बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता मी या भागात पुढे चालवतेय. उद्देश हा की, या खेळात जितकी मला मजा आली, ती त्यांनाही मिळावी..
तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते...
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक ५०:
कानसेन क्रमांक ५१:
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
कानसेन क्रमांक
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
या धाग्यावरचे पहिले कोडे:
एका हिंदी गाण्याचा अंतरा:
प्रतिक्रिया
9 Jul 2010 - 3:27 am | रेवती
इजाजत मधलं मेरा कुछ सामान आहे असं वाटतय.
रेवती
9 Jul 2010 - 3:35 am | मस्त कलंदर
पन्नासाव्या कानसेनपदाच्या मानकरी : रेवती :)
कोडं क्र ५१:
मला तरी जाम सोप्पं वाटतंय.. पाहूयात कोण ओळखतेय ते
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:37 am | मिसळपाव
खरंच ते असलं तर हि लिंक -
http://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q
9 Jul 2010 - 3:39 am | गणपा
चढता सुरज धिरे धिरे ..
धत्तेरीकी माताय आमच नेटं बेणं लै स्लो :(
9 Jul 2010 - 3:38 am | प्रभो
चढता सूरज धिरे धिरे..
http://www.youtube.com/watch?v=nwiu7w1-Wvk
http://www.youtube.com/watch?v=fTkrdR2VpsE
9 Jul 2010 - 3:40 am | मिसळपाव
एकाच वेळी तीन उत्तरं!
9 Jul 2010 - 3:47 am | मस्त कलंदर
हो तर!!!!
मी पाहिले तेव्हा सगळ्यांची उत्तरे एकाच वेळी आली होती... नंतर दोघांनी त्यांचे प्रतिसा अद्ययावत केले.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:42 am | मस्त कलंदर
बापरे.. एकदम तिघे तिघे!!!
कानसेन ५१ : मिसळपाव, गणपा आणि प्रभो.. :D
आता माझ्याकडून हे शेवटचं कोडं. पुढची स्पर्धा बहुगुणी तुमच्याकडे वेळ असेल तर पुढे चालू ठेवा.
मराठी गाण्याचा मुखडा आहे हा....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:43 am | प्रभो
आकाशी झेप घे रे पखरा
http://www.youtube.com/watch?v=qcFz1CFoGqI
9 Jul 2010 - 3:52 am | गणपा
आम्ही नाय खेळत जा... X(
आमचं पेज अपडेट होण्या आधीच यांची उत्तर येतात..
कच्चा लिंबू (नेटस्पिड) साठी वेगळा धागा काडा आणि तितं या प्रभ्या मिसळपावला बंदी करा [(
9 Jul 2010 - 3:54 am | रेवती
काल मला अस्सच वाटत होतं.
आज एकदाची विजयपताका फडकावली!;)
रेवती
9 Jul 2010 - 4:04 am | मस्त कलंदर
काल माझे पण नेट गंडले होते.. :(
अस्सं वाईट वाटलं... आणि आज त्या जखमेवर ५१ मधली ११ गाणी मी कशी ओळखली म्हणून प्रभो मीठ चोळून गेला.. :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 4:09 am | प्रभो
>>प्रभो मीठ चोळून गेला.
तिखट घरीच राहिलं होतं ;)
9 Jul 2010 - 3:43 am | मेघवेडा
आकाशी झेप घे रे पाखरा!
9 Jul 2010 - 3:45 am | मिसळपाव
(हे निव्वळ गणपा नी प्रभो च्या आधी यावं म्हणुन quick guesswork!!) मटका लागला तर आनंदच आहे.
9 Jul 2010 - 3:49 am | रेवती
आकाशी झेप आहे. आत्ताच ऐकलं.
रेवती
9 Jul 2010 - 4:06 am | पंगा
अर्थाचा अनर्थ होतो.
(वर 'मटका लागला तर आनंदच आहे.' हेही ठेवून दिलेत... देशी काय, मटका काय...)
असो.
- (विदेशी) पंडित गागाभट्ट.
9 Jul 2010 - 4:11 am | मस्त कलंदर
=)) =)) =)) =)) =)) =))
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:48 am | Nile
तीन वेळेपेक्षा जास्त उत्तरं देण्यार्यांना 'जीवन गौरव पुरस्कार' देउन बाजुला करा राव. जी गाणी आम्हाला येतात त्यांची उत्तरं लगेच देउन मोकळे. :|
-Nile
9 Jul 2010 - 3:52 am | मिसळपाव
'जीवन गौरव पुरस्कार' देउन बाजुला करा
:-))))
9 Jul 2010 - 3:54 am | मस्त कलंदर
च्च च्च च्च... :p
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:49 am | मस्त कलंदर
हे गाणं "आकाशी झेप घे रे" च आहे.
कानसेन क्र. ५२: मेघवेडा आणि प्रभो.
चला मंडळी, शुभरजनी. भेटूयात आजच.. पण आमच्या दुपारी. :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 3:50 am | प्रभो
मेव्या ने लिंक कुठे दिलीय?? ;)
9 Jul 2010 - 4:02 am | मस्त कलंदर
संगीतवेड्या कानसेनांनो,
मी चालले असले तरी नुकतेच येथे डोकावून गेलेल्या नि पदार्पणातच कानसेनाचा मुकुट मिळवलेल्या आमच्या मेघवेडा नावाच्या स्नेह्यांना हा खेळ बंद होऊ नये असे वाटत आहे.
सबब, ही कामगिरी ते स्वतः शिरावर घेत आहेत. तरी आपण त्यांना गाण्यांचे क्लिप्स तयार करण्यास व अपलोड करण्यास थोडा अवकाश द्यावा आणि नंतर पुन्हा एकदा या खेळाचा लुत्फ लुटावा...
मेघवेडा.. ऑल द बेस्ट!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 4:06 am | प्रभो
>>>पदार्पणातच कानसेनाचा मुकुट मिळवलेल्या
मु़कुट परवा पहिल्या धाग्यातच मिळवलाय त्या म्हातार्याने सातार्याला जाऊन... =))
9 Jul 2010 - 4:17 am | मेघवेडा
>> मु़कुट परवा पहिल्या धाग्यातच मिळवलाय त्या म्हातार्याने सातार्याला जाऊन...
अर्रे लबाडा.. आता हे ओळख पाहू. माझं पहिलं गाणं म्हणून एकदम सोप्पं! मराठीच आहे! :)
9 Jul 2010 - 4:56 am | मेघवेडा
अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांचे स्वर, शांताराम नांदगावकरांचे शब्द आणि अरूण पौडवालांचं संगीत. अजून काय हिंट्स हव्यायत?
9 Jul 2010 - 4:19 am | Nile
कळलं, खात्री करुन सांगतो. पयला नंबर माझा!
-Nile
9 Jul 2010 - 4:26 am | गणपा
आस नाय हा निळु भौ साला रुमाल नाय तर नाय पन निदान एक दगुड तरी ठीउन जा =))
9 Jul 2010 - 5:10 am | मेघवेडा
कुणीच उत्तर देत नाहीये. :(
आता उद्या इथूनच सुरू करू. :) आम्ही चाललो झोपाया. :H
9 Jul 2010 - 5:44 am | बहुगुणी
की break घ्यायचा आहे?
पाच-दहा मिनिटे वाट पाहीन, अन्यथा उद्या भेटू.
9 Jul 2010 - 7:47 am | डॉ.प्रसाद दाढे
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला!
9 Jul 2010 - 1:44 pm | मेघवेडा
बरोब्बर! कानसेन क्र. ५३ : डॉ. दाढे.
आता पुढलं गाणं. हा एका प्रसिद्ध गाण्याचा अंतरा आहे. हे हिंदी की मराठी ते मी सांगणार नाही. ते तुम्हीच ओळखा. हिंट्स थोड्या थोड्या वेळाने देण्यात येतील (गरज पडल्यास)
9 Jul 2010 - 2:18 pm | गणपा
घन ओथंबुन येती मनात राघु.....
9 Jul 2010 - 2:28 pm | मेघवेडा
नाही.
बरं पहिला क्लू :
वर गणपाने सांगितलेलं जे गाणं आहे, त्या आणि कोड्यातल्या गाण्याचे गीतकार, संगीतकार आणि गायिका सारखेच आहेत. :)
9 Jul 2010 - 4:44 pm | रेवती
निवडुंग
लव लव करी पातं
दुवा
रेवती
9 Jul 2010 - 5:06 pm | मेघवेडा
अर्रं.. नाही! थोडक्यात हुकलं. जवळ आला आहात. पुढल्या प्रयत्नात पोहोचाल कदाचित! :)
हिंट ची विनंती आल्याने. पुढली हिंट
चित्रपट : सर्जा.
आता ओळखलंच पाहिजे हां... :)
9 Jul 2010 - 5:05 pm | चतुरंग
निवडुंग
http://www.dhingana.com/play/varyane-halte-raan/Mzc3MjQ%3D/pop/1
चतुरंग
9 Jul 2010 - 5:06 pm | मेघवेडा
हे पण नाही! :)
9 Jul 2010 - 5:12 pm | यशोधरा
मला गाण्याचा दुवा दिसत नाही मेव्याने दिलेला, पण सर्जा म्हणत आहेस, तर - चिंब पावसानं रान झालं आबादानी...?
9 Jul 2010 - 5:13 pm | मेघवेडा
'धुंद चिंब पावसानं..' तर नाहीच नाही! :)
9 Jul 2010 - 5:16 pm | यशोधरा
चाचपडत आहे कारण क्लू ऐकता येत नाही. झाल्या तिन्हीसांजा?
9 Jul 2010 - 5:14 pm | रेवती
मलाही असं वाटतय.
तसं असेल तर
दुवा
रेवती
9 Jul 2010 - 5:18 pm | गणपा
आज-उदास-उदास-दुर-पांगल्या ??
हेच का रे?
9 Jul 2010 - 5:23 pm | मेघवेडा
जाहल्या तिन्हीसांजाही नाही अन् आज उदास उदासही नाही.. :)
आमचे मित्रवर्य आणि पट्टीचे कानसेन श्री श्री प्रभो यांच्यासाठी थांबावे असा विचार मनात आल्याने उत्तर देत नाहीये मी अजून. ;)
9 Jul 2010 - 5:28 pm | यशोधरा
आमाला दुवे ऐकू येत नाय्ये, आमी नाय खेळत आत्ता...
9 Jul 2010 - 6:04 pm | मेघवेडा
प्रभोंनी चॅटवर उत्तर न दिल्याने त्यांच्यासाठी थांबण्याचा विचार रद्दबातल करण्यात येत आहे. हे गाणं आहे "बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं.."
हापिसात यूट्युब बंद आहे त्यामुळे mp3 फॉरमॅट मधील डाऊनलोडची लिंक दिली आहे :)
कुणीच उत्तर देऊ शकलेलं नाही आहे. तरी मनात इच्छा असूनसुद्धा आम्ही स्वतःलाच कानसेन घोषित करत नाही आहोत!
कानसेन क्र. ५३ - कुणीही नाही.
पुढलं कोडं नवीन धाग्यावर! :)
9 Jul 2010 - 5:38 pm | प्रमोद्_पुणे
??? काटयांचे सरले दिस च्या आधीची आहे का ट्यून?
9 Jul 2010 - 5:39 pm | मेघवेडा
अगदी बरोब्बर! चला आम्ही लंच ब्रेक वर जात असल्याने बॅटन मकीकडे दिलेलं आहे. :)
9 Jul 2010 - 5:39 pm | प्रमोद्_पुणे
मी ओळखले आहे..हा हा...
9 Jul 2010 - 5:47 pm | मस्त कलंदर
प्रमोद_पुणे
चित्रफित आणि शक्य नसल्यास ध्वनिफित द्या. मग मी पुढचे गाणं टाकते.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jul 2010 - 5:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नवीन धागा टाक ... इथे पन्नास प्रतिसाद झाले.
(इनसेन) अदिती
9 Jul 2010 - 5:56 pm | श्रावण मोडक
खतरनाक कंस केला आहे!
9 Jul 2010 - 6:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खरं असल्यामुळे खतरनाक वाटला असावा! बघा, खगोलप्रेमी असल्यामुळे 'ख'चा खट्याळ खनुप्रास, आपलं, अनुप्रास केला पहा! ;-)
अदिती
9 Jul 2010 - 5:55 pm | प्रमोद्_पुणे
दोन्ही आता करता येणे शक्य नाहिये.. हे गाणे आहे माझ्याकडे पण इथे कसे अपलोड करतात ते मित्राकडून शिकेन ह्या विकांताला आणि नक्कि अपलोड करेन.