दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग ४)

चिंतामणी's picture
चिंतामणी in जनातलं, मनातलं
6 Mar 2011 - 7:36 pm

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग- १)
(भाग-२)
(भाग-३)

ह्या भागात ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ.

संगीतकार- जी एस कोहली

१९५२साली ओ.पी. नैयर यांचे असीस्टंट म्हणून कारकिर्द सुरू केलेल्या श्री.कोहली यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन १९६३ साली केले. त्यांच्या वाट्याला A Class निर्माते दिग्दर्शक आले नाहीत.
शिकारी, फौलाद, गुंडा, नमस्ते जी, लंबे हाथ, अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबीन हुड आणि पुर्णीमा या चित्रपटांना संगीत दिले. यातील कलाकार बघीतले तरी या चित्रपटांविषयी कल्पना येइल. या चित्रपटाततुन अजीत-रागिणी, शेख मुख्तार- हेलन, मुमताझ-श्यामकुमार, अमिता-मेहमुद, मेहमुद- नाझ प्रमुख भुमीकात होते.

शिकारी या चित्रपटातील गाणी खूपच गाजली होती.

चित्रपट- शिकारी (१९६३)

अगर मैं पूछूँ जवाब दोगे
दिल क्यों मेरा तड़प रहा है
तेरे ही दिल में है प्यार कुछ कुछ
मेरे भी दिल में ज़रा ज़रा है
(लता दिदी आणि म.रफी यांनी गाइलेले अत्यंत प्रसीध्द रोमँटीक गाणे)

चमन के फूल भी तुझ को गुलाब कहते हैं
हमीं नहीं, हैं सभी लाजवाब कहते हैं

(लता दिदी आणि म.रफी यांनी गाइलेले अजून एक अत्यंत प्रसीध्द रोमँटीक गाणे)

तुमको पिया दिल दिया कितने नाज़ से
नैना लड़ गए भोले-भाले कैसे दगाबाज़ से हो

(लता दिदी आणि उषा मंगेशकर यांनी गाइलेले गाणे)

ये रंगीन महफ़िल गुलाबी-गुलाबी
मेरे दिल का आलम शराबी-शराबी

(आशा भोसले यांनी गायलेले नशीले गीत)

माँगी हैं दुआएँ हमने सनम
इस दिल को धड़कना आ जाए
इक नज़र-ए-इनायत हो हम पर
कुछ हमको बहकना आ जाए

(आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गाइलेले गाणे)

शिकारी चित्रपटातील गाणी येथे ऐका.

चित्रपट- अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ रॉबीन हुड (१९६५)

माना मेरे हसीं सनम, तू रश्क़-ए-माहताब है
पर तू है लाजवाब तो, मेरा कहाँ जवाब है

(म. रफी यांचे प्रसीध्द गाणे)

चित्रपट- नमस्ते जी (१९६५)

बहारों थाम लो अब दिल मेरा महबूब आता है
हो शरारत कर न नाज़ुक दिल शरम से डूब जाता है

(लतादिदी आणि मुकेश यांचे प्रसीध्द युगलगीत)

चित्रपट- फौलाद (१९६३)

ओ मत वाले साजना
हुआ है तुमसे प्यार

(आशा भोसले)
ही गाणे येथे ऐका

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संगीत दिग्दर्शक- हंसराज बहल

१९१६ साली जन्मलेले हंसराज बहल यांनी पंजाबी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना १९४६ साली अर्देशर इराणी यांनी "पुजारी" या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सोपविली.

चित्रपट- मिलन (१९५९)

हाय जिया रोए रोए
पिया नाहि आए आए
हाय जिया रोए रोए
इक मैं ही जागूँ
सारा जग सोए
हाय जिया रोए रोए

(लतादिदींने गायलेले सुंदर गाणे)

चित्रपट- सावन (१९५९)

देखो बिना सावन बरस रही बदली
पिया के दरस को तरस रही बदली

(महंमद रफी)

र : भीगा-भीगा प्यार का समाँ
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए बता दे तुझे जाना है कहाँ
श : चलूँगी तू ले चले जहाँ
कि तेरे बिना जाना है कहाँ बलिया कि तेरे बिना जाना है कहाँ

(महंमद रफी व शमशाद बेगम यांनी गायलेले प्रसीध्द युगल गीत)

चित्रपट- मीस बॉम्बे (१९५७)

र : दिन हो या रात हम रहें तेरे साथ यह हमारी मरज़ी -२
सु : तुम्हारी मरज़ी
र : जी हमारी मरज़ी
सु : तुम्हारी तो हमारी भी यही है मरज़ी
र : दिन हो या रात ...

(महंमद रफी व सुमन कल्याणपुर यांनी गायलेले प्रसीध्द युगल गीत)

चित्रपत- सिकंदर ए आजम (१९६५)

जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा

(महंमद रफी यांनी गायलेले सुप्रसीध्द गीत)

चंगेज खान (१९५७)

मुहब्बत ज़िन्दा रहती है मुहब्बत मर नहीं सकती
अजी इन्सान क्या ये तो ख़ुद से डर नहीं सकती

(महंमद रफी)

हंसराज बहल यांची अनेक गाणी येथे आणि येथे ऐकता/डाउनलोड करता येतील.

कलासंगीतचित्रपटमाहितीआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

6 Mar 2011 - 9:29 pm | इन्द्र्राज पवार

जी.एस.कोहली म्हटले की चित्रपट संगीतप्रेमींना आठवतो तो 'शिकारी' हाच चित्रपट, तर हंसराज बहल आणि 'सिकंदर-ए-आझम' यांचेही असेच अतूट नाते. 'जहाँ डाल डाल पे....सोनेकी चिडिया...' हे तर जवळजवळ या देशाचे राष्ट्रगीतसम गाणे झाले आहे....इतके त्याचे शब्द आणि संगीत कालातीत झाले आहे.

पण दुर्दैवाने या दोघांच्याही वाट्याला आली ती सारी 'सी' ग्रेड म्हटले जाणारे सिनेमे....अधुनमधून एखाद्या दुसर्‍या गाण्याने यांची आठवण ठेवणे एवढेच बाकी.

लेखमाला सुंदर होत आहे.

(एक शंका : यू शुअर अबाऊट 'पूर्णिमा'? मला वाटते या चित्रपटाचे संगीतकार कोहली नसून कल्याणजी आनंदजी होते....मीनाकुमारी धर्मेन्द्र अभिनित चित्रपटातील 'हमसफर मेरे हमसफर...' हे गाणे आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे कोहलीना असले अभिनेते कधीच मिळाले नाहीत संगीतासाठी... प्लीज चेक)

इन्द्रा

पुर्णिमाबद्दल खात्री नाही. पण माझी चूक कुठे झाली ते लक्षात आले. मुकेश आणि लतादिदींचे १९६५चेच एक प्रसीध्द युगलगीत आहे. संदर्भ घेताना चूक झाली असावी. दुरूस्ती करून ते गाणे टाकले आहे.

गाणे आहे

बहारों थाम लो अब दिल मेरा महबूब आता है
हो शरारत कर न नाज़ुक दिल शरम से डूब जाता है

माझ्या संदर्भात जि.एस. कोहली यांच्याखाती पुर्णिमाचे गाणे कसे आले हे मी आता खोलात जाउन बघीन.

इन्द्र्राज पवार's picture

8 Mar 2011 - 1:48 am | इन्द्र्राज पवार

थॅन्क्स चिंतामणी....योग्य ती दुरुस्ती होणे गरजेचे होतेच ती तुम्ही केलेली दिसली. मी स्वतः परत एकदा खात्री केली..."पूर्णिमा" बद्दल.

"नमस्तेजी" चे गाणेही तसेच सुमधुर आहे. विशेष म्हणजे एका संगीतवेड्या मित्राच्या घरी हे गाणे शोधत असतानाच "ते सापडेपर्यंत हे ऐक..." असे म्हणून त्याने अशाच दुसर्‍या फळीतील आणखीन् एक गुणी संगीतकार चित्रगुप्त यांचे 'बेजुबान' मधील गाणे टेपवर उलगडले....लताच्या जादुभर्‍या आवाजातील "दिवाने हम, दिवाने तुम....किसे खबर...!" गॉश्श, मी विसरलोच नेमक्या कोणत्या गाण्यासाठी मी त्याच्याकडे आलो होतो....

तुमच्या लेखमालेत 'चित्रगुप्त' आहेत ना?

इन्द्रा

त्यांच्या बद्दल बरेचसे लिहून तयार झाले आहे.सर्व संकलीत करून झाले की लौकरच येथे ठेवीन. या मालिकेतील सर्वात मोठा लेख बहुधा चित्रगुप्त यांचे बद्दलचा असणार आहे.

चिंतामणी's picture

7 Mar 2011 - 12:08 am | चिंतामणी

जी.एस.कोहली यांची गाणी येथेसुद्धा ऐकता/डाउनलोड करता येतील.

धन्यवाद.

हंसराज बहल यांनी दिलेली गाणी मला परिचित आहेत. पण कोहली यांची वर दिल्यापैकी "तुमको पिया" खेरीज इतर कोणतीही गाणी परिचित नाहीत.

खूप वेळा शब्द वाचून गाणी लक्षात येत नाहीत. वरती गाण्यांच्या लिंक दिल्या आहेत. मला खात्री आहे की आपणास जर हंसराज बहल यांची गाणी माहिती असतील तर गाणी सुध्दा माहिती असणार. ऐकल्यावर लक्षात येइल की ही गाणीसुद्धा परीचयाची आहेत.

पैसा's picture

7 Mar 2011 - 8:15 am | पैसा

तुमची गाण्यांची निवड अतिशय सुंदर. एमपी३ लिंक्स साठी खास धन्यवाद! आता डाऊनलोड करायचं काम शिल्लक आहे.

'तुमको पिया दिल दिया कितने नाज़ से , नैना लड़ गए भोले-भाले कैसे दगाबाज़ से '

' भीगा-भीगा प्यार का समाँ'

'जहाँ डाल-डाल पर , सोने की चिड़ियां करती है बसेरा, वो भारत देश है मेरा

'मुहब्बत ज़िन्दा रहती है मुहब्बत मर नहीं सकती , अजी इन्सान क्या ये तो ख़ुद से डर नहीं सकती'

या सेट मधली ही गाणि मला माहित आहेत, बाकीची डाउनलोडवतो आणि ऐकतो.

चिंतातुर जंतू's picture

7 Mar 2011 - 9:56 am | चिंतातुर जंतू

विविधभारतीवर ऐकून ऐकून यातली बरीचशी गाणी परिचित आहेत. बर्‍याच दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

मस्त लेखमाला काका ..

येवुद्या आनखिन ..

चिंतामणी's picture

8 Mar 2011 - 12:29 am | चिंतामणी

अजून लिहायचे आहेच. पण कामामुळे जसा वेळ मिळेल तसे लिहीत जाईन.