अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

विसुनाना's picture
विसुनाना in जनातलं, मनातलं
10 Jun 2008 - 3:12 am

हैदराबाद:

येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली". धमाल विनोदी असे हे बालनाट्य पूर्णपणे बालकलाकार सादर करत असून नाटकाचे नेपथ्य, वेशभूषा यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

या बालनाट्याचे मराठी भाषेच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे यात संस्कृतप्रचुर मराठी बोलीबरोबरच ग्रामीण मराठी बोलीतीलही संवाद आहेत. केवळ स्मरणशक्ती आणि अभिनयक्षमतेच्या जोरावर सर्व बालकलाकार हे संवाद अस्खलितपणे म्हणू शकतात. इतकेच नव्हे तर त्यांचा शाब्दिक अर्थ आणि भावार्थही त्यांना पूर्ण समजू लागला आहे हे त्यांच्या सहज अभिनयातून स्पष्ट होते.

बालनाट्य प्रशिक्षणावेळी उपस्थित असणारे एक पुणे येथून आलेले पाहुणे प्रेक्षक उद्गारले की "अरे, मला तर पुण्यात असल्याचाच भास होत आहे. " यातच या शिबिराचे यश दिसते.:)

रविवार दि. २२ जून २००८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता हैदराबाद येथील पोट्टी श्रीरामलू तेलुगू युनिव्हर्सिटीच्या नंदमूरी तारक (एन. टी.) रामाराव कलामंदिरात या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे. आपल्यापैकी कोणी जर हैदराबादमध्ये असतील तर त्यांनी (आपल्या बालगोपाळांसह) या प्रयोगाला अगत्याने उपस्थित राहावे आणि बालकलाकारांना प्रोत्साहन द्यावे ही आग्रहाची विनंती.

याच बालनाट्याचे येथील मराठी बालप्रेक्षकांच्यात मराठी भाषा आणि मराठी नाटक यांचे आकर्षण निर्माण करण्यासाठी आणखी प्रयोग सादर कऱण्याची 'रंगधारा' संस्थेची मनिषा आहे.

राजकन्येची बाहुली

लेखक : श्री. विजय शिंदे
कलाकारः चि. यश फडके, चि. आदित्य परळीकर, कु. सुगंधा जोशी, चि. चैतन्य ठाकूर, कु. पर्णवी फडके, कु. ऐश्वर्या गोखले, कु. अक्षदा अवधूत, कु.संपदा जोशी , चि. निखील नाईक, चि. ऋषभ सोमण, चि. सोहम चौसाळकर, कु. ईशा फडके, चि. अजित जोशी

प्रयोगाच्या अधिक माहितीसाठी श्री. प्रकाश फडणीस (हैदराबाद भ्रमणध्वनी ९९४८५ ८८५१२) यांच्याशी संपर्क साधावा.
(वि‌. सु. : मर्यादित आसनसंख्येमुळे रसिकांची होऊ शकणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधावा ही विनंती.)

संस्कृतीनाट्यबालकथाभाषाराहती जागाप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 3:18 am | विसोबा खेचर

नानासाहेब,

आपण दिलेली बातमी मला नक्कीच कौतुकास्पद वाटते.

सर्व कलाकारांना आणि नाटकाला माझ्या मनापासून शुभेच्छा! :)

आपला,
(मराठीचा अभिमानी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2008 - 3:45 am | भडकमकर मास्तर

सर्व कलाकारांना मास्तरांच्या शुभेच्छा....
दणक्यात वाजवा प्रयोग... :)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शरुबाबा's picture

10 Jun 2008 - 4:17 am | शरुबाबा

सर्व कलाकारांना माझ्या मनापासून शुभेच्छा....

प्रभाकर पेठकर's picture

10 Jun 2008 - 4:32 am | प्रभाकर पेठकर

सर्व बालकरांना, दिग्दर्शकाला मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा...

प्रयोगाला येऊ शकत नाही. (पुण्यात आहे). पण प्रयोग झाला की मिपावर फोटो जरूर चढवा..

नीलकांत's picture

10 Jun 2008 - 5:49 am | नीलकांत

ह्या बालकलकारांचं कौतुक वाटतं. त्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

नीलकांत

गणा मास्तर's picture

10 Jun 2008 - 5:40 pm | गणा मास्तर

माझ्यापण हार्दीक शुभेछा

प्रमोद देव's picture

10 Jun 2008 - 7:10 pm | प्रमोद देव

सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते. :)
हा प्रयोग धमाल होऊन जाऊ द्या!
तथास्तु!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

इनोबा म्हणे's picture

10 Jun 2008 - 9:14 pm | इनोबा म्हणे

सर्व बालकलाकारांचे,त्यांच्या पालकांचे आणि इतर संबंधित मंडळींचे जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आणि ही बातमी दिल्याबद्दल विसुनानांचेही कौतुक वाटते. आपल्या मातृभाषेची ओढ ही चीजच काही और असते.

हेच म्हणतो...

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jun 2008 - 7:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व कलाकारांना आमच्याही शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jun 2008 - 7:41 pm | प्रकाश घाटपांडे

याच वयात जर प्रोत्साहन मिळाले तर ही मुले अधिक उत्साहाने काम करतील.
प्रोत्साहन व सदिच्छा
प्रकाश घाटपांडे

प्रियाली's picture

10 Jun 2008 - 8:00 pm | प्रियाली

:-)

चतुरंग's picture

10 Jun 2008 - 7:52 pm | चतुरंग

कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे!
सर्वाना अनेक शुभेच्छा!!
(मी हैद्राबादला रहात असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळात काही कार्यक्रम झालेले बघितलेत. अजूनही होत असणार. मला स्वतःला हे शहर फार आवडते.)

विसुनाना ह्याची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद! नाटकाचे फोटोही नंतर देता आले तर मजा येईल.

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

10 Jun 2008 - 7:54 pm | मुक्तसुनीत

कौतुकास्पद आहे. परभाषिक मुलखात मराठीचे कार्यक्रम बसवणे हेच मुळात कष्टाचे असते त्यातून नाटकासारखा सर्वांची एकाच वेळी तालीम आवश्यक असणारा प्रकार करणे हे जिद्दीचेच काम आहे!

हेच म्हणतो.

धनंजय's picture

10 Jun 2008 - 8:51 pm | धनंजय

वर्णन ऐकून नाटक बघावेसे वाटते - हार्दिक शुभेच्छा!

सर्किट's picture

11 Jun 2008 - 2:03 am | सर्किट (not verified)

सर्व बाळगोपाळांना शुभेच्छा.

२००६ च्या जानेवारीत बे एरियातील कला या संस्थेतर्फे बालनाट्याअचा प्रयोग केला होता.

त्याविषयी http://www.calaaonline.com/events/gammat/index.html येथे अधिक.

- सर्किट

यशोधरा's picture

11 Jun 2008 - 9:12 am | यशोधरा

अरे वा!! प्रयोगासाठी खूप शुभेच्छा :)

विसुनाना's picture

11 Jun 2008 - 11:25 am | विसुनाना

बालकलाकारांना प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
हे प्रतिसाद मी त्यांच्यापर्यंत पोहोचवीनच!

प्रयोग सादर होण्यापूर्वी शिबिराचे आणि सादर झाल्यानंतर प्रयोगाचे फोटो येथे नक्की देईन.
पुनःश्च धन्यवाद.

मुक्तसुनीत's picture

11 Jun 2008 - 8:28 pm | मुक्तसुनीत

शक्य झाल्यास काही क्लिपिन्ग्स टाकता आली तर पहा. ते पहायला खरी मजा येईल.

विसुनाना's picture

12 Jun 2008 - 11:11 am | विसुनाना

क्लिपिंग देण्याचा प्रयत्न करीन.

कलंत्री's picture

12 Jun 2008 - 5:57 pm | कलंत्री

विसुनाना,

बर्‍याच दिवसानंतर चांगली वार्ता वाचण्याचा / ऐकण्याचा योग आला.

मनापासून धन्यवाद.

इतर मराठी भाषिकांना आवाहन,

इतरत्र राहणार्‍या मराठी भाषिकांनी असेच प्रयोग करावे ही विनंती आणि आवाहन.

कलंत्री