दुर्गाबाईंचे व्यासपर्व... एक अप्रतिम पुस्तक. कधीही मूड लागला की हाती घ्यायचे कोणतेही पान काढून वाचायला सुरूवात करायची... काल असेच झाले. आणि नेमका हा परिच्छेद समोर आला... दुर्गाबाईंच्या कालातीत भाष्याला सलाम... सद्य परिस्थितीत तर अजूनच बोचले हे शब्द...
"विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला मोठा शाप आहे. बुद्धिवंतांची संवेदनक्षमता करवंडली की मग पाशवी बलाचाच आग्रह अनावर होतो. स्वत्;ची कीव करत भले भले बसतात आणि मग चळवळे, दुय्यम दर्जाचे लोक सामर्थ्याची सारी क्षेत्रे काबीज करतात. पण ती त्यांनाही फार काळ पेलत नाहीत. जागा मोठ्या माणसे लहान - असे उलटे गणित सुरू होते. हे उलट्या गणिताचे चक्र द्रोणाने युगापूर्वी फिरवले. अजून ते तसेच फिरते आहे."
- मोहरीतील ठिणगी, व्यासपर्व.
संदर्भ - द्रोणाने एकलव्य अर्जुनापेक्षा वरचढ होऊ नये म्हणून कपटाने त्याचा अंगठा काढून घेतला.
प्रतिक्रिया
6 Apr 2010 - 1:47 pm | अरुंधती
मनातलं जळजळीत व्यक्त केलं आहे अगदी.... मी व्यासपर्व वाचलेलं नाही, पण तुम्ही उधृत केलेल्या परिच्छेदातून दुर्गाबाईंच्या लिखाणाची व विचारांची ताकद जाणवते. धन्यवाद! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
6 Apr 2010 - 1:55 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो. महाभारताच्या कथांमध्ये, व्यक्तिरेखांमध्ये व त्यांनी क्रमलेल्या मार्गांमध्ये असलं भाष्य ठासून भरलेलं आहे. दुर्गाबाईंसारख्यांनी ते उलगडून दाखवावं हे आपलं भाग्य आहे.
पण कधी कधी वाटतं की आजच्या माहितीयुगात ही बधीरता नवीन, अनपेक्षित रूप घेऊन येते. घडणारं समोर दिसत असताना त्याबद्दल बधीर असणं एक. तर समोर इतक्या अनंत गोष्टी घडत असतात की नक्की कुठे लक्ष केंद्रित करायचं याचं भान न राहाता, क्षुल्लक पण लक्षवेधक प्रश्नाकडे बघत बसायचं हा या युगाचा विचारवंतांना शाप आहे. परिणाम मात्र तोच होतो. याचा फायदा मोठ्या आवाजाची, लक्ष वेधून घेण्यात वाकबगार, अशी लहान मंडळी घेतात.
द्रोणाला त्याच बधीरतेने प्रत्यक्ष युधिष्ठिराकरवी 'नरो वा कुंजरो वा' म्हणवून व्यासाने काव्यात्म न्याय दिला असावा.
राजेश
6 Apr 2010 - 7:19 pm | शुचि
>>द्रोणाला त्याच बधीरतेने प्रत्यक्ष युधिष्ठिराकरवी 'नरो वा कुंजरो वा' म्हणवून व्यासाने काव्यात्म न्याय दिला असावा. >>
काय सुंदर मुद्दे मांडता तुम्ही घासकडवी साहेब
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सजनि कौन तम में परिचित सा, सुधि सा, छाया सा, आता?
सूने में सस्मित चितवन से जीवन-दीप जला जाता!
6 Apr 2010 - 3:12 pm | समंजस
हे तर आहेच.
युगांपुर्वी सुरू झालेली ती प्रथा (राजकीय परिस्थिती, राज्यकर्ते, राजकीय अधिकारी आणि एकलव्य) अजुनही बदलेली नाहीच. त्याउलट जास्तच मुळ धरून बसलेली आहे.
6 Apr 2010 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे
उत्तम वेचा निवडलास रे!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Apr 2010 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>उत्तम वेचा निवडलास रे!
बिका, असेच बोल्तो...!
>>>दुर्गाबाईंचे व्यासपर्व... एक अप्रतिम पुस्तक. कधीही मूड लागला की हाती घ्यायचे कोणतेही पान काढून वाचायला सुरूवात करायची.
खरं आहे. व्यासपर्व संग्रही असल्याने असा आनंद आम्हीही घेतो.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2010 - 6:17 pm | चित्रगुप्त
हा जय नावाचा इतिहास आहे... हे आनंद साधले लिखित पुस्तक ही वाचनीय आहे....
6 Apr 2010 - 7:04 pm | रेवती
छानच असणार पुस्तक!
बिपिनदा, पुस्तकातल्या ज्या ओळी इथे दिल्यास त्या आजकाल सगळीकडे किती चपखल लागू होतात ते आपण पाहतोच आहोत.
रेवती
6 Apr 2010 - 8:49 pm | प्राजु
जबरदस्त आहे हा उतारा..
हे पुस्तक मिळवून वाचेनच.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
6 Apr 2010 - 10:09 pm | सुमीत भातखंडे
वाचायलाच हवं आता.
हा परिच्छेद इथे दिल्याबद्दल धन्यवाद
6 Apr 2010 - 10:40 pm | विकास
दुर्गाबाईंच्या आवडत्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे.
संपूर्ण महाभारत हे मोहीनी घालणारे काव्य/इतिहास वगैरे सर्वच आहे. तरूणपणी दारीद्र्याचे ओरखडे अनुभवणार्या ज्ञानी व्यक्तीचे देखील अंतिमतः काय होऊ शकते, हे द्रोण जेंव्हा कुरूक्षेत्रावर लढाई चालू होण्याआधी, शेवटचा आशिर्वाद घेयला आलेल्या युधिष्ठीराला, "अर्थस्य पुरूषो: दासः" या शब्दात सांगतात, त्यातून समजते. व्यासांनी सांगितलेले हे, चिरंतन सत्य देखील आजच्या काळात तितकेच लागून होते.
स्वतःच्या सेनाधिपत्याखाली शकुनी, दुर्योधन, दु:शासन, कर्ण, आणि स्वतःचा मुलगा अश्वत्थामा यांचे अभिमन्यू वधाच्या निमित्ताने अमानुष चाळे, जेंव्हा द्रोणाचार्य चालवून घेतात तेंव्हा धर्मयुद्ध संपून अधर्मयुद्धाला सुरवात होते आणि त्यांच्यातील गुरूची सर्वार्थाने शोकांतिका झालेली असते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
6 Apr 2010 - 10:51 pm | आनंदयात्री
तुम्ही जर देशभर फिरलात तर लक्षात येतं की, पुजाअर्चा, सणवार, व्रतवैकल्य तीच राहिली आहेत. वरवरचा थर बदलत रहातो पण मुळ तेच रहातं. हा बदल वरवरचा असतो. कोणी काही गोष्टी टाकुन देतो, पण त्यानं मुळ संस्कृतीत फरक पडत नाही. आज आपण म्हणतो की, लोक नास्तिक झालेत, पण नास्तिकता ही देखिल चार्वाकापासुनच नव्हे तर वेदकाळापासुन सुरु झाली आहे, म्हणजे पुर्वापारची नास्तिक परंपरा, ती संस्कृतीसुद्धा टिकुन राहिली आहे.
-
ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी (संस्कृतीच्या पाउलखुणा)
7 Apr 2010 - 8:26 am | sur_nair
मीही व्यासपर्व वाचलेलं नाही. पण इरावती कर्व्यांच 'युगांत' २-३ वेळा वाचलंय. महाभारतावरील त्यांचा अभ्यास व भाष्य अचाट आहे. आता हेही वाचायला हवं.
7 Apr 2010 - 10:22 am | निखिलचं शाईपेन
@बिपिनका धन्यवाद,
आता वाचेन हे आणि युगांत अल्सो धन्यवाद sur_nair
@आनंदयात्री आणि काहि असे उतारे मिळाले तर लिहित चला.
छानच.
-निखिल