रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन ..
त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते.
परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे ..
असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते.
-------------------------------------
मिसळ :
१. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची ..
२. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही)
३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ...
जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ.
बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ...
वडापाव :
१. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो.
तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.;
२. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये .
३. कुंजविहार, ठाणे पश्चिम.
पिठल भाकरी /शेव भाजी
१. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे
२. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे.
चहा :
१. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण)
२. त्रिवेणी : जंगली महाराज रोड.
३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला).
४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे)
तवा सुरमई:
१. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे.
( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन.
चिकन/चिकन थाली
१. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई.
२. गोमंतक , दादर , मुंबई.
३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम)
- बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी
(नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )
प्रतिक्रिया
15 Dec 2010 - 4:23 am | सेरेपी
अगदी...जुने दिवस आठवले...मसाला पाव आणि फ्रुट बियर! :-)
15 Dec 2010 - 5:22 am | बेसनलाडू
वरील प्रदीप यांच्या सुधारणा बरोबरच आहेत.
रुईया नाक्याला वळसा घालून मागच्या अंगाला गेले की शेरीज फास्ट फूड बार, चायनामन इन्डो-चायनीज रेस्तराँ आणि त्यांच्या बरोबर समोरच फूटपाथवरचा पाणीपुरीवाला, यांच्याकडे चक्कर टाकायला विसरू नये! शेरीज आणि शिवाजी पार्कचे टिब्ज यांच्याकडे मिळणारा फ्रँकी पदार्थ ही दोन ठिकाणे सोडून जगात इतरत्र कुठेही तितका 'बेस्ट' मिळत नाही, असे माझे मत! :)
(दादरकर)बेसनलाडू
सेरेपी यांनी काढलेल्या मसाला पाव आणि फ्रूट बिअर च्या आठवणीने डोळे पाणावले!
(स्मरणाशील)बेसनलाडू
15 Dec 2010 - 8:36 am | प्रदीप
बरोबर आहेत म्हणजे? असणारच-- तिथे, त्या नाक्यावर कॉलेजातील ६ वर्षे फुल्ल्टाईम व नंतर अनेक पार्टटाईम घालवलीयत ना! :)
शेरीज आणी चायनीज वगैरे माझ्या वेळच्या नंतर आले, तेव्हा ते नव्हते.
अगदी पूर्वी (म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा) डी. पी. ही नव्हतेच. तिथे 'कॅफे राम' ह्या धेडगुजरी नावाचा इराणी होता. मी कॉलेजात जायच्या एखाद-दोन वर्षे अगोदर तो गेला व डी. पी. आले. खरे तर त्याचे 'डी. पी.' हे संक्षिप्तकरण आमच्या बॅचने केले असावे.
त्या परिसरात अजून एक इराणी होता तो, ए. वन. ट्रेडर्सच्या शेजारी. तसेच पोदारच्या शेजारील गल्लीत एक इराणी (कॅफे गुलशन?) अजून टिकून आहे.
दादर स्टेशन (पूर्व) च्या बाहेरील इराणी आहे का गेला?
टिब्सच्या फ्रँकीची आठवण खासच. माझ्य आठवणीप्रमाणे त्यांचे सर्वात पहिले आउटलेट चर्चगेट स्टेशनात आले. ब्रेबॉर्नवर मॅचला जातांना अथवा ब्रिटीश काउन्सिलला जातांना मधे हे एक मोठे व महत्वाचे आकर्षण असे. नंतर शिवाजी पार्कला फ्रॅन्कीचे दुकन आले, ते अजूनही आहे का?
शिवाजी पार्क जिमखान्याच्या कँटिनमधे वडा उत्कृष्ट मिळे. तसेच केरळ समाजला लागूनही एक वडापाव वाला तेव्हा असे.
अजून एका इराण्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. तो म्हणजे शिवाजी पार्काच्य स्विमींग पूलला लागून होता. तेव्हा (७०-७३ सालात) त्याच्याकडे वडा छान मिळे. पण त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्याकडे असलेला ज्यूक बॉक्स, आणि जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड्सचा त्याचा ग्रेट संग्रह. त्यासाठी तिथे रोज संध्याकाळी जोरदार गर्दी असे. एक टेबल पकडून बसावे, एखादा वडा किंवा चहा घ्यावा आणि एक-सो-एक जुनी गाणी ऐकावीत. त्य गर्दीत शिरीष कणेकरांनाही अनेकदा पाहिल्याचे आठवते.
16 Dec 2010 - 12:18 am | बेसनलाडू
गुलशन अजूनही आहे, असे स्मरते.
दादर (पूर्व) स्टेशनबाहेरचा स्वामीनारायण मंदिरासमोरचा इराणी जाऊन तिकडे 'शुभम' नावाचे उपाहारगृह झाले आहे. बकवास आहे; पण स्टेशनच्या बाहेरच असल्याने चहाकॉफीसाठी चटकन आत शिरणार्यांसाठी किंवा त्यातल्या त्यात स्वस्तातली राईस प्लेट खायची असणार्यांसाठी बरे म्हटले पाहिजे.
स्टेशनकडून उजव्या हाताला हिंदमाताच्या दिशेने चालल्यावर कैलास लस्सीवाला!! त्याच्या समोरच 'शापूर' नावाचा दुसरा इराणी होता, तो अजूनही टिकून आहे. पण आता तो फक्त नावालाच इराणी आहे आणि त्याच्याकडे जरा जास्तच पंजाबी पदार्थांची रेलचेल आहे. कैलासची लस्सी मात्र अजूनही प्रसिद्ध! परवडत असेल तर सरळ महाराजा लस्सी मागवावी :) ९१-९२ च्या दंगलीत काही नराधमांनी 'कैलास'ला आग लावून राख केले होते; पण परत उभे राहिले. शापूरचीही मोडतोड केली होती, पण जाळपोळ नाही.
शिवाजी पार्कचे टिब्ज अजूनही आहे; आणि अजूनही प्रचंड गर्दी खेचत असते.
(दादरकर)बेसनलाडू
15 Dec 2010 - 8:37 am | प्रदीप
प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने काढून टाकला आहे.
15 Dec 2010 - 10:14 pm | सेरेपी
शेरीज मधे झुरळांचा मुक्त संचार पाहील्यानंतर तिथल्या फ्रँकिज खाववल्या नव्ह्त्या :-(...अर्थात, त्यामुळे आम्ही डि.पीजच्या जमिनीकडे पाहणं बंद करुन टाकलं लग्गेच!
11 Dec 2010 - 3:35 am | नंदन
>>> रेल्वे कँटीन मधील काश्मिरी सोडा हे एक भन्नाट रसायन आहे .(येत्या भारत भेटीत त्याला काश्मिरी का म्हणतात ह्याचा शोध घेईन
--- मणी'ज् आणि काश्मिरी सोडाच्या उल्लेखावरून आठवलं. मणी'ज् च्या शेजारच्या दुकानाता हा 'फॉल्स सोडा' म्हणून बोर्ड पाहिला होता. कुतूहल म्हणून मागवल्यावर ते काला खट्टायुक्त मिश्रण निघाले :)
10 Dec 2010 - 12:06 am | चिंतामणी
निनाद
तुला खाद्य संस्कृतिची फारच आठवण येत आहे असे दिसते.
10 Dec 2010 - 2:22 am | निनाद मुक्काम प...
आज इतके दिवसांनी एरवी गोड लागणारा (म्हणजे गोड मानून घेतलेला )पास्ता आज बेचव वाटला .असे वाटले
ने मजशी ने परत मात्र भूमीला
सागरा प्राण तळमळला (भारतीय खाण्यासाठी )
कुठे सावरकर कुठे आम्ही
आमची झेप उदर भरण नोहे इतकीच
10 Dec 2010 - 12:54 am | ५० फक्त
पुणे,नगर आणि मुंबईच्या बाहेर लोक उपाशी राहतात की काय असं वाटेल वरचे प्रतिसाद पाहुन,म्हणुन हे घ्या.
सोलापुर -
१. लकी चॉकातुन एमएसईबीच्या ऑफिसच्या बाजुने (महिंद्र्करबिल्डींग) नवी पेठेत जाताना पहिल्या उजव्या बोळात पुनम इडली मध्ये इडली / मेदु वडा व चटणी. २. गंगा विहिरीजवळ अण्णाची भजी. ३. साखर पेठ सुत मार्केट जव़ळ बटाटा भजी.
४. पार्क चॉपाटीची डिस्को भजी ५. हरिभाई देवकरण च्या भॅयाची भे़ळ व पाणिपुरी.
६. हुतात्मा बागेच्या गेट्जवळचा चव्हाण कडे बेसन भाजी घातलेली कचोरी व पाव चटणी (बेसन भाजी ही फक्त सोलापुरची पेशलिटि आहे) ७. विजापुर वेशीतला खिमा ( इथे मटण नेउन द्यावे लागते, खिमा करुन मिळतो)
८. किल्यासमोरची सुप्रिया पावभाजी व मस्तानी ९. चाटी गल्लीत काका हलवाई कडे पुरी भाजी व कुंदा
१०. नवी पेठेत भाग्यश्री बटाटेवडा व चिवडा. ११. लांबोटीचा मक्याचा चिवडा , कुंदा , मस्का स्लाईस व चहा
१२ पंढरपुरच्या अकबर टॉकीज शेजारची मस्तानी १३. कोंडीच्या नसले बंधु कडचे पिठलं भाकरीचे जेवण
१४. भिगवण ज्योती मिस़ळ १५. किल्यासमोर सिद्धेश्वरचा चहा १६. जुनी मिल एमएसईबि ऑफिस कँटिन्चा चहा.
१७. भवानी पेठेतिल गुलाब केटि - हा चहाचा प्रकार आहे, ज्याच्या दुधात गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या असतात.
१८. सोलापुर एसटि स्टँड्च्या समोर मिळणारा रु. २ चा चहा व साखर पेठ शॉपिंग सेंटर मधला जनता चहा - हा २००९
पर्यंत रु. १ फक्त प्रति कप होता, पण चव अम्रुततुल्य सारखीच. १९. सोलापुर-उस्मानाबाद बॉर्डरच्या पठाणची पुरी भाजी व चहा. २०. सोलापुर सावरकर मॅदान जव़ळ वसंत पॅलवान कडे आंबा आईस्क्रीम . २१ जोडबसवण्णा चॉकात महेबुब कडे चहा व क्रिमरोल आणि लस्सी - ही खायची असते २२. स्टेशन जव़ळ्चं सुगरण
यापॅकी किमान १०- १२ आयटेम झाल्याखेरीज माझी सोलापुर ट्रिप पुर्ण होतच नाही.
ही साठा उत्तरी कहाणी एकविसा उत्तरी सुफ़ळ क्रमशः
हर्षद.
10 Dec 2010 - 1:00 am | रेवती
किती हो या क्यालरिज.;)
10 Dec 2010 - 1:53 am | योगप्रभू
हर्षद,
बरीच मोठी लिस्ट दिलीस. मस्तच.
मी सोलापुरात सुधा इडलीगृहात जाऊन इडली खाल्ली. इडली-चटणी-सांबार याबरोबर चटकदार, झणझणीत लाल मिरचीच्या बियांची कोरडी चटणी. नंतर ताजे लोणी-साखर लावलेल्या ब्रेड स्लाईस (मस्का-पाव). आत्मा सुखावला.
किल्ल्याच्या समोरचा चहा अफलातून. पण तिथे आम्हाला मारामारी (चहा+कॉफी मिश्रण) घेण्याचा आग्रह झाला. तो प्रकार पण सुंदर. बाकी सुप्रजाची पावभाजी लाजवाब. ज्वारीची पातळ कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी केवळ अप्रतिम.
सोलापूरकर खरंच सुखी आहेत.
10 Dec 2010 - 9:57 am | ५० फक्त
सिद्धेश्वरचा मारामारी पण फार प्रसिद्ध आहे. गुलाब केटी सारखाच मारामारी पण सोलापुरचा पेश्शल आहे. मी सोलापुरात असताना माझं ऑफिस सावरकर मॅदानाच्या जवळ होतं आणि कामासाठि सगळ्या जिल्ह्यात फिरायचो, त्यामुळे त्यावेळी जिभेचे चोचले फार पुरवले आहेत.
हॉटेल ते टप-या कुठेही कुणीही सांगितलं की लगेच ट्राय करायचो. या यादीत अजुन भर घालतो आहे.
हर्षद.
10 Dec 2010 - 12:49 pm | गणेशा
सोलापुरात कधीच आजुन गेलो नाही...
पण सोलापुरच्या खाण्याबद्दल आणि चटणी बद्दल बरेच ऐकुन आहे.
तुम्ही दिल्याने छान वाटले ..
आणि तुम्ही म्हणता तसेच टपरी-पासुन -- हॉटेल पर्यंत मी पण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो..
मज्जा येते ..
10 Dec 2010 - 7:29 pm | धमाल मुलगा
वा वा! एकच नंबर.
आणि भिगवणला मासेही झकास मिळतात. :)
10 Dec 2010 - 9:30 pm | चिंतामणी
मासे कुठे नक्की चांगले मिळतात भिगवणला?
10 Dec 2010 - 9:35 pm | धमाल मुलगा
नाव आठवत नाही आता. माझी माहिती जवळपास ५-६ वर्षांपुर्वीची आहे.
एका सरदारजीचं हॉटेल होतं. पण ब्येस जेवण होतं. जेवणाचा हॉल पहिल्यामजल्यावर होता इतकंच आठवतंय.
अधिक माहितीसाठी: कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल... :D
10 Dec 2010 - 9:15 pm | जयंत कुलकर्णी
मी हजार ठिकाणी खीमा (मटण ) खाल्ला असेल पण सोलापुरच्या कॅफे स्माईल (नक्की नाव आठवत नाही) सारखा खीमा आणि रेशमासारखी मऊ पोळी त्याबरोबर हिरव्या मिरच्या, गार चिरलेला कांदा आणि बीर. हे जेवण मी कधीही विसरू शकत नाही. शेवटी एग पुडींग...
जाऊदेत नको त्या आठवणी.... कारण आता ते जेवण परत कधीच मिळणार नाही. बंद झालं ते हॉटेल.....
10 Dec 2010 - 9:33 pm | धमाल मुलगा
निषेध निषेध निषेध!
आधी एव्हढं रसभरीत वर्णनं करायची आणि शेवटच्या वाक्यात टप्पकन 'बंद झालं ते हाटेल' असं सांगून आमचा पोपट करायचा. :( हे काय बरं न्हवं कुलकर्णीआप्पा :)
9 Apr 2018 - 8:45 pm | राघवेंद्र
हुतात्मा बागेच्या गेट्जवळचा चव्हाण कडे बेसन भाजी घातलेली कचोरी व पाव चटणी (बेसन भाजी ही फक्त सोलापुरची पेशलिटि आहे)
५० फक्त आणि तमाम सोलापूरकर, ही बेसन भाजी कशी बनवायची ? जेंव्हा मिळत होती तेंव्हा पाककृती विचारली नाही आणि आत इथं मिळत नाही पण बनवायची आहे.
10 Dec 2010 - 1:13 am | पक्या
पुण्यात लक्ष्मी रोडवर एल आय सी बिल्डिंग समोर ..हाय फॅशन जवळ..
सिटी ज्वेल म्हणून बिल्डिंग आहे त्यात दुसर्या मजल्यावर 'भगत ताराचंद' नावाचे वेज रेस्टॉरंट आहे. अफलातून राजस्थानी जेवण मिळते.
भरपूर तूप लावलेली पोळी , मस्त गारेगार ताक ह्याबरोबरच खास राजस्थानी पध्दतिने बनवलेल्या भाज्या मिळतात . खूपच चविष्ट जेवण आहे तिथले.
10 Dec 2010 - 12:51 pm | गणेशा
'भगत ताराचंद' हे खुप प्रसिद्ध सिरिज आहे हॉटेलची .
लक्ष्मी रोड ला आहे ते आजच कळाळे धन्यवाद.
12 Dec 2010 - 1:36 pm | पर्नल नेने मराठे
आम्च्या गिर्गावात पण झवेरी बझार मधे आहे ह्याची शाखा...
12 Dec 2010 - 10:11 pm | उपास
चुचुतै,
झवेरी बाजारात मूळ आहे शाखा नाही.. आणि २-३ मूळं आहेत तिथे भगत ताराचंदची :)
25 Feb 2011 - 1:47 pm | वपाडाव
त्यातल्या जी. भगत ताराचंदमध्ये एकदा जेवणाचा योग आला होता. (क्रॉफर्ड मार्केट असं काहीसं स्मरतं.)
प्रचंड फ्यान झालो. चक्क तुपात डुबिवलेल्या चपात्या. आणी ताक(गुज्जु : छांस) शेवटी २ गुलाबजाम.
येक नवंबर जेवण रे बाबा....
लिवता लिवता किबोर्ड ओला झालाय(लाळेने) ! ;-)
फुडच्या ट्रिपला फादर-मदर संगे जायचा विचार आहे.
10 Dec 2010 - 8:25 am | सूर्यपुत्र
इतर ठिकाणच्या चर्चा इथे आणि इथे वाचतां येतील...
10 Dec 2010 - 9:57 am | बट्ट्याबोळ
फिश करी अॅन्ड राइस ... , पुणे, कन्या शाळेच्या शेजारी.
भटांच मास्यांच हॉटेल !!
तिथे सोलकढी, जिर्या-मिर्याची कढी ...
खूप सुंदर.
10 Dec 2010 - 10:05 am | निवेदिता-ताई
शिरवळचा श्रीराम ..वडापाव...खाल्लाय का?????
खुप छान असतो..
आणी आमच्या इथे शशीकाकाचे हॉटेल आहे तिथे पुरी भाजी खासच मिळते.
10 Dec 2010 - 12:56 pm | गणेशा
हो .. छान आहे .. मिसळ पण ठिक ठाक आहे ..
(आता मागच्या रविवारीच नाष्टा केला तेथे.. )
10 Dec 2010 - 10:19 am | नन्दादीप
गोरेगाव वेस्ट ला ठक्कर कडे मस्त आम्लेट मिळते..२-३ आरामात खाल्ली जातात्.
10 Dec 2010 - 11:07 am | नंदन
वा, वा, वा. धागा आणि प्रतिसाद मस्तच. एवीतेवी मुंबईत जायचे वेध लागले म्हणून खादाडीच्या जागांची उजळणी करत होतोच, त्या यादीत आता बर्याच नावांची भर पडली.
पश्चिम रेल्वेवरच्या/जवळच्या खादाडीच्या जागांची यादी करायची झाली तर 'ब्रिटानिया'चा या यादीत अग्रहक्क. धनसाक, बेरी नो पुलाव, पात्रानी मच्छी, कबाब इ. हादडून मग कॅरॅमल कस्टर्ड किंवा पारसी डेरीची कुल्फी खावी. मरिन लाईन्सच्या गेलॉर्ड बेकरीचे आणि चर्चगेटच्या सम्राट रेस्तराँच्या 210c केक-शॉपचे केक्स आणि पेस्ट्रीजही उत्तम. पारंपरिक मिठायांसाठी नाना चौकातलं आदर्श बेस्ट. पलीकडे स्टेशनजवळचं मेरवान इराणी हाटिलही मस्तच. ब्रून-मस्का, आम्लेट, चहा असा टिपिकल इराणी बेत आहेच, पण तिथले मावा केक खाल्ल्याशिवाय त्या दुकान-कम-हाटिलाच्या पायर्या उतरू नयेत. 'समर्थ'बद्दल पुन्हा लिहित नाही :). विठ्ठल पावभाजीचा उल्लेख आला आहेच, तशीच ताडदेवची सरदार पावभाजीही प्रसिद्ध. हाजी अली ज्युस सेंटर, बडे मियाँचे कबाब, चर्चगेट स्टेशनची फ्रँकी, सिंधी खाण्यासाठी कैलाश परबत, मंगळदास मार्केटकडचं राजधानी नाही तर पंचवटी गौरव हे आहेच; मात्र ग्रँट हाऊस कँटीनच्या खिम्याच्या आणि क्रॉफर्ड मार्केटमधल्या बादशाह कोल्ड्रिंक हाऊसच्या फालुद्याशिवाय ही यादी अपूर्ण राहील. त्यांचे वर्णन करण्यात शब्द खर्ची घालत नाही.
परेल-एलफिस्टनच्या काही मालवणी खानावळी-कम-लंच होम्सशिवाय विशेष जागा माहीत नाहीत. दादरला अर्थात मामा काणे, छबिलदास/श्रीकृष्ण वडा, प्रकाश, सायबिणी, आस्वाद, गोमांतक, जिप्सी अशी मोठी यादी आहे. 'दिवा महाराष्ट्राचा'चं नाव वर आलं आहेच. माहीमचं अजून एक कारवारी हाटेल छान आहे, त्याचं नाव आठवून सांगतो. बांद्र्याला पूर्वेला हायवे गोमांतक आणि अस्सल केरळी खाण्यासाठी राईस बोट तर पश्चिमेला जरा जास्तच हाईप झालेली एल्को पाणीपुरी आणि कारावानसराई हे मुगलाई हाटेलही ठीकठाक. थडोमल शहानीकडचा जय सँडविचवाला मात्र ए-वन!
खारला 'राजस्थान' हे नाव पाहून एस.व्ही. रोडवरच्या एका हाटेलात शिरलो होतो आणि नावाशी पूर्ण विसंगत पण चविष्ट मुगलाई जेवण मिळालं होतं. सांताक्रुझ पश्चिमेला योको सिझलर्स आहे, पण कोबे सिझलर्सची सर त्याला नाही. साठ्ये कालिजात असताना जीवनची थाळी, दीनानाथजवळचं शर्मा चाट हाऊस, रामकृष्ण आणि शिवसागरची पावभाजी असे वार लागायचे. मत्स्याहारी असाल तर गजालीला जायलाच हवं, फक्त रांगेत ताटकळण्याची तयारी हवी. अंधेरी पश्चिमेला, चार बंगल्याजवळचं स्टमक हे चायनीज खाण्यासाठी उत्तम. तसंच पुढे ओशिवर्याजवळचं 'जस्ट बिर्याणी' (ही ऐकीव माहिती. नाही तर अर्थातच दिल्ली दरबार). मालाड पश्चिमेला एम. एम. मिठाईवाल्याकडे छोले-भटुरे आणि दाट लस्सी चांगली मिळते. बोरिवलीला गोयल शॉपिंग सेंटरमध्ये एका छोट्या कोपर्यात मिळणार्या कच्छी दाबेली आणि मुंगभज्यांनाही न्याय द्यायला हवा. दहिसर चेकनाक्याजवळचं कोकणरत्न ठीकठाक, पण वर मेव्याच्या प्रतिसादात आलेल्या दालखिचडीसाठी ते विशेष आठवणीत :)
10 Dec 2010 - 2:36 pm | मेघवेडा
नंदन नंदन लै लै भारी!
>> एवीतेवी मुंबईत जायचे वेध लागले म्हणून खादाडीच्या जागांची उजळणी करत होतोच, त्या यादीत आता बर्याच नावांची भर पडली.
+ १. आणि तू तर कहरच केलायस आता! बहुतेक ठिकाणी +१ आहेच!
>> पलीकडे स्टेशनजवळचं मेरवान इराणी हाटिलही मस्तच. ब्रून-मस्का, आम्लेट, चहा असा टिपिकल इराणी बेत आहेच, पण तिथले मावा केक खाल्ल्याशिवाय त्या दुकान-कम-हाटिलाच्या पायर्या उतरू नयेत.
मंगळवारी बंद असते. तेवढे टाळा.. माझा मागच्या वेळी मजबूत पोपट झाला होता.
>> साठ्ये कालिजात असताना जीवनची थाळी, दीनानाथजवळचं शर्मा चाट हाऊस, रामकृष्ण आणि शिवसागरची पावभाजी असे वार लागायचे.
इथे तर अगदी अगदी +१. जीवनची थाळी म्हणजे आहाहा! आणखी एक पार्ल्यातलं हमखास ठिकाण म्हणजे स्टेशनसमोरची प्रकाश मारवाडीची लस्सी! आणि बाजूचंच गोपाळ पानवाल्याकडचं मसाला पान! अहाहा! ज्जे व्वात!
बाकी प्रतिसाद तर लै लै ब्येश्ट! प्रिंटआऊट काढून ठेवतो. मुंबैत पोहोचल्यावर प्लॅनिंग करताना काम येईल! ;)
11 Dec 2010 - 1:47 am | रेवती
हे सगळे प्रकार जर मागल्या वर्षी माहित असते तर किती सोय झाली असती!
मला आणि आईला एका दिवसासाठी मुंबईला जावं लागणार होतं पण आमचं काम झाल्यावर जेवायचं कुठे? हा प्रश्न सुटला नाही. आमचं काम दादर, माटुंग्याला होतं. आईच्या औषध गोळ्यांच्यावेळेस जर जेवण मिळलं नाही तर पंचाइत नको म्हणून शेवटी जाणं क्यान्सल केलं.नंतर समजलं कि तिथेही बरेच हाटेलवाले आहेत. मुंबईची फारशी माहिती नसल्याने असे झाले. नेहमी घरून स्वयंपाक करून डबा नेण्याची सवय मलाच मोडायला हवी.
11 Dec 2010 - 3:41 am | नंदन
खरं तर गिरगाव सोडलं तर दादर-परळ भागात मराठी जेवणाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चविष्ट पण काहीशा अप्रसिद्ध ठिकाणांची माहिती या दुव्यावर आहे.
11 Dec 2010 - 2:50 am | उपास
होय आणि दुपारी एक दोन पेक्षा उशीर केलात तर मावा केके संपलेच समजा.. एकदा ४०-५० आणले की २-३ दिवस पुरवून खायचे ;)
10 Dec 2010 - 8:51 pm | प्रदीप
मुंबईचे समस्त इराणी हे एक आयकॉनिक वैभव होते. ते खरे तर इंस्टिट्यूशनच होते. अनेक कारणांनी ते आता काळाच्या उदरात लुप्त होऊ लागले आहेत. काहींनी धंदे बंदच केले (किंग्ज सर्कलवरील भांडारकर रोडच्या कोपर्यावरील कूलार, दादर टी. टी. वरील टिळक ब्रिजच्या पायथ्याकडे होता तो इराणी), काही बंद केले गेले (शिवाजी पार्कावरील इराण्याचे रेस्टोरंट जाळण्याचे व लुटण्याचे पातक काही मर्हाठी लोकांनी केले होते म्हणे!), काहींनी रूपडे बदलले ( किंग्ज सर्कलवरील एडनवाला रोडच्या कोपर्यावरील कूलार- केव्हाच अर्धा 'चायनीज' झाला... तरी ह्याने अर्धा भाग होता तसाच राखलाय). मोक्याच्या ठिकाणी बसून निवांत ब्रून मस्का किंवा खारी किंवा ऑम्लेट खावे, पानीकम चाय प्यावा, जगाच्या उठाठेवी करणार्या गप्पा कराव्यात, येणारी-जाणारी शोभा न्याहाळावी..... सुख, सुख ते अजून काय असतं?
आणि काही इराणी-- मेरवान (नंदन ह्यांनी उल्लेख केलेला आहेच), धोबी तलावचे क्यानी. तेथील छोटी खारी अक्षरशः जिभेवर विरघळायची! त्यासमोरील मेरवानचे मावा केक्स...अहा...
परवाच आमच्या येथील एका 'टर्की कबाब' वाल्या दुकानात गेलो. चार पाच इराण्यासारखी दिसणारी व तसलीच भाषा बोलणारी माणसे ते दुकान चालवत होती. कबाब अत्यंत सुमार होते, पण टर्की कॉफीची चव न्यारी होती. विचारल्यावर त्यातील प्रमुखाने मला कॉफीचा डबाच आणून दाखवला. 'मेहमूद इर्हादी' असे ब्रँडचे नाव होते. तुर्कस्तानात लोकप्रिय असावा. न रहावून त्यातील एकाला मी 'तुम्ही इराणी आहात का' असे विचारले. तसे काही नव्हते, ते तुर्कीच होते सगळे. पण उगाच मला मी इराण्याकडे काहीतरी खातोय ह्याचा आनंद घ्यायचा होता.
तो आनंद आता मिळेल असे वाटत नाही.
11 Dec 2010 - 2:53 am | उपास
साहेब घाबरू नका.. आमच्या गिरगावात या.. अजूनही हाताची बोटे मोजून उरतील अशी इराण्याची हाटेले गिरगाव व जवळपास आहेत.. मोक्याची जागा आणि कितीही वेल एक कप चहावर बसण्याची तसेच फुकण्याची सोय..
कधी येताय बोला :)
11 Dec 2010 - 3:00 am | बेसनलाडू
इराण्याच्या आठवणी चाळवल्या गेल्यात तसे याची आवर्जून आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू
10 Dec 2010 - 11:18 am | विलासराव
बांद्रा पश्चीमेला सिग्नलजवळ लकी (नाव नक्की आठवत नाही) बिर्यानी साठी मस्त आहे.
10 Dec 2010 - 12:35 pm | विजुभाऊ
ठाणे पुणे नगर औरंगाबाद कोल्हापूर या पलीकडे महाराष्ट् आहे रे मुलानो.
कोणीतरी विदर्भा तील एखाद्या स्थळाचा उल्लेख कराकी.
विदर्भावर चा हा अनुल्लेख कोणीतरी भरून काढाकी.
धुळे अमळनेर पाचोरा अकोला वडनेरा वर्धा येथले लोक काही खातच नाहीत असे का वाटते तुम्हाला.
ठाणे पुणे ठबे एरीया पार झेन्डे लावणारे मिपाकर आपल्या उर्वरीत महाराष्ट्रला ओळखत नाहीत?
10 Dec 2010 - 1:23 pm | योगप्रभू
काऊन असं कालजाले घर पाडनारं बोलते विजुभौ? हे राज्य तर सगल्यांचच ना बाप्पा ? :)
खरंच कुणीतरी विदर्भातली खवय्येगिरी जरुर सांगा. मी शेगावची प्रसिद्ध कचोरी खाल्लीय.
जरा खान्देशकडे पण येऊ. भुसावळचा प्रसिद्ध 'घाशीलाल वडा' खाल्लाय का कुणी?
तमाम महाराष्ट्रातील सर्वात तिखटजाळ, एकाच वड्यात डोळ्यातून पाणी काढणारा असा हा वडापाव आहे. मी माझ्या नातेवाईकाबरोबर हा वडापाव खायला गेलो होतो. तेव्हाची ही गंमत. माझ्या नातेवाईकांनी आधीच तिथल्या माणसाला बजावले, 'अरे हे आमचे पाहुणे पुण्यावरुन आलेत. त्यांना आपल्याइतक्या तिखटाची सवय नाही. तेव्हा कमी तिखट वडा दे.' त्यावर बरं म्हणून त्या माणसाने बटाट्याच्या भाजीतील मिरच्यांचे तुकडे बाजूला करुन चार वडे तळून दिले. तर ते खाताना घाम निघाला. बाजूचे पब्लिक मात्र वड्यात आणखी लाल तिखटाची चटणी घालून खात होते. बापरे! काय जबरी लोक आहेत इकडचे. 'घाशीलालचा वडा' मर्दानंच खावा. गोडघाशा पब्लिकने उगा नाद करायचा नाय. :)
10 Dec 2010 - 7:23 pm | विलासराव
शेगावला आनंदसागर उद्यान आहे. येथे उपमा, शिरा, ढोकळा, फाफडा, पोहे, ईडली, खिचडी सर्व पदार्थ अफलातुन रुचकर आहेत. बिसलरी पाणी येथे १ लिटर ८ रुपयांना मिळ्ते.ज्युसही छान मिळतात. जेवण पन मस्त असते. माझ्या मते फॅमीली सहलीसाठी हे सर्वोत्तम टिकाण आहे आनी परवडेबलही.
![1](http://lh5.ggpht.com/_p79GMe5GsE4/TQEY5Gq3I7I/AAAAAAAADo8/vi7aEBoenrg/s512/DSC02706.JPG)
ईथे पहा:
15 Dec 2010 - 4:31 am | सेरेपी
साबुदाणा उसळ आणि भोजन पत्रिका म्हंजे? (खिचडी आणि थाळी का?)
15 Dec 2010 - 8:59 am | विलासराव
खिचडी आणि थाळीच.
10 Dec 2010 - 12:51 pm | गवि
पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते विश्रांतवाडी (पण बाँबे सॅपर्सकडून न जाता होळकर पुलानंतरचा पहिलाच डावा टर्न घेऊन बहुधा "वैतागवाडी "किंवा तत्सम गावातून जाणारा रस्ता) या रस्त्यावर एक सरदारजी फॅमिलीचं नाष्ता सेंटर होतं. कायम सामोसे वगैरे तळत बसलेले असायचे.
टेस्टी सामोसा आणि चटणी विथ तोंड भाजणारा शेगडीवरून डायरेक्ट काचेच्या ग्लासात ओतलेला मसालेदार तिखट आलेबाज चहा.
आता असतील की नाही कोण जाणे. रोज त्या रस्त्याने जायचो म्हणून तशा पद्धतीने लोकेशन सांगितलंय..
कोणीतरी माझ्या वर दिलेल्या धेडगुजरी डायेक्शन्स नीट सांगितल्या आणि अजून ते तिथे असतात का सांगितलं तर फार बरं वाटेल..
10 Dec 2010 - 1:01 pm | गणेशा
मस्त मिळतात तेथे सामोसे .. दुपारी ३ नंतर मिळतात ..
छान आहे अगदी नाव विसरलो आहे .. पण २ महिन्यांपुर्वी कल्यानीनगर ला जाताना खाल्ला होता ..
एकदम झक्कास ..
10 Dec 2010 - 1:07 pm | चिंतामणी
कोणीतरी माझ्या वर दिलेल्या धेडगुजरी डायेक्शन्स नीट सांगितल्या आणि अजून ते तिथे असतात का सांगितलं तर फार बरं वाटेल.
गणेशाने सांगीतले आहेच. पण मी पुन्हा एकदा खात्री करून सांगतो.
बाकी सध्या विहार कुठे चालू आहे? पुण्यात नाही का रहात?
11 Apr 2018 - 12:07 am | एस
वैतागवाडी नाही, साप्रस म्हणतात. ते सॅपर्सचे मराठीकरण आहे.
10 Dec 2010 - 2:16 pm | आप्पा
बहुतेक ठिकाणाना भेट देईन म्हणतोय.
11 Dec 2010 - 1:06 pm | ५० फक्त
जाउन आलात की काय काय खाल्लंत ते लिहा उस्त्वार बरं का.
मी जानेवारीत जाईन गड्ड्याला, आमंत्रणाचा वेगळा धागा काढतोच आहे.
हर्षद.
10 Dec 2010 - 4:51 pm | खडूस
आता तेवढा नाही
आता सहकारनगरपर्यंत आलाच आहात तर घरी या की राव.
घरीच वडापावचा बेत करू
कसे??
10 Dec 2010 - 4:52 pm | sagarparadkar
समस्त मिपाकरांनी खाद्यवाङ्मयात ही जी अमूल्य भर घातलेली आहे त्याचे एक पुस्तक तयार करून मिळेल का?
उभी हयात पुण्यात घालवून सुद्धा मला इतकी खाद्यस्थळे माहिती नव्हती.
शिवाय असे पुस्तक बरोबर घेवून कोणत्याही गावात/शहरात गेले तरी कुठे आणि काय खायचे याची पंचाईत व्हायची नाही ... :)
अवांतरः ह्यांत कोणताही उपरोध दडलेला नाही , पुणेकर असल्याचा उल्लेख आला आहे म्हणून आधीच स्पष्ट केलेले बरें ...
10 Dec 2010 - 6:58 pm | यकु
विजुभाऊ,
धुळे-नवापूर रोडवरच्या एका धाब्यावर (बहुधा नेर या गावाजवळ) कोंबडी मस्त झणझणीत आणि मस्त मसालेदार मिळाली होती एवढं आठवतंय. सगळ्या आवारात मसाल्याचा वास सुटला होता.
10 Dec 2010 - 7:13 pm | इंटरनेटस्नेही
मिपा वरील पु़जेची पथ्ये हा लेख आठवला.. http://www.misalpav.com/node/11183 मिपावरचा एक अजरामर धागा..
(घाबरु नका, ही माझ्याच धाग्याची जाहिरात नाही!)
10 Dec 2010 - 7:23 pm | शैलेन्द्र
आमच्या डोंबिवलीतले काही छान ठीकाण..
१) माय होम-- अत्यंत सॉफ्ट इडली
२) गोविंदाश्रम- पावभाजी बेस्ट
३) गोरे वडापाव- कस्तुरी प्लाझासमोर, वडा ए वन असतो.
४) ठाकुर वडापाव-
५)सेलीब्रेशन - एम आय डी सी ग्राउंड, याचे पहाडी सॅन्ड्वीच खायचे
६) सेलीब्रेशन समोरच एक भय्या गाडी लावतो, त्याच्या गाडीवर " सेन्ड बिच " अस लिहलय.. मस्त आहे.
७) शांतारामचे सरबत, पेंढार्कर समोरचे.. आता कसे आहे माहीत नाही.
८)पाया सुप, कस्तुरी प्लाझाच्या पुढे.. एक काकु स्टॉल लावतात.. कडक मामला आहे..
९)गुगील स्टार... टोल नाक्या पलीकडे, शिळफाटा रोड्वर .. सगले कबाब मस्त आहेत...
11 Dec 2010 - 8:24 pm | निनाद मुक्काम प...
फडके वरील मोर्देन कॅफे चा उल्लेख नसल्याने तुम्हाला दिवाळीच्या पहाटच्या वेळी फडकेवर बंदी घालण्यात येत आहे .
आदेशावरून
11 Dec 2010 - 9:09 pm | शैलेन्द्र
माफ करा, पण मॉडर्न कॅफे कधीच आवडल नाही, कदाचीत अतिपरिचयात अवज्ञा अस झाल असेल.
10 Dec 2010 - 7:31 pm | गणेशा
सगोती
कोकण एक्सप्रेस, डहाणुकर कॉलणी, पुणे
सामोसे
अनारसे बंधु, ज्ञानप्रबोधनी जवळ , पुणे.
नागपुरी मटण्/चिकण
हॉटेल नागपुर, पुणे ( गल्लींची अआणि पेठेतल्या रोडची नावे निटशी माहित नाही त्यामुले नीट सांगता येणार नाही पण एस्.पी च्या समोरील लेन ने आत जायचे आणी आत मध्ये पुरेपुर कोल्हापुर च्या लेन मध्येच आहे हे )
10 Dec 2010 - 7:55 pm | धमाल मुलगा
एकदम झकास!
पण बर्याच वर्षात तिकडं गेलो नाही. हल्ली चव कशी आहे ते ठाऊक नाही.
>>गल्लींची अआणि पेठेतल्या रोडची नावे निटशी माहित नाही
:)
टिळक रस्त्यावरुन येत असाल तर टिळकस्मारक समोरची गल्ली जी भरत नाट्य मंदीराकडे जाते (गल्लीचं नाव शेडगेवाडी) त्या रस्त्याला डाव्या हाताला हॉटेल नागपूर. ओळखीची खूण म्हणजे उजव्या बाजूचं तॄष्णा (बार हो.)
10 Dec 2010 - 7:39 pm | गणेशा
strong>ढाब्यामधील अस्सल गावरान चिकन्/मटन ते ही बाजेवर
१. किनारा ढाबा , शिरुर च्या थोडे आधी , पुणे -नगर हायवेवरती ..
चहा आणि भजी आणि बटाटेवडा
१. भटाचे कुकडी कॉलनीतील कँटीन ..
(३-४ वर्षे येथे पडिक असायचो , ते दिवस आठवले मस्त वाटले ,अजुनही गेल्यावर भट पैसे नको म्हणतो माझ्यकडुन .. येव्हडे छान रीलेशन होते .. वडापाव-भजी आणि चहा यांची मेस होती माझी तेथे .. मला वाटते अशी मेस लावणारा मीच पहिला आणि शेवटचा असेन)
10 Dec 2010 - 7:49 pm | विलासराव
शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे गावाच्या पुढे ५-६ किमी वर सुवर्णज्योत हा प्रचंड ढाबा आहे. चिकण, मट्ण काहीही खा. मस्तच मिळ्ते. माझी आवडती डाळ तडका ही डिश तर अप्रतिमच मिळते.
10 Dec 2010 - 8:02 pm | शैलेन्द्र
नगर शहरात बहुदा नव्यानेच झालेले, " उदयनराजे पॅलेस" हे हॉटेल मस्त आहे.. वेज नॉन्वेज दोन्हीही..., सन्केत चौकानंतर, पुण्याच्या दीशेला
10 Dec 2010 - 7:56 pm | गणेशा
भेळ
१. नारायणगाव येथे कोठेही .. (जुन्नर -खेड- मंचर जवळ) फरसान भेळ पण खुप जबरी लागते ..
२. लोणी भापकर, बारामती (पणधरे जवळ)
येथील भेळ ही वेगळी आणि तिखट चुरमुर्याची मिळते, अतिशय उर्कृष्ठ आहे..
३. कैलास .. निअर शिंदेवाडी, पुणे-बँग्लोर हायवे.
४. सरदवाडि (शिरुर जवळ)
५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही मस्तच ...
10 Dec 2010 - 8:07 pm | विलासराव
५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही मस्तच ...
तुमचीच तर नाही?
10 Dec 2010 - 8:36 pm | गणेशा
नाही नाही आमची नाही ती [:)]
तरीही पुण्यात भेटलो तर आमचीच सम्जुन घरच्या सारखे खाल्ली तरी आवडेन
10 Dec 2010 - 8:11 pm | धमाल मुलगा
नक्की कोनती? जगतापची का? लै वर्षं झाली गेलो नाय तिकडं. आता नीट आठवेना.
ओ गाववालं,
झगड्याच्या समाधानमधली मिसळ अन पुरीभाजी इसरलो का आपुन? :)
आणि गांधीचौकात अलिकडं सिक्वेरा मेन्सवेअरसमोर जेवरेमामांकडची भेळ पण ढिंच्याक.
आईस्क्रीम आणि मस्तानी खायला शाकंभरी कोल्ड्रिंक्स... नौशादवाल्यानं थोडेदिवस 'मोकळ्यात जड' केलं राव पण शाकंभरीला मात नाय देऊ शकला. :)
10 Dec 2010 - 8:33 pm | गणेशा
गाववालं
लोणी भापकर ला छोट्याश्या चौकात , बस थांबते तेथे मिळते .. पहिल्यासारखी नाही मिळत येव्हडी तिखठ तरीही ही मस्त आहे अजुनही.
स्वताची ओलख अजुन जपलेली आहे..
बाकी तुम्ही दिलेली माहिती ही जबरी आहे ..
11 Apr 2018 - 12:05 pm | श्वेता२४
मटकी भेळ व हॉटेलात मासवडी (हा शाकाहारी पदार्थ आहे) जरुर ट्राय करा.
11 Apr 2018 - 12:11 pm | प्रचेतस
मटकी भेळ भामला (चाकणच्या पुढे) खूप छान मिळते. गरमागरम मटकी, कांदा आणि भेळभत्ता. ऑस्सम
12 Apr 2018 - 7:28 pm | भीडस्त
हा पदार्थ शाकाहार आहे?
नावच खतरनाक आहे .
10 Dec 2010 - 8:42 pm | गणेशा
चला आता २-३ दिवस नाहिये ...
तेच हो पोटपुजेसाठीची एकदोन नविन ठिकाणे नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करीन
गुड नाईट
10 Dec 2010 - 9:51 pm | चिंतामणी
सातारामागे टाकुन कोल्हापुरकडे जाताना खींड लागते. डाव्याहाताला पेट्रोलपंपाला लागुन आत जायचे.
तेथे "कणसे धाबा:" लागतो. चिकन, मटण, काजुकरी एकदम मस्तच. खूप गर्दी असते. पण सर्व्हीस चांगली आहे.
12 Dec 2010 - 9:09 am | अर्धवट
वाहवा.. कणशाकडे.. रोटी आणि रस्सा खाउन बघा.. पण त्यांचीच तीन हॉटेल झालीत त्यात जुन्याची चव नाही.. आम्ही अजून जुन्यातच जातो..
12 Dec 2010 - 9:27 am | चिंतामणी
आम्हीसुध्दा अजून जुन्यातच जातो..
10 Dec 2010 - 9:56 pm | स्वप्निल..
माझं गाव विदर्भात - उमरखेड जि. यवतमाळ .. तीथल्या काही जागा**
१) मुत्तुराज वडेवाला - याच्याजवळ वडे, मिरची भजे अप्रतिम मिळतात. एका प्लेट मध्ये कधीच समाधान होत नाही.
२) याच्याच बाजुला एक ऑम्लेटवाला होता - आता आहे का नाही माहित नाही पण त्याच्याजवळ ऑम्लेट मस्त मिळायचे
३) बिकानेर मिठाई - समोसा, कचोरी आणी ईम्रती साठी .. बाकी मिठाई पण मस्तच
४) संजय टॉकीज (बहुतेक) जवळ एक भेळवाला असायचा .. त्याच्याकडे पाणीपुरी, दहीपुरी, भेळ छान मिळायची
५) वसंत टॉकीज समोरच्या गल्लीत एक मिठाईचं दुकान होतं .. त्यात समोसा मस्त मिळायचा आणि याच्याच जवळ एक हॉटेल होते त्यात फाफडा मस्त मिळायचा .. सोबत तळलेली मिरची ..
६) एक हॉटेल होते पुसद रोडवर .. शाळेत जातांना लागायचे .. तीथला पेढा अप्रतिम असायचा .. एकसारख्या आकारात करुन न ठेवता चौकोनी वगैरे तुकडे करुन तराजुत मोजुन मिळायचा ..
७) पुसद रोडवरच एक जयस्वाल वाईन मार्ट आहे .. त्याच्याकडे पुर्वी सांभारवडी (कोथींबीर रोल) मिळायचे .. मस्त होते
८) फक्त उन्हाळ्यात एक ज्युस सेंटर उघडायचे .. तो पाईनॅपल ज्युस मस्त बनवायचा
सध्या एवढेच आठवतायत .. अजुन विदर्भातले काही ठीकाणं सांगेन .. कीतीजणांना याचा उपयोग होईल हे माहिती नाही तरीपण या धाग्यावरुन मला आठवल्या :)
** ही सर्व माहीती जवळपास ३ ते ७ वर्षापुर्वीची आहे .. त्यामुळे सध्याची परीस्थिती माहिती नाही
13 Dec 2010 - 6:03 pm | गणेशा
स्वप्नील भाउ , येवुद्या आनखिन ....
कितीजनांना उपोयोग होयील असे नाही.. पण यामध्ये वाचले तर नक्कीच उपोयोग होयील ...
कालच माझी फ्रेंड गणपती पुळे ला गेली होती.. मला वाटते मेघवेड्यांनी दिलेली खिचडीची माहीती दिली होती .. आज कळेल वृत्तांत ..
विदर्भाद आल्यावर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या ठिकांनाना भेट देवू ..
10 Dec 2010 - 10:04 pm | नगरीनिरंजन
बरं आहे हा धागा महाराष्ट्रापुरताच सीमित ठेवला आहे. जगभरातली पोटपुजेची ठिकाणे विचारली असती तर सगळे (फ्रींटुकबृहत्कथयाकथित) का.प्रे.न.झा. उच्चमध्यमवर्गीय उत्तेजित झाले असते आणि हा धागा एव्हाना टॉपला पोचला असता. ;-)
11 Dec 2010 - 3:00 am | उपास
अरे तात्या कडे तर सगळी यादीच होती.. दक्षिण मुंबईतल्या दिल्ली दरबार पासून अगदी गिरगावतल्या बोरभाटलेन मधल्या समर्थ भोजनालय, अनंताश्रम आणि बरच बरच..
ह्या सगळ्या ठिकांणांच्या हॉटेलांची एक छान यादी कुठे मिळेल कुणी सांगू शकेल का.. मुंबईतले बरेच आणि पुण्यातले काही झालेत भेट देऊन पण एखादी साईट असेल जिथे ही यादी मिळेल तर लय उपकार होईल..
माझे दोन प्रश्न -
१. मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल.. एकदा शोधताना हवा निघाली होती पण मनासारखा (आणि खिशाला परवडेल असाही) पत्ता मिळालाच नाही, म्हटलं तयारी असावी ;)
२. मुंबई च्या जवळ चांगला धाबा कुठे आहे (कृपया दादरचा प्रितम-दा-धाबा सांगू नका.. )..
धन्यवाद!
11 Dec 2010 - 3:10 am | बेसनलाडू
गिरगाव चौपाटीसमोर गुडलक किंवा तत्स्म नावाचे इराणी (पक्षी पारसीबावाचे) हॉटेल आहे. लाकडी टेबले, लाकडी पंखे असलेल्या त्या एकमजली हॉटेलात वरच्या मजल्यावर कॅन्डल लाइट डिनरची सोय (टेबलावरच्या टिचभर, चिनीमातीच्या पांढर्या फुलदाणीतल्या गुलाबाच्या फुलासकट!) असल्याचे आठवते. तरीही आम्ही खालीच बसून चहा-पराठे हाणले होते, हा भाग वेगळा.
(स्मरणशील)बेसनलाडू
गिरगावातलेच असाल, तर मनोहर आणि सरदार मध्ये पावभाजी खाल्लीत की नाही, असे विचारून तुमचा अपमान करावेसे वाटत नाही :)
(पावभाजीप्रेमी)बेसनलाडू
मुंबईजवळचे ढाबे म्हणजे सन्नी आणि टोनीचे - एन एच ४ वरचे सन्नी दा ढाबा आणि टोनी दा ढाबा
(सरदार)बेसनलाडू
11 Dec 2010 - 3:30 am | उपास
सरदारकडे ताडदेवला तर कैक दा... मनोहर कडे जायचो जेव्हा खिशात पैसे नसायचे तेव्हा दोन भाजी आणि १० पाव चौघात ;) नित्यानंद, श्रिराम पण आहेत पण मला मात्र तवा पुलाव, पावभाजी असे आयटंम गाडीवरच आवडतात.. ड्रीमलँडला मुमताजची गाडी लागते, जबराट पावभाजी आणि गुलालवाडीतही मस्त विशेषतः रात्री थोड्या उशीरानेच गणपतीत किंवा दांडीयात.. शिवाय ते शेगडीवर शेकत असलेले पापड.. अहाहा...
अहो कँडल लाईट ला नेताना सोयीस्कर हॉटेल पाहिजे.. आमच्या इथे इराण्याकडे कपल गेलं की समजा नुस्तं लफडं नाही तर झोल आहे म्हणून... :))))
धन्यवाद माहितीबद्दल.. नोंद घेतली आहे 'बेला' :)
13 Dec 2010 - 6:07 pm | गणेशा
चला तुमच्या प्रश्नामुळॅ कँडल लाईट डिनर मुंबईत कोठे मिळते ते कळाले
धन्यवाद आपले आणि बेसन लाडु चे ..
-- बाकी पुण्याजवळील पिंपळे सौदागर येथे ही कँडल लाईट डिनर मस्त मिळते .. तिकडेच सोय करुन ठेवली आहे आम्ही .. [:)]
11 Dec 2010 - 3:44 am | नंदन
>>> मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल..
--- वरळीच्या नेहरू सेंटरजवळच्या 'ज्वेल ऑफ इंडिया'बद्दल बिझीबीच्या कॉलममध्ये वाचल्याचं आठवतं. कधी गेलो नाही, पण जालावर रिव्ह्यूज चांगले आहेत.
11 Dec 2010 - 3:01 am | मीली
नासिक ला पाणीपुरी खायची म्हटली कि गाडी आपोआप कॉलेज रोड ला " नंदन" कडे वळते.शेव दहीपुरी तर अशी भारी कि खाणारा खातच राहतो....![](http://www.hotelsinkolhapur.com/misal_pav.jpg)
तसे बिग बझार समोर पण एक गाडी असते पेपे शोरूम जवळ तिथे पण पाणीपुरी मस्त ...
आणि सायंतारा चे साबुदाने वडे तर उपास असो नसो खावेसे वाटतात.चटणी पण मस्त असते....रेसिपी मिळवणार आहे एकदा मी! ....टायगर हिल्स म्हणून पांडवलेणे येथे हॉटेल आहे तिथे नोंव्हेज पण मस्त मिळते .मिसळ पाव साठी गंगापूर रोड वरचे "विहार "
पुण्याला भरपूर चापायचे असेल तर दुर्वांकुर बेस्ट आहे!आणि सेनापती बापट रोड च्या बाजूने एक लेन जाते तिथे मॉन्सून मोमो म्हणून आहे ....अप्रतिम! वेज आणि नोन व्हेज दोन्ही + व्हेज क्लीअर सूप अहाहा !
वडा पाव म्हणाल तर जोशी वडे वाले आहेत पण रोहित वडे पण मस्त लागतात.
बाणेर रोड वरचा डोमीनोचा burst पिझ्झा तर लई भारी ! सध्या परदेशात असल्याने फक्त आठवणी जवळ आहेत ....!
12 Dec 2010 - 5:05 am | उपास
तै, तो फोटो हलवा इथून.. अक्षम्य जळजळ!!!!!!!
** अरेच्चा.. अगदी हाच फोटो मिपावरील वरच्या बॅनर मध्ये पण दिसतोय.. (कधी पुस्तकविश्व तर कधी मिसळपाव असं..) पावाच्या शेपवरुन तर पक्की खात्री झाली ;)
11 Dec 2010 - 3:25 pm | मृत्युन्जय
ती बाकीचं राहु द्या बाजुला. फोटो कुठल्या मिसळीचा आहे ते बोला. तोंड खवळलं पार माझं.
11 Dec 2010 - 4:44 pm | चिंतामणी
.
पोटपुजेची ठिकाणे
चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?
या दोन धाग्यावरची माहिती वाचुन आता कुठे जायचे कळेनासे झाले आहे.
शहर, पत्ता, खाण्याचे पदार्थ अश्या क्रमाने मार्गदर्शक पुस्तक (त्याला मराठीत "गाईड" म्हणतात) बनवले तर खूप उपयोग होईल.
(कॉम्प्युटरवर कोण काम करून देउ शकेल हे सगळ्यांना माहीत आहेच). ;)
11 Dec 2010 - 7:02 pm | उपास
तेच म्हटलय मी वरती.. कुणीतरी विकी बनवा यार ;)
13 Dec 2010 - 6:10 pm | गणेशा
पुढच्या आठवड्यात वेळ मिळताच बनवतो येथील माहितीने मी ...
(नोट एक आठवड्याचा .. एक महिना होउ शकतो )
11 Dec 2010 - 8:26 pm | निनाद मुक्काम प...
मुंबईतील पारसी डेअरी म्हणजे पेढ्यांचा व दुधाची पर्वणी (कृपया चितळ्यांची बरोबरी करण्याचा हेतू नाही ) ह्याची नोंद घ्यावी
आम्हला मिपा वर राहायचे म्हटलं .
29 Dec 2010 - 11:12 am | चिंतामणी
(कृपया चितळ्यांची बरोबरी करण्याचा हेतू नाही ) ह्याची नोंद घ्यावी
आम्हला मिपा वर राहायचे म्हटलं .
Ninad - You too???????????:(