किस्से कॅफेतले

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in जनातलं, मनातलं
20 Feb 2010 - 12:05 pm

मध्ये 'बिकांना' माझ्या कॅफेत घडलेले काही गंमतीशीर किस्से सांगितले होते. ते किस्से लिहुन काढ म्हणुन बिका मागे लागले होते पण मी नेहमीप्रमाणेच आळस केला. काल सुहासनी विषय काढलाच त्यामुळे पुन्हा उत्साह आला आणी काही किस्से लिहुन काढले.

चला तर मह लुटुया लुत्फ ...

किस्सा १ :-

वेळ :- सकाळी ११.२५ साधारण

एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते.

युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ?

मी :- एक्स्टर्नल ??

युवती :- हो ! किती पैसे होतील ?

मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन. आणी जर पुर्ण फॉर्मच आमच्याकडून भरुन हवा असेल, तर मग २५ /- रुपये प्लस प्रिंट आउटस.

युवती :- चालेल मग तुम्हीच भरुन द्या.

मी हातानेच तिला शेजारच्या खुर्चीत बसायची खुण करतो. युवती स्थानापन्न होते.

मी :- नाव ?

युवती :- कुमार अ ब क.

मी चमकुन बघतो.

युवती :- (हसुन) माझ्या भावाचा भरायचा आहे फॉर्म.

मी :- काय प्रॉब्लेम नाही. जन्मतारीख सांगा.

युवती :- फलाना फलाना....

मी :- पत्ता ??

युवती :- फलाना फलाना...

फॉर्मची पहिली ३ पाने भरुन होतात. आता विषय निवडायची वेळ येते.

मी :- विषय कोणते घ्यायचेत ?

युवती :- कोणतेपण ३ टाकाना चांगले.

मी :- अहो , तुमच्या भावाला अभ्यास करायचाय मला नाही. आणी कुठलेपण विषय कसे टाकणार ? त्याचे जे विषय राहिलेत तेच टाकावे लागतील ना?

(युवतीच्या चेहर्‍यावर मतिमंद भाव, मग फोन करुन भावाशी चर्चा.)

मग विषय सांगीतले जातात.

मी :- ह्या आधी तुम्ही युनिव्हर्सिटिला रजिस्ट्रेशन केले आहे का?

युवती :- नाही !!

मी :- शेवटची परिक्षा कधी दिली होती तो महिना आणी साल ?

युवती :- फलाना फलाना...

(अजुन ५ पाने भरली जाउन एकदाचे शेवटचे पान येते.)

मी :- माहिती व्यवस्थीत आहे ना एकदा चेक करुन घ्या म्हणजे प्रिंटच्या पेज वर जाता येईल.

युवती :- (निट वाचुन) हो सगळे बरोबर आहे.

(मी नेक्स्टवर क्लिक करतो... ताबडतोब एरर मेसेज येतो "युजर ऑलरेडी रजिस्टर्ड)

मी :- अहो तुमचा भाऊ ऑलरेडी रजिस्टर्ड आहे की हो.

युवती :- (थंडपणे) हो आहे की.

मी :- (हतबद्ध स्वरात) अहो मग मगाशी मी विचारले तर नाही का म्हणालात ?

युवती :- अय्या ! मला वाटले तुम्ही माझे रजिस्ट्रेशन आहे का नाही विचारत आहात म्हणून.....
-----------------------------------

किस्सा २ :-

वेळ दुपारी ३-३० ते ४-००

२७-२८ वर्षाची युवती तोंडावर जमेल तेवढे शिष्ठ आणी जगाला तुच्छ लेखणारे भाव दाखवत प्रवेश करते. कॅफे जवळ जवळ पुर्ण भरलेला.

युवती :- टर्मीनल फ्री आहे का?

मी :- येस.

युवती :- अं..... ए सी नाहिये ???

मी :- नाही, पण दोन्ही फॅन चालु आहेत ना.

युवती :- गॉश ! खुप हॉट वाटतय इकडे. जरा फॅन मोठा करा !

(मी आज्ञापालन करतो)

युवती :- (अतिशय तुच्छपणे) ह्या माऊसला काय प्रॉब्लेम आहे का ? हा वर्क करतच नाहिये.

(युवती माऊसपॅड बाजुला सारुन माऊस वापरत असले. माऊसपॅड लावुन दिल्यावर माऊस व्यवस्थीत काम करु लागतो)
पुन्हा काही वेळाने...

युवती :- हॅलो.... केवढा स्लो आहे हा पि सी. १० मिनिट झाली साईट सुद्धा उघडत नाहिये.

(मी पुन्हा धावतो. युवतीच्या संगणकावर ४ एक्सप्लोरर, २ फायफॉक्स, गुगल चाट आणी पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन येवढा माल-मसाला उघडलेला असतो.)

मी :- मॅडम अहो येवढी अप्लीकेशन उघडल्यावर कुठला पण संगणक मान टाकणारच की. एकाच एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्समध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या टॅब मध्ये सगळे उघडाना म्हणजे मेमरी थोडी कमी लागेल.

युवती :- कळतय मला ! आय अ‍ॅम अल्सो कॉम्प्युटर इंजीनियर !!

(आता नेहमीचे कस्टमर्स वैतागुन बघायला लागलेले असतात.)

युवती :- आमच्या ऑफीसमध्ये मी ह्याहुन जास्त प्रोग्रॅम्स ओपन करते, काही प्रॉब्लेम येत नाही. कळले ? आणी हा कि-बोर्ड पण किती हार्ड आहे.

मी :- (जमेल तेवढ्या नम्रपणे) मॅडम अहो रोज वेगवेगळे दहा कस्टमर्स तो कि-बोर्ड हाताळतात, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोच. आणी अहो तुमच्या ऑफीसमध्ये मेमरी वगैरे सगळे एकदम हाय-फाय असेल. इथे आम्ही कॅफे असल्याने नॉमीनल मेमरी वगैरे युज करत असतो.

युवती :- दॅटस युवर प्रॉब्लेम ! ओके ??

(मी गुपचुप जागेवर जाउन बसतो)

काही वेळाने पुन्हा एकदा..

युवती :- हॅलो.. काय चाललय काय ?? डॅम ईट !! तुमचा फ्लॉपी ड्राईव्ह देखील काम करत नाहिये.

(मी शांतपणे तिच्याकडे बघतो...जे काय दृष्य दिसते ते पाहुन माझा चेहरा माकडाच्या हातात कोलित दिल्याप्रमाणे फुलुन येतो..दॅटस ईट दॅटस ईट दॅटस ईट.. मी जमेल तेवढ्या मऊ आवाजात पण आजुबाजुच्या दुकानदारांना देखील ऐकु जाईल अशा आवाजात ओरडतो... "मॅडम अहो तुम्ही सिडी रॉम मध्ये फ्लॉपी घालत आहात !!!")

ढॅण टा ढॅण.........
--------------------------------

किस्सा ३ :-

वेळ संध्याकाळी ६-३० ते ७-००

एक एकदम 'यो' पोरगा आपल्या मैत्रिणीबरोबर प्रवेश करतो. मुलगा स्वत:ला हृतीक आणी मुलगी ऐश्वर्या समजत असल्यासारखे दोघांच्याही चेहर्‍यावर भाव.

'यो' :- मॅन एक पिसी पाहिजे !

मी :- आहे ना. तुमच्याकडे काही आय-डी प्रुफ वगैरे आहे ??

'यो' :- म्हणजे ?

मी :- कोणतेही फोटो आय-डी कार्ड. पॅनकार्ड, लायसन्स किंवा कॉलजचा आय-डी वगैरे.

'यो' :- "पि एम टी" चा पास आहे की.
------------------

किस्सा ४ :-

वेळ :- दुपारची

४/५ कन्यांचा घोळका दारात येउन थडकतो. सर्व कन्या साधारण १७/१८ वयोगटातल्या. " तु जा - मी जा " करत अखेर एकजण प्रवेश करते.

कन्या :- एस्क्युज मी , तुमचा रेट काय आहे ?

(इतर कन्या उत्सुकतेने दारातुन डोकावत आहेत)

मी :- मी "प्राइसलेस" आहे.

कन्या काही क्षण पुर्ण ब्लॅंक होते आणी मग एकदम "अय्या !!" असे ओरडते आणी पळुन जाते.
--------------------

किस्सा ५ :-

वेळ साधारण रात्री ८ ची.

एक २१/२२ ची तारुण्याने मुसमुसलेली वगैरे युवती प्रवेश करते. आय-डी प्रुफ वगैरेची देवाण घेवाण होते.

कन्या :- त्या कोपर्‍यातल्या पिसी वर बसले तर चालेल का ?

(गर्दी जवळ जवळ नसल्यानेच मी तत्परतेने कडेचा संगणक चालु करुन देतो.)

कन्या :- फास्ट आहे ना ? सगळ्या साईट वगैरे ओपन होतात ना ?

मी :- एकदम ! काहिच प्रॉब्लेम येणार नाही.

(थोड्यावेळाने डोळ्याच्या कोपर्‍यात मला हालचाल जाणवते. कन्या 'सिपीयु'वर वाकलेली असते.)

मी :- मॅडम पेन-ड्राईव्ह युज करायचा आहे का ? वरती कॉर्ड काढलेली आहे बघा.

कन्या :- नाही, पिसी हॅंग झालाय, रिस्टार्ट करतीये.

(काही वेळाने पुन्हा एकदा पिसी रिस्टार्ट केला जातो. जेंव्हा तिसर्‍यांदा पिसी रिस्टार्ट करायला कन्या वाकते माझा पेशन्स संपतो.)

मी :- मॅडम CTRL + ALT + DEL वापरुन बघा ना, सारखा सारखा डायरेक्ट रिस्टार्ट करु नका प्लिज.

कन्या :- (शांतपणे) किबोर्ड सुद्धा वर्क करत नाहिये. मग कसे करणार ?

मी :- (उद्वेगाने) अहो मॅडम पण ३/३ वेळा ??

कन्या :- चार वेगवेगळ्या साईट ट्राय केल्या, कुठलीपण सेक्स साईट उघडली तरी पिसी हॅंगच होतोय त्याला मी काय करु ?

(कॅफे मालक, पक्षी - मी घेरी येउन पडतो.)

=======================================

विनोदसमाजजीवनमानमौजमजाआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शुचि's picture

20 Feb 2010 - 12:12 pm | शुचि

परा मस्त!!!!!!!!!!!!!!!! =D> =D> =D> =D>
किस्सा ४ खूप आवडला!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

20 Feb 2010 - 12:21 pm | मदनबाण

परा सही रे... और भी आने दो !!! ;)

मदनबाण.....

तुम्ही आणि मी अजुन कुठल्याच स्फोटात ठार झालो नाही ही अतिरेकी लोकांच्या योजनेची असफलता आहे आणि सरकारच यश...

शाहरुख's picture

20 Feb 2010 - 12:24 pm | शाहरुख

=)) लुत्फ लुटला !!

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2010 - 12:30 pm | ब्रिटिश टिंग्या

छान लेख!
कालच दुसरीकडे वाचला.....मज आली वाचुन! :)

टारझन's picture

20 Feb 2010 - 8:51 pm | टारझन

आपल्या प्रतिसादात मला टिन्गोपराव दिसले !

असो !
पर्‍या अंमळ मजेदार लिखाण :)

-- कॅफेकथेतील रेटकुमार

चिरोटा's picture

20 Feb 2010 - 1:01 pm | चिरोटा

छान अनुभव. अजुन येवू द्या.
भेंडी
P = NP

अविनाशकुलकर्णी's picture

20 Feb 2010 - 1:09 pm | अविनाशकुलकर्णी

सहि आहे..

सुधीर काळे's picture

20 Feb 2010 - 1:15 pm | सुधीर काळे

सुंदर व मजेदार लेख! <<मी "प्राइसलेस" आहे>> या वाक्याने तबीयत खूष झाली.
अवांतरः पूर्वीच्या Swissair च्या जाहिरातीची आठवण झाली. "Some say Switzerland is expensive. We say it is priceless."
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

स्वानन्द's picture

20 Feb 2010 - 3:37 pm | स्वानन्द

>>>>>"मॅडम अहो तुम्ही सिडी रॉम मध्ये फ्लॉपी घालत आहात !!!"

ठॉ.... मेलो
स्वानन्दाचे डोही

स्वानन्द तरंग!

सुनील's picture

20 Feb 2010 - 4:09 pm | सुनील

छान आहेत एकेक किस्से.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशिष सुर्वे's picture

20 Feb 2010 - 5:44 pm | आशिष सुर्वे

प.रा. भाऊ, बर्‍याच दिवसांनी एकदम खुसखुशीत लेख वाचायला मिळाले..
झक्कास!!

======================
कोकणी फणस

कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..

मिक्सरमधूनच काढावे!!

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:13 pm | पद्मजा देव

छान अनुभव.

रेवती's picture

20 Feb 2010 - 6:56 pm | रेवती

किस्से मनोरंजक आहेत.
अश्या विविध वयोगटातल्या ;) लोकांना सामोरं जायचं म्हणजे तुझ्या पेशन्सची कमाल आहे बाबा!

रेवती

श्रावण मोडक's picture

20 Feb 2010 - 10:29 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... एक 'यो'चा अपवाद सोडला तर सारे किस्से मुलींचे. पेशन्स? सौंदर्यफुफाटा वगैरे उगाच येत नाही त्याच्या डोक्यात!!! आणि आता तर खुद्द संपादकच या लेखनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तिथं जाण्याच्या विचारात आहेत असं कळलंय... ;)

रेवती's picture

21 Feb 2010 - 3:31 am | रेवती

काय म्हणता?
बरी माहिती आहे हो तुम्हाला?;)

रेवती

स्वाती२'s picture

20 Feb 2010 - 8:27 pm | स्वाती२

मस्त किस्से! नमुने आहेत एकेक.

chipatakhdumdum's picture

20 Feb 2010 - 9:55 pm | chipatakhdumdum

हुत्तम.

आनंदयात्री's picture

20 Feb 2010 - 10:15 pm | आनंदयात्री

हॅ हॅ हॅ !!
ते आयडी प्रुफावरचे डिटेल जसे फोन नंबर वैगेरे तुम्ही लिहुन घेता का ?
आणी हो .. तुम्हाला बर्‍याच दिसापासुन पार्टी द्यायची पेंडिग आहे ते आठवले .. कधी आणी कुठे देउ ?

वात्रट's picture

20 Feb 2010 - 10:23 pm | वात्रट

<<<कन्या :- एस्क्युज मी , तुमचा रेट काय आहे ?

(इतर कन्या उत्सुकतेने दारातुन डोकावत आहेत)

मी :- मी "प्राइसलेस" आहे.

कन्या काही क्षण पुर्ण ब्लॅंक होते आणी मग एकदम "अय्या !!" असे ओरडते आणी पळुन जाते.>>
:)) :)) :))

विसोबा खेचर's picture

20 Feb 2010 - 10:37 pm | विसोबा खेचर

छोटेखानी किस्से छान रे! :)

२७-२८ वर्षाची युवती तोंडावर जमेल तेवढे शिष्ठ आणी जगाला तुच्छ लेखणारे भाव दाखवत प्रवेश करते.

भेंडी, या टाईपच्या पोरी पटवायला सर्वात सोप्या. अनुभवावरून सांगतो! ;)

युवती :- (अतिशय तुच्छपणे) ह्या माऊसला काय प्रॉब्लेम आहे का ? हा वर्क करतच नाहिये.

हम्म! तिला इतकंच सांगायचं, 'मॅडम वर्क करणारा माऊस हवा आहे का? तोही आहे माझ्याकडे!' ;)

तात्या.

हर्षद आनंदी's picture

20 Feb 2010 - 10:52 pm | हर्षद आनंदी

काका काकूंचे किस्से दे की..

किस्सा नं १, ३, ४ म्हनजे ह.ह.पु.वा.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 12:26 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

मेघवेडा's picture

21 Feb 2010 - 4:42 am | मेघवेडा

एकदम फक्कड!! लई म्हणजे लईच भारी बगा!!

मजा आली!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

ज्ञानेश...'s picture

21 Feb 2010 - 12:43 pm | ज्ञानेश...

मजेशीर किस्से, पण सेन्सॉर्ड वाटले. (उगाचच.)
कृपया व्यनि सुविधेचा वापर करावा. :>

जयवी's picture

21 Feb 2010 - 12:46 pm | जयवी

हे हे हे........मज्जा आली !!
रंजक आहेत सगळॅच किस्से.....और भी आने दो :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

21 Feb 2010 - 12:56 pm | डॉ.प्रसाद दाढे

और भी आने दो..!!

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 1:11 pm | अरुंधती

धम्माल आहेत एकेक किस्से! वाचताना मजा आली!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

पराशेठ अजुन आपले असे अनुभव येवु देत.

वेताळ

इंटरनेटस्नेही's picture

16 Mar 2010 - 7:11 pm | इंटरनेटस्नेही

सही!

अजुन येऊ द्यात!

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 3:13 pm | राजेश घासकडवी

दुकानदारांनी ग्राहकांच्या चक्रमपणाबद्दल लेखन आधीच केलेलं आहे होय! मला वाटलं होतं की त्यांना त्यांच्या कामापायी वेळ मिळत नाही.

चार मठ्ठ तरुणी... शहराचं नाव दिलेलं नाही, पण माझ्या मनात काही अंदाज आहे. तेव्हा त्या विशिष्ट शहरातल्या तरुणी मठ्ठ असतात असं लेखकाला म्हणायचं आहे का? की सर्वच तरुणी मठ्ठ असतात?

पूर्वग्रह ही फार फार वाईट गोष्ट हो...

बाकी किस्से गमतीदार बरं का.

श्रावण मोडक's picture

15 Jul 2010 - 3:35 pm | श्रावण मोडक

पोचपावती!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jul 2010 - 3:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पावती काय फक्त दुकानदारांनीच द्यावी काय!

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार

चार मठ्ठ तरुणी... शहराचं नाव दिलेलं नाही, पण माझ्या मनात काही अंदाज आहे. तेव्हा त्या विशिष्ट शहरातल्या तरुणी मठ्ठ असतात असं लेखकाला म्हणायचं आहे का? की सर्वच तरुणी मठ्ठ असतात?

गुर्जींनी अजुन कॅफेला भेट दिली नसल्याने त्यांचा गैरसमज होणे साहजीकच आहे.

आमच्या कॅफेच्या आजुबाजुला ६ हॉस्टेल्स + फ्लॅट घेउन राहणारे विद्यार्थी (मुले-मुली) आहेत. त्यामुळे असे किस्से घडण्यात आणि घडवण्यात सर्व धर्म - जाती - प्रांत - विभाग ह्यांचा सहभाग असतो. त्यामुळे फक्त स्त्रीयांनाच किंवा शहरालाच दोष देता येणार नाही :)

खुलासक
©º°¨¨°º© व्यर्थेश कळबडवी ©º°¨¨°º©
आमचे राज्य

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 4:15 pm | राजेश घासकडवी

त्यामुळे फक्त स्त्रीयांनाच किंवा शहरालाच दोष देता येणार नाही

खुलासे काय कोणीही देईल, पण लेखातून काय दिसतं ते महत्त्वाचं ना...असो, निदान तुमचा हेतू शुद्ध होता हे कळलं ते बरं झालं. इतरांचा तसा नसेल हे गृहित धरण्याचा तुमचा हक्कही नुकताच दिसून आला, तेव्हा तेही ठीकच.

कधी कधी कोणत्या शहराला, कोणत्या डेमोग्रफिकला, काय म्हटलंय यापेक्षा ते कोणी म्हटलं हे महत्त्वाचं ठरतं. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हेच शेवटी खरं.

©º°¨¨°º© मठ्ठपर्‍यांचा दुकानदार ©º°¨¨°º©

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 4:22 pm | परिकथेतील राजकुमार

खुलासे काय कोणीही देईल, पण लेखातून काय दिसतं ते महत्त्वाचं ना...असो, निदान तुमचा हेतू शुद्ध होता हे कळलं ते बरं झालं. इतरांचा तसा नसेल हे गृहित धरण्याचा तुमचा हक्कही नुकताच दिसून आला, तेव्हा तेही ठीकच.

दिखावे पे मत जाओ अपनी अकल लगाओ...

कधी कधी कोणत्या शहराला, कोणत्या डेमोग्रफिकला, काय म्हटलंय यापेक्षा ते कोणी म्हटलं हे महत्त्वाचं ठरतं. ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हेच शेवटी खरं.

हो हो. जॉर्ज ऑरवेल म्हणुन गेलाय ना असे ? त्यानी म्हणल्यामुळे हे वाक्य महत्वाचे मानायला हरकत नाही. (तुमच्या प्रतिसादात आले असले तरी) ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 8:14 pm | राजेश घासकडवी

जॉर्ज ऑरवेल म्हणुन गेलाय ना असे ?

ऑरवेलचं आहे होय! मला ते अवलियांचं वाटलं होतं...

छोटा डॉन's picture

15 Jul 2010 - 4:11 pm | छोटा डॉन

>>तेव्हा त्या विशिष्ट शहरातल्या तरुणी मठ्ठ असतात असं लेखकाला म्हणायचं आहे का?
:)
हं, कदाचित ह्या घटनेमागची आणि घटनास्थळाबाबत पार्श्वभुमी माहित नसल्याने आपली किंचित गल्लत झाली आहे ;)

मला नाही वाटत की 'विशिष्ठ शहरात' स्वतःचे घर असणार्‍या तरुणी 'हॉस्टेल'वर रहात असतील व ते ही प्रायव्हेट हॉस्टेल वगैरे.
बाकी सदरहु नेटकॅफे हा हॉस्टेलसमोरच ( किंवा अगदी जवळ, जे असेल ते ) असल्याने इथे ह्या कॅफेतले गिर्‍हाईक हे त्या 'हॉस्टेलचे' म्हणजे त्या 'विशिष्ठ शहराबाहेरुन' खास शिक्षण किंवा नोकरी वा इतर कामासाठी ह्या 'विशिष्ठ शहरात' आलेल्या तरुणींचेच असते हे इथे 'अध्याहृत' आहे.

आपल्याला ही पार्श्वभुमी 'माहित नसण्याची' शक्यता आहे म्हणुनच आम्ही आपली 'गल्लत झाली आहे' असे सांगतो. :)

>>पूर्वग्रह ही फार फार वाईट गोष्ट हो...
खरयं खरयं.
आता आपणच बघा की परस्पर त्या तरुणींना 'विशिष्ठ शहरातल्या' समजुन मोकळे झालात व वर त्यांना 'मठ्ठ' म्हणावे का असा सवाल केलात.
पुर्वगॄहच तो, वाईटच !!!

------
(विस्तारित)छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 4:20 pm | राजेश घासकडवी

पराशेठ,
तुम्ही डान्रावांचे मित्र हे आधीच नाही का सांगायचं? मग मी कशाला उगाच तोंड वर करून बोललो असतो? हॅ हॅ हॅ. ते सम आर मोअर ईक्वल वगैरे तर विसरूनच जा. लय वंगाळ त्वांड बगा माजं. कोणासमोर बोलतोय याची काही पोच? चालू द्यात.

सुंदरच लेख. आणि अनुभव तर लाजवाब. हसून हसून मुर्कुंड्या वळल्या. हा हा हा... काय पण एकेक कष्टमर असतात. हा हा हा...

राजेश

सहज's picture

15 Jul 2010 - 4:24 pm | सहज

लेख, पुणे, पुणेकरांवर टीका: एक डेडली डिसीजन! असा उपसंहार येतोय आता. ;-)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

आता भवतेक "आपलं काय ठरलंय?....." लिहायची वेळ आली म्हणावे काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

छोटा डॉन's picture

15 Jul 2010 - 4:28 pm | छोटा डॉन

तुम्ही डान्रावांचे मित्र हे आधीच नाही का सांगायचं? मग मी कशाला उगाच तोंड वर करून बोललो असतो? हॅ हॅ हॅ. ते सम आर मोअर ईक्वल वगैरे तर विसरूनच जा. लय वंगाळ त्वांड बगा माजं. कोणासमोर बोलतोय याची काही पोच? चालू द्यात.

सुंदरच लेख. आणि अनुभव तर लाजवाब. हसून हसून मुर्कुंड्या वळल्या. हा हा हा... काय पण एकेक कष्टमर असतात. हा हा हा...

=)) =)) =)) =)) =))
_/\_

गुर्जी, ह्या प्रतिसादानंतर आपली सपशेल माघार.

तुम्ही थोर आहात हे म्हणतो व माझे ४ शब्द संपवतो.

------
छोटा डॉन

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 4:51 pm | राजेश घासकडवी

गरीबाला आसं कसं म्हणता... तुम्ही 'पुणेरी पाट्यांचे' थोर लेखक...त्या पाट्यांम्ध्ये तर मला बिलकुल पूर्वग्रह दिसले नाहीत. ती होती निखळ करमणुक.

तुम्हाला वंदन करून मीच मागे होतो.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jul 2010 - 5:08 pm | परिकथेतील राजकुमार

जाउ दे हो गुर्जी, मांजरीची नखे पिल्लाला लागत नाहीत.

शेवटी पुणेकरांना 'गंमत' कोणती आणि 'अपमान' कोणता हे ओळखण्याची अगदी योग्य पात्रता असते बघा.

डॉन्रावांच्या पुणेरी पाट्यांचा चाहता
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Dhananjay Borgaonkar's picture

15 Jul 2010 - 6:40 pm | Dhananjay Borgaonkar

शेवटी पुणेकरांना 'गंमत' कोणती आणि 'अपमान' कोणता हे ओळखण्याची अगदी योग्य पात्रता असते बघा.

+५००

च्यायला खुन्नस सुद्धा पुचाट निघाली.

राजेश घासकडवी's picture

15 Jul 2010 - 8:16 pm | राजेश घासकडवी

जाउ दे हो गुर्जी, मांजरीची नखे पिल्लाला लागत नाहीत.

पराशेठ, मेलेल्याला पुन्हा कशाला मारताय. मी घेतलं ना ते सम आर मोअर इक्वलचं वाक्य मागे! सोडून द्या ना गरीबाला.

कवटी's picture

15 Jul 2010 - 8:20 pm | कवटी

पॉपकॉर्न खाणारे आणि झाडे बळकावणारे......
पटापट काय घ्यायचाय तो बोध घेउन टाका....

हॅ हॅ हॅ पराशेठ किस्से जबरीच हां!

कवटी

भाऊ पाटील's picture

15 Jul 2010 - 4:22 pm | भाऊ पाटील

सही जवाब डॉन्राव.

बाकि संगीत मानापमानाचा खेळ भारीच रंगलाय. ;)

स्पंदना's picture

15 Jul 2010 - 4:08 pm | स्पंदना

लिहायची स्टाइल अगदी लाजवाब.

तुम्ही कायम का लिहित नाही?

कुठल्या का कारणान असेना पण हा लेख वर आला आणी मला वाचायला मिळाला.
(अवांतरः- अच्छा म्हणुन ही आय डी तर्..परीकथेतील राजकुमार)

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

यशोधरा's picture

15 Jul 2010 - 4:13 pm | यशोधरा

खुर्ची टाकून पॉपकॉर्नही आणावेत का?

बरखा's picture

15 Jul 2010 - 6:00 pm | बरखा

माझे ही काही असेच गोड /कडु अनुभव आहेत. :)) :(

sagarparadkar's picture

15 Jul 2010 - 6:02 pm | sagarparadkar

>> मॅडम अहो येवढी अप्लीकेशन उघडल्यावर कुठला पण संगणक मान टाकणारच की. एकाच एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्समध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या टॅब मध्ये सगळे उघडाना म्हणजे मेमरी थोडी कमी लागेल. <<

अहो एकाच ब्रौझरमधील एखादा टॅब जर का हँगला ना तर सगळा ब्रौझरच बंद करावा लागतो. म्हणून काही लोक वेगवेगळ्या विन्डोज वापरतात ...

मेघवेडा's picture

15 Jul 2010 - 6:22 pm | मेघवेडा

त्या पोरीचं वकीलपत्र आहे काय तुमच्याकडे? ;)

मनीषा's picture

15 Jul 2010 - 9:09 pm | मनीषा

"चार मठ्ठ तरुणी... शहराचं नाव दिलेलं नाही, पण माझ्या मनात काही अंदाज आहे. तेव्हा त्या विशिष्ट शहरातल्या तरुणी मठ्ठ असतात असं लेखकाला म्हणायचं आहे का? की सर्वच तरुणी मठ्ठ असतात?"

मठ्ठपणाचं पेटंट काय फक्त त्या विशिष्ट शहरात नं रहाणार्‍यांनी घेतलं आहे का? आमच्या त्या विशिष्ट शहरात सुद्धा ४ का होईना मठ्ठ सुंदर्‍या आहेत .. भले तुमच्याकडे (म्हणजे त्या विशिष्ट नसलेल्या शहरात ) जितक्या संख्येने दिसतात तितक्या नसतीलही कदाचित ...

क्रान्ति's picture

15 Jul 2010 - 9:34 pm | क्रान्ति

=)) ब्युटी पार्लर असल्याचा तर परिणाम नसेल हा? :?

काही असो परा, तुला कोणे एके काळी ईमेल आयडीसोबत पासवर्ड पण देणार्‍या पोरीची आठवण झाली. =)) =)) =))
सीडी ड्राइव्हमधे फ्लॉपी घालणार्‍या इंजीनिअर पोरीच्या अगाध ज्ञानाचं कौतुक करावं तेवढं कमीच! =)) =)) =)) =))
अजून झक्कास किस्से येऊ देत आणि ते झी मराठीच्या "फू बाई फू" मधे गाजू देत!!!!!!

विनायक प्रभू's picture

15 Jul 2010 - 10:50 pm | विनायक प्रभू

:O) =)) :)) =D> =)) =)) =)) =)) =)) =))

विनायक प्रभू's picture

15 Jul 2010 - 10:51 pm | विनायक प्रभू

=)) =D> =))

पुष्करिणी's picture

16 Jul 2010 - 1:26 am | पुष्करिणी

मस्तच =))
ह्यालाच जॉब सॅटिस्फॅक्शन का काय ते म्हणतात बहुतेक.... :B

पुष्करिणी

बॅटमॅन's picture

9 May 2012 - 6:37 pm | बॅटमॅन

>>(मी शांतपणे तिच्याकडे बघतो...जे काय दृष्य दिसते ते पाहुन माझा चेहरा माकडाच्या हातात कोलित दिल्याप्रमाणे फुलुन येतो..दॅटस ईट दॅटस ईट दॅटस ईट.. मी जमेल तेवढ्या मऊ आवाजात पण आजुबाजुच्या दुकानदारांना देखील ऐकु जाईल अशा आवाजात ओरडतो... "मॅडम अहो तुम्ही सिडी रॉम मध्ये फ्लॉपी घालत आहात !!!")

आति प्प्रचंड!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

स्मिता.'s picture

9 May 2012 - 6:57 pm | स्मिता.

थँक्स टू बॅटमॅन, हा धागा पाहिलाच नव्हता.

एकाहून एक भारी किस्से आहेत. किस्सा क्र. २ आणि ४... प्राइसलेस!!

प्रचेतस's picture

9 May 2012 - 7:49 pm | प्रचेतस

लै भारी. मजा आली वाचून.

किस्सा ५ मधील त्या हँग होणार्‍या साईट्सची नावे व्यनी करु शकाल का?

नाही म्हणजे, पुढच्या पिढीला कोणत्या प्रकारच्या साईट्सपासून वाचवायला हवे याविषयीच्या माझ्या छोट्याश्या संशोधनात या माहितीची मदत होईल.

धन्यवाद.

-(जिज्ञासू) गवि.

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 6:29 pm | प्रसाद गोडबोले

आत्ता असेच काहीबाही शोधता शोधता हा धागा गवसला ! काय मस्त लेखन केलय :)
कॉलेजात असताना कॅफेत जाऊन एकेक फॉर्म भरल्याचे दिवस आठवले , २०-२० रुपये काढुन 'एक छोटीसी लव्ह ष्टोरी' नावाचा तद्दन फालतु पिक्चर पाहिला होता कॅफेत जाऊन लय अपेक्षा ठेवुन ...
सिफी कॅफे चा ब्रॉडबॅन्ड म्हणजे लय काही तरी हायफाय वाटायचे दिवस होते ते !

आता कॅफेत जाऊन जवळपास २-४ वर्षे झाली असतील ... आता ज्याच्या त्याच्या मोबाईलवर नेट आहे ... कॅफेचे असे किस्से आता घडत असतील की नाही देव जाणे ...

असो. जुन्या ठवणी जाग्या केल्या ह्या लेखाने :)

सुंदर !

सौंदाळा's picture

8 Dec 2014 - 6:38 pm | सौंदाळा

mirc वर चॅटींग करत बसायचो तासन्-तास.
ASL Please

प्रसाद गोडबोले's picture

8 Dec 2014 - 6:42 pm | प्रसाद गोडबोले

आम्ही याहु चॅट वर किंव्वा गुगल टॉक्वर किंव्वा रेडीफ मेल वर , पण पहिलं यश हे ऑर्कुट आल्यावरच लाभले होते ;)

प्रमोद देर्देकर's picture

9 Dec 2014 - 3:05 pm | प्रमोद देर्देकर

तो प्राईसलेसचा किस्सा वाचुन मेलो, :)) खपलो, :)) हहपुवा लागली.

मजेदार किस्से! पहिला आणि दुसरा फारच भारी!

चिनार's picture

12 Jun 2015 - 9:36 am | चिनार

मस्त लेखन !!
मज्जा आली..लिहित रहा

कपिलमुनी's picture

12 Jun 2015 - 4:16 pm | कपिलमुनी

ह्म्म्म्म्म

वेल्लाभट's picture

12 Jun 2015 - 11:13 am | वेल्लाभट

हाहाहाहाहाहा ! क्लास !!!!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2015 - 12:27 pm | अत्रुप्त आत्मा

लै भारी! :-D

समांतर:-
"पांडु मोड ऑन"
प.रा.सर, या ना परंतून!
"पांडु मोड ऑफ!" :-D

पद्मावति's picture

12 Jun 2015 - 4:00 pm | पद्मावति

मज़ा आली वाचून. तुमचा तो 'यो' ऑल्टिमेट माठ असेल.
किस्सा नंबर चार एकदम क्यूट....अय्या असे म्हणत पळुन जात असलेली कन्या अगदि नजरेसमोर आली. फारच गोड आणि जराशि यड़पट.....
अज़ून किस्से येऊ दया.