शेवटी एकदा ठरल्याप्रमाणे "पुणे" हे स्थळ नक्की झाल्यावर पुढचा प्रश्न आला की "पुण्यात कुठशीक ?". आता ह्या प्रश्नावर पुण्यातल्या लोकांनी बोलायचे नाही तर कुणी ? लगेच "कार्यकारणीची" एक तात्काळ मिटिंग बोलावण्यात आली.
सलामीचे २-४ पेग पोटात गेल्यावर "अल्ट्रा माइल्ड्स धूर" सूडत धमाल्यानं पहिला बॉल टाकला "ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे ...". तिकडे लगेच "आनंदयात्री" डॉक्टरसाहेबांच्या कानात कुजबूजला "तुला कळतयं का डेक्कन का म्हणतय़ं हे बेणं ? म्हणजे काय दिवसभर हा संभेलनाची तयारी या नावाखाली इथल्या पोरी टापत बसणार व रात्री बसल्यावर मी आज काय काय बघितलं याच वर्णन करून आपल्या डोक्याला झीट आणणार." त्यावर ते दोघे व आसपासचे अजून २ जण ख्या ख्या करून खिदळाय लागल्यावर नक्की काय होतयं हे धमाल्याच्या लक्षात आले व तो म्हणाला " मां की किरकीरी साला, इथं आम्ही च्यायला दिवसरात्र हिंडून व बोंबलून घश्याची वाट लागली आणि हे खिदळतात " आता विनोबा पण काहितरी वार करणार जे जाणून तात्यांनी "गपाकीरे फोकलीच्यांनो " म्हणून परिस्थीती नियंत्रणात आणली.
जमेल तसे दऱ्या-खोऱ्यात हिंडणाऱ्या "जुन्या अभिजीताने" एकदम जोशात म्हणले " नाही, मी काय म्हणतो, समजा आपण हा कार्यक्रम लोहगड, सिंहगड अशा ठिकाणी ठेवला तर ?" त्यावर केशवसुमारांनी पण " सिंहगडाच्या पायथ्याशी बंगला भाड्याने घेउ" असा सल्ला दिला. त्यावर विनोबांनी लगेच " महाराजांनी जिवापाड जपलेल्या स्वराज्याच्या एका साक्षिदाराच्या अंगणी असले प्रकार मला चालणार नाहीत" अशी धमकीवजा सूचना केली. आता ह्याचा परिणाम व एकंदरीत "नांगरे पाटलांचा दरारा" या गोष्टी लक्षात घेउन शेवटी कुठल्याही प्रकारचे "गड" हा प्लान पण ड्रॉप करण्यात आला. शेवटी गावाच्या गर्दीपासून दूर एखाद्या ठिकाणी, निवांत जागी स्थळ फिक्स करायचे ठरले.
पुणे शहरातील हॉटेल्स चे रेट्स व आजकाल "विकएंन्ड्ला पुणेकरांनी घरात चूल पेटवणे बंद" केल्यामुळे हॉटेलात होनारी गर्दी व आपण जेवताना पाठिमागे रांगा लाउन उभारणारे पुणेकर यांच्यापासून सुटका म्हणून "सातारा रोडवरचे एक खोपच्यातले हॉटेल" ठरवण्यात आले. त्यावर शेखरने आपण एकदा नळस्टॉपच्या इथे "शांग्रिला गार्डन" च्या वर कशी गरम पेयाची पार्टी केली होती व तिथे कसा कोनाचाही डिस्टर्ब होत नाही याचा दाखला दिला. त्यावर "विवेक" म्हणाला " राजे, आपण पिउन झाल्यावर बाकी कुणाला व घरच्यांना डिस्टर्ब न करता शांतपणे जाउन झोपलात तरी मिळवली...". आता या दोघात वाजण्याची चिन्ह दिसत असताना विनोबांनी शेखरला "पेग भर, मग बोलू" म्हणून शांत केले. शेवटी एकदा सगळे ठरल्यावर मिटिंगमधली "सावरकर" मंडळी बाकीच्या " डोलकरांना" घेउन मार्गस्थ झाली....
