एप्रिल फळ (५)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
14 Apr 2008 - 8:13 pm

आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते. आंब्या च्या रसा त थोडे ताक् घालुन् त्याला मोहोरी,जिरे/ओव्याची फ़ोडणी दिलेली असते. आमरस् जर् थोडा आंबट् असेल् तर काही विचारायला नकोच "अम्रुता ते पैजा जिंके" अशी चव. जेवणा अगोदर् प्यायला दिले तर पोटभर जेवलेल्या माणसाला सुद्धा पुन्हा कडकडुन् भूक् लागेल. या दिवसात् सगळे घरच् "आंबा" मय झालेले असते. स्वयंपाक् घरात् तर आंब्या ला मध्या भागी ठेउनच् सगळे पदार्थ् केलेले असतात्.
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते.

घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते.
नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
आंब्यांच्या आठवणीबरोबर् ही आठवण् प्रत्येकवेळी ताजी होऊन येते. बाजारात आता आंबा महोत्सव् चालु असतो. प्रत्येक जण् आंब्यांचे काही ना काही करत असतो पिकलेल्या हापुसआंब्याचा मोरांबा ही खास पाककृती वर्तमान पत्रात् झळकते. घरात् घरात् त्यावर् प्रयोग् होतात साखर् आंबा गुळांबा केला बरण्यात् भरला जातो.
आंबे असतात् तरी कैर्या येतच् असतात्. आता मात्र त्या खास लोणच्या साठी येत् असतात्. एकदम कडक् आणि बिन वासाच्या ही त्यांची पहीली पारख. घरात माळावर् अडगळीत पडलेले खास कैरी फ़ोडण्यासाठी बनवलेले अडकित्त्ते घासून् पुसून् लखलखत बाहेर येतात्.खड्डा असलेल्या पाटावर् सोललेली पांढरी कैरी व्यवस्थित् बसते. एका घावात् दोन तुकडे होतात. बघता बघता कैरी च्या तुकड्यांचा ढीग् होतो. त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात्.आणि हळदी , मसाल्याचा साज चढविलेल्या कैर्या पडदानशीन् होतात.कैरी च्या या देखण्या खानदानी तुकड्याना दृष्ट् लागु नये. बाहेरचे असंस्कृत् वारेसुद्धा लागु नये म्हणुन् बरण्या फ़डकी लाउन् पुरेपुर् बंदोबस्तात् पुन्हा फ़डताळात् रवाना होतात. या खजिन्यावर् मुलांचा डोळा असतोच्. आजी ते ओळखुन् असते. ती हळुच् मुलाना एकेक् फ़ोड् देते. बाठीच्या जवळचा कडक तुकडा ज्याला मिळतो तो आपल्याला स्पेश्यल् ट्रीटमेन्ट मिळाली आपण् आजीचे लाडके या आनन्दात् असतो. या फ़ोडीवरचा मसाला नळाखाली धुवुन् नुसत्या हळदी मिठात् मुरलेल्या फ़ोडी खाणे यात स्वर्गीय आनन्द्. ज्याने चाखले त्यालाच हे ब्रम्हरहस्य ठाउक..
एरवी खास असणारा आमरस् आता अगदीच् आम झालेला असतो. मुबलक् झाला तरी तो आपला आब राखुन असतो. आंबा पोळी , आंबा वडी हे प्रयोग् चालुच् असतात्. ताटलीला तूपाचा हात् लावुन् त्यावर् आमरसाचा पातळ् थर या रोपात् आमरस् उन्हात् बसतो. मुलांच्या तावडीतुन् सुटलेली आंबा पोळी हे आंब्याचे आणखी लोभस रूप्. गोल तलम गुळगुळीत् आंबापोळी आंब्याचे सारे गुण् घेउन् पुन्हा अवतरते.आंब्याच्या रसाचे आटवण हे आंब्याची वर्षभर आठवण् ताजी करायची गुप्त् युक्ती. सुंभ जळला तरी पीळ जळत् नाही तसे मोसम संपला तरी आम्र पुराण् काही संपत येत् नाही. बर्फ़ी आईस् क्रीम् सरबत् अशा नाना प्रकाराने आंबा भेटीला येतच् रहातो.
आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

14 Apr 2008 - 8:31 pm | स्वाती दिनेश

त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो.
लोणच्या चे हे वर्णन आवडले.बाकी आंबा महात्म्य काय वर्णावे?
स्वाती

व्यंकट's picture

14 Apr 2008 - 8:35 pm | व्यंकट

>>आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल.
ह्म्म चांगला व्यासंग आहे...

व्यंकट

इनोबा म्हणे's picture

14 Apr 2008 - 8:36 pm | इनोबा म्हणे

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते.
क्या बात है विजुभाऊ... अगदी भरलेले ताट डोळ्यासमोर आले... जिभेला पाणी सुटले की हो!

एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात.
अगदी बरोबर बोललात बघा. आमच्या घरी आता लोणचे वगैरे बनवत नाहीत,त्यामुळे बरणी तशीच पडून आहे.कुणाला पाहीजे असेल तर सांगा भौ.

विजुभाऊ हा भाग सुद्धा पहील्या भागांसारखाच उत्तम जमला आहे.अगदी मुरलेल्या कैरीच्या लोणच्यासारखा...

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

लेखातील पहिला परिच्छेद वाचल्यावरच तो॑डा॑ला पाणी सुटले, मी आ॑ब्याच्या सीझनला भारतात नाही ह्याचे खुप दु:ख वाटते, लेख वाचल्यावर आजोळी कोकणात जाऊन आल्या सारखे वाटले, पाहु इथे देवगडचा हापुस आ॑बा कोठे मिळ्तो ते. शेवटी आम्ही पडलो कोकणी त्यामुळे आ॑बा, फणस, रातआ॑बे , काजु, करव्॑द, जा॑भुळ हे वीक पॉइ॑ट.

छोटा डॉन's picture

14 Apr 2008 - 8:53 pm | छोटा डॉन

दिवसेंदिवस असे लिख लिहून "विजूभाऊंनी" आमचे येथील जगणे अशक्य करून टाकले आहे.
कारण इथले वर्ण्न वाचून तोंड खवळते आणि ते शांत करायला काय तर "राईस्-रस्सम". असो. क्या करें ?

"पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ........."
हे मात्र जास्त होतं हं, असं लिहून आम्हाला का छळता ?
थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ?
चेष्टा नाही बरं का, नक्की समजा ...
आता करा तयारी आमच्या आदरातिथ्याची ....

अवांतर : बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!!

छोटा डॉन काका
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे's picture

14 Apr 2008 - 9:05 pm | इनोबा म्हणे

थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ?
डॉन्या लेका काय समजलास काय विजुभाऊंना... अरे मागून तर बघ.तू एक मागशील तर ते दहा देतील. काय विजुभौ... बरोबर ना?

बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!!
कधीही बोलव भाऊ...आपण तयारच आहोत.

(फूकट ते पौष्टीक माननारा)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

14 Apr 2008 - 9:08 pm | छोटा डॉन

"(फूकट ते पौष्टीक माननारा""
हा हा हा, पटलं आवडलं आणि आजपासून अंगिकारलं

मग विजूभाऊंची पार्टी फिक्स !!!
हाय दंगा आता ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

फु़कट ते पौष्टीक
कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे.
पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2008 - 6:58 pm | इनोबा म्हणे

कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे.
हा माणूस कशाचा काय अर्थ काढेल काहि नेम नाही. ... :)

माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे
म्हणजे न्कम टॅक्सवाले का हो?

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

छोटा डॉन's picture

15 Apr 2008 - 6:37 pm | छोटा डॉन

पेहवेसाहेब आम्ही आय टी वाले नाही ....
आम्ही "आर & डी , इंजिन डिजाईन " या नावाखाली सध्या चालू असलेल्या इंजिनात काड्या करण्याचे काम करतो.
सध्या "जगातील सगळ्यात मोठ्या कार मेकर" कंपनीत आमची "काड्यागिरी" चलू आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चंबा मुतनाळ's picture

14 Apr 2008 - 8:59 pm | चंबा मुतनाळ

विजुभाऊंना विधात्याने आंब्यांचा ब्रँड अँबॅसिडर करावा!
त्रिलोकातून आंब्याला मागण्या येतील!!

अप्रतीम भाग झाले आहेत सर्व.
असेच येवूद्यात

विजुभाऊ's picture

14 Apr 2008 - 10:22 pm | विजुभाऊ

.

स्वाती राजेश's picture

15 Apr 2008 - 12:42 am | स्वाती राजेश

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् .......... सहीSSSSSSSSSSSSSS
मला कुणीतरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले आहे असे वाटले.:)))))
विजुभाऊ, मस्त लेख लिहीला आहे. प्रत्येक लेखामधे काही ना काही तरी वैशिष्ठ्य आहे. लेख बुक मार्क करून ठेवण्यासारखे आहेत.(मी सेव्ह केले आहेत.)
कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))

इनोबा म्हणे's picture

15 Apr 2008 - 12:49 am | इनोबा म्हणे

कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))
पोराला कॉपी करायला शिकवताय की काय? :) (ह.घ्या बरं का!)

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

भडकमकर मास्तर's picture

15 Apr 2008 - 12:51 am | भडकमकर मास्तर

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते.
फारच बेष्ट वर्णन ...काय सांगू?? जेवण झालंय तरी पुन्हा भूक लागल्यासारखी वाटतेय....

नंदन's picture

15 Apr 2008 - 6:03 am | नंदन

हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

15 Apr 2008 - 6:47 pm | विसोबा खेचर

हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच!

हेच म्हणतो! विजूभाऊ, तुम्ही कमाल केलीत! अहो आमच्यासारख्या खुद्द देवगडात, आंब्याफणसात वाढलेल्या माणसालादेखील असं लिहिणं सुचणार नाही!

झक्कास लेखन...

आपला,
(देवगडातला एक छोटासा आंबा व्यापारी) तात्या.

रविराज's picture

15 Apr 2008 - 6:45 am | रविराज

विजुभाऊ, अतिशय छान लिहिल आहे. सगळेच भाग एकसे बढकर एक. मंत्रमुग्ध करतात. पुन्हा पुन्हा वाचवण्यासारखे. धन्यवाद.

रवी.

सहज's picture

15 Apr 2008 - 7:09 am | सहज

मस्त आंबामय करुन टाकलेत.

पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते.

जबरी!! परवाचा तो फोटू अन हे वर्णन.......

हं इंटरेस्टींग, मधे भारतीय टीम ७६ धावात आउट झाली होती त्या दिवशी हा बेत होता की काय?

मनापासुन's picture

15 Apr 2008 - 7:51 am | मनापासुन

बाकी वर्णनाबद्दल काही बोलायलाच नको
पण यातले मला
आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते.
नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.

हे मनापासुन आवडले. डोळ्यात पाणी आले.

प्रमोद देव's picture

15 Apr 2008 - 9:10 am | प्रमोद देव

विजुभाऊ, जिथे, आंबा ह्या रसाळ फळाबद्दल, तितकेच रसाळ आणि भरभरून लिहिण्यासारखे असू शकते , ही कल्पनाही आमच्यासारख्यांना पेलत नाही, तिथे तुम्ही हे ५-५ भाग कसे लिहू शकता? ह्याची मात्र कमाल वाटते. आपल्या कल्पना शक्तीला आणि लेखन कर्तृत्वाला आमचा कडक सलाम!
आता आंब्याचे नुसते नाव निघताच त्याबरोबर विजुभाऊ देखिल आमच्या नजरेसमोर येतील. आजवरचे तुमचे चहा,आंबा असे विविध प्रकारचे लेखन वाचल्यावर मला आपल्याला विजुभाऊ च्या ऐवजी "रसिकभाऊ किंवा रसिकलाल" असे म्हणावेसे वाटू लागलेय.
रोजच्या खाण्यातल्या ह्या पदार्थांबद्दल इतके भरभरून बोलणारा आणि लिहिणारा तुमच्यासारखा माणूस खरंच रसिक दिलाचाच असणार ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

