मॅरेज लाईफ.....३

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
11 Aug 2009 - 11:53 pm

परा कधी हो म्हणाला ते त्यालाही कळलं नाही...
आता निखिलने एक कोरा कागद काढला. आणि पराला समजाऊन सांगु लागला. हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेजचा कोर्स अटेंड करायचा... कोर्स सोबत क्लीनिंग एजंट किट आणि कूकिंग टीप्सचे पुस्तक मिळेल.. बदल्यात या प्रोग्रामचे प्रोमोशनल राईट्स मिळणार. आपण काही करायचे नाही फक्त लोकाना अशा सेमिनार ला घेऊन यायचे. आपल्या ओळखी मुळे एक नवीन नोंदणी झाली की काही टक्के कमिशनचे मिळणार होते. असे करून मी एकूण १० नोंदणी झाल्या तर आपण आपल्या गुंतवणूकीतून मोकळे होऊ. सगळॅ ट्रेनिंग जवळ जवळ फुकटात पडणार होते...
किती सोप्पंय हे... लग्न ठरण्याची शक्यताही वाढेल... नि सोबत कमीशनही...!!--परा
"यामध्येही एक लफडं आहे.."-- निखिल
"आता आणी काय?"--अर्थातच परा..
"अरे या प्रोग्राम्सच्या डिस्कशनमध्ये मी खूप आधीपासून होतो... मी १५ नोंदणी आणल्यानंतर मला या बिझनेसमध्ये पार्ट्नरशिप मिळणार आहे.. निव्वळ नफ्याच्या ३०%.... हां त्यासाठी मला काही इव्हेंट्स हँडल करायला लागतील अर्थात.. मी काय म्हणतो..., कलंदरला या नोंदणी मी आणल्या काय नि तू आणल्या काय, त्याने काही फरक पडत नाही..!! आपण दोघे अधिकाधिक लोकांना इथे आणायचा प्रयत्न करू.. पहिल्या १५ माझ्या नावावर खपवू.. मला मिळणार्‍या नफ्यातून आपण आधी तुझी फी भरू.. पण आपल्याला त्यातून कायमस्वरूपी इन्कम येत राहिल... तो आपण दोघे वाटून घेऊ.. नि आणखी जर १० लोक मिळाले, तर प्रश्नच नाही... तुझं ट्रेनिंगही फुकट.. नि नफा ही आपल्याकडेच राहील.. कशी आहे आयडिया???" निखिलने एका दमात सगळं सांगून टाकलं..
"एकदम सॉलिड....पण प्रॉब्लेम आहे रे.."
"आता काय??"
"हे १५ + १० लोक मिळवायचे कुठून नि कसे???"
"ते सोपे आहे. घरातली टेलिफोनची डायरी घेऊन बसूयात. नातेवाईक , मित्र ,ओळखीचे या सर्वांची नावे काढू. झालंच तर परवाच मास्तरांनी मिपावरच्या अविवाहितांची यादी दिलीय.. ती पण हाताशी घेऊ.. यातले कोण घेतील कोणाला परवडेल याचा विचार करायचा नाही.फक्त लिस्ट तयार करू". "आपल्याला असे वाटतय का की चार्/पाच लोकही आपण जमवु शकणार नाही म्हणून्?....तसे असेल तर चाळणीत पाणी घेऊन जीव देण्याचाच लायकीचे असू आपण".
"म्हणजे मी नाही समजलो"--- पराला सगळंच नवीन.. त्यामुळे त्याचा मेंदूच काम देईनासा झाला होता ...
"अरे, माणूस मेल्यावर त्याला खांदा द्यायला चार आणि पुढे मडके धरायला एक असे पाच, नि राम नाम सत्य है असे म्हणायला पाच-दहा लोक लागतात. एखाद्याला इतकेही जमवता येत नसेल तर तो माणूस कसला म्हणायचा????".
पराला हे वाक्य फार बोचले. अर्थात निखिल जे बोलला त्यात चूक ते काहीच नव्हते. असं वाटत होतं जणू ते सगळे बहुतेक पराचेच विचार होते. आता परा चांगलाच भारावल्या सारखा झाला होता. "हा क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज कोर्स करायचा.. नि लग्न करायचे... निखिलला मदत करून पैसेही मिळवायचे... त्याचा सब-पार्ट्नर म्हणून!!. नुसते जगण्याची तयारी करत मरायचे नाही तर खरोखर आनन्दात जगायचे....आपण लोकाना मदत करतोय. हे एक पुण्यकर्मच आहे..........", असं मनात आणी उघड
"चल असं नुसतं बोलून काही व्हायचं नाही.. आपण लगेच यादी करायला लागू" असं म्हणून त्याने निखिलला उठवलं...

