मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग १

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
4 Apr 2008 - 6:10 pm

डिस्क्लेमरः लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व.
इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्‍यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))
यासाठी "बेस" म्हणून "मिपा" वर लिहले गेले साहित्य तसेच त्याला पडलेले प्रतिसाद हा मसाला कच्चा माल म्हणून वापरण्यात आले आहेत तरी कोणी आमच्यावर "साहित्यचोरीचा आळ" घेऊ नये, तसे झाल्यास त्या निषेघांच्या खलित्यास केराची टोपली दाखवण्यात येईल असे आम्ही नमूद करू ईच्छितो ....

पुण्यातील "मिपा कट्ट्याच्या" उत्तुंग यशानंतर व त्याचसुमारास दिल्लीत गाजलेल्या व शिवसेनेच्या संजय राउतांनी आयोजीत केलेल्या "मराठमोळ्या खाद्यपदार्थाच्या मेजवानीच्या" पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा "मिपा कट्टा तोही खाद्यसंभेलनासगट [ म्हणजे थोडक्यात खादाडी ] म्हणजे ज्याची थीम मिसळपाव असेल असे संभेलन " भरवण्याची मागणी जोर धरू लागली. आख्या जगभरातून खरडींचा, व्य. निंचा व फोनचा तात्यांवर मारा सुरू झाला. शेवटी सर्वानुमते हा फस्कास कार्यक्रम आयोजीत करण्याचे ठरले. "काडीसम्राट छोट्या डॉनने" यावेळीही हा कार्यक्रम आयोजीत करण्यात पुढाकार घ्यायची तयारी केली पण मागच्या वेळेसचा त्याचा "काडी टाकून " पळून जाण्याचा अनूभव जमेस धरून त्याला "तू फक्त [ जमल्यास] हजर रहायचे बघ " म्हणून परस्पर टोलवण्यात आले. शेवटी "महामहिम तात्यासाहेब, 'धुरं'धर;महापराक्रमी असलेला देशमुखांचा छावा सर्वस्वी धमाल मुलगा , इनोबा ठाकरे , विजूभाउ,डॉक्टरसाहेब, पेठकर साहेब व कांदळकर काका " अशी कार्यकारणी ठरवण्यात आली...........
आता कट्ट्यासाठीचा कारभारीपणा आपल्याकडे आहे म्हणून तात्यांनी लगेच हा कार्यक्रम "ठाण्यातच" आहे असे समजून पुढची आखणी करायला सूरवात केली पण यामुळे मोठ्ठा गोंधळ होउन शेवटी चर्चा करून सर्वमान्य ठिकाणी संभेलन घेण्याचे ठरवले. त्यानुसार चर्चा सुरु झाली. सहाजीकच त्याला अनेक फाटे फुटले, तात्या;सृलाताई;पेठकरसाहेब व बाकी मुंबईकरांच्या मते हा कार्यक्रम केव्हाही "मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या ठाण्यात किंवा गिरगावात" घ्यावा तर इनोबांनी हा कार्यक्रम "गेली १०००० वर्षे मराठी संस्कृतीची जपणूक करणाऱ्या पुण्यात घ्यावा" अशी मागणी केली व त्याला आपसूकच आनंदयात्री, केशवसुमार, छत्रपती, चित्तर, विजूभाउ, मनस्वी, भुईनाळा, संजोपराव यांचा पाठिंबा लाभला. त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली. याउप्पर छोटा डॉन, स्वयंभू, आर्य, अबब च्या मते हा कार्यक्रम "दक्षिणेत घेणे योग्य" कारण त्यानिमीत्ताने आपल्याला तेथेही हातपाय पसरता येतील. त्याबरोबर लगेच डांबिसकाका, प्राजू, सर्कीट, नंदन, बेसनलाडू, कोलबेर, टिंग्याच्या मते हा कार्यक्रम म्हणजे " मराठी संस्कृतीला सातासमुद्रापार न्हेण्याची सुवर्णसंधी " आहे म्हणून तो "यक्षनगरीत" घेणे चांगले असा त्यांचा प्रतिवाद सुरु झाला. "धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले. आता या घोळात "कार्यक्रमाचा बोऱ्या वाजतो काय ?" या शंकेने व कदाचित विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले. शेवटी प्रत्येकाने समझोता म्हणून "पुण्यात" यायचे ठरवले. कांदळकार काका पण औरंगाबाद वरून येण्यास तयार झाले....

