डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १
आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !
वाचा हा परिच्छेद -
शाल
किबोर्ड
दुकानांचे पत्ते
श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-treasure-shawl-1.jpg
किबोर्ड - http://www.superonline.co.in/product_image/gold-std-big.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
मी सखाराम गटणे. छप्पन सशांची व्याकुळता साठवणार्या लहानशा भावशून्य डोळ्यांचा. अर्ध्या विजारीत पांढरा शर्ट खोचून प्राज्ञ मराठी बोलणारा. झकास अक्षर असूनही इतरांच्या स्वाक्षर्याो गोळा करणारा. आणि, अर्थातच तोंडात दातांच्या ऐवजी छापखान्याचे खिळे बसवलेला. अप्पाजीराव गटण्यांच्या घरी जन्मलो. वयाच्या बाराव्या दिवशीच आई गेली. पोरका झालो. पण म्हणजे नक्की काय?, ते काही बराच मोठा होईपर्यंत कळलं नाही. त्या एवढाल्या वाड्यात, आजारी आजी आणि घनघोर बाप सोडला तर फक्त मी आणि आईची मागे राहिलेली पुस्तकं. आसपास कोणी माझ्या वयाची मुलंही नव्हती. त्यामुळे पुस्तकं वाचणं आणि न आठवणार्या आईच्या आठवणींत बुडून जाणं एवढाच दिनक्रम उरला. आप्पा दिवसभर त्यांच्या दुकानांवर. घरी यायचे ते पण रात्र उलटून गेल्यावर. मला कधी मारलं नाही हे खरं, पण त्यांचा दराराच एवढा होता, की माझ्या हातून कुठलीच चूक होणं शक्य नव्हतं. आईवेगळ्या मुलाला वाढवताना फक्त शिस्तच पुरेशी नाही हे त्यांना बहुधा कळत असावं, पण मायेनं बोलणं त्यांना जमायचं नाही. दिवसभराच्या दगदगीतून घरी आल्यावर मी काही खोड्या करत नाही, एवढंच त्यांच्या दृष्टीने पुरेसं होतं. तेव्हा मी असून नसल्यासारखाच. कधीतरी मध्येच कितवीत आहेस, प्रगतिपुस्तक बघू वगैरे रुंद गडगडाटी आवाजात चौकशा होत. मनातल्या मनात मी त्यांना 'आप्पा बळवंत' नाव ठेवून दिलं होतं. खरं तर त्या चौकात आप्पांचं दुकान आहे, म्हणूनच त्याला तसं नाव पडलं अशी माझी बरेच दिवस पक्की समजूत होती.अधिक भाग - http://misalpav.com/node/8144 *** मुंबई म्हणजे धावपळ. घाई गर्दी. घड्याळाला बांधलेले आयुष्य. बदलत्या युगात तरुणी, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन जीवनाच्या गाड्याला स्वतःला जुंपुन घेत आपणही काही कमी नाही हे दाखवत पळापळ करु लागल्या. पुरुषी अहंकारी वृत्ती अशा स्त्रियांसाठी सोडल्या जाणार्या स्पेशल लोकल्सकडे जरा कुत्सित वृत्तीनेच पहात होती. पण केवळ पैसा मिळतोय म्हणून या स्त्रिया भर गर्दित लोकलला लटकत होत्या का? नाही. त्यांच्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांची घालमेल, त्यांचे प्रयत्न एखाद्याच सुजाण आणि प्रगल्भ मनुष्यास समजु शकतात. आणि मग ते जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ते शब्द शब्द रहात नाहीत. त्यांचे अभंग होतात. त्यांची गाथा होते. नाही पटत? जरा वाचुन बघा -
सकाळी उठावे | सुसाट सुटावे | ऑफिस गाठावे | कैसेतरी || इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या | वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या || चढावे बशीत | गर्दीत घुशीत | रोज या मुशीत | कुटताना || धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम | गाठण्या मुक्काम | सोस बये! || उशीर अटल | चुकता लोकल | जीवही विकल | संभ्रमित || लागते टोचणी | भिजते पापणी | जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||अधिक भाग - http://misalpav.com/node/746 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो लेखक केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/17 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे नंदन. वेगवेगळ्या विषयांमधे माहितगार असलेला नंदन चटकन कुठुनही माहिती आणुन देतो. बहुधा गुगलने एक स्पेशल सर्वर त्याला भेट दिला आहे. कोट्या करण्यात पटाईत असलेला नंदन उकार, वेलांटी चुकली तर नाही ना हे शोधण्यात जितका वाकबगार आहे तितकाच कूणी कोलांटीउडी मारली तर जुनी लिंक टुणकन आणुन आदळवुन देतो. भले भले ह्याला घाबरतात हे नक्की ! नंदन आमच्या या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे त्याचा किबोर्ड हरवला आहे. त्यामुळे हल्ली तो टंकत नाही. हरकत नाही. आम्ही त्याला किबोर्ड भेट देत आहोत. त्याच बरोबर शाल श्रीफळ पण देत आहोत त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर कीबोर्डचे उद्घाटन करावे अशी आमची इच्छा ! बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे? श्रीफळ
शाल
किबोर्ड
दुकानांचे पत्ते
श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-treasure-shawl-1.jpg
किबोर्ड - http://www.superonline.co.in/product_image/gold-std-big.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
प्रतिक्रिया
बिन शेंडीचा नारळ?????
बिन शेंडीचा नारळ?????
बाब्बौ
नंदन, खराच रे. लिही बघाया
लिही बघाया कायतरी
वाह छान प्रकल्प हाती घेतलायस
नाना, अतिशय धन्यवाद, सध्या
असेच म्हणते...
दोन दोन कीबोर्ड दिले
अगदी..
डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर
सहमत आहे.
साडेतीन
कर्तव्य
नाना पुलेशु मस्त झाला हा भाग
प्रकल्प छानंच . पुढील
सुर्याची संक्रांत नुकतीच येऊन
चला त्या निमित्तानं या
नाना छान लेखन रे. उगाच
आणि ज्ञानेश्वर सध्या समाधित आहेत म्हणे
धन्यवाद कोदेश्वर
वा वा वा! हे लै भारी! नंदन या
खरे आहे
ह्याला मि पा वरचा नवा रिअलिटी शो म्हणायचे का ?
नाना...धन्यवाद.... तुमच्या
नाना धन्यवाद!
श्रीफळ दिले, शाल दिली, नानानी तुला!
क्या बात है!!! ही सगळी मंडळी
हा हा !!! प्रकल्पाचा (लेखाचा)
वाट पाहुनी अति मी दमलो, थकलो
अनपेक्षित सुखद अपेक्षाभंग