शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
12 Jun 2008 - 9:27 am

झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्‍या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील...
ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट...
( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)...
. ..
हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...


मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी आर्मेचर ( लाकडी सांगाडा) वरती शाडूची भिजवलेली माती लावून कामाला सुरुवात केली होती...
ज्यांची प्रतिकृती करायची होती त्यांना समोर विविध कोनात बसवून त्यांनी भराभर आउटलाईन तयार केली सुद्धा... मग डोळे करण्यासाठी काय तंत्र वापरायचे, कोणती अवजारे वापरायची, यावर एकदम प्रॆक्टिकल सूचना दिल्या .. इतकं वय असूनही मातीवर एकदा हात चालू लागला की त्यांच्या हाताला कंप अजिबात नव्हता.. त्यांच्या परवानगीने मी भरपूर फोटो काढले...


त्यांच्याशी खूप छान गप्पा झाल्या ..त्यात असे कळले की त्यांनी ५० च्या दशकाच्या सुरुवातीला ( ५३ ५४ साल असेल बहुतेक) बडोद्याहून फ़ाईन आर्ट्सची पदवी घेतली.. पदवीनंतर त्यांना एक वर्षं पॅरिसमध्ये फ़ाईन आर्ट्स शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती आणि त्याचा त्यांनी स्वत:चं ज्ञान वाढवायला पुरेपूर उपयोग करून घेतला.... त्या काळात राष्ट्रीय पातळीवरच्या शिल्पकलेतील काही स्पर्धा त्यांनी जिंकल्या होत्या.... ते अगदी तरूण असताना कॉलेज मध्ये पृथ्वीराज कपूर आले होते , त्यांना मॉडेल म्हणून एक तास थांबण्याची विनंती करून जोशी सरांनी त्यांचे अप्रतिम शिल्प बनवले होते , ते त्यांच्या संग्रही अजून आहे, पण माझ्याकडे त्याचा फोटो नाही...)
नंतर ते निवृत्तीपर्यंत राजस्थानमध्ये अजमेरच्या मेयो कॉलेजात फ़ाईन आर्ट्सचे हेड ऒफ़ द डिपार्टमेंट होते...

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक पैलू म्हणजे ते उत्तम क्रिकेट प्लेयर आहेत...( आधी वाटलं त्यात काय? सगळेच क्रिकेट खेळतात...)..मग कळलं ते तर राजस्थानकडून २० पेक्षा जास्त वर्षं रणजी आणि भरपूर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत..
ते चांगले लेगस्पिनर होते आणि काही काळ राष्ट्रीय संघात निवड होण्याच्या जवळ पोचले होते... ते नाटकातही खूप रस घेऊन काम करत होते,... कॊलेजच्या आणि इतर अनेक हौशी ग्रुप्सच्या नाटकासाठी लागणारे मोठमोठे सेट आणि पडदे त्यांच्या देखरेखीखाली बनत असत.
म्हटलं बाप रे... एकाच माणसाला इतकं सगळं कसं काय जमतं?...

क्रिकेटवरच्या आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या... ( मीही कॉलेजकडून खेळलो होतो आणि एम सी ए च्या बर्‍याच परीक्षा पास होऊन राज्यस्तरीय क्रिकेट अंपायर होतो असे त्यांना सांगितले...अंपायरिंगच्या आठवणींविषयी एक लेख लिहायचाय अजून)...)...दोन व्हेरिएशनने गुगली कसा टाकायचा तुला शिकवेन म्हणाले, ... ( त्यातला एखादा प्रकार नुसता लक्षात आला तरी पुष्कळ झाले, टाकायला जमणे हे महिनोन्महिने मेहनतीचे काम.. अजून त्यांच्याकडे गुगली शिकायला जायचे आहे ... ) ते उत्तम गली फ़ील्डर होते... ( त्यांच्या फ़ील्डिंगबद्दल मला जालावर एक संदर्भही सापडला .. चंदु जोशी यांच्या निवृत्तीनंतर राजस्थान संघ उत्तम गली फ़ील्डरला मुकला))..त्यांनी कॉलेजातून अनेक क्रिकेट प्लेयर्स घडवले... काही जण टेस्ट खेळले पुढे.. ( उदा. अरूणलाल)...मंकड, सी के नायडू आणि मुश्ताक अली यांच्या गोष्टी ऐकल्या...

इकडे काम भराभरा चालू होतंच.. मी त्यांना काही मूर्ख प्रश्नसुद्धा विचारले की हेच मोल्ड / साचा करूनसुद्धा करता येतं का? ते म्हणाले, " अरे असली पुष्कळ तंत्रे आहेत,पण त्यात कसलं आलंय स्किल? मला ग्रिड आखून , मोजणी करून , साचे करून असली शिल्पे बनवायला आवडत नाही "...
तयार झालेले शाडूचं शिल्प... विविध कोनातून...


मग यावरच प्लास्टर मारून ते सेट झाल्यानंतर त्याचा साचा तयार झाला ,त्यात पुन्हा प्लास्टर भरून प्लास्टर शिल्प तयार होतं..त्यानंतर उरलेली शाडूची माती मी घेऊन गेलो ....घरात भरपूर कचरा , धूळ उडवली आणि मातीच्या पाण्याचे भरपूर शिंतोडे भिंतीवर उडवले ( आणि खायच्या त्यांच्या शिव्या खाल्ल्या)......मग माझे ही एक फ़्री हँड शिल्प तयार झाले...
ते अगदीच विनोदी ( नाक वगैरे आणि कर्टली अँब्रोज सारखे ओठ ) दिसत असले तरी आमचे पहिलेच काम असल्याने आम्हाला फ़ार आवडते...

जोशी सरांकडून आता गुगली, फ्लिपर आणि पेपर मेशी तंत्राने शिल्पे बनवणे शिकायला जायचे आहे... बघूयात कधी योग येतो ते...

कलातंत्रशिक्षणविचारअनुभवमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

राजे's picture

12 Jun 2008 - 9:35 am | राजे (not verified)

ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!!

वा काय कला !
फोटो छान आले आहेत....

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

अमोल केळकर's picture

12 Jun 2008 - 9:38 am | अमोल केळकर

अप्रतिम कलाकार !!

भाग्यश्री's picture

12 Jun 2008 - 9:39 am | भाग्यश्री

काय मस्त केलय हो?!! जोशी काकांनी केलेले शिल्प बेस्टच आहे, परंतू तुमचे पहीले असून अप्रतिम आले आहे! फार आवडलं!!

http://bhagyashreee.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2008 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री जोशी मास्तरांची शिल्पकला आणि त्यांच्याबद्दलची माहिती आवडली !!!
बाय द वे, या कलेला मृदुमुर्तीकलाही म्हणतात असे वाटते ? ( चुभुदेघे)

मनस्वी's picture

12 Jun 2008 - 10:02 am | मनस्वी

मास्तर, शिल्पकलेची सचित्र माहिती आवडली.
आणि तुमचे पहिलेवहिले शिल्पही छान आहे.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

प्रमोद देव's picture

12 Jun 2008 - 10:10 am | प्रमोद देव

उत्तम लेख आहे. जोशी सर आणि त्यांचे शिष्य भडकमकर मास्तर दोघांचेही कौतुक वाटते.
ज्या व्यक्तीचे शिल्प बनवलंय त्या व्यक्तीची छायाचित्रं सोबत जोडली असती तर अजून मजा आली असती.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

ऋचा's picture

12 Jun 2008 - 10:16 am | ऋचा

अप्रतिम!!!!!!!!!!!!!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ध्रुव's picture

12 Jun 2008 - 11:57 am | ध्रुव

सुरेख चित्रे व तुमच्या सरांची शिल्पकला तर फारच छान आहे. अजूनही येऊदे...
--
ध्रुव

स्वाती दिनेश's picture

12 Jun 2008 - 2:49 pm | स्वाती दिनेश

गुरु आणि शिष्य दोघांनी केलेली शिल्पे आवडली. आठवणीही छान!
स्वाती

चतुरंग's picture

12 Jun 2008 - 6:02 pm | चतुरंग

जोशीबुवा चांगलेच शिल्पकार दिसताहेत. आपलेही शिल्प छान आहे. शिल्पकला ही अतिशय अवघड आहे असे माझे मत कारण त्रिमितीत काम करताना एक वेगळीच समज लागते.
पुढच्या कामाला शुभेच्छा!

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

12 Jun 2008 - 7:18 pm | मुक्तसुनीत

लेख आणि माहिती फार आवडली. इतक्या बुजुर्ग माणसाला जवळून पहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , एखादे काम "घडताना" पहायचे ! हे म्हणजे भीमसेन जोशींची (मायक्रोफोन शिवायची) खाजगी मैफल पहिल्या रांगेत बसून ऐकण्यासारखे झाले राव ! :-)

एक विनंती : या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम. तुमची नाट्यकलेबद्द्लची लेखणी थोडी इथे वळवा की ! :-)

ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!!

राजेसाहेब , काय बोलला आहात ! पैसा वसूल :-)

भडकमकर मास्तर's picture

14 Jun 2008 - 9:07 am | भडकमकर मास्तर

या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम
_
शक्य असते तर तेही लिहिले असते पण एवढी माहिती मला खरंच नाही...
आमच्या नाटकाच्या निमित्तानं हे सारं चुकून शक्य झालं, इतकंच....
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

13 Jun 2008 - 2:12 am | इनोबा म्हणे

मास्तरांचे मास्तर 'जोशी मास्तर' यांचे शिल्प तर अप्रतिमच...पण आमच्या मास्तरांनीही कमालच केली म्हणायची.

अवांतरः ह्या मास्तरनी आता काय करायचे बाकी ठेवलंय ते पण कळू दे!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

13 Jun 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

वा मास्तर! सुंदर लेख आणि ओळख..

गुरुशिष्य परंपरेला सलाम! जोशीमास्तरांना आमचा दंडवत सांगा...

तात्या.

शितल's picture

13 Jun 2008 - 5:59 pm | शितल

मास्तर तुमच्या गुरूला आणि तुम्हाला ही सलाम.
मस्त कला आहे ही, आणि तुमची आवड अजुन कशात कशात आहे हे ही कळु दे.
बाकी इनोबा म्हणतो ते खरे.

सहज's picture

15 Jun 2008 - 8:16 am | सहज

लेख आवडला.

शिल्पकला बघायला जितकी उच्च तितकी त्यावर काही वाचायला बोरींग हा देखील एक पुर्वग्रह तुमच्या लेखाने दुर झाला.

जोशी बुवांची माहीती, कला, फोटो, त्यांचे इतर कौशल्य वाचायला खरच खूप छान वाटले.

कबुलीजबाब - खरे सांगतो भडकमकर मास्तर यांचे क्लासेस मालीका वाचल्यावर मी हा लेख नंतर वाचायचा म्हणुन बाजुला ठेवला. ; - ) मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. भडकमकर सर, लेखाचे शीर्षक वाचुन लेख वाचायला किंचीत पुर्वग्रहाने वेळ लावला त्याबद्दल माफी. पुन्हा असे होणार नाही.आता वाचल्यावर कबुल करतो की आधी वाचायला पाहीजे होता.

भडकमकर मास्तर's picture

15 Jun 2008 - 9:04 am | भडकमकर मास्तर

मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा.
क्लासचे शीर्षक करीअर गयडन्स क्लास भाग अमुक अमुक असेच असणार आहे...
असो...तुम्हाला लेख आवडला , आनंद वाटला... धन्यवाद.. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

27 Jan 2025 - 3:39 pm | भडकमकर मास्तर

https://www.youtube.com/watch?v=CMw9BeAWbro

या वरच्या मुलाखतीत गावसकर १ तास चार मिनिटे ०७ व्या सेकन्दाला राजस्थानचे लेग स्पिनर चन्दू जोशी यान्चा उल्लेख करतात. आता नव्वदीत असतील आता. ९२ .

त्यंच्यावरचं हे आर्टिकलही सापडलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2025 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चक्क भड़कमकर मास्तर ? येत राव्हा...!

-दिलीप बिरुटे