वि.सू.: - वाचकांच्या प्रतिसादामुळे आणि काही महत्वाच्या "इनपुट्स" मुळे "अनुष्काभाभींचे येणे" पाचव्या भागावर लांबणीवर पडत आहे. तूर्तास आज एवढेच ...
पहिल्या दिवशी कार्यक्रम ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीच्या वेळेसच्या अपरिमीत कष्टांमुळे व केलेल्या ओरडाओरडी व विवादामुळे काही सदस्यांच्या "घशाला कोरड" पडली होती व काहींना "थकवा" आला होता. त्यामुळे छोट्या डॉनने संध्येला आपण "कोरडे घसे ओले करण्यासाठी व थोड्या श्रमपरिहारासाठी बसूया" असा विचार मांडला. त्याला सगळ्यांनी अगदी आनंदाने संमती दिली.
पण मधीच डाबिसकाकांनी "हे संध्येचे काय काढले ? पुन्हा जर माझ्या संधेचे नाव कढले तर तुला आंगठे धरून उभे केल्याशिवाय राहणार नाही." अशी धमकी दिली.
त्यावर चतुरंगने मधीच "अहो डांबिसकाका, आपण संध्येला म्हणजे संध्याकाळी समजूयात" असे सांगून विषय मिटवला.
समस्त महिला मंडळाने संध्याकाळी होनाऱ्या "तूफान धूमशानाची " थोडी आयडीया आल्याने "आम्ही जरा तुळशीबागेत चक्कर टाकून येतो" असे साम्गून तेथून काढता पाय घेतला.
मग सगळे आपला आपला जामानिमा आवरून "बैठकीत " येउन बसले. साधारणता सगळ्या मंडळींची ३ गटात विभागणी झाली. पहिला गट म्हणजे "मद्यदूरंधर डांबिसकाका व त्यांचा शिष्यसमूदाय [ यात धमाल, आंद्या, डॉन्या, इनोबा, टिंग्या, छत्रपती, विजूभाउ, सुमारशेठ इत्यादी इत्यादी आले]." ही मंडली थोडी रगेल आणि रंगेल असल्याने त्यांनी पिण्यासाठी सापडतील ते पेले आणि सापडतील त्या ब्रँडच्या बाटल्या उचलून अणलेल्या होत्या व आरामात तिथल्याच हिरवळीवत फतकत मारली होती. बर्फाच्या व्यवस्थेआठी डॉक्टरसाहेबांनी कुठूनतरी एक बर्फाची लादी पैदा केली होती व तिचेच आता तुकडे करून ते लवकर पगळू नये म्हणून एका पोत्यात गुंडाळून ठेवण्यात आले होते.
दुसरा गट म्हणजे " एन आर आय"मंडळींचा, ह्या लोकांनी एकदम सोफॅस्टीकेटेड पद्धतीने प्यायचे ठरवले असल्याने त्यांनी येताना तिकडूनच वाईनचे पेले, बर्फाचे क्युब्स, बसायला व्यवस्थीत टेबस खुर्च्या व अंगात घालायला व्यवस्तीत ढगळ कपडे यांची व्यवस्था केली.
तिसरा आणि शेवटचा गट म्हणजे "तात्या, पेठकरसाहेब, बिरूठेशेठ, संजोपराव" सारख्या "वयाने आणि ज्ञानाने मोठ्या" असलेल्या मंडळींचा. यांना आपल्या आवडीप्रमाने कुठलाही गट जॉईन करण्याची मुभा होती.
शेवटी तात्यांच्या हस्ते "सिंगल माल्ट पधतीने बनवलेल्या स्कॉचची बाटली" फोडून कार्यक्रमाची सूरवात झाली.
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. तात्यांनी आजचा हा कार्यक्रम म्हणजे फक्त श्रमपरिहार असल्याचे पुन्हा एकदा सांगून "कुणी टांगा पलटी होउन आमच्या डोक्याला झीट आणू नका" असा धमकीवजा इशारा दिला व शेवटी लवकर आवरा कारण उद्या सकाळी "अनुष्का" येणार आहे अशी सुचना दिली.
पहिले काही पेग झाल्यावर औपचारिकतेची सगळी बंधने सुटली आणि मग सुरु झाल्या मोकळ्या-ढाकळ्या गप्पा. यातील काही प्रमूख अंश खालील प्रमाणे,
[ वि.सू. :- मिपाच्या महिला वाचकवर्गाला व चूकून माकून येणाऱ्या सभ्य, सुसंस्कृत वाचकवर्गाला ओशाळवाणे वाटू नये म्हणून काही अस्सल कोकणी डायलॉग व काही प्रेमाचे सुसंवाद "*" च्या भाषेत देण्यात आले आहेत. दर्दी लोकांना योग्य अर्थ समजण्यास काही अडचण येणार नाही अशी खात्री आहे.]
"धमालाने" बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली व ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम "
केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं".
धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.तुम्हीच बघा आता, तुम्ही पित नाही जे जाणून संजोपरावानी कशी तुमची घेतली. च्यायला मिपावर जगणं मुश्कील करून ठेवलं होतं. जे ते विचारतयं ' काय राव, सुमारशेठ घेत नाहीत राव' , काय रे टिंग्या, खरं ना ?"
टिंग्या " एकदम राईट बोलला बघ तू, मी म्हणतो घ्याच तुम्ही शेठ. मी तर काय म्हणतो आपण दोघं पण स्मिरनॉफ चा एकएक लार्ज पेग भरू आणि डायरेक्ट संजोपरावासमोर बसू, काय ?"
सुमारशेठ " नको रे बाबा. तुझं तु घे. मला आपलं स्वीट लाईम सोडा बरं"
टिंग्या " अहो, हून जाउ द्यात एकदा दूध का दूध और पानी का पानी "
सुमारशेठ "अरे बाबा नको, मला नाही सवय "
डांबिसकाका " अरे फोकलीच्या सोड ना, तू आपलं आपलं संभाळ, सरळ बस बरं आधी , सारख त्या लोडाला मागे टेलू नको आणि भरताना सोडा सांडू नको "
छोटा डॉन " टिंग्या, तेवढं लाईट्सचं पाकीट फेक बरं. अरे किती वेळ, संपव ग्लास "
चित्तर "बरं , पतियाळा कोण मारणार आहे ?"
आंद्या " मी आलोच बर्फ घेउन "
धमाल " बरं झालं, स्वताहूनच गेलं ते, मागच्यावेळी मारला की भाउने पतियाळा आणि च्यायला आम्हाला आवरता आवरता नाकी नौ आलं "
इनोबा " हा हा हा "
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
इनोबा " बस का शेठ, हीच किंमत केली का आपली? ही तर सलामी आहे ? असली मजा तो अभी बाकी है, काय रे धमू ? "
धमाल एकदम कळवळून " च्यायला धमू नका रे म्हणू, वाटॅलं तर डायरेक्ट धम्या म्हणा ..."
डांबिसकाका " वा रे वा, बराच डोकेबाज दिसतोस की. आम्हाला म्हणा तुम्ही पिडा आणि तुम्हाला धमू म्हणलं की लगेच दुखाय लागलं ?"
डॉन्या " अहो तसं नाही डांबिसकाका ..."
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..."
आंद्या " कुणाचे ?"
डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल "
धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...."
इनोबा " अरे गप्प बस्स म्हणतोय, तू बर्फाचे बोलतोय मी तर सोडा पाणी काहीच घेत नाही, डायरेक्ट नीट ..."
डॉन्या " मी पण घेउ का ?"
बाकी सगळे " हा हा हा...."
डांबिसकाका " आत्ता नको. नंतर मी तूला बनवून देइन..."
**************************************************************
बेसनलाडू स्वताच्या मांडीवर एक फटका मारून "डम इट, ह्या मच्छारांनी जीव नकोसा करून टाकला आहे."
नंदन " येस यु आर करेक्ट, आमच्या सॅन डिएगोत तुम्हाला औषधाला पण डास सापडणार नाही. इथ तिच्यायला नुस्ता उच्छाद मांडला आहे."
सर्कीट " म्हणून साहेब माणसाला 'गेंड्याची कातडी' असावी. क़ितीबी मच्छार येउदेत, आपल्याला झा* फरक पडत नाही."
बेसनलाडू " हे मात्र खरं, थोदा आईस घे रे"
नंदन " आपण तर यु एस ला एक मस्त समुद्रकिनारी बंगला बांधणार आहे. त्यात एक मस्त लॉन, लॉनमध्ये मस्त एक झोपाळा आणि त्यावर बसून मी मस्त वाईन पिणार."
सर्कीट " विषय बदलू नकोस. तर मी काय सांगत होतो की गेंड्याची कातडी. आपलं आजकाल ह्या विषयावर पेटंट झालं आहे. मी तर विचार करतोय की भारतात जर वळू हिट होत असेल तर तिकडे गेंड्याची कातडी असे मजबूत बॅकराउंड असलेला गेंडा नावाचा पिक्चर काढायला काय हरकत आहे? होऊन जाउ दे तिच्यायला ..."
बेसनलाडू " वाह, काय आयडीया आहे, परदेशात शूट झालेला एक भव्य मराठी चित्रपट गेंडा. अवघ्या दुनयेत हलकल्लोळ होइल महाराजा ..."
नंदन " प्लान चांगला आहे. आपण नंतर शुद्धीत बोलू."
सर्कीट " तुला काय म्हणायचे मला चढली !!!
नंदन " मी असे म्हणलो नाही. फक्त म्हणालो नंतर बोलू."
सर्कीट " तुम्ही कितीपण टॉन्ट मारा आम्हाला गेंड्याच्या कातडीमुळे झा* फरक पडत नाही, कारे बेसन्या ?"
मग बेसनलाडू आणि सर्कीट एकमेकांना टाळ्या देत हसू लागतात
**************************************************************
तात्या " काही पण म्हण पेठकरा, मस्त मौहोल जमला आहे."
पेठकरसाहेब " हो ना तात्या. समाधान वाटलं बघ सगळं बघून. तु लावलेलं छोटसं रोपट आज एक मोठा वटवृक्ष बनून सगळ्यांना त्याची मधूर फळे चाखायला मिळत आहेत."
तात्या " खरं आहे. हे सगळ्या मंडळींचे प्रेम आहे रे. बघ कशी मस्त मैफील जमली आहे. सुख सुख म्हणतात ते काय असतं अजून ? "
संजोपरव " एकदम सौ टके की बात की है "
तात्या " आत्तापर्यंत तर सगळं व्यवस्थीत पार पडलं आहे. आता उद्या "अनुष्का" आल्यावर काय होतं देव जाणे "
पेठकरसाहेब " काही नाही रे. सगळं व्यवस्थीत होइल. क़ार्य सिद्धीस न्हेण्यास आई जगदंबा समर्थ आहे."
तात्या " नाही, तरी पण थोडी मंडळींची काळजी वाटते आहे."
पेठकरसाहेब " तु कशाला काळजी करतोस, फक्त ती आल्यावर स्वताला सावर म्हणजे मिळवलं. तुच बहीकून जाधील. आम्हालाच तुला आवरता आवरता नाकी नौ येइल."
तात्या " , तू हे मला सांगतोस. मला काय माहित नाही का तु * * * * *"
पेतहकरसाहेब " चिडू नको , मी फक्त सावर म्हणलं तर तु डायरेक्ट आमची ** **** काढलीस."
तात्या "अरे , मला सांगतोस का ? तुझी**** न ***** ओळखतो मी."
पेठकरसाहेब " बरं बाबा, तुझी ** तर **, आम्हाला काय ? काय हो संजोपराव ? "
संजोपराव " पेठकर बरोबर बोलतो "
तात्या " ***** *** ****, , , *, *, ** आता जर पुढे एक शब्द बोललास तर बघ"
पेठकरसाहेब " च्यायला मलाच शिव्या देतोस. थांब आता तुला चांगलाच धडा शिकवतो. क़ाय समजलास, मला काय शिव्या येत नाहीत ? होय रे *, *, *, *, * !!!"
तात्या " अरे च्या मारी. *, *, , * ** *"
पेठकरसाहेब " * * , , *, हम "
तात्या " हॅ, हे घे * * , * * ***"
येवढा गोंधळ बघून सगळे आपले काय चालले आहे ते विसरून इकडे बघू लागतात. शेवटी संजोपराव या दोघांना शांत करतात
तात्या " तुला बघतो नंतर "
पेठकरसाहेब " जा रे, मला बघणारा आलाय मोठा, * *"
हा "अस्सल कोकणी शिव्याकूट " चालूच राहतो ......
*********************************************************
तिकडे "धम्मकलाडू" बारच्या पाशी बसून जो येतोय त्याला "तुझा पगार किती , तु पितोय किती" असे सुनावून झीट आणत असतो. यामुळे चूकून विनोबांची छेड काढल्यामुळे त्या दोघांची जुंपते .....
शेवटी सगळी आवराआवरी करायची म्हणून विजूभाउ "सुपारीचे तबक आणतात" व स्वता सगळ्यांना "बास करा, ही घ्या चिमूटभर सुपारी आणि झोपायची तयारी करा" असा सल्ला देतात.
आता हे तबक घेउन ते छोट्या डॉन्यासमोर येतात व म्हणतात " डॉन्या , सुपारी घे आणि आवरायच बघ बघू"
डॉनचे विमान आधीच उंच उडल्यामुले तो म्हणतो " मला काही चढ़ली नाही विजूभाउ. तुम्ही मला सुपारी देता पण मला खाण्याच्या सुपारीचे व्यसन नाही कुणाचा गेम करायचा असेल तर सांगा. मी फक्त "सिगारेट" पिल्यावर तोंडाचा वास जाण्यासाठी चिमुटभर सुगंधी सुपारी तोंडात टाकतो, सिगारेट पण नेहमी पित नाही पण जेव्हा ४ मित्रांबरोबर "प्यायला" बसतो तेव्हा लागतेच. ह्याचा अर्थ मी नेहमी पितो असा नाही, जेव्हा त्याच ४ मित्रांबरोबर "३ पत्ती" खेळायला बसतो तेव्हा कोरडे बसूने म्हणून उगीच आपली "उष्टावल्यासारखी" घेतो , ३ पत्ती पण नेहमी खेळत नाही पण जेव्हा घोड्यावर लावलेले पैसे जेव्हा घूसतात तेव्हा बॅलन्स करण्यासाठी थोडे खेळावं लागतं ....तर थोडक्यात काय की, आम्हाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही ...." असं अख्खं च्या अख्खं रामायण सुनावतो.
हे बोलणे ऐकत असलेल्या सर्कीटला एकदम "पत्ते खेळण्याचे " ऐकून उत्साह येतो.
तो म्हणतो " ए, कोण खेळणार आहे आता बदाम सात ? माझा हूकूम बदाम"
सर्कीटरावांची अवस्था ओळखून संजोपराव म्हणतात " जाउ दे शेठ, आता उशीर झाला, अंधार पडला आपण सकाळी खेळू"
सर्कीट " अंधार पडला म्हणजे? आपण काय कुणला घाबरतो की काय ? आपण झा * घाबरत नसतो. लगलेच तर माझ्याकडे गेंड्याची कातडी पण आहे . चला रे आपण पत्ते खेळू. बरं पानं कोण पिसणार ???"
तिकडून लगेच आंद्या " मी , मी , मी " करत पळत येतो .....
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता " म्हणून आजचा अध्याय संपवतात….
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 8:44 pm | छोटा डॉन
अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले ....
तेवढे आहे असे समजून वाचा ....
अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Apr 2008 - 12:02 am | एक
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....."
अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं.
आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;)
आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.
8 Apr 2008 - 8:56 pm | इनोबा म्हणे
शाब्बास रे डॉन्या...
गेंड्याची आणि खेकड्याची(तिरक्या चालीचा)चांगली जोडी जमवली आहेस.
तेवढं अनुष्का वैनीला लवकर आणायचं बघ आता.
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
8 Apr 2008 - 11:48 pm | प्रभाकर पेठकर
कल्पनारंजन म्हणून चांगले आहे.
मिसळपाव पुणे खादाडी सम्मेलन म्हणजे दारूड्यांचे सम्मेलन वाटते आहे. लिखाणाचा 'तोल' सांभळल्यास अजून मजा येईल.
8 Apr 2008 - 11:55 pm | छोटा डॉन
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता...
हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं....
हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ...
पुढच्या वेळी काळजी घेईन ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
9 Apr 2008 - 12:08 am | प्राजु
हा पार्ट थोडा इम्बॅलन्स्ड वाटतो आहे. पेठकरांशी सहमत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Apr 2008 - 12:15 am | अभिज्ञ
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला.
पहिले ३हि भाग बरेच बरे होते.
इथे मात्र साफ निराशा झाली.
पूढच्या भागात नक्कि काळजि घे.
अबब.
9 Apr 2008 - 12:25 am | आंबोळी
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला
ह. ह.पु.वा.
लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव
छोटा डॉन
ये भाग कुछ जम्या नही.
पुढच्या भागात काळजी घे.
(पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी
9 Apr 2008 - 8:43 am | विसोबा खेचर
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले.
:)
असो, वरील मंडळींशी सहमत...
लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :)
परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता!
कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा.
असो, प्रामाणिक मत. राग नसावा...!
तात्या.
9 Apr 2008 - 11:12 am | आनंदयात्री
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.
9 Apr 2008 - 1:19 pm | विसोबा खेचर
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु
म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही!
असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची!
तात्या.
10 Apr 2008 - 4:24 am | झंप्या
काय राव? असल्या रद्दी लिखाणाला संजोपरावांच्या वगैरे पंगतीत बसवुन तुमची महान अभिरुची अशी पब्लिकली का दाखवताय?
9 Apr 2008 - 11:35 am | धमाल मुलगा
पुन्हा एकदा "आकाशातून पडली लाकड॑..." !!!!!
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
जबरान् !!! :-)))
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
भले...गुरु !!!
बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-))
असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय?
हरकत इल्ले...हरकत इल्ले.
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-)))
आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला.
डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????
9 Apr 2008 - 4:27 pm | छोटा डॉन
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ...
पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता.
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही....
दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते.
आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे.
ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो.
आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ...
आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल .....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
9 Apr 2008 - 4:34 pm | आनंदयात्री
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे.
निषेध .. निषेध .. निषेध.
(अरे लोकं दुसरीकडे दुसर्या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)
9 Apr 2008 - 5:06 pm | नारदाचार्य
या लेखमालेला इतक्यात श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली...
9 Apr 2008 - 5:17 pm | रामदास
वाईट्ट लिहिलं तर लोकं वाचणार नाहीत.विसरून जातील. एवढंच. चुका सापेक्श असतात.
9 Apr 2008 - 5:19 pm | रामदास
दिल पे मत ले यार.
9 Apr 2008 - 5:21 pm | धमाल मुलगा
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन...
खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही.
असो! जे जे होईल..ते ते......
"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा !
-(व्यथित) ध मा ल.
9 Apr 2008 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छोटे डॊन यांना स. न. वि. वि.
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो.
आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ?
कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ?
बिंधास्त लिहित राहा !!! :)
दिलीपभाय
( छोटा डॊन गॆंगचा )
(शार्प शुटर )
10 Apr 2008 - 4:29 am | झंप्या
फ ह ड ह तु स लिखाण!!
मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!!
पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.
10 Apr 2008 - 11:47 am | विजुभाऊ
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ????
असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ?
खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती.
असो! जे जे होईल..ते ते......
"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा !
हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ
10 Apr 2008 - 12:01 pm | इनोबा म्हणे
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ????
'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे...
(बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
हेच म्हणतो...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
10 Apr 2008 - 1:58 pm | ब्रिटिश टिंग्या
'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे....
हा हा हा!
(बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही !
सहमत आहे......
(व्यथित) टिंग्या
10 Apr 2008 - 4:06 pm | छोटा डॉन
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या "
आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ...
आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात "
वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना"
आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे....
पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्याच्या लेखावर मत द्यावे, कसे !
पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही,
आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ...
आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 Apr 2008 - 4:25 pm | विसोबा खेचर
अरे छोटा डॉन,
सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं?
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही..
काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे!
हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे!
आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं!
तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन!
अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू!
अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही!
आणखी काय लिहू बॉस?!
तुझा,
तात्या.
11 Apr 2008 - 7:58 am | झंप्या
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर!
आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!!
असो...
आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे?
तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं?
आणखी काय लिहू?
*पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः
10 Apr 2008 - 3:50 pm | लडदू
रेफरन्स लागत नाहीत पण मला तरी मज्जा आली वाचताना.
असो.
=================================
खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!
10 Apr 2008 - 5:35 pm | वरदा
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही..
आता कसं बोल्लात...
तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही...
आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...
10 Apr 2008 - 5:47 pm | धमाल मुलगा
जरा डोळे उघडून नीट वाच...
काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे....
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच
जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत !
एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा?
आता पुढचा भाग....
अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....
अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....
[ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]
10 Apr 2008 - 5:54 pm | मदनबाण
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला.
च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :)
प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस?
तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन!
हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ?
(मि.पा.प्रेमी)
मदनबाण
10 Apr 2008 - 5:58 pm | छोटा डॉन
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ...
आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ...
मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ...
"तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही...
थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
10 Apr 2008 - 6:21 pm | नारदाचार्य
याला म्हणतात डॉनगिरी. शुभेच्छा. येऊ द्या लवकर सारे काही.
11 Apr 2008 - 12:05 am | वरदा
तात्या कशाने वैतागले..तुम्ही अनुष्का वहिनीला ताटकळत ठेवलत ना म्हणून्...दारू कसली पीत बसता अनुष्का वहीनी येणार त्याची तयारी करा ना..आम्ही आणलं पण तुळशीबागेतून गिफ्ट...:)
11 Apr 2008 - 9:24 am | विद्याधर३१
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि.
कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते.
काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते.
पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि.
त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे.
कारण माझ्यासारखे खूपजण असतील.
जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये..
प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती...
अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत.
विद्याधर
11 Apr 2008 - 5:42 pm | मनापासुन
डॉन काका...
इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे.
अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत)
जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या?
डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका
तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...
12 Apr 2008 - 4:27 am | पिवळा डांबिस
डॉन काका...
ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:))
आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!!
डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:))
हा, हा, हा!!!!
-डांबिसकाका
13 Apr 2008 - 12:04 pm | छोटा डॉन
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या.
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ...
आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही...
सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ...
उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ...
आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही ....
आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ...
वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ...
तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ...
डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
13 Apr 2008 - 8:59 pm | पिवळा डांबिस
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ...
आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही...
आम्हीही नाही!!
सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ...
सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!
उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ...
आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही ....
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ...
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:)))
आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ...
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
तुझ्या बारशाला जेवलेला,
डांबिसकाका
:)))))
14 Apr 2008 - 3:22 pm | भडकमकर मास्तर
आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, ....................
हे आवडले
14 Apr 2008 - 7:53 pm | छोटा डॉन
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!"
२ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ...
"म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))"
हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा .
"आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!"
म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो ....
"आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))"
आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा.
येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या.
"पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))"
तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ?
ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
15 Apr 2008 - 11:35 am | धमाल मुलगा
आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. :-)
महत्वाचा शव्द आठवणीने टाकण्याची हातोटी आवडली. उगाच काकूंचे 'आब्जेक्षण' नको, काय?
:) :) :) :) आजि म्या ब्रम्ह पाहिले गा! काकोबा....धन्य.. धन्य आहात हो !!!!!
लाख मोलाचा सवाल ! आत्ता बोला की रे!
29 Dec 2014 - 2:54 pm | विजुभाऊ
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक झालोय
डान्या परत ल्ह्ययला घे नव्याने असले काहितरी
13 Apr 2008 - 8:00 pm | विजुभाऊ
डॉन काका :)))))
जब्बर दस्त...
" डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है"
आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य
कसे वाटते बघा
डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो"
किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा"
हे वाक्य असे होईल
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
.......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ
14 Apr 2008 - 7:55 pm | छोटा डॉन
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
.......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ"
सत्यकाम जाबाली . हा हा हा ...
अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ?
च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
15 Apr 2008 - 11:39 am | धमाल मुलगा
हाणा तिच्याआयला! एकदम भिरभिरं !
मग ती..'तात्याकाम जाबली' आणि 'तात्या ख्रिस्त' ची गोष्ट कधी सांगनाल डॉनकाका? काय हो विजुभाऊ...सांगा ना!
14 Apr 2008 - 10:09 pm | वरदा
ही ही ही...:)))))
पि. डां. काका सहिच लिहीलय....