मिपा सुपर सिलेक्टर - मिपाकरांची फुटबॉल टीम
डिस्केमर :
१. हा खेळ केवळ मौजमजा आणि विरंगुळा इथपर्तंच मर्यादित असावा.
२. स्कोअर सेटर करणे, वैयक्तिक चिखलफेक, वाद-विवाद, गदारोळ आदी बाबी आढणारे व अनावश्यक फाटे फोडणारे प्रतिसाद अपेक्षित नाहीत.
वि. सु. : फुटबॉल वर्ल्डकपच्या निकालानंतर इथे निवडल्या गेलेल्या "बेस्ट टीम ऑफ मिपाकर फॉर फुटबॉल" ह्याला मिपाच्या 'फिफापानाच्या मुखपॄष्ठावर ( जमल्यास ) " स्थान दिले जाईल.
असो.
काय मग ?
फुटबॉल वर्ल्डकपची मज्जा घेत आहात ना ?
तुमची कोणती तरी फेव्हरिट टीम असेल, आवडते खेळाडु असतील, आवडते फॉर्मेशन असेल, आवडता गेम्-प्लान असेल वगैरे वगैरे ...
अहो मग तेच सगळे निकष लावा ना आपल्या मिपाकरांबद्दल.
येऊ द्यात तुमची 'फुटबॉल टीम आपल्या मिपाकारांचा समावेश असलेली' , सोबत तुम्हाला एक फॉर्मेशन आणि त्या टीमचे प्लेयरच्या पोझिशन्स आणि इतर डिटेल्स द्यावे लागतील.
माझी टीम झाली देतोच आहे व त्यातल्या दिलेल्या माहितीच्या आधारावर शेम टु शेम तशीच तुमची टीम येऊद्यात.
जस्त स्पष्टीकरण जमत नसेल तर निदान नावे आली तरी हरकत नाही त्यांच्या पोझिशन्ससह.
तुम्हाला एकुण " ११ + ७ ( राखिव आणि ऐच्छिक ) = १८ खेळाडु" इथे द्यायचे आहेत.
दुसर्या संघात आलेले खेळाडु पुन्हा वापरायला परवानगी आहे.
सोबत फॉर्मेशन आल्यास उत्तम ...
येऊ द्या मग तुमची टीम ... खास आपल्या मिपाकरांनी बनलेली !!! :)
*** आमची टीम :
१. फॉर्मेशन :
आमचे नेहमीचे आवडते ४-४-२.
त कसे असते आणि त्यात कोण कुठे असतो ते खालिल चित्रात पहा म्हणजे त्या आधारे आम्ही कोणते प्लेयर त्यांच्या कुठल्या क्ल्वालिटीसाठी निवड्ले ह्याचा तुम्हाला अम्दाज येईल व तुम्हाला तुमची टीम बनवणे सोपे जाईल. ;)
* गोली / किपर :
१. नीलकांत : सांगायची गरज नाही, मिपाचे रक्षण करण्यात ह्या माणसाएवढे कष्ट घेणारा अजुन दुसरा कोणी माझ्या पाहण्यात नाही
२. तात्या अभ्यंकर : अगदीच गरज पडली तर नीलकांतची रिप्लेसमेंट म्हणुन आम्ही पोझिशनला तात्यांना खेळवु ..
बाकी तात्यांची स्वतःची अशी खास वेगळी पोझिशन आहे ती पुढे येईलच ;)
* सेंटर बॅक डिफेंडर्स :
ह्यांचे काम असते ते हल्ले रोखणे व ते गोली किंवा गोलपोस्टापर्यंत जाऊ न देणे. तसेच चाली रचण्याची व डाव खेळण्याची सुरवात ह्यांच्यापासुनच होते.
कुठलाही संघ 'मजबुत' हवा असेल तर त्यात चांगले सेंटर बॅक असणे आवश्य्क असते.
१. बिपिन कार्यकर्ते
२. रामदासकाका
३. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे
एकदम मजबुत बचवफळी, कुठल्याही वेळेला हमखास 'बचाव' करुन बाजु संभाळतील असा विश्वास.
मुख्य सामन्यात आम्ही ह्यातले २ जण खेळवु ...
* साईड बॅक :
हे पण खरे तर डिफेंडर्सच, ह्यांचेही काम बचाव करणे हेच असते.
पण ह्यांच वेगळा रोल अशासाठी की जेव्हा वेळ येते तेव्हा बचाव सोडुन ह्यांना "आक्रमण" ही संभाळावे लागते, समोरच्याला एखादा 'झटका' देऊन त्याची बोलती बंद करावी लागते, मधल्या फळीशी ताळमेळ ठेवावा लागतो, असे हे बहुआयामी 'साईड बॅक्स' ...
१. चतुरंग ( राईट बॅक )
२. विकास ( लेफ्ट / राईट बॅक )
३. नितीन थत्ते ( आवर्जुन लेफ्ट बॅक )
* डिफेंसीव्ह मिडफिल्डर :
ह्यांचे एकच काम, सगळीकडे लक्ष ठेवणे आणि कुठे काय कमी पडते आहे हे पाहुन त्यानुसार योग्य ती अॅक्शन घेणे.
बचावफळीला अणि आघाडीला सारखेच महत्व देणारे टीमचे मजबुत खांदे. हे जर चांगले नसतील तर टीमचा बाजार उठलाच समजा ...
