दि : २१.नोव्हें.२०१०;
आज आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे.
प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रमालिकेतुन प्रसिद्ध होउन लहानांपासुन मोठ्यांपर्यंत ईतर कोणत्याही बातमी कडे कटाक्ष टाकण्यापुर्वी चिंटू कडे जायला भाग पाडतो...ह्यातच ह्या मालिकेचे यश सामावलेय..
सतत दोन दशके वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चिंटू २० व्यात पदार्पण करणार.
चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा मानसपुत्र असलेला चिंटू आपल्या घरातील आजी अजोबांचा नातु तर आई-वडिलांचा मुलगा..आणि घरातील लहानांचा भाउ...आणि काही लहानगे तर स्वतःलाच चिंटूच्या रुपात पहातात...तर काही आईवडील आपल्या लहानग्याला चिंटू च्या रुपात पहातात...तर काही प्रौढ आपले कालौघात हरवलेले बालपण चिंटूत शोधतात..
चिंटूचे विनोद हे निखळ असतात..हे विनोदच त्याचे निरागसपण २० वर्ष अखंड टिकुन राहण्यास सहाय्य करतात..
लहानपणी चिंटू त्याचे आई-बाबा,आजी-आजोबा,त्याचे मित्र मिनी,पप्पू,बगळ्या,सोनू,राजू,त्याच्या त्या जोशीकाकू हे सर्वजण आपल्या आजूबाजूलाच राहतात असं वाटायचं.
आपले बालपण काळाच्या ओघात संपते पण ते बालपण पुन्हा एकदा सकाळी सकाळी आठ्वुन चिंटूच्या कोट्यांनी ओठावर मंद स्मित आणुन दिवसाची छान सुरवात करुन देणार्या त्याच्या निर्मात्यांचे शतश: आभार...
चिंटू खुप खुप मोठा हो...वयाने नाही प्रसिद्धिने..तुला वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...
चिंटूच्या सकाळमधे दर वाढदिवशी प्रसिद्ध होणार्या स्ट्रिप्स पैकी काही......
प्रतिक्रिया
21 Nov 2010 - 8:10 pm | शैलेश हिंदळेकर
चित्रे अपलोड करण्याची पद्धत फारच किचकट आहे. प्रयत्न केला पण निष्फ्ळ. तसेच, प्रसिद्ध केलेला मजकूर एडिट करणे जमले नाही. योग्य मार्गदर्शन कुठे मिळेल ?
21 Nov 2010 - 8:16 pm | डावखुरा
योग्य मार्गदर्शन
21 Nov 2010 - 9:08 pm | उल्हास
अभिनंदन व शुभेच्छा