डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
5 Feb 2011 - 11:52 am

आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्‍याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !

वाचा हा परिच्छेद -

मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्याो गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला.

अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही. त्या एवढाल्या वाड्यात, आजारी आजी आणि घनघोर बाप सोडला तर फक्त मी आणि आईची मागे राहिलेली पुस्तकं. आसपास कोणी माझ्या वयाची मुलंही नव्हती. त्यामुळे पुस्तकं वाचणं आणि न आठवणार्या आईच्या आठवणींत बुडून जाणं एवढाच दिनक्रम उरला.

आप्पा दिवसभर त्यांच्या दुकानांवर. घरी यायचे ते पण रात्र उलटून गेल्यावर. मला कधी मारलं नाही हे खरं, पण त्यांचा दराराच एवढा होता, की माझ्या हातून कुठलीच चूक होणं शक्य नव्हतं. आईवेगळ्या मुलाला वाढवताना फक्त शिस्तच पुरेशी नाही हे त्यांना बहुधा कळत असावं, पण मायेनं बोलणं त्यांना जमायचं नाही. दिवसभराच्या दगदगीतून घरी आल्यावर मी काही खोड्या करत नाही, एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. तेव्हा मी असून नसल्यासारखाच. कधीतरी मध्येच कितवीत आहेस, प्रगतिपुस्तक बघू वगैरे रुंद गडगडाटी आवाजात चौकशा होत. मनातल्या मनात मी त्यांना 'आप्पा बळवंत' नाव ठेवून दिलं होतं. खरं तर त्या चौकात आप्पांचं दुकान आहे, म्हणूनच त्याला तसं नाव पडलं अशी माझी बरेच दिवस पक्की समजूत होती.

अधिक भाग - http://misalpav.com/node/8144

***

मुंबई म्हणजे धावपळ. घाई गर्दी. घड्याळाला बांधलेले आयुष्य. बदलत्या युगात तरुणी, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन जीवनाच्या गाड्याला स्वतःला जुंपुन घेत आपणही काही कमी नाही हे दाखवत पळापळ करु लागल्या. पुरुषी अहंकारी वृत्ती अशा स्त्रियांसाठी सोडल्या जाणार्या स्पेशल लोकल्सकडे जरा कुत्सित वृत्तीनेच पहात होती. पण केवळ पैसा मिळतोय म्हणून या स्त्रिया भर गर्दित लोकलला लटकत होत्या का? नाही. त्यांच्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांची घालमेल, त्यांचे प्रयत्न एखाद्याच सुजाण आणि प्रगल्भ मनुष्यास समजु शकतात. आणि मग ते जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ते शब्द शब्द रहात नाहीत. त्यांचे अभंग होतात. त्यांची गाथा होते.

नाही पटत? जरा वाचुन बघा -

सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||

इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

अधिक भाग - http://misalpav.com/node/746

***
मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो लेखक केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/17 इथे वाचता येईल.

बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे नंदन.

वेगवेगळ्या विषयांमधे माहितगार असलेला नंदन चटकन कुठुनही माहिती आणुन देतो. बहुधा गुगलने एक स्पेशल सर्वर त्याला भेट दिला आहे. कोट्या करण्यात पटाईत असलेला नंदन उकार, वेलांटी चुकली तर नाही ना हे शोधण्यात जितका वाकबगार आहे तितकाच कूणी कोलांटीउडी मारली तर जुनी लिंक टुणकन आणुन आदळवुन देतो. भले भले ह्याला घाबरतात हे नक्की !

नंदन आमच्या या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे त्याचा किबोर्ड हरवला आहे. त्यामुळे हल्ली तो टंकत नाही. हरकत नाही. आम्ही त्याला किबोर्ड भेट देत आहोत. त्याच बरोबर शाल श्रीफळ पण देत आहोत त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर कीबोर्डचे उद्घाटन करावे अशी आमची इच्छा ! बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे?

श्रीफळ

शाल

किबोर्ड

दुकानांचे पत्ते

श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-tr...
किबोर्ड - http://www.superonline.co.in/product_image/gold-std-big.jpg

क्रमशः

(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)

औषधोपचारमदत

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

5 Feb 2011 - 11:56 am | नन्दादीप

बिन शेंडीचा नारळ?????

पिवळा डांबिस's picture

6 Feb 2011 - 12:17 pm | पिवळा डांबिस

कोण?
नंदन की नाना?

मिपाक काळजी...!!!