दोघे जाऊन "विसावा" मध्ये विसावले.. टेबलावरचा टीपकागद घेतला.. पेन सरसावले.. नि पराने निखिलला प्रश्न केला..
"सुरूवात कुठून करायची?? मास्तरांच्या यादीपासून???"
"हो.. नि अर्थातच राजे पासून"
"आयला हो रे... प्रकरण डोहाळेजेवणापर्यंत आलं... मी तर म्हणायचं गाणंपण पाठ केलं.. अर्धा-अधिक नाचपण बसवला कोपर्‍यावरच्या तैंच्या मदतीने... नि अजून आर्याच्या मम्मीचा पत्ता नाही म्हणजे काय??"
"हो.. तो तर नक्कीच पट्कन तयार होईल... आणि तुला माहिती आहे का?? त्याच्याकडे घरी प्रॅक्टीस करण्यासाठी भरपूर भांडी पण पडलीयेत....


चुचु तैंच्या परिक्षेत जैनांचं कार्टं पैल्या लंबरानं पास हुईल!!"

"ठीक आहे.. राजे नक्की.."---------------चला सुरूवात तर चांगली झाली----------- काऊंट = १
पुढे?
"तात्या..?"
"हो.. पण ते भांडी घासायला तयार होतील?? स्वयंपाक करायचं एकवेळ मनावर घेतील पण भांडी....??? जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील.... नि जाऊन स्वतःचा 'खाद्य व लग्न संस्कृती' नावाचा प्रोग्राम काढतील. आपल्याकडे काळं कुत्रं फिरकायचं नाही मग... आपल्याला काँपिटीशन नाय पायजे...!!"
"खरंच की... तात्या कटाप!!!"

"मग अवलियाला खोपच्यात घेऊया"???
"अरे तो माणूस काळा की गोरा हे माहित नाही... .. अजून त्याला कुणी पाहिलं नाही.. तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू"
"ठीक आहे.. अवलिया पण कट!!!" ------------------------------- काउंट तसाच :(

"मिथुन काशिनाथ भोईर ?"
"चालेल... पण साला तो एक आख्खा दिवस खाईल.... लग्नातही सुख असतं हे त्याला पटायला वेळ लागेल.. "
"का??
"सुख म्हणजे सुख म्हणजे सुख असतं.. पण त्याचं नि आपलं सेम नसतं!! "
परा यावर निरूत्तर!!------------- चला आणखी एक बकरा तरी मिळाला... ---------------------- काऊंट=काउंट+१

"टार्‍या??"--- परा
"वेड लागलं काय तुला? त्याने भांडं घासलं तर त्या भांड्याच्या 'बिफोर' आणी 'आफ्टर' आकाराचा काही संबंध राहणार नाही... पैसे मि़ळणं दूर... आपल्याकडून वसूल करतील ते लोक.. असलं झेंगाट घेऊन आल्याबद्द्ल.. "
"आपण मास्तरांना त्याचं समुपदेशन करायला सांगू.... त्यांचं क्रिप्टीक नि त्यांच्या क्लायंटांच्या गोष्टी सांगून इतके हैराण करायला सांगू की त्यानं लग्न करतो पण समुपदेशन आवर म्हणायला पाहिजे... जेन जर आत्ताच लग्नाला तयार नसेल तर मास्तरांना तिचंपण बौद्धिक घ्यायला सांगू... "----------------------ढॅणटॅढाण----------------------------------- काऊंट=काउंट+१

