"वेलकम वेलकम दोस्त. गेले दोन दिवस आम्ही तुमची वाट बघत आहोत. कुठे गायब कुठे झाला होतात मि. पॅपिलॉन??"
" हॅलो मि. वॉल्टर ! मी जरा 'अनटचेबल्स'चा पाहुणचार घेण्यात व्यग्र होतो !"
"स्मार्ट ! म्हणजे आता मला अ ब क पासून नक्कीच सुरुवात करावी लागणार नाही तर."
"नक्कीच नाही मि. वॉल्टर. एलिटला काय माझ्याकडून काय हवय आणी कस हवय ते मला आता माहिती आहेच; तेंव्हा आपण आता सरळ मुद्याकडे वळुयात का?"
"चालेल, मलाही लवकरात लवकर काम सुरु करायचेच आहे पॅपिलॉन."
"तुमची ऑफर ?? आणी मुख्य म्हणजे माझी सुरक्षितता ?"
"वेल पॅपिलॉन सुरक्षेची खात्री मी तुला आमच्याकडून १००% देउ शकतो ! उद्या तुझे नाव फुटलेच तरी तुला एखाद्या दुसर्या देशात संपुर्ण नविन कागदपत्रांसह, नविन ओळखीसह सेटल करणे हे आमचे वचन ! तु कुठल्याही सरकारी चौकशीत अडकणार देखील नाहिस, मात्र तु 'यु.एस' च्या हातला लागलास तर मात्र आम्ही काहिच करु शकणार नाही. शेवटी येवढा पैसा मिळवायचा तर रिस्क घ्यावीच लागणार !"
"हम्म्म ! प्रश्न पैशाचा नाही मि. वॉल्टर. तुमच्या ऑफरच्या १० पट ऑफर मला ऑलरेडी कबुल झाली आहे अनटचेबल्स कडून."
"इंट्रेस्टिंग ! आणी तुझी सुरक्षीतता ??"
"संपुर्ण सुरक्षीतता, ति देखिल सरकारी खात्याकडून."
"डबल क्रॉस ??"
"कधिच नाही. मला थेट अनटचेबल्स जॉईन करायची ऑफर आहे ! डबलक्रॉस करुन पैसे मिळवायची मला गरजही नाही आणी आवड त्याहुन नाही."
"अनटचेबल्स साठी तुला काय वर्क करायचे आहे पॅपिलॉन ?? आणी मुख्य म्हणजे कोणत्या सरकारसाठी ?"
"मला नक्की खात्री नाहिये मि. वॉल्टर, पण भवतेक मला गल्फ कंट्रिजच्या स्वतः स्थापन केलेल्या काही ऑइल्स कंपनीच्या डेटाबेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल असे वाटते."
"यु शुअर अजुन काही वेगळे आणी धोकादायक काम तुला सांगणार नाहित ??"
"मी अजुन माझा निर्णय कळवला नाहिये मि. वॉल्टर ! पण जर एलिट मला चांगली ऑफर देत असेल तर मी अनटचेबल्सचा विचार तरी का करावा ??"
"तुला काय अपेक्षीत आहे पॅपिलॉन ??"
"उम्म्म्म्मम माझ्या मते इंडीयन करंसी मध्ये २ कोटी पुष्कळ होतील माझ्यासाठी... आणी हो, अजुन २ कोटी मिळणार असतील तर मी माझा अभिमान बाजुला ठेवुन अनटचेबल्सला डबलक्रॉस करायला देखिल तयार आहे."
"तु अत्यंत विश्वासघातकी आणी निच माणूस आहेस पॅपिलॉन !"
"धन्यवाद मि. वॉल्टर. बाकी अनटचेबल्सच्या पार्टनर्सपैकी एक असलेला 'केन' मला बरबाद करण्यासाठी तुझी मदत करायला एका पायवर तयार होईल असे मला वाटते."
"कुल ! दोनच दिवसात तु शत्रु देखिल तयार करुन आलास तर."
"नाह, शत्रु नाही. मी फक्त माझ्यामागे परतिचे दार बंद होणार नाही ह्याची काळजी घेतलीये."
"तुला भेटायला बोलावुन मी माझ्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असे मला आता वाटायला लागलय पॅपिलॉन." वॉल्टर खदखदून हसत म्हणाला.
"एट युवर सर्विस सर ;) बाकी अनटचेबल्सला नेस्तनाबुत करायला तुम्हाला नक्किच आवडेल नाही का ?? अनटचेबल्सकडचा कामाचा ओघही आपसुकच एलिटकडे वळेल."
"निश्चीतच तसे होईल पॅपिलॉन. पण हे वाटते तेवढे सोपे नाही , फार फार धोका आहे त्यात."
"डोंट वरी मि. वॉल्टर, तुम्ही फक्त माझे डिल कबुल करा. पुढचे माझ्याकडे सोपवा."
"आणी तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कोणाकडे सोपवायचे?"
"आमच्याकडे पैशाचा देवीला लक्ष्मी म्हणतात ; तिच्याकडे द्या मला सोपवुन."
"हा हा हा.... केन बद्दल अजुन काही माहिती ?"
"पैसे कधी पर्यंत जमा होतील मि. वॉल्टर ?"
"हरामखोर आहेस तु !! वेट, मला एक फोन करु देत, तु सांगितलेल्या खात्यात ३० मिनिटात पैसे ट्रान्सफर होतील."
"धन्यवाद मि. वॉल्टर. मी तर फक्त तुमचे मन बघत होतो. पैसे मल हवेच आहेत, पण ते इथे नकोत. अजुन ४ दिवसांनी मला बोस्टन मध्ये ते मिळतील अशी व्यवस्था करा."
वॉल्टर तोंडाचा आ वासून माझ्याकडे बघतच राहिला.
"रिलॅक्स सर. बोस्टनमध्ये बसुन, अनटचेबल्सच्या सेट अप वरुन एलिटचे काम करता करता अनटचेबल्सला संपवायला किती मजा येईल ना??" मी मस्तपैकी डोळा मारत म्हणालो.
"तुला हे येवढे सोपे वाटते ??"
"जगात अवघड काहिच नाही मि. वॉल्टर ! फक्त तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न चालु ठेवले पाहिजेत."
"चार दिवसात तुला पैसे मिळतील. उद्यापर्यंत बोस्टनमध्ये असलेले आपले कॉन्टेक्टस, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हे सगळे तुला कळवण्यात येईल. अनटचेबल्स कडून सुटलास आणी जगला वाचलास तर पुन्हा भेटुच पॅपिलॉन.
(मुर्ख माणूस ! अनटचेबल्सचा हिसका कोणाला सांगत होता; तर मलाच. अरे मुर्ख माणसा, कालच अनटचेबल्सचा नविन बॉस म्हणुन पार्टी साजरी करुन आलोय मी !)
वॉल्टरचा निरोप घेउन मी बाहेर पडलो. फोन चालु करताच मिस्ड कॉल अॅलर्टनी १४ मिस्ड कॉल्सची यादी समोर फेकली. सारेच्या सारे
कॉलिंग कार्डसचे नंबर होते. मी काही वेळ शांत बसून राहिलो. मग मी माझ्या फोन मध्ये दुबईच्या कॉलिंग कार्ड वरुन डायनाचा नंबर डायल करायला सुरुवात केली.
"हाय स्विटी"
"जिझस ! कुठे होतास तु ? मी कधी पासून तुला ट्राय करत होते."
"तुझ्या आजुबाजुला आत्ता कोणी आहे ? असेल तर थोडे बाजुला एकांतत ये, मला काही महत्वाचे बोलायचे आहे."
"बेलाशक बोल मी आत्ता टेरेसवर एकटीच आहे."
"डायना मी अनटचेबल्सला भेटायला आलो होतो हि बातमी एलिटपर्यंत पोचली होती ! मी विमानतळाबाहेर पडताच अतिशय सभ्यपणे माझे अपहरण करण्यात आले."
"ओह्ह गॉड ! तु ठिक आहेस ना? त्यांनी तुला काहि केले तर नाही ना?"
"मी सुखरुप आहे आणी आता घरीच निघालो आहे. पण माझ्या जीवाला इथे धोका आहे. दोन दिवसात मला इथुन बोस्टनाला न्यायचा मार्ग काढ, तिकडे आलो की सविस्तर बोलणे होईलच."
"तु काळजी करु नकोस पॅपिलॉन. मी आजच सगळी व्यवस्था करते."
"नाही आजच नको ! मला दोन दिवस दे. हे प्रकरण कधी आणी कोणते वळण घेईल ह्याची शाश्वती नाही. मी दोन दिवसात आई वडीलांना आधी सुरक्षीत जागी हलवतो."
"गुड. ते योग्यच ठरेल."
"ठेवतो आता, बाय. आणी हो मला चुकीचे समजू नकोस डायना, पण केनच्या हालचालींवर पाळत ठेव आणी प्लिज येवढ्यात त्याला कुठल्याही महत्वाचा गोष्टीची माहिती देउ नकोस."
"पॅपिलॉन......"
"सॉरी डायना पण माझ्याकडे तसे पुरावे आहेत !"
"ओके ... मी काळजी घेईन. पण तु प्लिज लवकर ये, तुला बघितल्याशिवात आता मला चैन पडणार नाही."
डायनाला धिर देउन मी माझा कॉल संपवला आणी त्याचवेळी माझ्या दुसर्या मोबाईलनी कोकलायला सुरुवात केली....
"पॅपिलॉन ??"
"बोलतोय..."
"सर मार्क बोलतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मार्क-रॉबिन्सनच्या मॅनेजरची भेट घेतली. जर एलिट ग्रुप नामशेष होणार असेल तर लागेल ती मदत करायला तो एका पायावर तयार आहे. फारच मनाला लावून घेतलाय त्यानी नोकरी वरुन हाकलले जाणे."
"छान बातमी दिलीस मार्क, धन्यवाद. तु त्या मॅनेजरच्या संपर्कात रहा. मी ४/५ दिवसात बोस्टनला पोचलो की तुला कॉन्टेक्ट करीनच. चलो बाय."
आता दुसर्या कॉलींग कार्डवरुन मी माझ्या प्रिय हॅकर मित्राचा डेनिसचा नंबर फिरवला, डेनिस आजकाल त्याच्या सरकारसाठी इथिकल हॅकींगची कामे करायचा.
"हॅलो एग"
"कोण बोलतय ??"
"तुला एग नावानी हाक मारणारा अजुन कोण असु शकेल ? पॅपिलॉन बोलतोय"
"डॅम ! तु अजुन जिवंत आहेस का? मला वाटले एलिट आणी अनटचेबल्सच्या साठमारीत आपले जीवन कधिच संपले असेल."
"यु विश ! माझ्या कामाचे काय झाले?"
"मी पुर्ण प्रयत्न करतोय. पण अजुनही काही प्रमुख अधिकारी नाना शंका उपस्थीत करत आहेत."
"कमॉन एग. येवढी चांगली ऑफर तुमच्या रशीयाला कधी वर्ल्ड बँकेनी देखील दिली नसेल ! एकाच वेळी "यु एस, चायना आणी आखाती देशांच्या ऑईल कंपन्यांचा संपुर्ण डाटाबेस घर बसल्या मिळतोय तुम्हाला ! वर एलिट आणी अनटचेबल्स सारख्या ग्रुपसना संपवल्याचे फुकटचे पुण्य वेगळेच; आणी त्याबदल्यात मला फक्त हवय ते रशियन नागरीकत्व, 'केजीबी'ची मदत आणी एफ बी आय पासून संरक्षण....."
(क्रमशः)
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 2:21 pm | अस्मी
सॉल्लिड...अमेझिंग :) :)
:W पुढच भाग असाच लवकर टाका pls
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
30 Mar 2010 - 3:52 pm | satish kulkarni
एक्दम जबराट....
येउ...दे.....
(सु.शि., गुरुनाथ नाइक यान्च्या रहस्य कथान्चा पन्खा)
30 Mar 2010 - 3:58 pm | Dipankar
सहि आहे पुढील भागाची वाट पहातो आहे
30 Mar 2010 - 4:13 pm | अनिल हटेला
वाचतोये राजे........:)
कथा मस्त वेग घेतेय.....
पू भा प्र......:)
बैलोबा चायनीजकर !!!
:D
30 Mar 2010 - 4:40 pm | स्वाती दिनेश
थरार वाढतो आहे ,परा , स्टँडर्ड आतापर्यंत मस्त मेंटेंन्ड ठेवले आहेस, गो अहेड..
स्वाती
30 Mar 2010 - 5:29 pm | स्वानन्द
याने तर थर्ड मारला!!
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
30 Mar 2010 - 5:38 pm | मीनल
वाचते आहे .
मग पुढे काय होतं?
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
30 Mar 2010 - 5:41 pm | विशाल कुलकर्णी
अबाबाबा आता डोळे फिराया लागले की राव !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
30 Mar 2010 - 7:12 pm | पिंगू
पुढील भाग लवकर आण रे!!!!!!!
30 Mar 2010 - 7:22 pm | प्रभो
अरे भाड्या, त्या विशल्या (कुलकर्णी) कडून शिक काहीतरी आणी मोठे भाग टाक.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
30 Mar 2010 - 7:26 pm | रेवती
वाचतीये.
रेवती
1 Apr 2010 - 4:18 pm | ४ऊ दत्त
वाचतोय! येऊ द्या लवकर!