महा विडंबन स्पर्धा

आमोद शिंदे's picture
आमोद शिंदे in जे न देखे रवी...
21 Aug 2010 - 4:24 am

आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन.

तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

भयानकहास्यबिभत्सहे ठिकाणचारोळ्याप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

21 Aug 2010 - 9:07 am | गांधीवादी

सध्या एकच सुचत आहे,
बघा पटते का ?

युद्ध काय होणार नाय |
आधार कोणाचाच नाय |
सैनिक सगळे लाचार |
पाक-चीन हमला करणार, भारत हरणार निश्चित |
(ते युद्ध केल्या शिवायच जिंकणार असे गृहीत धरून लिहिलेले हे २०१० मधील महाकाव्य आहे )
|| इति, तरीसुद्धा (बळेच) मेरा भारत महान ||

ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन.

आमची तुमच्यावर श्रद्धा नाही, आधी पुरस्कार काय मिळेल वगैरे जाहिर करा मग प्रयत्न करु. ;-)

आम्ही विडंबनं करणार| समर्थ संपादकांच्या कात्रीला धार|
आम्ही प्रतिसादक लाचार| विडंबन उडणार निश्चित||

|| इति अस्य विडंबनम ||

परिकथेतील राजकुमार's picture

21 Aug 2010 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार

धागा पटला नाही.

आपल्याकडुन तरी अशा प्रकारच्या 'वाहत्या गंगेत हात धुणार्‍या' धाग्याची अपेक्षा न्हवती :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Aug 2010 - 2:36 am | जाई अस्सल कोल्हापुरी

अनुभवाचे बोल आहेत.
काय पण होत नाही पुढे..स्पर्धा आयोजित केल्या जातात्...आयोजक जातो विसरून आणि लावणारे डोकं लावत बसतात..
धन्यवाद!

तिमा's picture

22 Aug 2010 - 5:37 pm | तिमा

आपले मिपाचे वाचन कमी दिसते. याआधीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून मिपाच्या अनेक मातब्बरांनी याचे विडंबन केले आहे.
धागा पटला नाही.