१. श्रावण मोडक ( सध्याच्या घडीतले सर्वोत्तम )
२. मुक्तसुनित
ह्यातला '१' आम्ही फायनलला खेळवनार
* मिडफिल्डर्स :
मधल्या फळीतले आणि संघाच्या 'प्रगती'चे काम पाहणारे धुरंदर, मधली फळी दमदार असेल तरच संघ उभा राहतो.
नवनवीन चाली रचणे, डावपेच रचणे, आघाडीला प्रोत्साहन आणि मदत देणे, गरज पडल्यास स्वतः आघाडीला धावणे, आघाडीच्या योग्य त्या आसामीस पाठिंबा देणे व त्याच्याकडुन हवा तो रिझल्ट मिळवणे. मिडफिल्डर्स म्हणजे संघाचा कणा, मजबुत असायलाच हवा ...
१. सहजराव
२. भडकमकर मास्तर
३. धमाल मुलगा ( ह्यात अज्जिबात पार्शिलिटी नाही, जरा त्याच्या खव पहा आणि सांगा त्याने किती माणसे जोडली आहेत व तो कसे सगळ मॅनेज करतो ते )
ह्यातले आम्ही "२ " जण मुख्य सामन्यात खेळवणार
* अॅटॅकिंग / ऑफेंसिव्ह मिडफिल्डर :
नावातच सगळे आहे, म्हणले तर मिडफिल्डर्स पण कधी पुढे जाऊन 'हल्ला' करुन समोरच्याचा डोक्यावर शॉट काढतील ह्याची खात्री नाही.
सपोर्ट आणि अॅटॅक ह्याचा उत्तम समतोल असणारे हे आसामी ...
१. अवलिया ( सर्वात बेश्ट, खरे तर स्ट्रायकरच व्हायचा पण मधुन आधुन 'विधायक' कामे करतात म्हणुन मिडफिल्डला टाकला )
२. अदिती
ह्यातला "१" जण मुख्य सामन्यात खेळेल.
* स्ट्रायकर / फॉर्वर्ड / क्लिनिकल फिनिशर :
बेधडक घुसणे, कसलाही विचार न करता समोरच्यावर बिनधास्त हल्ला करुन मैदान मारणे, खेळ गाजवणे, समोरच्याचा पार चिंध्या चिंध्या करणे, मध्येच एखादा धडाकेबाज फटका मारुन 'प्लेयर ऑफ द डे' होणे अशी ह्या स्ट्रायकर्सची नाना कौशल्ये.
माणुस मात्र दमदारच हवा, बाकी थोडे "अॅडज्स्ट" करता येते. तापट आहे, हरकत नाही. पटकन निराश होतो, हरकत नाही, पण माणुस रिझल्ट ओरियंटेडच हवा ... असे हे स्ट्रायकर्स
१. तात्या अभ्यंकर ( जेव्हा गोली असलेला कांता फीट असतो तेव्हा हे बिनधास्त स्ट्रायकर म्हणुन खेळु शकतात व समोरच्यावर आरामात हल्ले करु शकतात )
२. मिभोकाका ( जेन्युईन स्ट्रायकर )
३. टारझन ( एक भरपुर टॅलेंट असलेला एकदम तरुण स्ट्रायकर, पण जरा 'पेशन्स' कमी, बर्याच वेळा रेडकार्ड घेऊन बाहेर जातो व पुढची मॅचही बेंचवर बसुन पहातो , पण ज्या दिवशी खेळेल तो दिवस त्याचाच )
मेन सामन्यात आम्ही ह्यातले "२ जण" खेळवु ...
तर अशी आहे आमची टीम !
कोण आहे का आम्हाल चॅलेंज देऊन आमच्या टीमशी २ हात करायला ?
आहे का कुणाची हिंमत ?
असेल तर येऊद्यात तुमची टीम, वाट पहातो आहे ...
- ( मॅनेजर ) डॉन्या मुर्हिनो
तळटीप : वर नावे घेतल्यापैकी कुणाला आक्षेप असल्यास तसे आम्हाला कळवावे, माफीसह नाव मागे घेतले जाईल. आपल्यातल्या क्वालिटीज ओळखुन आपला समावेश आमच्या टीममध्ये केलेला आहे. असो.
वि.सु. : धागा केवळ मौजमजेपुरताच मर्यादित रहावा ही पुन्हा एकदा आग्रहाची विनंती !!!

प्रतिक्रिया
मस्त टीम आहे....
+१
आमची टिम
अरे
चुचु आणि
>>खेळाडु
अबे
कच्चे दुवे
जबरा ...
ह ह लो पो
वो मालक ते
अरे हो ...
च्यायला हा
फाऊल ...
मस्त!
अहो साईड
हॅहॅहॅ..
एकही
नितीन
राजकारण
आम्हाला
...
एक विनंती ...
आमची एक
आमची एक
कंसातल्या
लै भारी रे
बर्रं...
हा हा हा
असेच म्हणतो
ही घ्या टीम
हरकत नाही ...
ते अपोझिशन
>>डॉनसाहेब
ह्ह्ह्ह्ह
डान्याच्य
छप्पर फाड
(विषय दिलेला नाही)
चिंता नको
ते मधुबाला
बास्स
बरोबर आहे,
हेहेहे
हे हे,
(विषय दिलेला नाही)
???
>>>तुला
माझी टीम
हा हा हा
डिफेंसीव्
Pagination