"बअअअअरं... मग छोटा डॉन???"
"अरे तो तर रिसोर्स पर्सन आहे ना.. त्याने १० लेक्चर्स दिली की त्याला फुकट ट्रेनिंग मिळणार आहे.. वर क्लीनिंग एजंट्चं गिफ्ट हँपर लाईफटाईम दर महिन्याला फ्री!!! त्याने नंतर या रेसिपीचं पेटंट/कॉपीराईट घेऊ नये म्हणून थोडं गोडीगुलाबीनं एक कॉन्ट्रॅक्ट पण करून घ्यायचंय.. त्याच्याशी नोंदणीबद्द्ल बोलून आधीची बोलणी फिसकटवायची नाहीत!! "
"काय हुशार आहेस रे तू..... पूरा बिझनेस माईंड!!!" पराचा निखिलबद्दल वाटणारा आदर दुणावला होता!!

"मदनबाणचं पण लग्न व्हायचंय ना रे अजून?"-- निखिल
"हो रे.. सायकोच्या तावडीतून सुटला.. पण अजून धड"पड"तोच आहे... नुसतं शुभ्रा शुभ्रा म्हणून काही होत नाही.... खरी शुभ्रा मिळवायला प्रयत्न करायला लागतात.. त्याला पण खोपच्यात घेऊ.. ..." ----------पराचं सगळं लक्ष काउंट कसा वाढतोय याकडेच!!--------------------पुन्हा एकदा------------- काऊंट=काउंट+१
"सही जारेलेहो भिडू"

"टिंग्या.....??"
"त्याला कसे विसरलो? अजूनतरी पुरूषांनी कपडे धुण्याचा कायदा झाला नाही.. हा भांडी घासेल.. स्वयंपाक करेल.. नि त्याची बायको कपडे धुवेल... निदान तेव्हातरी चारचौघांत स्वच्छ कपडे घालून येईल.... चल चल.. काउंट वाढव.." --------------------- काऊंट=काउंट+१ :D

आता दोघांनाही पटापट नावे सुचत होती...
"अरे आपला दोस्त राहिला ना...सुहास..."--- परा
"ऋषिकेशचं पण नांव लिही... त्याला एकदा का नातिचरामि म्हटलं की पटकन तयार होईल रजिस्ट्रेशनला"--- पुन्हा पराच!!

"Nile..?"-- पराच्या डोकं मस्त चालू लागलं...
"अरे त्याने हात मोडून घेतलाय... जमत नाही तर उगाच कशाला पालथे धंदे करायला गेलं कुणास ठाऊक?"-- निखिल
"म्हणजे हात मोडला नसता तर तो आला असता??? [स्वगतः देवा वाचव रे बाबा] कैच्या कैच तुझं.... अरे तो उसगावात र्‍हातो..."
"त्याला करस्पॉन्डन्स कोर्स देऊ..... तेवढीच फॉरेन करन्सी मिळेल.... आपण डॉलर नि पौंडात कमवू"
"अरे हो की... चल मग आणखी नावं अ‍ॅड कर.. नंदन.. घाटावरचे भट... अनामिक...!!!"
परा नि निखिल यादी वाढतच चालली होती.

"मम्मी ओ मम्मी तू कब सास बनेगी..." हे त्यांच्या नव्या अवस्थेचे नाव होते. नि बर्‍याच बकर्‍यांच्या मनात हे गाणे ऐकू येण्याची व्यवस्था करण्यात हे दोन शैतान दिमाग बुडून गेले होते....
[समाप्त]

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

12 Aug 2009 - 12:03 am | प्राजु

हे काय समाप्त??????????????????
छे छे!! ये तो अभि शुरूआत है!
विजुभाऊंचे ते बघा भाग- ७ आले . तुम्ही तिसर्‍यातच समाप्त केलं??
नामंजूर!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

12 Aug 2009 - 12:19 am | टारझन

हेच म्हणतो ... आता कुठे आम्हाला उमगायला लागलं व्हतं .. इतक्यात दुकाण बंद ?

