Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 16:26
लेखनविषय (Tags)
समाज
राहणी
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला
मदत
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?
  • Log in or register to post comments
  • 53907 views

प्रतिक्रिया

Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/11/2011 - 16:29

Permalink

नानाला विचारा !!बरेच बोके

नानाला विचारा !! बरेच बोके आणि नख काढण्यार्‍या मांजरी सरळ केल्यात त्याने ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन भालेकर on Fri, 10/12/2012 - 07:46

In reply to नानाला विचारा !!बरेच बोके by सुहास..

Permalink

प्रतिसाद

गाडी विकुन टाका........ :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वैर परी on Fri, 03/11/2011 - 16:31

Permalink

सीटवर ...

गाडीच्या प्लॅस्टिक अंथरुन त्यावर फेव्हिकॉल लावुन ठेवा आणि कव्हर टाका. बोका त्यावर बसला कि त्याला चिकट चिकट काहीतरी जाणवेल. मग तिथुन निघुन तो जिथे बसेल, तिथे चिकटुन राहिल. शिवाय पुन्ह कधी बसायाला/झोपायला येणार नाही , बाईकवर!
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 16:36

In reply to सीटवर ... by स्वैर परी

Permalink

अं हं!!!

फेव्हिकॉल फार लवकर सुकतं!
  • Log in or register to post comments

Submitted by गुंड्या बावळा on Sat, 03/12/2011 - 09:25

In reply to अं हं!!! by उगा काहितरीच

Permalink

तुम्ही पण बोका पाळा, जो

तुम्ही पण बोका पाळा, जो शेजार्याँना त्रास देईल,....
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 03/12/2011 - 09:40

In reply to तुम्ही पण बोका पाळा, जो by गुंड्या बावळा

Permalink

गुड आयडिया!

तुमची हरकत नसेल तर मला पाळा!! मी तेव्हढ्यासाठी फेंदारलेल्या मिशा वाढवायला तयार आहे.... तुम्हाला त्रास देणार्‍या बोक्याची सॉलिड वाट लावतो!! (खरं तर सॉलिड मारतो असंचं म्हणणार होतो पण संपादकीय धोरण वगैरे हॅ हॅ हॅ...) मानधनाची अपेक्षा नाही... पण आम्हाला दर दिवशी नॉनव्हेज आणि वीकांताला शिवास लागते हे लक्षात असू द्या म्हणजे झालं!!!! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 03/12/2011 - 09:52

In reply to गुड आयडिया! by पिवळा डांबिस

Permalink

=)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) आगायायाया ... एकदम मुक्तहस्त चित्रकला चाललीये पिडा .. क्या खाया क्या है ? म्याच आहे ५ तासांनी .. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Fri, 03/11/2011 - 16:36

Permalink

बोका सापडत नाही ?

हरकत नाही. एकदा शेजार्‍याला सडकून बघा. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 16:41

In reply to बोका सापडत नाही ? by विनायक बेलापुरे

Permalink

नको बॉ!

प्रयत्न झालेला आहे! यश नाही!!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Fri, 03/11/2011 - 16:54

In reply to नको बॉ! by उगा काहितरीच

Permalink

हरकत नाही. एकाच प्रयत्नात यश

हरकत नाही. एकाच प्रयत्नात यश नाही येत कधी कधी. बोक्यालाच घरातून बाहेर पडायची दहशत बसेल तोपर्यंत प्रयत्न सुरु ठेवा.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Fri, 03/11/2011 - 16:55

In reply to बोका सापडत नाही ? by विनायक बेलापुरे

Permalink

आयचा घ्घो!!!!

काय फिस्स्स्सकन हसलोय राव! :D ह्यॅ:! हे आमचे विनायकरावही जरा डेंजरफुलच हैत राव. कधी कसला यॉर्कर टाकतील नेम नाही. अवांतरः तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 03/11/2011 - 17:23

In reply to आयचा घ्घो!!!! by धमाल मुलगा

Permalink

हम्म

तुम्ही कुत्रा पाळून का नाही बघत? कुत्रा-मांजर्/बोका ह्यांचं शत्रुत्व असतं म्हणे. एका संन्याशाची गोष्ट आठवली (ओशोंनी सांगितली असावी बहुधा.). एक तरुण संन्यासी जंगलात तप करीत असताना त्याने सोबत म्हणून एक मांजर पाळले. त्याला नियमित दूध मिळेना म्हणून त्याच्यासाठी एक गाय पाळली. तिच्या शेणाचा दुर्गंध त्याच्या कुटीपासून दूर रहावा म्हणून - आणि वन्य प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे म्हणून - थोड्या अंतरावर त्या गायीसाठी त्याला एक गोठा बांधावा लागला. गायीला चरायला नेणे, गोठ्याची सफाई वगैरे करण्यात त्याचा फार वेळ जाऊ लागला नि त्याच्या साधनेत व्यत्यय येऊ लागला म्हणून हे सगळे काम करण्यासाठी त्याने एक बाई ठेवली. यथावकाश त्याने तिच्याशी लग्न केले. तर हे असं असतं बघा. काहीही पाळण्यापूर्वी आधी विचार करा हा प्रेमळ सल्ला.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 03/11/2011 - 18:22

In reply to हम्म by रमताराम

Permalink

हा हा हा ..............

हा हा हा ..............
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/11/2011 - 16:42

Permalink

सोप्प आहे !

तुम्ही मांजर पाळा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्यपुत्र on Fri, 03/11/2011 - 19:47

In reply to सोप्प आहे ! by सुहास..

Permalink

+१

असेच म्हणणार होतो... किंवा पेट्रोलची नळी इंजनातून काढून ठेवा. पेट्रॉल कोक बारीक चालू ठेवा. बॉका बसताक्क्षणी पेट्रोलला काडी लावा. गॉका आणि बॉडी दोन्हींचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होयेल.... ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/11/2011 - 16:43

Permalink

गाडी विका.

गाडी विका.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/11/2011 - 17:18

In reply to गाडी विका. by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

अन्यथा सगळ्या समस्यांवर एकंच उपाय आहे .. जग सोडा :) रामबाण इलाज !!
  • Log in or register to post comments

Submitted by पंगा on Sat, 03/12/2011 - 08:58

In reply to +१ by टारझन

Permalink

काहीतरीच!

जग सोडा :) रामबाण इलाज !!
त्यांना बोक्यावर इलाज हवाय. हँगओव्हरवर नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Fri, 10/12/2012 - 13:16

In reply to काहीतरीच! by पंगा

Permalink

एक मस्त गुब्गुबित मांजर पाळा

एक मस्त गुब्गुबित मांजर पाळा ,अन तिला गाडिपासुन दुर बांधा ,तिथेच झोपायला काहीतरी टाका... :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/11/2011 - 16:47

Permalink

कव्हरखाली पाण्याने भरलेले दोन

कव्हरखाली पाण्याने भरलेले दोन टब ठेवत चला सीटवर. आठवडाभर असं केल्यावर बोका फिरकणार नाही याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Fri, 03/11/2011 - 16:47

Permalink

पाणी ओता

एक दिवस पाण्याची बादली घेवून लपून / दबा धरून बसा. बोका येउन गाडीच्या कव्हरमधे जाऊन झोपला, की हळूच पुढे जाऊन एका हातानी त्याला कव्हरमधेच जाम धरून ठेवा, आणि दुसर्‍या हाताने बादलीतले पाणी त्याच्या अंगावर ओता. :) :) :) सलग २/३ दिवस हाच नित्यक्रम चालू ठेवा. मग परिणाम पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वतन्त्र on Fri, 03/11/2011 - 16:49

Permalink

पाण्याच्या टाक्या !

पहिले गाडीला कवर घट्ट बांधा जेणेकरून बोका आता शिरणार नाही. त्यानंतर गाडीच्या टाकीवर आणि सीटच्या भागावर,दुधवाले दुधाच्या पिशव्या ठेवायला वापरतात तसल्या लाम्बुकळे टाक्या पाणी भरून ठेवा. बोका पाण्यात बसूच/ झोपू शकणार नाही ! करून तर पहा !
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 03/11/2011 - 16:57

Permalink

कुत्रा पाळा.

