काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे.
***
नमस्कार,
येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.
कळावें,
आपला नम्र,
अमित मेंगळे.
९८६९ १० ९९ ७०.
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 1:27 am | कवटी
कल्पना स्तुत्य आहे. संपर्कात येणार्यांना कळवतो.
कवट्यालिटी: यांना भोई पाहीजेत की मेटकरी?
कवटी
5 Jul 2010 - 4:50 am | सहज
कार्यक्रमाला अनेक शुभेच्छा!
>सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा>..
हे वाचल्यावर मात्र हिस्ट्री चॅनेलवर, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसिद्ध लढाया, प्रसंग डॉक्युमेंटरी, रि-एनॅक्टमेंट पहायला मिळावे ही इच्छा बळावली आहे.
5 Jul 2010 - 6:51 am | स्पंदना
स्तुत्य उपक्रम्...पण हे भ्रमण संपल्यावर ..तसेच शिवरायांच्या मावळ्यांसारखे कडवे होउन उभे रहा ..आपल्या देशासाठी...उपक्रमास शुभेच्छा!!
5 Jul 2010 - 9:26 am | अप्पा जोगळेकर
..तसेच शिवरायांच्या मावळ्यांसारखे कडवे होउन उभे रहा ..आपल्या देशासाठी...
ते कॉण्ट्रॅक्ट शिवसेनेकडे आणि अलीकडे मनसेकडे दिलं आहे.
5 Jul 2010 - 9:30 am | अप्पा जोगळेकर
सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे.
काही लोकांना एक - दोन महिने आधी पन्हाळ्याला वेढा घालून बसवून ठेवायला हवं होतं. इतिहास थोडा अधिक जिवंत वाटला असता बरं.
5 Jul 2010 - 12:15 pm | II विकास II
>>काही लोकांना एक - दोन महिने आधी पन्हाळ्याला वेढा घालून बसवून ठेवायला हवं होतं. इतिहास थोडा अधिक जिवंत वाटला असता बरं.
छान कल्पना.
तुम्ही करा सुरवात.
आम्ही येतो पालखी घेउन.
5 Jul 2010 - 10:10 am | प्रभाकर पेठकर
बिपिन,
एकंदरात कठीण दिसते आहे.
माझ्या कृश गुडघ्यांना माझे ११५ कि. वजन घेऊन पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण जमविणे अवघड आहे. मनांत इच्छा आणि शिवरांयाबद्दल तसेच त्यांच्या मावळ्यांबद्दल अपार आदर आहे. पण मनीच्या इच्छेला शरीर साथ देणार नाही त्यामुळे क्षमा असावी.
इतर मावळ्याना माझीच पालखी खांद्यावर घेऊन धावावे लागू नये म्हणून आधीच माघार घेत आहे.
क्षमा असावी.
5 Jul 2010 - 12:23 pm | जे.पी.मॉर्गन
२७ जुलैला तसा अजून बरा वेळही आहे... बघूया काय सेटिंग करता येतंय ते!
जे पी
5 Jul 2010 - 12:24 pm | दशानन
चांगला उपक्रम !
आम्ही देखील कळवतो ही माहीती मित्रांना.
5 Jul 2010 - 12:35 pm | जिप्सी
या ट्रेकच माझ हे ४थ वर्ष आहे. पन्हाळा - पावनखिंड ते विशाळगड हे अंतर सुमारे ९५ किमीच्या आसपास आहे. आणि वाट डोंगर,पठारे ओढे,चिखल आणि जळवा अशी अतिशय रम्य आहे,त्यामुळे नवख्या लोकांनी या फंदात पडू नये,अशी कळकळीची विनंती.
6 Jul 2010 - 9:27 am | अप्पा जोगळेकर
या ट्रेकच माझ हे ४थ वर्ष आहे. पन्हाळा - पावनखिंड ते विशाळगड हे अंतर सुमारे ९५ किमीच्या आसपास आहे. आणि वाट डोंगर,पठारे ओढे,चिखल आणि जळवा अशी अतिशय रम्य आहे,त्यामुळे नवख्या लोकांनी या फंदात पडू नये,अशी कळकळीची विनंती.
तुम्ही जेंव्हा केंव्हा सुरुवात केली तेंव्हा तुम्हीसुद्धा नवखेच होतात ना ? प्रत्येकजण कधी ना कधीतरी नवखा असतोच.
वाट खूप अवघड आहे. आधी पूर्वतयारी करा. किंवा एकदम एवढी हनुमान उडी मारु नका. या वर्षी इतर साधेसुधे ट्रेक करा आणि तयारी झाली की पुढच्या वर्षी जॉईन व्हा. असा सल्ला दिला असतात तर ते योग्य झालं असतं. त्याऐवजी तुम्ही इतरांना नाउमेद करत आहात.
5 Jul 2010 - 12:39 pm | स्वाती दिनेश
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
यथावकाश फोटोंसहित वृत्तांत वाचायला मिळाल्यास बहार येईल.
स्वाती
6 Jul 2010 - 12:44 am | हर्षद आनंदी
कार्यालयीन सुट्टीची व्यवस्था झाल्यास नकी येईन!!
नुकताच फेब्रुवारी मध्ये हा ट्रेक केला. तेव्हा धमाल आली, आता पाऊस म्हणजे सोने पे सुहागा!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
6 Jul 2010 - 2:01 am | पाषाणभेद
कार्यक्रम इतिहासाचे भान ठेवून करावा. त्याची सहल होवू नये. कचरा, प्लाश्टिक, गुटखा खाणे, दारू पिणे, नैसर्गीक गोष्टी (जसे झाडे, नाले, आदिवासी / स्थानिक लोकांचे जगणे हे सुद्धा) यांचे प्रदूषण करणे आदी प्रकार टाळावेत ही इच्छा.

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
6 Jul 2010 - 3:11 pm | धमाल मुलगा
शाहिरांशी अगदी १००१% सहमत!
धन्यवाद बिपीनदा! फार चांगली माहिती इथे दिलीस.
6 Jul 2010 - 12:40 pm | II विकास II
मी अमितला फोन केला होता. त्याने मला माहीती पाठवली आहे. ज्यांना माहीती हवी त्यांनी मला संपर्क करावा.
6 Jul 2010 - 4:07 pm | बिपिन कार्यकर्ते
त्यापेक्षा इथेच टाका माहिती... या धाग्याचा तोच उद्देश आहे.
बिपिन कार्यकर्ते
6 Jul 2010 - 4:09 pm | अवलिया
सहमत आहे. टाका इथे माहिती
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
6 Jul 2010 - 4:22 pm | II विकास II
पी डी एफ फाईल आहे आणि खुप मोठी आहे.
फॉन्ट्ची अडचण येते आहे.
6 Jul 2010 - 4:16 pm | II विकास II
पी डी एफ फाईल आहे आणि खुप मोठी आहे.
6 Jul 2010 - 11:12 pm | हर्षद आनंदी
ती फाईल मेल करा..
harshadvbutala@gmail.com
तुमच भ्रमण्ध्वनि क्रमांक पण द्या
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
6 Jul 2010 - 11:32 pm | मराठमोळा
स्तुत्य उपक्रम.
शुभेच्छा!!!! :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
9 Jul 2010 - 12:55 pm | जिप्सी
अप्पासाहेब, माझा खरच कुणालाही खच्ची करण्याचा उद्देश नव्हता. गेली ८-१० वर्ष मी ट्रेक करतो आहे ७ हिमालयातील ट्रेक्स आणि सह्याद्रीतले असंख्य ट्रेक्स वेगवेगळ्या ग्रुप बरोबर केल्यानंतर माझ निरीक्षण अस आहे कि बरेसशे लोक अत्यंत उत्साहानं ट्रेकला येतात कारण त्यांचे मित्र येणार असतात पावनखिंड वगेरे वाचून उत्साह आलेला असतो,पण अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्यांचा उत्साह आणि ताकत संपते आणि तिथून परत फिरायला वाव नसतो. मी पावनखिंड ट्रेक आयोजित करणाऱ्या एका ग्रुपच्या व्यवस्थापन विभागात आहे,आणि प्रत्येक वेळेला मी लोकांना अक्षरशः दादा बाबा करत मुक्कामाच्या ठिकाणपर्यंत आणलेलं आहे. आणि दुसर्या दिवशी त्यांना मधल्या वाटेन उतरवून दिलेलं आहे. बरेसाशे ग्रुप लोकांना नक्की किती चालायचं आहे याचा सुद्धा अंदाज देत नाहीत आणि मग नवीन लोकांची वाट लागते.
माझ्याबरोबर हिमालयातले ट्रेक करणारे २ मित्रसुद्धा पन्हाळा पावनखिंड ट्रेक करताना ढेपाळले होते कारण वाट घोटाभर ते गुढघ्यापर्यंत अशा चिखलाने भरलेली होती. माझा कोणालाही नाउमेद करण्याचा उद्देश नव्हता माझ्या प्रतिसादातून असा अर्थ निघत असल्यास माफ करा.
ट्रेक्स मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्यासाठी असतात,ट्रेक करून आल्यानंतर पुढचे ४ दिवस जर झोपून राहण्यात जात असतील तर मूळ उद्देशच नाहीसा होतो अर्थात हे माझ स्वताच मत आहे. या ट्रेकसाठी सर्वाना शुभेच्छा.