मॅरेज लाईफ.....२

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
10 Aug 2009 - 11:38 pm

भाग - १

कलंदरनी फर्ड्या इंग्रजीत आधी लग्न हे मानवी जीवनास किती आवश्यक आहे ते सांगितले... मग यशस्वी.. बिना कटकटीच्या लग्नाची महती सांगितली... लग्न म्हणजे फक्त दोन मनांचे मीलन नाहीतर सहजीवनही कसे असते.. आधी घरकाम करणे हा स्त्रियांचा प्रांत समजला जात असे.. आजकालच्या मुलींना साधा चहा पण करता येत नाही... पण चहा कसा करता येत नाहीत यावर कविता करता येतात.., स्वयंपाक येतो म्हणतात.. पण एखादा पदार्थ बनवून दाखव म्हटलं की आंतरजालावरचा फोटो आणून दाखवतात.. भरीस भर लग्नाळू मुलांना स्वयंपाक करणे आणि भांडी घासणे या दोन गोष्टी शिकणे कायद्याने बंधनकारक केल्या आहेत... त्यामुळे चांगला स्वयंपाक करणे.. भांडी स्वच्छ घासणे या गोष्टी मुलांनी शिकणे कसे अनिवार्य आहेत.. नि या गोष्टी न आल्याने आजकाल मुलांची लग्ने ठरणं कसे अवघड झालंय हे स्पष्ट केलं....
प्रेझेंटेशनच्या दुसर्‍या भागात.... लग्नविधींचा अर्थ... सप्तपदी म्हणजे काय?? सप्तपदीचा विधी केल्यास तो पुरूषांस कसा अपायकारक आहे.. त्यात कोणकोणती वचने दिली-घेतली जातात.. नि त्यांचे consequences यावर बराच उहापोह झाला...

तिसर्‍या भागात क्लीनिंग, कूकींग विथ सप्तपदीलेस मॅरेज प्रोग्राम बद्दल सांगितलं..
क्लीनंगमध्ये भांडी घासण्याच्या साबणाचं किती अनन्यसाधारण महत्व आहे.. जाहिराती बघून फक्त प्रॉडक्ट्स कळतात.. त्यांची उपयुक्तता नाही.. दुबईस्थित सौ. पर्नल नेने-मराठे यांचा भांडी घासण्याचा मोठ्ठा अनुभव नि कपडे, अंग नि भांडी धुण्याच्या साबणाच्या सर्वेक्षण नि संशोधन यात आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेले कार्य यांची ओळख करून देण्यात आली... त्या साबणांचे मानवी शरीरावर नि विचारांवर कसे परिणाम होतात ते सांगितले... विशिष्ट क्लीनिंग एजंट (याला साबण म्हणायचे नाही)मुळे हाताला बिल्कुल त्रास न होता.. जराही शक्ती खर्च न करता भांडी कशी लख्ख होतात ते सांगितले....
पराला हे सगळे नवीन होते.. पण त्याला फक्त कोणाचा लेख किंवा कविता कुणी पळवली किंवा खव उचकपाचक याचीच माहिती असायची.. दुबईतल्या तंत्रज्ञानाबद्दल आपले ज्ञान्/अज्ञान उघडे पडेल म्हणून काही न बोलता तो फक्त ऐकत होता.
"सो.. डोन्ट ओन्ली ड्रीम अबाऊट मॅरेज... बट डू इट टू..." या वाक्याने ते प्रेझेंटेशन संपले..