शेवटी तो महान दिवस उजाडला, ठरलेल्या वायद्याप्रमाणे देशोदेशीचे सरदार पहिल्या "मिसळणारोहण समारंभासाठी" पुण्यनगरीत जमा झाले. मागच्या वेळी "कल्टी मारलेल्या" छोट्या डॉनला यावेळी "अबब" ने मानगूट पकडून धरून आणले होते. तरी त्याचे माझा "गुजरात दौरा, माझा गुजरात दौरा" असा घोषा चालूच होता त्यावर विनोबांनी त्याला " राजे, पुणे काय आणि गुजरात काय, सगळे आपलेच हिंदवी स्वराज्य आहे" अशी समजूत काढली. त्यावर एकवेळ "प्राजूच्या चारोळ्या" परवडल्या पण असले "नाटकात किंवा दशावतारीत भाषण केल्यासारखे बोलणे नको" असा विचार करून "अरे काय आंद्या, किधर है ?" असे म्हणत तिथून काढता पाय घेतला.
तेवढ्यात "डांबिसकाका" सगळ्या 'यक्षनगरीतल्या मिपा ग्रामस्थांना" घेउन तेथे अवतीर्ण झाले. त्यासाठी त्यांनी खास "चार्टर्ड फ्लाईट" केल्याचे समजले. त्याबद्दल त्यांना विचारताच ते म्हणले " तर मग, काय समजलात, मी काय घाबरतो की काय ? आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. " बाहेर कसला येवढ़ा गलाबला चालला म्हणून ते बघायला स्वता: तात्यासाहेब बाहेर आले, बघतात तो समोर डांबिसकाका. मग काय विचारता महाराजा , जवळपास १० मिनिटे दोघांनी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" एकमेकांची विचारपूस केली. हा "अनूपम सोहळा" पाहून अनेकांना गदगदून आले. दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या त्यावर धमाल ने त्यांच्याकडे "काय बावळट ध्यान आहे?" अशा अर्थाने पाहिले त्यावर शरमून त्या दोघांनी वह्या मिटल्या.
तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती. अशा गप्पा मारत ती मंडळी हॉलकडे चालू लागली. वाटेतच स्वागतमुर्ती इनोबा उभे होते, बेसनलाडू कडे पाहून ते म्हणाले "राजे सावकाश, पडताल; इथे आपल्या अमेरिकेप्रमाणे सरकते जिने नसल्याने पाय घसरण्याची शक्यता आहे..." त्यावर चिडून बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले.
तिकडे समस्त महिला मंडळाच्या नेहमीप्रमाणे गप्पा चालू झाल्या "ए काय म्हणतीस? अय्या काय मस्त साडी आहे. क़िति जाड झाली आहेस, डाएट बंद केलेस का ? बाकीच काय म्हणतेस ? ती बघ कसा शहाणपणा करती आहे,झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...."
तर अशा रितीने संभेलानासाठी सर्व मंदळी एकत्र आली ...
आता संभेलनात काय घडले हे पुढच्या भागात ....
क्रमशः
[ खरच सॉरी राव, रात्रीचे १२ वाजले. आता झोपायलाच हवे ...]
प्रतिक्रिया
5 Apr 2008 - 12:13 am | आंबोळी
आयला डॉन मजा आणलीस .....
दुसरा पार्ट पण झकास जमलाय..... पण आजुनहि एकही प्रतिक्रीय का नाही?
पुढचे भाग लवकर आणा.....
(खादाडी प्रेमी) आम्बोळी
5 Apr 2008 - 12:26 am | बेसनलाडू
(तुम्हाला) झोप यायच्या आधी लवकर लिहा ;)) आम्ही वाचत आहोतच. उत्सुकता आहे संमेलनात काय घडले याची :)
(आस्वादक)बेसनलाडू
5 Apr 2008 - 12:51 am | विसोबा खेचर
तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती.