- सिंग मनिंदर
दुसर्‍याला नावे ठेवणे ही फेमस क्रिटिक्स होण्याची खुण आहे

श्रावण मोडक's picture

12 Aug 2009 - 12:13 am | श्रावण मोडक

समाप्त? हे काय? अजिबात नाही चालणार... विसावात आत्ता कुठं बैठक जमतीये. हळुहळू बुद्धी चालू लागलीये आणि म्हणे समाप्त. एक तर कधी नव्हे ते क्रमशः मालिकेत रस भरतोय. काही चालणार नाही. नीट मालिका चालली पाहिजे. नाही तर परिणाम वाईट होतील. हा सुका दम नाहीये.
कसला सॉलीड मारलाय. अघदी नंदनसकट. कलंदरताई जोरात. लिहा पुढे...

प्राजु's picture

12 Aug 2009 - 12:14 am | प्राजु

हा सुका दम नाहीये!!

हा मुकादम आहे!! ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

12 Aug 2009 - 12:18 am | श्रावण मोडक

बरं, उद्या मोहीम उघडून तो बोलका दम करतो. बास्स? मालिका पुढे चालू राहणं हे आपलं उद्दिष्ट्य आहे. बरोबर? तुझा पाठिंबा गृहीत धरतो.

प्राजु's picture

12 Aug 2009 - 12:23 am | प्राजु

तुझा पाठिंबा गृहीत धरतो.

अगदी नक्की!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

12 Aug 2009 - 12:40 am | अनामिक

माझा पाठिंबापण गृहित धरा

-अनामिक

समंजस's picture

12 Aug 2009 - 12:30 pm | समंजस

माझा ही पाठिंबा.... :)
जर पुढील भाग आले नाहीत तर सर्वांनी एकमताने :) ठराव करून, कलंदर तैं ची
खव बंद करून टाकावी!! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2009 - 12:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओ समंजसराव, तिची खव बंद करून काय फायदा? त्यापेक्षा तिला रोज सगळ्यांनी खरडी टाकून भंडावून सोडू या! खव बंद केली तर सुटकाच झाली ना तिची!

अदिती

गोगोल's picture

12 Aug 2009 - 2:26 am | गोगोल

गान्धीगिरी सारख मुके देउन दम देणार का ;)

नंदन's picture

12 Aug 2009 - 12:22 am | नंदन

तिसरा भागही सही. वरील सर्वांच्या प्रतिक्रियांशी सहमत आहे. पुढचे भागही येऊ द्या की.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अनामिक's picture

12 Aug 2009 - 12:29 am | अनामिक

काय जबर्‍या लिहिले आहे कलंदर बै ने...
पण अरे काय एवढ्यातच समाप्त? कोर्स सप्तपदीलेस असला म्हणून काय झालं, या मालिकेचे सात भाग यायलाच पाहिजे.

(चांगला स्वयंपाक करता येणारा (स्वघोषित), सध्या धुनी-भांडी स्वतः करणारा, आणि सप्तपदीची अट न घालणारा)
-अनामिक

Nile's picture

12 Aug 2009 - 2:16 am | Nile

अरेरे काय हे! वाजवा कि आमचा बँड! आमचं जमलं तर दहा अनिवासी मेंम्बर्स बोनस आमच्याकडुन. ;)

-गुडघ्याला बाशिंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2009 - 9:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =))
घ्या घ्या, ह्यालाही घोळात घ्या आणि दहा नावं याच्याकडूनही घ्या ... पण परा आणि निख्याचा जरा प्रॉब्लेमच दिसतो, त्यांना साधी आकडेमोड करायलाही कंप्यूटर प्रोग्रॅम लागतो. या दोघांकडून जास्त पैसे घेऊन त्यांना आकडेमोडही शिकव गं!

समाप्त काढ आणि पुढच्या भागात काका लोकांसाठी काही पेश्शल लिही ना!

अदिती

स्वाती२'s picture

12 Aug 2009 - 2:37 am | स्वाती२

कलंदर नेहमी नकोसा वाटणारा क्रमशः आज हवा हवासा वाटतोय.एवढ्यात नका संपवू.

मनिष's picture

12 Aug 2009 - 12:09 pm | मनिष

कलंदर नेहमी नकोसा वाटणारा क्रमशः आज हवा हवासा वाटतोय.एवढ्यात नका संपवू.

हेच म्हणतो. अजून लिही/लिहाच! :)

दशानन's picture

12 Aug 2009 - 8:48 am | दशानन

>>"हो.. नि अर्थातच राजे पासून"

=))
=))
=))
=))
=))

अरे मीच का.... का का... !
का माझ्या मागे पडला आहात... सुखाने राहू द्या.. चार पॅग पिऊ द्या की रे :D

*

ए... कलंदर तै.... ते समाप्त काढा... व लवकर पुढील भाग लिहा ... पटापट !

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

मदनबाण's picture

12 Aug 2009 - 9:08 am | मदनबाण

नुसतं शुभ्रा शुभ्रा म्हणून काही होत नाही.... खरी शुभ्रा मिळवायला प्रयत्न करायला लागतात..
=)) =)) =))
माझ्या आवडत्या स्त्रीसाठी हा कोर्स करण्याचे कष्ट करावेच म्हणतो !!! ;)
आणि हे काय संपेष ??? हे काही नाही पटेश...याचा पुढचा भाग लवकर येउदे.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

अवलिया's picture

12 Aug 2009 - 10:41 am | अवलिया

तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे

___/\__
अवघड आहात कलंदर काकु ! :)
बाकी तुफान.... =))

मालिका समाप्त केल्याबद्दल निषेध ! निषेध !! निषेध!!! X(

(बाप्प्या) अवलिया

निखिल देशपांडे's picture

12 Aug 2009 - 10:37 am | निखिल देशपांडे

कलंदर तै आपले ३० % तयार ठेवा लवकरच येतोय तुमच्याकडे मिपावरच्या अविवाहीत मंडळींना घेउन..
अजुन एक लेखमाला लिहायला घ्या.... त्यात सगळे लोक एकत्र क्लास ला एका जागी आलेत असे काही तरी लिहा..

(हुश्श... बरं झाले संपली ही मालिका.... पुरती वाट लावली ह्या मालिकेने ;))

निखिल
================================

नाटक्या's picture

12 Aug 2009 - 11:52 am | नाटक्या


"जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील."

तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू

लग्नातही सुख असतं हे त्याला पटायला वेळ लागेल.

त्याने भांडं घासलं तर त्या भांड्याच्या 'बिफोर' आणी 'आफ्टर' आकाराचा काही संबंध राहणार नाही

या वाक्यांना हसून हसून वारलो...

समाप्त काढ आणि पुढच्या भागात काका लोकांसाठी काही पेश्शल लिही ना!

हे मात्र झालंच पाहीजे...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

सहज's picture

12 Aug 2009 - 12:32 pm | सहज

लेखन आवल्डे बर का! पन फक्त पोरांच्या का मागे लागला (सेमीनार साठी हो गैरसमज नको)? अजुन त्यांचे फुलायचे, बागडायचे, वाढायचे दिवस आहेत. अर्धवट पोरांना खपवुन तुम्ही कशापायी कुन्या पोरींचे शाप ओढावुन घेताय? अजुन वाढ होउ दे पोरांची.

मिपावर होतकरु मुलगी असतील तर त्येंला बी लिखानात घ्यावा की. समानतेचा जमाना हाय!

समस्या मोठी असेल तर तात्या एक मिपा वधु-वर मेळावा टाकतील. हो तर चांगल्या कामाला मागेफुडे पहात नाहीत, मालक.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2009 - 12:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =))
बाई गं, आता तू काका लोकांसाठीतरी ही मालिका पुन्हा सुरू कर. डेलीसोप्समधे कसं, मेलेलं पात्र लोकाग्रहास्तव जिवंत होतं ना तशी तू मालिकाच सुरू ठेव. या काका लोकांनाही काही स्कोप ठेव. आणखी आयडीया हवं तर सहजकाका देतील! शिवाय मूळ मालिकेचा पुढचा भाग आलेला आहेच!

