आता आधीच ठरले असल्यामुळे संभेलन एकूण ३ दिवसाचे असल्याचे ठरले होते. पहिल्या दिवशी साधारणता सर्व सदस्यांच्या "चांगल्या ओळखी, झालेच तर सदस्यात आपापसात असलेल्या वादाची मांडवली, बाकीच्या २ दिवसाची आखणी" असा व दुसर्या दिवशीचे खास आकर्षण म्हणजे "अनुष्काच्या ऊपस्थीतीत मिपा कमेटीची सभा, त्यात वेगवेगळे ठराव व अहवाल वाचन " व शेवटी संध्याकाळी "केशवसुमार आणि दारूचा बार" या संगितनाट्याचा प्रयोग हा कार्यक्रम व तो झाल्यावर रात्री "महामेजवानी [ अतिमद्यपानासकट ] " असा कार्यक्रम ठरला. शेवटच्या तिसर्या दिवशी "विविध [अव] गूणदर्शन व संध्याकाळी प्राजू, वरदा, मनस्वी, सॄला यांनी आयोजीत केलेले कविसंभेलन व चरोळी मैफील " असा साधारण अजेंडा ठरला.
हे सर्व जाहीर झाल्यावर "धमाल, इनोबा, आंद्या, छोटा डॉन" यांनी आमाला शेवटच्या दिवशी "संध्याकाळी" रजा द्यावी कारण त्यांना त्यांच्या लोकल नातेवाईकांना भेटाअयचे आहे असे सांगितले. त्यावर "डांबिसकाका" म्हणले "चला, मी पण तुमच्या घरी येतो". तात्यांना पण त्याच दिवशी संध्याकाळी "अनुष्काला" सोडायला जायचे असल्याचे समजले. पण हा सर्व "कविसंभेलन व चारओळी मैफिलीपासून पळून जाण्याचा बहाणा आहे" असा सूर 'महिला मंडळाने लावल्याने व त्याला सर्व "एन आर आय" मंडलींचे समर्थन लाभल्याने हा डाव फसला. तरी शेवटी "टिंग्याने" घाबरू नका, मी काही तरी तरकीब काढतो असे सांगितले.
सर्वात महत्वाचे म्हणजे या "३ दिवसांचा खाण्याचा मेनू काय असावा?" हे ठरवण्यासाठी सर्व मंडळींची बैठक बसली. 'मिसळपाव' हे प्रमूख आकर्षण असल्याने त्याचे काय करायचे यावर गोंधळ ऊडाला.
तात्या म्हणाले "फोकलीच्यांनो, गूमन ठाण्यात आला असता तर सगळ्यांना मामलेदाराची मिसळ खिलावली असती. आता बसा बोंबलत." त्यावर डॉक्टरसाहेबांनी व केसुने तावातावात "पून्यात कशी आणि कूठेली मिसळ जबरदस्त आहे" याचे पूराण सुरु केले. त्यावर "टींग्याने" मधेच "नको रे बाबा, पुण्यात मिसळीला शुद्ध साजूक तुपाची फोडणी घालतात व तिच्यावरोबर प्यायला पियूष देतात" असे पिल्लू सोडले. त्यावर चिडून धम्याने "डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले.
त्यात मधीच "कोलबेर व बेसनलाडूने" सध्या"पुण्यातल्या मिसलीत झा* दम राहिला नाही" असे जळजळीत विधान केले. शेवटी या सर्व वादाला कंटाळून 'पेठकरकाकांनी' स्व हस्ते एकदम 'फर्मास मिसळ' बनवण्याचे मान्य केले. त्यावर तात्यांनी " हे बघ, तुझी ही झणझणीत मर्हाटी मिसळ खाल्यावर मात्र अनुष्कावहिनींची जी वाट लागेल की दुसर्या दिवशी सगळेजणं, आपापली 'दु:ख' विसरून, हातात पंखे घेऊन, पुणेभर धावणार्या अनुष्कावहिनींच्या मागे धावातील. मला मात्र अनुष्काला सांभाळू की मॅरथॉन मध्ये सहभागी आपल्या सदस्यांना सांभाळू असे होऊन जाईल. तेव्हा जरा जपून." असा इशारा दिला, त्याचे उत्तर म्हणून 'पेठकरकाकांनी" फक्त एक गूढ हास्य केले. यासाठी उपाय म्हणून 'पुण्याच्या पेशव्यांनी' अस्सल बेळगावी लोणी आणतो म्हणून सांगितले.
मध्येच 'बेसनलाडू व धम्मकलाडूने' उत्तर म्हणून "मी काय म्हणतो, आपण समजा साजूक तुपातले लाडू बनवले तर दाह कमी होईल" असा सल्ला दिला. त्यावर विनोबा म्हणाले "च्यायला, ह्या झनझणीत मिसळपावात हे गूळमट लाडू कुठनं आले भौ ?" मधीच धमालने "मला जेवणानंतर कमीत कमी ३ ग्लास ताक लागते व ते न मिळाल्यास ब्रम्हहत्यचे पातक तुमच्या माथी येईल" अशी शापवाणी उद्गारली. पेठकरकाकांनी "ताक हे पचनक्रियेसाठी उत्तम औषध असल्याचा" निर्वाळा दिला. वरदाने लगेच "म्हशीच्या गोठ्यातून आणलेल्या दुधाचं आणि गोकुळच्या दुधाचं ताक वेगळं लागतं त्या गोठ्यातल्या दुधाच्या केलेल्या ताकाची चव अप्रतिम ती कशालाच येत नाही..." असा शास्त्रोक्त सल्ला दिला.
शेवटी सर्वसंमतीने [???] जो मेनू ठरला तो असा ...
**** शाकाहारी ****
* जळजळीत वांग्याची भाजी
* मस्त खुसखुशीत सांडगे व बटाटे घातलेली गवारीची भाजी
* तात्याच्या माळेतला कांदा चौकोनी चिरुन हिरवी मिरची तेल लावून भाजून चुरडून घालून दह्यात कालवायचे आणि चवीला मीठ घातलेली कोशिंबीर
* ज्वारीची गरमागरम पापूद्रे सूटलेली भाकरी
* स्वघोषीत इतिहासकारांच्यासाठी ज्यावर इतिहास लिहिला आहे अशा ग्रीक रोट्या
* आ॑ध्रा-थाळीबरोबर हमखास असणार आणि कुठच्याशा गवताच॑ केलेल॑ असल्यासारख॑ दिसणार चवदार लागणार लोणचे.
* चिकन कॅफ्रिअल अँड राईस...
* मूगाचे वरण (लसणीची फोडणी घालून)
* हराभरा कबाब्, दाल आणि सफरचंदाची खीर....
* व्हेज बिर्याणी
* डाळींबीची उसळ
* पापड, खास सोलापूरी शेंगाचटणी, तळलेल्या पापड्या-कुरोड्या
* सणसणीत कांदाभजी, बटाटाभजी न मिरच्याभजी
* सॅलेड [एव्होकॅडो, रोमन लेट्युस, लाल सिमला मिर्च, काकडी, टोमॅटो, ] ड्रेसींग - ऑलीव्ह ऑइल, लिंबु
* स्रुश्टी लावण्या साठी खास संस्क्रुत खाद्य दालन..मुळ्या आणि कंद स्पेश्यल मेन्यु
तरी 'जुन्या अभिजीतच्या' मते "च्यायला, ह्या लोकांना डायरेक्ट सिंहगडावर न्हेऊन तिथली पिठलं-भाकरी, दही खिलवायला हवं"...
**** मांसाहारी ****
* बटर तंदूर रोट्या व नान
* झणझणीत चिकन कोल्हापूरी / बटर चिकन
* तंदूरी चिकन / रेशमी कबाब
* अस्सल हैद्राबादी मटन बिर्याणी
* कोल्हापूरी तांबडा रस्सा व पांढरा रस्सा
* अस्सल कोकणी 'फिश'
* चिकन पकोडे
* सोलकढी
**** डेझर्ट्स ****
* कॉर्नेटो आइस्क्रीम
* स्ट्रॉबेरीच्या तुकड्यांवर बोरबॉन वॅनीला आईसक्रीम
* आमरस
* खास चितळेंची आंबाबर्फी
* गूलाबजामून
* मँगो किंवा स्ट्रॉबेरी स्मूदी...
**** उत्तेजनापेय अर्थात सोमरस अर्थात दारवा ****
स्कॉच शिवास रिगल,ग्लेन्न्फिडिच, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल , जॅक डॅनियल्स, टकिला, ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस, "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" , AK47 cocktail, बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी, व्होदका [ स्पेशली स्मिरनॉफ ] इन टोमॅटो जुस आणि पाणी, जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम, वेगवेगळ्या बियरा [ बडवायझर, किंगफिशर, फोस्टर ] इत्यादी इत्यादी .... याशिवाय कुनाला आणखी काही लागल्यास रात्री २ वाजता का होईना ते आणण्याची तयारी 'धमालाने' दाखवली. त्याच्या मते 'पुणे तिह्ते काय उणे ? '
ह्या "बारची" सर्व जबाबदारी सर्वश्री केशवसुमार व धमु [ मधून मधून एखादा पेग मारत] पार पाडतील ....
प्रमूख व्यवस्थापक पद "डांबिसकाकांनी" स्व:ताहून आपल्याकडे घेतले. जे नवशिके पिनारे असतील त्यांच्यासाठी त्यांनी खास "२ तासात टूल्ल व्हा" असा क्रॅशकोर्स पण तयार केल्याचे समजते...
संध्याकाळी आपापली माहिती शेअर करण्यासाथी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याचे विषय साधारणता असे ठरले...
* छोटा डॉन : 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' / कार्यक्रम कसा आयोजीत कर्रून पार पाडावा
* मुक्तसुनित : 'सरळ, सोप्या मराठीत प्रतिसाद कसे द्यावेत'
* प्रकाश घाटपांडे / धोंडोपंतदादा : 'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?'
* सॄष्टीलावण्या : संस्कृतभाषा - संगोपन व संवर्धन
* वरदा : ऑफीसमध्ये काम नसल्यावर टाईमपास कसा करावा ?
* मनस्वी : मजेशीर नावांचा इतिहास
* स्वाती दिनेश : माझी "जपानची दुनीया"
* स्वाती राजेश : संडे स्पेशल
* इनोबा : राज ठाकरेंचे काय चुकले ?
* प्रमोदकाका : माझ्या बालपणीच्या रम्य आठवणी
* विजूभाऊ : अकबर द ग्रेट.....मग राणा प्रताप कोण?......गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?
* केशवसुमार : विडंबन आणि मी
* जुना अभिजीत : मी रानवेडा आणि माझी दुर्गभ्रमंती
* डाबिसकाका : मद्यपानाचे तोटे व टाळण्याचे सहजसोपे मार्ग'
[ यानंतर लगेच त्यांच्या "'माझे मद्यपानाचे प्रयोग'[गांधीजींच्या माझे सत्याचे प्रयोग च्या धर्तीवर ] " या पूस्तकाचे लघूवाचन, सादरकर्ते धमाल, आंद्या, टिंग्या, डॉन्या, इनोबा आदि शिष्य मंडळी ....]
* 'धमाल मुलगा' : 'मद्य रिचवायच्या उत्तमोत्तम पद्धती'
* तात्या अभ्यंकर :
१. हस्ताक्षरावरून स्वभाव!
२. ललित लेखनात शिव्या असाव्यात का?
३. शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई!
४. मी रंगवलेली व्यक्तीचित्रे
आता यासंमंधीची अधिक माहिती व "अनुष्काभाभी स्पेशल डे" च्या साथी कॄपया "भाग ४ " ची वाट पहा ...
क्रमश :
[ हतबल ] छोटा डॉन ....
प्रतिक्रिया
6 Apr 2008 - 9:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही वाचतोय !!! :)
6 Apr 2008 - 7:16 pm | स्वाती दिनेश
चालू द्या,आम्ही वाचतोय !!! :)
असेच म्हणते.
स्वाती
6 Apr 2008 - 10:46 am | इनोबा म्हणे
"विविध [अव] गूणदर्शन व संध्याकाळी प्राजू, वरदा, मनस्वी, सॄला यांनी आयोजीत केलेले कविसंभेलन व चरोळी मैफील "
हा हा हा!
"धमाल, इनोबा, आंद्या, छोटा डॉन" यांनी आमाला शेवटच्या दिवशी "संध्याकाळी" रजा द्यावी कारण त्यांना त्यांच्या लोकल नातेवाईकांना भेटायचे आहे
याच्यात माझा समावेश कोणी केला रे?
डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली.
धमालराव देशमूख पाटील जिंदाबाद!
विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले.
हाण तिच्यायला....
'बेसनलाडू व धम्मकलाडूने' उत्तर म्हणून "मी काय म्हणतो, आपण समजा साजूक तुपातले लाडू बनवले तर दाह कमी होईल" असा सल्ला दिला. त्यावर विनोबा म्हणाले "च्यायला, ह्या झनझणीत मिसळपावात हे गूळमट लाडू कुठनं आले भौ ?"
हे बाकी खरंय...:)
आता यासंमंधीची अधिक माहिती व "अनुष्काभाभी स्पेशल डे" च्या साथी कॄपया "भाग ४ " ची वाट पहा ...
आता कीती वाट पाहायला लावतोस लेका...
डॉन्या लढ लेका.मस्तच....
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
6 Apr 2008 - 11:13 am | केशवसुमार
डॉनशेठ..
उत्तम चलू आहे चलू द्या
ते आमच्या परिसंवादाचे नाव
' विडंबन आणि मी' बदलून 'बाई, बाटली, बिडी आणि मी' असे ठेवावे
केशवसुमार
7 Apr 2008 - 12:51 pm | छोटा डॉन
शेठ तुमच्या मागणीप्रमाणं कार्यक्रमातला बदल सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात आला आहे ...
पण हे "बाई" च नविन काय काढलतं ? जरा आमाला बी "नालेज" द्या ना राव ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
6 Apr 2008 - 12:16 pm | संजय अभ्यंकर
ह. ह. पु.वा.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
6 Apr 2008 - 12:32 pm | भडकमकर मास्तर
हाहा...झकास....;
येउंद्यात....
6 Apr 2008 - 8:29 pm | गोट्या (not verified)
स्कॉच शिवास रिगल,ग्लेन्न्फिडिच, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल , जॅक डॅनियल्स, टकिला, ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस, "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" , AK47 cocktail, बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी, व्होदका [ स्पेशली स्मिरनॉफ ] इन टोमॅटो जुस आणि पाणी, जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम, वेगवेगळ्या बियरा [ बडवायझर, किंगफिशर, फोस्टर ] इत्यादी इत्यादी ....
ह्या सर्व स्वर्गीय पेयांच्यामुळे तुमचे संमेलन एकदम झकास चालले असेल अशी भाबडी आशा !!!!!
पण आम्हाला बोलवणे कसे आले नाही ह्याचाच विचार करत आहे :)
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
7 Apr 2008 - 9:22 am | llपुण्याचे पेशवेll
सिंगल माल्टवाली ग्लेनमोरांजी शिवाय तात्याचे कसे होणार???
पुण्याचे पेशवे
6 Apr 2008 - 9:27 pm | रामदास
कटी साक आता मिळायला लागली आहे.
7 Apr 2008 - 12:11 pm | विजुभाऊ
सोलकढी! नी ती मासाहारी कधी झाली रे डॉन्या.......शिंच्या.......
..............सावन्त वाडीत नारळाचे दूध आणि कोकमाच्या आगळाची सोलकढी प्यालेला विजुभौ सावन्तवाडीकर
7 Apr 2008 - 1:48 pm | धमाल मुलगा
अरे बाबल्या...
कालतर गुढीपाडवादेखील होऊन गेला...
तू आपला अजुन शिमग्यातच रमला आहेस...
च्यामारी, एकेकाला धर-धरुन 'आकाशारून पडली लाकड॑...' च्या धर्तीवर चा॑गल॑च घोसळून काढतोयस की!!!
जियो मेरे शेर :-))
त्यावर चिडून धम्याने "डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली.
हा हा हा!!! परत ही सवय लागणार दिसत॑य. आत्ता जेवायला जातानाही क्युबिकलमधल्या मित्राला अस॑च म्हणालो.
आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले.
:-)))))))))))))) जाऊदे रे. आपला च्या-बिझनेसचा पार्टनर है तो. ल॑टनला शाखा काढणार आहे आपल्या बिझनेसची. दिला सोडून.
7 Apr 2008 - 6:15 pm | ब्रिटिश टिंग्या
आयला डॉन्या एकदम खल्लास लिहीलयं रे.........
आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले.
आयला या वेळी माझी तर एकदम फुल्ल टु च करुन टाकली राव......थांब बघतोच आता तुझ्याकडं.....
तरी शेवटी "टिंग्याने" घाबरू नका, मी काही तरी तरकीब काढतो असे सांगितले.
काळजी नको......तरकीब व्य.नि.ने पाठवत आहे.....जमल्यास पुढच्या भागात टाक.
"अनुष्काच्या ऊपस्थीतीत मिपा कमेटीची सभा, त्यात वेगवेगळे ठराव व अहवाल वाचन "
आपल्याला सगळं डिटेल्डमध्ये पाहिजे बरं का? म्हणजे कोण कोण कोणाला कोणाला काय काय म्हटलं ते? क्काय?
अवांतर -
पुण्यात मिसळीला शुद्ध साजूक तुपाची फोडणी घालतात
डॉनभाय, आमच्या माथी हे पातक नको.....आम्ही (इनायकभौंसमोर) पुण्याबाबत काही मत देउ इच्छित नाही कारण आम्ही स्वत: डायहार्ड रामनाथप्रेमी आहोत.......अन् शेवटी पक्का पुणेकर असल्याने "आपला तो बाब्या" वगैरे वगैरे........
असो,
पु. भा. ल. ये. दे.
- टिंग्या
21 Jun 2008 - 10:04 am | विजुभाऊ
आजचा मेन्यु काय आहे डॉनभाऊ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत