कवी अनिरुद्ध अभ्यंकर यांची "किंमत" ही सुंदर गझल धरुन केलेली हि रचना (विडंबन म्हणा हव तरं)
कारणे होतीचं तशी लिहायला
प्रतिक्रीया होत्याच तशा न पटलेल्या
प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागला तो काहीतरीच कारणे द्यायला
मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला (हे मात्रं खरे)
काळजी त्यांची नका करू एव्हढिही
की काळजी लागेल ही खटकायला
बंद कधीही नाही केले मी उमलायचे
आणि तो आला नेहमीप्रमाणे फुले तोडायला
कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे
लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला
भाव नाही तुला थोडासाही दिला
काजवे लागले दिवसाचं चमकायला
माणसे येतील नक्कीचं रस्त्यावरी
जेव्हा भूक ही लागेल बोलायला
प्रतिक्रिया
5 May 2008 - 2:10 pm | आनंदयात्री
कॉ. स्वतःला म्हटलेस तू पहिजे तसे
लागलास् तु वाट्टेल तसे लिहायला
कॉ. म्हणजे कॉम्रेड का हो ? ... तसे असेल तर हा हा हा :))
5 May 2008 - 5:57 pm | विसोबा खेचर
विडंबन मस्त रे!
मीही यात्रीसारखेच विचारतो.. :)
तात्या.
5 May 2008 - 6:11 pm | काळा_पहाड
मस्तच!!!! जवाब नही.
सदासर्वदा तो मी नव्हेच
5 May 2008 - 7:12 pm | चेतन
कॉ. म्हणजे कॉम्रेड का हो ?
तोमीनव्हेच....
कॉ. (अनारक्षित) चेतन