मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
1 Jul 2010 - 5:34 pm

डिस्केमर :
१. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा.
२. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत.

वि. सु. : फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालानंतर इथे निवडल्या गेलेल्या "बेस्ट टीम ऑफ मिपाकर फॉर फुटबॉल" ह्याला मिपाच्या 'फिफापानाच्या मुखपॄष्ठावर ( जमल्यास ) " स्थान दिले जाईल.
असो.

काय मग ?
फुटबॉल वर्ल्डकपची मज्जा घेत आहात ना ?
तुमची कोणती तरी फेव्हरिट टीम असेल, आवडते खेळाडु असतील, आवडते फॉर्मेशन असेल, आवडता गेम्-प्लान असेल वगैरे वगैरे ...

अहो मग तेच सगळे निकष लावा ना आपल्या मिपाकरांबद्दल.
येऊ द्यात तुमची 'फुटबॉल टीम आपल्या मिपाकारांचा समावेश असलेली' , सोबत तुम्हाला एक फॉर्मेशन आणि त्या टीमचे प्लेयरच्या पोझिशन्स आणि इतर डिटेल्स द्यावे लागतील.
माझी टीम झाली देतोच आहे व त्यातल्या दिलेल्या माहितीच्या आधारावर शेम टु शेम तशीच तुमची टीम येऊद्यात.
जस्त स्पष्टीकरण जमत नसेल तर निदान नावे आली तरी हरकत नाही त्यांच्या पोझिशन्ससह.

तुम्हाला एकुण " ११ + ७ ( राखिव आणि ऐच्छिक ) = १८ खेळाडु" इथे द्यायचे आहेत.
दुसर्‍या संघात आलेले खेळाडु पुन्हा वापरायला परवानगी आहे.
सोबत फॉर्मेशन आल्यास उत्तम ...

येऊ द्या मग तुमची टीम ... खास आपल्या मिपाकरांनी बनलेली !!! :)

*** आमची टीम :

१. फॉर्मेशन :
आमचे नेहमीचे आवडते ४-४-२.
त कसे असते आणि त्यात कोण कुठे असतो ते खालिल चित्रात पहा म्हणजे त्या आधारे आम्ही कोणते प्लेयर त्यांच्या कुठल्या क्ल्वालिटीसाठी निवड्ले ह्याचा तुम्हाला अम्दाज येईल व तुम्हाला तुमची टीम बनवणे सोपे जाईल. ;)

* गोली / किपर :
१. नीलकांत : सांगायची गरज नाही, मिपाचे रक्षण करण्यात ह्या माणसाएवढे कष्ट घेणारा अजुन दुसरा कोणी माझ्या पाहण्यात नाही
२. तात्या अभ्यंकर : अगदीच गरज पडली तर नीलकांतची रिप्लेसमेंट म्हणुन आम्ही पोझिशनला तात्यांना खेळवु ..
बाकी तात्यांची स्वतःची अशी खास वेगळी पोझिशन आहे ती पुढे येईलच ;)

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
ह्यांचे काम असते ते हल्ले रोखणे व ते गोली किंवा गोलपोस्टापर्यंत जाऊ न देणे. तसेच चाली रचण्याची व डाव खेळण्याची सुरवात ह्यांच्यापासुनच होते.
कुठलाही संघ 'मजबुत' हवा असेल तर त्यात चांगले सेंटर बॅक असणे आवश्य्क असते.
१. बिपिन कार्यकर्ते
२. रामदासकाका
३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
एकदम मजबुत बचवफळी, कुठल्याही वेळेला हमखास 'बचाव' करुन बाजु संभाळतील असा विश्वास.
मुख्य सामन्यात आम्ही ह्यातले २ जण खेळवु ...

* साईड बॅक :
हे पण खरे तर डिफेंडर्सच, ह्यांचेही काम बचाव करणे हेच असते.
पण ह्यांच वेगळा रोल अशासाठी की जेव्हा वेळ येते तेव्हा बचाव सोडुन ह्यांना "आक्रमण" ही संभाळावे लागते, समोरच्याला एखादा 'झटका' देऊन त्याची बोलती बंद करावी लागते, मधल्या फळीशी ताळमेळ ठेवावा लागतो, असे हे बहुआयामी 'साईड बॅक्स' ...
१. चतुरंग ( राईट बॅक )
२. विकास ( लेफ्ट / राईट बॅक )
३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक )

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
ह्यांचे एकच काम, सगळीकडे लक्ष ठेवणे आणि कुठे काय कमी पडते आहे हे पाहुन त्यानुसार योग्य ती अ‍ॅक्शन घेणे.
बचावफळीला अणि आघाडीला सारखेच महत्व देणारे टीमचे मजबुत खांदे. हे जर चांगले नसतील तर टीमचा बाजार उठलाच समजा ...
१. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम )
२. मुक्तसुनित
ह्यातला '१' आम्ही फायनलला खेळवनार

* मिडफिल्डर्स :
मधल्या फळीतले आणि संघाच्या 'प्रगती'चे काम पाहणारे धुरंदर, मधली फळी दमदार असेल तरच संघ उभा राहतो.
नवनवीन चाली रचणे, डावपेच रचणे, आघाडीला प्रोत्साहन आणि मदत देणे, गरज पडल्यास स्वतः आघाडीला धावणे, आघाडीच्या योग्य त्या आसामीस पाठिंबा देणे व त्याच्याकडुन हवा तो रिझल्ट मिळवणे. मिडफिल्डर्स म्हणजे संघाचा कणा, मजबुत असायलाच हवा ...
१. सहजराव
२. भडकमकर मास्तर
३. धमाल मुलगा ( ह्यात अज्जिबात पार्शिलिटी नाही, जरा त्याच्या खव पहा आणि सांगा त्याने किती माणसे जोडली आहेत व तो कसे सगळ मॅनेज करतो ते )
ह्यातले आम्ही "२ " जण मुख्य सामन्यात खेळवणार

* अ‍ॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
नावातच सगळे आहे, म्हणले तर मिडफिल्डर्स पण कधी पुढे जाऊन 'हल्ला' करुन समोरच्याचा डोक्यावर शॉट काढतील ह्याची खात्री नाही.
सपोर्ट आणि अ‍ॅटॅक ह्याचा उत्तम समतोल असणारे हे आसामी ...
१. अवलिया ( सर्वात बेश्ट, खरे तर स्ट्रायकरच व्हायचा पण मधुन आधुन 'विधायक' कामे करतात म्हणुन मिडफिल्डला टाकला )
२. अदिती
ह्यातला "१" जण मुख्य सामन्यात खेळेल.

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
बेधडक घुसणे, कसलाही विचार न करता समोरच्यावर बिनधास्त हल्ला करुन मैदान मारणे, खेळ गाजवणे, समोरच्याचा पार चिंध्या चिंध्या करणे, मध्येच एखादा धडाकेबाज फटका मारुन 'प्लेयर ऑफ द डे' होणे अशी ह्या स्ट्रायकर्सची नाना कौशल्ये.
माणुस मात्र दमदारच हवा, बाकी थोडे "अ‍ॅडज्स्ट" करता येते. तापट आहे, हरकत नाही. पटकन निराश होतो, हरकत नाही, पण माणुस रिझल्ट ओरियंटेडच हवा ... असे हे स्ट्रायकर्स
१. तात्या अभ्यंकर ( जेव्हा गोली असलेला कांता फीट असतो तेव्हा हे बिनधास्त स्ट्रायकर म्हणुन खेळु शकतात व समोरच्यावर आरामात हल्ले करु शकतात )
२. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर )
३. टारझन ( एक भरपुर टॅलेंट असलेला एकदम तरुण स्ट्रायकर, पण जरा 'पेशन्स' कमी, बर्‍याच वेळा रेडकार्ड घेऊन बाहेर जातो व पुढची मॅचही बेंचवर बसुन पहातो , पण ज्या दिवशी खेळेल तो दिवस त्याचाच )
मेन सामन्यात आम्ही ह्यातले "२ जण" खेळवु ...

तर अशी आहे आमची टीम !

कोण आहे का आम्हाल चॅलेंज देऊन आमच्या टीमशी २ हात करायला ?
आहे का कुणाची हिंमत ?
असेल तर येऊद्यात तुमची टीम, वाट पहातो आहे ...

- ( मॅनेजर ) डॉन्या मुर्‍हिनो

तळटीप : वर नावे घेतल्यापैकी कुणाला आक्षेप असल्यास तसे आम्हाला कळवावे, माफीसह नाव मागे घेतले जाईल. आपल्यातल्या क्वालिटीज ओळखुन आपला समावेश आमच्या टीममध्ये केलेला आहे. असो.

वि.सु. : धागा केवळ मौजमजेपुरताच मर्यादित रहावा ही पुन्हा एकदा आग्रहाची विनंती !!!

मांडणीविनोदसमाजक्रीडामौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निळू, तू मोठा न झाल्याने कोरडा, आपलं मैदानाच्या बाहेरच रहाशील रे!

अदिती

छोटा डॉन's picture

1 Jul 2010 - 11:06 pm | छोटा डॉन

>>फॉरवर्ड (४) धमाल मुलगा, छोटा डॉन, टारझन, ३_१४ अदिती, मस्त कलंदर, नाईल.
=)) =))
ओ श्रामो, कशाला मला ह्या घोळात घालता आहात ?

च्यायला ते धम्या बॉल पास कर म्हटले तर 'जोहार मायबाप, काय म्हणतेय मग तुमची ती?' म्हणुन गप्पांचा फड लावायचा, तिकडे बॉल गुडुप्प.
टार्‍याचे तर नावच नको, उगाच मला दर ५ मिनिटाला "काय रे, मगाशी मी दिलेला पास कुणी मध्येच उडवुन लावले रे?' म्हणुन माझ्याच डोक्यावर शॉट काढायचा.
मी इकडे गोल करायला अलमोस्ट गोलपोस्टच्या जवळ जायचो व अदिती म्हणेल "ओ राको, जरा आमच्याकडे लक्ष असु द्या !", आता कसला गोल करणार सांगा.
मकचे तर काय बोलायलाच नको, उगाच मलाच घाबरुन घाबरुन रहावे लागेल एखाद्या कोपर्‍यात, उगाच समजा स्कोर ०-० झाला तर " ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ?
आन ते नाईल्या, फोकलीचं मॅचच्या मध्येच मला त्याच्या खिषात ठेवलेले "तसले" फोटो दाखवणार, मग कसला गोल करता राव !

------
(ज्याम फसलेला)छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2010 - 11:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =))

लै बेक्कार पास होता हा डान्या!

अदिती

श्रावण मोडक's picture

1 Jul 2010 - 11:20 pm | श्रावण मोडक

छोटा डॉन, अदिती, नाईल यांना समज देण्यात येत आहे की, आपल्या अडचणींबाबत, मुद्यांबाबत पिवळा डांबिस यांच्याशी टीममिटिंगमध्ये चर्चा करावी. संघाचे आतले विषय असे जाहीर करू नयेत. अन्यथा तात्या यांचे काम आणखी अवघड होत जाईल. ;)

मस्त कलंदर's picture

1 Jul 2010 - 11:20 pm | मस्त कलंदर

ही बाकी शुन्य कशी राहिली?" ह्या प्रश्नाचे मी काय उत्तर द्यायचे बॉ ?

=)) =)) =)) =)) लै बेक्कार...

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

2 Jul 2010 - 12:29 am | रेवती

आज छोटा डॉन यांनी दंगा करतायेण्याजोगा धागा काढून समस्त संपादकवर्गाचे काम हलके केले आहे व आमचा दुवा घेतला आहे. रोज असा एखादा धागा काढल्यास बाकिच्या धाग्यांवर उगीच गोंधळ उडणार नाही. बरे, हा खेळही सगळ्यांच्या आवडीचा! कोण कश्याला वाईट लिहितय?;)

रेवती

ramjya's picture

2 Jul 2010 - 9:57 am | ramjya

छान फुटबॉल टीम.........

दीपक साकुरे's picture

2 Jul 2010 - 11:02 am | दीपक साकुरे

गोली / किपर :
१. नीलकांत
२. निखील देशपांडे ( ठाण/औरंगाबादची अभेद्य भिंत पोस्टसमोर असताना कुनाची बिशाद आहे गोल करायची)

* सेंटर बॅक डिफेंडर्स :
१. श्रावण मोडक
२. बिपिन कार्यकर्ते
३. विजुभाउ

* साईड बॅक :
१. विसोबा खेचर ( एकदा का बॉल ऑपोसिशनच्या डी मधे गेला की आम्ही कवीता करयाला मोकळे )
२. विकास

* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
१. बिपिन कार्यकर्ते
२. चतुरंग
३. केशवसुमार

* मिडफिल्डर्स :
१. सहज ( सहज म्हनता म्हनता गोल करुन यायचे, कुनाला माहीत..)
२. निले / नायले / नाइल़ ( क्रुपया योग्य तो उच्चार करावा.. इंग्रजीची शिकवनी चालु आहे.. चु भु घ्यावी / द्यावी )
३. धमाल मुलगा
४. छोटा डॉन

* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
१) टारझन ( यांनी गोल नाही केला तरी चालेन पण किमान अपेक्शा ही की प्रतीस्पर्धी संघाचे कमीत कमी २ खेळाडु मैदानाबाहेर घालवावेत.. )
२) ३_१४ विक्षिप्त अदिती ( एकदा का टारुभाउंनी आपले काम केले की यांचा 'तिरक्या' गोलांचा पाउस चालू )

उदास नोकरदार,
वाटलाव्या व्यवस्थापक, घाटकोपर एफ सी

स्मिता चावरे's picture

2 Jul 2010 - 11:11 am | स्मिता चावरे

अतीशय सुंदर खेळकर धागा .निरोगी.
कुणालाही वावडं नसलेला आणि कल्पना शक्तीला भरपूर वाव देणारा धागा.
अव्वल नंबर वन.
आता कुणीतरी खेळाडूंचे आणि म्यानेजरांचे संवाद पण लिहा की !!!

जागु's picture

2 Jul 2010 - 11:27 am | जागु

बर झाल माझ नाव कुणी ह्या टिम मध्ये टाकल नाही. कारण मी फुटबॉल बद्दल माझे ज्ञान खुप कमी आहे. मला कसलेच नियम माहीत नाहीत.

मोहन's picture

2 Jul 2010 - 11:31 am | मोहन

माझी टीम ५-४-१-१ फॉरमेशन ने खेळेल.

फॉरवर्ड लाईन
१ सेंटर फॉर्वड - तात्या.
२. इनसाईड राईट - रामदास
३. इनसाईड लेफ्ट - प्रभू सर
४. राईट विंगर - अवलीया
५. लेफ्ट विंगर - श्रामो

ही सगळी मंडळी किक-ऑफलाच आपला कट्टा चालू करुन बसतील. समोरचे स्ट्रायकर कुठे असतील असे वाटते ? परत यमनालाच घडाभर .... घालणारच त्यामुळे वूवूझेलांवर फक्त "क्या बात है" चा गोंगाट ऐकू येईल.

मीडफील्डर्स
१. शशीकांत ओक
२. परा
३ धमु
४ अदितीबाई दुर्बिटणे

कट्ट्यातून सुटलेल्यांच्या नाड्या बांधून ठेवण्याची जबाबदारी.
कट्ट्याला समयोचीत सप्लाय करत राहणे. कट्टेकर्यांवर बारिक नजर ठेवणे.
वेळ पडल्यास पुढचा गोली, रेफ्री,लाईनमन लोकांनासुध्दा पकडून पकडून कट्ट्यास घेवून येणे.

ब्याक

१.नीलकांत - म्याच चालू राहील याची हाच खबरदारी घेवू शकतो.

गोलकीपर

१. टारझन

आहे कोणाची बिषाद गोल करायची. अरे गोल जवळ जरी कोणी फिरकला तर ... असो.

या सगळ्या मधे बहूतेक रेफ्रीच गोल करून सामना संपल्याचे जाहीर करेल.

मोहन

रामदास's picture

2 Jul 2010 - 11:32 am | रामदास

झाल्यामुळे मला पण फुटबॉलच्या चार भिडूंची ओळख झाली आणि नियम कळले.नाहीतरी माझं ज्ञान डेंपो साळगावकर मोहन बगान आणि इस्ट बेंगालच्या पलीकडे नव्हतं.

अवलिया's picture

2 Jul 2010 - 11:51 am | अवलिया

धागा कहर आहे

--अवलिया

विजुभाऊ's picture

2 Jul 2010 - 2:14 pm | विजुभाऊ

ये आपने कहर बरपाया
कुछ ना कहकर हमे तडपाया
वो वक्त ही कुछ ही अलग था
हर शख्स हमे शाख पर बैठा उल्लु नजर आ रहा था

जे.पी.मॉर्गन's picture

2 Jul 2010 - 2:20 pm | जे.पी.मॉर्गन

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आता सावकाश वाचून मग प्रतिसाद देतो

जे पी

शानबा५१२'s picture

2 Jul 2010 - 8:22 pm | शानबा५१२

लेख खुप भावुक होता.......

________________________________________________
'मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे