मॅरेज लाईफ.....१

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
9 Aug 2009 - 10:21 pm

हॅलो, वेळ आहे का रे या रविवारी??
का रे?
अरे आपल्याला एका काम आहे मुंबईत!! मला तुझी मदत लागेल...
रविवारी..... ?? बघतो..
बघु नकोस मी वाट पाहतोय. नि तू इकडे येतोहेस हे नक्की. आता हे लक्षात ठेऊन तू बाकीचं प्लॅनिंग कर.
अरे पण काय आहे ते सांग ना..
ते नंतर सांगतो सविस्तर बोलू ना आपण....
तरी पण...
फोनपेक्षा सविस्तर भेटून बोलू.....
पराला निखिलचा अचानक फोन आला आणि मुंबईला का बोलावतोय ते तो सांगायला तयार नव्हता.... काही विचारले तर तू फक्त ये इकडे असं म्हणत होता..
शनिवारी संध्याकाळी निखिलने पराला पुन्हा फोन केला.. उद्या निघतोयस ना पाचच्या बस ने?
पाच??? अरे तेव्हा तर माझी मध्यरात्र होते..!!! Sad
ते काही सांगू नकोस.. तू पाचच्या बसने निघ मात्र...

पराला हे निखिलला अचानक काय झाले होते कळायला काही मार्ग नव्हता.. विचार करून कशाला दिमाग का दही करून घ्यायचं? जे काय असेल ते कळेलच मुंबईला गेल्यावर. अशा विचारानं परा रविवारी पहटे लवकर निघाला.. इकडे ठाण्याला निखिल फॉर्मल पोषाखात वाट पाहतच होता..

परा: काय रे? इतक्या घाईने का बोलावलेस?? काही पालथे धंदे तर करून बसला नाहीस ना?
निखिलः नाही....
परा: मग कुणी फाटयावर मारलं का??
निखिलः नाही रे....
परा: मग काही चप्पल प्रकरण?
निखिलः असलं काही नाही रे.... आपल्याला दहाच्या आत पोचायला हवं रे दादरला...
परा: अरे ९ तर वाजताहेत.. नि आपल्याला थोडंच बस किंवा टॅक्सीने जायचंय.. ट्रेन ने पोचू दहाच्या आत निवांत...

चहापान पटकन आटोपून दोघांनी प्लॅटफॉर्म क्र. १ ची ठाण्याहून सुटणारी गाडी पकडली.. "परा.. पोळी-भाजी केन्द्रातलं अन्न खाऊन वैतागलोय रे!!!" ट्रेननं वेग घेतला तसा बोलावं की न बोलावं असं होऊन शेवटी निखिल म्हणाला...
हात्तिच्या.. एवढंच ना.. मग घरी स्वयंपाकीण ठेवायची....
तरं नाही रे....

बघ ना मी इतकी वर्षे ऑफिसात राबराब राबतो. काय मिळतं मला.??? कामाच्या अनियमीत वेळा.. बर्‍याचदा नुसतं सॅण्डविच नि कॉफी.. संध्याकाळी पण ९ वाजेपर्यंत घरी गेलो तर ठीक आहे नाहीतर विकतची पोळीभाजीही मिळत नाही.. पोटाचे हाल पण एकवेळ परवडले रे.. पण घरी गेल्यावर चार शब्द बोलायलाही कुणी नाही... ऑफीसमध्ये चार मित्र असतात तेवढेच.. पण प्रोफेशनल रिलेशन्स वेगळे नि आपलं हक्काचं माणूस असणं वेगळंच रे!!! विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..

निखिल अगदी मनातून बोलत होता. तोच काय त्याच्या सारख्या असंख्य अविवाहित लोकांची व्यथाच त्याने मांडली होती. नि त्यात नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर राहणार्‍यांची अवस्था तर त्याहूनही वाईट.
पण दुकटं होणंही तितकं सोपं नव्हतं.. आधीच आजकाल मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या.. अशात हवी तशी मुलगी मिळणं.. नि तीनंही पसंत करणं कठीण झालंय... एकवेळ मंदीत नोकरी मिळेल पण छोकरी मिळणं अवघड आहे.. लग्न हे एखाद्या चक्रव्यूहाप्रमाणे आहे यात येता येतं बाहेर पडता येत नाही. नि त्यात जर लग्न करताना सप्तपदीचा विधी केला तर काय काय भयानक परिणाम होऊ शकतात याचा नुकताच साक्षात्कार झालेला!! एखादाच योगेश्वर पिवळा डांबिस असेल तरच त्याची यातून सुटका... चांगलं खाऊ-पिऊ घालणारी.., रोज हापिसातून निघण्या आधी फोन करणारी..(काही पालथे धंदे केले असतील निस्तरण्याची पूर्वसूचना तर मिळते ना!!), छान मोगर्‍याचे गजरे माळणारी बायको मिळते नाहीतर.. तात्या काय किंवा अवलिया काय सगळ्यांनीच यातून माघार घेतल्यासारखी गत!!!

निखिल बोलत होता हे सगळे या पूर्वीही बर्‍याचदा बोलून झालं होतं. सहनही होत नाही अन सांगताही येत नाही!!!
"मी यातून बाहेर पडायचे ठरवलय". - निखिल
" मग काय करणार आहेस तू त्या साठी"? - परा
"माझी एक मैत्रिण आहे.. मस्त कलंदर नावाची... तिच्या ऑफिसमध्ये चाललोत आपण"
" काय करतात त्या"?
" हे काय येईलच त्यांचे ऑफीस"
निखिलने मोघम शब्दात पराचा प्रश्न टाळला.
ऑफिसच्या इमारतीच्या तलमजल्यावर आल्यावर निखिलने गळ्यात टाय अडकवला, खिशातून काढून एक पराला ही दिला आणि एकदम वेगळाच हसला.
"कलंदरतै टाय नसेल तर आपल्याला भेटणार नाहीत."
दोघे एका पॉश ऑफिसच्या बाहेर थांबले....
आत प्रवेश करताना का कोण जाणे पराला एका वेगळ्याच दुनियेत पाय ठेवतो आहोत असे वाटत होते!!!!
महागड्या अत्तराचा मंद दरवळ.. दूर कुठेतरी सौम्य आवाजात संतूरवादन ऐकू येत होते.. छान प्रसन्न करणारे वातावरण होते.. दादरच्या गर्दीतून बाहेर आलेल्या पराचा जीव थोडा सुखावला.. आधीचे आलेले लोकही टाय लावून आले होते.. सगळ्यांना एका हॉल मध्ये बोलावण्यात आले..

समोर भिंतीवर एक वाक्य मोठ्या ठळक अक्षरात लिहिले होते
"मॅरेज इज द मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड..... सो.. डोन्ट ओन्ली ड्रीम अबाऊट इट.. बट.. डू इट!!!"

परा त्या वाक्यावर विचार करू लागला.
खरंच शादी का लड्डू... जो खाये वो पछताये, जो ना खाये ललचाये.. लग्नाची स्वप्ने सगळेचजण बघतात... कोणी तो तिच्याबरोबर.. तर कोणी तो "त्या"च्या बरोबर लग्न करण्याची स्वप्नं बघतात.. हक्काच्या-प्रेमाच्या माणसाची स्वप्ने बघतात.. नोकरी मिळाली की लगेच सगळेजण छोकरीची स्वप्ने बघतात. आणि ती स्वप्ने साकार व्हावीत म्हणून प्रयत्नशील होतात. आपण त्याला स्वप्ने म्हणतो खरेतर त्या आपल्या गरजा असतात. पण मग स्वप्ने आणि गरजा यात फरक काय असतो? गरजा जेंव्हा अप्राप्य होतात तेंव्हा त्यांची स्वप्ने होतात? बापरे!!! म्हणजे लग्न अप्राप्य आहे?????

