काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
21 May 2008 - 2:56 am

१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला... पण कथेच्या दृष्टीने दोन तीन घटना तर अजिबात डोक्यात गेल्या...
माझ्या माहितीप्रमाणे लग्नघरातल्या वधूवर डोळा ठेवून तिथे स्वतःचे लग्न तिच्याशी लावण्यासाठी उपस्थित राहण्याची फ्याशन या सिनेमाने सुरू केली...जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. ते जाऊदे...

आणि ती हिरॉईन तरी कसली हो... अहाहा......म्हणजे बापाला वाईट वाटू नये म्हणून त्या दुसर्‍या नवर्‍याच्या फ्यामिलीची आणि त्या नवर्‍याचीच वाट लावायची, आणि त्यांच्या नकळत प्रियकराबरोबर गुण उधळायचे, प्रेमगाणी गात शेतांमध्ये हिंडायचे...च्यायला टू टायमिंग करणारी , शुद्ध फसवणूक करणारी (आणि त्याचे उदात्तीकरण करणारी) ही हिरॉईन.... प्रेमं करायची अक्कल आहे पण ते बापाला सांगायची, त्याला ते पटवून द्यायची अक्कल नाही, त्यासाठी जे काही सहन करावे लागेल , त्रास भोगावा लागेल त्याची भीती वाटते म्हणून ही बापाने ठरवलेल्या भारतातल्या मुलाशी लग्न करायला परवानगी देते ...आणि आपला यार आला की मग लपून छपून करा मज्जा... तिची आई त्यातल्या त्यात बरी, की ती म्हणते " पळून जा बाबा इथून या पोरीला घेऊन " पण हा हीरो तरी काय हो, तिच्या आईला वर तोंड करून सांगतो की " जगात अडचणी आल्या की सोपे आणि कमी कष्टाचे मार्ग असतात पण ते चुकीचे असतात "वगैरे वगैरे , म्हणजे तात्पर्य काय की हा तिच्या बापाला आपल्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल... आणि त्याच्याकडूनच लग्नाला परवानगी मिळवेल...
...
ठीक आहे, आता कथा इथपर्यंत चढवत नेलीय ना, तर शेवटी काहीतरी अजबच घडते....
-------------ती रेल्वे स्टेशनातली मारामारी घडते मग हा आपल्या बापाला म्हणतो की चला परत जाऊ...गाडीत चढतो , गाडी स्पीड पकडते आणि मग तिचा बाप तिचा घट्ट धरलेला हात सोडून देतो आणि म्हणतो जा...मग ती पळत जाऊन गाडी पकडते वगैरे...
----------------------- पण इथे मुख्य प्रश्न हा की बापाने तिला जायची परवानगी का दिली असेल??

आमचा अंदाज ...........त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत
" याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...

म्हणजे आता काय झालं ?
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?

महिलांनी चिडण्याच्या आत हे सांगू इच्छितो की आमचा आक्षेप हीरॊईनच्या ( इंटर्वलच्या आधीच्या ) उदात्त वगैरे प्रेमावर नसून तिच्या फ़सवाफ़सवीच्या वर्तनावर आहे... कोणावर कसे ( मानसिक आणि शारिरिक वगैरे ) प्रेम करायचे हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तिला बापाची भीती वाटते म्हणून एका संपूर्ण कुटुंबाची तिने फ़सवणूक करावी हे अगदीच वाईट...

( अवांतर : माझ्या कॊलेजातील ओळखीच्या एका मुलाच्या साखरपुड्यानंतर लग्नाच्या आधी काही दिवस ती मुलगी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली...या प्रचंड मनस्तापाला कोण जबाबदार ? दिदुलेजा या सिनेमात हीरॊईनचे काही चुकले नाही असे मानणारी ती पोरगी असावी )..

कथाचित्रपटप्रकटनविचारमतआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

मन's picture

21 May 2008 - 3:05 am | मन

मनातले प्रश्न बोललात.
मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत.
पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात.

(आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे.
थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.)

आपलाच,
मनोबा

अन्या दातार's picture

16 Jul 2008 - 11:50 pm | अन्या दातार

दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी.

आपला,
अन्या

टारझन's picture

17 Jul 2008 - 12:20 am | टारझन

दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला..
तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही....
आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या)

कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले.

एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले.

पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला...

त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही.

(स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

भडकमकर मास्तर's picture

21 May 2008 - 9:43 am | भडकमकर मास्तर

खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)...

बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते)

कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ?

आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही......
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

21 May 2008 - 6:09 am | मदनबाण

खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
:D

हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा.....

(मिस्टर इंडिया चा पंखा)
मदनबाण.....

पण कधी कधी असंही होतं...

म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं...

आता बोला...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर's picture

21 May 2008 - 8:53 am | विसोबा खेचर

याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे...
आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला..."....
जा बाई जा...

हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :)

मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात...

आपला,
(काजोलप्रेमी) तात्या देवगण.

भडकमकर मास्तर's picture

21 May 2008 - 9:46 am | भडकमकर मास्तर

मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात
धन्यवाद तात्या.... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

21 May 2008 - 10:13 am | भडकमकर मास्तर

आमची अजून दोन निरीक्षणे आहेत...
१. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं?
२. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते...
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो...

याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मन's picture

21 May 2008 - 1:57 pm | मन

हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...

जबरान...
:-)
आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...)
अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत.

दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते.

वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे.

(सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)

संताजी धनाजी's picture

16 Dec 2008 - 6:39 pm | संताजी धनाजी

अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
=))
ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.

मेघना भुस्कुटे's picture

21 May 2008 - 1:33 pm | मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर, जबरा! अजून येऊद्यात शिणेमे!

कल्याणी पेटकर - पोरे's picture

21 May 2008 - 3:49 pm | कल्याणी पेटकर - पोरे

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )

डॉ.प्रसाद दाढे's picture

22 May 2008 - 8:36 am | डॉ.प्रसाद दाढे

मस्त रे मास्तुर्‍ये.. अजुन लिवा..

वेताळ's picture

22 May 2008 - 10:12 am | वेताळ

हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क.
वेताळ

विसोबा खेचर's picture

22 May 2008 - 12:31 pm | विसोबा खेचर

गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची.

वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:)

आपला,
(जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.

धमाल मुलगा's picture

22 May 2008 - 12:19 pm | धमाल मुलगा

मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते...
मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?

हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :)
आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय?

बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन...

स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?

झकासराव's picture

22 May 2008 - 7:13 pm | झकासराव

मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>>
=))
मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :)
आवडल आपल्याला तुमच मत.
मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा.
आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल???
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

भडकमकर मास्तर's picture

23 May 2008 - 1:58 pm | भडकमकर मास्तर

आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल???
तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

15 Jul 2008 - 5:56 pm | टारझन

मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा.
आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल???
खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;)
असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात...
सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न)

(रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.


तू भारी ...तर जा घरी...

राजे's picture

22 May 2008 - 7:16 pm | राजे (not verified)

मास्तर.....
ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते ..
पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते !

उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :))

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

रुस्तम's picture

23 Nov 2012 - 6:07 am | रुस्तम

सहमत

मेघना भुस्कुटे's picture

23 May 2008 - 10:21 am | मेघना भुस्कुटे

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... "

अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :)

असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का?

हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.

धमाल मुलगा's picture

23 May 2008 - 10:37 am | धमाल मुलगा

जबरान् !!!!!

आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून.
एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :)
बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का?

दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही?
आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार...
तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत....
बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली...
काय बाई आहे का भिंताड?

येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख!

आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !

भडकमकर मास्तर's picture

23 May 2008 - 1:39 pm | भडकमकर मास्तर

एकाच पात्राच्या किती चुका...
१.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _
२.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला.
३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र

पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग)
अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय...
( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..."
... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :))
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

23 May 2008 - 1:42 pm | विसोबा खेचर

"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..."

=))

हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))

मन's picture

23 May 2008 - 4:55 pm | मन

मला सुचली ती अशी...
समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता,
तर त्याने:-
येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो.
आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती
येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती!
मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे.
मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन!
पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे.
मग?
करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं!
ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता!
(हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या
भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन!
आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच.
सगळाच कसा सुखांत!)

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

भडकमकर मास्तर's picture

23 May 2008 - 5:14 pm | भडकमकर मास्तर

(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या
भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन!

हहाहा... हे फारच आवडले...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

झकासराव's picture

23 May 2008 - 7:32 pm | झकासराव

हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या
भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन!
आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच.
सगळाच कसा सुखांत
=)) ................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

गिरिजा's picture

27 May 2008 - 4:46 pm | गिरिजा

मास्तर..

हा अभिप्राय तर अतिशयच अप्रतिम आहे!!! =))
चालु द्या..

चावटमेला's picture

23 May 2008 - 2:12 pm | चावटमेला

मस्तच मास्तर, लै भारी..
ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील

"अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"

धमाल मुलगा's picture

23 May 2008 - 2:17 pm | धमाल मुलगा

सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय....
अगाबाबो.....
त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)

मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून

:))

( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"

=)) =)) =))

स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)

सूहास's picture

20 Nov 2009 - 9:06 pm | सूहास (not verified)

धम्या शी सहमत ...

आता मास्तर पुढचा चित्रपट कधी ??

सू हा स...

निरंजन मालशे's picture

23 May 2008 - 5:03 pm | निरंजन मालशे

अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात.

मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.

शितल's picture

24 May 2008 - 3:40 am | शितल

मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत.
चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे.
त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार.
प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?

देवदत्त's picture

24 May 2008 - 12:34 pm | देवदत्त

मस्त आहे... दे धमाल :)

शरुबाबा's picture

24 May 2008 - 1:57 pm | शरुबाबा

बाकी तुमचे चालु द्या

मनिष's picture

27 May 2008 - 5:50 pm | मनिष

कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा -

(१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले.

(२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले.

(३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते.

पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली.

बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले....

- (फिल्मी) मनिष

अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :)

कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.

धमाल मुलगा's picture

27 May 2008 - 6:18 pm | धमाल मुलगा

मनिष,

छान सांगितलस :)

माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास.

अभिनंदन !

जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.

+++१

तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती

सही रे भिडू!

भडकमकर मास्तर's picture

28 May 2008 - 2:13 pm | भडकमकर मास्तर

फारच छान मनीष..

हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले...
वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

31 May 2008 - 9:54 am | मेघना भुस्कुटे

मनीष,

मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते.

त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो...

असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.

मनिष's picture

31 May 2008 - 11:10 am | मनिष

खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो.

आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.

मेघना भुस्कुटे's picture

31 May 2008 - 1:43 pm | मेघना भुस्कुटे

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल!

काही वेळा असे होते खरे.

बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला.

बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता.

पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार...

सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.)

असे अजून काही सिनेमे आठवताहेत?

मनिष's picture

31 May 2008 - 3:07 pm | मनिष

माझ्या तो अख्खा सिनेमाच डोक्यात गेला... मी शेवटी वैतागुन उठून आलो. भंसाळी परवडला पण करण जोहर.....

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2008 - 1:11 am | भडकमकर मास्तर

मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट.
हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क...
पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो...
मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो...
...
दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न...

तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती फडणीस's picture

17 Jul 2008 - 2:09 pm | स्वाती फडणीस

विश्लेषण आवडले :)

मास्तर - अमरिश पुरीचे स्वगत मस्तच!

काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा...
काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे -

चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!

मनिष's picture

28 May 2008 - 11:42 am | मनिष

शाहिद कपूर - करीना ह्यांच्या सिनेमाचे नाव "चुप-चुपके" होते! चुकीबद्द्ल क्षमस्व.

- मनिष
स्वगत : तसेही कोणी वाचलेले दिसत नाही! :)

बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...

भडकमकर मास्तर's picture

28 May 2008 - 2:10 pm | भडकमकर मास्तर

किती हिडिस कल्पना आहे ही??
खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट?
..
त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?)
बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो,
" माता कौन पिता कौन,
कचरे के डिब्बे में गिराया गया
कचरे के डिब्बेसे उठाया गया...."
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

28 May 2008 - 2:26 pm | भडकमकर मास्तर

लक्ष्य
हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही...
चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच....
.
..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______
ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी....
मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला...
( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे)

हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...)
लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा's picture

28 May 2008 - 2:36 pm | ऋचा

अस्साच एक डोक्यात जाणारा चित्रपट म्हणजे "कभी खुषी कभी गम"

~X(

मेघना भुस्कुटे's picture

31 May 2008 - 10:08 am | मेघना भुस्कुटे

आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!)
त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)

कोलबेर's picture

31 May 2008 - 10:17 am | कोलबेर

मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका!
अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!

मन's picture

28 May 2008 - 2:44 pm | मन

हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय.
त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो.
कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत.
आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी.
(थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.)
आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर.
इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे).
आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय.
बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.)
(हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती
बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत"
पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.)

तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच,
बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा.

आपलाच,
मनोबा

यशोधरा's picture

28 May 2008 - 11:52 pm | यशोधरा

>>> लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा?

जावेद अख्तर यांचा. दिग्दर्शन फरहानचे.

मेघना भुस्कुटे's picture

31 May 2008 - 10:02 am | मेघना भुस्कुटे

'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्‍या.

आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे.

मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.

कोलबेर's picture

31 May 2008 - 11:35 am | कोलबेर

अगदी खरंय...अरे तुच का तो 'दिल चाहता है' बनवणारा??? असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो होतो.

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2008 - 1:00 am | भडकमकर मास्तर

_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _

फार छान वाक्य...
अगदी हेच म्हणतो...
____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

13 Jul 2008 - 4:19 pm | भडकमकर मास्तर

आता थोडं लिहितो
ओम शांती ओम बद्दल...
मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत..
__________
शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग?
गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना...
त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

14 Jul 2008 - 6:43 am | मेघना भुस्कुटे

मला नाही असं वाटलं.
शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं.
आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?

भडकमकर मास्तर's picture

16 Jul 2008 - 9:42 pm | भडकमकर मास्तर

आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय?
आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच...
... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ?
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

17 Jul 2008 - 12:40 pm | मेघना भुस्कुटे

कदाचित बरोबर आहे तुमचं.

मुक्तसुनीत's picture

14 Jul 2008 - 6:51 am | मुक्तसुनीत

दुसरा धागा सुरू करा .. नवीन पोस्ट्स वाचताना लई त्रास होतोय आता ..

छोट्या's picture

15 Jul 2008 - 4:31 pm | छोट्या

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ...
कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family).
अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का?

आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे...
उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत.
याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो.

आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले???

त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.

भडकमकर मास्तर's picture

16 Jul 2008 - 9:31 pm | भडकमकर मास्तर

तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा.....
लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल...

आणि ९५ % लव्ह स्टोर्‍यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद...
तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही??
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोट्या's picture

17 Jul 2008 - 12:30 pm | छोट्या

काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का?

शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे.
उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा.

आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Jul 2008 - 1:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा
=))
पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या.

(टुकार सिनेमांची चाहती) अदिती

स्वाती फडणीस's picture

17 Jul 2008 - 2:25 pm | स्वाती फडणीस

:)

गिरीराज's picture

17 Jul 2008 - 3:54 pm | गिरीराज

आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>>

अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मध्यमवर्गीय's picture

18 Sep 2008 - 8:33 pm | मध्यमवर्गीय

मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये.

व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का?

तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून.

स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो.
(रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.)

पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन.
प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे.

एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

भडकमकर मास्तर's picture

27 Sep 2008 - 12:06 am | भडकमकर मास्तर

एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.
लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हाहाहा! फारच भारी!
लेख आणि बर्‍याच प्रतिसादांशी सहमत :)

फारएन्ड's picture

10 Sep 2010 - 5:46 am | फारएन्ड

एकदम आवडला :)

मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

चिगो's picture

12 Sep 2010 - 12:10 pm | चिगो

मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

चिंतामणी's picture

12 Sep 2010 - 1:00 pm | चिंतामणी

जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली.

चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

भडकमकर मास्तर's picture

12 Sep 2010 - 11:40 pm | भडकमकर मास्तर

त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते.
मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Sep 2010 - 1:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D

मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!

एमी's picture

14 Jun 2012 - 8:40 am | एमी

:-))

मंदार कात्रे's picture

26 Nov 2012 - 10:12 pm | मंदार कात्रे

मास्तर फुल्ल फोर्म मध्ये............लय भारी !

हाडक्या's picture

12 Aug 2014 - 4:53 pm | हाडक्या

मिपावर कधीकाळी संयतपणे बहुरंगी चर्चा (कोणत्याही संपादकीय हस्तक्षेपाशिवाय) चाललेली पाहून ड्वाले पाणावले.. ;)