अदिती

निखिल देशपांडे's picture

12 Aug 2009 - 12:45 pm | निखिल देशपांडे

काका लोकांसाठी मालिका झालीच पाहिजे

निखिल
================================

अवलिया's picture

12 Aug 2009 - 12:41 pm | अवलिया

अनिवासी भारतीयांसाठी सहजकाका प्रयत्नशील आहेतच... चांगल्या कामाला (परदेशात) मालकांना मदत करायला ते एका पायावर तयार असतात.

--अवलिया

मस्त कलंदर's picture

12 Aug 2009 - 12:48 pm | मस्त कलंदर

मिपावर होतकरु मुलगी असतील तर त्येंला बी लिखानात घ्यावा की. समानतेचा जमाना हाय!

सुरूवात मंग आमच्यापास्नंच कराया लागंल.... आमीच आमचंच इडंबण कसं पाडू सहजराव? दुसर्‍या कुनीतरी चानस घ्या की आता.. न्हाय म्हनलं.. जमाना समानतेचा हाय.. सगळ्यास्नी संधी मिळाया होवी. खरं का न्हाय????

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

अवलिया's picture

12 Aug 2009 - 12:58 pm | अवलिया

सहजराव या निमित्ताने तुम्ही तुमची लेखणी काढा बाहेर.....

नुस्ते '+१ सहमत आहे' कटपेस्ट करत मिपावर फिरत असता... नाही तर खरडीत तलवारबाजी करत असता...

जरा या मैदानात.. .... कधी लिहिता मग?

--अवलिया

सहज's picture

12 Aug 2009 - 1:01 pm | सहज

पोर काही बोलायला लागली की उगाच काहीतरी बोलताय म्हणून स्त्रीमुक्तीवादी गप्प करायचे त्यांना. त्यामुळे तै तुम्हीच लिहा. भारी जमेल तुम्हाला.

:-)

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 9:36 am | विजुभाऊ

.... आमीच आमचंच इडंबण कसं पाडू सहजराव? दुसर्‍या कुनीतरी चानस घ्या की आता..
सहमत+१
शरदिनी ताई ना पाचारण करुयात त्यासाठी.
इमॅजीन करा त्या या लेखाचे विडम्बन कसे करतील
एक झलक
मॅरेज लाईफ च्या मर्तिकाची मडकी
कोठूनही गेलो तरी भग्न भांडी भांडकी
भारंभर क्लासेसना विद्यार्थीसंख्येची कडकी
चिंता होते ही की मिळतील का मला दहा तरी डोकी

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2009 - 10:07 am | बिपिन कार्यकर्ते

तुम्ही तर शरदिनीताईंचं श्ट्यांडर्ड पार खाली आणलंत...

बिपिन कार्यकर्ते

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Aug 2009 - 12:49 pm | ब्रिटिश टिंग्या

लै भारी! :)

- (मच) टिंग्या

प्रकाश घाटपांडे's picture

12 Aug 2009 - 12:59 pm | प्रकाश घाटपांडे

लईच भारी ! काढा काढा कोर्स; कंचा बी मुहुर्त शुब अस्तोय. चांगल्या कामाला उशीर नको!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Aug 2009 - 1:07 pm | ब्रिटिश टिंग्या

काका जरा थंड घ्या!

समंजस's picture

12 Aug 2009 - 1:25 pm | समंजस

का हो कलंदर तैं, ज्यांची लग्ने हा 'क्लीनिंग कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज' चा कोर्स न करता झाली आहेत आणि त्यामुळे आता कुटुंबात समस्या निर्माण झाल्या आहेत, अश्या करींता एखादा क्रॅश कोर्स आहे का ???? :?

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Aug 2009 - 2:03 pm | ब्रिटिश टिंग्या

काका लोकांसाठी लौकरच असा एक कोर्स सुरु करणार आहेत म्हणे :)

अवलिया's picture

12 Aug 2009 - 2:05 pm | अवलिया

बरोबर आहे टिंग्याची माहिती. सहजरावांकडे नोंदणीसाधी संपर्क साधावा... :)

--अवलिया

सूहास's picture

12 Aug 2009 - 2:17 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

ई बेव्यस्था,हमार पराभैय्या जरा बिमार का हुवे , आपका खव का ईस्टडी और बुखार सर चढ कर बोल रहा है , हमार भैय्या कि तनिक ठीक हो जाने दिजीये, फिर देखीयेगा ऊका कमाल !! समझे के नाही !!!

जब-तक सुरज-चा॑द रहेगा , परा यादव तोहार नाम रहेगा

सू हा स...

परिकथेतील राजकुमार's picture

12 Aug 2009 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला !! =)) =))

दमादम मस्त कलंदर अगाध प्रतिभा (लेखन) आहे आपली __/\__

©º°¨¨°º© परा यादव ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

12 Aug 2009 - 3:02 pm | ऋषिकेश

आज पासून तुमचे लेख ऑफीसात वाचणे बंद! मी इथे ख्यॅ ख्यॅ करून पोट धरून हसतोय आणि समोरून माझ्या म्यानेजरचाही बॉस अख्खा गेलेला कळला नाही मला. :( ;)
लेख आवडला हे वे सां न

"समाप्त" हा शब्द तिथे नाही असे समजतो.. पुढचे भाग येऊ द्यात

(क्रमशःवादी)ऋषिकेश
------------------
दुपारचे ३ वाजले आहेत. चला आता ऐकूया एक रॉकिंग गीत "आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽऽहे...."

लिखाळ's picture

12 Aug 2009 - 6:39 pm | लिखाळ

हा हा हा .. एकदम मस्त :)
मजा आली.
अजून लिहा..

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.

विजुभाऊ's picture

13 Aug 2009 - 12:11 am | विजुभाऊ

टार्‍या??"--- परा
"वेड लागलं काय तुला? त्याने भांडं घासलं तर त्या भांड्याच्या 'बिफोर' आणी 'आफ्टर' आकाराचा काही संबंध राहणार नाही...

टार्‍या या गुपीत ठेवलेल्या गोष्टी बाहेर कशा आल्या?

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Aug 2009 - 10:02 am | ब्रिटिश टिंग्या

>>टार्‍या या गुपीत ठेवलेल्या गोष्टी बाहेर कशा आल्या?

गुपीत की कुपीत?

Nile's picture

13 Aug 2009 - 6:57 am | Nile

अनेकांशी सहमत आहे. काका लोकांकरीता 'आपादग्रस्त (पुनः) विवाहेच्छुक विशेष' प्लॅन सुरु करा. त्यासाठी दोन- तीन पैसे आमच्याकडुनः
१. पोट कमी कसे करावे- क्रॅश कोर्स- विना प्रात्यक्षिक.
२. 'समोरुन जाणारी ललना कशी दिसते? या प्रश्नाची १००१ समर्पक उत्तरे' पुस्तिका- माफक दरात. (' बायको बरोबर खरेदी' माहीती पुस्तिका यासोबत मोफत!)
३. बायकोच्या माहेरी कसे वागावे-प्रात्यक्षिकासहित (साडुला बरोबर आणल्यास विशेष सवलत!) (प्रात्यक्षिकाकरिता सासरची मंडळी आणल्यास मोफत!)

आमच्याकडुन पोतंभर अनिवासी इच्छुकांची नोंदणी पक्की समजा.

'नेहमीच अविवाहीतां'साठी सुद्धा काही कल्पना आहेत, उदा. ख.व.त कसे फोटो लावावेत वगैरे, पण ते ३०% मिळाल्यावर.

-सर्व काकुंचा लाडका पुतण्या. :)

विसोबा खेचर's picture

13 Aug 2009 - 7:04 am | विसोबा खेचर

जियो...! :)

येऊ द्यात अजून...

तात्या.

क्रान्ति's picture

13 Aug 2009 - 9:25 pm | क्रान्ति

तृतियोध्यायातच कथेची समाप्ती? हे काही पटलं नाही!
बाकी लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत, टवटवीत आणि धम्माल! हसून हसून बेजार करणारं. अजून येऊ दे!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी