या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावासह इथे पहायला मिळेल, आणि दुसरा भाग इथे.
***********
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
****************
कानसेन क्रमांक २२: मिसळपाव
कानसेन क्रमांक २३: निखिल देशपांडे
कानसेन क्रमांक २४: ------
कानसेन क्रमांक २५: पांथस्थ आणि चतुरंग
कानसेन क्रमांक २६: मिसळपाव
कानसेन क्रमांक २७: प्रभो
कानसेन क्रमांक २८:मस्त कलंदर
****************
सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 5:56 pm | बहुगुणी
हिंदी गाणं, मुखडा:
सर्व्हरचा अजूनही प्रॉब्लेम वाटतोय, निदान माझ्याकडे तरी, तुम्हाला व्यवस्थित ऐकायला मिळावं ही आशा आहे....
7 Jul 2010 - 6:02 pm | निखिल देशपांडे
अपलम चपलम चित्रपट आझाद
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
7 Jul 2010 - 6:04 pm | गणपा
अपलम चपलम चपलाईरे ......
बरोबर का?
हापिसात तुनळि वर बंदी आहे लि़क नाही देता येत :(
7 Jul 2010 - 6:13 pm | बहुगुणी
सॉरी गणपा! पण गाणं बरोबर ओळखलं!
कानसेन क्र. २३: निखिल देशपांडे
पुढचे टाकतो आहे...
7 Jul 2010 - 6:16 pm | बहुगुणी
हिंदी गाणं, मुखडा...![]()
7 Jul 2010 - 9:10 pm | विसोबा खेचर
गाणं ऐकूच आलं नाही साहेब..
8 Jul 2010 - 12:28 am | टारझन
स्पिकर्स चालु आहेत ना ? आपली एक शंका हो ;)
7 Jul 2010 - 6:27 pm | गणपा
चिंगारी कोई भडके????
7 Jul 2010 - 6:39 pm | बहुगुणी
लड बाप्पू! और आने दो....!
7 Jul 2010 - 7:01 pm | बहुगुणी
थोडी मदतः
एका स्पर्धकाने 'किशोर वाटतो आहे' असं म्हंटलं (कानात!),...
तर हे गाणं किशोरचं नाहीये इतकीच मदत ....
यापुढच्या अपलोड्स ना मात्र मला वेळ लागणार आहे, प्रश्न तयार आहेत, पण वेळ नाही:-( [पापी पेट का सवाल है!!! ऑफिसला जाणं भाग आहे!]
तेंव्हा निदान २ तास तरी पुढचा प्रश्न नसेल, क्षमस्व!
- बहुगुणी
7 Jul 2010 - 9:20 pm | विसोबा खेचर
तूर्तास मी सायबर कॅफेमधून ऑनलाईन येतो, अर्थात दिवसातला फारच कमी वेळ.. त्यामुळे एखादा नवीन क्लू आल्यानंतर त्याला माझ्या कानी यायला बराच वेळ लागू शकतो.. तो पर्यंत माझ्यापेक्षा जास्त वेळ ऑनलाईन असणार्यांना अर्थातच माझ्यापेक्षा खूप लौकर संधी मिळणार.. व माझा नंबर कधीच लागणार नाही किंवा बराच उशिराने लागेल..
अन्यथा, ह्या स्पर्धेत निर्विवादपणे प्रथम क्रमांकावर राहणे मला सहज शक्य आहे.. हे मी गर्वाने नाही परंतु अभिमानाने म्हणू शकतो.. तेवढी श्रवणभक्ति केली आहे म्हणून..!
आणि हे फक्त सिनेसंगीताबद्दलच नव्हे, तर रागदारी संगीताबद्दलही! राग, ताल, गायक, त्याचं घराणं, त्याची गुरुपरंपरा.. अगदी सगळं!
(कानसेन) तात्या.
7 Jul 2010 - 10:26 pm | बहुगुणी
तुकडा छोटाच आहे (फक्त ८ सेकंदांचा), त्यामुळे असेल कदाचित, आणि divshare.com च्या संस्थळाचा (Slow/no downloading)चा त्रास मलाही जाणवतो आहे त्याचाही परिणाम असावा.
असो. हे गाणं होतं 'आपकी याद आती रही रातभर',
गायलं आहे छाया गांगुली यांनी, स्मिता पाटीलच्या गमन या चित्रपटासाठी. इथे पहायला मिळेल.
पुढ्चा प्रश्न थोड्याच वेळात टाकतो आहे, आशा आहे की सर्वांना ऐकायला मिळेल.
7 Jul 2010 - 10:39 pm | विसोबा खेचर
हम्म.. आता गाणं ऐकू येतंय..
साहेब आता काय बोलू? :)
ह्याची मूळ ठुमरी 'जाने ना कैसे..' मी शोभा गुर्टुंकडून एका खाजगी मैफलीत ऐकली होती..ह्यात भैरवीचे काही अनोखे रंग आहेत साहेब..
छोटेखानी, खाजगी मैफल होती ती.. ऐकायला आम्ही गिनेचुने श्रोते.. भाईंच्या भाषेत 'बेभान झाला होता सारा मामला..!' पुरुषोत्तम वालावलकर होते पेटीला, नाव अगदी तोंडावर आहे पण आता आठवत नाही.. - भोपाळ्चे कुणी खासाहेब होते सारंगीवर..! जन्मजन्मांतरीचा दोस्त असल्यासारखा वाटला होता तेव्हा तो मला म्हातारा खासहेब! मैफलीनंतर चहा-विडी पितांना वागलाही अगदी तसाच होता.. अलीकडेच वारला तो..
सारी मैफल ही अशी कब्जात घेतली होती शोभाताईंनी..आजही आठवण ताजी आहे साहेब..!
लिहीन एकदा केव्हातरी या गाण्याबद्दल..अगदी नक्की! :)
(भरपूर ठुमर्या-दादरे ऐकलेला) तात्या.
7 Jul 2010 - 10:39 pm | मिसळपाव
गणपाप्रमाणे मलाहि पटकन् 'चिंगारी कोई...' वाटलं. नंतर 'बाजार' ची सगळी शोधून आलो. असो. त्या निमित्ताने 'फिर छिडि रात...' परत ऐकून झालं. फ्रिझ मधे डबा ठेवायला जावं नी मागे ठेवलेली, विसरून गेलेली आंबा वडी दिसावी तसं झालं :-))
7 Jul 2010 - 10:43 pm | बहुगुणी
सही प्रतिक्रीया आहेत दोघांच्या!
तात्या: येऊच द्या रसग्रहण लवकर.
मिसळपाव: आंबा वडी सापडल्याचा आनंद आवडला!
7 Jul 2010 - 10:44 pm | चतुरंग
फ्रिझ मधे डबा ठेवायला जावं नी मागे ठेवलेली, विसरून गेलेली आंबा वडी दिसावी तसं झालं :)
(फ्रिझमधली आंबावडी दुसरीकडे लपवून ठेवणारा)चतुरंग
7 Jul 2010 - 10:32 pm | बहुगुणी
हिंदी गाणं आहे, अंतरा देतोयः
7 Jul 2010 - 11:08 pm | Nile
गाणं ऐकल्यासारखं वाटतंय पण काय उजेड पडेना राव. :( किशोरचं आहे का?
-अवगुणी
-Nile
7 Jul 2010 - 11:12 pm | चतुरंग
पण अंतरा असल्याने जाम सुधरत नाहीये, आणखी थोडा क्लू द्या राव! :(
चतुरंग
7 Jul 2010 - 11:16 pm | मस्त कलंदर
हो ना.. ते गाणं असावं म्हणून किती गाणी ऐकून झाली..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
7 Jul 2010 - 11:26 pm | मिसळपाव
.... ती सगळी गाणी आपापला बोनस!!
7 Jul 2010 - 11:27 pm | बहुगुणी
आणि एक आवाज भूपेन्द्रचा...
7 Jul 2010 - 11:31 pm | मनिष
दिल ढुंडता है, फिर वही...
7 Jul 2010 - 11:35 pm | बहुगुणी
सॉरी, ते वेगळंच गाणं आहे:-(
7 Jul 2010 - 11:39 pm | पांथस्थ
गीतः जिंदगीमे जब तुम्हारे गम नहि थे....
गायकः अनुराधा / भुपेंद्र
चित्रपटः दुरियां
आपलं एकदम आवडतं गाणं!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
7 Jul 2010 - 11:32 pm | Nile
चिंगारी कोई भडके?
-Nile
7 Jul 2010 - 11:37 pm | बहुगुणी
यात किशोरचा आवाज आहे, नाइल, भूपेन्द्र नव्हे..
आणखी प्रयत्न करा.
7 Jul 2010 - 11:39 pm | Nile
सॉरी, भुपेंद्र हिंट पाहिलीच नव्हती. :-( छ्या! मग काय आठवत नाही, किशोर शिवाय मला कुणाचाच आवाज ओळखत नाही. :|
-Nile
7 Jul 2010 - 11:38 pm | मस्त कलंदर
क्लू ऐकून "दिल ढूंढता है" च वाटले होते.. पण त्याचे सॅड/स्लो वर्जन शोधतेय.. मनिष तू दिलेल्या गाण्यात हा पीस येत नाहीए
@ नाईल, हे गाणे किशोर कुमारने गायलेय.. याला जर तू भुपेन्द्र म्हणालास, तर दोघेही जीव देतील... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
7 Jul 2010 - 11:43 pm | मस्त कलंदर
स्लो वर्जनमध्ये पण हा म्युझिक पीस नाही..
अगदी ओळखीचे गाणं असूनही आता बुवा मी हार मानली... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
7 Jul 2010 - 11:47 pm | रेवती
मी आपली गृह प्रवेशातली गाणी अगदी मन लावून ऐकतीये.
काही म्हणता काही सापडत नाहिये.
रेवती
7 Jul 2010 - 11:49 pm | चतुरंग
दूरियाँ - अनुराधा पौडवाल, भूपेंद्र संगीत जयदेव
http://www.hindigeetmala.com/song/jindagee_me_jab_tumhare_ghum.htm
चतुरंग
7 Jul 2010 - 11:53 pm | मस्त कलंदर
_/\_
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
7 Jul 2010 - 11:52 pm | बहुगुणी
कानसेन २५: पांथस्थ आणि चतुरंग
7 Jul 2010 - 11:54 pm | बहुगुणी
आता यावर किती जण एकाच वेळी सिक्सर मारताहेत तेच पहायचं!
Coming up!
7 Jul 2010 - 11:59 pm | बहुगुणी
8 Jul 2010 - 12:00 am | बहुगुणी
नुसतं गाणं ओळखून भागणार नाही.
8 Jul 2010 - 12:06 am | मिसळपाव
प्रेम पर्बत (हे यु टयुब वरनं - मला माहिती नव्हतं).
- http://www.youtube.com/watch?v=bw0BY6HXWjg
BTW, हि नुसती ध्वनीफित आहे. चित्र फित सापडत नाहिये.
8 Jul 2010 - 12:10 am | बहुगुणी
मिसळपाव, once again!
(बाकीच्यांना मैदानात तर येऊ द्या!)
8 Jul 2010 - 12:53 am | मिसळपाव
खरं सांगायचं तर प्रभो, चतुरंग, मस्त कलंदर वगैरे मंडळींच्या आधी सिक्सर मारायची घाई झाली. आय यॅम म्हंजे एक्दमच सारी हां....
8 Jul 2010 - 12:14 am | बहुगुणी
थोडंसं कठीण असू शकेल असं वाटतं म्हणून काही क्लूजः
१. रूना
२. अमोल
३. चौपाटी
8 Jul 2010 - 12:19 am | प्रभो
तुम्हें हो ना हो , घरोंदा
http://www.youtube.com/watch?v=tqKcH804fb4
(कालच ऐकल्याचं आठवतंय ;) )
8 Jul 2010 - 12:24 am | रेवती
मुझे प्यार तुमसे नहीं कै
दुवा
रेवती
8 Jul 2010 - 12:21 am | बहुगुणी
कानसेन क्र. २७: प्रभो
(Clues दिले नसते तर ओळखता आलं असतं का हो? मला नसतं आलं म्हणून विचारतोय.)
8 Jul 2010 - 12:23 am | प्रभो
कालपासून घरोंदाची गाणी दोन वेळा ऐकून झालीत....त्यामुळे जरा पटकन लिंक लागली...एवढ्या लवकर नसतं जमलं..थोडा वेळ लागला असता अजून...
8 Jul 2010 - 12:44 am | मस्त कलंदर
पीसच्या शेवटचा भाग युनिक आहे.. अगदी तेवढी दोन सेकंदांची क्लिप असती तरी व्यवस्थित ओळखता आले असते... इकडे मॅच बघेबघेपर्यंत दोन-तीन कोडी येऊन त्यांची उत्तरे पण ओळखून झाली होती..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jul 2010 - 12:25 am | बहुगुणी
8 Jul 2010 - 12:30 am | रेवती
गुमनाम है कोइ
दुवा
रेवती
8 Jul 2010 - 12:35 am | बहुगुणी
(दोन्हीचा राग वगैरे एकच आहे का विचारायला हवं तात्यांना!)
8 Jul 2010 - 12:40 am | मस्त कलंदर
मुझको इस रात की तन्हाई में आवाज ना दो....
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jul 2010 - 12:46 am | बहुगुणी
कानसेन क्रमांक २८: मस्त कलंदर!
8 Jul 2010 - 12:52 am | बहुगुणी
इथे.