बाकी शून्य ...कादंबरी परीक्षण

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
29 May 2008 - 1:39 am

जय सरदेसाई नावाच्या सांगलीतल्या एका हुशार , संवेदनशील माणसाची शाळेपासून ( १९७० ते १९८६) इंजिनियर होईपर्यंत...मग पुढे आयुष्यातील एक से एक वळणांची ही एक बरीचशी इण्ट्रेष्टिंग गोष्ट...( लेखक कमलेश वालावलकर ,राजहंस प्रकाशन ,पृष्ठे ४२५, किंमत १७० रु.)

जयची शाळा, मित्र, अभ्यासातली हुशारी, दहावी बोर्डात येणे, खच्चून अभ्यास, बी ई करताना नाटकाचा नाद लागणे, लेखनाचा छंद, सिनेमात जायचा निश्चय, डीग्री घेतल्यानंतर मराठी सिनेमात असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम,पुण्यामध्ये फिल्म बनवणे शिकायसाठी आगमन, पार्टटाईम पत्रकारिता, दिल्लीची बिनधास्त पत्रकार मैत्रीण, नाशिकमधल्या एका कंपनीत मार्केटिंगचा जॉब, पगार वाढत जात असतानासुद्धा काहीतरी करून दाखवण्यासाठी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी नोकरी सोडून अभ्यास चालू, मग तिथले मुंबईतल्या हॉस्टेलचे ,मित्रांचे खच्चून अनुभव...आय ए एस व्हायचा अभ्यास म्हणजे वेड्यासारखा १८-१८ तास अभ्यास , इतिहास,-तत्त्वज्ञान- शास्त्र एकदम तपशीलवार, मग कसल्या तरी विचित्र कारणानं नैराश्य, भयंकर दारू पिणे, प्रचंड सिगरेट, एकूणच सगळ्याचा काही उपयोग नाही असा साक्षात्कार, कशालाच काही अर्थ नाही छापाचे प्रचंड म्हणजे प्रचंड नैराश्य, वैफल्य आणि विचित्र अधोगती...मग काय वाट्टेल ते...

ही कादंबरी सॉलिड चक्रम आहे...एंटरटेनिन्ग आहे,प्रश्न पाडते.. तत्त्वज्ञानाचा कीस पाडते अधून मधून...
नायक हॉस्टेल मध्ये एकटा वगैरे असला की त्याला हे नेहमी पडणारे प्रश्न , मग मित्रांबरोबर चर्चा.... ...--- मी कोण आहे? कसा आहे?जगणं म्हणजे काय? तुझ्या माझ्या अस्तित्त्वाचं प्रयोजन काय?या सगळ्याचा अर्थ काय? वगैरे वगैरे... मग नील्स बोहर, श्रोडिंजर, आईनस्टाईन लोकांची मदत घेऊन आणि तत्त्वज्ञान वापरून प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न आणि मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...कादंबरीत अशा स्टाईलची वर्णनं वारंवार येतात....

...विविध स्त्रीव्यक्तिरेखा झकास जमवल्या आहेत विशेषतः पत्रकार स्त्री....अधूनमधून ( वाचकाच्या भुवया उंचावणारी आणि मराठीत क्वचित दिसणारी ) पेरलेली सेक्स वर्णने ही आहेत... प्रेमभंगाचे दु:ख आणि दारू सिगरेट व्यसन यांच्या परस्परसंबंधाबाबत किंवा आत्महत्या आणि एकूणच मानसिक विकृती यावरही काही चिंतने आहेत...

कादंबरीचे बरेच नाव ऐकले होते.....कोसला पार्ट टू वगैरे कौतुक (?) ऐकले होते....खूपच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या...वाचताना अर्थात बराच काळ या अपेक्षा टिकवून धरल्या कादंबरीने...
कोसला जरीला सारख्या नेमाडपंती लेखनाची आठवण पुष्कळ वेळा होते आणि वाचताना मजासुद्धा येते..... ( पण आपल्याला वाचताना निव्वळ स्टाईलची कॉपी म्हणून आवडतंय की कसे? तसे आवडावे का? :< हं..शेवटी कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष...)/.. असो..
शेवटी शेवटी मात्र वैफल्यग्रस्त , नैराश्यग्रस्त नायकाची भलतीच वाहवत गेलेली गोष्ट विशेष आवडली नाही...( मग पुन्हा कशालाच अर्थ नाही, असा निष्कर्ष... ;) :) )

वाङ्मयसाहित्यिकलेखमतप्रतिक्रियाआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

कोलबेर's picture

29 May 2008 - 2:34 am | कोलबेर

पुस्तक परिक्षण आवडलं! तटस्थ नजरेतुन पुस्तकाची छान ओळख करुन दिली आहे.
कादंबरीला 'बाकी शून्य' हे नाव तरी अगदी समर्पक दिलेले दिसतय.

