नेहमीप्रमाणे चौपाटीवरची मजा पाहुन मी परत चाललो होतो. एका कोप-यात एक माणुस तळमळत बसलेला दिसला. सारखा पोटाला हात लावुन तोंडाने खुर्क खुर्क आवाज काढत होता. जवळ जावुन पाहिले तर आपला नाना!
'नाना? काय रे काय झाले ?'
'काही नाही यार ! त्या समोरच्या भेळवाल्याकडची भेळ खावुन पोटात दुखत आहे... सारखे करपट ढेकर येत आहेत.... साला काय बकवास भेळ बनवतो.. अग आईग...खुर्क'
'छ्या ! नाना ! काहीतरीच काय बोलतोस? बघ किती गर्दी आहे त्याच्या दुकानात... कुणाचेही काही पोट दुखत नाही अन तुझेच कसे काय दुखते?'
'अरे खोटारडे आहेत ते... त्या भेळवाल्याला बरे वाटावे म्हणुन तसे म्हणतात.'
'बर मग त्या दुस-या भेळवाल्याकडे जायचे... शेजारच्या! '
'छे ! फार गोड बनवतो तो भेळ, मला मधुमेह आहे.'
'बर मग तो पलिकडे बसलेलाऽऽ '
'छे ! फार तिखट असते त्याची भेळ, मला मुळव्याध पण आहे.'
'मग नुसतीच पाणीपुरी खायची... '
'नाही ना ! तोंड आले आहे.. तिखट पाणी घेववत नाहि..'
'मग तो त्याच्या शेजारचा.. त्याचा रगडा पॅ॑टीस एकदम बेस्ट '
'नको ! बटाटा खावुन सारखे पादायला होते... लाज वाटते'
'नाना, हे नको ते नको.. सारखे तोंड वेंगाडत असतोस... ह्याची भेळ खराब, त्याची पाणी पुरी खराब.. कधी तरी कुठल्यातरी गोष्टीला चांगले म्हण... '
'अरे कुणी नाहीच बनवत तसे तर मी तरी काय करु?'
'अजिबात नाही. तुलाच कावीळ झाल्यावर जग पिवळे दिसते तसे सगळे जग खराब दिसते आहे. अरे सगळ्यांचीच भेळ काही भारी बनत नसते. पण खराबही नसते. कुणाची बनते कूणाची नाही. आपण जे चांगले आहे त्याचा आस्वाद घ्यावा. भेळ आवडली तर मनापासुन कौतुक करुन सांगावे. भेळ बनवणा-याला पण बरे वाटते. तो पुढच्यावेळी अजुन छान भेळ बनवुन आपल्याला खिलवतो.. अरे तु एवढा मोठा ! तुला या गोष्टी मी सांगायच्या का?'
'अरे पण मला कौतुक करायची लाज वाटते... ! '
'छ्या ! त्यात काय लाजायचे. आणि जर भेळ नीट जमली नसेल तर जे काही कमी आहे ते गोड शब्दात सांगायचे. आता परवाच बघ त्या भेळवाल्याची भेळ तिखट होती मी त्याला म्हटले वा ! फार छान जमली आहे भेळ, फक्त थोडे तिखट कमी असते तर बरे झाले असते कारण माझे तोंड आले आहे. अरे काय सांगु? त्याने लगेच मस्तपैकी चिंचेचे आंबटगोड पाणी दिले, वर नंतर एक कोरडी पुरी शेव घालुन दिली. अहाहा ! मजा आली. असे करायचे सोडुन तु भेळेची प्लेट फेकुन देतोस.. असे करुन नाही चालणार.'
'हम्म... '
'याचमुळे तुझे पोट दुखते, डोके दुखते. सारखा एकटा एकटा असतोस, अरे भेळ हा सगळे मिळुन खाण्याचा प्रकार आहे. मजा करत करत भेळेची लज्जत चाखायची. चल उठ ! आपली मंडळी आहेत तिकडे चल. आत्ता तुझी पोटदुखी पळुन जाईल आणि हा अपचनाचा त्रास बरा होईल.'
बघुया आता नानात सुधारणा होते की माझेच पोट नानासारखे दुखु लागते ! खुर्क !!
