तुम आ गए हो नूर आ गया है ...अर्थात्, गुलझारची पंचाहत्तरी!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
19 Aug 2009 - 8:36 am

कवी, गीतकार आणि दिग्दर्शक गुलझार आज पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा! आणि त्यांच्या असण्याने तुमच्या-आमच्या आयुष्यात 'नूर' आला म्हणून त्यांचे आभारही!

त्यांच्या आयुष्याची आणि कारकीर्दीची माहिती खूप ठिकाणी आहे, मला स्वतःला हे संस्थळ मधून मधून भेट द्यायला आवडतं.

वेळ मिळेल तेंव्हा या संस्थळांना भेट द्या, पण तोपर्यंत ऐका गुलझारची काही गाणी:

Smashits

दिशांत


धिन्गाणा
[इथे गुलझारच्या गझलांविषयीच्या आणि अमृता प्रीतम यांच्या काव्यवाचनाच्या काही links आहेत.]

आणि त्यांच्या चित्रपटांतील गाण्यांचा दृश्य आनंद लुटायचा असेल तर इथे भेट द्या:

" alt="" />

" alt="" />

तसंच हा अल्बमही पहा.

कवितागझलचित्रपटप्रकटनशुभेच्छाअभिनंदनआस्वाद

प्रतिक्रिया

दशानन's picture

19 Aug 2009 - 8:38 am | दशानन

अनेकोत्तम शुभेच्छा!

एकापेक्षा एक सुंदर गाणी दिली ह्यांनी....

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

बेसनलाडू's picture

19 Aug 2009 - 9:46 am | बेसनलाडू

(शुभेच्छुक)बेसनलाडू

समंजस's picture

19 Aug 2009 - 11:06 am | समंजस

वयाचे त्र्याहत्तर वर्ष पुर्ण केल्याबद्दल गुलजार यांना हार्दीक शुभेच्छा!!
या कवीची तारीफ करायला शब्द अपुरे पडतात!
त्यामुळे तो प्रयत्न न करता, त्यांची गाणी/गजल ऐकनेच उत्तम!! :)
(मरासीम या गजल संग्रहातून अजूनही बाहेर न पडलेला @) ) ..समंजस

क्रान्ति's picture

19 Aug 2009 - 12:33 pm | क्रान्ति

गुलजारजींच्या तरल आणि अद्वितिय प्रतिभेला दंडवत!
या प्रतिभेचा बहर असाच फुलत राहो, ही सदिच्छा!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Aug 2009 - 5:30 pm | बिपिन कार्यकर्ते

गुलजार !!! खरा कवी, खरा कलावंत. अतिशय उच्च दर्जा सातत्याने राखत त्यांच्या लेखणीने सहित्याच्या बर्‍याच प्रांतात संचार केला. आज गुलजार म्हणले की, माझ्या वडिलांना काही गाणी आठवतात, मलाही आठवतात आणि माझ्या मुलीलाही बहुतेक 'कजरारे कजरारे' ने वेड लावलेच आहे. हे महान नाही तर काय?

त्यांच्या शंभराव्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा द्यायचे भाग्य लाभो हीच सदिच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

चित्रा's picture

19 Aug 2009 - 6:41 pm | चित्रा

>त्यांच्या असण्याने तुमच्या-आमच्या आयुष्यात 'नूर' आला म्हणून त्यांचे आभारही!

गुलझार यांनी खरेच छान गाणी दिली. गुलझारांनी आपल्या स्वत:च्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगितलेल्या आठवणींचा एक लेख आमच्याकडील एका पुस्तकात आहे. पुस्तकाचे नाव आत्ता लक्षात नाही, पण "मोरा गोरा अंग" या गाण्याचा जन्म कसा झाला त्याबद्दल लिहीले होते.
त्यांच्या संकेतस्थ़ळाद्वारे वाढदिवसाच्या थेट शुभेच्छाही देता येतील.

गुलझारांनी आपल्या स्वत:च्या सुरूवातीच्या दिवसांबद्दल सांगितलेल्या आठवणींचा एक लेख आमच्याकडील एका पुस्तकात आहे.

मला पण एकदम हाच लेख आठवला. त्या पुस्तकाचे नाव आहे "हाती ज्यांच्या शून्य होते"... या पुस्तकाची ओळख येथे करून दिली आहे. त्यात्च लिहीलेला गुलझार यांच्याबद्दलचा भाग, त्यांना शुभेच्छा देत, परत खाली देत आहे:

फाळणीनंतर भारतात आला. आईवडीलांना वाटले मुलगा सी ए होईल. पण कसचे काय... दिल्लीहून मुंबईस आला. सेल्समनची नोकरी घेतली. त्यात दोनशे रुपये पगार मिळायचा. त्यातीलही ६० रुपये कापले जायचे...पण त्या नोकरीत वाचायला मिळायचे नाही म्हणून ती सोडून १५० रुपयांची नोकरी विचारे मोटर गॅरेज मधे स्विकारली. वाचायला वेळ मिळालाच पण तेथे स्वतःच्या गाड्या दुरूस्त करायला येणारे बासू भट्टाचार्य, देबुसेन आदी ओळखीचे झाले.