अन्जलि's picture

29 May 2008 - 12:26 pm | अन्जलि

माझेहि हेच मत झाले होते पुस्तक वाचल्यावर. खुप छान आहे असे ऐकले म्हनुन वाचले पन खरेच शुन्य निघाले.

फार जास्त पाने लिहुन शेवटी 'बाकी शून्य' !!!! असे स्वरुप आहे कदम्बरी चे
कोसला ची आठवण करुन देण्याचा केविलवणा प्रयत्न असे माझे मत आहे
मजेदार विदुषक

भोचक's picture

29 May 2008 - 2:58 pm | भोचक

सहमत. माझाही हाच अनुभव. वाचूनही पदरात पडते, ते बाकी शून्यच. असेच अनंत सामंतांच्या अविरत नावाच्या जाडजूड कादंबरीनंतरी वाटले होते.

देवदत्त's picture

16 Sep 2008 - 10:59 pm | देवदत्त

नुकतेच हे पुस्तक वाचायला घेतले.
सुरूवातीची काही पाने वाचताना वाटले की सलगता नाही. वेगवेगळे प्रसंग एकत्र लिहिलेत बस्स. नंतर बहुधा त्याची सवय झाली म्हणून वाचू शकलो. अजूनही अर्धेच पुस्तक वाचले आहे. #:S

त्यातल्या त्यात ह्याआधीच "दुनियादारी" वाचले होते, त्याचा प्रभाव अजूनही आहेच. त्यामुळेही बहुधा हे पुस्तक विस्कळीत वाटतेय.
पुढे वाचू की नाही विचार करतोय. :?

आपला आभि's picture

18 Sep 2008 - 5:00 pm | आपला आभि

मला ही कादंबरी खूप आवडली.........
छोटा डॉन आणि माझे याबाबत बरेच विचारमंथन झाले आहे... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं.....
अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे.............. :/

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 5:05 pm | आनंदयात्री

डॉनने मला सांगितले होते की त्याची प्रत आहे !

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 5:14 pm | छोटा डॉन

ती प्रत माझीच आहे, काय म्हणणे आहे ?
पावती दाखवु का ?
झालच तर त्या दुकानदाराची पण साक्ष आपण काढु शकतो ...

बाकी " बाकी शुन्य" म्हटल्यावर लगेच आमच्यावर टिका करायची संधी काय तुम्ही सोडु नका ...
बाकी सविस्तर तुमच्या "खरडवहीत" ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 5:19 pm | आनंदयात्री

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 5:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पावती दाखवु का ?

हे ऐकल्यासारखं वाटतंय... तुला काय वाटतं रे आंद्या?

असो, हे फारच विषयांतर आहे!

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 5:27 pm | छोटा डॉन

आजकाल जमाना खराब आला आहे ...
आंतरजालीय साहित्य प्रकाशित व्हायच्या आतच त्याची चोरी होती .

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ...
काय म्हणातेस आदिती, बरोबर ना ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 5:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे आमचे वाक्य कुणीतरी " जीम ची पावती दाखवु का ? " म्हणुन खपवले ...

अगदी, अगदी! तुझ्या डोक्यातूनच चोरी झाली असणार! काय करणार कलियुग आहे ना! मला तुझ्याबद्दल अंमळ (कोरडी) सहानुभूती वाटत्ये रे!
त्यातून ते अत्री लोक जीवालाही नाडतात!

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 5:28 pm | आनंदयात्री

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !!

-
(पावत्या फाडणारा) आंद्या मल्ल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2008 - 5:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जिकडे तिकडे पावत्या दाखवत फिरणारी एक भुरटी तोंडाळ जमातच आंतरजालावर अस्तित्वात आहे. काही आद्य पावतीजातीचे लोक कट्ट्यांना सुद्धा पावत्या घेउन येतात !!

मॉनिटर नसला की काही लोकं फार बोलतात बाबा इतरांना!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2008 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अती अवांतर गप्पा मारण्यासाठी, खरडफळ्याची ,खरडवहीची, व्य. निरोपाची चांगली सुविधा दिल्याबद्दल मिपाच्या चालकांचे मनापासून आभार !!! ;)
(ह. घ्या)

-दिलीप बिरुटे
(खडूस मास्तर )

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 5:51 pm | आनंदयात्री

मी पण हेच म्हणतो.

-
(सहमत) प्रसादलाडु !

चला आता आपण गप्पा मारु ;)

छोटा डॉन's picture

18 Sep 2008 - 5:12 pm | छोटा डॉन

मुळात आपण तुलना का करत आहात ?
सरळ आहे की पुस्तक आवडले का नाही, ह्याच्या तुलनेत भिकार** आहे , त्याचा तुलनेने बरे आहे ह्याला अर्थ नाही ...

असो. पुस्तक अर्धेच वाचले आहे तर पुर्ण वाचा ...
आणि मग मत बनवा, मग ते " भंगार पुस्तक" असे झाले तर कदाचित मान्य करु ...
पण एवढीही टाकाऊ कादंबरी नाही ...

... मला फारसे साहित्यिक भाषेत लिहता येत नाही... पण जय सरदेसाई ने खूप दिवस अस्वस्थ केलं होतं.....
अनेकवेळा वाचून शेवटी माझी प्रत डॉनने जर्मनी ला पळवली. :& परत मिळेल अशी आशा आहे..............

बस का अभि मालक, कशाला खेचता राव आमची ...
कादंबरी जर्मनीला आणली ही बाब खरी आहे.
त्यामचा उद्देश असा आहे की कादंबरीची समिक्षा करणारा "एक फक्कड लेख " लिहावा ...
लवकरच वेळ मिळेल अशी आशा आहे, तेव्हा टाकुच सविस्तर ...

ता . क : " आपली " कादंबरी परत मिळेल कदाचित ...
बाकी सर्व कर्ता करविता परमेश्वर आहे ...

अवांतर ( काही खास लोकांसाठी ) : "लेख कधी टाकणार" असे सारखे प्रश्न विचारुन मझे जिने हराम नका करु. वेळ मिळाला की टाकतो ...
सध्या जर्मन सरकारशी " युरोपमधल्या आर्थीक मंदीचा तुलनात्मक अभ्यास " ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा चालु आहे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 5:17 pm | आनंदयात्री

३०-४० विषय पेंडिंग आहेत तुमच्याकडे आजवर !

(अहो "पोपटाच्या पिंजरा" चे परिक्षण पण १० वेळा आले असते इतक्यात !!)

देवदत्त's picture

19 Sep 2008 - 12:25 am | देवदत्त

मुळात आपण तुलना का करत आहात ?
नाही. तुलना करत नाही आहे. आधीच मी त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया लिहिली. जे सुरूवातीला वाटले ते लिहिले.

बाकी पुस्तक वाचेन जमेल तसे.

आपला आभि's picture

18 Sep 2008 - 5:15 pm | आपला आभि

इतका विश्वासघात?
थांब जर्मनीच्या प्रेसिडेंटला फोन लावतो ....आणि जर्मनीत दारू , सिगरेट आणि 'इतर' गोष्टींवर बन्दी आणतो..........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Sep 2008 - 5:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी शुन्यचे परिक्षण आवडले.

अवांतर : 'एबारो बारो, सत्यजित राय यांच्या कथेंचे विलास गितेंनी अनुवाद केलेले मस्त पुस्तक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

18 Sep 2008 - 5:31 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
परिक्षण आवडले.
वि.प्र.

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2008 - 6:22 pm | भडकमकर मास्तर

म्हटले, एकदम बाकी शून्यला इतके प्रतिसाद??
...
मग कळलं खरडफळा झालाय होय? मग ठीकंय
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

18 Sep 2008 - 6:38 pm | मुक्तसुनीत

ही कादंबरी वाचल्याला काही महिने उलटले. कसे कुणास ठाऊक , पण मास्तरांच्या या धाग्यावर लिहायला जमलेच नव्हते...

