काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :) -- भाग दुसरा.

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
26 May 2008 - 7:16 pm

या पूर्वी,

काही आत्मचरित्रं! काही व्यक्तिचित्रं! :) -- भाग पहिला.

ऋणनिर्देश -

मिसळपावच्या एक सुगरण सदस्या चकली यांच्या ब्लॉगवरून या लेखातील मिसळीचे प्रकाशचित्रं घेतले आहे.

राम राम मंडळी,

काय ओळखलंत का मला? अहो मी मिसळ! आपल्या सर्वांची लाडकी! आपल्या सर्वांना माझा नमस्कार आणि माझ्या संकेतस्थळावर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत! :)

हो, माझंच संकेतस्थळ आहे हे. अगदी माझ्या नावागावाचं! माझ्या मायमराठीतील एका संकेतस्थळाला माझं नांव लागण्याचा बहुमान मला मिळाला आहे. तात्या नावाच्या माझ्यावर निस्सीम प्रेम करणार्‍या एका इसमाने मला हा बहुमान दिला आहे! :)

हे संकेतस्थळ माझ्या नावाचं आहे याचा मला निश्चितच आनंद आहे. आज आपल्यासारखी चार गुणी, विद्वान, सर्जनशील, सृजनशील माणसं इथे येतात, दिवसातून एकदा तरी या संकेतस्थळाची आणि पर्यायाने माझी आठवण काढतात ही माझ्याकरता अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे! खरं तर स्वत:बद्दल फार बोलू नये असं म्हणतात परंतु मलाही कधी कधी माझ्या मनातलं कुणाशी तरी भरभरून बोलावसं वाटतं! आणि म्हणूनच आज मी माझ्यावर मनापासून प्रेम करणार्‍या तुम्हा सर्व खवैय्या रसिकांशी थोड्या गप्पा मारायचं ठरवलं आहे.

माझा जन्म काय, कुठला याबद्दल मला काहीच आठवत नाही. मी कोण, कुठली, कुठून आले याबद्दलही मला कल्पना नाही. परंतु एक मात्र खरं की मी मराठी आहे, महाराष्ट्राची आहे आणि या गोष्टीचा मला प्रचंड म्हणजे प्रचंड अभिमान आहे! ज्ञानोबातुकोबाची बोली हीच माझीही बोली आणि शिवबाचा महाराष्ट्र हाच माझाही महाराष्ट्र!

मी आवडत नाही असा माणूस विरळाच. लोकांनी माझ्यावर अगदी भरभरून प्रेम केलं. तशी बटाटावडा, भजी, थालिपीठ ही माझी आत्येमामेभावंडही खूप लोकप्रिय आहेत परंतु माझ्याइतकं प्रेम आजवर क्वचितच कुणाला मिळालं असेल! तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं! :)

पण मंडळी, तशी मी स्वभावाने गरीबबिरिब नाही बरं का! नेळभटपणा, गुळमटपणा माझ्या स्वभावात बसतच नाही! एकदम मस्त, झणझणीत आणि चमचमीत स्वभाव आहे माझा! आणि तुम्ही लोकं माझ्या झणझणीत व चमचमीतपणावरच तर भरभरून प्रेम करता! माझा चविष्टपणा हीच माझी सर्वात मोठी दौलत!

माझ्याइतकं ग्लॅमर फारच कमी पदार्थांना मिळालं असेल! इथे मिपावरही मी येते अधनंमधनं, इथेही अनेक मंडळी अगदी न दमता माझ्याबद्दल चर्चा करत असतात हे पाहून मला गंमत वाटते! मी कुठे चांगली मिळते, ठाण्याच्या मामलेदार कचेरीजवळची की कोल्हापुरातली? पुण्याच्या रामनाथमधली की काटा कीर्र मधली? लोकांना अगदी चवीपरीने माझ्या नावाची चर्चा करताना पाहून गंमत वाटते. प्रत्येकजण अगदी दांडग्या उत्साहाने, 'अमूकअमूक ठिकाणी गेलो होतो ना, तिथे काय झक्कास मिसळ मिळाली होती!' असं सांगतो तेव्हा माझा ऊर अभिमनाने भरून येतो! अहो नुसतं माझं नांव जरी उच्चारलं तरी लोकांच्या चेहेर्‍यावर एक प्रसन्नतेची रेषा उमटते त्यामुळे माझ्यात अशी काय खासियत आहे हे कधी कधी माझं मलाच कळेनासं होतं. वास्तविक, चवीने चांगली तिखट आणि झणझणीत असूनही माझं इतकं कसं काय कौतुक होतं असा माझा मलाच प्रश्न पडतो!

पाव!

त्याच्याबद्दल मी काय बोलू? माझा अत्यंत जिव्हाळ्याचा सखा! माझा सर्वात जवळचा दोस्त! पावाशिवाय मी, ही कल्पनाच मला सहन होत नाही. शब्दांपलिकडचं नातं आहे आम्हा दोघांचं! तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता! हे मी खास तुम्हाला म्हणून सांगत्ये, कुठे बोलू नका बरं! :)

लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत. तसा मी काही कुणी अनवट पदार्थ नव्हे, शाही नाष्टा वगैरे तर मुळीच नव्हे! साधेपणा परंतु तेवढाच चमचमीतपणा हेच माझे स्वभावविशेष! आणि माझ्या या साधेपणामुळेच पॉश ठिकाणी, मोठमोठ्या पंचतारांकीत हाटेलांमध्ये माझं मन रमत नाही! कोपर्‍यावरील एखाद्या मारुतीशेजारची एखादी वळचणीची साधी टपरी, "अरे पोर्‍या जरा फडका मार!" किंवा "एक इसम बारा आणेऽऽ" अश्या दिलखुलास आरोळ्या असलेलं सामान्य जनांचा वावर असलेलं एखादं हाटेल किंवा एखाद्या गजबजलेल्या यष्टीष्टँडचं कँटीन या माझ्या अगदी लाडक्या जागा!

काय म्हणालात? इन्ग्रेडियन्टस कोणते?

इश्श्य, हा शब्द ऐकून मला बाई मुळी अगदी लाजल्यासारखंच झालं हो! :)

अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान!

मंडळी, अमूक एक गोष्टीचा आग्रह न धरता असेल त्या परिस्थितीत स्वत: खुलावं आणि लोकांनाही खुलवावं, आनंद द्यावा ह माझा स्वभाव. मी माझ्या नावाप्रमाणे आहे. सर्वांशी मिळूनमिसळून वागणे, जमवून घेणे आणि स्वत:ही जमेल तितक्या चविष्टपणाने जगणे हाही माझाच स्वभाव! आणि माझ्या मते आपल्या प्रत्येकानेच हा स्वभाव अंगिकारला पाहिजे तरच दोन घटकांच हे आयुष्य सुखी होईल, समाधानी होईल! जीवन म्हणजे नुसतंच सगळं छान छान, गुडी गुडी नव्हे हे माझी झणझणीत तर्री तुमच्या नाकातोंडात पाणी आणून तुम्हाला शिकवते! परंतु एवढं होऊनही तुम्ही अगदी शेवटचा चमचा हौशीहौशीने, आवडीआवडीने खाऊन मला संपवताच की नाही?! :)

काय म्हणालात? जाता जाता संदेश काय देऊ?

अरे माझ्या देवा! अहो संदेशबिंदेश देण्याइतकी मी मोठी महान नाही हो!

जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!

आपलीच,
मिसळ!

संस्कृतीवाङ्मयमौजमजाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

ऍडीजोशी's picture

26 May 2008 - 7:23 pm | ऍडीजोशी (not verified)

लै भारी. मिसळीसारखंच चमचमीत आणि झक्कास :)

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

26 May 2008 - 7:38 pm | स्वाती दिनेश

तात्या,मिसळ झक्कास!
स्वाती

प्राजु's picture

27 May 2008 - 11:56 am | प्राजु

मिसळपाव आणि तात्या अभ्यंकर.

जबरदस्त आहे...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पिवळा डांबिस's picture

26 May 2008 - 9:38 pm | पिवळा डांबिस

आरं आरं तात्या,
ह्यो काय गोंधळ घातलास रं?
तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!!
ह्ये म्हंजे शेवंता सातारकरणीचा नाच "गडकरी रंगायतन" मधी पायल्यासारखं वाटतंय!!:)
आरं तमाशाची मजा उघड्या फडातच आसतीय!!

आमी हिथेच मागं वाचलं होतं, "बेंड फुटेपर्यंत तिखट मिसळ खानं ही भटा-बामनाची कामं नव्हंत, त्येला मराठा न्हायतर बहुजनसमाजच लागतोय!" किती समजदार ल्येखक व्हता राव त्यो!! आता न्हायी बगायला गावायचे ल्येका आसले पावरबाज लेखक!!:))

मापी कर, पायजे तर आमची शिकार कर (न्हायतरी हल्ली मिपावरचा लई पापुलर खेळ हाय त्यो!!!:)) आनि मुंडकं टांगून ठीव तुज्या भित्तीवर आमचं!
पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं?

टकुरं औट झाल्येला,
पिवळा डांबिस

कोलबेर's picture

26 May 2008 - 9:39 pm | कोलबेर

परतीसाद लै आवडला बरंका!!
डांबीसकाका अता तुमीबी टाका लिवुन एक झनझनीत मिसळ चरित्र!
तेवडं शेवटी 'मिसळ खाल्य्याने ऍशीडीटी वाडते' असलं सोशल म्यासेज टाकू नका म्हंजी झालं :))
ह घ्या! न्हायतर म्हनाल आमिबी पॉप्युलर खेळ खेळालोय!

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 9:52 pm | विसोबा खेचर

तू 'मिसळबाई चव्हाण' ला येकदम 'मिसळताई अभ्यंकर' च केलीस की!!

हा हा हा! डांबिसा, आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार? :)

पन आपल्या ठसकेदार मिसळबाईला तांदूळ निवडत बसवायची ही अवदसा तुला कशी सुचली रं?

पण मला सांग डांबिसा, 'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का? मिसळीचं व्यक्तिचित्रं रंगवताना मी थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे. 'ठसकेबाज' हे एक महत्वाचं लक्षण आहे हे खरं, परंतु या एकाच विशेषणावर मिसळ थांबते का?

टकुरं औट झाल्येला,

हा हा हा! अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस? चालायचंच! :)

बाय द वे, तूही रंगव मिसळीचं व्यक्तिचित्रं! ते माझ्यापेक्षा निश्चित कितीतरी सरस असेल याची मला खात्री आहे आणि मला ते वाचायला आवडेल!

शिवाय, खाद्यपदार्थांची व्यक्तिचित्रं/आत्मचरित्र या मी चालू केलेल्या लेखनप्रकारात एक मोलाची भरही पडेल! मला त्यात समाधानच असेल! :)

तुझा,
तात्या.

पिवळा डांबिस's picture

26 May 2008 - 10:36 pm | पिवळा डांबिस

आता आम्ही आहोतच अभ्यंकर, मग आम्ही चव्हाणांसारखं कसं लिहिणार?
त्ये बी खरंच!! :))
आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!!

'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का?
व्हऽऽऽऽऽऽय!
कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!! :))

थोडाफार तिचा रुपकात्मकही विचार केला आहे.
आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!!
आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी. आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!:)

अरे गावितमास्तर फसला म्हणून इतकं टकुरं आऊट करून का घेतोस?
आता तूच ईषय काडलास म्हनून बोलतो (न्हायतर 'त्या' धाग्यावर आमी कायसुदिक बोल्लेलो न्हायी)
आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला?
पर्तिक्रिया दिलेल्या मिपाकरांची मोजनी करून बघ (एका मिपाकराचं मत एकदाच मोजून हो! म्हंजे रिगिंग न करता!!:))
गावितमास्तर आवडलेली लोकं, न आवडलेल्या लोकांपेक्षा अनेकपटींनी जास्त हायेत, र्‍हातूस कंच्या गावात!!

मान ताठ ठीवून फिरनारा,:)
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

26 May 2008 - 11:49 pm | विसोबा खेचर

आमचंच चुकलं म्हना की! आमाला वाटलं की तात्यासारक्या तरबेज लेखकाला सहज जमंल त्ये!!

हम्म! तसे आम्ही तरबेज लेखक आहोत पण आम्हाला सगळंच जमतं असं नाही! आम्हाला जसं जमलं तसं आम्ही लिहिलं आहे.. :)

व्हऽऽऽऽऽऽय!
कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!!

हम्म! या मुद्द्यावर आपल्या दोघांचा नजरिया वेगळा आहे. आमच्या मते मिसळीत ठसकेबाजाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी आहेत!

आरं व्हय, पन त्ये पन "ठसक्यात" करता न्हायी येत व्हय रं? आरं नाथांच "इंचू चावला" रुपकात्मकच हाय की!!

हो पण ठसक्याव्यतिरिक्त मिसळीत अनेक गोष्टी आहेत असं आम्ही आधीच म्हटलं आहे त्यामुळे केवळ मिसळ झणझणीत असते म्हणून मुद्दाम ओढूनताणून त्यात ठसका आणावासा असं आम्हाला वाटला नाही! शिवाय आम्हाला ठसक्याची भाषा १००% जमली असती असंही नव्हे, त्यामुळे आम्ही आपलं आमच्या बोलीभाषेत लिहायचा प्रयत्न केला आहे. नाहीतर धड शहरी नाही आणि धड खेडवळ ठसक्याची नाही असा घेडगुजरीपणा झाला असता! ;)

आसो, तुज्या लिखानाची सालं काडण्याइतकी आमची अडान्याची लायकी न्हायी.

हम्म! हे मात्र खरं! नाहीतर उद्या आम्ही संगीतावर एखादा अवजड लेख लिहून मोकळे होऊ आणि त्यात तुम्हाला 'सा' देखील लावता यायचा नाही! :)

आमाला जे वाटलं त्ये लिवलं. तवा रागावर घ्येऊ नको राजा!!

छे रे! अरे या तात्याचे विरोधक/समिक्षक अगदी चिक्कार आहेत! त्यात तू एक! तेव्हा रागावू कशाला सायबा?! :)

आणि माझे मुद्दे मला कितीही खरे वाटत असले तरी 'लेखन मिसळीसारखंच ठसकेबाजच हवं होतं!' या तुझ्या मुद्द्याचा मी आत्ताही आदरच करतो! :)

आरं कोन आंधळा म्हनतो की गावितमास्तर फसला?

इतरांच्या प्रतिसादांचा आदर करून गावित मास्तर फसला असंच मी म्हणेन! :)

आपला,
(आंतरजालीय व्यक्तिचित्रकार) तात्या.

पिवळा डांबिस's picture

27 May 2008 - 6:53 am | पिवळा डांबिस

बरं बाबा, तुजं खरं!:)

विसोबा खेचर's picture

27 May 2008 - 8:05 am | विसोबा खेचर

दे टाळी!

चल, साला तुझं पण खरं! असेच वरचेवर कान पिळत रहा, त्यातूनच एकमेकांचे विचार एकमेकांना कळतात, सुधारणेस वाव मिळतो! :)

झणझणीत, ठसकेबाज, गावरान, चव्हाण ष्टाईल लिहिलं नाही एवढं मात्र खरं! कदाचित लिहिता आलं असतं किंवा नाही याचीही शंका होती, त्यामुळे ती ष्टाईल न चोखा़ळता माझ्याच भाषेत लिहीलं! शंकर पाटील, व्यंकटेशतात्या, ना धो महानोर यांची ष्टाईल, यांचा बाज, मनात कुठेतरी इतका पक्का आहे की त्या बाजाला हात घालताना उगीच त्या गावरान भाषेच्या ताजमहालाला माझ्यासारख्या शहरी मुंबईकराने आपली वीट का लावावी हाच कळीचा मुद्दा होता..!

तुझा,
(मिसळप्रेमी) तात्या.

प्रियाली's picture

26 May 2008 - 10:20 pm | प्रियाली

हाहा! प्रतिसाद आवडला.

मिसळ बाई असती तर पद्मा चव्हाण नाहीतर उषा चव्हाणसारखी दिसली असती. मादक, तिखट आणि सणसणीत ;-)

उगीच इथे गरज नसताना उषाकिरणची (तशी ती इतरत्र मला आवडते) आठवण झाली

अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2008 - 10:32 pm | बिपिन कार्यकर्ते

अवांतरः च्या**! या नेटावर या दोघींचा एकही धडाकेबाज फोटु नाही.

ताई, तुमच्या दु:खात मी सामिल आहे... :''( :''( :''(

बिपिन.

धमाल मुलगा's picture

27 May 2008 - 1:51 pm | धमाल मुलगा

आईशप्पथ!!!

काय जब्बरा डोकं चाललय :)
मस्तच.
माझ्या डोळ्यापुढे 'गुपचुप गुपचुप' मधल्या पद्मा चव्हाण आल्या...बाथटबमधल्या... 'पाहिले ना मी तुला..' गाण्याच्या वेळच्या.....
मिसळही आता मला अशीच मादक दिसणार यापुढे.

बाकी, ताटली/वाडग्याच्या टबात, तर्रीमध्ये पहुडलेल्या मिसळीच्या चेहर्‍यावरही बाथटबातल्या पद्मा चव्हाणांसारखेच भाव असतील नाही का? :)

तात्याबा,
मिसळ आख्यान मस्तच.

जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!

क्या बात है! एकदम खरं.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2008 - 10:30 pm | बिपिन कार्यकर्ते

लेख एखाद्या उत्तम मिसळी सारखा फक्कड जमला आहे.

प्रियालीताईंशी सहमत. मिसळ बाई असती तर उषा नाही तर पद्मा चव्हाण सारखी दिसली असती. १००%, वादच नाही.

बिपिन.

विजुभाऊ's picture

27 May 2008 - 7:21 pm | विजुभाऊ

मिसळ बाप्या असती तर............?
नाना पाटेकर..........हे एकमेव उदाहरण डोळ्यापुढे येते.
उगाच राजा गोसावी / रमेश देव आठवत नाहीत.

फटू's picture

26 May 2008 - 11:22 pm | फटू

लय भारी...

तुमच्या मिसळीच्या झणझणीत वर्णनाने आमच्या तोंडाला पाणी सुटले ....

(अमेरिकेत असल्यामुळे झणझणीत मिसळ खाणे शक्य नसलेला एक अभागी जीव)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पक्या's picture

27 May 2008 - 9:26 pm | पक्या

मिसळीचे व्यक्तिचित्रण छान झाले आहे. हे लिहीताना गावरान भाषा टाळली ते बरे झाले.
असेच वाचायला छान वाटतयं . चटपटीत, खुमासदार.
फक्त सन्केतस्थळ आणि मीपाकर हा उल्लेख नको होता ..त्यामुळे ते जास्त वैयक्तिक वाटतय. जनरल मिसळीबाबत लिहीलेलं वाटत नाही. ह्यावरचे पहिले २ परिच्छेद सोडले तर बाकी मिसळ उत्तम जमली आहे.

'ठसकेबाज' हे एवढं एकच विशेषण मिसळीला लागू होतं का?
व्हऽऽऽऽऽऽय!
कारन नंतर दुसर्‍या इशेशनाची गरजच लागत न्हायी!!

मिसळ नुसतीच ठसकेबाज असेल तर फक्त आग आग च होणार. त्या ठसक्यांनीच माणूस बेजार होऊन जाईल. ती चमचमीत, चटपटीत ,चविष्ट , परत परत खावीशी वाटेल अशीच हवी.
-- (मिसळप्रेमी ) पक्या

मुक्तसुनीत's picture

27 May 2008 - 4:42 am | मुक्तसुनीत

तात्या,
नेहमीप्रमाणे , तुमचा हाही लेख जमलाय. आणि हा लेख जमणारच ! मिसळपाव नि तुम्ही म्हणजे जिवाशिवाची भेटच की !
'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' हे आम्हाला जमो न जमो , ज्याना ते जमले त्याना आमचा पहिला सलाम ! अहो म्हणून तर इथे यायचे !

आनंदयात्री's picture

27 May 2008 - 12:23 pm | आनंदयात्री

मस्त जमलेय, तुमच्या शैलीनुसार अन या मालिकेतल्या आधीच्या पदार्थांच्या वर्णनाला सुसंगत असेच वर्णन आहे. आवडले.

>>परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे

मस्तच ... पुढेमागे मिसळ अन पावाची प्रेमकहाणी पण लिहुन टाका .. लै लै भारी होईल ..

शितल's picture

27 May 2008 - 4:55 am | शितल

तात्या,
मिसळी सारखाच चवदार लेख, आणि फोटो ही एकदम बेस्ट,
तुम्ही असे लिहिल्यावर आम्हाला ते पदार्थ करायचा आणखी ऊत येतो.
परवाचे लग्नाच्या वाढदिवसाला मैत्रीणी॑साठी मिसळ केली होती. सगळ्याजणी खुश.

चतुरंग's picture

27 May 2008 - 6:49 am | चतुरंग

खुसखुशीत आणि खुमासदार झालंय आता लवकरच मिसळ करावी लागणार! ;)

चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2008 - 7:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झणझणीत मिसळीचं आत्मनिवेदन आवडलं !!!

''जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!

हे बाकी लै भारी, हे मिसळीचे निवेदन की तात्याचं निवेदन असा विचार आला, पण लगेच उत्तरही मिळालं 'दो जीस्म मगर एक जान है हम'

अवांतर : आपला स्वभावही आम्हाला मिसळीसारखा झणझणीतच वाटतो. फक्त मिसळीत स्वीट नसते इतकाच काय तो फरक :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राजे's picture

27 May 2008 - 1:55 pm | राजे (not verified)

हेच म्हणतो !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

छोटा डॉन's picture

27 May 2008 - 8:24 am | छोटा डॉन

तात्या तुमचे मिसळ आख्यान खरचं जबरा झाले आहे ...
मिसळीबद्दल इतके तुम्ही लिहले आहे की ते वाचून आज दुपारी आमचा रॉयल लंच म्हणजे राईस्-सांबार खाणे अवघड आहे.
रविवारी मिसळ खायला जावेच लागणार मग ती भले ३५ रुपये प्रती प्लेट का असेना !!!

पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
हे बाकी खरं हा...

पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे
एकदम अव्वल नंबरी बात. आमचा पण अनुभव काही असाच आहे ...

जीवन म्हणजे फक्त सुख नव्हे की फक्त दु:ख नव्हे! तर ती आहे सुखदु:खाची एक सरमिसळ! 'झणझणीतपणे लढा, झगडा, हिंमतीने पुढे चला, चवीने जगा, चमचमीत जगा, कृतार्थ जगा!' एवढंच सांगेन...!

वाह, क्या बात है. मस्त !!!

एकंदरीत मिसळाअख्यान हे चमचमीत आहे ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चेतन's picture

27 May 2008 - 11:34 am | चेतन

तात्या फोटुबघुन तोंडाला पाणी सुटलं (का खिजवताय राव) :''(
आता दिवसभर मिसळ कायं डोळ्यासमोरुन जायचि नायं

लोकं माझ्या चमचमीतपणावरच प्रेम करत असावेत

१०००% खरं

अवांतर : थोडि चमचमीत मिसळ झालि असति तरं आणखिन मजा आलि असती

मिसळिवर ताव मारणारा चेतन

अरुण मनोहर's picture

27 May 2008 - 12:53 pm | अरुण मनोहर

>>> तुम्ही हॉटेलात गेलात तर तुम्हाला अगदी दहा पदार्थांची नावं असलेला बोर्ड दिसतो. परंतु त्यात 'चमचमीत मिसळ' हे नांव वाचताचक्षणी, 'अरे वा! मिसळपण आहे का?!' असा विचार तुमच्या मनात डोकावून जातो की नाही ते सांगा बरं!
>>> अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान!

मानल तुम्हाला तात्या. इन्टरनेट हॉटेलातील मिपाचे खूप झकास वर्णन केलेत.
--- खवय्या.

मनिष's picture

27 May 2008 - 2:25 pm | मनिष

मिसळआख्यान एकदम चवदार झालय!

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2008 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

'तोडलंत हो तात्या तुम्ही, तोडलंत अगदी.'
झकास वर्णन आणि जीभ जमीनीपर्यंत बाहेर यावी असा फोटो...स्स्स्स्स्स्स्स! खासच.

लाल भडक, तेजतर्रार तर्रीत पावाचा तुकडा बुडवून चारही बाजूंनी लालबूंद होऊन बाहेर येतो आणि पहिलाच घास बनून जिभेवर विसावतो त्या बरोबर ठण्, ठण्, ठण्, ठण् असा खणखणीत ढोलकीचा ताल कानावर पडून लावंण्यवती तमासगिरनीची जी जीवघेणी अदा सुरू होते ती मिसळ संपली तरी कानात, मनात निनादत राहते. रोम, रोम पुलकित होऊन जीव मस्तपैकी तरंगत राहतो आणि तोंडून उत्स्फुर्त दाद जाते..... व्वाह! मिसळ...!

मनस्वी's picture

27 May 2008 - 2:54 pm | मनस्वी

तात्या
मिसळीचे आत्मचरित्र आवडले.
पण चिंच-गूळ टाकल्यासारखे वाटले. तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर's picture

27 May 2008 - 3:52 pm | विसोबा खेचर

तिखटाचा जाळ आणि नाका-डोळ्यातून पाणी आले असते तर आणखी मज्जा आली असती.

म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय? मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का! मलाही वाचायला आवडेल! :)

तात्या.

मनस्वी's picture

27 May 2008 - 6:55 pm | मनस्वी

म्हणजे कसं लिहायला हवं होतं हे सांगाशील काय?

का नाही! (तात्या.. हा जोक चांगला होता.)

मिसळ ही फक्त तिखटजाळ नसून चवदारही असते हा मुद्दा मात्र आला पाहिजे बरं का!

हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!

मलाही वाचायला आवडेल!

तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते. तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर!
:)

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विसोबा खेचर's picture

28 May 2008 - 11:08 am | विसोबा खेचर

हा मुद्दा नसून हेच तर गिमिक आहे मिसळीचं!

तुला 'गमक' म्हणायचे आहे की 'गिमिक'?

'गमक'असेल तर तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु 'गिमिक' म्हणायचं असेल तर मला ते बरोबर वाटत नाही..

तिखटजाळपाणा हे मिसळीचं एक वैशिष्ठ्य आहे हे नक्कीच मान्य! परंतु तिखटजाळपणा हा चवदारपणापुढे शेवटी केवळ एक गिमिकच ठरतो असं मला वाटतं!

मी हा लेख लिहिताना गिमिक्स पेक्षा गमकांना अधिक महत्व दिलं आहे. हां, आता त्यात मी कितपत यशस्वी झालो आहे ह भाग वेगळा!

तात्या.. मलाही लिहायला आवडेल. पण लेखनकलेची देणगी मला लाभलेली नाही असे मला वाटते.

असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!

राईट? :)

आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील! निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

तोडकामोडका प्रयत्न केलाच तर टाकेनच नक्की मिपावर!

नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!

तात्या.

छोटा डॉन's picture

28 May 2008 - 11:18 am | छोटा डॉन

मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का? तसा तो कर असं माझं तुला सांगणं आहे. फार फार तर काय होईल? तुझं लेखन कुणाला आवडणार नाही, त्याला कुणी बरवाईट प्रतिसाद देणार नाही! मगच 'मला लेखनकलेची देणगी मिळालेली नाही' असं कदाचित तू म्हणू शकतेस! पण किमान पाच दहा वेळा काही लिहिण्याचा प्रयत्न केल्याशिवाय, आपल्या मनातले विचार मनमोकळेपणाने उतरवून पाहिल्याशिवाय असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं!
मनस्वी, तात्या म्हणतायत ते बरोबर आहे ...
तु खरच लिही ....
प्रतिसाद देणारे काय कसेही देतील, आपण त्यातुन चांगले तेवढे घ्यायचे ...
बाकी रंगाचा बेरंग करायला काही "माकडे" टपलेली असतात पण घाबरनेका नही ... आपण असल्या लोकांना पुरुन उरु !!!

तेव्हा टाक तुझा लेख !!!

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

28 May 2008 - 12:23 pm | मनस्वी

तात्या.. इथे मला 'गमक' आणि 'गिमिक' मधला फरक कळत नाही आणि डायरेक्ट लेख वगैरे लिहू??

असं म्हणू नकोस. हे म्हणण्याआधी मिपावर किमान पाच दहा वेळा तरी लिहायचा प्रयत्न केला आहेस का?

बरोबर आहे.. पण पाच-दहा काय.. एकदा जरी सुचले नीट काहीतरी तरी खूप.

आणि मला कुठेतरी अशीही खात्री आहे की तुला हे नक्कीच जमेल आणि तू उतम लेखन करशील!

घाबरले ना मी!

निदान तसा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

तेव्हा टाक तुझा लेख !!!

काही खरं नाही.. आता मनावर घेतलेच पाहिजे.. बघते.. प्रयत्न करून बघते. राईट! :)

नक्की टाक, मी वाट पाहीन! तुझं लेखन उत्तमच असेल...!

थोडा वेळ लागेल. पण नक्कीच टाकेन. मोटिव्हेशनसाठी धन्यवाद तात्या.
आणि तुझ्या शब्दांबद्दल थँक्स् डान्या.

:)

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

वरदा's picture

27 May 2008 - 7:06 pm | वरदा

आहे मिसळाख्यान....
आता एकदा केली पाहिजे...

स्वाती राजेश's picture

27 May 2008 - 7:09 pm | स्वाती राजेश

मिसळीचे आत्मकथन आवडले..
अहो माझे मेलीचे कुठले आल्येत इन्ग्रेडियन्टस? अमूकअमूकच फरसाण पाहिजे? नाही! मटकीचीच उसळ पाहिजे? नाही! ठरावीकच मसाला पाहिजे? नाही! आज काय फरसाणासोबत चिवडाही आहे? चालेल! नुसताच कांदा आहे? चालेल! कोथिंबीर नाही? हरकत नाही! आज काय बटाटा आणि टोमॅटो पण आहेत? फारच छान!
अगदी खरे....
कुठेही जा तिची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात....कुठे मटकी, कुठे मसुर, कुठे टोमॅटो , तर कुठे चिंचेचा कोळ.... तिच्यात काही फरक पडत नाही...
मस्त चमचमीत, चविष्ट मिसळीचे कथन......

बेसनलाडू's picture

27 May 2008 - 8:21 pm | बेसनलाडू

(खादाड)बेसनलाडू

ईश्वरी's picture

27 May 2008 - 10:32 pm | ईश्वरी

तात्या, तुमची चमचमीत मिसळ आवडली.

तुम्ही लोकं पाव हा अनेक प्रकारे खाता. भाजीसोबत खाता, नुसतं लोणी लावून खाता, चहसोबत खाता, परंतु माझ्या तर्रीत बुडण्यातच त्याच्या जन्माचं सार्थक आहे असं तो स्वत:च मला एकदा म्हणाला होता.
मस्त वर्णन.
शब्दयोजना ही समर्पक झाली आहे.
मला वाटते एखाद्या लेखकाला एकवेळ व्यक्तीचित्रण सहज जमेल पण असे पदार्थचित्रण लिहीणे सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ते सहज जमले.
तुमचा हा लेखनप्रकार खूप आवडला.
ईश्वरी

चकली's picture

27 May 2008 - 10:56 pm | चकली

मिसळ चा फोटो काढताना मिसळीची चव वाचकांपर्यंत पोचावी हा हेतु होता. आज मिसळीच्या फोटो ला जे काही सांगता आले नसेल ते तुम्ही शब्दात मांडलेत !
चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

28 May 2008 - 11:13 am | विसोबा खेचर

बरेवाईट प्रतिसाद देणार्‍या सर्व वाचकांचे मनापासून आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मिसळ's picture

28 May 2008 - 8:59 pm | मिसळ

तात्या, एकदम दिलखुश लिहिले आहे. आवडले.
- मिसळ