अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
27 Mar 2010 - 5:20 pm

अगत्यार जीव नाडी कथा भाग ६वा
जीव नाडी वाचक हनुमत दासन यांची परीक्षा

मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?.

एकदा एक बाई आपल्या बहिणीला बरोबर घेऊन आली. तिला मूत्रपिंडाचा त्रास होता. दोन्ही किडन्या बाद झाल्या होत्या. २६ वर्षांची ती बारीक वाळूनकोळ १२ वर्षांची वाटत होती. म्हणाली, 'सर्व उपाय झाले. आता माझी बहीण वाचेल का हे विचारायला आलो आहोत'.
हनुमत दासननी विचारले, 'किती वर्षे झाली त्रास व्हायला लागून? ती म्हणाली, 'दीड वर्ष. ती विवाहित आहे. हा आजार झाल्यापासून नवऱ्याने सोडून दिले आमच्या घरी, माहेरी ती राहाते. तो एकदाही घरी भेटायला आला नाही. ती कॉलेजात होती तेंव्हापासून प्रेम झाले. आम्ही विवाह करून दिला. आता मात्र त्याने तोंड फिरवले. अगदी मंगळसूत्रासकट सर्व विकून तिची सेवा चालू आहे. आम्ही तरी किती सहन करणार? आमचे संसार आहेत. काही उपाय आहे का?'

दासननी जीव नाडी वाचून सांगितले, ‘तिला एका अनोळखी व्यक्तीची किडनी मिळून ती बरी होईल. काळजी नको. ती जीवंत राहील.’ जीव नाडीतील उल्लेख त्रोटक होता. म्हणून त्यांनी तो तीन-तीनदा वाचून पाहिला. त्यांनाही बुचकळ्यात पडायला झाले की त्या बाईची परिस्थिती इतकी वाईट होती की आता दगते की मरता असे वाटत होते. तिला सांगावे तरी कसे कि ती वाचेल म्हणून. कारण अगत्यार फक्त म्हणतात की ती वाचेल पण तिला कोणाची किडनी मिळेल हे ते सांगत नाहीत. त्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील की ती कोण दान करेल याबद्दल बोलत नाहीत.
हे सर्व मनात चालले असताना ते त्या बायकांना वरवर बोलायचे म्हणून म्हणाले, 'काळजी नको. किडनी ट्रान्सप्लांटेशनसाठी मिळेल.'
त्या बायकांना ही यामुळे दिलासा मिळाला व त्या अगत्यारांचे आभार मानून निघून गेल्या.
चार महिन्यांनी....
त्या दिवशी हनुमत दासनना काही विचित्र वाटत होते. कारण त्या दिवशी जी वाचने झाली त्यातून त्यांचे समाधान होत नव्हते. असेच वाचन चालू करणार अशा वेळी पुर्वीच्या त्या दोघी बहिणीपैकी एकीचे आगमन झाले. त्यांची विचारपूस करताना कळले की दोन महिन्यापूर्वी तिचे किडनीचे ऑपरेशन झाले. ते सांगायला त्या आली होती. म्हणाली, 'तिच्यासाठी किडनी मिळावी म्हणून आम्ही वर्तमानपत्रात जाहिरात द्यायला जात असताना तिच्या पतीची बहीण गाठ पडली. तिला सर्व सांगितले. तिने गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधे नेले. तेथील डॉक्टरांनी तिचे ऑपरेशन लवकरच करू, मात्र जुळणाऱ्या किडनी साठी थांबावे लागेल म्हणून सांगितले. दिवस पुढे सरकत होते. आम्ही अगस्त्य महर्षींची प्रार्थना करता होतो. आमची खात्री होती की महर्षींचा शब्द चुकणार नाही. सहाव्यादिवशी एका अपघाती मृत्यूच्या पेशंटला आणले गेले. त्याची किडनी बरोबर जुळणारी होती. त्याच्या नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या....

सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’
‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?....
लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ...
जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’

या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे....

वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.

(क्रमशः) -----------------

संस्कृतीज्योतिषआस्वादअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

27 Mar 2010 - 5:30 pm | चित्रगुप्त

झालो बुवा थक्क...
येउद्या आणखी अशी कथने......
या अगत्यार नाडी विषयी मुळातील माहिती कुठे वाचायची?

अगत्यार किंवा (अगस्त्य) जीव नाडीचे वाचन श्री.हनुमत दासन वडपळणी भागातील केंद्रातून करत असतात. त्यांच्या जीव नाडीवाचनात आलेले काही अनुभव, किस्से "दिनतंती" नावाच्या तमिळ साप्ताहिकातून वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. त्याचे स्वैर भाषांतर श्री.विश्वनाथ गोपी करतात. मराठी वाचकांना त्यातील काही अनुभवांची ओळख करून देणे हा य़ा लेखाचा उद्देश आहे. त्या अनुरोधाने नाडी ग्रंथ भविष्याची सामान्य ओळख करून देऊन नाडी लेखनकर्त्या महर्षींचा भविष्य लेखनामागील उद्देश स्पष्ट करण्याचे कार्यही घडेल.

नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

II विकास II's picture

27 Mar 2010 - 5:45 pm | II विकास II

>>वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.
येउद्या अजुन, वाचतो आहे.

----

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट.
योग्य बोली सह संपर्क करावा.

नंदू's picture

27 Mar 2010 - 7:22 pm | नंदू

ही ष्टोरी पण लई ब्येष्ट. तुमच्या प्रतिभेला सलाम...!!
अजुन येउद्या.

नाडीकथा प्रेमी,

नंदू

When rape is inevitable, enjoy it.

शशिकांत ओक's picture

27 Mar 2010 - 7:10 pm | शशिकांत ओक

--- सनल एडामारुकु यांचा एका टीव्ही चॅनेलवर ज्योतिषांची परीक्षा घेण्याचा कार्यक्रम झाला होता. त्यावर अन्य ठिकाणी उत्पन्न धाग्या वर काही प्रतिक्रिया आल्या. पैकी एक होती...

तिकडे करड्या अक्षरातल्या साहेबांची यथेच्छ थट्टा चालू आहे. (मालक त्यांना चावी मारतात). पण त्यांचे दळण चालू असते. नवीन नवीन सुरस आणि चमत्कारिक गोष्टींचे.

.... प्रियालींनी तेथे आपले मत प्रदर्शित केले की .... केवळ हिप्नोटिझममुळे (जसा) हा पुनर्जन्म आहे असे सिद्ध होत नाही असे वाटते. त्यासाठी केस बाय केस अधिक संशोधन करावे लागेल. ही केस पर्सनॅलिटी डिसऑर्डरची आहे का हे तपासणेही योग्य ठरेल. मुख्य म्हणजे केवळ एका तज्ज्ञाच्या तपासणीवरून निष्कर्ष काढणे घाईचे वाटते आणि तसेही, असे प्रयोग सिद्धतेची पातळी कधीच गाठत नाहीत कारण मग हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न बनतो. विश्वास ठेवणारे लहानशा प्रयोगावरून ठेवतील आणि न ठेवणारे अनेक प्रयोगांनंतरही ठेवणार नाहीत. अशा प्रयोगांत खुसपटे काढून दोन्ही बाजू आपापले मुद्दे रेटत राहतात. तेव्हा, आपल्याला पटत असल्यास विश्वास ठेवावा हेच खरे.

त्या पुढे लिहितात... अशाच प्रकारचा (पुनर्जन्माचा - कंस माझे) किस्सा उत्तरा हुद्दार यांचा होता. पक्ष आणि प्रतिपक्ष यांनी इतके ढोबळ मुद्दे मांडले की मूळ व्यक्तिची त्यात उगीच होरपळ झाली असावी असे वाटते. या केसमध्येही मुद्दे खोडून काढणारे स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते परंतु आपली श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले.

प्रियालींचे त्या धाग्याच्या बाबतचे मत नाडी ग्रंथांना ही तितकेच चपखलपणे फिट होते. म्हणून ते ओढून इथे डकवले आहे.
जसे प्रा. उत्तरा हुद्दारांच्या क्लासिक पुनर्जन्माच्या केसमधे मुद्दे खोडून काढणारे (बुद्धिवादी) स्वतः उठून काहीच संशोधन करत नव्हते मात्र (आपली नाडी ग्रंथांवरील)श्रद्धा अबाधित राखण्यासाठी "छट! असे काही घडतच नाही." असे म्हटले की झाले. असे मत झाडून मोकळे होतात.

करड्या अक्षरातल्या (विंग कमांडर)साहेबांनी कोणत्याही संस्थेचे / व्यक्तीचे आव्हान घेतल्याचे माझ्या ऐकण्यात अगर वाचनात नाहि (खर्रेखुर्रे बरं का त्यांच्याच गोष्टीतले नव्हे ;) ) असल्यास निकाल जाणण्यास उत्सुक आहे

साहेबांनी अंनिसला आव्हान देण्याचा वा घेण्याचा प्रश्न पुर्वी नव्हता व आज ही नाही. नाडी ग्रंथ थोतांड आहेत असे म्हणणाऱ्यांनी ते कसे थोतांड आहेत हे सिद्ध करायचे आहे. त्यांनी आधी जे पुरावे सादर केले होते त्यांना समर्पक उत्तरे देऊन ते सर्व आक्षेप खोटे व बिनबुडाचे असल्याने तो निकाल नाडी ग्रंथांच्या बाजूने आधीच लागला आहे. आता त्याला संबंधित लोक दुर्लक्षुन टाळतात "छट! असे काही घडतच नाही." असे मत झाडून मोकळे होतात वा तेच तेच जुने आक्षेप उगाळत बसतात इतकेच. संदर्भासाठी वाचा - नाडीग्रंथ भविष्याने केला अंनिसचा पराभव - उर्फ बोध अंध श्रद्धेचा हा ग्रंथ.
प्रियालींचा हा प्रतिसाद नाडीला उद्देशून नसला तरी तो नाडीग्रंथांना ही तितकाच लागू ठरतो म्हणून वापरला. मिपा मालकांचा उल्लेख आला म्हणून इथे डकवला इतकेच.
नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/
शशिकांत

नितिन थत्ते's picture

28 Mar 2010 - 10:11 am | नितिन थत्ते

लोकांना करड्या अक्षरातील साहेब म्हणजे काहीच कळणार नाही म्हणून हा संदर्भ.

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

संजा's picture

27 Mar 2010 - 8:07 pm | संजा

माननीय शशीकांत ओक साहेब,
आपला लेख वाचला आणि खरच भारावुन गेलो. आपणास प्रार्थना आहे की कोणत्याही टीके कडे दुर्लक्श करून लीहीत रहा त्यामूळे आम्हासारख्याच्या ज्ञानात खुप चांगली भर पडेल.
पूढील लेखासाठी शुभेच्छा.

संजा

प्रमोद देव's picture

27 Mar 2010 - 8:56 pm | प्रमोद देव

मस्त वाटतंय वाचतांना...विश्वास असो अथवा नसो....कथा मात्र खूप रंजक आहेत.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2010 - 9:34 am | विसोबा खेचर

ओक साहेब जिंदाबाद..

ओकसाहेब, तुम्ही तुमच्या नाड्यांनी सार्‍या विरोधकांचे गळे साफ आवळलेत! :)

तात्या.

तिमा's picture

28 Mar 2010 - 4:54 pm | तिमा

नाडीच काय, अशा अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात. त्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा तुमच्या स्वतःच्या बुध्दीवर तुमचा विश्वास आहे की नाही यावर अवलंबून आहे.
तोपर्यंत नाडी, धागे, कफन्या यांनी तुमचे गळे आवळून घ्यावे!
आ बैल मुझे मार!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

संजा's picture

29 Mar 2010 - 2:53 pm | संजा

अनेक पंथाचे लोक आपल्या प्रसिध्दीसाठी अशा कथा प्रसूत करतच असतात
अपप्रचारी व अविवेकी विधान. ज्यांना विश्वास ठेवायचा आहे ते ठेवतीलच यात शंका नाही.
इतरांच्या योग्यते बाबत आपण शंका न घेणे ऊचित ठरेल.

संजा

ऋषिकेश's picture

28 Mar 2010 - 11:20 am | ऋषिकेश

वाचकांची इच्छा असेल तर थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.

माझी अजिबात इच्छा नाहि.
अश्या अफवा पसरविण्यासाठी मिसळपावचा दुरूपयोग होऊ नये असे वाटते.

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

विसोबा खेचर's picture

28 Mar 2010 - 11:52 am | विसोबा खेचर

अरे त्या 'अफवा' म्हणूनच वाचायच्या! :)

तिमा's picture

28 Mar 2010 - 4:59 pm | तिमा

इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

इथे दुसर्‍यांच्या अफवांची जाहिरात करुन मिळेल.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

तिमा's picture

28 Mar 2010 - 4:56 pm | तिमा

तात्या,
अफवा हा शब्द अफू वरुन आला आहे का ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

चित्रगुप्त's picture

28 Mar 2010 - 5:22 pm | चित्रगुप्त

अगदी नवीन वाचकांसाठी नाडी विषयी प्राथमिक माहिती आपल्या मायभाषेत द्यावीत, असे वाटते. उदाहरणार्थः

१. नाडी म्हणजे काय? याचे किती प्रकार आहेत?
२. भारतात कुठकुठे उपलब्ध आहेत?
३. प्राचीन ग्रंथ, वेद, पुराणे, महाभारत वगैरेत याबद्दल काय उल्लेख आहेत?
४. भारताबाहेरील इतर संस्कृतींमध्ये याप्रकारचे काही ग्रंथ आहेत का? कोणते?
५. जगातील प्रत्येक व्यक्तीची नाडी पट्टी असते का? नसल्यास कुणाकुणाच्या असतात?
६. कुंडली द्वारे सांगितले जाणारे भविष्य आणि नाडी द्वारे सांगितले जाणारे भविष्य, यात कोणते फरक वा साम्ये असतात?

बहिरुपी's picture

18 Jun 2014 - 1:13 pm | बहिरुपी

ओकसाहेब, नाडी विषयी प्राथमिक माहिती जरुर येवु द्यात.

शशिकांत ओक's picture

18 Jun 2014 - 8:29 pm | शशिकांत ओक

अनेक धागे उपस्थित आहेत ते धुंडाळावेत
या क्लिपमधून प्राथमिक माहिती समजून घेता येईल.
पुर्वाचे धागे सापडत नसतील तर नंतर देता येतील.

मीनल's picture

28 Mar 2010 - 6:53 pm | मीनल

मी वाचते आहे.
पण स्वतः अनुभव घेतल्यावर विश्वास ठेवयचा की नाही ती मी ठरवेन.
अनुभव घ्यायला आवडेल. मजा म्हणून नाही किंवा खरे खोटे पडताळून पहाण्यासाठी ही नाही. तर गत/भविष्यजन्मा विषयी जाणून घेण्यासाठी.

माग एक दोन वेळा गतजन्मा विषयी स्वप्म पडली होती. मी ती स्वप्नच मानते तरी हे ती लक्षात मात्र अचूक राहिली आहेत.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

चित्रगुप्त's picture

17 Jun 2014 - 11:58 pm | चित्रगुप्त

थक्क करणारी आणखी कथने सादर करता येतील.

अलिकडील हा नवा धागा यापैकीच म्हणायचा का ?

शशिकांत ओक's picture

18 Jun 2014 - 12:35 am | शशिकांत ओक

नातेवाईकांच्या संमतीने ते ऑपरेशन यशस्वी झाले. आता ती हळूहळू पुर्ण बरी झाली आहे. तेच सांगायला आलेय की अगत्यारांचे शब्द अगदी सत्य ठरले.' त्या गेल्या....

सर्व ऐकून दासनी जीव नाडी वाचायला सुरवात केली. त्यात मजकूर होता... ‘अरे, मी एक वेळ दुःखाच्या काळात आवेगाने कोणी कोणी मला दूषणे देतात. झटपट बरे वाटणारे काही उपाय मी सुचवले नाहीत तर रागावतात, रुसतात, अशा लोकांचे वागणे समजू शकतो. कारण त्यांच्या मनस्थितीचा तो भाग असतो.’
‘पण मी तुला क्षमा करु शकत नाही. कारण अजूनही तुझ्या मनात मी जे म्हणतो ते कसे शक्य आहे या शंकेची पाल चुकचुकते? आज इतक्या काळानंतर तू असे कसे समजतोस? मी तर तुला माझा पुत्र मानतो आणि तू माझ्यावर अविश्वास दाखवतोस?....
लक्षात ठेव आज पासून २७ दिवस हे वाचन बंद राहील. ताडपट्टीतील मजकूर तुझ्यापासून अदृष्य राहील. ...
जर कार्तिकेयाच्या सहा मंदिरांतील (अरिपाडई वीडू - मुरुगेशाची सहा घरे) ज्या माझ्या मूर्ती स्थापित आहेत त्या प्रत्येकांना १०८ वेळा साष्टांग नमस्कार घालून आला नाहीस तर मी तुला पुन्हा भेटणार नाही. मी या ताडपट्ट्यातून कायमचा अदृष्य झालेला असेन…’

या शब्दात दासनना अगत्यारांनी शिक्षा सुनावली. मात्र त्यामुळे हनुमान दासनांचा श्रद्धाभाव व्दिगुणित झाला. सांगितलेल्या मंदिरात त्यांनी १०८ साष्टांग नमस्कार घालून कान पकडून क्षमायाचना केली. पुढे २७ दिवसांनी ताडपत्रातील मजकूर पुन्हा दृष्टीला पडू लागला. तो आज तागायत चालू आहे....

कथन थक्क करणारे असेले तरी सा. तांदळेची केस वरील धाग्याच्या बाबतीतील नाडी ग्रंथावर आधारित नाही.( सा तादळे च्या भेटीच्या अनेक महिन्यांच्या अंतरालाने माझी नाडी ग्रंथांची ओळख झाली)हनुमत दासन जींना त्या कथनात महर्षींचा रोष ओढवून घ्यावा लागला होता. शिवाय किडनीचे ऑपरेशन करून पेशंट बरा झाला दैवी उपायांनी नाही...

शशिकांत ओक's picture

19 Jun 2014 - 1:46 am | शशिकांत ओक

मुक्त विहारिजी आपले...

मुक्त विहारि's picture

19 Jun 2014 - 9:20 am | मुक्त विहारि

पुढचे भाग कधी?

कोणी काही म्हणोत मला तर आवडले सर्व लेख.