पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे.
______
काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे.
पण झाले भलतेच. या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. इतर शाळांत जास्त मोठे चाकू सापडलेले आहेत.
यावर पालकांना हसावे की रडावे तेच समजेना. हे मुख्याध्यापक घाबरवत आहेत की प्रोत्साहन देत आहेत तेच कळत नव्हते.
अमेरिकेत प्रायव्हेट शाळा अतोनात महाग आहेत. पब्लिक शाळांमध्ये ह्या असल्या समस्या आहेत. प्रायव्हेट शाळांत ह्या समस्या नाहीतच याची शाश्वती नाही पण तेथे सरासरी कमी मुलांमागे एक शिक्षक, वैयक्तिक लक्ष, शिस्त आदि प्लस पॉईंटस आहेत.
काळजीने खूप घोर लागला आहे.
प्रतिक्रिया
13 Dec 2010 - 7:20 pm | टारझन
मला स्पॉण्सर करणार असाल तर बॉडी गार्ड म्हणुन येऊ शकेन :)
-( पार्टटाईम बाउंसर) माईक टारझन
लग्न व पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
13 Dec 2010 - 7:21 pm | यशोधरा
=)) महान आहे उपाय योजना!
13 Dec 2010 - 7:25 pm | पुष्करिणी
उपाययोजना सहीच :)
बाकी लग्नात कशाला लागतात बॉडीगार्ड्स आणि बाउंसर्स?
13 Dec 2010 - 7:33 pm | असुर
>>> बाकी लग्नात कशाला लागतात बॉडीगार्ड्स आणि बाउंसर्स? <<<
'दिल चाहता है' पाहील्यापासून अनेक जणांना आकाश बनायची खोड असते. आणि पृथ्विराज चौहान - संयोगिता ष्टॉरी अजून जुनी झाली नसल्याने लग्नसमारंभातदेखील माईक टारझनना 'बिल'वणे असते!!!
--असुर
13 Dec 2010 - 7:40 pm | स्वानन्द
ह्याला तिकडे बोलावून पोसण्याचा खर्च आणि खाजगी शाळेचा खर्च यांची तुलना करा आणि स्वस्त पर्याय निवडा :)
13 Dec 2010 - 7:33 pm | गणेशा
असे तिकडे असते हे पहिल्यांदाच कळाले आहे मला.
आता पर्यंत वेगळीच आणि छान माहीती मिळाली आहे.
आणि ज्याचा ज्यात इंट्रेस्ट त्यात त्याला शिकता येते .. सगळ्या सोयी .. सुविधा आणि शिस्त खुप असते असेच ऐकले होते..
या सगळ्या गोष्टींना छेद बसला आहे.--
अवांतर :
महाराष्ट्रात येण्याचा विचार आहे का ? (उत्तराची अपेक्षा नाही , पण आपुलकीने वाटले ,असे असेन तर इकडेच का नको ?या पेक्षा सरस्वी चांगले शिक्षण मिळेल )
13 Dec 2010 - 7:40 pm | यकु
अहो शुचिताई, मुख्याध्यापकांनी श्रोत्यांना हसवून इंप्रेस करण्यासाठी हा ज्योक मारला असेल - पण तो फाऊल झाला.
काळजी करू नका.
13 Dec 2010 - 7:59 pm | निनाद मुक्काम प...
खरी समस्या ड्रग्स अमली पदार्थ ह्यांची असते. बाकी मुलीना मुलींपासून व मुलांना मुलांपासून सांभाळून राहा असे सांगयचे दिवस आहेत .(हेच सांगण्याचे दिवस बाकी त्यांच्या मोठेपणी आपण आलीय भोग व्हावे सादर शिवाय गत्यंतर नाही .
13 Dec 2010 - 8:20 pm | शुचि
प्रकाटाआ
13 Dec 2010 - 8:26 pm | मराठे
चाकू संदर्भात एक घटना इथे मिशिगनच्या शाळेत नुकतीच घडली. एका सिख विद्यार्थ्याकडे कृपाण असल्याचं एका अमेरिकन मुलाला कळलं व त्याबद्धल त्याने घरी सांगितलं. त्याच्या आईने याबाबत शाळेत तक्रार केली. (हे प्रकरण मिडल स्कूल म्हणजे इयत्ता ५ ते ८ मधिल आहे). त्या शिख कुटूंबियांनी सांगितलं की हे कृपाण अगदी लहान आहे. ज्या बाईने तक्रार केली तिने मुलाखतीत सांगितलं की, मी असं म्हणत नाही की हा मुलगा इतरांना त्रास देइल. पण त्याच्याकडचा चाकू कोणितरी घेउ शकतो व त्याचे दु:परिणाम होउ शकतात. तसेच, असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही की शिख मुलांना राग येत नाही. अशा वेळी त्या मुलाच्या हाती चाकू असणं हे निश्चितच सुरक्षित नाही. अशा वेळी कोणाचं बरोबर आणि कोणाचं चूक हे सांगणं तसं अवघड आहे, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत.
13 Dec 2010 - 8:33 pm | शुचि
धन्यवाद मराठे साहेब. चांगली घटना सांगीतलीत. मला वाटतं "झिरो टोलरन्स" नियम लागू होतो सुरे /चाकू वगैरे शाळेत आणण्याच्या बाबतीत.
कारण धारदार वस्तू कितीही लहान असो , डोळा आदि नाजूक अवयवांना गंभीर दुखापत होऊ शकते.
13 Dec 2010 - 8:56 pm | शुचि
आमच्या डेलावेअर (ख्रिश्चिआना डिस्ट्रीक्ट) मध्ये एका मुलाला शिक्षा म्हणून ४५ दिवस "रिफॉर्म" स्कूलमध्ये घातलं का तर त्याने - काटा चमचा आणि सुरी (नाइफ आणि फोर्क) आणला शाळेत म्हणून.
http://www.cbsnews.com/stories/2009/10/12/national/main5378839.shtml
_____
पण असे नियम बनविण्यामागे कारण व्हर्जिनिया टेक मधला प्रकार वगैरे. म्हणजे जेव्हा होतात तेव्हा भयानक प्रकार होतात.
13 Dec 2010 - 9:14 pm | रेवती
काळजी करू नकोस असं सांगण्यानं उपयोग होत नाही म्हणून सांगत नाही शुचितै.:)
सुदैवाने आमच्या मुलाच्या शाळेत असं अजूनतरी झालेलं नाही पण बुलींग थांबवण्यासाठी शाळेचे बरेच प्रय्त्न चालू आहेत.
या घटना थांबाव्यात म्हणून शाळेत मुलांसाठी मुख्याध्यापिकाबाईंनी उदाहरण म्हणून रेस्टरूममधील मारामारी (सौम्य स्वरूपाची) हे उदाहरण दिले आणि अनेक दिवस आमचा मुलगा शाळेतील रेस्टरूम वापरायला घाबरत होता. रोज थोडे थोडे समजावल्यावर आता जातो. हा अनेक दिवस शाळेत 'शू' करायला जात नव्हता म्हणूनही काळजी वाटत होती.
आमच्या मुलाला खेळताना गंमत म्हणून उलटे (पाठमोरे)चालत जाण्याची खोड आहे. तश्यात तो एका मोठ्या (अंगाने व ग्रेडने) असलेल्या मुलाच्या अंगावर पडला आणि त्यानी याच्या सगळ्या खेळातल्या वस्तू ट्रॅश केल्या आणि धक्काबुक्की केली. हाताला बँडेड लावून घरी आला होता. वेगवेगळ्याप्रकारे विचारल्यावर त्याने मारले म्हणून मीही मारले म्हणाला. शाळेत शिक्षिकेला आणि नर्सला सगळे सांगून आला होता. शेवटी 'काळजी करणे' व वेगवेगळ्याप्रकारे समजावणे, विचारत राहणे एवढे मात्र मी नियमाने करते. ;)
13 Dec 2010 - 9:52 pm | गणपा
>>त्याने मारले म्हणून मीही मारले म्हणाला.
हे ब्येष्ट केले लेकाने.
अरे गांधीजींच्या देशातला झाला म्हणुन काय झाल? नाठाळाच्या माथी हाणु काठी अस संतांनीच सांगुन ठेवलय. :)
(तुमच्या लेकाने धक्का लागल्यावर आधी सॉरी म्हटल असेलच अस गृहित धरलय.)
13 Dec 2010 - 10:02 pm | रेवती
हो, मुलाने सॉरी म्हटलं आणि उलटा चालत आल्याने हे घडलं असं सांगितलं.
वाईटातून चांगली गोष्ट ही कि मी शंभरदा सांगून त्याने उलटे चालत जाणे थांबवले नव्हते ते आता थांबले.;)
13 Dec 2010 - 9:15 pm | नितिन थत्ते
आमच्या वेळच्या भारतातल्या शाळा चांगल्या होत्या. फक्त अकरावीतलीच मुलं चेन, सळी वगैरेंनी मारामार्या करायची. शिवाय आता अकरावीच नसल्याने प्रॉब्लेम सॉल्व्हच झाला असावा.
13 Dec 2010 - 9:59 pm | अडगळ
आमच्या वेळेला मास्तर लोकच हत्यारं घेऊन यायची . त्यामुळे आमचा बहुतांश वेळ आपापसात हल्ले करण्यापेक्षा मास्तरांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्यात जायचा. एका मास्तरांच्या सायकलच्या शीटखालील नळीत गुप्ती आहे अशी अफवा होती.
14 Dec 2010 - 12:39 am | Nile
आम्ही एनसीसीत असताना सीएचएमच्या केनमध्ये गुप्ती असायची ब्वॉ. मुठी वगैरे तर जवळजवळ सगळेच घेउन यायचे शाळेत. रामपुरी वगैरेही कॉमन होते. पण एकदा एकाने मस्त कोरलेला नेपाळी का कुठलातरी चाकु आणला होता तो आपल्याला जाम आवडला होता ब्वॉ. सगळ्यात धमाल म्हणजे ११वी एका पंजाबी मित्राचं लफडं झालं होतं, तेव्हा लेकाचा २ आठवडे तलवार घेउन यायचा शाळेत.
(गुर्जी ऐकता आहात ना?) गेले ते दिन गेले...
13 Dec 2010 - 9:23 pm | प्राजु
वरचे प्रतिसाद वाचले..
हा एक खरंच अतिशय काळजीस्पद प्रकार आहे.
मुलांना वरचेवर प्रश्न विचारून, त्यांच्या कलाने हळूहळू माहिती मिळवायला हवी. शाळेत कोण कसे वागते आहे.. काय करते आहे .. सगळ्या गोष्टि माहिती असाव्यात. कारण शाळा कोणतीही असो.. पब्लिक वा सरकारी.. सगळीकडे हे प्रकार चालतातच. त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त बोलते करणे .. हेच महत्वाचे आहे.
स्वतःचे संरक्षण करणे मुलांना शिकवायला हवे..
13 Dec 2010 - 9:48 pm | गणपा
शुचीतै 'तुम्हाला अमेरीका कशी वाटते?' यात हा मुद्दा म्यॅपायचा राहिला की काय :?
14 Dec 2010 - 1:58 am | यकु
:bigsmile:
13 Dec 2010 - 10:05 pm | रन्गराव
काय ते चाकू आणि कृपाण घेवून बसलाय! लहानपणी शाळेत दगड आणि कर्कट्क ह्यांचा प्रसंगी हत्यार म्हणून उपयोग व्हायचा! अमेरिकेतली मुलं फारच ढ आहेत बा ;)
13 Dec 2010 - 11:47 pm | शिल्पा ब
काळजी करण्यासारखे आहे खरे....आता नुसतीच मारामारी झाली तर दोन घ्यायचे दोन द्यायचे हे ठीक पण एखाद्याने असं काही हत्यार काढलं तर काय करणार? आणि मुख्य म्हणजे गरज काय? आता माझी लेक K G त जाईल...आणि मग हळूहळू शाळा सुरु....माझ्यामते आतापासूनच शाळेत अशा वस्तू वापरू नये...डेंजरस असतं असं शिकवलं तर काही फरक पडेल...इथे आम्ही भारतीय आणि एशिअन बहुल ठिकाणी राहतोय त्यामुळे कदाचित असे प्रकार कमी असतील....तरी मी लेकीची शाळा सुरु झाली कि त्यांना याबद्दल सांगेनच....
बाकी बुलिंग काय प्रकार असतो नेमका? रॅगिंग सारखे का अजून काही...म्हणजे लेकीला कसं तयार करायचं अशा गोष्टींशी टक्कर घ्यायला?
पण बहुतेक तिला आता सांगावे लागेल कि आपण स्वतः भांडण, मारामारी करायची नाही पण जर कोणी आपल्याला त्रास दिलाच तर आपणही दोन ठेऊन द्यायचे...रडत घरी यायचं नाही..
आता ती अजून खूपच लहान आहे त्यामुळे कोणी त्रास दिला तर त्या मुलांना सांगायचं कि "this is not nice " अन टीचरला सांगायचं आणि बाहेर असू तर आई- बाबाला सांगायचं म्हणून..
14 Dec 2010 - 1:53 am | यकु
अरारा... किती ताप हो एक लेकरू शाळात घालायच म्हंजे...
आम्ही पन मारामारी करायचो.. पण सुरे, चम्चे घेऊन नाय जायचो बुवा कधी..
मला तर हे सगळं वाचून भीती वाटायलीय... पोरं शाळा शिकणार की मारीमारी कशी करायची/कशी टाळायची ते लक्षात घेणार?
परिस्थिती एवढी भीतीदायी असेल तर परत या आपल्या देशात.. कशाला उगं जीव धोक्यात घालता लेकरांचा?
14 Dec 2010 - 2:20 am | मराठे
मला वाटतं इथे शाळा अमेरिकेत आहे की भारतात हा मुद्दा गैरलागू आहे. तुम्हाला आपल्या देशात असे प्रकार होत नाहित असं वाटतं का? आपल्या पोराच्या वर्गातील शाळेतील सगळी पोरं सुसंस्करीत आहेत असं खरंच आपण म्हणू शकतो का?
14 Dec 2010 - 2:22 am | Nile
तुम्हाला सुसंकरीत म्हणायचे आहे का? ;-)
14 Dec 2010 - 2:36 am | शुचि
माझा मुद्दा आहे की आता निर्णय घेतला आहे ना इथे (अमेरीकेत) यायचा मग तो निभवायचा. शेवटी काय तर नाण्याला २ बाजू असतात एवढच यातून सिद्ध होतं. इथेही सगळं आलबेल (हंकीडोरी) नाहीये.
इथल्या लोकांनी कसा या समस्येचा सामना केला ते रेवती, शिल्पा, प्राजु, मराठे यांच्या काही मुद्द्यातून लक्षात आलं ..... मनाला जरा दिलासा मिळाला.
14 Dec 2010 - 4:38 am | रेवती
आपल्याकडेही परिस्थिती वेगळी नाहीये यशवंतराव!
उलट यावर फारशी अॅक्शन घेतली जात नाही याचं वाईट वाटतं.
फारच भितीदायक वाटलं तर मी इथे निदान हा मुद्दा लावून धरू शकते याची खात्री आहे.
आईवडीलांच्या ताणाच्या नोकर्या, काहींच्या घरचे घटस्फोटाचे प्रकरण यांचा माझ्या मैत्रिणीच्या मुलीला त्रास झाला होता.
ते लक्षात आल्यावर शाळेने लगेच त्या मुलावर अॅक्शन घेतली. मुलीच्या मनातील भिती जावी म्हणूनही शाळेने प्रयत्न केले.
त्या मुलाच्या मनावर आलेला ताण जावा म्हणूनही ट्रीटमेंट सुरु झाली. मागल्या वर्षी एका अमेरिकन मुलाने माझ्या मुलाला व दुसर्या एका भारतीय मुलाला कृष्णवर्णीय असल्याचे एकदा म्हटल्याबरोबर त्यावर उपाय सुरु झाले. आपल्याकडे यावर "जाऊ द्या ना राव!" असा प्रकार असतो.
14 Dec 2010 - 4:28 am | रेवती
बाकी बुलिंग काय प्रकार असतो नेमका? रॅगिंग सारखे का अजून काही
साधारण तसच पण सौम्य स्वरूपाचं. मोठी मुलं लहानांवर दादागिरी टाइप करतात.;)
यात माझ्यामुलाशी जे झालं ते फारच साधं होतं. मोठ्या मुलानं त्याचे आणखी दोन मित्र आणून याला गाठलं वगैरे पण शाळेत याची कल्पना असल्यानं अजूनतरी मधल्यासुट्टीत काम करणार्या लोकांचं लक्ष असतं या प्रकारांवर. त्यातून माझा मुलगाही दंगेखोर आहे म्हणून त्यानं आधी खरं सांगितलं नाही (आणि खोटंही बोलला नाही). बर्याचदा विचारल्यावर मनातलं बोलला आणि हाताला कसं लागलं हे सांगितलं. या गोष्टीचा उल्लेख मी पालक शिक्षक मिटींगच्यावेळी करणार आहे.
14 Dec 2010 - 4:39 am | शिल्पा ब
थोडक्यात झंगडपक्कड ;)
मी बरेचदा लेकीशी बोलते...कोणी समजा आपल्यावर ओरडलं, किंवा कोणी ढकललं किंवा अजून काही तर लगेच येऊन टीचरला नाहीतर आई- बाबाला सांगायचं म्हणून...तशी ती पण काही कमी नाही म्हणा :)
14 Dec 2010 - 5:39 am | निनाद मुक्काम प...
आपल्याकडे सुध्धा शाळामध्ये अश्या गोष्टी व्हायच्या
आमच्या शाळेत कै एका भाईची भाचा होता त्याची बुलिंग चालायची शाळेत
आम्ही पडलो मध्यमवर्गीय पोर आपण बरे नि आपले ८०%
माझ्या मते लहान मुलांना रामायण व महाभारताच्या शिवाजी महाराज्याच्या गोष्टी सांगाव्यात .अन्याय सहन करू नये हे शिकवावे पण प्रत्येकवेळी मेंध्यासारखी धडक देऊ नये हे पण शिकवावे ,
सगळ्यात महत्वाचे शाळेत ग्रुप करून राहिला तर शक्यतो बुलिंग प्रकार होत नाही .
अवांतर र बुलिंग कोणत्या ठरला जाऊ शकते. व त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे अमेरिकन सत्य घटनेवर आधारित बुली ह्या सिनेमातून कळते .
सदर सिनेमा मेगा विडीयोवर उपलब्ध आहे .(लहान मुलांना दाखवू नये .)
http://www.imdb.com/title/tt0242193/
14 Dec 2010 - 5:47 am | शुचि
हा मस्तच उपाय सांगीतलात की गटामध्ये सामील राहीलं तर बुलींग होत नाही. हे नाही माझ्या लक्षात आलं. एकलकोंडं शक्यतो असूच नये. हां "पर्सनल स्पेस" असावी पण माणसाने सोशल देखील असावं.
14 Dec 2010 - 6:03 am | आमोद शिंदे
जीटॉकला स्टॅटस म्हणून लावण्यासारखे वाक्य!
14 Dec 2010 - 7:20 am | शिल्पा ब
असे प्रकार कोणत्याही ठरला जाऊ शकतात...मध्ये ७-८ मुलींनी मिळून एका मुलीला मारले, मारले म्हणजे चांगलेच मारले आणि त्याचा video सुद्धा काढला...त्यांना शिक्षा व्हायच्या ऐवजी डॉ. फिल च्या staff ने वाचवलं...बातम्यात किती दिवस हा विषय होता.
बाकी घाबरून राहूच नये...असे लोक घाबरट, प्रतिकार न करू शकणारे किंवा टोळीने असले उद्योग करतात...जशास तसे भरणार असं दिसलं कि मग फारसा त्रास होत नाही हा अनुभव आहे.
बाकी हा पिच्चर काही मी पाहणार नाही...उगाच नाही नाही ते विचार मनात येतात मग.
14 Dec 2010 - 9:23 am | निनाद मुक्काम प...
ह्या सिनेमाचा मतितार्थ तुमच्या लक्षात आला आहे त्यामुळे तो पाहण्याची गरज नाही ,
हे एका अर्थी बरोबर आहे डॉ फिल चा महिमा काय वर्णावा
युरोपात आखात त्यांचे दर्शन होतच असते आता फक्त भारत बाकी आहे ( माझ्या मते )
14 Dec 2010 - 1:21 pm | आत्मशून्य
आपण भारतीय तीकडे जातो आणी शेपूट घालून जगतो (म्हणे व्हाइट कॉलर). जणू काही अमेरिका भीक म्हणून मीळाली आहे. आरे आपण आपल्या कर्तूत्वावर सर्व मीळवतो मग असा Attitude का ? ते चीनी, इटालीयन , आयरीश लोक बघा जातात तेथे ताठ मान अस्ते कोन हीम्मत नाय करत उगीच हात लावय्ची.. एक धाक असला पाहीजे आपला .... साला एक भार्तीय डॉन्/भाइ ऑस्ट्रेलीयात नीपजला असता तर कोनाची हिम्मत होती हल्ले कराय्ची ? विशेतः गॉड्फादर वाच्ल्यावर/बघीतल्यावर मला हे जास्त जानवले की इटालीयन तेथे नीर्वासीत म्हणून गेले आणी आज त्यांची ताकत बघा ..आणी आपण भारतीय ? व्हाइट कॉलर :(
आणी शूची ताई एव्डीच काळजी आहे तर मूलीला एक बंदूक घेउन द्या, म्हणजे चाकू सूरीची भीती नाय वाटनार. आणी ती लपवू नको असे तीला सांगा म्हणजे बंदूक सापडली असे म्हणायचा प्रसंगच येणार नाय मूख्यध्यापकांवर.
14 Dec 2010 - 9:40 am | वेताळ
तरी देखिल तुम्ही संयमाने व समाधीतुन ह्यावर विजय मिळवाल ह्याची मला खात्री आहे.
14 Dec 2010 - 3:03 pm | आत्मशून्य
धमाल वाक्य........
14 Dec 2010 - 10:42 am | बद्दु
अहो, मुलं आपापल्या परीने प्रत्येक प्रश्नावर तोडगा काढत असतात. आपण सर्व सुद्धा लहान असतांना असेच करायचो..तेंव्हा एकदम घाबरुन न जाता किंवा आपल्या मुलाला सुद्धा न घाबरवता य विषयी तो काय ठरवितो ते सुद्धा सहजरित्या त्याच्याकडुन काढुन घ्या...कदाचित तो/ती असे प्रसंग विसरला पण असेल ..विनाकारण त्या विषयावर चिंतींत होउन स्वत: ला आणि घरच्यांना ( म्हणजे नवर्याला) मानसिक ताण देणे योग्य नव्हे. हे आणि असे विषय इतरत्र बोलतांना सुद्धा त्यातुन निगेटिव्ह संदेश जाउ नये असा प्रयत्न करावा.. सर्वसामान्य जनता साहसी नसते त्यातुन असे प्रसंग आले की त्यांच्या काळजीत आणखी भर पडते म्हणुन असे प्रसंग आपण कसे व्यवस्थीत रित्या निभावुन नेले याची चर्चा केल्यास उत्तम्...असो.
14 Dec 2010 - 11:03 am | परिकथेतील राजकुमार
शुचि ह्यांच्यासाठी एक 'अमेरिका आणि समस्या' असा वेगळा विभाग मिपावर उघडून द्यावा अशी मी मागणी करत आहे.
बाकी आमच्याकडे शाळात शिक्षकच बंदुका आणि सुरे घेउन येतात, बायांची छेड काढतात, दारु पिउन वर्गात मारामार्या करतात, अल्पवयीन मुलींवर..... त्यामानाने तुमची अमेरिका फारच मागासलेली वाटते.
14 Dec 2010 - 3:03 pm | समीरसूर
शुचिजी,
काळजी करू नका; सगळे व्यवस्थित होईल. तुम्ही फक्त एकदा नीट समजावून सांगा तुमच्या लेकीला की कुठल्या गोष्टींपासून लांब रहायचे आणि कसे रहायचे. तुमची लेक नीट समजेल आणि व्यवस्थित काळजी घेईल. राहता राहिला प्रश्न दुसर्यांमुळे होऊ शकणार्या त्रासाबद्दलच्या काळजीचा तर त्याची काळजी तुम्ही करून काहीच उपयोग नाही. ती काळजी तुमची लेक व्यवस्थित घेईल. किरकोळ भांडणं, मारामार्या, रुसवे-फुगवे इत्यादींकडे सरळ दुर्लक्ष करा. त्यातून मुले बरंच काही मोलाचं आणि शाळेत न शिकवलं जाणारं पण आयुष्यात पावलोपावली उपयुक्त ठरणारं शिकत असतात. अनुभवासारखा शिक्षक नाही. हो, थोडं लक्ष ठेवणं मात्र आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीत सक्रीय सहभाग घेतलाच पाहिजे असं नाही पण मुलांच्या बारीक-सारीक हालचालींवर लांबून ढोबळ लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वागणूकीतले बदल, बोलण्याच्या पद्धतीतले बदल, काही आगळ्या घटना इत्यादी गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास आणि वेळच्यावेळी मुलीशी मनमोकळेपणे बोलल्यास काहीच प्रॉब्लेम होणार नाही याची खात्री बाळगा. नथिंग टू वरी, जस्ट चिल!!!
आम्ही शाळेत असतांना मातीत लोळून लोळून खेळायचो आणि तोंड फुटेस्तोवर मारामारी करायचो. तशाच अवतारात घरी आल्यावर आम्हाला "कुणी मारलं का?" असं म्हणून कवटाळणारं कुणीच नसायचं. आई-बाबा सरळ दुर्लक्ष करायचे. जोपर्यंत गंभीर असं काही होत नाही तोपर्यंत मुलांच्या भानगडीत लक्ष घालायचं नाही हा आई-बाबांचा खाक्या होता. एकदा दहावीत असतांना मी एका टग्या पोराला धू-धू धुतला होता; अगदी बाकड्यांच्या मध्ये पाडून-बिडून धुतला होता....आठवून आता हसू येते. मुख्याध्यापकांनी बोलावून कानउघाडणी केली होती आणि घरी देखील कळले होते; पण आमच्या घरी नो प्रॉब्लेम!
कॉलेजला असतांना वसतिगृहावर जबरदस्तीने गणपतीची वर्गणी गोळा करणार्या एका स्थानिक मुलासोबत माझी जबर मारामारी झाली होती. पण आम्ही आमच्या लेव्हलवर ती सोडविली. असे बरेच किस्से घडले. मार खाणे आणि मारणे या विद्यार्थीदशेतल्या दोन आवश्यक आणि उपयुक्त घटना असतात. बाकी ड्रग्ज वगैरेचा काही अनुभव नाही. बिडी-सिगारेट वगैरे आमच्या इथे शाळापातळीवर इतकं प्रचलित नव्हतं. मुलगा-मुलगी या कोनातूनचा धोका तेव्हाही होता आणि आता ही आहे. पण ड्रग्ज, मुलगा-मुलगी समस्या तशा सहज टाळता येण्यासारख्या असतात. थोडी जपणूक, थोडा संवाद, भल्या-बुर्याची समज, उदाहरणातून समजावणे, आपला आदर्श नीट उभा करणे इत्यादी काळजी घेतल्यास नो प्रॉब्लेम!
तेव्हा चिंता सोडा आणि तुमच्या लेकीला शाळा आणि ते निरागस दिवस 'एंजॉय' करू द्या. बघा, तुमच्या सगळ्या चिंता कापरागत उडून जातील...
--समीर
15 Dec 2010 - 12:58 am | इंटरनेटस्नेही
हेच म्हणतो.. मी देखील शाळेत असताना सुरवातीला थोडा घाबरट होतो.. पण एकदा सातवीला असताना दहावीतल्या डॉनला लै चोपला होता, सकाळी बाथरुमध्ये आणि आणि शाळा सुटल्यावर ग्राऊंड मध्ये, त्या दिवसापासुन जो लाईनवर आला की विचारता सोय नाही.
तात्पर्य: तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवुन न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे.
हा चित्रपट नक्की बघा : लॉ अबायडिंग सीटीझन.
-
इंटेश,
मुंबई प्रदेश अध्यक्ष,
मिसळपाव दुर्लक्षित पँथर.
14 Dec 2010 - 6:49 pm | शुचि
वेताळ सोडून अन्य सर्वांचे आभार. ;)