हे वाक्य सर्वात आवडलं! :)
हम्म, छोट्या डॉना, पुढे काय झालं ते लवकर सांग......
बाय द वे अनुष्का संमेलनात केव्हा आली? इथे तर तात्या एकटाच आलेला दिसतोय! तो तिला घेऊन येणार होता ना? :)
तात्या.
5 Apr 2008 - 11:54 am | पिवळा डांबिस
तेवढ्यात "डांबिसकाका" सगळ्या 'यक्षनगरीतल्या मिपा ग्रामस्थांना" घेउन तेथे अवतीर्ण झाले. त्यासाठी त्यांनी खास "चार्टर्ड फ्लाईट" केल्याचे समजले. त्याबद्दल त्यांना विचारताच ते म्हणले " तर मग, काय समजलात, मी काय घाबरतो की काय ? आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. "
आंवशीक खांव व्हरांन! वेतोबाची आण! खरांच सागतंय! तुझो पहिलो भाग वाचलो ना आणि मांका लिव्हुसां वाटलां की रांडिच्यांनो मी सिंडीबाईक बोलंवतंय, मग बघतंय हो तात्या खंय जाता, यक्षनगरीक की पुण्याक!!:)) पण मी थंयसर चिन्यांच्यात आडकलों होतंय! आत्ता जपानात आयलंय आणि तुझो कॉलम पाह्यलंय!!!
अरे यक्षनगरी म्हंजे काय समजल्यात तुम्ही! अरे सिंडिबाईने ढेकर दिलो ना (आणि शिंची देता कधीकधी!!) तर आमच्या घरांक आयकू येतां!!!
बाहेर कसला येवढ़ा गलाबला चालला म्हणून ते बघायला स्वता: तात्यासाहेब बाहेर आले, बघतात तो समोर डांबिसकाका. मग काय विचारता महाराजा , जवळपास १० मिनिटे दोघांनी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" एकमेकांची विचारपूस केली. हा "अनूपम सोहळा" पाहून अनेकांना गदगदून आले.
मग काय समजल्यांत! देवगडाचा मोंड नदीचा पाणी आसां दोघांच्याही रक्तात!!! फरक इतकोच की रामचंद्र भट झालो आणि आम्ही बामण!!!
दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या त्यावर धमाल ने त्यांच्याकडे "काय बावळट ध्यान आहे?" अशा अर्थाने पाहिले त्यावर शरमून त्या दोघांनी वह्या मिटल्या.
हॅ, हॅ, हॅ, आसा बुकात लिवून कधी कोकणी येतां? तेच्यासाठी, म्हाराजा, कोकणी फॅमिलीतच जन्म घेउचो लागतां!! नायतर सगळेच मच्छिंद्र कांबळी नसते झाले?:)))))
बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली.
इनोबा, तुकां एक सांगतंय, आपलो दोस्त म्हणून!! "आपण कोण" हो प्रश्न फक्त पुण्यातच विचारलो जाता! आमच्या कोकणांत हो प्रश्न कोणच कोणांक विचारणां नाय! कारण काय ठावूक आंसा? "आपण कोण?" या प्रश्नाचा एकच उत्तर आंसा, " तुझ्या आवशीचो घोव!!!":))))
आणि लक्षांत घे, आवशीचो घोव म्हणजे बापूस आसोच अर्थ आसाल आसा न्हय!!:)))
तेंव्हा तुका जर कोणी विचारलां की "तुम्ही कोण?" तर आता तुका उत्तर म्हायिती आसां!!!!:)))))
"ए काय म्हणतीस? अय्या काय मस्त साडी आहे. क़िति जाड झाली आहेस, डाएट बंद केलेस का ? बाकीच काय म्हणतेस ? ती बघ कसा शहाणपणा करती आहे,झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...."
आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय! आगदी हुबेहूब चित्रण!!!:)))
बाकी तुमचा डॉन लोकांचा काय सांगूक येणा नाय! आता म्हणशाल तर मुंबईत बॉम्बस्फोट नायतर आता लगेच "राम तेरी गंगा मैली"!:))))
आपलोच, (नायतर दुसरो कोण आमकां घेतलो? नमोगतांवर कोकणीक काय मार्ग आसां, जोड्यांन मारतील!!)
पिवळो डांबिस
5 Apr 2008 - 1:10 pm | इनोबा म्हणे
"आपण कोण?" या प्रश्नाचा एकच उत्तर आंसा, " तुझ्या आवशीचो घोव!!!":))))
तेंव्हा तुका जर कोणी विचारलां की "तुम्ही कोण?" तर आता तुका उत्तर म्हायिती आसां!!!!:)))))
एकदम डांबीस प्रतिसाद. धन्यवाद! डांबीस काका :)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
5 Apr 2008 - 3:02 pm | नंदन
हय मालवणी वाचून बरा वाटला :), बाकी डॉन्याचो कल्पनाविलास मस्तच. फुडचे भाग पण लवकर येवांदेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Apr 2008 - 3:27 pm | विसोबा खेचर
बाकी डॉन्याचो कल्पनाविलास मस्तच. फुडचे भाग पण लवकर येवांदेत.
ह्याच म्हणता!
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मेल्या नंदन, अरे ह्या काय खयचंर साहित्य वगैरे घेऊन बसलास? रांडेच्या, धड चार बुकंदेखील शिकलंस नाय म्हणून तुका त्या तात्या अभ्यंकराक सांगून त्याच्या मिपा हाटेलात लावून दिला. तुका रे मेल्या खय कळता त्या साहित्यात? :)
तू स्वताक काय जयवंत दळवी समजता की मधु मंगेश कर्णिक? :)
5 Apr 2008 - 11:01 pm | छोटा डॉन
"आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय"
ह्या ह्या ह्या. कसलं डाबिसकाका, आमच कुठलं एवढं भाग्य ???
पण आमच आपलं जमेल तसं हापिसात "मलिका-ए-हिंदूस्तान, कनिज " वगैरे चालू असतं ...
आहेत आपल्या १०-५ मैत्रीण बरोबर हिंडायला, तेवढेच आपले "ज्ञानवर्धन", काय ?
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
5 Apr 2008 - 11:00 am | रिमझिम
काय मस्त लिहीले आहे हो तुम्ही छोटा डॉन,हा भाग पण मस्त झाला आहे,मजा आली वाचुन !
>>तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती.
हा हा हा !!!! :))
उत्सुकता आहे संमेलनात काय घडले याची,लवकर पुढचे भाग लिहा
(संमेलनोत्सुक) रिमझिम्
5 Apr 2008 - 11:18 am | विजुभाऊ
आयला ( सॉरी माताय) डॉन्या तु लेका सम्मेलन व्हायच्या आतच बखर लिहुन टाकली की. आता तुझी खबर घ्यायला यायलाच पायजेल.
5 Apr 2008 - 11:50 am | प्रभाकर पेठकर
भाग दोन, भाग एक प्रमाणेच खुसखुशीत झाले आहे. अभिनंदन.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
5 Apr 2008 - 1:22 pm | इनोबा म्हणे
"सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती व त्यासाथी बकरे म्हणून त्यांनी आसपास खेळणारी बारकी पोर पकडून ठेवली होती.
हे लय बेस....
"अल्ट्रा माइल्ड्स धूर" सूडत धमाल्यानं पहिला बॉल टाकला "ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे ...
आपून तर धम्याशी सहमत....
वाटेतच स्वागतमुर्ती इनोबा उभे होते, बेसनलाडू कडे पाहून ते म्हणाले "राजे सावकाश, पडताल; इथे आपल्या अमेरिकेप्रमाणे सरकते जिने नसल्याने पाय घसरण्याची शक्यता आहे..." त्यावर चिडून बेसनलाडूने "आपण कोण ?" असे विचारताच मागे एकदा प्रतिसादावरून या दोघात घडलेल्या प्रसंगाची पूनरावृत्ती सुरु झाली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले.
