लेखनविषय (Tags)
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)
यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
प्रतिक्रिया
गाडी विकुन टाका........ :)
गाडीच्या प्लॅस्टिक अंथरुन त्यावर फेव्हिकॉल लावुन ठेवा आणि कव्हर टाका. बोका त्यावर बसला कि त्याला चिकट चिकट काहीतरी जाणवेल. मग तिथुन निघुन तो जिथे बसेल, तिथे चिकटुन राहिल.
शिवाय पुन्ह कधी बसायाला/झोपायला येणार नाही , बाईकवर!
फेव्हिकॉल फार लवकर सुकतं!
तुम्ही पण बोका पाळा, जो शेजार्याँना त्रास देईल,....
तुमची हरकत नसेल तर मला पाळा!!
मी तेव्हढ्यासाठी फेंदारलेल्या मिशा वाढवायला तयार आहे....
तुम्हाला त्रास देणार्या बोक्याची सॉलिड वाट लावतो!! (खरं तर सॉलिड मारतो असंचं म्हणणार होतो
पण संपादकीय धोरण वगैरे हॅ हॅ हॅ...)
मानधनाची अपेक्षा नाही...
पण आम्हाला दर दिवशी नॉनव्हेज आणि वीकांताला शिवास लागते हे लक्षात असू द्या म्हणजे झालं!!!!
;)
=)) =)) =)) =)) आगायायाया ... एकदम मुक्तहस्त चित्रकला चाललीये पिडा .. क्या खाया क्या है ?
म्याच आहे ५ तासांनी .. :)
हरकत नाही. एकदा शेजार्याला सडकून बघा. ;)
प्रयत्न झालेला आहे! यश नाही!!
हरकत नाही. एकाच प्रयत्नात यश नाही येत कधी कधी.
बोक्यालाच घरातून बाहेर पडायची दहशत बसेल तोपर्यंत प्रयत्न सुरु ठेवा.
काय फिस्स्स्सकन हसलोय राव! :D
ह्यॅ:! हे आमचे विनायकरावही जरा डेंजरफुलच हैत राव. कधी कसला यॉर्कर टाकतील नेम नाही.
अवांतरः तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे.
तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे.
एका संन्याशाची गोष्ट आठवली (ओशोंनी सांगितली असावी बहुधा.). एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले.
तर हे असं असतं बघा. काहीही पाळण्यापूर्वी आधी विचार करा हा प्रेमळ सल्ला.
हा हा हा ..............
तुम्ही मांजर पाळा ;)
असेच म्हणणार होतो...
किंवा पेट्रोलची नळी इंजनातून काढून ठेवा. पेट्रॉल कोक बारीक चालू ठेवा. बॉका बसताक्क्षणी पेट्रोलला काडी लावा. गॉका आणि बॉडी दोन्हींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होयेल.... ;)
-सूर्यपुत्र.
गाडी विका.
अन्यथा सगळ्या समस्यांवर एकंच उपाय आहे .. जग सोडा :) रामबाण इलाज !!
जग सोडा :) रामबाण इलाज !!त्यांना बोक्यावर इलाज हवाय. हँगओव्हरवर नव्हे.
एक मस्त गुब्गुबित मांजर पाळा ,अन तिला गाडिपासुन दुर बांधा ,तिथेच झोपायला काहीतरी टाका... :)
कव्हरखाली पाण्याने भरलेले दोन टब ठेवत चला सीटवर. आठवडाभर असं केल्यावर बोका फिरकणार नाही याची खात्री बाळगा.
एक दिवस पाण्याची बादली घेवून लपून / दबा धरून बसा. बोका येउन गाडीच्या कव्हरमधे जाऊन झोपला, की हळूच पुढे जाऊन एका हातानी त्याला कव्हरमधेच जाम धरून ठेवा, आणि दुसर्या हाताने बादलीतले पाणी त्याच्या अंगावर ओता.
:) :) :)
सलग २/३ दिवस हाच नित्यक्रम चालू ठेवा. मग परिणाम पहा.
पहिले गाडीला कवर घट्ट बांधा जेणेकरून बोका आता शिरणार नाही.
त्यानंतर गाडीच्या टाकीवर आणि सीटच्या भागावर,दुधवाले दुधाच्या पिशव्या ठेवायला वापरतात तसल्या लाम्बुकळे टाक्या पाणी भरून ठेवा.
बोका पाण्यात बसूच/ झोपू शकणार नाही !
करून तर पहा !
कुत्रा पाळा.
