गुणीदास पं जगन्नाथबुवा पुरोहित. हिंदुस्थानी गायकीतलं, आग्रा गायकीतलं, बंदिशीच्या दुनीयेतलं, तबलावादनातलं एक मोठं नांव. पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, मणिक वर्मा, पं रामभाऊ मराठे, पं भाई गायतोंडे यांसारख्या दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा!
कठोर परिश्रम करून गाण्यावर हुकुमत मिळवलेले जगन्नाथबुवा!
'हम्म! जितेंद्र अभिषेकी गाणं शिकायला सकाळी सात वाजता यायचे आहेत ना?' मग स्वत: पावणेसात वाजताच तानपुरा गवसणीतून काढून, सतरंजी वगैरे घालून तयार राहणारे करड्या शिस्तीचे गुरू जगन्नाथबुवा!
"छे! हा शिरा काही खरा नाही! थांब मी शिकवतो तुला.." असं म्हणून अत्यंत हौशीने परंतु तेवढ्याच निगुतीने उत्तम गोडाचा शिरा कसा बनवावा, याचं माणिक वर्मांना प्रात्यक्षिक करून दाखवणारे बल्लवाचार्य जगन्नाथबुवा!
स्वत:चं मोठेपण विसरून, गुरूपण विसरून भीनसेन अण्णांच्या एखाद्या तोडीला साश्रू नयनाने दाद देणारे गुणग्राही जगन्नाथबुवा! "बुवा, माझं गाणं आपल्याला आवडलं, यातच सगळं भरून पावलं!" असं भीनसेनअण्णांनी म्हटल्यावर कुठलाही अभिमान न बाळगता उलटपक्षी किंचित अवघडून जाणारे जगन्नाथबुवा!
दिवाळीचेच दिवस होते. बुवांची प्रकृति जरा नरम होती. बुवा डोंबिवलीला आपली मानसकन्या लीला करंबेळकर यांच्या घरी मुक्कामाला होते. धनतेरसची संध्याकाळ. बुवा तसे करड्या शिस्तीचे पण प्रत्येक गोष्टीची हौस मात्र दांडगी. बुवा एकदम मुलीला आणि जावयाला म्हणाले, "हे काय, दिवाळी आहे ना? जा मस्तपैकी फटाके वगैरे आणा. वाजवूया तरी!"
"नको हो बुवा. आपली तब्येत बरी नाही ना.."
"छे छे! काही होत नाही मला. तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता बाजारात जा. मिठाई आणा, फटाके आणा. अगदी दणक्यात दिवाळी साजरी करूया!" बुवा हसून म्हणाले.
एवढं म्हणातात न म्हणतात तोच बुवांनी अखेरचा श्वास घेतला. एक मोठा गुरू, एक मोठा बंदिशकार क्षणात नाहीसा झाला होता. ऐन दिवाळीत अंधारून आलं होतं!
आज मिपा परिवातर्फे बुवांना ही लहानशी आदरांजली..!
माणिक वर्मा. सात्विक आवाजाच्या, निकोप आवाजाच्या अतिशय गुणी गायिका. बुवांच्याच शिष्या. राग जोगकंस. बुवांचीच निर्मिती. बंदिशही बुवांचीच. शब्द आहेत,
"पीर पराई जाने नही बालमवा..
प्राणपिया तुम ऐसे निठूर भयो
दासगुणी आस गवाई.." (येथे ऐका)
माणिकताईंचं सुंदर गाणं, सोबत व्ही जी जोगांची व्हायलीनवरील एखाद्या सावलीसारखी पाठराखण करणारी सुंदर साथसंगत!
काही अक्षरं रेषेवरची असतात, काही सूर शब्दातीत असतात, तर काही माणसं गगनाइतकी उत्तुंग असतात. आमचे जगन्नाथबुवा त्यातलेच!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
16 Oct 2009 - 3:37 pm | llपुण्याचे पेशवेll
जगन्नाथबुवा पुरोहीत यांच्या सारख्या कलाकाराची ओळख करुन दिल्याबद्दल तात्याचे आभार मानवे तितके कमीच.
अवांतरः धनतेरस म्हणजे मराठीत धनत्रयोदशी म्हणतात तीच का?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
17 Oct 2009 - 12:51 pm | आण्णा चिंबोरी
अरे माझ्या राजा धनतेरस हा मराठीच शब्द आहे.
बहुजनसमाजाच्या मराठीत बारस, तेरस, चावदस, आमुशा असे असते. सदाशिव पेठ पुणे ३० मध्ये बोलतात फक्त तीच मराठी असते असे नाही.
आदरणीय, प्रातःस्मरणीय, वंदनीय, पूजनीय संपादक महाशय येथे जातीयवाद वगैरे काही नाही. श्री. पेशवे यांच्या शंकेला फक्त उत्तर दिले आहे.
बोळा, दाणा, पाणी असले अश्लील प्रतिसाद, उमेदवार वगैरे द्वयर्थी लेखन जरा उडवा. माझे निरुपद्रवी प्रतिसाद उडवून तुम्हाला काय मिळणार आहे?
18 Oct 2009 - 8:03 am | llपुण्याचे पेशवेll
सदाशिव पेठ पुणे ३० मध्ये बोलतात फक्त तीच मराठी असते असे नाही.
अरे आण्णा, पुणे ३० मधे रहायला मिळालं नाही म्हणून जळफळू नको रे, नसतं तेवढं सगळ्यांचं भाग्यं थोर. तुम्ही काय बहुजन समाजाचे ठेकेदार आहात असे वाटतं का?
बहुजन समाजात वारकरी वर्गात अगदी एकद्शी, द्वादशी, त्रेदोशी असेच म्हणतात. उगाच काहीतरी बिलं बहुजन समाजाच्या नावावर फाडू नका.
बोळा, दाणा, पाणी असले अश्लील प्रतिसाद, उमेदवार वगैरे द्वयर्थी लेखन जरा उडवा. माझे निरुपद्रवी प्रतिसाद उडवून तुम्हाला काय मिळणार आहे?
का तुम्ही मालक आहात काय?
पुण्याचे पेशवे
18 Oct 2009 - 8:43 am | आण्णा चिंबोरी
कारण नसताना स्पष्टीकरण न देणं, म्हणजे ठेवलेला आरोप नकळत मान्य करणंच आहे. तसलं काही मी करणार नाही.
याउलट मी स्पष्ट दिलेली उत्तरे उडवून लावली आहेत. एक विनंती. पेशवे यांचा पहिला प्रतिसाद व माझा नंतर आलेला प्रतिसादही उडवून लावावा अन्यथा मी आरोप मान्य करुन गप्प राहिलो असा वाचकांचा गैरसमज होईल.
रेषेवरच्या संपादकांच्या योग्यायोग्य वर्तनाबाबत इतरत्र चर्चा सुरु असताना होणारा हा प्रकार गमतीशीर आहे.
16 Oct 2009 - 4:05 pm | श्रावण मोडक
बुवा, माणिक वर्मा, जोग... आपण काही लिहूच नये!
अवांतर: या श्रद्धांजलीत 'काही अक्षरं रेषेवरची असतात' हे कशासाठी? शब्दातीत सूर आणि गगनाइतकी उत्तुंग माणसं यांच्याबरोबरीनं रेषेवरची अक्षरं? रेषेवरची अक्षरं म्हणजे काय? उगाच काहीही, यातून केवळ जळजळ दिसते! ते शब्द संपादित केलेत तर हा प्रतिसादही संपादित करा!!!
16 Oct 2009 - 4:24 pm | निखिल देशपांडे
प्रतिसादाशी आणी अवांतराशीही...
बाकी बुवांबद्दल बोलायची लायकी नाहिएच
एवढ्या चांगल्या लेखात त्या शब्दांची गरज नव्हती
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
16 Oct 2009 - 4:46 pm | दशानन
श्रामो शी सहमत आहे.....
16 Oct 2009 - 7:03 pm | सखाराम_गटणे™
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
16 Oct 2009 - 4:27 pm | विसोबा खेचर
का? जसे सूर, जशी माणसं तशीच अक्षरंही!
असहमत असलो तरी आपल्या मताचा मी आदर करतो..
कुठलेच संपादन होणार नाही. मला जे योग्य वाटलं ते मी लिहिलं, तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही लिहिलंत. विषय मिटला!
धन्यवाद,
तात्या.
16 Oct 2009 - 4:50 pm | llपुण्याचे पेशवेll
तात्या,
मी ही आपल्या मताशी असहमत आहे व मी ही आपल्या मताचा आदर करतो.