त्यानंतर एक अतिशय अतिसामन्य पण चेहर्‍यावर खूप आत्मविश्वास असलेला माणूस पुढे आला.. तो स्वतःची गोष्ट सांगु लागला..
मित्रानो तुम्ही हे जे पाहिले ती आमच्या प्रोग्रामची ची निम्मीच ओळख आहे. १० टक्केच म्हणाना..
क्लीनिंग, कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज प्रोग्राम हे एक संशोधन आहे.. नि हे ज्ञान कार्यशाळा नि प्रॉड्क्ट च्या स्वरूपात दिले जाते..
कार्यशाळेतील अंतर्भूत कार्यक्रमः
१. सौ. पर्नल नेने-मराठे यांच्याकडून भांडी घासण्याचे प्रशिक्षण.. [लग्ना आधीपासूनचा अनुभव थोडक्यात विशद केला गेला] घरच्या भांड्यावर केलेल्या सराव पाहून उमेदवारांचे मूल्यांकन केले जाईल...
२. कोणत्या भांड्यासाठीच नाहीतर पाठीला चोळण्यासाठी ही कोणता साबण वापरावा याबाबतच्या सौ. मराठे यांच्या संशोधनावर चर्चासत्र
३. ­ पाककृतीस गरजेपेक्षा खूप जास्त वेळ लागल्यास नंतर रेशमी सळसळ वगैरे आरोग्यास हितावह प्रकरणास वाव राहत नाही त्यामुळे स्वयंपाक कसा करू नये यावर छोटा डॉन यांची अर्ध-दिवसीय प्रात्यक्षिकासह कार्यशाळा...
४. कमीत कमी वेळात नि साधा टोमॅटो-कांदा वापरूनही चमचमीत नि झणझणीत पाककृतींसाठी शेख बिका यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान
५. कांडेपोह्यांच्या.. प्रसंगी मिक्सरशिवाय पाककृती, गोडधोडाच्या पाककृती.. यासाठी मा. भुस्कुटेतै,दिपालीतै,रेवतीतै, स्वातीतै यांचे मार्गदर्शन
६. सुकलेल्या नवर्‍यांना पौष्टीक पदार्थ खायला घालून लठ्ठ कसे बनवावे यावर सौ. धमी यांचे छोटेखानी भाषण...
७. बायको घरी नसताना दूधाचे भांडे करपवल्यास ती परत येण्याआधी ते कसे निस्तरावे यावर श्री. पर्नल मराठे यांचे खास व्याख्यान..
८. सप्तपदी विधी न करता लग्न कसे करावे... त्यासाठी भटजीला कसे पटवावे... यावर श्री. युयुत्सु यांचे भाषण...
९. न पटणार्‍या भटजीला फाट्यावर कसे मारावे यावर तात्यांची प्रात्यक्षिके.. [ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.. हो की नाही हो तात्या???]
१०. साधी शिंक जरी आली.. तरी बायका हापिसात असलेल्या नवर्‍याला ती किती गंभीर आहे हे पटवून त्याला घरी येणे कसे भाग पाडतात यावर पुन्हा एकदा सौ. धमी यांचे सखोल मार्गदर्शन...
११. ती शिंक गंभीर असो.. वा नसो.. घरी जाऊन बायकोची सेवा कशी करावी... याविषयावरचे श्री. धमाल यांचे स्वानुभव कथन...

त्या अतिसामान्य चेहार्‍याच्या माणसाने लग्न करायचे ठरवल्यावर त्यालाही निखिल-परासारखा अनुभव आला होता.. नातिचरामि...नातिचरामि या शब्दांनी डोके भंजाळलं होतं... नंतर कुठूतरी कळाल्यावर हा पूर्ण कार्यक्रम अटेंड केला होता.... नि नंतर ट्रेनिंगनंतर लगेचच त्याचं लग्न झालं होतं...

साहेब या ट्रेनिंगचा खर्च काय असेल हो?
ट्रेनिंग नाही हो.. प्रोग्राम म्हणा... ट्रेनिंग म्हटले की कसे एकदम आयटीआय मध्ये गेल्यासारखे वाटते.
बरं प्रोग्रामचा काय खर्च असेल??
यात पाच लेव्हल्स आहेत. तुम्हाला काय वाटते काय असेल फी?
काँम्प्युटरचे कोर्सेस पण १०-१५ हजारात होतात.. हे तर भांडी घासायला नि स्वयंपाक करायला शिकायचे.. फारतर हजार-दोन हजार असेल
तो हलके हसला...
साहेब आपल्या लोकांचे हेच चुकते. आपण मध्यमवर्गीय लोक चांगल्या गोष्टींची किम्मतच करु शकत नाही.
नाही म्हंटले तरी सगळे जरा खजील झाले.
साहेब या क्लीनिंग, कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज प्रोग्रामची प्रोमोशनल फी आहे फक्त २५ हजार अधीक टॅक्सेस. म्हणजे साधारण २७ हजार समजाना...
अरे बापरे!! पराने एकदम आवंढा गिळला........नुसते लग्न ठरण्याची पात्रता मिळवण्यासाठी २७ हजार??
ओके....ओके ....ओके फी बद्दल साहेब आपण नन्तर बोलू. पन तुम्ही बोललाच आहात तर विचारतो...मला सांगा कांदेपोहे कार्यक्रमास किती वेळ नि पैसे जातात??
नि एकदा कांदेपोहे खायला घातले म्हणजे संपले का??? जर क्लीनिंग नि कूकिंग या पात्रता नसतील तर एक लग्न ठरण्यासाठी किमान पन्नास वेळा कांदेपोहे करायला लागतील.. नि नुसत्या पोह्यांनी भागत नाही... सोबत चहा.. बिस्कीटे... मिठाई.. एक ना दोन.. वर तुम्ही त्यांच्याकडे जाणार.. ते तुमच्याकडे येणार... प्रवासात पण पैसे नि वेळ खर्च होतो तो वेगळाच.. नी लग्न ठरेल याची खात्री नाहीच..
"हो".
मग हा कोर्स करून ती सगळी काळजी संपवली तर....कांदेपोह्यांवर खर्च केला असे समजा!!!
दोघांनाही आता त्याच्या म्हणण्यात तथ्य वाटायला लागले.
तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे.
"साहेब ऐकयला वाईट वाटते पण खरे आहे"... "आपल्याला काही गोष्टी परवडत नाहीत"..."आपली ऐपत नसते म्हणून आपण त्याला उधळपट्टी वगैरे म्हणतो"... "खरं तर ही बदलत्या काळाची गरज आहे.."
खरे सांगा तुमच्या मनात आपलीही सुंदर बायको असावी असे कधीच आले नाही?? हा प्रश्न पराला होता..
आले की बर्‍याचदा आले. अवलियांची, तात्यांची खव पाहून वाटले.... कॅफेत येणार्‍या सुंदर कन्यका पाहून वाटले.. सौंदर्यफुफाटा पाहून प्रकर्षाने वाटले...
मग करायचा आहे असा प्रयत्न?
कसला प्रयत्न?
आयुष्यात एक सुंदर बायको मिळवायचा.....
अहो परत तेच्.......ते कसे शक्य आहे?
शक्य आहे.........मला ते शक्य झाले आहे. एका वर्षापुर्वी मी देखील तुमच्याच सारखा होतो. कांदेपोहे खायला घालून कंटाळलो होतो...... आज मी म्हणु शकतो की मला जशी बायको हवी ती मी आज मिळवू शकलो... तेही सप्तपदी न घालता!!!.
तो इतक्या आत्मविश्वासाने बोलत होता .......की त्याचे म्हणणे खोटे आहे म्हणणेच शक्य नव्हते.

आता त्याने प्रोजेक्टरवर फोटो दाखवायला सुरूवात केली... बापरे.. काय प्रेक्षणीय बायको होती त्याची... अवलियाच्या खवमधली बाईही हिच्यासमोर फिकी पडेल.. त्याने लग्नापूर्वीचे.. लग्नाचे.. हनिमूनला फिरायला गेल्याचे... घरगुती... नवीन वाटणार्‍या घासून निथळत ठेवलेल्या भांड्यांचे... त्याने बनवलेला स्वयंपाकाचे... ती त्याला प्रेमाने भरवतानाचे... असे सगळे फोटो एकामागून एक येत होते... नि पाहणारे सगळेजण मनोमन अशी बायको मिळाल्याच्या त्याच्या भाग्याचा हेवा करत होते...
हा इतका फाटका दिसणार्‍या इसमाची बायको असली ब्युटीक्वीन.....???
साहेब तुम्हाला हवंय अशा चेहर्‍याच्या सुंदरीसोबत असणारा तुमच्या लग्नाचा अल्बम?
साहेब तुम्हाला हवंय अशा चेहर्‍याच्या सुंदरीसोबत असणारा तुमच्या लग्नाचा अल्बम?
साहेब तुम्हाला हवंय अशा चेहर्‍याच्या सुंदरीसोबत असणारा तुमच्या लग्नाचा अल्बम?
पराने कानात हे वाक्य त्या एका क्षणात कित्येक वेळा ऐकले ......कानात शब्द घुमत होते.....[क वाल्या मालिका पाहण्याचा परिणाम.. दुसरं काय??]
(क्रमशः)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

10 Aug 2009 - 11:49 pm | श्रावण मोडक

चालू द्या. वाचतो आहे. उद्या रात्री तिसरा भाग येईल हे गृहीत धरले आहे.

छोटा डॉन's picture

11 Aug 2009 - 6:46 am | छोटा डॉन

मोडकसाहेबांशी सहमत,
वाचतो आहे, उद्या तिसरा भाग येईल असे गॄहित धरतो आहे ...

लेखाची संकल्पना मजेशीर असल्याने वाचायला मज्जा येते, त्यातच मध्ये चवीसाठी टाकलेले खुसखुषीत टोले लेखाचा स्वाद वाढवतात.
आता वाफ मुरायच्या आत पुढचा भाग येऊद्यात ...
पुलेशु ...

------
(इन्स्टन्ट मिक्स ) छोटा डॉन

प्राजु's picture

10 Aug 2009 - 11:52 pm | प्राजु

जोरदार टोले लगावले आहेत!!!
मस्तच!! पुढचा भाग लवकर येऊदे. असे भाग येणार असतील तर तुमची ही "लाईफ" ५० भागांपर्यंत चालायला हरकत नाही
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Aug 2009 - 9:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राजुने बरोब्बर शब्द वापरला आहे, "जोरदार टोले". :-d

अदिती

गोगोल's picture

11 Aug 2009 - 12:11 am | गोगोल

नुसती धमाल चालू आहे. एकदम जबरदस्त!!
सवडिने टाका पण क्वालिटी अशीच रहू देत.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Aug 2009 - 12:17 am | बिपिन कार्यकर्ते

झबर्डस्ट!!!!! आठ कलमी कार्यक्रम टार्‍याच्या भाषेत सांगायचे झाले तर... "के व ळ अ प्र ति म" !!!!

=))

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

11 Aug 2009 - 1:23 am | मस्त कलंदर

८ ची ११ कलमं झालीयेत..

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

पक्या's picture

11 Aug 2009 - 12:45 am | पक्या

मस्त. मजा आली वाचताना.

अनामिक's picture

11 Aug 2009 - 1:18 am | अनामिक

लै म्हणजे लै भॅरी लिहिलॅ अ‍ॅहे...

-अनामिक

लिखाळ's picture

11 Aug 2009 - 2:20 am | लिखाळ

छान.. छान कल्पना रंगवली आहे. मजा येत आहे.

पण पहिल्या भागाइतकी मजा नाही आली. आणि 'मडकं धरायला एक आणि उचलायला चार इतकी माणसे तरी लागतात तेवढी सुद्धा तुमची ओळखीची नसावीत?' या मर्मभेदी प्रश्नासारखा भावनांना हात घालणारा प्रश्न या भागात असे वाटले पण तो आला नाही. (किंवा तो धक्का माझ्या नजरेतून सुटला.)

