तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सुखी संसाराचे एक रहस्य सांगनार आहे. निट ऐका.
कोनताही एक विकएण्ड निवडा. शनिवार चालेल.
सकाळि लवकर ऊठा. बायको उठन्याच्या निदान एक तास तरी अगोदर.
दोन बटाटे घ्या, पान्यात टाकुन उकडायला ठेवा.
" alt="" />
कणिक मळा. कणकेचे गोळे करुन घ्या.
" alt="" />
चित्रात दाखविल्याप्रमाने कणिक थोडी जाड गोलाकार करुन घ्या.
एकुन ४ करा, २ बायकोसाठी, २ तुमच्यासाठी.
" alt="" />
बारीक कांदे चिरुन घ्या.
" alt="" />
बटाटा स्मॅश करुन घ्या, त्यात मिठ, हळद, चटनी, कांदा टाकुन त्यांचे मिश्रण करुन घ्या.
" alt="" />
कणके मध्ये हे मिश्रन भरुन घ्या, आनि ते गोळे लाटा.
" alt="" />
तव्यावर मस्त पैकी दोन्हि बाजुने शेकुन घ्या. शेकताना देसी घी वापरा.
" alt="" />
बायको उठल्याउठल्या तिच्या पुढे गरम गरम पराठ्यांचे ताट, त्यासोबत लोणचे, केचअप, आनी फक्कड चहा धरा.
तुमचा विकएण्ड एकदम मस्त जाईल.
आनि असेच प्रेमाने राहिले तर अवघे जिवन नाही सुखाचे झाले तर नाव बदलुन घेईन
प्रतिक्रिया
3 Feb 2011 - 6:30 pm | चिरोटा
फोटू दिसत नाही आहेत. पण चांगले असणार.वीक एन्ड चांगला जाईल ठीक पण प्रत्येक आठवड्यात हेच काम लागायचे.हापिसातून येताना बटाटे घेवून यावे लागतील दर शुक्रवारी.
3 Feb 2011 - 6:32 pm | अवलिया
ओ नरेशजी पाककृती जनातलं मनातलं मधे का टाकली? गंडलो ना !
3 Feb 2011 - 6:40 pm | मनराव
अनुमोदन......
हे शब्दशः जनातलं मनातलं अजिबात नाही..
3 Feb 2011 - 6:35 pm | टारझन
आहो तुमच्यात काही दात बीत घासायची , अंघोळ बिंघोळ करायची रितभात आहे की नाही नरेंद्रकुमार ... शी बै ..
अवांतर : पराठे खायला डेरिंग लागेल हे :)
- टारु कराटे
3 Feb 2011 - 6:36 pm | मनराव
मित्रा नरेश,
तू का येउ घातलेल्या विकएन्डची वाट लावण्यासाठी एवढा उतावळा झाला आहेस.... तुझे असले उपाय घरातली शांती भंग करण्यास करणी भूत ठरू शकतात..........
बाकी आलू पराठे पाहून झक्कास वाटलं, येत्या शनिवारी तेच करायला सांगतो........ :)
3 Feb 2011 - 6:43 pm | मुलूखावेगळी
हरहुन्नरी, गुणी , आदर्श, विनम्र, १ निष्ठ, घनिश्ठ सगळे
आहात
गेल्या जन्मी तुमच्या बायकोने कोनते व्रत केले होते हो जे कि तिला तुम्ही मिळालात
विचारुन सांगा.
. बाकि कनकित भाजी घातल्यानंतर लाटने आनि ती न फाटने , फुटने ही खरी कला हो
3 Feb 2011 - 7:22 pm | आत्मशून्य
त्या पेक्षा सरळ सकाळचे वीधी आटोपून मस्तपैकी चैतन्यला जा मग, चांगाला पेश्वाई पराठा ओरपा आन एक पटीयाला ग्लास लस्सी प्या आनी ऊरलेला दीवस एकदम मस्त आळसात लोळत घालवा. संध्याकाळी बायकोला जेवण घरीच बनवायला सांगा. सहकूटूंम्ब सहपरीवार (वढील्धारे व लहान्गे पकडून) जेवण करा बाय्कोचे सूगरण म्हणून कौतीक करा.... मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते. दूसर्या दीवशी दूसरा पराठा ट्राय करा व रीयल ओरेंज ज्यूस प्या (टेट्रा पॅक मधले) आणी रात्री कूटूंम्बाला बाहेर जेवायला न्या (वढील्धारे व लहान्गे सोडून) ... मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते. सोमवार ते शूक्रवार सकाळी , दूपार व रात्री बायकोने प्रेमाने स्वतःच्या हाताने तयार केलेला नाष्टा व कोणतीही भाजी भाकरगोड मानून खा.... मंगळवारी आन गूरूवारी आपल्या फर्माइशी बनवायला लावा..... तीच्या सूगरण पणाचे, गृहक्रूत्यदक्षतेचे गूण गावा, त्याला प्रोत्साहन द्या कश्टाचे कौतीक करा ...आन मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते... अधून मधून बायकोला माहेरी पाठवा आणी स्वतः मीत्रांसोबत ओल्या पार्ट्या झोडा आन मग बोला संसार कसा नाय सूखाचा व्हत ते... आणी हे जर शक्य येत नसेल तर जसे वाटेल तसे करा पण प्लीज असले दीशाभूल करणारे लेखन करून इतरांच्या सूखी संसाराची वाट लावू नका....
(क्रूपया हा प्रतीसाद हलके घ्यावा हे सूज्ञास सांगणे न लगे.)
- (परोठाप्रेमी) संसारशून्य
4 Feb 2011 - 12:39 pm | खादाड अमिता
टाळ्या टाळ्या
असं लिहिण्याची हिम्मत आमचे आहो मिपा बघत नसल्या कारणाने करतीये. :)
3 Feb 2011 - 7:18 pm | आत्मशून्य
प्रकाटाआ
3 Feb 2011 - 11:11 pm | ५० फक्त
आत्मशुन्य यांच्या अनुभवी प्रतिसादाला साष्टांग दंडवत.
4 Feb 2011 - 9:11 am | आत्मशून्य
हे काय ? आमच्या सूखी संसाराचा कूणालाच हेवा वाटला नाही ? :( कोणीच आम्हाला लकी मानत नाही? :(
छ्या छ्या छ्या काळ बाकी भलताच बदलला आहे आता. म्हणतात ना ..... रामचंद्र कह गये सीयासे ऐसा कलीयूग आयेगा .......
3 Feb 2011 - 11:48 pm | विजुभाऊ
साला हा नरेशकुमार बरा होता. त्याच्या लग्नाचा वाढदिवस काय झाला एकदम बिघडलाच.
अवांतरः गणपाच्या पावलावर पाऊल टाकतोय बहुतेक. त्याची वाट अवघड आहे. लक्षात घे रे
3 Feb 2011 - 11:48 pm | कच्ची कैरी
हा खरच सुखी संसाराचा मंत्र आहे .तुमची बायकोही माझ्याइतकीच लकी आहे ह! मला आत्तापर्यंत उगाच मीच या जगातील लकी मुलगी आहे असे वाटत होते पण माझ्यासारख्या अजुनही आहेत म्हणुन आंनंद वाटला .कीप इट ऑन !बाकी तुम्हाला या गोष्टीपासुन परावृत्त करणार्या लोकांच एका कानाने एका आणि दुसर्या कानाने सोडुन द्या.
4 Feb 2011 - 10:33 am | वाहीदा
मेरेदिलमें है जोरु, दिल की धडकन में जोरु,
मेरी आंखोंमें जोरु, मेरे सांसोंमें जोरु ...
(इति - नरेश ;-) हं घे रे बाबा )
बहिणींसाठी लवकर उठून कधी पराठे केलेले आठवतात का ??
बहिणींसाठी असे गुलाम नवरे शोधले का ?
व्वा ! व्वा ! असेच नेहमी जोरु का गुलाम बनून रहा ...(जशी मी माझ्या मावस भावाला चिढवते तशी तुला ही हेच चिढवेन ) तु तो जोरुका गुलाम बनके रहेगा !!
बाकी पराठ्याची पाकृ मस्तच हां ;-)
4 Feb 2011 - 8:07 am | llपुण्याचे पेशवेll
हे देसी घी काय अस्तंय?
4 Feb 2011 - 9:59 am | मनराव
नरु भाऊ कडचा पेशल पदार्थ असेल........
4 Feb 2011 - 10:09 am | llपुण्याचे पेशवेll
खी: खी: खी:
4 Feb 2011 - 10:17 am | टारझन
पण "देसी" हा शब्द तर हिणवण्याच्या दृष्टीणे वापरतात असे गुल्टीमहाचर्चेत वाचलं होतं. .. णकु आपल्या पत्निस हिणवतात ? हाय अल्ला :)
4 Feb 2011 - 10:56 am | प्यारे१
लाहौलविलाकुवत....
आमा मियाँ कैसी बाता कर्ते ।
सूरज अपनी रोशनी भूले, हवाँ बहना , णकु अपनी पत्नी को हिणवें...???
नामुमकिन।
4 Feb 2011 - 7:19 pm | विजुभाऊ
हे देसी घी काय अस्तंय?
हो ना. बरोबर आहे.... नुसते "देशी " असते तर चट्टकन कळाले असते.
4 Feb 2011 - 12:43 pm | रमताराम
आणि सक्काळी सक्काळी येवढ्या धडपडीनंतर 'मीठ जास्त झालेय', 'किती तिखट केलेत', 'कांदा नीट चिरला नव्हतास', 'कित्ती जाड केलेस पराठे, मधे नीट शिजले सुद्धा नाहीयेत', 'तुला स्वैपाकघरात कडमडायला कोणी सांगितलं होतं',. 'आता हा सगळा राडा कोण आवरणार' वगैरे उत्साहवर्धक प्रशस्तीपत्रके संपादन करावीत.
(अननुभवी, तटस्थ निरीक्षक) रमताराम