कुत्रा पाळा.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarparadkar on Fri, 03/11/2011 - 16:57

Permalink

खबरदारी ...

वरील प्रमाणे जलतत्वाचे उपाय करून झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी गाडीवर बसण्यापूर्वी रेनकोटची पँट वापरायला विसरू नये. नाहीतर बोक्याच्या ऐवजी आपलीच फजिती व्हायची :) हलकेच घ्या ... :)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/11/2011 - 17:01

Permalink

प्रकाटाआ

प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 03/11/2011 - 17:01

Permalink

वाचनीय धागा पुढच्या भागाच्या

वाचनीय धागा पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
  • Log in or register to post comments

Submitted by असहकार on Fri, 03/11/2011 - 17:06

Permalink

हे करा

डांबर गोळ्या ठेवा,(napha balls/ odonil)
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पू on Fri, 03/11/2011 - 17:09

Permalink

उपाय सुचवाल ?

शेजार्याला एकदा बोच्कारा !!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पप्पू on Fri, 03/11/2011 - 17:10

Permalink

उपाय सुचवाल ?

तुमच्या गाडीचे कवर एकदा त्यांच्या गाडीला घाला
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Fri, 03/11/2011 - 17:13

Permalink

उपाय

अ)गाडी साईड स्टँडवर लावा. बोका पडेल. किंवा ब)बोक्याची नखे कापा.
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Fri, 03/11/2011 - 17:17

In reply to उपाय by ज्ञानेश...

Permalink

पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे

पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे शेजार्‍यासाठी सुन्दरसे घर बान्धून द्या! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 17:25

In reply to पाच किलोमिटर परीघाच्या पलीकडे by मृगनयनी

Permalink

वा!

उत्तम आहे !!पण मिच त्या घरात जानार नाही का ? दुस-याला घर बांधुन द्यायची आवास योजना सुचतेय का एखादी?
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 17:20

In reply to उपाय by ज्ञानेश...

Permalink

अ)

अ) --> गाडी साईड स्टँडवरच असते! ब) -->शक्य नाही!!
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 03/11/2011 - 17:27

Permalink

हम्म

चुचु पण डु आय डी घेऊन आली आहे की तिने ******क धाग्यांचे क्लासेस चालू केले आहेत? (नाहीतरी बुटिक, किराणा मालाचे दुकान नि हाटेलाचे दिवाळे काढल्यावर काही नवा रोजगार चालू केल्याचे ऐकिवात नाही.) हल्ली अशा धाग्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे असे निरीक्षण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 03/11/2011 - 20:02

In reply to हम्म by रमताराम

Permalink

ररा आजोबा इन्श्योरन्स पॉलिसी

ररा आजोबा इन्श्योरन्स पॉलिसी घेत्लीत का तुम्ही...?
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण मनोहर on Fri, 03/11/2011 - 17:29

Permalink

एक शंका

>>गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब)<< हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते. असो. बोक्याला मांजरीचे आमिष दाखवून पार्लर मधे घेऊन जा आणि (त्याची) सगळी नखे कापून घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/11/2011 - 17:38

Permalink

असे करा... तुम्ही एकदा

असे करा... तुम्ही एकदा शेजार्‍याचा पलंगावर जावुन झोपा.
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Fri, 03/11/2011 - 17:42

In reply to असे करा... तुम्ही एकदा by परिकथेतील राजकुमार

Permalink

किंवा

बोक्याला तुमच्या पलंगावर आणून झोपवा आणि तुम्ही स्वतः कव्हरमधे जाऊन झोपा.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 03/11/2011 - 17:46

In reply to किंवा by रमताराम

Permalink

कहर्..आहे.

कहर्..आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 03/11/2011 - 17:44

Permalink

हे कव्हर असे कसे काय आहे?

हे कव्हर असे कसे काय आहे? कव्हरला कुलूप देखील लावता येते हे माहीत नव्हते. आणि समजा जर कव्हरला कुलूप असेल तर बोका कसा आत घुसु शकतो?? Point to be noted mylord. आणि हे लिहीता लिहीता सुचले कि,एखादे कुलूप वाले कव्हर मिळत असेल तर बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 17:50

In reply to हे कव्हर असे कसे काय आहे? by नि३

Permalink

नाही

कव्हरला कुलुप लावता येत नाही. कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी !
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 03/11/2011 - 17:58

In reply to नाही by उगा काहितरीच

Permalink

कव्हर लावल्यावरपण पेट्रोल

कव्हर लावल्यावरपण पेट्रोल चोरले जाउ शकते . पण मनाच्या समाधानासाठी ! एवीतेवी पेट्रोल जाणारच आहे किमान कव्हर न टाकुन टाकीवरले/सिटवरील ओरखडे वाचवावे आणी हो कव्हर पण जाऊ शकते ना चोरी तर तेही वाचेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 03/11/2011 - 18:08

In reply to कव्हर लावल्यावरपण पेट्रोल by नि३

Permalink

त्याबरोबर पेट्रोल पण वाचवायचे

त्याबरोबर पेट्रोल पण वाचवायचे असेल तर गाडी empty करुन ठेवा म्हणजे पेट्रोल पण वाचेल.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 18:09

In reply to कव्हर लावल्यावरपण पेट्रोल by नि३

Permalink

अहो!

अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!!
  • Log in or register to post comments

Submitted by नि३ on Fri, 03/11/2011 - 18:22

In reply to अहो! by उगा काहितरीच

Permalink

अहो कव्हर नाही टाकले तर

अहो कव्हर नाही टाकले तर ब्लेडचे ओरखडे आढळतात!!! हा हा...हा.. ब्लेडचे ओरखडे कोण करतो आता?? बोका??..? तुमचा प्रश्न बदला मग आता..तुम्हाला बोका as well as जो कोणी ब्लेडचे ओरखडे करतो त्यावर ऊपाय पाहीजे.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 03/11/2011 - 18:28

In reply to अहो कव्हर नाही टाकले तर by नि३

Permalink

चालू दे ...........छान

चालू दे ...........छान चाललय?????? त्या बोक्याला पकडा................आणी लांब गावाबाहेर सोडुन या....शेजार्याच्या नकळत...
  • Log in or register to post comments

Submitted by कोमल on Fri, 03/11/2011 - 17:47

Permalink

१) बोक्याच्या गळ्यात घंटा

१) बोक्याच्या गळ्यात घंटा बांधा.. त्यामूळे बोका आलेला कळेल.. २)पहारा करा ३) नेमबाजी शिकुन घ्या..बोक्यावर दगड मारायला उपयोग होइल ४) "बोक्या सातबंडे" चा सल्ला घ्या... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 03/11/2011 - 17:59

In reply to १) बोक्याच्या गळ्यात घंटा by कोमल

Permalink

उत्तरे

१) -->मांजराच्या ( मर्जार कुळाच्या कोनत्याही सदस्याच्या) गळ्यात घंटा कोण बांधनार ? २) -->जमनार नाही ! ( मी गुर्खा नाही हो!!!) ३) -->गाडीला लागला तर ? ४) -->कुठे मिळतात हे ? मिपा वर आहेत का ?
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 03/11/2011 - 18:07

Permalink

अरेरे इथे देखिल मराठी माणसाची ससेहोलपट

पाहुन मन व्याकुळ झाले.गाडी पार्किग करण्यासाठी जागा नसताना कशासाठी गाडी घेतलीत? सदर शेजारी देखिल सरकारी निवास्थानात राहत असेल तर सरकारी निवास्थानात पाळीव प्राणी पाळता येतात का ह्याची चौकशी करा. बोक्याचा त्रास होत असेल तर पाजंरपोळात जावुन तक्रार करा व बोका पकडुन नेण्याची व्यवस्था करा.तसे नसेल तर बोका पकडुन खाणारे लोक तुमच्या गावात/शहरात कुठे राहतात ह्याचा शोध घ्या व त्याना सुपारी द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 03/11/2011 - 18:18

In reply to अरेरे इथे देखिल मराठी माणसाची ससेहोलपट by वेताळ

Permalink

+

असेच करा. बोक्यांना मेनका गांधी + न्यायालय यांचे संरक्षण नाहीये.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com