ह्यो तात्या दरवेळी असं का करतो....(पुढच्या वेळी डांबिसकाकांनी सांगितलेले उत्तर देणार आपून....)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
5 Apr 2008 - 5:08 pm | ब्रिटिश टिंग्या
धम्या, आंद्या अन् विवेकला मस्त झोडपलाय!
बाकी "अस्सल कोकणीतून आदररार्थी शब्दांनी, सुवचनांनी, अलंकारांनी" वगैरे वगैरे गोष्टी जरा डिटेल्ड्मध्ये लिहील्या असत्या तर आम्हीही ४ नवीन सुवचने शिकलो असतो....
असो, "व्हेन आय वॉज इन युएस..." हा चिमटा मस्त्....अन् अखिल जागतिक मिसळपाव भगिनी मंडळाच्या खलबती तर नेहमीच्याच.....
"झाला बघ हिच पुढंपुढं सुरु, मी तर आजकाल बोलणंच सोडलयं ... वगैरे वगैरे ...."
हे हे हे आम्हाला माहितीये असं कोण कोणास म्हणालं असेल ते ;)
असो, पुढचा भाग लवकर टाक रे....
- टिंग्या ;)
7 Apr 2008 - 11:30 am | धमाल मुलगा
नुसत॑ धर की आपट...धर की आपट...
अरे काय चालल॑य काय...ठकाठक..ठकाठक..ठकाठक
हाण तिच्याआयला, एकदम ज ह ब ह र्ह्या ;-))))
"तुला कळतयं का डेक्कन का म्हणतय़ं हे बेणं ? म्हणजे काय दिवसभर हा संभेलनाची तयारी या नावाखाली इथल्या पोरी टापत बसणार व रात्री बसल्यावर मी आज काय काय बघितलं याच वर्णन करून आपल्या डोक्याला झीट आणणार."
म्हाराज, डा॑बिसकाका म्हणतात तसा मनक-वडा आहात की काय?
"आपल्याला काय कुणाच्या बापाची भिती आहे काय ? टिनपाट उडवीन एकेकाला ? आयला हाच कार्यक्रम जर अमेरिकेत ठेवला असता तर डायरेक्ट जॉर्ज बूशचे व्हाईट हाउस खाली करून घेतले असते आणि वरून सिंडी क्रॉफर्ड ला पाहूणी म्हणून बोलावले असते. "
लय भारी...जय डा॑बिसकाका !!!!
दोघांच्या तोंडातून बाहेर पडलेले अनमोल "शब्दकण " टिपण्यासाठी [ कधीतरी वापरता येतील या हिशोबाने] लगेच आंद्याने, विवेकने वह्या काढल्या
फुटलो रे!!!!! खत्तरनाक :-))))
तिकडे पाहिले तर "सर्कीट, बेसनलाडू, एक, नंदन" वगैरेंची टिपीकल 'एन आर आय' च्या आवेशात " व्हेन आय वॉज इन युएस..." अशी बोलणी चालू होती...
.....प्रकरण जास्त वाढू नये म्हणून तात्यांनी लगेच इनू ला बाहेरून "हार-फुले " आणण्यास पिटाळले.
ठ्ठ्याsssss लेका दुनळीतुन तोफेचा बार? तोडल॑स भौ :-))))))))))
तिकडे समस्त महिला मंडळाच्या नेहमीप्रमाणे गप्पा चालू झाल्या.....
हशा हशा आणि फक्त हशा.....तोही फिस्सकन :-)))))
आयला, तू काय डॉन्या साडी-परकर नेसून काय आपल्या महिलामंडळात बसतंस की काय!
आता मात्र हद्द...नव्हे सरहद्द झाली...अरे हा चिमुकला जीव ह्याहून जास्त नाही हसु शकत !! फट्कन प्राणपखेरु उडून जातील रे !!!!
- (लोटपोट) ध मा ल.