वरील प्रमाणे जलतत्वाचे उपाय करून झाल्यावर दुसर्या दिवशी सकाळी गाडीवर बसण्यापूर्वी रेनकोटची पँट वापरायला विसरू नये. नाहीतर बोक्याच्या ऐवजी आपलीच फजिती व्हायची :) हलकेच घ्या ... :)
प्रकाटाआ
वाचनीय धागा
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
डांबर गोळ्या ठेवा,(napha balls/ odonil)
शेजार्याला एकदा बोच्कारा !!!!!!!!!!!!!!!
तुमच्या गाडीचे कवर एकदा त्यांच्या गाडीला घाला
अ)गाडी साईड स्टँडवर लावा. बोका पडेल.
किंवा
ब)बोक्याची नखे कापा.
पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे शेजार्यासाठी सुन्दरसे घर बान्धून द्या! ;)
उत्तम आहे !!पण मिच त्या घरात जानार नाही का ?
दुस-याला घर बांधुन द्यायची आवास योजना सुचतेय का एखादी?
अ)
--> गाडी साईड स्टँडवरच असते!
ब)
-->शक्य नाही!!
चुचु पण डु आय डी घेऊन आली आहे की तिने ******क धाग्यांचे क्लासेस चालू केले आहेत? (नाहीतरी बुटिक, किराणा मालाचे दुकान नि हाटेलाचे दिवाळे काढल्यावर काही नवा रोजगार चालू केल्याचे ऐकिवात नाही.) हल्ली अशा धाग्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे असे निरीक्षण आहे.
ररा आजोबा इन्श्योरन्स पॉलिसी घेत्लीत का तुम्ही...?
>>गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)<<
हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते.
असो. बोक्याला मांजरीचे आमिष दाखवून पार्लर मधे घेऊन जा आणि (त्याची) सगळी नखे कापून घ्या.
असे करा... तुम्ही एकदा शेजार्याचा पलंगावर जावुन झोपा.
बोक्याला तुमच्या पलंगावर आणून झोपवा आणि तुम्ही स्वतः कव्हरमधे जाऊन झोपा.
कहर्..आहे.
हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते.
आणि समजा जर कव्हरला कुलूप असेल तर बोका कसा आत घुसु शकतो??
Point to be noted mylord.
आणि हे लिहीता लिहीता सुचले कि,एखादे कुलूप वाले कव्हर मिळत असेल तर बघा.
कव्हरला कुलुप लावता येत नाही. कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी !
कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी !
एवीतेवी पेट्रोल जाणारच आहे किमान कव्हर न टाकुन टाकीवरले/सिटवरील ओरखडे वाचवावे आणी हो कव्हर पण जाऊ शकते ना चोरी तर तेही वाचेल.
त्याबरोबर पेट्रोल पण वाचवायचे असेल तर गाडी empty करुन ठेवा म्हणजे पेट्रोल पण वाचेल.
अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!!
अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!!
हा हा...हा..
ब्लेडचे ओरखडे कोण करतो आता?? बोका??..?
तुमचा प्रश्न बदला मग आता..तुम्हाला बोका as well as जो कोणी ब्लेडचे ओरखडे करतो त्यावर ऊपाय पाहीजे.
चालू दे ...........छान चाललय??????
त्या बोक्याला पकडा................आणी लांब गावाबाहेर सोडुन या....शेजार्याच्या नकळत...
१) बोक्याच्या गळ्यात घंटा बांधा..
त्यामूळे बोका आलेला कळेल..
२)पहारा करा
३) नेमबाजी शिकुन घ्या..बोक्यावर दगड मारायला उपयोग होइल
४) "बोक्या सातबंडे" चा सल्ला घ्या... ;)
१)
-->मांजराच्या ( मर्जार कुळाच्या कोनत्याही सदस्याच्या) गळ्यात घंटा कोण बांधनार ?
२)
-->जमनार नाही ! ( मी गुर्खा नाही हो!!!)
३)
-->गाडीला लागला तर ?
४)
-->कुठे मिळतात हे ? मिपा वर आहेत का ?
पाहुन मन व्याकुळ झाले.गाडी पार्किग करण्यासाठी जागा नसताना कशासाठी गाडी घेतलीत?
सदर शेजारी देखिल सरकारी निवास्थानात राहत असेल तर सरकारी निवास्थानात पाळीव प्राणी पाळता येतात का ह्याची चौकशी करा. बोक्याचा त्रास होत असेल तर पाजंरपोळात जावुन तक्रार करा व बोका पकडुन नेण्याची व्यवस्था करा.तसे नसेल तर बोका पकडुन खाणारे लोक तुमच्या गावात/शहरात कुठे राहतात ह्याचा शोध घ्या व त्याना सुपारी द्या.
असेच करा.
बोक्यांना मेनका गांधी + न्यायालय यांचे संरक्षण नाहीये.
नानाला विचारा !!बरेच बोके