तरी मजा आलीच हे नक्की :) शेवट मस्त :)
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

टारझन's picture

11 Aug 2009 - 7:25 am | टारझन

अर्रे वा !!! कळतंय थोडं थोडं ... बर्रंच उत्खणण करून लेख बणवलाय हो :)
मस्तंच !!

-नुस्तं बिलंदर
उडालेले (डोक्यावरचे) केस , ही शरदिनीच्या कवितांचं रसग्रहण केल्याची खूण आहे !!

दशानन's picture

11 Aug 2009 - 9:02 am | दशानन

=))

लै भारी चालू आहे... परा... कोर्स झाल्यावर सांग... मी पण करतो मग ;)

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

अवलिया's picture

11 Aug 2009 - 10:03 am | अवलिया

हा हा हा
जे काही चालु आहे ते भन्नाट आहे... जोरदार टाळ्या !
=D> =D> =D>

--अवलिया

निखिल देशपांडे's picture

11 Aug 2009 - 10:06 am | निखिल देशपांडे

हा भाग पण छान जमला आहे....
मस्त टोले लगावले आहेत एकेकाला... पहिल्या भागात फक्त मी आणी पराच होतो....
आता तिसरा भाग टाका लवकरच
निखिल
================================

पर्नल नेने मराठे's picture

11 Aug 2009 - 12:20 pm | पर्नल नेने मराठे

:D
चुचु

परिकथेतील राजकुमार's picture

11 Aug 2009 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला आम्हाला टोले बसतायत म्हणल्यावर लोक्स एकदम खुष झालेले दिसतात ;)

असो...

उत्खननासाठी अथवा काही 'खास' लोकांचा 'खास' इतीहास अथवा कहाण्या हव्या असल्यास आम्ही तत्परतेने मदत करु. तेव्हडेच आमचे चार पाच टोले विभागले जातील ;)

मदतनीस
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नंदन's picture

11 Aug 2009 - 1:19 pm | नंदन

दोन्ही भाग आजच वाचले. 'परा'कोटीचा अभ्यास त्यांच्यामागे आहे यात शंकाच नाही :), पुढल्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मनिष's picture

11 Aug 2009 - 2:49 pm | मनिष

मस्त चालू आहे, वाचतो आहेच. पुढचे भाग लवकर येऊ द्या! :)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Aug 2009 - 2:35 pm | प्रकाश घाटपांडे

कूकिंग विथ सप्तपदीलेस मॅरेज प्रोग्रामची प्रोमोशनल फी आहे फक्त २५ हजार अधीक टॅक्सेस.

युयुत्सुंना पण रॉयल्टी द्यावी लागेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सूहास's picture

11 Aug 2009 - 4:20 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))

आमच्या काही मित्रांना शालजोडेतुन हाणल्याबद्दल "आखिलमिपा अविवाहित महामडंळातर्फे" जॉहीर निशेढ....

सू हा स...

श्रीयुत संतोष जोशी's picture

11 Aug 2009 - 6:31 pm | श्रीयुत संतोष जोशी

कल्पना छानच रंगली आहे.
जरा ते पुढच्या भागाचं लवकर बघा.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

ऋषिकेश's picture

11 Aug 2009 - 7:07 pm | ऋषिकेश

पुन्हा एकदा हसून फुटलो!

(फुटका)ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ०३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "लाजून हासणे अन.. हासून ते पहाणे.. मी ओळखून आहे वेडातले बहाणे...."

क्रान्ति's picture

11 Aug 2009 - 7:51 pm | क्रान्ति

खरंच येरवड्याचा रस्ता धरावा लागणार! अरे, किती हसवावं याला काही मर्यादा? =)) =)) =)) =)) =)) =))

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी