आमची पहिली परदेशवारी....७

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 11:05 am

आमची पहिली परदेशवारी....७
भाग-१ http://www.misalpav.com/node/13410
भाग-२ http://www.misalpav.com/node/13436
भाग-३ http://www.misalpav.com/node/13450
भाग-४ http://www.misalpav.com/node/13473
भाग-५ http://www.misalpav.com/node/13495
भाग-६ http://www.misalpav.com/node/13529

नमस्कार मंडळी,
आज सकाळी एडीने मला थोडे लवकरच उठवले. मला झोप फारच प्रिय असल्याने ती सहसा माझी झोप मोडत नसे.आज नेहमिपेक्षा ती जरा जास्तच खुशीत आणि उत्साहात होती आणि त्याला कारणही तसेच होते आज तिचा वाढदिवस होता.मी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.झटपट तयार झालो आणि घराबाहेर पडलो .आज आम्ही व्हिला-व्हेल्हा येथे जाणार आहोत. मी एडीसाठी घेतलेला लाल ड्रेस तिने परिधान केलाय, लाल रंग हा एडीचा सर्वात आवडता रंग आणि माझा सर्वात नावडता. पण तरीही तिला तो खुलून दिसत आहे. विटोरिया ते व्हिला-व्हेल्हा हे बसने १ तासाचे अंतर आहे. आम्ही बस पकडली आणि एडीने मला व्हिला-व्हेल्हा नेव्हल स्कूलमध्ये तिचे वडील शिक्षक होते आणि विल्हा-वेल्हा येथे तिचा जन्म झाला असल्याची माहिती दिली. याच कारणास्तव स्वारी आज भलतीच खुशीत दिसत होती. विटोरिया हे बंदर आहे. समुद्राची जी खाडी आहे त्याच्या एका बाजूला वीटोरिया आणि दुसरया बाजूस विल्हा-वेल्हा. अगदी समोर दिसत असले तरीही पलीकडे जाण्यासाठी एका लांबच लांब अशा three ponte bridge वरून प्रवास करावा लागतो. खाडीच्या बाजूने असणार्या चौपदरी रस्त्याने पुढे आल्यानंतर एक प्रशस्थ असा मॉल आहे त्याला वळसा घालून बस या थ्री पोन्ते पुलावर आली.बराचसा उंच आणि साधारण ४-४.५ कि मी लांब असा हा पूल स्थापत्यशार्स्त्राचा उत्तम असा नमुना आहे. पुलावर आल्याबरोबर समोरच्या किनाऱ्यावर असलेल्या पर्वतावरील चर्च दृष्टी पथास पडते. एडीने आम्ही आज तेथे भेट देणार आहोत असे सांगितले.खाडी पार करून पूल संपला ,थोडेसे पुढे जाऊन बस उजवीकडे वळाली आणि त्यानंतर पुढच्याच थांब्यावर आम्ही उतरलो.खरेतर आम्हाला थोडेसे पुढे उतरायचे होते. येथून आम्ही चालत निघालो आणि एडीने रस्त्यामध्ये मला तिची शाळा , ती पूर्वी जेथे काम करायची ते ऑफिस आणि तिच्या लहानपणीच्या बालसुलभ आठवणी मला ऐकवल्या.मध्येच एडी एका इमारतीसमोर उभी राहिली आणि काहीतरी आठवणीत गढून गेली. क्षणभर मी बरोबर आहे हेही ती विसरली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिचे डोळे भरून आलेले. याच जागेवर त्यांचे घर होते आणि येथेच तिचा जन्म झाला होता. तिला तिच्या आईवडिलांची आठवण झाली होती.आईवडील गेल्यावर या मोठ्या घरात तिला एकटीला रहाण्याची भीती वाटायची आणि मुख्य म्हणजे आईवडिलांची आठवण तिची पाठ सोडत नसे. पुढे सज्ञान झाल्यावर एडीने ते घर विकून टाकले आणि तिने वितोरीयाला घर घेतले. नोकरीही वितोरीयालाच असल्याने तिला ते सोयीचे वाटले. आता त्या जागेवर कसलेतरी न्यायालयीन फोरम आहे. फोटोमध्ये ते दिसेलच. समुद्रकिनारी असलेले ते घर तिने विकले होते त्याचा आज तिला पश्चाताप वाटत होता. समोरील छोट्याशा बीचवर आम्ही थोडा वेळ बसलो.तिच्या बालपणीचे बरेचसे किस्से तिने मला सांगितले. मैत्रिणीची नावे त्यांची घरे आणि त्यांच्याबरोबर घालवलेले बालपण यावर ती भरभरून बोलली. आणि मध्यच ती उठून उभी राहिली. डोळे बंद करून तिने खोल श्वास घेतला.......आणि मला म्हणाली, येथील हवासुद्धा किती शुद्ध आणि वेगळी आहे ना विलासराव? मी होकार दिला पण त्यात काही राम नव्हता ते तिला जाणवले. माझा जन्म येथे झाला आणि बालपणही येथेच गेले म्हणून मला असे वाटत आहे तुला कसा काय बदल जाणवनार.तुझ्या कसल्याच आठवणी येथे नाहीत तू फक्त मला बरे वाटावे म्हणून हो म्हणालास, अशी हि एडी.
1
2
3

आता आम्ही बाजूलाच असलेल्या नेव्हल स्कूलमध्ये निघालो. गेटवर सुरक्षा तपासणी करून आम्हाला आत सोडण्यात आले. भव्य अशा गेटमधून आत गेल्यावर भले मोठे एक पटांगण ओलांडून पुढे आल्यावर प्रशासकीय इमारत होती. एडीने मला तेथील प्रत्येक विभागाची माहिती करून दिली. तिचे वडील बसायचे ते ऑफिस , त्यांचा वर्ग असे सर्व झाल्यावर आम्ही मुख्य इमारतीसमोर ठेवलेले काही यंत्र, जे जहाजावर वापरतात त्यांची माहिती करून घेतली.आणि शेवटी तेथील छोट्या पण सुबक अशा छोट्याशा त्रिकोणी आकाराच्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी हजर झालो.माझ्या आयुष्यामध्ये मी चर्चमध्ये गेलो ते ब्राझीलमध्ये आल्यावर.मला चर्चमध्ये नक्की कशी प्रार्थना करायची याची माहिती नव्हती मी फक्त हात जोडून उभा राहिलो. प्राथना आटोपल्यावर एडी तेथील फादर बरोबर काहीतरी बोलली त्यांनी मला पुढे बोलावले आणि आमच्यासाठी छोटीशी प्रार्थना केली.तेथून बाहेर पडल्यावर एडीने मला आमच्यासाठीच केलेली प्रार्थना होती , आणि जीझसची आमच्यावर सतत कृपा राहील असे सांगितले , हे सांगताना तिच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. आणि याबद्दल तिच्यामनात आता कुठलीही शंका नव्हती. जगामध्ये एकच देव आहे आणि तो म्हणजे जिझस अशी तिची धारणा आहे. असो.येथून आम्ही त्या पर्वतावर असलेल्या मोठ्या चर्चकडे रवाना झालो. दोन्ही बाजूला उंच उंच झाडे आणि मध्ये दगडी अशी पायवाट. ते गुळगुळीत झालेले दगड तेथे असणार्या वर्दळीची साक्ष देत होते. येथे वरती सोडण्यासाठी बसची सोय होती पण आम्ही पायीच निघालो. अर्ध्या तासाने आम्ही वरती पोहोचलो असू . येथे आम्ही थोडी विश्राती घेतली. कॉफी पिऊन वरील पायऱ्या चढण्यास सुरवात केली.खालून छोटेसे दिसणारे हे चर्च खूपच प्रशस्त होते. उंचावर असल्याने जोरदार हवा आणि तेथून दिसणारा तो खाडीवरचा पुल पलीकडे वितोरिया शहर आणि मागे व्हिला-व्हेल्हा हे शहर. उजवीकडे त्या पुलावरून धावणाऱ्या मोटारी, पलीकडे गगनाला गवसणी घालणार्या उंचउंच इमारती आणि समोर समुद्र आणि त्यावरून निघालेले जहाज नजरेच्या टप्प्यात येत होते. या बीचचे नाव 'प्राया द कोस्टा' असे आहे. हा तिचा सर्वात आवडता बीच. याच बीचवर घर घेण्याच एडीच स्वप्न आहे.येथे आम्ही बरेच फोटो घेतले. खाली आल्यावर जवळच असलेल्या सिमेट्री मध्ये, एडीच्या आईवडिलांची भेट घेतली, तिने मनोमन त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना माझी ओळख करून दिली. आणि अचानक तिच्या मनाचा बांध फुटला तिला रडू कोसळले, मला करता येण्यासारखे काहीच नसल्याने मी फक्त तिच्या खांद्यावर थोपटले आणि ती शांत होण्याची वाट पाहत उभा राहिलो.तिचा आवेग ओसरल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला, मीही हात जोडून तुमच्या लेकीची मी सर्व काळजी घेईल असे मनातल्या मनात वचन दिले.
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
बाहेर आल्यावर आम्ही जवळच असलेल्या 'गारोटो' या प्रसिद्ध अशा चोकलेट कंपनीला भेट दिली. तेथे भरपूर खरेदीही केली. येथेच एक टाक्सिवाला माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याशी इंग्रजीमध्ये संवाद सुरु केला. मी इंडिअन आहे हेही त्याने ताडले आणि मी त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या. त्याच्याबरोबर फोटोही काढला. त्याचा ई-मेल घेतला आणि आम्ही प्राया द कॉस्ताला आलो. हा बीच मलाही खूप आवडला. इथे एक बरे आहे समुद्रकिनारी सुट्टीचा दिवस सोडला तर फारशी गर्दी नसते.बीचवरून वाळूतून चालताना आम्हाला दोन सुमो( जाडी माणसे) दिसली. मी एडीला फोटो घ्यायला सांगितले, अशा गोष्टी तिला आवडत नसत तरीही माझ्यासाठी ती त्या करत असे. काही वेळ फिरून आम्ही घरी परत आलो.फ्रेश झालो आणि एडीच्या चार मैत्रिणी पावला, मिर्टेस,केली आणि दिल हजर झाल्या.थोड्याच वेळात जुनिअरही आला. मी त्याला केक आणण्यास सांगितले. केक कापण्याचा मान मला देण्यात आला, मी आणि सर्वांनी एडीला शुभेच्छा दिल्या, आणि आमची पार्टी सुरु झाली.आज ब्राझीलमधील फ्लेमिंगो आणि वास्को या टीमचा फूटबॉलचा अंतिम सामना होता.जुनिओर, केली ,मिर्टेस ,पावला ,दिल हे सगळे फ्लेमिंगो ला सपोर्ट करत होते. फक्त एडीचा सपोर्ट वास्को ला होता. फ्लेमिंगो हि रीओची टीम ब्राझीलमधील सर्वात ख्यातनाम आहे. सर्वांनी मला माझा सपोर्ट कोणाला याची विचारणा केली. मी अर्थातच एडीच्या टीमला पाठींबा दिला. मला आश्चर्य वाटले ते या गोष्टीचे कि घरामध्ये टीव्हीवर सामना बघायचा होता आणि हे सर्व लोक आपापल्या टीमची जर्सी घालून सामना पाहायला बसले.हे लोक जर्सी बरोबर घेऊन आलेले होते. जुनिअर सुद्धा. मला जर्सी नव्हती तरी एडीकडे एक वास्कोची टोपी होती ती मला घालावीच लागली. त्याशिवाय माझा वास्कोला पाठींबा आहे असे हे लोक मानायलाच तयार नव्हते.तुम्हाला कुठल्याही खेळाबद्दल असे वेड असणारे लोक संपूर्ण जगाच्या पाठीवर कोठेच भेटणार नाहीत हे मी खात्रीने सांगू शकतो.सामना सुरु झाला आणि संपलाही,आमची टीम ४-१ अशी हरली. म्हणजे हरणारच होती. फ्लेमिंगोच्या प्रत्येक गोलला हे सर्व लोक जोरात ओरडायचे कुणी पिपाण्या वाजवायचे आणि नाचायचे सुद्धा. आम्ही विरोधक असूनही त्यांच्यात सामील व्हायचो.सामना संपल्यावर आम्ही हॉटेलमध्ये जेवण घेतले आणि एडीच्या सर्व मैत्रीणीना निरोप दिला आणि घरी परत आलो. मला आणि एडीला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण सर्वांनी न विसरता दिले. आणि त्या हे विसरूनही गेल्या. परत कोणीही आम्हाला बोलावले नाही आणि आम्ही कुणाच्या घरी कधीच गेलो नाही.मी माझ्या वास्तव्यात कुणाच्याही घरामध्ये गेलो नाही. एकंदरीत शांत प्रवृत्तीचे हे लोक, मलातरी कधीही बसमध्ये,रस्त्यावर, गर्दीमध्ये कुणी कुणावर ओरडताना.भांडताना किंवा मारामारी करताना दिसले नाहीत(रिओ चा प्रसंग सोडून).एडी नेहमी म्हणते ह्या माझ्या मैत्रिणी नाहीत, फक्त सहकारी आहेत ते मला मनोमन पटले.त्यातल्या त्यात मिर्टेस हि एडीची जवळची सहकारी(एडी कुलीग म्हणते ).माझ्या संपूर्ण वास्तव्यात मला कुणीही साधा चहा/ कॉफी पाजली नाही.असा का एडीच्या सहकार्यांचा पाहुणचार. असो.
क्रमश:
हे काही फोटोज
22
23
24
25
26
27
28
29
30
31

प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

अब् क's picture

4 Aug 2010 - 11:39 am | अब् क

केक मस्त आहे

सगळे भाग वाचतोय... खुप सुंदर

अनिल २७'s picture

4 Aug 2010 - 11:40 am | अनिल २७

>>डोळे बंद करून तिने खोल श्वास घेतला.......आणि मला म्हणाली, येथील हवासुद्धा किती शुद्ध आणि वेगळी आहे ना विलासराव<<
ईलासराव..!! एडी सुद्धा तुम्हाला विलासराव असे हाक मारायची!! तुमचे सारेच भन्नाट!

विलासराव's picture

4 Aug 2010 - 12:24 pm | विलासराव

एडी सुद्धा तुम्हाला विलासराव असे हाक मारायची!!
होय.मि तिला आमची ओळख झाली तेंव्हाच माझे नाव विलासराव असल्याचे सांगितले होते.याचा आयुश्यभर फायदा होईल असे दिसतेय.

सहज's picture

4 Aug 2010 - 11:40 am | सहज

वाचतोय!

विलासराव छान लिहताय.

प्रचेतस's picture

4 Aug 2010 - 11:49 am | प्रचेतस

एडीचे फोटो अजुनही न टाकता वाचकांची उत्सुकता खूपच ताणून धरण्याची तुमची हातोटी विलक्षणच म्हणली पाहीजे.

अवांतरः मागे एकदा विलासराव देशमुखही ते मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळाचा विस्तार करू असे सांगून बरेच दिवस उत्सुकता अशीच ताणून धरण्यात यशस्वी झालेच होते व सत्त्त्तांतर होइपर्यंत विस्तार झालाच नव्हता. तसे तुमच्याकडून होउ नये अशी अपेक्षा

आणि स्थापत्यशास्राचा उत्तम नमुना दाखवल्याबद्दल आभार.. ( आमचे एक मास्तर मी कॉलेजमधे असताना मलाही स्थापत्यशास्राचा उत्तम नमुना म्हणायचे त्याची आठवण झाली..;))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 11:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शेवटून तिसरा आणि केकचा फोटो भन्नाटच!

वाचते आहे, पुढचा भाग कधी?

तुमचा पहिला (नुसता फोटोंचा )धागा पाहुन तुमच्या बद्दल गैर समज झाला होता, पण तो दुसर्‍या लेखानेच दुर झाला.
मालिका चांगलीच रंगतेय. :)

(इतर नविन सभासदांनी त्या वांझोट्या चर्चा करण्या पेक्षा अस काही चांगल लिहावं. )

विलासराव's picture

4 Aug 2010 - 12:32 pm | विलासराव

तुमचा पहिला (नुसता फोटोंचा )धागा पाहुन तुमच्या बद्दल गैर समज झाला होतापण
बरेच दिवस मिपाचा फक्त वाचक होतो. सदस्य सुद्धा नव्ह्तो.सदस्य झालो अनि दुसर्याच दिवशी लेखनाला सुरुवात.मराठी टायपिंग जमेना. फोटो टाकता येईनात.अशी अवस्था झाली होति म्हनुन....
तो दुसर्‍या लेखानेच दुर झाला.
धन्यवाद.

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 1:25 pm | मस्त कलंदर

एडीचा फोटू बघण्याची उत्सुकता आहे. आणि तुमच्या धाडसाबद्दल कौतुकही..
केकचा फोटू आवडला..

समंजस's picture

4 Aug 2010 - 3:17 pm | समंजस

एकंदरीत झक्कास प्रवास वर्णनमाला तयार होत आहे विलासराव :)
भरपुर माहिती मिळतेय तुमच्या मुळे या बाझील बद्दल.

दोन महिने तिथे घालवलेत आणि ते सुद्धा एका ब्राझीलीयन सोबत राहून म्हणजे नक्कीच ब्राझील तुम्ही खुप जवळून बघितलंय असं दिसतंय.

रेवती's picture

4 Aug 2010 - 5:55 pm | रेवती

फोटो आणि लेखन जमले आहे.
तुम्हाला मुद्देसूद लिहायला जमतय वि. रा!
मीही हात जोडून तुमच्या लेकीची मी सर्व काळजी घेईल असे मनातल्या मनात वचन दिले.
कशी काळजी घेणार ते स्पष्ट लिहा हो भौ!;) जिच्यासाठी हा भाग लिहिलात ती बर्थडे गर्ल कुठे आहे?
मालिका इंटरेस्टींग होत चाललीये.

प्रभो's picture

4 Aug 2010 - 6:55 pm | प्रभो

मस्त!!!