असहमत असलो तरी मताचा आदर करणं हा खरोखरच स्तुत्य बदल आहे.
पुण्याचे पेशवे
16 Oct 2009 - 4:53 pm | विसोबा खेचर
हा हा हा! :)
अरे सहज काडी टाकून पाहिली! बघुया कोण कोण मंडळी त्या काडीने पेटतात ते! ;)
तात्या.
16 Oct 2009 - 4:56 pm | दशानन
विझवणार कोण आग मग ;)
16 Oct 2009 - 4:58 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. आम्ही पण चुपक्रमी प्रतिसाद ल्ह्याला शिकलो आहोत. :)
चुपक्रमी प्रतिसादाला चुपक्रमी उत्तर.
(बिडीविनाच काडी वाया गेली म्हणून दु:खी)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
16 Oct 2009 - 6:53 pm | सखाराम_गटणे™
खेचरकाका उर्फ तात्या उर्फ उर्फ आणिबाणिचा शासनकर्ता उर्फ सरपंच उर्फ मिपामालक उर्फ मिपाचालक उर्फ .......
>>अरे सहज काडी टाकून पाहिली! बघुया कोण कोण मंडळी त्या काडीने पेटतात ते!
हे बरे आहे.
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
16 Oct 2009 - 5:27 pm | श्रावण मोडक
काहीही संपादन न करण्याच्या निर्णयाचे स्वागत.
पांढऱ्यावर काळं असणं केव्हाही चांगलंच! :)
16 Oct 2009 - 5:29 pm | दशानन
सहमत आहे....
*
च्यामायला आमची गाडी सहमत वरच अडकली आहे आज ;)
16 Oct 2009 - 4:08 pm | चिंतामणराव
धन्यवाद तात्यासाहेब.
बुवांची आठवण आणि त्याबरोबरच ज्यांच्या गाण्यावर आमच्या पिडिचे कान तयार झाले अश्या एकाहुन एक मातब्बर गायकांची आठवण. दिवाळीची सुरवात सुरेल झाली.
बुवांसारख्या गुरुंना लागु होते अशी एक संकल्पना आहे.
परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं . पण पंडितजींसारखे परीस आणखी परीस निरर्माण करतात आणी त्यांचे शिश्य पुडे सोन्यासारखे शिश्य तयार करतात आणि ऐकणार्याचे कान सोन्याचे करतात.
पुन्हा एकदा धन्यवाद
शुभ दीपावली
16 Oct 2009 - 5:11 pm | विसोबा खेचर
लेखाचा मुख्य गाभा समजून घेऊन मनमोकळी दाद दिल्याबद्दल धन्यवाद चिंतामणराव!
आपल्यालाही शुभ दिपावली.. :)
तात्या.
16 Oct 2009 - 5:32 pm | विसोबा खेचर
लीलाताई करंबेळकरांविषयी -
लीलाताई ह्या जगन्नाथबुवांच्या शिष्या तसेच मानसकन्याही. बुवा आधी कोल्हापुरात होते, त्यानंतर मुंबैत दादरला राहायला आले. दुर्दैवाने बुवांचं निधन लीलाताईंच्या घरी झालं. त्या वर्षानंतर आपल्या गुरुंना श्रद्धांजली म्हणून लीलाताई आणि त्यांचे यजमान दोघे मिळून त्यांच्या डोंबिवलीच्या राहत्या घरी दरवर्षी एखाद्या चांगल्या गुणी गायकाचं/गायिकेचं गाणं करत असत. अगदी न चुकता!
आणि हा उपक्रम एक-दोन वर्ष नव्हे तर अखंड २५ वर्ष चालला! जेव्हा त्या पती-पत्नींनी डोंबिवली सोडून सातारला स्थायिक व्हायचं ठरवलं त्या वर्षी एका मोठ्या सभागृहात दोन दिवसांचं एक समारोपाचं/निरोपाचं संगीत संमेलनच त्यांनी साजरं केलं. शिकाऊ/नवख्या कलाकारापासून ते अगदी अभिषेकीबुवा/काणेबुवांसारख्या दिग्गजांनी त्या संगीत संमेलनात आवर्जून हजेरी लावली आणि २५ वर्षांचं ते सांगितिक उद्यापन पार पडलं!
तात्या.
16 Oct 2009 - 6:46 pm | अन्वय
ह्रद्य आठवण तात्या.
समर्पण म्हणतात ते हेच
कुणा येर्या गबाळ्याचे हे काम नव्हे
16 Oct 2009 - 5:39 pm | मदनबाण
छान लेख...
आत्ताच गाणे ऐकले,,, मस्त वाटलं... :)
(रेषेवरची अक्षरे जिथे संपतात तिथे रौशनी सुरू होते! ... कधी मिळाणार बरं वाचायला ??? :? )
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
Why shoot the messenger?
http://chellaney.spaces.live.com/blog/cns!4913C7C8A2EA4A30!1118.entry
16 Oct 2009 - 5:53 pm | अवलिया
तात्या
सुरेख लेख.
अक्षरे रेघेच्या वर असतात की खालती हे न समजणा-या माझ्या सारख्या धुळपाटीवर लिहिणा-या माणसासाठी (!) आदर्श लेख.
जियो ! तात्या जियो !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
16 Oct 2009 - 6:40 pm | निमीत्त मात्र
'पीर पराई' म्हंटलं की मला 'वैष्णव जन तो' आठवतं. त्यामुळं शिर्षक बघून एकदम वाटलं तात्यासाहेब गांधींवर दिवाळी निमित्त आणखी एक रॉकेट सोडतायत की काय?
16 Oct 2009 - 6:42 pm | अन्वय
तात्या, खरेच काही अक्षरे रेषेवरची असतात.
आपल्या विधानाशी सहमत.
जगन्नाथबुवांचा छोटेखानी परिचय करून दिल्याबद्दल
धन्यवाद
16 Oct 2009 - 6:55 pm | स्वाती२
सुरेख लेख तात्या. गाण्याच्या दुव्याबद्दल धन्यवाद.
17 Oct 2009 - 6:22 am | सुबक ठेंगणी
सुंदर लेख आणि माणिकबाईंचा आवाज ऐकून दिवाळीची पहाट छान सुरेल झाली.
16 Oct 2009 - 8:34 pm | प्राजु
आवडला लेख.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
17 Oct 2009 - 4:15 am | लवंगी
असच म्हणते
16 Oct 2009 - 8:40 pm | प्रमोद देव
Get this widget | Track details | eSnips Social DNA
बुवांनी गायलेल्या 'शिवमत भैरव'ची ही एक झलक.
ध्वनीमुद्रण खूप जुनं आहे. त्यामुळे त्यात खरखर जाणवते. तरीही बुवा ही काय चीज होते....हे तरी ऐकता येईल. हेही नसे थोडके.
17 Oct 2009 - 10:44 am | सहज
बुवा गायनाबरोबर तबलावादनातही नाव कमावुन होते म्हणजे जणू ऑलराउंडर खेळाडूच की!
दोन्ही दुवे सही!
16 Oct 2009 - 11:11 pm | आण्णा चिंबोरी
तात्या लेख छान आहे. अवांतर प्रतिसाद उडवून लाव किंवा आपापसात मध्ये टाक. तुझ्या लेखावर फालतू प्रतिसाद पटले नाही. गाण्याच्या दुव्याबद्दल धन्स.
16 Oct 2009 - 11:38 pm | चित्रा
सुंदर.
गाणे ऐकते आहे. माणिक वर्मांचा अगदी तरूणपणीचा आवाज आहे का?
17 Oct 2009 - 1:05 am | विसोबा खेचर
हो, अनेक वर्षांपूर्वी एच एम व्ही कंपनीने माणिकताईंच्या जोगकंसाची ध्वनिमुद्रिका काढली होती. सदरचे गायन हे त्यातलेच आहे. माझ्या आठवणीप्रमाणे २५ वर्ष तरी सहज होऊन गेली असतील या गोष्टीला! त्याहीपेक्षा जास्तच म्हणा ना!
आपला,
(जुनापुराणा श्रोता) तात्या.
17 Oct 2009 - 8:13 am | पक्या
सुंदर लेख, तात्या. बुवांचा अल्प परिचय आवडला.
बुवा गेले ते कोणते वर्ष होते?
17 Oct 2009 - 10:51 am | बिपिन कार्यकर्ते
वा तात्या!!! अजून एका दिग्गजाची उत्कृष्ट ओळख. सगळे दुवे छानच. ऐकायला छान वाटले.
काही भाग अनावश्यक वाटला.
बिपिन कार्यकर्ते