ज्या पुस्तकाचा (कुठल्याही गोष्टीचा ?) "बिल्ड्-अप" अमुक-अमुक-पार्ट्-टू असा होतो , त्या गोष्टीबाबतच्या अपेक्षाभंगाला मनाची तयारी करून ठेवणेच इष्ट ; अशी आपली माझी खूणगाठ. त्यामुळे एकूणच अपेक्षा मी खाली आणलेल्या होत्या. पुस्तकाच्या एकंदर रूपरेषेबाबत मास्तरानी लिहिले आहेच. स्वतःचा शोध म्हणा, स्वत:ची कैफियत म्हणा , अशा स्वरूपाची पुस्तके मराठीत खूप काळापासून चालत आली आहेत. "कोसला" हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसले तरी अर्थातच प्रथमपुरुषी आहे. "कोसला" मधे कार्‍या लोकांचे , कॉलेजजीवनाचे , हॉस्टेल वास्तव्याचे चित्रण आहे. तर "बाकी शून्य" मधे एकंदरच पौगंडावस्थेवाटे , उमेदवारीच्या दिवसांपर्यंत केलेला प्रवास चितारलेला आहे.

तर मग "बाकी शून्य" चा माझ्या दृष्टीने जमाखर्च नेमका काय ?

काही लैंगिक अनुभव यात धाडसीपणे मांडले आहेत. पौगंडावस्थेच्याही आधी कथानायकाला जवळच्या नातेसंबंधामधील मुलींशी संबंध येतो. अगदी संभोग नाही , तरी ज्याचे वर्णन "लैंगिक" असे करता येईल असेच. अशा स्वरूपाच्या धक्कादायक - कारण चाकोरीपेक्षा वेगळ्या - प्रसंगांची रेलचेल यात आहे. कथानायक आपल्या शालेय आणि व्यावसायिक शिक्षणाचा प्रवास, आपल्या नोकरी मधे आलेले सुरवातीचे अनुभव वर्णितो. या सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे ठायीठायी सांगितलेले आहे. आणि या सार्‍यातून धावणारा "सबझूट्"वादाचा एक धागा. कादंबरीचा प्याटर्न ( ज्याचा पन्नासेक पानानंतर मला कंटाळा येऊ लागला) हा असा आहे.

माझे आक्षेप :
आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल , स्वतःबद्दल , स्वतःला आलेल्या अनुभवांबद्दल लिहीता येणे ही एक सुरवात आहे - इतिकर्तव्यता नव्हे. जे अनुभव आले , यातून तुमचा "वर्ल्ड्-व्ह्यू " काय बनतो ? त्याचा इथे मागमूस नाही. उदाहरणार्थ , कोसला मधे धाकट्या बहिणीचा मृत्यू, त्यानंतरचे अजिंठ्यातील बुद्धाच्या शिल्पाबद्दलचा भाग , कोसलातील महान डायरी यातून आपल्याला जाणवते , की आयुष्याच्या बहुस्तरीय स्वरूपाची , गुंतागुंतीच्या विणीची जाणीव लेखकाला प्रखरतेने जाणवते. "बाकी शून्य" मधे असे एकदाही दिसत नाही की , गुंतागुंतीच्या क्षणी, एखादा धारदार निर्णय नायकाला घ्यावा लागला आहे. त्यातली चलबिचल , नैतिक प्रश्नांची घालमेल यातले काहीच नाही. आयुष्य येऊन आदळते तसे वर्णिले आहे ; आणि कदाचित चारचौघांपेक्षा किंचित वेगळे आहे ; पण लेखकाला निव्वळ ते दिसले . त्याने पाहिले काहीच नाही. त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

आनंदयात्री's picture

18 Sep 2008 - 6:44 pm | आनंदयात्री

सुरेख प्रतिसाद !!

>>सार्‍यामधे कथानायक आपली संवेदनशीलता - अगदी बालपणापासूनच - इतरांपेक्षा जास्त तीव्र आहे , आपले लुक्स (कादंबरी अंती चक्क लेखकाचा फोटू !!) आणि आपली ही संवेदनशीलता यामुळे मुली आपल्याकडे वेगवेगळ्या परिस्थितीमधे आकर्षित होतात असे

अगदी अगदी ... अन फोटु टाकणे तर अत्यंत हास्यास्पद !
स्वत:च स्वतःला लिव्हिंग लिजेंड बनवायचा प्रचंड फसलेला प्रयत्न !

मेघना भुस्कुटे's picture

18 Sep 2008 - 8:09 pm | मेघना भुस्कुटे

कादंबरी वाचल्यानंतर माझा माझ्याशीच प्रचंड गोंधळ उडाला होता. हे जे काही आहे, ते धक्कादायक आहे म्हणून केवळ आपण नाकारतो आहोत काय, हा त्यातला मुख्य प्रश्न होता. पण तुमच्या परीक्षणाने माझ्या गोंधळावर नेमके बोट ठेवले आहे. जसे अंगावर आदळते, तसे लिहिणे ही केवळ सुरुवात आहे, इतिकर्तव्यता नव्हे. इतक्या नेमक्या शब्दांत 'बाकी शून्य'चा फुगा फोडल्याबद्दल आभारी आहे. :)

भडकमकर मास्तर's picture

19 Sep 2008 - 12:54 am | भडकमकर मास्तर

त्यामुळे ही झाली आहे एक जंत्री - प्रसंगांची, घटनांची. एकूण अस्तित्त्वविषयक प्रश्नांचा , आपल्या सामाजिक बाबीचा त्याच्याशी असणारा संबंध याबाबतील हाताशी लागेल असे काही नाहीच.

अगदी करेक्ट...
विशेषतः शेवटी शेवटी स्वतःच्या अधःपतनात कौतुक करून घेण्यासारखं काय आहे?
( मी खूप हुशार आहे, मी आय ए एस होऊ शकतो पण होऊन तरी काय उपयोग आहे? कशालाच अर्थ नाही =सगळं शून्य आहे,म्हणून मी नशा, बाई वगैरे नाद करतो आणि वाया जातो, वेडा होतो )
अवांतर : काही पेशंट दाताच्या डॉक्टरला म्हणतात, " हा दात नाहीतरी कधीतरी पडणारच आहे, मग काढून टाका...."
..असलं काहीतरी लॉजिक वाटलं...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

19 Sep 2008 - 1:42 am | धनंजय

सहसा कादंबरीचे नैतिक मूल्य माझ्या मूल्यांपेक्षा वेगळे आहे, हा त्यातला दोष मी मानत नाही.

मास्तरांचे परीक्षण त्या अंगाने जात होते, असे मला वाटले, पण ते तसे नाही, म्हणून आवडले.

सबझूठवादाच्या समर्थनात कादंबरी लिहू नये असे नाही, पण तो मानव्य अनुभव म्हणून वाचकाला पटवता आला पाहिजे. स्वतःबद्दल खूप मुलींना लैंगिक आकर्षण वाटते असा वृथाभिमान असलेल्या तरुणाच्या दृष्टिकोनातून कादंबरी जर समर्थपणे लिहिली असेल तर मी जरूर वाचणार.

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो.

सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2008 - 9:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण दोन्ही समीक्षणांवरून असे दिसते की लेखक मानवी मनाचा अनपेक्षित पैलू (मग तो माझ्या दृष्टीने हीन का असेना) दाखवण्याचे काम समर्थपणे करत नाही - उलट कंटाळा आणतो.

मला शब्द सापडत नव्हते मास्तर आणि मुक्तसुनीत यांची परिक्षणं वाचून! पण धनंजय, तुम्ही माझं काम केलंत!

सारांश : हे पुस्तक मी विकत घेणार नाही, पण कोणा मित्राने विकत घेतले असेल तर फुकटात १५-२० मिनिटे चाळायचा विचार करतो आहे.
:-D

अभिज्ञ's picture

18 Sep 2008 - 7:03 pm | अभिज्ञ

मु़क्तसुनीतजी व मास्तर या दोघांचेहि परिक्षण आवडले व त्यांच्या मतांशी १००% सहमत.
विशेषतः मुक्तसुनीत जी ह्यांनी केलेले विमोचन आवडले.

मला ह्या कादंबरितील पहिली काहि पाने प्रचंड ओंगळवाणि वाटली.
मुसु म्हणतात त्याप्रमाणे पौगंडाअवस्थेतील काहि वर्णने अतिशय बकवास वाटली होती. मी त्यापुढेचे वाचायला गेलो नाहि.

अभिज्ञ.

विसोबा खेचर's picture

18 Sep 2008 - 10:44 pm | विसोबा खेचर

आंद्या, छोटा डॉन आणि अदिती,

कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर गप्पा मारून येथील मोकळ्या वातावरणाचा गैरफायदा घेऊ नये अशी हात जोडून कळकळीची विनंती...!

त्यामुळे मूळ धाग्याचे गांभिर्य/महत्व निघून जाते!

कृपया विनंतीचा जमल्यास विचार व्हावा अशी कळकळीची विनंती..

तात्या.

आनंदयात्री's picture

19 Sep 2008 - 11:16 am | आनंदयात्री

ओक्के बॉस्स !!
आज्ञेचे पालन कसोशीनी होईल !