पराच्या नजरेसमोर आता पर्यंत दिलेल्या वरपरीक्षा उभ्या राहिल्या... त्यावेळी मुलींनी विचारलेल्या स्वयंपाक येतो का?? घरकाम येतं का??? सप्तपदीतल्या सगळ्या वचनांचं पालन करशील का?? या असल्या प्रश्नांनी पराला गारद केलं होतं.. लग्न झाले/ठरले नाही.. गर्लफ्रेंड पण नाही.. म्हणून नाईलाजास्तव कॅफेतल्या मुलींकडे पाहत कसेबसे रडतखडत जगत होता. नि "लडकी और बस के पीछे कभी भागना नहीं चाहिए.. एक गयी तो दुसरी आती है.." असे काहितरी बरळून मनाची समजूत घालत होता... छे: माणूस स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो................. आपण नक्की जगणे जगत असतो का जगण्याची तयारी करण्यासाठी खपत असतो? आनन्दात / स्वतःच्याच मस्तीत जगणे असू शकते हे स्वप्नही पहायला आपण नालायक आहोत?
आसपासचे बहुतेक लोक परासारखेच विचारात गढलेले होते.

त्या मस्त वातानूकुलीत हॉलमध्ये अन्धार झाला. हाय आय अ‍ॅम मॅस्ट कालान्डर. व्हॉट यू आर गोइन्ग टू सी टुडे इज अ वंडर ऑफ धिस मिलियिनम!!!

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Aug 2009 - 10:49 pm | बिपिन कार्यकर्ते

वाव!!! आय थिंक धिस इज गोन्ना बी फन... लेट इट कम सम मोअर अ‍ॅन्ड फास्ट!!! ;)

बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर's picture

9 Aug 2009 - 11:05 pm | मस्त कलंदर

:) जस्ट वेट अँड वॉच!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

श्रावण मोडक's picture

10 Aug 2009 - 10:46 am | श्रावण मोडक

वेट अँड वॉच? यू आर नॉट अ पॉलिटिशियन... नक्कीच नाही. :)
लवकरात लवकर पुढचं येऊ द्या. पराला भेटायचं आहे. त्याआधी सगळं वाचलेलं बरं. :)

विशाल कुलकर्णी's picture

10 Aug 2009 - 12:36 pm | विशाल कुलकर्णी

नामंजुर, वाट पाहाण्याची अजिबात तयारी नाही. लगेच येवु दे पुढचा भाग! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

Nile's picture

10 Aug 2009 - 3:52 am | Nile

वा वा! येउद्या!

(नवशिक्या) ;)

लिखाळ's picture

9 Aug 2009 - 10:59 pm | लिखाळ

वा .. मस्त मजेदार.. कल्पना एकदम आवडली.

मॅरेज सिस्टीम बद्दल पुढे वाचायला उत्सुक आहे. :)

-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !

प्राजु's picture

9 Aug 2009 - 11:33 pm | प्राजु

बरेच संदर्भ वाचल्यासारखे वाटताहेत.
मॅरेज लाईफ असं का नाही नाव दिलं?? ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मस्त कलंदर's picture

9 Aug 2009 - 11:44 pm | मस्त कलंदर

तीन लोकांनी डोकं लढवलं.. पण नीटसं सुचलं नाही...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन's picture

10 Aug 2009 - 12:49 am | टारझन

काय आहे हे ? काहीही बोध झाला नाही !

असो चालु द्या तुमचं !!

-नुस्तं बिलंदर
स्वच्छ दिसणारा कमोड , ही हगवण लागल्याची खुण आहे!!

विसोबा खेचर's picture

10 Aug 2009 - 12:02 am | विसोबा खेचर

चालू द्या... :)

आपला,
(अविवाहीत) तात्या.

--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय? नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!

गोगोल's picture

10 Aug 2009 - 3:23 am | गोगोल

जे काही आहे ते (विड्म्बन, प्रेरणा घेउन ई ई), मस्त जमलय.

पिवळा डांबिस's picture

10 Aug 2009 - 5:47 am | पिवळा डांबिस

एखादाच योगेश्वर पिवळा डांबिस असेल तरच त्याची यातून सुटका... चांगलं खाऊ-पिऊ घालणारी.., रोज हापिसातून निघण्या आधी फोन करणारी..(काही पालथे धंदे केले असतील निस्तरण्याची पूर्वसूचना तर मिळते ना!!), छान मोगर्‍याचे गजरे माळणारी बायको मिळते नाहीतर..

साधा मानव वा योगेश्वर, मी स्वामीच सुखांचा,
भोगी म्हणुनि उपहासा, मी योगी कर्माचा ||
;)
(स्वगतः च्यायला, आज रात्री गळ्यात मिरच्या आणि लिंबू बांधून झोपलं पाहिजे! :))

शैलेन्द्र's picture

10 Aug 2009 - 11:14 pm | शैलेन्द्र

काय गरज काका?

छोटा डॉन's picture

10 Aug 2009 - 6:44 am | छोटा डॉन

मजेशीर प्रकर्ण दिसतेय.
वाचतो आहे, येऊद्यात अजुन , एकुण ह्या लेखाच्या निमीत्ताने बर्‍याच जणांचा अडकलेला बोळा निघणार तर ;)

उत्तम जमते आहे, पुलेशु ...

------
छोटा डॉन

दशानन's picture

10 Aug 2009 - 8:27 am | दशानन

हेच म्हणतो.... ;)

(विवाहीत कि अविवाहित ह्या प्रश्नात अडकलेला ) राजे :D

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

सहज's picture

10 Aug 2009 - 7:18 am | सहज

पुढचा/चे भाग लवकर येउ दे.

स्वाती२'s picture

10 Aug 2009 - 7:25 am | स्वाती२

असेच म्हणते.

मदनबाण's picture

10 Aug 2009 - 8:22 am | मदनबाण

हम्म...लवकर लिहा पुढचा भाग.

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

प्रमेय's picture

10 Aug 2009 - 8:31 am | प्रमेय

माणूस स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो........... का त्याग?
जरा उच्च शब्द वापरला तर उगीच गुदगुल्या होतात काही माणसांना!

अवलिया's picture

10 Aug 2009 - 10:18 am | अवलिया

हा हा हा
मस्तच दिसते आहे एकंदर प्रकरण...

(अविवाहीत) अवलिया

निखिल देशपांडे's picture

10 Aug 2009 - 10:25 am | निखिल देशपांडे

बघ ना मी इतकी वर्षे ऑफिसात राबराब राबतो. काय मिळतं मला.??? कामाच्या अनियमीत वेळा.. बर्‍याचदा नुसतं सॅण्डविच नि कॉफी.. संध्याकाळी पण ९ वाजेपर्यंत घरी गेलो तर ठीक आहे नाहीतर विकतची पोळीभाजीही मिळत नाही.. पोटाचे हाल पण एकवेळ परवडले रे.. पण घरी गेल्यावर चार शब्द बोलायलाही कुणी नाही... ऑफीसमध्ये चार मित्र असतात तेवढेच.. पण प्रोफेशनल रिलेशन्स वेगळे नि आपलं हक्काचं माणूस असणं वेगळंच रे!!! विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..

=)) =)) =))
=)) =))
=))

बापरे हे वाचुन पुरती वाट लागली....
काय पण लिहिले आहे...
माझी तर वाटच लावली आहे ;)
असो पुढचा भाग लिहा लवकर
पराच्या नजरेसमोर आता पर्यंत दिलेल्या वरपरीक्षा उभ्या राहिल्या... त्यावेळी मुलींनी विचारलेल्या स्वयंपाक येतो का?? घरकाम येतं का??? सप्तपदीतल्या सगळ्या वचनांचं पालन करशील का?? या असल्या प्रश्नांनी पराला गारद केलं होतं.. लग्न झाले/ठरले नाही.. गर्लफ्रेंड पण नाही.. म्हणून नाईलाजास्तव कॅफेतल्या मुलींकडे पाहत कसेबसे रडतखडत जगत होता. नि "लडकी और बस के पीछे कभी भागना नहीं चाहिए.. एक गयी तो दुसरी आती है.." असे काहितरी बरळून मनाची समजूत घालत होता... छे: माणूस स्वतःच्या इच्छा मारणे याला समाधान म्हणत असतो................. आपण नक्की जगणे जगत असतो का जगण्याची तयारी करण्यासाठी खपत असतो? आनन्दात / स्वतःच्याच मस्तीत जगणे असू शकते हे स्वप्नही पहायला आपण नालायक आहोत?

काय परा तु असे विचार करतोस????;)

निखिल
================================

समंजस's picture

10 Aug 2009 - 11:54 am | समंजस

वा!!!.......
उत्सुकतेने पुढील भागाची वाट बघतोय!!
( हा वर्जीनल आहे की मागील एका लेख मालेचे विडंबन?? :? ) (क्रु.ह.घे.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Aug 2009 - 11:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझं नाव वाचून लेख उघडला आणि निराशा झाली नाही. पुढच्या भागात गोष्ट पुढे सरकेल अशी मात्र आशा आहे. ;-)

"स्लीपिंग लाईफ" नाव कसं वाटतं?

अदिती

ब्रिटिश टिंग्या's picture

10 Aug 2009 - 12:37 pm | ब्रिटिश टिंग्या

निखील मागच्याच आठवड्यात भेटला होता......बराच फ्रस्टेट होता......तो अशा काही नादाला लागेल अशी अपेक्षा होतीच.

अन् परा तर काय......च्यायला गंडलेलाच आहे!

असो,

@मॅस्ट कालान्डर टॅई, लेख अ‍ॅकडम मॅस्ट!
नेक्ट पार्टची अ‍ॅटुरटेने वॅट बघॅट आहे!

निखिल देशपांडे's picture

10 Aug 2009 - 12:45 pm | निखिल देशपांडे

निखील मागच्याच आठवड्यात भेटला होता......बराच फ्रस्टेट होता......तो अशा काही नादाला लागेल अशी अपेक्षा होतीच.
=)) =))
@मॅस्ट कालान्डर टॅई, ह्यांना पण ओढा हो पुढचा भागात...

निखिल
================================

परिकथेतील राजकुमार's picture

10 Aug 2009 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार

अ गा गा गा !
दमा दम मस्त कलंदर.... लेखाचा पहिला नंबर ;)

अतिशय अप्रतिम आणी एकदम शॉल्लीड ! पुढचा भाग वाचुन सविस्तर प्रतिक्रीया देईन. सध्या तब्येत खरच गंडली आहे :(

गंडलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

सूहास's picture

10 Aug 2009 - 4:57 pm | सूहास (not verified)

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
आयला ,,,हे प्रकरण माहीत नव्हते...लवकर सांगा..मॅस्ट कालान्डर टॅई

सू हा स...

फ्रॅक्चर बंड्या's picture

10 Aug 2009 - 5:32 pm | फ्रॅक्चर बंड्या

विकांताला जरा पाय मोकळे करू म्हणून कुठे मॉलमध्ये गेलो.. की हातात हात घालून फिरणारी जोडपी जखमेवर पोतंभर मीठ चोळतात..

=)) =)) =)) =)) =)) =))

खरे आहे राव

ऋषिकेश's picture

10 Aug 2009 - 6:10 pm | ऋषिकेश

=)) =))

मस्त.. येऊदे पुढचा भाग लवकर

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ६ वाजून ७ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "आज मेरे यार की शादी है...."

विजुभाऊ's picture

10 Aug 2009 - 10:14 pm | विजुभाऊ

जपान लाईफ ही एक गादी अर्र्,,,,,,,,नाय नाय,,,,,स्लिपिंग सिस्टीम आहे.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे