माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..??
त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...."
आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय..
.
.
.
.
.
.
पटतंय ना वरचे लेखन. पटणारच.. मद्रासच्या सफरीचा मस्त वृत्तांत http://misalpav.com/node/7993 इथे अधिक वाचायला मिळेल. तिथेच या लेखमालेच्या आधीच्या भागांची लिंक मिळेल.
***
"ठीक आहे.. राजे नक्की.."---------------चला सुरूवात तर चांगली झाली----------- काऊंट = १
पुढे?
"तात्या..?"
"हो.. पण ते भांडी घासायला तयार होतील?? स्वयंपाक करायचं एकवेळ मनावर घेतील पण भांडी....??? जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील.... नि जाऊन स्वतःचा 'खाद्य व लग्न संस्कृती' नावाचा प्रोग्राम काढतील. आपल्याकडे काळं कुत्रं फिरकायचं नाही मग... आपल्याला काँपिटीशन नाय पायजे...!!"
"खरंच की... तात्या कटाप!!!""मग अवलियाला खोपच्यात घेऊया"???
"अरे तो माणूस काळा की गोरा हे माहित नाही... .. अजून त्याला कुणी पाहिलं नाही.. तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू"
"ठीक आहे.. अवलिया पण कट!!!" ------------------------------- काउंट तसाच
.
.
.
खुसखुशीत संवाद आणि मस्त कथाबीज.
काय म्हणालात वाचायचे आहे? वाचा तर मॅरेज लाईफ
http://misalpav.com/node/8893
http://misalpav.com/node/8906
http://misalpav.com/node/8917
***
मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखिकेची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी ती केवळ एवढेच लिहु शकते असे नाही. तिचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/3586 इथे वाचता येईल.
बरोबर आहे मंडळी, ही लेखिका आहे मस्त कलन्दर.. :)
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.
मात्र मस्त कलन्दर आमची या आठवड्याची "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे तिच्या कडे असलेल्या मोगर्यांच्या कळ्या सुकल्या आहेत. त्यामुळे हल्ली ती लेख लिहित नाही. हरकत नाही. आम्ही तिला मोगर्यांच्या कळ्या भेट देत आहोत. त्याच बरोबर पुष्पगुच्छ आणि पैठणी देत आहोत. त्याचा तिने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! मोगरा फुलला !" बाकी ती ठरवेल ते मान्य. कसे?
पुष्पगुच्छ
पैठणी
मोगर्यांच्या कळ्या
दुकानांचे पत्ते
पुष्पगुच्छ - http://www.sendflowerindia.com/Images/bouquet_07.jpg
पैठणी - http://agjbusiness.com/images/paithani.jpg
मोगर्यांच्या कळ्या - http://farm2.static.flickr.com/1426/1170785933_17e9c4bf75.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
प्रतिक्रिया
10 Feb 2011 - 6:33 pm | नरेशकुमार
माझं नाव कट कर रे !
(नसेल तर टाकुन मग कट कर.)
बाकी मस्त कलंदर ताई, पैठ्नी निट बघुन घ्या हो ! खर्या जरीची/रेशमाची आहे का नाही ते.
10 Feb 2011 - 6:42 pm | श्रावण मोडक
नाना, दर तीन दिवसांनी लिहित जा हे. :)
पण...
हे कुणी सांगितलं? काही घोर गैरसमज दडलेत या वाक्यात. मितभाषी? मकी? प्रगल्भ विचारांची हे शब्द वाचताना विचारजंत हा शब्द आठवला... ;)
10 Feb 2011 - 6:49 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त रे नान्या !
वरचे शब्द वाचुन अंमळ डोळ्यासमोर अंधारी आली आणि मकीचे वादविवादपटुत्व कानात गुंजरव करायला लागले. बाकी काही काळापूर्वी आम्ही मकीला मितभाषी म्हणावेच लागेल अशा व्यक्तीमत्वाला सहन केल्याचे आठवले आणि शुद्ध परत आली.
10 Feb 2011 - 6:42 pm | मस्त कलंदर
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल. :-)
आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून..
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच... :-)
10 Feb 2011 - 6:50 pm | टारझन
हा हा हा .. मकाकुंशी सहमत आहे .. हा णाण्या उगाचंच अमुल बटरचं पाकिट घासतोय ...
मस्कामारु साला :)
तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... :)
- (सदा पडिक असणारे मिपाकर) टारझन
10 Feb 2011 - 7:45 pm | सुहास..
मस्कामारु साला
तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... >>>
+१
फक्त ण च्या एवजी न वाचावा ;)
(सदा भिडीक असणारा मिपाकर) सुहास
10 Feb 2011 - 7:01 pm | पर्नल नेने मराठे
तेच म्हटले ..उश्त्या हाताने कावळा पण न हाकणारा नाना आज अचानक पैठणी कशी देतोय ?
10 Feb 2011 - 7:23 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
अग्ग्ग्ग्ग्ग्गं!!!!!
10 Feb 2011 - 7:20 pm | गणपा
चला आश्वासन तरी मिळाल... नान्स् प्रगती होतेय रे. ;)
लिहिता रहा.
10 Feb 2011 - 7:22 pm | धमाल मुलगा
साडी म्हणलं की जगाच्या असेल त्या टोकाहून धावत आलीच पाहिजे.
श्री.परासर हे लवकरच 'साडीप्रेम, कालची, आजची आणि उद्याची स्त्री' असा लेख लिहिणार आहेत त्याची आठवण आली. ;)
10 Feb 2011 - 8:56 pm | रेवती
तुला साडी हा प्रकार आवडत असावा असा अंदाज आहे.
साडी या विषयावरच का लिहित नाहीस?
मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत.
11 Feb 2011 - 4:42 pm | मस्त कलंदर
साडी म्हणजे जाम आवडतं प्रकरण आहे माझं. लहानपणी आई साडी देत नाही म्हणून मिळेल ते लांबलचक कापड गुंडाळून त्यात पाय अडकून रपारप पडलेय आणि सांगूनही ऐकत नाही म्हणून आईचा त्यावर धपाधप मारही खाल्लाय. परिणाम असा झालाय की सध्या कॉलेजमध्ये काही प्रोग्रॅम असेल तर साडी नेसवून घेण्यासाठी आदल्या दिवशीच आमच्या अपॉईंटमेंटा घेतल्या जातात!!!! :-)
>>>मला तसेही पैठणी, चंदेरी आणि पटोला शिवाय दुसरे प्रकार ओळखता येत नाहीत.
मला बर्यापैकी प्रकार कळतात असा माझा समज आहे.. गेल्या कित्येक वर्षांत आई-बहिणींच्या साड्यांची खरेदी माझ्याशिवाय झालीच नाहीय. फक्त साडी खरेदीत तास न् तास घालवणं आवडत नाही इतकंच.
साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो.. :-)
11 Feb 2011 - 5:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अक्षर थोडं बरं काढणार असशील तर ती साडी मला प्रेझेंट म्हणून चालेल. सध्या मी माझा फॅशन कोशंट वाढवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे.
11 Feb 2011 - 5:47 pm | मस्त कलंदर
माझं अक्षर सुंदर म्हणावं इतकं चांगल आहे.
अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट मोडक. ते माझं हस्ताक्षर पाहून 'अक्षरावरून निरागसपणा अजून मनात लपून आहे' असं म्हटले होते!!!! :-)
11 Feb 2011 - 5:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रामोंना आंजापरिवारात काय विशेषणाने ओळखतात मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीच. पण हस्ताक्षरावरून तू निरागस वाटतेस तर तुझं अक्षर नक्की गोल-गरगरीत असणार ... असं असेल तर तेलुगु आणि बंगाली लिपीत लिही हो माझ्यासाठी लिहीशील त्या साडीवर.
11 Feb 2011 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया ह्या धाग्यावर हा वधु-वर सुचक अंक असल्यासारख्या मिजासी करुन स्वतःच्या जाहिराती करु नयेत.
हुकुमावरुन.
11 Feb 2011 - 6:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मके, या पर्याची जळजळ बंद करण्यासाठी त्याच्यासाठी एक "गंजकं" महावस्त्रही बनवू या.
11 Feb 2011 - 6:06 pm | श्रावण मोडक
काय ते, काय ते?
11 Feb 2011 - 6:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जुन्या मालकांपासूनच रूढ आहे तेच ते! उगाच पब्लिकमधे शिवीगाळ केली असा आरोप नको म्हणून मोघमच ठेवतें, कसें?
11 Feb 2011 - 7:36 pm | श्रावण मोडक
छे, छे... यात कुठं शिवीगाळ आहे?
10 Feb 2011 - 6:45 pm | पर्नल नेने मराठे
मकीला समस लिहिलाय =)) आता ति येइल्स ;)
10 Feb 2011 - 7:29 pm | मस्त कलंदर
या चुचुचे जितके फेसबुक प्रोफाईल्स तितके मोबाईल नंबर दिसताहेत.
@परा: असो!!!! ;-)
10 Feb 2011 - 6:49 pm | विजुभाऊ
आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून..
नान्याला पैठणी पहायची सवय नाहिय्ये गो. त्याला पैठणी नेसलेली पहायची सवय आहे.
जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतो
10 Feb 2011 - 6:54 pm | पर्नल नेने मराठे
तुमचा नाना अगदी सर्वगुणी संपन्न दिस्तोय :-?
10 Feb 2011 - 7:01 pm | नरेशकुमार
तीच तर पैटनीची खासियत आहे.
10 Feb 2011 - 6:50 pm | कवितानागेश
फसवलं फसवलं, फसवलं!
ही काय पैठणी आहे का?
10 Feb 2011 - 6:58 pm | स्वाती दिनेश
लिहायचं मनावर घेच आता..
नाना,हे बरोबरच झालं.. तसंही मकीने खूप दिवसात काही विशेष असं लिहिलं नाहीये..
तिसर्या मिपाकराची वाट पाहत आहे,(मोठ्या यादीतल्या मिपाकरांनी लवकारत लवकर चांगले काही लिहीले तर ही लेखमाला सफल होईल असा विश्वास वाटतो.)
क्रमश" वाली मंडळी आहेत त्यांनाही जरा त्यांची कथानकं पूर्ण करायला सांगा बरं..
स्वाती
10 Feb 2011 - 7:01 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त कल्पना आहे.
10 Feb 2011 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll
चान चान ....
10 Feb 2011 - 7:46 pm | रेवती
मस्तताईंना लेखणी उचललीच पाहिजे.
नानांनी फटूमध्ये दाखवलेली पैठणी नव्हे असं लिहायलाच आले होते पण 'मस्त' यांनी 'कलंदर' प्रतिसाद देवून नानांची कान व डोळे उघाडणी केलीच्चे तर मी कशाला बोलू?;)
10 Feb 2011 - 8:04 pm | ब्रिटिश टिंग्या
ही मकडी आजकाल शांत असल्याने समस्त मराठी आंतरजाल सुखाने नांदतय हे पहावत नाही का तुला! ;)
10 Feb 2011 - 8:53 pm | निनाद मुक्काम प...
ह्या उपक्रमाच्या निम्मिताने नवीन मिपाकरांना जुन्या जेष्ठ जाणत्या मिपाकाराची व त्यांच्या मिपावरील अतुल्य कामगिरीची ओळख होत आहे .
मस्त कलंदर ह्यांच्या पुढील लेखनास पु ले शु
10 Feb 2011 - 9:15 pm | पैसा
"गौळणी " २ नोव्हेंबरला आल्या होत्या. मग "विकिचा १० वा वाढदिवस" १६ जानेवारीला लिहिल तिने. थोडी टाईम गॅप पडली खरी, पण ती अगदीच अदृश्य नाहिये. मात्र तिचं लिखाणाचं प्रमाण जरा जास्त झालं तर नक्कीच आवडेल मला.
10 Feb 2011 - 9:19 pm | रेवती
वा! वा!! वा!!!
खर्या पंख्या आहात हो पैसाताई.;)
10 Feb 2011 - 9:37 pm | पैसा
उद्या समज तुझ्यावर एक लेख लिहिलाच कोणी, तर तुझी पण बाजू घेईन ग! शेवटी एक पाशवी महिलाच दुसरीला समजू शकते!
10 Feb 2011 - 10:32 pm | रेवती
याला म्हणतात पाशवी प्रतिक्रिया!;)
10 Feb 2011 - 11:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मकीने बर्याच दिवसांत खरडी, व्यनी, इमेल, चॅट मेसेजेस, एसेमेस आणि असाईनमेंट्स सोडून काहीही लिहीलेलं नाही हे मान्य आहे. पण म्हणून मकीबद्दल एवढ्या अफवा पसरवत तिला साधीच साडी पैठणी म्हणून देणे हा साफ अपराध आहे.
नानांचा निषेध.
10 Feb 2011 - 9:23 pm | शाहरुख
नाना, याचा भाग-१ आहे का २ पासूनच सुरुवात केलीय ?
असल्यास लिंक द्यावी.
11 Feb 2011 - 11:39 am | अवलिया
http://misalpav.com/node/16627
10 Feb 2011 - 9:55 pm | गणेशा
छान ...
आणि मद्रास ची सफर माझी वाचायची राहिलेय वाटते.. उद्याच वाचुन काढतो ..
आता
गुडनाईट
11 Feb 2011 - 5:53 pm | प्राजक्ता पवार
छान !