नंदन's picture

5 Feb 2011 - 11:56 am | नंदन

शाल आणि श्रीफळाबद्दल धन्यवाद हो, नाना. (चला आता पुण्याचं सार्वजनिक नागरिकत्व मिळालं असं मानायला हरकत नाही :)). बाकी पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे ;)

यशोधरा's picture

5 Feb 2011 - 11:59 am | यशोधरा

नंदन, खराच रे. लिही बघाया कायतरी सुरेखसा.

लिही बघाया कायतरी सुरेखसा.

सहमत आहे, थोडावेळ इतर सर्वरवर लोड आला तरी चालेल.

भले भले ह्याला घाबरतात हे नक्की !

भला भला नसलो तरी आपण तर जाम घाबरतो ब्वॉ नंदनला. प्रत्येकवेळी प्रतिसाद देताना हा पुढे भविष्यात आपल्या प्रतिसादाने आपल्यालाच लोळवणार नाही ना अशी भीती तर सश्या सारखी आमच्या पाठी सतत असते. ;-)

वाह छान प्रकल्प हाती घेतलायस रे अवलिया. पुढल्या भागची वाट पहातोय.
नंदनशेटना विनंती, पुन:श्च लिहिते व्हा. :)

५० फक्त's picture

5 Feb 2011 - 12:16 pm | ५० फक्त

नाना, अतिशय धन्यवाद, सध्या धोनी पण सचिनला असेच त्याच्या शारजाच्या मॅचच्या क्लिप दाखवत असेल.

या यादीत असलेल्या आणि नसलेल्या सगळ्या चांगल्या लेखकांना पुन्हा सक्रिय होण्याचे नम्र आवाहन, सर्व नव्या मिपाकरांतर्फे.

कुणाची तरी कॉपि करावी स्टाईल
ते वाचुन कुणितरी देईल स्माईल
पण इथे बघतो तर हाय रे दैवा
नेहमीच कोणितरी चोटिल .

अशी गत झाली आहे.

हर्षद.

sneharani's picture

5 Feb 2011 - 12:16 pm | sneharani

छान प्रकल्प!
येऊ देत पुढचे भाग!
@नंदन : लिहते व्हा!

नरेशकुमार's picture

5 Feb 2011 - 12:27 pm | नरेशकुमार

दोन दोन कीबोर्ड दिले आहेत,
उपयोग व्हावा.

स्वाती दिनेश's picture

5 Feb 2011 - 12:35 pm | स्वाती दिनेश

नंदन, पुण्याचं नागरिकत्व मिळालय, आता लिवायला लागा.. कसें?
अवलिया ह्या धाग्यातून किती जणांना चिमटे काढणार आहेत.. आणि ते मनावर घेऊन लिहिती झाली मंडळी तर मजा येईल.. त्यामुळे आता पुढचा सत्कार कोणाचा ? याची उत्सुकता आहे.
स्वाती

आजानुकर्ण's picture

5 Feb 2011 - 1:07 pm | आजानुकर्ण

आत्मचरित्र असल्याचे वाटले होते. पण अंमळ अपेक्षाभंग झाला.

सन्जोप राव's picture

6 Feb 2011 - 6:29 am | सन्जोप राव

हेच म्हणतो.
असेच.
इतके चांगले शीर्षक वाया घालवल्यासारखे वाटते.
डिस्क्लेमरः 'हम्म. हे अपेक्षितच होते, तर्कटपणा इथेतरी नको, ते कोण राव का साहेब वगैरे...' अशा बद्धकोष्ठी प्रतिसादांना कुठेतरी मारण्याचे स्वातंत्र्य घेतलेले आहे.

तिमा's picture

6 Feb 2011 - 10:49 am | तिमा

पेशवाईत साडेतीन शहाणे होते. मिपावर माझ्या मते संजोप राव , क्लिंटन, नितीन थत्ते हे तीन नक्कीच. अर्धा कोण ते ठरवता येत नाही.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2011 - 1:36 pm | श्रावण मोडक

नाना 'कर्तव्य' करू लागला म्हणायचं... :)
छान. छान. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

प्रीत-मोहर's picture

5 Feb 2011 - 1:42 pm | प्रीत-मोहर

नाना पुलेशु
मस्त झाला हा भाग

नन्दन्सेठ लिवा की कायबाय झ्याक :)

प्राजक्ता पवार's picture

5 Feb 2011 - 1:50 pm | प्राजक्ता पवार

प्रकल्प छानंच .
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ...

अरुण मनोहर's picture

5 Feb 2011 - 1:57 pm | अरुण मनोहर

सुर्याची संक्रांत नुकतीच येऊन गेली. आता मिपावर नाना संक्रांती येणार! आठवड्याला एक ह्या वेगाने.

