर पन प्यायला काफी

=)) =)) =))

श्रावण मोडक's picture

12 Mar 2011 - 7:59 pm | श्रावण मोडक

मेलो... सार्थक झालं इथं आल्याचं.

चिगो's picture

30 Aug 2012 - 4:26 pm | चिगो

मेलो.. ठार मेलो.. :-D केवळ रामदासकाकांच्या ह्या जबराट प्रतिसादासाठी हा धागा वर आणतोय.. :-)

मोहनराव's picture

30 Aug 2012 - 5:01 pm | मोहनराव

कंय लिवलय.... भन्नाट!

sagarpdy's picture

30 Aug 2012 - 5:05 pm | sagarpdy

धन्य!

sagarpdy's picture

30 Aug 2012 - 5:06 pm | sagarpdy

धन्य!

हा प्रतिसाद वाचायचा राहून गेला होता, भन्नाट लिहीलंय. :D

अत्रुप्त आत्मा's picture

30 Aug 2012 - 5:22 pm | अत्रुप्त आत्मा

मांजराला संकोच नसतो. त्यामुळे पांढरी वापरली तरी चालेल >>> --^--^--^--

gogglya's picture

29 May 2015 - 12:43 pm | gogglya

+१११११११११११

त्या बोक्याला मुरक्कू द्या खायला...

संदर्भ : http://www.misalpav.com/node/13560#comment-220153