मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
1 Jul 2010 - 5:34 pm

डिस्केमर :
१. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा.
२. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत.

वि. सु. : फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालानंतर इथे निवडल्या गेलेल्या "बेस्ट टीम ऑफ मिपाकर फॉर फुटबॉल" ह्याला मिपाच्या 'फिफापानाच्या मुखपॄष्ठावर ( जमल्यास ) " स्थान दिले जाईल.
असो.

काय मग ?
फुटबॉल वर्ल्डकपची मज्जा घेत आहात ना ?
तुमची कोणती तरी फेव्हरिट टीम असेल, आवडते खेळाडु असतील, आवडते फॉर्मेशन असेल, आवडता गेम्-प्लान असेल वगैरे वगैरे ...

अहो मग तेच सगळे निकष लावा ना आपल्या मिपाकरांबद्दल.
येऊ द्यात तुमची 'फुटबॉल टीम आपल्या मिपाकारांचा समावेश असलेली' , सोबत तुम्हाला एक फॉर्मेशन आणि त्या टीमचे प्लेयरच्या पोझिशन्स आणि इतर डिटेल्स द्यावे लागतील.
माझी टीम झाली देतोच आहे व त्यातल्या दिलेल्या माहितीच्या आधारावर शेम टु शेम तशीच तुमची टीम येऊद्यात.
जस्त स्पष्टीकरण जमत नसेल तर निदान नावे आली तरी हरकत नाही त्यांच्या पोझिशन्ससह.

तुम्हाला एकुण " ११ + ७ ( राखिव आणि ऐच्छिक ) = १८ खेळाडु" इथे द्यायचे आहेत.
दुसर्‍या संघात आलेले खेळाडु पुन्हा वापरायला परवानगी आहे.
सोबत फॉर्मेशन आल्यास उत्तम ...

येऊ द्या मग तुमची टीम ... खास आपल्या मिपाकरांनी बनलेली !!! :)

*** आमची टीम :

१. फॉर्मेशन :
आमचे नेहमीचे आवडते ४-४-२.
त कसे असते आणि त्यात कोण कुठे असतो ते खालिल चित्रात पहा म्हणजे त्या आधारे आम्ही कोणते प्लेयर त्यांच्या कुठल्या क्ल्वालिटीसाठी निवड्ले ह्याचा तुम्हाला अम्दाज येईल व तुम्हाला तुमची टीम बनवणे सोपे जाईल. ;)

* गोली / किपर :
१. नीलकांत : सांगायची गरज नाही, मिपाचे रक्षण करण्यात ह्या माणसाएवढे कष्ट घेणारा अजुन दुसरा कोणी माझ्या पाहण्यात नाही
२. तात्या अभ्यंकर : अगदीच गरज पडली तर नीलकांतची रिप्लेसमेंट म्हणुन आम्ही पोझिशनला तात्यांना खेळवु ..
बाकी तात्यांची स्वतःची अशी खास वेगळी पोझिशन आहे ती पुढे येईलच ;)

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
ह्यांचे काम असते ते हल्ले रोखणे व ते गोली किंवा गोलपोस्टापर्यंत जाऊ न देणे. तसेच चाली रचण्याची व डाव खेळण्याची सुरवात ह्यांच्यापासुनच होते.
कुठलाही संघ 'मजबुत' हवा असेल तर त्यात चांगले सेंटर बॅक असणे आवश्य्क असते.
१. बिपिन कार्यकर्ते
२. रामदासकाका
३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
एकदम मजबुत बचवफळी, कुठल्याही वेळेला हमखास 'बचाव' करुन बाजु संभाळतील असा विश्वास.
मुख्य सामन्यात आम्ही ह्यातले २ जण खेळवु ...

* साईड बॅक :
हे पण खरे तर डिफेंडर्सच, ह्यांचेही काम बचाव करणे हेच असते.
पण ह्यांच वेगळा रोल अशासाठी की जेव्हा वेळ येते तेव्हा बचाव सोडुन ह्यांना "आक्रमण" ही संभाळावे लागते, समोरच्याला एखादा 'झटका' देऊन त्याची बोलती बंद करावी लागते, मधल्या फळीशी ताळमेळ ठेवावा लागतो, असे हे बहुआयामी 'साईड बॅक्स' ...
१. चतुरंग ( राईट बॅक )
२. विकास ( लेफ्ट / राईट बॅक )
३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक )

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
ह्यांचे एकच काम, सगळीकडे लक्ष ठेवणे आणि कुठे काय कमी पडते आहे हे पाहुन त्यानुसार योग्य ती अ‍ॅक्शन घेणे.
बचावफळीला अणि आघाडीला सारखेच महत्व देणारे टीमचे मजबुत खांदे. हे जर चांगले नसतील तर टीमचा बाजार उठलाच समजा ...
१. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम )
२. मुक्तसुनित
ह्यातला '१' आम्ही फायनलला खेळवनार

* मिडफिल्डर्स :
मधल्या फळीतले आणि संघाच्या 'प्रगती'चे काम पाहणारे धुरंदर, मधली फळी दमदार असेल तरच संघ उभा राहतो.
नवनवीन चाली रचणे, डावपेच रचणे, आघाडीला प्रोत्साहन आणि मदत देणे, गरज पडल्यास स्वतः आघाडीला धावणे, आघाडीच्या योग्य त्या आसामीस पाठिंबा देणे व त्याच्याकडुन हवा तो रिझल्ट मिळवणे. मिडफिल्डर्स म्हणजे संघाचा कणा, मजबुत असायलाच हवा ...
१. सहजराव
२. भडकमकर मास्तर
३. धमाल मुलगा ( ह्यात अज्जिबात पार्शिलिटी नाही, जरा त्याच्या खव पहा आणि सांगा त्याने किती माणसे जोडली आहेत व तो कसे सगळ मॅनेज करतो ते )
ह्यातले आम्ही "२ " जण मुख्य सामन्यात खेळवणार

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
नावातच सगळे आहे, म्हणले तर मिडफिल्डर्स पण कधी पुढे जाऊन 'हल्ला' करुन समोरच्याचा डोक्यावर शॉट काढतील ह्याची खात्री नाही.
सपोर्ट आणि अ‍ॅटॅक ह्याचा उत्तम समतोल असणारे हे आसामी ...
१. अवलिया ( सर्वात बेश्ट, खरे तर स्ट्रायकरच व्हायचा पण मधुन आधुन 'विधायक' कामे करतात म्हणुन मिडफिल्डला टाकला )
२. अदिती
ह्यातला "१" जण मुख्य सामन्यात खेळेल.

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
बेधडक घुसणे, कसलाही विचार न करता समोरच्यावर बिनधास्त हल्ला करुन मैदान मारणे, खेळ गाजवणे, समोरच्याचा पार चिंध्या चिंध्या करणे, मध्येच एखादा धडाकेबाज फटका मारुन 'प्लेयर ऑफ द डे' होणे अशी ह्या स्ट्रायकर्सची नाना कौशल्ये.
माणुस मात्र दमदारच हवा, बाकी थोडे "अ‍ॅडज्स्ट" करता येते. तापट आहे, हरकत नाही. पटकन निराश होतो, हरकत नाही, पण माणुस रिझल्ट ओरियंटेडच हवा ... असे हे स्ट्रायकर्स
१. तात्या अभ्यंकर ( जेव्हा गोली असलेला कांता फीट असतो तेव्हा हे बिनधास्त स्ट्रायकर म्हणुन खेळु शकतात व समोरच्यावर आरामात हल्ले करु शकतात )
२. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर )
३. टारझन ( एक भरपुर टॅलेंट असलेला एकदम तरुण स्ट्रायकर, पण जरा 'पेशन्स' कमी, बर्‍याच वेळा रेडकार्ड घेऊन बाहेर जातो व पुढची मॅचही बेंचवर बसुन पहातो , पण ज्या दिवशी खेळेल तो दिवस त्याचाच )
मेन सामन्यात आम्ही ह्यातले "२ जण" खेळवु ...

तर अशी आहे आमची टीम !

कोण आहे का आम्हाल चॅलेंज देऊन आमच्या टीमशी २ हात करायला ?
आहे का कुणाची हिंमत ?
असेल तर येऊद्यात तुमची टीम, वाट पहातो आहे ...

- ( मॅनेजर ) डॉन्या मुर्‍हिनो

तळटीप : वर नावे घेतल्यापैकी कुणाला आक्षेप असल्यास तसे आम्हाला कळवावे, माफीसह नाव मागे घेतले जाईल. आपल्यातल्या क्वालिटीज ओळखुन आपला समावेश आमच्या टीममध्ये केलेला आहे. असो.

वि.सु. : धागा केवळ मौजमजेपुरताच मर्यादित रहावा ही पुन्हा एकदा आग्रहाची विनंती !!!

मांडणीविनोदसमाजक्रीडामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

वेताळ's picture

1 Jul 2010 - 6:45 pm | वेताळ

खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच. :\

वेताळ

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 6:48 pm | छोटा डॉन

>>खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच.
+१, हेच म्हणतो.
त्यामुळेच ज्यांची नावे आली नाहित त्यांनी आमच्यावर नाजार होऊ नये, माफी द्यावी !

बाय द वे, ह्या टीममध्येही १-२ नावे बदलु शकतात असे वाटत आहे. असो.

------
छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

1 Jul 2010 - 10:11 pm | निखिल देशपांडे

* गोली / किपर :
१. नीलकांत : द रक्षणकर्ता
२. आनंदयात्री : द वॉल.... अभेद्य असणारा आंद्या गोल पोस्ट समोर उभा राहिल्यावर काय प्रश्न????

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. बिपिन कार्यकर्ते
२. रामदासकाका
३. सहज :- हळुच व्यनी टाकुन बॉल पळवणार...

* साईड बॅक :
१. चतुरंग
२. विकास
३. केशवसुमार

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम )
२. नंदन

* मिडफिल्डर्स :

१. छोटा डॉण
२. गणपा
३. धमाल मुलगा

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :

१. अवलिया
२. अदिती
३.परा
४. नाईल

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :

१. इनोबा म्हणे.
२. चुचु (पर्नल नेने मराठे) चुचु वाणि ने समोरचा गारद
३. टारझन

आमच्या टिम चा मॅनेजर जेप्या.

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

रामदास's picture

2 Jul 2010 - 2:08 am | रामदास

ही टिम आहे की संपादक मंडळ ?

विजुभाऊ's picture

2 Jul 2010 - 11:24 am | विजुभाऊ

चुचु आणि माधुरी याना कॉमेन्टेटर करा.
त्या स्पेष्यल ष्टाईल मध्ये लै फाश्ट कॉमेन्ट्री कर्तील
उदा: च्न्डुं गोल्मध्ये ग्ले.डॉन ध्मुक्डे प्स कर्तोय. त्ने प्स क्ला आणि मधेच टारूने अड्वाला. बिप्न क्र्क्र्ते नी च्न्डू त्य्बात घेत्ला अन प्ढे प्स क्ला
एकदम हटके शॉर्ट्वेव्ह कॉमेन्ट्री

II विकास II's picture

2 Jul 2010 - 11:23 am | II विकास II

>>खेळाडु खुप आहेत त्यामुळे टिम निवडताना त्रास होणारच. :\
+१

आमची टिम.

१. बागडु
२. चोखोबा
३. वजीर
४. विश्वजीत
५. जय गणेश
६. सुरमई
७. बंडु बावळट
८. पापलेट
९. रिकामा सुतार
१०. कोल्हापुरी दादा
११. सोलापुरी दादा
१२. मंगेश पावसकर
१३. चंद्रशेखर अभ्यंकर
१४. सर्कीट

बाकी धागा पाहुन धन्य वाटले.

नि३'s picture

3 Jul 2010 - 12:31 am | नि३

अबे गट्ण्या हे सर्व तुझे डुप्लिकेट आय डी आहे का बे????

--- (व्हर्जीनल)नि३.

विजुभाऊ's picture

2 Jul 2010 - 11:51 am | विजुभाऊ

डान्राव तुमच्या टीमचे कच्चे दुवे

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. बिपिन कार्यकर्ते : अरबी सुदानी चीअर लीडर्स असल्या लक्ष विचलीत होते
२. रामदासकाका : गोलकीपरशी गप्पा मारतात
३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे: रेफरी नी प्राकृतात उच्चारलेला शब्द वर्मी लागतो
* साईड बॅक :
१. चतुरंग ( राईट बॅक ) : फुटबॉलच्या मैदानात गोली एका वेळेस एकच घर चालेल. सेंटर फॉरवर्ड तिरकाच पळेल , लेफ्ट बॅक हा उभा किंवा आडवाच चालेल , लेफ्ट फॉरवर्ड हा केंव्हाही पळतानाएकदा उभा दोनदा आडवा आणि एकदा आडवा असा अडीच वेळा पळेल असे यांचे नियम आहेत.
२. विकास ( लेफ्ट / राईट बॅक ). यांन्या काड्या दिल्या तर गोंधळ उडतो
३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक ): दमदार खेळाडू पण कधीतरीच खेळतो

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम ) : वादातीत. अगदी योग्य वेळ आली तरच खेलतात
२. मुक्तसुनित : फक्त ठरावीकच खेळाडूने पास दिला तर भरभरून खेळतील

* मिडफिल्डर्स :
१. सहजराव: दमदार खेळाडू
२. भडकमकर मास्तर : यांना शरदिनी तैंची जोड मिळाली तर यांचा बचाव हा आक्रमक होतो. भलेभले खेळाडू चकतात आणि फुटबॉल खेळतानाच खोखो आणि आट्यापाट्या खेळू लागतात
३. धमाल मुलगा : मागच्या तीन सीझन मध्ये याने प्रत्येक वेळा रेफरीच्या अंगावर कॉफी सांडली
* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :

१. अवलिया :
याला गोलपोष्ट दाखवून द्याला लागते एकदा गोलपोष्ट कळाले की मग दमदार खेळ होतो
२. अदिती : अ‍ॅटॅक इज द बेष्ट डीफेन्स या तत्वावरच नेहमी खेळतात अगदी प्रॅक्टीस मॅच ला सुद्धा.
स्ट्रायकर
२. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर ) : हातात विरजण घेऊन फिरतात आपल्या टीमच्य अखेळाडूवर विरजण उधळण्याचा संभव.
३. टारझन : गेल्या सीझन मध्ये ह्याने रेफरीच्या डोक्यावर मिरे वाटले होते. टीव्हीवरच्या मुलाखतीत कॅमेर्‍यात मावत नाही. मुलाखत देताना न चा ण करतो
या काही गोष्टी सांभाळल्या तर टीम फायनल खेळेल हे नक्की

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 11:57 am | छोटा डॉन

जबरा हो विजुभौ !

पण तुम्ही आमच्या टीमच्या स्टार खेळाडुंवर आरोप करत आहात.
आम्ही ह्याची योग्य दखल घेतली आहे, थोड्यात वेळात आपल्याला एक 'सविस्तर स्पष्टीकरण' असलेला प्रतिसाद किंवा खरडखेचर फेकुन मारण्यात येईल. ;)

------
( आपल्या प्लेयर्सना सपोर्ट करणारा ) छोटा डॉन

दीपक साकुरे's picture

2 Jul 2010 - 12:04 pm | दीपक साकुरे

=)) =)) =)) =)) =))

गणपा's picture

1 Jul 2010 - 6:56 pm | गणपा

वो मालक ते टीम मॅणेजर का काय असतय बगा.
की मुद्दाम सवताच नाव टाकाय तित म्हनुन श्यान लिव्हल नाय वो;)

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 7:01 pm | छोटा डॉन

एक सांगायचेच राहिले.
ह्याला म्हंत्यात गणपाशेठ, आजपासुन तो आमच्या टीमचा "प्रवक्ता" ...

"स्वतः निवडलेल्या टीममध्ये स्वतःचे नाव नसावे ही किमान अपेक्षा" ;)

------
छोटा डॉन

टारझन's picture

1 Jul 2010 - 7:08 pm | टारझन

च्यायला हा डाण्या फुटबाल फिव्हर ने अगदी पछाडलाय =)) =)) =))
लेखाच्या आयडियेसाठी धापैकीधा !! षिलेक्षण साठी पण धापैकीधा !! आणि आमचं णाव योग्य प्रकारे योग्य ठिकाणी टाकल्याबद्दल धापैकीइस :)

बाकी भरपुर णावं आहेत तर मग इच्छुक म्याणेजर लोकांनी स्वतःच्या टिम्स तयार करुन प्रतिसादात लिहाव्यात !! एका म्याणेजर ने घेतलेले खेळाडु पुढच्या म्याणेजर ला घेता येणार नाहीत :)

-(लालचड्डीफाडी लालपत्रधारी) टारियानो फोडाल्डो

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 7:13 pm | छोटा डॉन

बघा, तुम्हाला म्हणलं नव्हतं टार्‍यात पेशन्स कमी आहेत म्हणुन.
एवढा प्रतिसादाचा बॉल मस्त खेळवत आणला आणि शेवटी ऐन डी मध्ये "एका म्याणेजर ने घेतलेले खेळाडु पुढच्या म्याणेजर ला घेता येणार नाहीत " हे असले काहितरी लिहुन "फाऊल" केला की नाही. ;)
फाउल... फाउल... फाउल...
फाउल... फाउल... फाउल...

असो, तरीही टार्‍या आमचा आवडता स्ट्रायकर आहे. :)
- (मॅनेंजर ) डॉन्या

अवांतर :
तुम्ही कुठलेही खेळाडु कितीही वेळा निवडु शकता, त्याचे लिमिट नाही, तो एका टीममध्ये आला आहे म्हणुन दुसर्‍यात नाही असे काही नाही, बिनधास्त गो अहेड ....

- ( धागाप्रवर्तक ) छोटा डॉन

विकास's picture

1 Jul 2010 - 7:18 pm | विकास

ही आयडीया एकदम आवडली!

आमची टिम मजबूत दिसते. येऊंदेत कुणालाही. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 8:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो साईड बॅक विकास, ही तुमची टीम नव्हे, ही आमच्या राकोंची टीम आहे! तुमची टीम तुम्ही लिहा!!

मला फुटबॉलमधलं गोऽऽऽऽऽऽऽऽल एवढं सोडून काही काही कळत नाही, तर उग्गाच बोंबलायला काय जातंय माझं! तर ही घ्या डान्राव माझी टीमः

* गोली / किपर :
१. नीलकांत
२. निखिल देशपांडे

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. बिपिन कार्यकर्ते
२. सहजकाका
३. रामदासकाका

* साईड बॅक :
१. मुसुकाका
२. चित्राताई
३. रेवतीताई

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. श्रावण मोडक ( राकोंशी सहमत )
२. राजेश "गुर्जी" घासकडवी (थोडं ट्रेनिंग बाकी आहे, पण जमेल गुर्जींना)

* मिडफिल्डर्स :
१. धमाल मुलगा
२. छोटा डॉन
३. नंदन

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
१. ॥पुण्याचे पेशवे॥ (तसं आमचं ठरलं आहे एकमेकांच्या खोड्या न काढायचं; पण आज त्यांनी विडंबन टाकलंच)
२. मस्त कलंदर

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१. मिभोकाका
२. इनोबा म्हणे
३. "खतरनाक" प्रियाली

पीआरओ: मेघना भुस्कुटे (ती आख्खा फुटबॉल विशेषांक काढेलः चौकटीबाहेरचे खेळाडू ;-) ) (आता मेघना जर खेळांना नाही म्हणाली तर हे काम कोदांकडे देण्याचा विचार करते आहे!)
मेडीकल ऑफिसर: भडकमकर मास्तर

चीयरलीडर म्हणून: Nile, गणपा, परिकथेतील राजकुमार आणि मेघवेडा पाहिजेतच!

अदिती

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 8:53 pm | मेघवेडा

हॅहॅहॅ.. आम्ही तसे चीअर्स करण्यात लीडरच! काय रे गणपाभौ? ;)

Nile's picture

1 Jul 2010 - 9:31 pm | Nile

एकही चिअरगर्ल नसेल तर आपुन चीअर लिडींग करनार नाय!

-Nile

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2010 - 7:21 pm | llपुण्याचे पेशवेll

नितीन थत्ते ( आवर्जुन फेफ्ट बॅक )
सहमत भल्या माणसांनाही फेफ्रं आणतील.
एक आक्षेप
२. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर )
उत्तेजक द्रव्य घेऊन खेळण्यास परवानगी असते का?
आमच्या टीम मधे स्ट्रायकर पद परा यांना देण्यात येईल. थंड डोक्याने कसा गेम करायचा हे पराला विचारा. :)
आमच्या टीम मधे अजून एक पद आहे राकोंचे. ते पद अर्थातच कोणाला? हॅ हॅ हॅ. मॅच मैदानावर खेळवण्याआधीच बाहेरच्या बाहेर जिंकून देतील.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

Nile's picture

1 Jul 2010 - 7:30 pm | Nile

राजकारण करुन निवडलेल्या टीमचा निषेध करतो. आम्हाला अंडी फेकायला मैदानात मोकळे सोडल्याबद्दल धन्यवाद. सांभाळा. ;)

-Nile

टारझन's picture

1 Jul 2010 - 7:34 pm | टारझन

आम्हाला अंडी फेकायला मैदानात मोकळे सोडल्याबद्दल धन्यवाद. सांभाळा.

ते चुकुन "उबवायला" वाचलं आणि फु ट लो =)) =)) =))

मी-सौरभ's picture

1 Jul 2010 - 8:34 pm | मी-सौरभ

=)) =))

टार्यालाच कर्नाधार करा टीम चा

-----
सौरभ :)

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 7:34 pm | छोटा डॉन

तुम्ही ह्या धाग्यावर जरुर टाईमपास करा, आमची अजिबात ना नाही.
पण आपली एक स्वतःची टीम जरुर येऊद्यात.
नुसतेच अंडे/टमाटे/बटाटे फेकायला आलात तर मग तुम्हाला इंग्लिश हुलीगन्स समजुन ह्या धाग्यावरुन "डिपोर्ट" केले जाईल ;)

@ पुपे & निळ्या :
लेकांनो तुमची स्वतंत्र टीम येऊद्यात ना !
हवे तर त्यात आमचे नाव नका टाकु, क्काय ? ;)

अवांतर :
जे प्लेयर सर्वात जास्तवेळा निवडले जातीत अशांची एक टीम बनवुन व त्यांची नावे फिफापानावर झळकवुन आमच्या ह्या उपक्रमात आम्हाला पाठिंबा देणार्‍या 'मिपाकरांचा सन्मान करायचा' आमचा विचार आहे.
कृपया सहकार्य करा आणि आपापल्या टीमा येऊद्यात !

नुसती नावे द्यायला काय हरकत आहे,बाकी पोझिशन्सचे डिटेल्स आम्ही लिहलेच आहेत, तुम्ही फक्त कोनत्या पोझिशनला कोण खेळणार हे द्या.

------
छोटा डॉन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Jul 2010 - 7:44 pm | घाशीराम कोतवाल १.२

आमची एक टीम
फॉर्मेशन ४-४-२

* गोली / किपर :

१ निखिल देशपांडे
२ सुधीर काळे

* सेंटर बॅक डिफेंडर्स :

१ विशाल कुलकर्णी
२ पिवळा डांबिस
३ प्रमोद देव

* साईड बॅक :

१ पुण्याचे पेशवे
२ गणपा
३ ब्रिटिश टिंग्या

* मिडफिल्डर्स :
१ अ‍ॅडी जोशी ( माजोरडे जोशी आला अंगावर घेतला शिंगावर प्रसंगी उत्कृष्ट स्ट्रायकर )
२ जे पी मॉर्गन
३ विजुभाउ

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर
१ मेघवेडा
२ प्रभो

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
१ धमाल मुलगा
२ सुहास ( सध्या मिपा वासी नाहीत )

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१ परिकथेतील राजकुमार
२ राजे
३ टारझन
______________________________

घाश्या कोतवाल
म्यानेजर
मिसळपाव युनायटेड

दशानन's picture

1 Jul 2010 - 10:10 pm | दशानन

आमची एक टीम
फॉर्मेशन ४-२-४

* गोली / किपर :

१ निलकांत
२ अजून सुचला नाही.

* सेंटर बॅक डिफेंडर्स :

१ अदिती
२ पिवळा डांबिस
३ रेवती

* साईड बॅक :

१ मास्तर + :D ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील )
२ धम्या ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील )
३ दाढे ( साईडला काही काम नाही कोपर्‍यात गप्पा मारत बसतील )

* मिडफिल्डर्स :
१ नाना ( हलकट म्हणून....)
२ मिभो ( हॅ हॅ हॅ )
३ विजुभाउ / थत्ते ( थिंक टँक ..... काय विचार करतात ते भाजपा जाणे)

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर
१ मेघवेडा ( लै हाड तोडून घेतो.. पण असू दे... तुटून तुटून मजबुत झाली असतील :P
२ प्रभो ( खेळात दिलदार)

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
१ निदे ( प्लॅनर)
२ श्रामो ( छुपे रुस्तम)

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१ प्रियाली ( सुपडा साफ )
२ बिका ( गोल गोल फिरवून गोल करणार )
३ टारझन ( स्टेट गोली सक्कट बॉल जाळीमध्ये ;) )
__________________

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 10:34 pm | मेघवेडा

कंसातल्या कमेंट्स लै भारी! ;)

>> स्टेट गोली सक्कट बॉल जाळीमध्ये
=)) =)) =))

प्रभो's picture

1 Jul 2010 - 10:40 pm | प्रभो

लै भारी रे राज्या...केमेंट्स जबरा... =))

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 10:48 pm | श्रावण मोडक

बर्रं... छुपे रुस्तुम काय? मघाशीही काही तरी गडबड केली आहेस. ठीके. लक्षात ठेवेन. मैदानावर तुझ्या टीमचा म्हणून नीट खेळेन. पण बाहेर बघून घेईनच. :)