त्याच वेळेस बिमलदा बंदीनी चित्रपट काढत होते. शैलेंद्र आणि बिमलदांमधे तेंव्हा मतभेद झाले होते. म्हणून बासू भट्टाचार्यांनी या रिपेअरमनला बिमलदा आणि सचीनदेवना भेटायला आणले. त्यात कल्याणी (नुतन) तीचे विकास (अशोक कुमार) वरील मूक प्रेम दाखवताना रात्री गाणे म्हणते असे दाखवायचे होते. पण बिमलदांची अट अशी की मुलगी एकटी रात्री अंगणात जाऊन अथवा वडीलांसमोर कवीता म्हणणार नाही. सचीनदेवांचे म्हणणे मग गाणे घरात गुदमरून जाईल त्यामुळे मी संगीत देणार नाही. ती कविता ही ती तिच्या वडीलांकडून ऐकत असलेल्या वैष्णवी कवितेसारखी होती... (हे सर्व बिमलदा, सचीनदांचे विचार) ... हे सर्व गुलजारना समजावून सांगितले. मग काही शब्द बसवले ते चंद्राशी ती बोलते असे होते. पण तितकेसे रुचले नाहीत.

मग आरडींनी त्याला डोबळ चाल लावून दिली.त्याला सचीनदांनी "पॉलीश" केले.मग या कविच्या मनात आले की ही कल्याणी म्हणते आहे की, "मी काळीसावळी असते तर रात्रीत प्रियकराजवळ निघून गेले असते..." आणि मग त्यांना खालील ओळी सुचल्या:
मोरा गोरा रंग लई ले
मोहे शाम रंग दई दे....

ह्या गाण्यामुळे त्या कल्याणीला अथवा तीचे काम करणार्‍या नुतनला कुठला रंग मिळाला ते माहीत नाही पण हिंदी चित्रपटसृष्टीस "मेलडी" म्हणता येतील अशी अनेक गाणी मिळतच राहीली आणि अजूनही तशी मिळत राहोत हीच इच्छा!

डॉ.प्रसाद दाढे's picture

19 Aug 2009 - 10:04 pm | डॉ.प्रसाद दाढे

मोरा गोरा रंग' ह्या एकाच गाण्याविषयीसुद्धा खूप काही लिहिण्यासारखे आहे. सचिनदांचे र्‍हीदम अरेंजर मारूतराव कीरांनी असा काही ऑफबीट ठेका धरला आहे की पटकन कुठे सम येते तेच कळत नाही. शिवाय इंटरल्यूडमध्ये परत ठेका बदललाय, डग्गा मस्त घुमवलाय. खरं म्हटलं तर तबला, मेंडोलिन, खोपडी-तरंग आणि ग्रूप व्हायोलिनचा अतिशय सुबक आणि सरल मेळ आहे.. पण त्यातही खुबी केल्या आहेत. लताबाईंचा विलक्षण दैवी आवाज आणि गुलझारसाहेबांचे अतिशय अर्थपूर्ण शब्द हे तर वेडच लावतात. त्यात बिमलदांचे दिग्दर्शन आणि नूतनचा अभिनय.. एकावर एक कडी किती असावी याला काही मर्यादाच नाहीत..!!
गुलझारसाहेबांना ह्यापुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

19 Aug 2009 - 11:53 pm | विसोबा खेचर

दिग्गज माणूस...

सलाम...!

तात्या.

संदीप चित्रे's picture

20 Aug 2009 - 1:52 am | संदीप चित्रे

म्हणूनच तर 'ढॅण टॅ ढॅण' सारखं भन्नाट गाणं आलंय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Aug 2009 - 10:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुठेतरी गुलजार साहेबांची एक कमेंट ऐकली होती, तेव्हा 'कजरा रे' फार प्रसिद्ध झालं होतं. गाणं 'पब्लिक'ला आवडलं आहे हे कसं कळणार? जे गाणं रिक्षातही ऐकायला मिळतं ते गाणं आम जनतेलाही फार आवडलेलं असतं. "आज मी हे गाणं दोन रिक्षांमधे ऐकलं, नक्कीच लोकांना आवडलं आहे." बहुदा हे वाक्य त्यांनी त्यांच्या मुलीला, मेघनाला, सांगितलेलं असावं.

अदिती

vijay nandgaonkar's picture

24 Aug 2009 - 10:32 am | vijay nandgaonkar

मोरा गोरा रंग' पासून अगदी 'ढॅण टॅ ढॅण' पर्यन्त सगळीच गाणी आपल्या मनात खरे-खुरे चित्र (picturesque) उभे करतात. भारतीय चित्रपट इतिहासात एक वेगळा गीतकार आणि भारतीय साहित्यातील मानबिन्दू (realistic Writer and Lyricist) म्हणून गुलझारसाहेबांना संबोधले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.

Gulzar sahab’s every song can be explored endlessly. He is a poet. A poet who writes for everyone… right from ‘more gora aang’ to ‘sili hawa choo gayee’ (libaas) to ‘main ek sadee se’ (lekin) to ‘choti si kahani se’ (Ijaazat) to ‘is mod se’ (aandhi) to ‘lakdi ki kaathi’ (masoom) to ‘jungle jungle baat chali hai’ (jungle book) to beedee jalayile (omkara) and much more…
And the beauty is that each and every listener can relate himself with the song. His contribution to filmi as well as to the non filmi music industry is untouchable. Simply inspirational !!

वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना प्रणाम व शुभेच्छाही !

महान शायराला अभिवादन! =D>

"Great Power Comes With Great Responsibilities"

दत्ता काळे's picture

24 Aug 2009 - 1:46 pm | दत्ता काळे

भारतीय चित्रपट इतिहासात एक वेगळा गीतकार आणि भारतीय साहित्यातील मानबिन्दू (realistic Writer and Lyricist) म्हणून गुलझारसाहेबांना संबोधले तर त्यात काहीही वावगे ठरणार नाही.

- मीपण असेच म्हणतो.

सचीन जी's picture

24 Aug 2009 - 5:25 pm | सचीन जी

अरे,
गुलझारांबद्दल इतकं लिहुन ही , पंचमदांचा उल्लेख नाही!
निषेध !!

पंचम भक्त,
सचीन जी