प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी
मुद्दामच लेखाचं नाव अर्धवट ठेवलं. नाहीतर वरूनच कळुन जायचं कि आत काय लिहिले आहे.
काही दिसांपुर्वी मुलुखावेगळी यांचा सुप्रसिद्धी न मिळालेली पण चांगली गाणी हा लेख वाचला आणि तेव्हाच हे लिहायची इच्छा झाली.
पण वेळ न मिळाल्यामुळे आणि या गाण्यांनी विचार करायला (पक्षी: आठवण्यासाठी) खूप वेळ घेतला म्हणून उशीर झाला.
तर झाले असे, की ही जी गाणी मी तुमच्यासमोर टंकत आहे, ती सुमधुर, रसाळ, ऐकीव वगैरे प्रकारात मोडत नाहीत.
पण आमच्यासारख्या (टुक्कार)लोकांत फारच (चिक्कार) लोकप्रिय आहेत. चांगल्या गाण्यांवर तर सर्वच जण प्रकाश टाकतात. पण अश्या गाण्याचं काय ज्यांची गोडी तर बर्याच जणांना आहे पण उल्लेख मात्र कोणीच करायला धजत नाही.
ही गाणी वेगळी का? तर त्यांची काही प्रमाणे आहेत.
एक तर त्यांची चाल, दुसरे त्यांची रचना, तिसरे आणि महत्वपूर्ण म्हणजे त्यांचे शब्द किंवा अभिप्रेत असलेले अर्थ.
तर, या समूहातली जवळपास सर्वच गाणी सर्वांनीच ऐकली असतील, पण उजाळा म्हणून मी हा एक प्रयत्न केला आहे.
आपल्याला माहिती असल्यास उत्तम आणि आणखी काहींची भर घातल्यास अत्त्युत्तम.
संपादकांना विनंती की धागा जर मिपा नियमावलीच्या बाहेर वाटतोय आणि उडवावयाचा असेल तर कल्पना द्यावी.
उडवण्यास काहीच हरकत नाही.
१. मुझको राणाजी माफ करना.
करण-अर्जुन सिनेमातलं हे गाणं. ममता कुळकर्णी (वाचणार्यांची पक्षी: पाहणार्यांची अवस्था बिकट करणारी यक तारका)
आणी गाण्याचे बोल (काला काला घुंघट काहेको डाला, का करी आई गोरी मुंह कही काला) ही जमेची बाजु. "गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप गुपचुप, छत पे सोया था......" म्हंटले की कसंससं व्हायला होतं. अ.सां.न.ल.(अ फॉर असुज्ञ) बाईंचे नृत्य कौशल्य तर वाखाणण्याजोगे. या चित्रपटातलं जाती हू मै हे गाणं सुद्धा कमी-अधिक प्रमाणात याच पठडीतलं. फक्त बोल छान आहेत.
२. चढ गया उपर रे, अटरिया पे लोटन कबुतर.
दलाल सिनेमा अन मिथुनदा. आता काय सांगावं अजुन. हे गाणं बस "क्या बात !! क्या बात !! क्या बात !!" यातील चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे हे गाणं तितकंच विरुद्ध म्हणजे अगदी श्रवणीय.
३. भोलीभाली लडकी खोल तेरे दिल की.
ममता अन अक्कीचं ह्ये गाणं 'टाप आफ आल'. चाल, बोल, लोकेशन अन नृत्य सर्वच बाबींत येक क्रमांक काढतंय हे गाणं. वेन्जॉय करता येण्यासारखं पण टपोरी. आपलं आल टैम फेवरेट. यातलं जहेर है के प्यार है तेरा चुम्मा एकदम छिछोर गाणं.
४. चमक चम चमके अंगुरी बदन.
असंच एक साध-सुधं गाणं. लिहिण्यासारखं जास्त काही नाही म्हणुन.
५. सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है.
राजाबाबु-गोविंदा नि करिश्मा वैनी काय तुफान नाचले आहेत या गाण्यात. बनेल घालुन गोविंदा नि लेहंगा का काय ते घालुन क्रिश्मा. बाज, उश्या, चादरी यांचा यथासांग वापर करुन घेतलाय. या चित्रपटातील ईतरही गाणी छान आहेत, जसे पक चिक पक राजाबाबु आणी अ आ ई उ उ ऊ मेरा दिल ना तोडो.
६. ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है.
अनु मलिक यांच्या आवाजातील देव कोहलींच सुंदर गाणं-जुडवा. सल्लुमियाँचा डँस नि रंभाकाकु नि करिश्मावैनी. सगळे 'एका पेक्षा एक'.
७. जब तक रहेगा समोसे मे आलु.
चित्रपट-मिस्टर & मिसेस खिलाडी. अनु मलिकचं गाणं. लिरिक्स (अतिशय फालतु )त्याचंच असावं बहुतेक. नो आयड्या.
८. मेरी छतरी के निचे आजा, क्यु सोचे है ---खडी खडी.
तहेलका नावाचा मल्टी स्टारर पिक्चर. वेणिवाला अमरिश, शक्तिमान, जावेद जाफरी, नसीरुद्दीन शाह (तद्दन फालतु चित्रपटात ह्याने काम करायला होकार का दिला? हे न कळालेलंच बरं). ४ जण मजा करण्याच्या मुडमध्ये असतील तर पाहता येण्याजोगा चित्रपट.
९. बत्ती ना बुझा, मुझे लगता है डर.
१०. भरो माँग मेरी भरो, करो प्यार मुझे करो.
वरील दोन्हिही गाण्यांविषयी न लिहिलेलंच बरं.
११. मैने पैदल से जा रा था, उने आटो से आ री थी.
वाहहहह !!! वाहहहह !!! गाणं लिहावं तर असं. पक्क्या दख्खणी हैदराबादी भाषेतील. या भाषेच्या संदर्भासाठी 'द अंग्रेज' पहावा. एक्स्प्रेशन वाईज (लै विचार केला पण मराठी शबुत गावलाचं न्हाय) गोविंदा वेक लवंबर.
१२. एक चुम्मा तु मुझको उधार दई दे.
छोटे सरकार चित्रपटातील माथेफिरु लिरिक्स असलेलं गाणं. शिल्पा शेट्टी म्हतारी (सध्या) असुन इतकी छान दिस्त्ये. तेव्हा तर तिचा काळ होता. गोविंदाचे ठुमके एकावर एक. त्याच तर्हेचं शुल चित्रपटातील दिलवालों के दिल का करार लुटने.
१३. चांदी की डाल पर सोने का मोर.
सल्लुची टपोरी भुमिका, राणीचा लाडीक अभिनय आणी होळीचा धिंगाण्याचा माहौल.
१४. खिडकी खुली जरा, जरा पर्दा सरक गया.
गोविंदा वन्स अगेन-दिवाना मस्ताना. त्याच्या डँसने धुमाकुळ (हंगामा) घातला. अनिल कपूर, गोविंदा अन चावला आजी सर्वच जण खास.
या यादीत अजुन अलिकडे एक-दोनगाण्यांची वाढ झालेली आहे.
१५. नॉटी नॉटी सैया सैया - कॅश
ह्या गाण्याचे शब्दांकन चांगले आहे, पण चित्रीकरण ज्या पद्धतीने केलंय, ते अगदी अपर्तीमरित्या अर्वाच्य तर्हेने.
नट्यांच्या कापडांवर २ रुपये जरी जास्त खर्च केला असता तर आपल्या जुन्या (कसब्याच्या) बाजारातील नवी कापडं विकत घेता येत होती. त्या देओल काकुंच्या मर्दानी शरीराला पाहुन म्हणे खलीला घेर्या आलेल्या. गाणं छान, रितेशला दाढी करण्यासाठी मिपावरुन मदत करण्याचं आश्वासनसुद्धा.
तर मग मित्रहो कसं वाटलं ते कळवा. बाकीची या सदरातील गाणी आपण सुचवावी.
अवांतर : लिवायला लई कटाळा यितु. एक टंकलेखक फायजे. व्यनितुन संपर्क करा.
प्रतिक्रिया
2 Mar 2011 - 6:40 pm | गणेशा
फालतु अर्थहीन गाणी उगाच फक्त ढिंच्याक म्युजिक देवुन तयार केली ना एकताना खुपच राग येतो ..
पण काय करणार .. असल्या गाण्याकडे साफ दुर्लक्ष करतो मी.. वरील गाणी ही खरेच खुप भंकस आहेत.
नविन पैकी एक गाणे मधेय सारखे एफ्.एम वर लागायचे मी लगेच चॅनेल चेंज करायचो.
गाणे होते : x x x तेरे लिये ..
काहीही लिहिलेले आनि पुढे ...तेरे लिये .. काय अर्थ ही नाहिये निट ..
जन्नते मांगी मैने तेरे लिये .
दुनिया सजायी मैने तेरे लिये ..
असलेच काहि तरी.
गआणे कधीच पाहिलेले नाहिये हे ..
पण डोकेच फिरते एफ.एम ला लागले की ...
असीच बरीच गाणी आहेत त्यांची शब्दरचना खुप खालची असती ..
खालची आणि सोपी यात फरक आहे.
उदा>
कधी दूर दूर .. तु समोर .. मन हरवते आज का.
का हे असे .. होते असे.. ओढ लागे जीवा ..
आभास हा ..
हे गाणे सोपे आहे .. पण मस्त वाटते ऐकायला.
3 Mar 2011 - 10:00 am | वपाडाव
हे गाणे नितांत सुंदर आहे याशी बाडिस..
+१
पण तेरे लिये .. हे वाईट्ट/पांचट आहे याच्याशी प्रचंड असहमत.
-१ :-(
आतिफ भाई की आवाज म्हंजे नजराणा आहे.
रचना सुद्धा छान आहे या गाण्याची. बोलही काही वाईट नाहीयेत. एकदा शांतपणे ऐकाच.
शेवटी तुमचं मत.
2 Mar 2011 - 7:04 pm | सविता
उडी उडी मै...कहा उडी उडी...मुडी..मुडी....
असं काहीतरी गाणं आहे... "पा" मधलं.........डोक्यात जातं...शब्दांना काही म्हणजे काहीच अर्थ नाही.
बाकी.... मग...
पिक्चर चं नाव आठवत नाही..पण अक्षयकुमार आणि बहुधा मधु ( रोजावाली) वर चित्रित झालेलं एक गाणं आहे...
"गोरी जो मटके... बालों को झटके... गालों से रस टपके.... कंवारा मन भटके....."
अक्षरशः र ला ट जुळवला आहे... "गालों से रस टपके" काय? अरे तो तो काय रसगुल्ला आहे काय? आणि... तसे पण "गालोंसे रस टपके" व्हिज्युअलाईज केले मी नकळत... ओंगळ वाटले....
2 Mar 2011 - 7:08 pm | धमाल मुलगा
अहो, त्या हिरव्हिनीची लाळ गळत असेल.. =))
अवांतरः काय येक्केक गाणी निवडलीयेत भौ.... व्वा! ;)
2 Mar 2011 - 8:39 pm | नगरीनिरंजन
>>काय येक्केक गाणी निवडलीयेत भौ.... व्वा!
असेच म्हणतो. बर्याच गाण्यांमध्ये ममता कुलकर्णी बाई आहेत. हा ही मराठी मनाचा एक मानबिंदू?? ;-)
4 Mar 2011 - 6:53 am | नरेशकुमार
सविता मॅडम,
असल्या गान्यांचा अर्थ शोधण्याच्या नादी लागु णये. यातिल गुढार्थ खुप वेगळे, अश्लिल आनि भयाणक असतात.
2 Mar 2011 - 7:46 pm | स्पा
हे चावट गाणं कसं विसरलात भौ
चोळीच्या मागे काये ,चोळीच्या मागे :D
3 Mar 2011 - 9:12 am | वपाडाव
स्पा...
मी माधुरी बैंचा फ्यान/स्प्लिट/विंडो/सेंट्रलाईझड ए.सी. असल्या कारणाने ते गाणं जाणुन-बुजुन ईसरलो.
त्यात काही आपलं मन लागत नाही.
-(खैतान/वोल्टास) वपाडाव
2 Mar 2011 - 8:01 pm | इंटरनेटस्नेही
ही गाणी म्हणजे 'मस्ट' आहेत या यादीत:
१. बेवफा बार में बेवफा बार में..
२. पिंजरा हैं इष्क पिंजरा सोने का!
३. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी
3 Mar 2011 - 9:56 am | वपाडाव
हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना.
पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही.
१ नि २ विषयी सहमत.
- (गाण्यांची कदर कर)णारा
वपाडाव.
3 Mar 2011 - 1:10 pm | इंटरनेटस्नेही
. जवानी में अब जंग होने लगी ये चोली मेरी अब तंग होने लगी
हे गाणं घेतलं असतं पण ते जरा जास्तच डायरेक्ट आहे ना.
असु दे असु दे.. मी घेतलं ना.. झालं मग! ;)
४. थोडासा प्यार हुआ है थोडा है बाकी
पण हे गाणं तसं पहायला गेलं तर चांगलं आहे की. हे या क्याटेगिरीत मोडेल असं वाटत नाही.
१४ व्या वर्षी ब्रेक ऑफ झालेल्या पोरीने लिहिलेलं वाटतं... सो इमॅच्युअर.
१ नि २ विषयी सहमत.
धन्यवाद! :)
3 Mar 2011 - 1:22 pm | वपाडाव
मग हे गाणं त्या "पहिला पहिला क्रश ..." च्या प्रतिसादांत असायला हवं होतं.
व्हॉट से?
3 Mar 2011 - 3:38 pm | टारझन
हे गाणे सकाळी सकाळी गेल्यावर आतुन आवाज देण्याच्याही कामी येते :)
4 Mar 2011 - 6:54 am | नरेशकुमार
कुठे गेल्यावर ?
3 Mar 2011 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते
इंट्या, लेका... असली गाणी ऐकतोस होय? कोणी घरी बाबांना कळवलं तर?
4 Mar 2011 - 6:55 am | नरेशकुमार
हा हा हा,
बाबा सुद्धा इथं मिपा वाचत णसतील कशावरूण ?
2 Mar 2011 - 8:50 pm | आत्मशून्य
मुझको राणाजी माफ करना, चोरी चोरी मैने भी तो यारी निभायी रे, सरकाई ल्येओ खटिया जाडा लगे है आणी ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है गाणी आपली लय फेवरीट होती तवा. आताच्या आयटमसाँगना तर त्याची सर बी येऊ शकनार न्हाइ. सगळच सालं कमर-शील आन प्लास्टीक झालया आता.................
3 Mar 2011 - 9:14 am | वपाडाव
हेच म्हंतो की वो मी पण...
मुन्नी अन शीला निव्वळ फिक्या की हो या समोर.
2 Mar 2011 - 9:53 pm | जानम
आणखी काही :
१. बिडी जलाअॅदे जिगर्से पिया ...(ओम्कारा)
२. बिल्लो रानी (गोल)
:-)
2 Mar 2011 - 11:23 pm | इरसाल
कल सैय्याने ऐसि ...........
2 Mar 2011 - 11:49 pm | आनंदयात्री
जहर है के प्यार है तेरा चुम्मा
3 Mar 2011 - 1:39 pm | वपाडाव
हे गाणं, बोल ऐकले की लैच भारी वाट्टं.
मला लिहिण्यासारखं काही भेटलं नाही म्हणुन फक्त दुवा देउन सोडुन टाकलं.
3 Mar 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावरील आदरणिय व्यक्तिमत्व असलेल्या आनंदजीयात्री यांचा असा अप्रगल्भ प्रतिसाद पाहून आज आमची मान शरमेनी खाली झुकली. मिपाला अप्रगल्भतेकडे नेणार्यांच्यात आज आमच्या मित्राचे नाव जोडले गेल्याने आम्हाला मानसीक त्रास झाला.
3 Mar 2011 - 12:44 am | बोक्या सातबन्दे
आथरा बरस कि कन्वारी कली थी
3 Mar 2011 - 9:34 am | वपाडाव
बोकोबा हे पहा
http://www.misalpav.com/node/17065#comment-293486
-(मउ म्याउ) वपाडाव
3 Mar 2011 - 9:45 am | पंकज
3 Mar 2011 - 12:14 pm | विकाल
अन हे
"..................कल सैंयाने ऐसी बोलींग करी..... एक ओवर भी मैं खेल पायी नहीं......"
सुमार ९४ ९५... चक्क तब्बू बै.... न गुलशन...!
3 Mar 2011 - 12:17 pm | पिलीयन रायडर
कभी हंड्रेड वन कभी हंड्रेड टू...
होठ रसिले तेरे होठ रसिले..
मोहिन्जादाडो... रोबोट
लटका लगा दिया हमने... हिं दुस्तानी
आईला रे लडकी मस्त मस्त तू यायला रे...
तोफा तोफा तोफा ....
3 Mar 2011 - 1:37 pm | वपाडाव
तोफा तोफा तोफा
आपको आपको आपको
दिया दिया दिया
;-) ;-) ;-)
3 Mar 2011 - 2:18 pm | गवि
साधारण छोट्या गावात केस कापायला बसलोय आणि टेप लागली आहे असा फील देणार्या या सर्व गाण्यांची आठवण करुन दिल्याबद्दल आभार.
:)
3 Mar 2011 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
आमचे आगीत चार तेल्शिंतोडे :-
म्हणजे गावातील लोक ऐकतात ती 'प्रसिद्धी मिळालेली पण वंगळी/वक्टी /आचरट/बिभत्स/छिछोर गाणी ' आणि शहरातील लोक ऐकतात ती किंवा शहरातील 'सलून्स' मध्ये लावली जातात ती दर्जेदार गाणी असे गविंना म्हणायचे आहे का?
हा भेदभाव शहरी लोकं कधी बंद करणार आहेत ?
3 Mar 2011 - 3:07 pm | छोटा डॉन
>>हा भेदभाव शहरी लोकं कधी बंद करणार आहेत ?
गावातल्या लोकांना असे टोचुन बोलणे नाही आवडले ;)
- छोटा डॉन
3 Mar 2011 - 3:42 pm | टारझन
पर्या . डॉण्या शी. सहमत आहे किमान बोलुन तरी टोचावे.
3 Mar 2011 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
टारझन.. सध्या मुक्काम उरुग्वे ह्यांच्याशी अंशतः सहमत आहे.
बोलताना बोलावे टोचताना टोचावे.
4 Mar 2011 - 6:59 am | नरेशकुमार
बोलल्याणंतर कोणी टोचुन देईल काय ?
4 Mar 2011 - 7:03 am | शेखर
रेडिफ बोल वर एक अकाउंट ओपन कर...
4 Mar 2011 - 7:36 am | नरेशकुमार
चालेल, करतो.
मग त्यावर आपन एकमेकांना टोचुण बोलु, इथे नको.
4 Mar 2011 - 7:47 am | शेखर
तिथे फक्त तुमच्या सारख्या लोकांनाच प्रवेश आहे... मी सरळमार्गी माणुस आहे... =))
3 Mar 2011 - 3:44 pm | वपाडाव
+१
आमची फोडणीला मिर्ची (कॉलिंग लवंगी .... कॉलिंग लवंगी.... कॉलिंग लवंगी..)
सलूनमध्ये बसुन Hit me baby one more time, Doncha think your GF ...... ही आणी असली गाणी कान टवकारत ऐकत असावीत. तरी बरं मी अजुन अल्ताफ राजाची क्यासेट लावली नाही, नाहीतर गविंना चवाळ्यावर बसुन केलेली 'कटिंग' सुद्धा आठवली असती.
3 Mar 2011 - 11:22 pm | गवि
घ्या.आत्तापर्यंत 20 वर्षे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी ऐकत केस कापत असलेल्या गविला शहरी ठरवून पुणेरी शहरी मोकळे ..
4 Mar 2011 - 4:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली अशा गावी अश्शीच गाणी .....
ओ गवि, चांगल्या जिल्ह्यांच्या शहरांना गाव काय म्हणता ?
तुम्हा पुण्या-मुंबईच्या लोकांना बाकी सगळी गावेच वाटतात काय ?
या बामणी वृत्तीचा निषेध.
(शोधा ३ वाक्यातील तार्किक संबंध ;-) )
3 Mar 2011 - 8:18 pm | मदनबाण
अरे पाववड्या कसली लिस्ट दिलीस रे... ;)
चला आता अधिकचे टंकन कष्ट घेतो !!! ;)
तर...
सर्वात प्रथम जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा पाहिलतं का ? असेल तर सुमन (शेखर सुमन नव्हे हो ) कशी वाटली ? ;)
वरती स्पावड्याने चोली के पिछे दिलं हाय !!!
माधुरीच्या सारखं उत्कॄष्ठ नॄत्य करणारी नायिका भविष्यात देखील होणार नाही... तिला तोड नाही.
तिच मै तुम्हारी हुं हे गाणं म्हणजे काय ते पाहिल्यावर कळेल तुम्हाला... ;) इतकं सखोल नाभी दर्शन घडवलयं...बॉब्बो. शिवाय नितंब देखील तितकेच भारी उडवले आहेत !!! ;) त्या गाण्यात एक एफ.एम हुसेन पण दिसलं बघ तुला !!! ;)( लागले सगळे यू-ट्युबवर शोधायला लगेच !!!) ;)
हा... तर स्पावड्याने चोली के पिछे गाणं दिल हाय नव्ह त्याच यक रिमिक्स व्हर्जन म्या पाहिलं व्हतं... रिंगा रिंगा गाण्याने केलेले.
रसिक जनांसाठी ते इथे देत आहे...
हेच म्हंतो की वो मी पण...
मुन्नी अन शीला निव्वळ फिक्या की हो या समोर.
काय रे पाववड्या... शिला ची अॅलर्जी झाली काय तुला ? ;)
अरे चुन्नी मुन्नी फिक्या पडल्या तिच्या पुढे बघं जरा...
कश्या ? तर हे इडियो पहाच जरा... ;)
इतक्या यंन्ट्रॅया तिन कश्या मारल्या, त्या देखील एकाच वेळी... ते काय समजलं नाय बॉ मला... कोणाला समजलं असेल्/माहित असेल तर नक्की सांगा हं... तेव्हढीच माझ्या ज्ञानात भर पडेल म्हणतो !!!
बाकी मराठी तडका लागलेली शिला पण पाहुन घे... ;)
बस्स झालं... उगाच ओव्हर डोस नको !!! काय ? ;)
(सौंदर्यभोक्ता);)
4 Mar 2011 - 10:09 am | वपाडाव
मदनबाणांनी आपलं वज्रास्त्र मारुन इथे या धाग्याचं संधान केलेलं आहे.
त्रिवार __/\__.
अवांतर :
+१११
दिलखेचक अदा, नृत्य कौशल्य, मनमोहक चेहरा, त्यावर खळखळतं हास्य.
जाउ द्या राव. तुमी लई शेंटी केलं मला.
(माधुरीच्या मदनबाणाने घायाळ होणारा -रसिक) वपाडाव.
अॅलर्जी वगैरे काही नाही, पण शिलावहिनी फक्त slice च्या जाहिरातीत आवडणार्यांपैकी मी एक आहे.
3 Mar 2011 - 9:50 pm | मुलूखावेगळी
पोरांचा धागा आहे म्हणुन सोडुन देते. नाही तर लै नामी गाणे सुचले होते ...........................
चालु द्या :)
4 Mar 2011 - 7:02 am | नरेशकुमार
द्या की हो,
नाहीतरि थोड्या येळानी ह्यी पोस्ट उडनारच आहे.
4 Mar 2011 - 10:23 am | मुलूखावेगळी
बागडा रे मस्त. ;) तुम्हांला राखीव कुराण
3 Mar 2011 - 10:56 pm | देवदत्त
तेरे दिल की पटरी पे दौडेगी मेरे दिल की रेल.. (आशिक मस्ताने)
दरवाजा खुला छोड आयी, नींद के मारे (नाजायज)
बाराना दे.. बाराना दे (इन्साफ)
......
4 Mar 2011 - 12:28 am | इंटरनेटस्नेही
१. चुम्मा दे गयी चुम्मा हो गया हम्मा हम्मा..
ओ स्वीटी तुझे देख के, दिल मे बजे सीटी..
तसंच
२. वॉल्युम कम कर पापा जग जायेगा..
३. मम्मी को नही है पता
ही अत्यंत सुरेल आणि सभ्य गाणी?? ;)
4 Mar 2011 - 10:05 am | वपाडाव
वर दिलेली काही गाणी त्यांच्या दुव्यांसहित.
दरवाजा खुला छोड आयी, नींद के मारे (नाजायज)
जाओ चाहे दिल्ली मुंबई आग्रा (कुरुक्षेत्र)
मम्मी को नही है पता (चॉकलेट)
4 Mar 2011 - 10:50 am | विजुभाऊ
ओ पडोसन अपनी मुरगी को रखना संभाल मेरा मुर्गा हुवा है दिवाना : जादुगर ( अमिताभ बच्चन)
हम तंबु मे बंबु लिये बैठे : अमिताभ बच्चन ( चित्रपट बहुतेक: कुली )
4 Mar 2011 - 11:12 am | गवि
हम तो तंबू में बंबू लगाई रहे थे.
मर्द. (जो मर्द होता है उसे दर्द नही होता.)
4 Mar 2011 - 11:31 am | वपाडाव
नव्हे ते असे आहे.
मर्द को दर्द नही होता.
जबड्यात हात घातल्याबद्दल स्वारी.
-(मर्द मराठा)वपाडाव
4 Mar 2011 - 11:39 am | गोगोल
ऊप्स .. म्हणजे आता ऊर्वरित आयुष्यात तुम्हाला चुकून माकून दर्द झाला तर???
:P
4 Mar 2011 - 11:51 am | वपाडाव
शिंपल हाय,
खिशात himani fast relief - दर्द मिटाये चुटकी मे किंवा डिस्प्रिन - दर्द क अंत, तुरंत बाळगायचं.
4 Mar 2011 - 12:26 pm | गवि
नाही
-१
अमितजींच्या या डायलॉगविषयी मला खात्री आहे.
जो मर्द होता है उसे दर्द नही होता.
मर्द को दर्द नही होता हे अन्य कुठेतरी किंवा एखाद्या संवादात आले असेल. पण "मर्द" सिनेमाचा मेन डाय्लॉक
"जो मर्द होता है उसे दर्द नही होता."
आणि ते तंबूचं गाणं त्यातच होतं. इतर मुख्य झलक्स : चाबकाचे फटके, त्यावर मिठागरातील प्रेमपूर्ण मीठचोळणी, आणि तात्काळ गवताच्या गंजीत प्रेमपूर्ण प्रयाण... इ इ
त्यानंतर देशातल्या गरीब जनतेचे रक्त रोज भरपूर काढून घेऊन लोणच्याच्या बरण्यांत काढून फडताळांत साठवून ठेवणे आणि इतर वेळात त्यांजकडून दगड धोंडे वाहून कष्टाची कामे करुन घेणे.
कृपया तज्ञांनी पाठिंबा द्यावा.
4 Mar 2011 - 11:45 am | स्पा
अरे बाबूजी जरा धीरे चलो बिजली गिरी यया बिजली गिरी
या गाण्याने तर पार य्याड लावला होतं पघा...
त्या गायिकेचा (?) "हिरवट" आवाज तर लय भारी होता
4 Mar 2011 - 11:53 am | वपाडाव
सोनु कक्कर
4 Mar 2011 - 6:38 pm | धमाल मुलगा
पडद्यावरची 'या ना गुप्ता' म्हणवून घेणारी सळसळणारी बिजली बघायची सोडून गाण्यामागचं नरडं कोणाचं ह्याचा शोध घेत बसला होता? मोठे व्हा! ;)
5 Mar 2011 - 10:38 am | वपाडाव
ती बी काय कमी नाय !!!!!
लोक आपापल्या परीने जे झेपेल ते करतात्/पाहतात्/ऐकतात.
आम्ही मोठे आहोतंच हे.वे.सां.न ल.
झेपेल ते ;-)
अवांतर : हा प्रतिसाद गविंच्या धाग्यावर यायला हवा होता.
4 Mar 2011 - 11:32 pm | एक
खुल्ला है राजा" हे शिल्पा शेट्टींच आमंत्रण-वजा-गाणं राहिलं का? पिक्चरचं नाव विसरलो. पण त्यात ३ हिरॉईन्स आणि अक्षयकुमार होता असं म्हणतात. ;)
5 Mar 2011 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार
श्या !
ह्या सगळ्यात आमच्या लाडक्या मिथुनदाचे आणि आयेशा झुणका भाकरीचे* 'घुटुर घुटूम.. .. चढ गया उपर रे अटरीया पे सोना कबुतर रे..' असे काही गाणे कसे विसरले लोक्स ?
*शब्द सौ. कणेकर गुर्जी
5 Mar 2011 - 4:33 pm | वपाडाव
एक तर परांनी आम्हाला दिलेला फैला प्रतिसाद अन त्यात त्यांनी तो लेख अपुर्ण/अर्धवट वाचुन दिला आहे असं वाटायला कुठेच जागा सोडली नाही. तसं हा त्यांचा दुसरा प्र. आहे पण या आधी त्यांनी आणंदयात्रींचा समाचार घेतला होता. धाग्याविशयी काही लिहिण्यात नव्ह्ते आले. तर राहीला प्रश्न त्या गाण्याचा. ते तर वरंच दुस्र्या क्र. शिलेक्ट केलेलं आहे. एवडं म्ह्त्वाचं कसं इस्रु शकीन मी.
5 Mar 2011 - 4:40 pm | वपाडाव
या धाग्यावर प्रतिसाद देणार्या सर्व हौशी जणांचे आभार......