गालबोट: आता तुमचे हे इतके सुंदर लिखाण वाचल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे एक गालबोट.......
विजुभाऊ उत्साहाच्या भरात तुम्ही लिहिता आणि लगेच चढवता, तेव्हा इथे ते चढवण्या आधी दोनतीन वेळा नीट वाचून घ्यावे अशी अपेक्षा करतो. ज्यामुळे टंकलेखनात होणार्‍या अक्षम्य चुका तुमच्या तुम्हालाच दिसतील आणि त्यात योग्य त्या सुधारणा करता आल्यामुळे वाचताना होणारा रसभंग खूपच कमी होईल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मनस्वी's picture

15 Apr 2008 - 1:49 pm | मनस्वी

झाले आहे.

धमाल मुलगा's picture

15 Apr 2008 - 2:26 pm | धमाल मुलगा

विजुभाऊ सध्या 'होमग्राऊंडवर' खेळत आहेतसं दिसतंय.
धडाधड सेन्च्युर्‍या काढताहेत.
काय हे भाऊ? आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं?
विजुभाऊ 'चहा' ? की आंबासम्राट विजुभाऊ?

घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते.
नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.

ओहोहो !!!!
अरे काय रे हावरटांनो?
लेको, आंबापुराण आणि केळीच्या पानावरच्या जेवणात इतके गुंग झालात की विजुभाऊंनी हळूच घेतलेली एक हलकीशी रोमॅन्टीक गिरकी तुमच्या लक्षातच आली नाही?

आयला! लय भारी भाऊ :-) नजरेसमोर आलं दृष्य!

सगळे मस्त दंगा-धूडगुस घालत जेवताहेत...आणि आजी-आजोबांची नजरानजर होते....दोघं एकमेकांशी नजरेनेच बोलतात...बस्स..एकच क्षण..पुरेसा आहे तेव्हढाच...पटकन आजी लाजते. त्या वाढत्या वयानुसार गोडवा वाढत गेलेल्या चेहर्‍यावर एक गोडसं अस्फुट हसु फुटतं...ते बघून आजोबाही मिशीतल्या मिशीत हळूच हसतात..आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते......

आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी !

आपला
(तृप्त) ध मा ल.

आनंदयात्री's picture

15 Apr 2008 - 2:30 pm | आनंदयात्री

म्हणतो. उत्तम लिखाण. बाकी हे असे उत्तमोताम लेख लिहिता तुम्ही आम्हाला जोरदार भुक लागते हो, हाण हादडतो आम्ही, वजनाची चिंता. :(

डॉ.प्रसाद दाढे's picture

15 Apr 2008 - 4:46 pm | डॉ.प्रसाद दाढे

सगळेच भाग एकापेक्षा एक (ते महागुरूवाले नाही हा॑) मस्त झाले आहेत.. तुमचा देवगडा॑स सत्कार केला पाहिजे (देवगड गा॑व हो, 'म्हातारो देवगडाक गेलो' ते नव्हे ;))

विदेश's picture

15 Apr 2008 - 5:23 pm | विदेश

प्रभाकर पेठकरानी समोर ठेवली आहे आमरसपुरीची थाळी आणि विजूभाऊनी चालवलाय पंगतीतला आग्रह! दोन्ही एकदम्बेषटच.
अ......आआआआआआ....अब्ब!

विजुभाऊ's picture

15 Apr 2008 - 10:09 pm | विजुभाऊ

आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते.
नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते......
आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी !
आपला
(तृप्त) ध मा ल.

धमाल्या मला तुझी ("तृप्त) ध मा ल."
सिग्नेचर आवडली