मिपाचा टीआरपी वाढणार. मस्तच.

चला त्या निमित्तानं या मिपाकरांची जाहीर ओळख तरी होईल.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक!

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2011 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार

नाना छान लेखन रे.
उगाच वाकड्यात शिरणार्‍या खाजाळु प्रतिक्रीयांकडे दुर्लक्ष करुन लिहित रहा.

तू मिपाचा कालिदास आहेस.

*ज्ञानेश्वर आमचा कोदा आहे म्हणे.*

एनीवे ,
सध्या मी फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही हे बरे आहे ... ;)

टारझन's picture

6 Feb 2011 - 11:26 am | टारझन

नाही तर ह्याच षिर्षकाचा लेख आम्हाला लिहायला घ्यायला लागला असता.

अवांतर : नाना , लिहीते व्हा !! नंदन लिहीते व्हा !!

- (तिडिक जाणार्‍या मिपाकरांच्या कासोट्याला हात घालणारा मिपाकर ) टारझन

वा वा वा! हे लै भारी!
नंदन या निमित्ताने पुन्हा लिहिता झाला की मालिका वसूल!!

सुनील's picture

5 Feb 2011 - 4:28 pm | सुनील

अत्यंत दर्जेदार माल विकणार्‍या नंदन शेठ यांचे दुकान अत्यंत कमी वेळ उघडे असते :(

त्यांनी दुकान जरा जास्त वेळ उघडे ठेवावे, ही विनंती!

ह्याला मि पा वरचा नवा रिअलिटी शो म्हणायचे का ?
दर आठवड्याला नवीन बकरा ...........

डावखुरा's picture

5 Feb 2011 - 8:45 pm | डावखुरा

नाना...धन्यवाद....
तुमच्या ह्या प्रयत्नाणे जुने मिपाकर लिहिते होवोत....
नाही झाले तरी त्यांचे उत्तम लिखाण तरी समोर येईल....
पुन्हा एकदा धन्यु...
पुढील भाग्यवानाच्या प्रतिक्षेत......

पैसा's picture

5 Feb 2011 - 9:28 pm | पैसा

या थीममुळे (सध्या न लिहिणार्‍या) काही चांगल्या लेखकांचं पूर्वीचं उत्तम लिखाण (शोधायचे कष्ट न करता ) एका जागी वाचायला मिळेल. आणखी एक फायदा म्हणजे, पुढचा नंबर आपला नसावा या भीतीने निदान काही लोक तरी कीबोर्डावरची धूळ झटकतील!

गुंतलास कोठे नंदनंदना तू?
आधीसारखं रे केव्हा ल्हिशील तू?
हारतुरे केले सारे, आता तरी लिहा!!

क्या बात है!!! ही सगळी मंडळी लिहिती व्हावीत हीच अपेक्षा. :)

हा हा !!!
प्रकल्पाचा (लेखाचा) फॉरमॅट आवडला, नाना :)
नुसतंच लिहिते व्हा सांगण्याऐवजी ही स्टाईल लै भारी.

बाकी नंदनभौ... खरंच लिही रे काहीतरी मस्त.
पुढच्यावेळी बे-एरियात येशील तेव्हा बक्षिस म्हणून माझ्याकडची रशियन व्होडका ओपन करीन. :) :) :)
(मागच्यावेळी जॉनी वॉकर होती ;) )
कय बोल्तो ??? :)

राजेश घासकडवी's picture

6 Feb 2011 - 11:37 am | राजेश घासकडवी

वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो रे नंदनलाला,
थकलो रे नंदनलाला...

'कोटीकेसरी' अन् 'लिंकाळ्या', लोक जाणती तुजला
'अंमळ हळवा' शब्दप्रयोग हा, तू मीपाला दिधला
तुझ्या हातचे लेखन वाचुन काळ केवढा गेला....
थकलो रे नंदनलाला...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Feb 2011 - 11:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख पाहून अनपेक्षित पण सुखद अपेक्षाभंग झाला. कोटीकेसरी*, लिंकन आणि 'ऐटीतल्या हळव्या' नंदनने ही टीका मनावर घ्यावी आणि काहीतरी (कैच्याकै) कोट्या सोडून काही सकस लिखाण करावे ही विनंती.

धागाप्रवर्तक, कृपया पुढचे भाग पटापट टाकणे.

*गुर्जींनी आपल्या कवितेत योग्य बदल करावा ही विनंती.