तरी शेवटी सृलाताईंनी "शी बाई, काय ते पुणे ? आमच्या मुंबईत रात्री २.३० ला चहा मिळतो, पुण्यात दुपारी २.३० ला मिळायची मारामार" असा सूर लावला. त्यावर भडकून धमाल व विनोबाने दिवसाच काय पण रात्रीपण कितीही वाजता आणि काय काय म्हणजे " कॉफी, ब्रेड बटर, सॅ॑डविच, सामोसा, पोहे, अ॑डा / चिकन बिर्याणी, ऑम्लेट, भुर्जी पाव, चिकन मसाला, चिकन कलेजी, कटलेट, लस्सी, प॑जाबी डिशेस, खर्डा-झुणका भाकरी आणि सर्व प्रकारच्या दारवा " असा आख्खा पुण्याचा रात्रीचा मेनू तिच्यासमोर आदळला. त्यावर सृला ने "मला पुण्याबद्दल असे म्हणायचे नव्हते, माझ्या विधानाचा विपर्यास झाला." असे म्हणने मांडून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व शेवटी "पुणे तिथे काय उणे ?" हे मान्य करून आपली काहीही हरकत नसल्याचे कबूल केले....

मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले. तर या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण "अनुष्काभाभी" असणार ही जवळजवळ "काळ्या दगडावरची पांढरी रेघ " आहे अशी सर्वांची खात्री झाली.
पण यात एक गोम होती, तात्यांनी " मी अनुष्काला आणतो पण या संपूर्ण कार्यक्रमासाठी बल्लवाचार्याची भूमिका सर्वश्री पेठकरकाकांनी संभाळावी " अशी अट घातली. त्यावर उसळून पेठकर साहेबांनी " आयला..... हे बरंय! आपण स्वतः अनुष्काच्या कुशीत आणि प्रभाकर पेठकर स्वयंपाक घरात काय? अन्याय आहे हा.... घोर अन्याय. थांबा... आता जेवण असे तिखट ज्ज्ज्ज्जाळ्ळ्ळ्ळ बनवून ठेवतो की दुसर्‍या दिवशी चांगलाच 'पश्चातताप' होईल. (पश्चातताप = 'मागून' होणारा ताप.)" अशी धमकी दिली. त्यावर "पुण्याच्या पेशव्यांनी" हा पश्चाताप कमी करण्यासाठी 'अस्सल बेळ्गावी लोणी (पिठ मिसळलेले का होईना!)' आणण्याचे कबूल केले.

*** शेवटी सगळ्यांच्यात "दिलजमाई" होउन शेवटी हा " कार्यक्रम पुणे मुक्कामी अनुष्काच्या उपस्थीतीत व पेठकरकाकांच्या हातून बनलेल्या मिसळीला साक्षी ठेउन होईल" असा फतवा जारी करण्यात आला.***

क्रमशः ...

हे ठिकाण

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 6:20 pm | स्वाती राजेश

सही$$$$$$$$$ नाव...
काय छोटा डॉन बरीच भूक लागलेली दिसते?
कारण लागोपाठ इतक्या रेसिपी येत आहेत म्हणून ध मा ल अगोदरच कासावीस झालेत त्यात तुम्ही हा लेख लिहिला आहे.
भरपूर मंडळी जमतील या सम्मेलनाला....काही येतील खाण्यासाठी....पण काही येतील अनुष्काला पाहायला...
आता ती कोणाची?......बहुतेक छोट्या डॉन च्या संम्मेलनात ठरेल...
तात्या, माफ करा.....

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 6:38 pm | विसोबा खेचर

मागच्यावेळीस साध्य न झालेली गोष्ट म्हणजे "मिपाची मालकीण सर्वश्री अनुष्काभाभी" यांचा सहभाग या वेळी नक्की असेल असे तात्यांनी आश्वासन दिले त्यासाठी तात्यांनी तिला फोन केल्याची व ती "हो" म्हणाली याची खात्री पटावी म्हणून काही "फोटो" प्रसिद्ध केले.

हा हा हा! :) हे बाकी लै ब्येस..

मस्त लिवलं आहेस रे छोट्या डॉना, एकदम लै भारी! पुढचा भागही लिव फटाफट!

तात्या.

स्वातीताई,

पण काही येतील अनुष्काला पाहायला...
आता ती कोणाची?......बहुतेक छोट्या डॉन च्या संम्मेलनात ठरेल...
तात्या, माफ करा.....

अरे त्यात माफी कसली? हमने तो हमारा दिल उसको दे दिया है! आगे उसकी मर्जी़ :)

आपला,
(अनुष्काचा पागल!) तात्या.

रिमझिम's picture

4 Apr 2008 - 6:46 pm | रिमझिम

मजा आली वाचुन!!
तात्या एक प्रश्न ह्या अनुष्का कोन??
तुमच्या मैत्रिण की काय :)

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 6:50 pm | छोटा डॉन

"मस्त संभेलन" म्हणताय पण ते अजून झाले कुठे आहे...
ही तर नुसती जागा तापवली आहे. अजून खरी होळी पेटवायची आहे ...
खरी मज्जा तर पुढे आहे ... लवकरच टाकतो ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:51 pm | मीनल

अरे देव्वा!

सग्ळ रामायण झालं.आणि रामाची सीता कोण?

समजवा रे कोणी तरी या लेट कमर रिमझिमला.
नाही तर कोसळायची!

मीनल.

रिमझिम's picture

4 Apr 2008 - 6:56 pm | रिमझिम

या मिसळपाव परिवारात नवीन आहे ना,कस माहीत असनार...
>>सग्ळ रामायण झालं.आणि रामाची सीता कोण?
अछा म्हणजे तात्याची सीता आहेत तर या अनुष्का
बर बर समजल आता :))

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 7:01 pm | विसोबा खेचर

आमच्या सीतेला आमच्या खरडवहीत पाहा! :)

आपला नम्र,
रामचंद्र अभ्यंकर, :)

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 7:07 pm | प्रभाकर पेठकर

व्वा...व्वा... मस्तच...( म्हणजे अनुष्कावहिनी नाही, ती तर मस्स्स्स्स्स्त आहेच पण ) कल्पना आहे. आता ही 'कल्पना' म्हणजे कोऽऽऽण असे विचारू नका. कल्पना म्हणजे आयडिया.

मर्‍हाटी मिसळ खाल्यावर मात्र अनुष्कावहिनींची जी वाट लागेल की दुसर्‍या दिवशी सगळेजणं, आपापली 'दु:ख' विसरून, हातात पंखे घेऊन, पुणेभर धावणार्‍या अनुष्कावहिनींच्या मागे धावाल. तात्यांना मात्र अनुष्काला सांभाळू की मॅरथॉन मध्ये सहभागी आपल्या सदस्यांना सांभाळू असे होऊन जाईल.

पण लिहा तुम्ही. पुढच्या भागांच्या (म्हणजे ह्या कल्पनाविस्ताराच्या होऽऽऽऽ) प्रतिक्षेत.

विजुभाऊ's picture

4 Apr 2008 - 7:07 pm | विजुभाऊ

रामचंद्र अभ्यंकर, :)
:)))))))
तात्या.......उगाच रामचन्द्र होउ नका रावण व्हायला बरेच जण तयार आहेत....धोबी पण बरेच आहेत
आपला..... रामचन्द्र तात्या च्या राज्यातल्या धोब्याने कपडे हरवलेला.विजुभाऊ

अभिज्ञ's picture

4 Apr 2008 - 8:18 pm | अभिज्ञ

आजकाल मिसळपावकरांच्या भुमिका असलेले बरेच नाट्यप्रयोग इथे पहायला मिळत आहेत.
वाचून मजा आलि.
परन्तु......
चांगला लेख वाचताना ते क्रमशः वाचले कि फार चिडचिड होते.)

बाकि,सर्वच कट्टे पुण्यातच घेणार कि काय???

असे असेल तर होउन जाउ दे.डॉन साहेब आपणहि आपला मि.पा.चा दक्षिणेतला कट्टा ऍरेन्ज करुयात.
कट्टा कशाला आपण त्याला ओसरीच म्हणुया.
अहो कट्टयापे़क्षा ओसरीवर जरा ऐसपैस "बसता" येते.असा आमचा अनुभव आहे.)
तुमचा लेख जरी काल्पनिक असला तरी आमचे आमंत्रण खरे मानावे.

अबब

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 8:31 pm | छोटा डॉन

बोला येताय का या विकएंन्ड ला, मस्त ३ दिवस सलग सुट्टी आहे ... वाटलं तर "स्वयंभू" ला पण बोलवू ...
उद्या सकाळी सवडीने कॉल टाकतो ...
सध्या अजून हापिसातच आहे .... आज लैच उशीर होणार आहे ... असो.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनापासुन's picture

4 Apr 2008 - 8:31 pm | मनापासुन

भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी........

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 8:37 pm | प्रभाकर पेठकर

अरें शिंच्यां! हल्लीं परप्रांतींयंच हांतपांय पसरंतोंय, तिंथें लक्ष्यं द्यां. कसें? आम्हां भटांच्या मागें तरीं कितीं लागायचें रें. आँ?

छोटा डॉन's picture

4 Apr 2008 - 8:44 pm | छोटा डॉन

पेठकर काका, बरे झालं ठोकलात ते. आजकाल कोणपण ऊठतो आणि ब्राम्हणांवर टिका करतो ...
कधी बामण म्हण, कधी भट म्हण काय काय चालू असतं ... आणि ह्यांना काहि म्हणले की लगेच "ऍट्रासिटी ऍक्ट" ...

अवांतर : मनापासून , आमची तुमच्याबद्दल तक्रार नाही पण "भट" हा शब्द मनाला लागला ... कदाचित तुमचा हेतू तो नसेल ...
असो. अधिक विषयांतर नको म्हणून हा विषय इथेच संपवावा हेच बरे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनापासुन's picture

4 Apr 2008 - 8:57 pm | मनापासुन

अरे बापरे............मला हे असे काही होइल याची कल्पना नव्हती.
मी ओसरी बद्दल म्हंटले होते............मी पण भट च आहे.......
आता यात उगाच ऍट्रोसीटी वगैरे म्हणु नका........कोणाच्याकाही भावना वैगेरे दुखावण्याचा हेतु अजिबात नव्हता
असो हा विषय इथेच संपवावा हेच बरे ...

................पुण्यातल्या चित्पावन सम्मेलनात मनापासुन हजेरे लावली होती मी .

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 10:03 pm | प्रभाकर पेठकर

अहो भावना कसल्या दुखावताहेत डोंबल्याच्या? उगाच वेळ जात नाही म्हणून टाकली एक प्रतिक्रिया. कोणी ब्राह्मणांना/भटांना कितीही झोडपले तरी त्यांना कांऽऽऽही फरक पडत नाही/पडणार नाही.

प्राजु's picture

4 Apr 2008 - 8:34 pm | प्राजु

एकदम छान.
पण. अजून थोडा मोठा आणि आणखी रंगतदार करता आला असता. कंटाळा आला होता का आपल्याला?

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

5 Apr 2008 - 12:54 pm | इनोबा म्हणे

त्यामुळे विनोबांनी आपली मागणी मान्य न झाल्यास " कार्यक्रमामध्ये घूसून राडा करण्याची धमकी" दिली
:)

विनोबांच्या धमकीचा परिणाम असेल म्हणून तात्यांनी हा कार्यक्रम "पुण्यनगरीत होणार" असे जाहीर केले.
अरे लेका त्यो तात्या हाय्,माझ्या धमकीला कसला घाबरतोय. 'विनोबांच्या धमकीचा मान ठेवून' असे म्हण हवे तर...

खाद्य संभेलनची कल्पना लई आवडली....

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर's picture

5 Apr 2008 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर

'विनोबां'ची धमकी म्हणजे 'साने गुरुजीं'च्या रहस्यकथेइतपत रोमहर्षक असणार.

आनंदयात्री's picture

7 Apr 2008 - 12:08 pm | आनंदयात्री

भारीच रे डान्या !!!

धमाल मुलगा's picture

7 Apr 2008 - 12:36 pm | धमाल मुलगा

एकदम फर्मास सुरुवात !!!

"धमाल मुलाला" काय सगळेच सारखे होते त्यामुळे त्याने "कुठही घ्या बायलीला, आपण नक्की येतेओ" असे आश्वासन दिले.

काय? नक्की काय सुचवायच॑य रे?
....(खातोय मार !!) म्हणजे उम्म्म्म....हा॑..अस॑ का? की तुला 'बाटलीला' म्हणायच॑य? (हुश्श्य ! बर॑ झाल॑ वेळेत दुसरा शब्द सापडला !!!)

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 12:40 pm | छोटा डॉन

म्हणजे काय की तू "पुणे, मुंबई, बेंगरूळ, कोल्हापूर" असा कुठही अनिर्बंध संचार करत असतो म्हणून ...
आता " बाटलीला" का अजून काही ते सांगायची गरज नाही ...

समजने वाले को इशारा काफी है ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....