सहज's picture

1 Jul 2010 - 7:42 pm | सहज

श्री श्री छोटारावजी डॉनसाहेब यांना धन्यवाद की त्यांनी आम्हाला टीम मधे निवडले. :-)

नवीन टिम बनवत आहे. :-)

मिसळभोक्ता's picture

2 Jul 2010 - 2:18 am | मिसळभोक्ता

परंतु, कोणतीही टीम असली, तरी आम्ही अपोझिशन कडूनच खेळणार.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

2 Jul 2010 - 6:54 am | सहज

गोली - नीलकांत,
सेंटर बॅक डिफेंडर्स - धनंजय, ट.. उप्स आय मिन पंगा
साईड बॅक - विकास, थत्ते, पेठकर
डिफेंसीव्ह मिडफिल्डर - मोडक
मिडफिल्डर्स - बिका, नंदन, डॉन्या
अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर - पिडा, प्रभु मास्तर
स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर - टार्‍या, मिभो, परिकथेतला राजकुमार

चियर लीडर्स - चुचु, शरदिनी

छोटा डॉन's picture

2 Jul 2010 - 9:38 am | छोटा डॉन

हरकत नाही.
मग तुम्ही अपोझिशनकडुनच खेळा !

------
छोटा डॉन

टारझन's picture

2 Jul 2010 - 9:42 am | टारझन

=)) =)) ते अपोझिशन ला पण तेच म्हणताहेत =)) =)) कुठनंही खेळा .. हे स्वतःच्याच गोलात टाकणार .... बॉल ... क्यो नां हम एक गम्मत करे =)) जाऊ दे गम्मत णको :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2010 - 7:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>डॉनसाहेब यांना धन्यवाद की त्यांनी आम्हाला टीम मधे निवडले.

असेच म्हणतो. आता येऊ दे कोणतीही टीम.
साला नै धुव्वा उडवला समोरच्या टीमचा तर काय राहिले ! :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

2 Jul 2010 - 9:32 am | टारझन

ह्ह्ह्ह्हैस्साब्बास !! प्राडाँच्या प्रतिसादाने कशी धमन्यांना ऑयलिंग झाली एकदम
स्फुरण चढले =)) जबर्‍या !!

Nile's picture

1 Jul 2010 - 8:06 pm | Nile

डान्याच्या फुटकळ टीमला शह देण्यासाठी आम्ही आमची (शाओलिन सॉकर्च्या धर्तीवर) टीम बनवत आहोत. कुणाची कुठली पोसिशन हे सांगण्यात येणार नाही, तसेही आमचे खेळाडु काय वाटेल त्या जागेवर खेळण्यात माहिर असल्याने अडचण नाहीच.

तात्या जर गोली असतील तर मधुबालेचे चित्र घेउन गुर्जींना फॉरवर्डला धाडले जाईल, तात्यांचे लक्ष कुठे? चेंडूकडे? ..... गोssssssssssssssssssssssल!!

बिकांना हुल देण्यासाठी धनंजय आणि नंदन पुढे आपापले शब्दकोश घेउन असतीलच, बिका इकडे, अरे ह्या शब्दाचा अर्थ काय वगैरे... गोssssssssssssssssssssssल!!

प्रा डॉं ना हुल देण्यास एखादा अशुद्ध शब्द फेकुन मारणे काही या दोघांना अवघड नाही (फारतर आ. दवणेंचे स्मरण केले तरी पुरे) , त्याशिवाय 'एकसमयावेच्छेदेकरुन' सारख्या शिव्या घेउन गुर्जी आहेतच. प्रा डाँची पळता भुई... गोssssssssssssssssssssssल!!

रामदासांना चकवा देण्यासाठी आम्ही डान्यालाच श्रीलंकंन पोरीचे कपडे अन कानात मोत्यांचे डुल घालुन पुढे धाडु.. केस लांब आहेतच... काय होणार काय विचारता? ...गोssssssssssssssssssssssल!!

इकडे विकास यांच्या कानात "थत्ते भाजपाला शिव्या देताहेत" आणी तिकडे थत्त्यांच्या कानात "विकास गांधीना बंडल म्हणताहेत" इतके सांगितले की पुरे.. हे काम अमृतांजन वगैरे लोकांना देण्यात येईल.. फक्त एव्हढी पीन मारली की ते बाहेर... इथं त्यां दोघांची पान पान भर खरडा खरडी सुरु.. इकडे आमचा... गोssssssssssssssssssssssल!!

चतुरंगाना एक बाटली अन एक (तात्यांची) नवी कविता.. गोssssssssssssssssssssssल!!
(अ‍ॅडिशनल बंदोबस्तम्हणुन रेवती काकुंना त्यांचे काय चालले आहे याची खबर दिली जाईल, ;) )

सहजराव आणि धमाल मुलगा ह्यांना आम्ही डेटाप्लानवाले मोबाईल देउ, इकडे पेश्शल पंधरा माकडं सहजरावांना व्यनी करायला बसवु, तिकडे धम्याचे फार्मव्हिल्चे शेत पेटवुन देउ... खल्लास..

राहता राहिले भडकमकर मास्तर तर मग शरदिनीतै काय कामाच्या??? .... गोssssssssssssssssssssssल!!

बाकी अवलिया अन दुर्बिटणेबैंना आम्ही 'देव की शास्त्र' असा प्रश्न इचारुन टाकु.. दोघे बसतील कोण देव? काय शास्त्र? धन्यवाद वगैरे करत.

मिभोकाकांच्या हाफिसात बकर्‍या सोडल्यातर ते तासाचे हजार डालर सोडुन काय येत नाहीत, बसा बोंबलत लेको....

बाकी टार्‍याला मात्र आम्ही मोकळाच सोडणार... तो स्वतःच्याच प्लेअर्स ना टॅकल करुन पाडेल याची आम्हाला खात्री आहे. ;)

बाकीदिपालीतै, गणपाकडून स्पेश्शल पदार्थ, स्वातीतैंक्डुन जर्मन स्वीट्स वगैरे बनवुन घेउन बेंचाजवळ सजवुन ठेउ.

पुरे, बाकीचे शिक्रेट मैदानातच पहा.... गोssssssssssssssssssssssल!!

-Nile

गणपा's picture

1 Jul 2010 - 8:16 pm | गणपा

छप्पर फाड टीम
आम्ही नाय्ल्याच्या टीमचा झेंडा उचलाणार
=)) =)) =)) =)) =))

स्वप्निल..'s picture

1 Jul 2010 - 8:19 pm | स्वप्निल..

=)) =))

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 8:27 pm | श्रावण मोडक

गुर्जी कोण?

Nile's picture

1 Jul 2010 - 8:31 pm | Nile

ते मधुबाला वाले गुर्जी. तुम्ही अपोजिशन मध्ये आहात. (ह्यांचे राहिले काय समाचार घ्यायचे??) ;)

हा तर श्रामो आणि मुसुंचे काय करावे हा प्रश्नच आहे, पण तसेही दोघांना काहीतरी अगम्य विषयांवर दिर्घ चर्चा करायची सवय आहेच, त्यांचे ते पाहुन घेतील कुठली चर्चा करायची ते. ;)

-Nile

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 8:47 pm | श्रावण मोडक

बास्स. म्हणून मी आधीच म्हटलं, चिंता नको. चिंता नकोच आता. गोल होणार नाही. आता बरोबर खेळतील आमचे फॉरवर्ड्स आणि बॅकवर्ड्स!!!

Nile's picture

1 Jul 2010 - 8:52 pm | Nile

बरोबर आहे, फॉरवर्ड्स बॅकला अन बॅकवर्डस पुढे ना? ;)

-Nile

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 9:00 pm | श्रावण मोडक

हेहेहेहे... तुनाकते! हा फुटबॉल आहे.

Nile's picture

1 Jul 2010 - 9:49 pm | Nile

हे हे, आम्ही त्याला सॉकर म्हंतो पण. ;)

-निले पेले

-Nile

दशानन's picture

1 Jul 2010 - 9:22 pm | दशानन







छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 9:51 pm | छोटा डॉन

=)) =)) =))
जबरान ...

निळ्या, तुला फुटबॉलमधला "फ" तरी कळतो का रे ?
च्यायला टीम आहे का शिवसेनेची माहिमची शाखा ?

------
छोटा डॉन

दशानन's picture

1 Jul 2010 - 9:57 pm | दशानन

>>>तुला फुटबॉलमधला "फ" तरी कळतो का रे ?

हा फुटबॉलचा माज का ?

या हुतुतु खेळायला मग आम्ही माज दाखवतो... :P

प्रभो's picture

1 Jul 2010 - 8:08 pm | प्रभो

माझी टीम खालीलप्रमाणे. (फिफाच्या नियमानुसार २३ खेळाडू निवडले आहेत.)
*घाशीराम भाउंनी त्यांच्या टीम मधे मला घेतल्याबद्दल धन्स.

गोलकीपर
१. नीलकांत २. निखील देशपांडे

फुल बॅक्स
१.मेघवेडा २.जे पी मॉर्गन ३.गणपा ४.पुणेरी

सेंटर बॅक्स
१.छोटा डॉन २.तात्या अभ्यंकर ३.बिपिन कार्यकर्ते ४.चतुरंग

डिफेंसीव्ह मिडफिल्डर्स
१.प्रमोद देव २.नंदन

अ‍ॅटॅकिंग मिडफिल्डर्स
१.सहज २.धमाल मुलगा ३.पिवळा डांबिस ४.ब्रिटीश टिंग्या

विंगर्स
१.श्रावण मोडक २.अवलिया ३.परिकथेतील राजकुमार ४.भडकमकर मास्तर

स्ट्रायकर्स
१.टारझन २.मिसळभोक्ता ३.आंबोळी (समोरच्याचा काटा काढण्यात ह्याचा हात कोण धरू शकणार?? ) ;)

पीआरओ : जयपाल
मेडीकल ऑफिसर : डॉ. दाढे

मी बुवा, ४-१-४-१ हे फॉर्मेशन खेळवणार.
पहिले चार मांडणी =>> फुल बॅक - सेंटर बॅक - सेंटर बॅक - फुल बॅक
मधला एक मांडणी =>> डिफेंसीव्ह मिडफील्डर
मधले चार मांडणी =>> विंगर - अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर - अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर - विंगर
शेवटचा एक मांडणी =>> स्ट्रायकर.

सेकंड हफ मधे गरजे नुसार ही मांडणी ४-२-३-१ करेन किंवा ४-४-२.

(म्यानेजर)प्रभो श्यांकली.

गणपा's picture

1 Jul 2010 - 8:17 pm | गणपा

हा हा हा त्या आंबोळ्याला फक्त कंदिल दिला हातात तर बाकीच्या कुंणाचीच गरज नाय रे तूझ्या टिमला
;)

Nile's picture

1 Jul 2010 - 8:33 pm | Nile

डिफेंसीव्ह मिडफिल्डर्स
१.प्रमोद देव २.नंदन

मेला, नंद्या आत्मपरि़क्षणातच मेला. ;)

१.श्रावण मोडक २.अवलिया ३.परिकथेतील राजकुमार ४.भडकमकर मास्तर

घ्या, इथेच सगळा राडा होणार.ह्यांच्यामध्ये काय कप्पाळ पासिंग होणार??? प्रभ्याची टीमतर सुपर १६ मध्ये पण नाय येत.

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 8:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत ... आपसांतल्या भांडण आणि तटस्थतेमुळे क्वालिफाय झाल्या टीम्स तरी खूप!

अदिती

प्रभो's picture

1 Jul 2010 - 8:44 pm | प्रभो

नायल्या, फुटबॉलची काहीतरी माहिती आहे का रे??
विंगर्स स्वतःमधे पासिंग करत नाहीत कधी......ते मिडफिल्डर्स आणी फॉरवर्ड्शी लिंक करतात भाऊ.... मोठे व्हा......

Nile's picture

1 Jul 2010 - 8:45 pm | Nile

तुला प्लेअर्स ची काही माहीती आहे का? ह्या पेक्षा हे लोक पलिकडच्या टीमला पास करतील =)) ... खुळा कुठला.

-Nile

दशानन's picture

1 Jul 2010 - 9:34 pm | दशानन

खरं आहे रे... !

हे लेकाचे फुटबॉल फुटबॉल म्हणून नाचते आहे.... येडं !

काय रे प्रभो.. ते चारचा लफडा लै मोठा होणार बघ... मास्तर, पर्‍या व नाना एकाच लिस्ट मध्ये ???

म्हणजे सगळे हलकट एकत्र !

कसे होणार रे तुझ्या टिमचे.

प्रभो's picture

1 Jul 2010 - 9:38 pm | प्रभो

हॅहॅहॅ...ते अपोझिशन साठी हलकट आहेत....आपल्याच टीम साठी नाही =))

दशानन's picture

1 Jul 2010 - 9:40 pm | दशानन

पण श्रामो................. !

अरे जरा वयोवृध्दांची काहीतरी काळजी घे रे ........

नाहीतर फुकट पैसा.............. दुसराच डॉक्टर घेऊन जाईल ना ( आज डॉक्टर डे ना ......... =))

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 8:57 pm | मेघवेडा

सहमत. नायला हॉप्पी बड्डे. उगाच पुढे पुढे करायचं नाय. चल मागं हो बघू गपचूप. ;)

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 8:55 pm | श्रावण मोडक

अरे ए... काय चाल्लंय? चार विंगर खेळवतात का फुटबॉलमध्ये? प्रभ्यानं तेवीस जणांची टीम दिलीय. त्यातले ११ च खेळतील ना?

Nile's picture

1 Jul 2010 - 8:58 pm | Nile

घ्या, मतभेद सुरु! प्रभ्याच्या टीमचं काय खरं नही. ;)

-Nile

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 9:00 pm | मेघवेडा

याला आवरा रे कुणीतरी. ते श्रामो बिचारे त्यांच्या म्यानेजरला पाठिंबा देताहेत तर फुकाचे आरोप करतो रे तू नायल्या? आँ?

Nile's picture

1 Jul 2010 - 9:02 pm | Nile

घ्या, अजुन टीम बाहेर गेली नाही तरी यांचे रडणे सुरु.. 'इंग्लिश' कुठले! =)) =))

-Nile

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 9:03 pm | श्रावण मोडक

मुद्दाम चाललंय त्याचं. त्याच्या प्लॅनमधली मोठी दरी दाखवली ना मघा मी. त्यामुळं चिडलाय तो. रडीचा डाव खेळत बसेल आता. :)

Nile's picture

1 Jul 2010 - 9:04 pm | Nile

अहो ती दरी प्रभ्याच्या प्लॅनमधली आहे माझ्या नाय काय! घ्या खेळाडू गोंधळले आत्तापासुनच. काय खरं नाय बा या टीमचं.

-Nile

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 9:09 pm | श्रावण मोडक

रडीचा डाव.
मघाच्या डान्याच्या टीमला हरवण्यासाठीच्या तुझ्या प्लॅनमध्ये मी किंवा मुसु यांचा विचारच तू केलेला नाही. तो प्लॅन फसणार हे कळल्याने चिडून तिकडून इकडे मोर्चा वळवलायस तू.
रडीचा डाव!!!

Nile's picture

1 Jul 2010 - 9:12 pm | Nile

हॅ हॅ, अज्ञानात सुख?? ;)

तरी बरं आम्ही प्रतिसादात लिहलं आहे सगळी शिक्रेटं सांगणार नाही म्हणुन. पण राहुद्या राहुद्या, असेच गाफिल रहा. ;)

-Nile

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 9:49 pm | श्रावण मोडक

अर्रे विसरलोच. आज आंतरराष्ट्रीय विनोद दिवस आहे की. चालू देत तुझे विनोद. आज एन्जॉय करतो. :)

Nile's picture

1 Jul 2010 - 9:53 pm | Nile

=)) =)) तुमचा ज्योक आवडला. ;)

-Nile

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 9:09 pm | मेघवेडा

अरेरे.. काय ही अवस्था. खूप त्रास होत असेल नाही रे? च्चच्चच्चच्च.. :D

प्रभो's picture

1 Jul 2010 - 9:02 pm | प्रभो

हो ११ च खेळणार....
आणी एका वेळेस म्याच मधे २ विंगर खेळणार.....

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 9:55 pm | छोटा डॉन

स्पर्धेच्या नियमाप्रमाणे "११+७=१८" एवढीच टीम द्यावी.
अन्यथा तुमची एन्ट्री डिक्वालिफाय करण्यात येईल.
कळावे.

------
छोटा डॉन

प्रभो's picture

1 Jul 2010 - 10:39 pm | प्रभो

कोणते नियम???
आम्ही फिफाचे विश्वस्तरीय नियम पाळलेले आहेत.... बाकीचे फाट्यावर..

टारझन's picture

1 Jul 2010 - 8:50 pm | टारझन

गुर्जींनी म्हणे एकदा गोल करायचा ट्राय केला ... पण तो हांपर लोकांना कळलाच नाय .... तं गुर्जी त्यांना "मठ्ठ" म्हणाले =)) त्यानंतर गुर्जींना काय हुक्की आली .. त्यांनी हांपरच्या खीशातनं रेडकार्ड काढलं आणि स्वतःलाच देऊन घेतलं =)) =)) =)) सगळ्या प्रेक्षकांचे गैरसमज झाले :)

बाकी आम्ही "णवख्या" पिलियर्स ला घेऊन टिम बनवतोय ... तेंव्हा थोडावेळ थांबा ... टीम जिंकण्यासाठी खेळत नाही आमची :)

- टारझन कापुर

टारझन's picture

1 Jul 2010 - 9:31 pm | टारझन

आमचा गोलटी : तात्या
तात्याला आम्ही गोलामधे एक पोतंभरुन पानं भरुन देणार ... म्हणजे तात्या सरकार गोलच्या आजुबाजुला पच्याकपच्याक थुंकुन ठेवणार =)) सगळे प्लेयर्स घसरुन आपटणार आणि रिटायर्ड हर्ट होणार ... थोड्यावेळानं कळलं समदे खपलेत आणि फक्त दोन गोल्टी उरलेत =)) म्याच ड्रा =)) हा ड्रा आमच्यासाठी विजयासारखा आहे.

रक्षक गटात : नाडीकांत रॉक
नाडिकांत बचाव करताना लोकांच्या नाड्या बांधणार =)) ना रहेगा स्ट्रायकर .. ना होंगा गोल =)) ड्रा !!

रँडम खेळाडु : अमिबा२१०
ह्याला आम्ही डोळ्यांना पट्टी बांधुन गोलगोल फिरवुन मैदानात सोडणार .. कुठे जायचं कुठे गोल करायचा कश्श्शाचाही पत्ता नसताना ड्रंकन मंकी टेक्निक ने फुटबॉल खेलुन रेफ्रीसकट सगळ्यांना कनफ्युज करुन ९० च्या ९० मिनीटं (एक्स्ट्रा टाईम सकट) पुर्ण वाया घालिवणार

गोल करण्याचे पोकळ प्रयत्न करण्यासाठी : गोलकर्मी
ह्यांना आम्ही स्पेक्टेटर्स ची संख्या मोजणे , कोणत्या देशातनं किती प्रेक्षक्स आले ... शिवाय जाहिराती करुन सपोर्टर्स जमवने आणि जमल्यास खेळल्यासारखे करणे अशा रणनीतीने उतरवु :)

टिम पिलियर्स ला टॉवेल पाणी पुरवायला एका IIहमालII -( शक्यतो ||श्री म्हसोबा प्रसन्न|| असावा) ची गरज आहे ... कुठे मिळेल काय ? सापडुन दिल्यास प्यार्टी मिळेल

संपली आमची टिम :) आहे का आव्वाज ?

गणपा's picture

1 Jul 2010 - 9:37 pm | गणपा

पाचर मारली आहे :)
सु़ज्ञास सांगणे न लगे. ;)

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 10:37 pm | मेघवेडा

परि तु टायमिंग चुकलासि.. :P

ब्रिटिश टिंग्या's picture

1 Jul 2010 - 9:27 pm | ब्रिटिश टिंग्या

* गोली / किपर :
१. नीलकांत
२. रावसाहेब (हे आमचे रॉबर्ट ग्रीन)

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. श्रावण मोडक
२. रामदासकाका
३. विजुभाउ

* साईड बॅक :
१. इनोबा म्हणे (हा आमचा सर्जिओ रॅमॉस)
२. विकास
३. धनंजय
४. विशाल कुलकर्णी

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. बिपिन कार्यकर्ते
२. चतुरंग
३. केशवसुमार

* मिडफिल्डर्स :
१. सहजराव
२. भडकमकर मास्तर
३. धमाल मुलगा
४. छोटा डॉन
५. हलकट नायल्या
६. मेघवेडा
७. गणपा
८. निदे

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :

१. अवलिया
२. परा
३. मास्तर
४. जेपी

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१. तात्या अभ्यंकर
२. मिभोकाका
३. टारझन
४. प्रभो

Nile's picture

1 Jul 2010 - 9:30 pm | Nile

च्यायला अपोझिशनला काय ठेवले का नाय बाकी?? =)) =))

-Nile

टारझन's picture

1 Jul 2010 - 9:35 pm | टारझन

म्हणुन म्हंटलो होतो ... एका म्याणेजर नी घेतलेल्या प्लेयर ला दुसर्‍या टिम मधी जागा नगं ... कितीतरी प्लियर्स दुर्लक्षित राहिले ... आता त्यांनी काय पिपाण्या वाजवायच्या ? की कवतिकं करायची इतर प्लियर्स ची ? :) बोला निले बोला

Nile's picture

1 Jul 2010 - 9:40 pm | Nile

तुम्ही चारच प्लेअर घेउन त्यांना मदत केल्याबद्दल तुम्हाला हॅपी बड्डे. ;)

बाकी राजकारण सगळीकडे चालायचंच, मैदानावर येउ देत की त्यांना मग दाखवु, बसलेत सगळे सुमडीत!

-Nile

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 10:01 pm | छोटा डॉन

भादरणीय टिंग्या,

टीम फकत ११+७ = १८ ची असावी.
बाकी गावच्या गप्पा नकोत.

उगाच ड्युप्लिकेट आयडी काढल्यासारखी नावे भरु नकात.
टीम एडित करा किंवा मग ती डिस्क्वालिफाय करण्यात येईल.

------
छोटा डॉन

मेघवेडा's picture

1 Jul 2010 - 10:40 pm | मेघवेडा

आता तुम्ही पाचर मारल्यावर एडिट काय करा? :P

विजुभाऊ's picture

2 Jul 2010 - 11:04 am | विजुभाऊ

टिंग्या हा लोकशाहीप्रेमी आहे त्यामुळे त्याने सर्वाना बरोबर घेऊन जाण्याचा विडा उचलला आहे.
( अवांतरः टिंग्या तुझे के जी चे शिक्षण बारामतीत झाले का? आख्खे गाव टीममध्ये घेतले आहेस)

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 9:46 pm | विसोबा खेचर

छानच रे.. :)

रामदास's picture

1 Jul 2010 - 10:05 pm | रामदास

आधी चीअरगर्ल म्हणून नाव टाका तरच मी खेळीन .
(मग दुसर्‍या क्लबाची माणसं पण आमचीच.)
म्हणजे मग माझ्या नातवंडांना बोर्ड खेळाचे पंचवीस गुण देईल.
(दोन मॅच्या खेळलो तर जास्तीचे पंचवीस धमालच्या मुलाला देईन.)
असो.
अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी.
कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा.
अव्वल नंबर वन.
आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!

रामदास's picture

1 Jul 2010 - 10:07 pm | रामदास

निषेध नोंदवायचा राहीलाच की.
आमच्या मास्तरांना विसरल्याबद्दल सगळ्यांचा त्रिवार निषेध.

Nile's picture

1 Jul 2010 - 10:11 pm | Nile

प्रभु मास्तर आमच्या टीमचे कोच. साला बेंचावरुन असल्या कथा ऐकवतील की लोकांच्या चिंबोर्‍या गायब! ;)

-Nile

विकास's picture

1 Jul 2010 - 10:35 pm | विकास

जेंव्हा दोन टिम मध्ये खेळ चालू होईल तेंव्हा त्या दोन्ही टिम्समधे असलेल्या "कॉमन" खेळाडूंनी कुणाकडून खेळायचे? :?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 10:35 pm | श्रावण मोडक

आम्ही २, ४, ४ फॉर्मेशनवाले. आमची टीम -
गोली (१) - नीलकांत (पर्यायच नाही), निखिल देशपांडे.
बॅक (२) - बिपिन कार्यकर्ते, रामदासकाका, मुक्तसुनित, अक्षय पुर्णपात्रे.
मिड (४) - आळश्यांचा राजा, नंदन, घासकडवी - हे किंचित मागं; पुण्याचे पेशवे, इनोबा, सहज - हे दोन पावलं पुढंच.
फॉरवर्ड (४) - धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
मिड आणि फॉरवर्डमध्ये कुणाला सामन्यात खेळवायचं आणि कुणाला नाही हा निर्णय तसा अवघड. त्यावरून कुणी नाराज न होणं महत्त्वाचं. म्हणजे हा निर्णय घेणारा जो असेल तो खमक्या पाहिजे.
मॅनेजर/कोच - पिवळा डांबीस
प्रसिद्धी - तात्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.

झालं ना! आता डॉन्या काय मी+मकी विरूद्ध कधी धमु कधी निळ्या अशी तुमच्या इस्टेटीची भांडणं सोडवत बसणार का फॉरवर्ड, पक्षी पुढाकार, घेऊन!

अदिती

Nile's picture

1 Jul 2010 - 10:56 pm | Nile

हॅ हॅ, श्रामोंची टीम आवडली, मकी आणि अदितीचं 'नाव लावुन' ऐन वेळी त्यांना न खेळवण्याची कल्पना पण भारी, अन सगळं खापर पिडां काकांवर! जिओ श्रामो! ;)

-Nile