प्रतिक्रिया
26 Jun 2009 - 3:39 pm | यशोधरा
:)
27 Jun 2009 - 10:06 am | अनंता
अनंताशी सहमत! लेख अतिशय सुमार आहे. असले सुमार लेखन मिपावर येणे ज्यादिवशी बंद होइल तो सुदिन..! खरा डॉनसाहेब, पराचे लेखन व त्यावरील माझी प्रतिक्रिया दोन्ही उपरोधात्मक आहे. कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून हा खुलासा!!
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
26 Jun 2009 - 3:59 pm | अनंता
नेहमीप्रमाणेच सुमार लेखन!! प्रोत्साहनपर प्रतिक्रिया देणार्याची खिल्ली उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न!!
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
26 Jun 2009 - 9:11 pm | खरा डॉन
अनंताशी सहमत! लेख अतिशय सुमार आहे. असले सुमार लेखन मिपावर येणे ज्यादिवशी बंद होइल तो सुदिन..!
खरा डॉन
26 Jun 2009 - 3:54 pm | विजुभाऊ
परा शेठ्............भेळ या शब्दा ऐवजी मिसळपाव शब्द वापरुन बघ. आणखी धम्माल येते वाचायला.
( तुला पराशेठ ऐवजी पराभाऊ म्हणताना का कोणजाणे हरल्यासारखे वाटते)
26 Jun 2009 - 4:06 pm | दशानन
हॅहॅ हॅ !
=))
=))
थोडेसं नवीन !
26 Jun 2009 - 4:08 pm | श्रावण मोडक
इनो घेत जा म्हणावं अधूनमधून. बरं असतं ते. जळजळ कमी होते, ती कमी झाल्यानं डोकेदुखी थांबते, पोटदुखी थांबते. अपचन दूर होतं. :)
26 Jun 2009 - 4:40 pm | नितिन थत्ते
=))
जळजळ झाल्यावर हे उत्तम
खराटा
(रंग माझा वेगळा)
28 Jun 2009 - 11:45 am | पर्नल नेने मराठे
ओवा खावा !!!
चुचु
26 Jun 2009 - 5:25 pm | विनायक प्रभू
क्रीम उत्तम उपाय
26 Jun 2009 - 5:27 pm | श्रावण मोडक
=)) =))
26 Jun 2009 - 5:32 pm | नितिन थत्ते
सर, नानांच्या पोटात आतून दुखतंय. क्रॅक क्रीम कसं चालेल?
खराटा
(रंग माझा वेगळा)
26 Jun 2009 - 6:24 pm | विनायक प्रभू
दुखल्याणंतर काय होते?
कायमचा त्रास मीटला हो.
26 Jun 2009 - 6:07 pm | विसोबा खेचर
लेखन खास नाही...
पुढील प्रयत्नाकरता शुभेच्छा!
तात्या.
26 Jun 2009 - 6:59 pm | परिकथेतील राजकुमार
लेखन खास नाही...
पुढील प्रयत्नाकरता शुभेच्छा!
तात्या.
+१, सहमत आहे. आजकाल पुर्वीसारखे एवढे सविस्तर लिहणे होत नाही ...
तुमचे वय झाले आणि आम्ही वयात आलो, पण मुद्दा सेमच ...
(प्रतिक्रीया बिकांच्या खवतुनच साभार)
º°¨¨°º© परा डॉन ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
26 Jun 2009 - 6:11 pm | अवलिया
च्यायला कोण मी? एक सामान्य इसम. पण मी माझं मत मांडलं तर लोकान्च्या नाकाला एवढ्या मिरच्या झोंबायचं काय कारण?
आता भेळवाला भेळेच्या नावावर जे काही करतो ते नाही आवडत मला! किंबहुना, त्याचा आणि भेळेचा काही संबंध आहे असंही नाही वाटत मला! मग ते मी लिहिलं तर काय रे बिघडलं इतकं?!
साला, मी माझं मत चुपचाप नोंदवून मोकळा झालो होतो. पण पब्लिक च्यामारी माझ्या मताला एवढं सिरियसली घेऊन त्याला एवढी किंमत का देतं, याचाच मला अलिकडे ताप होतो. साला, कोण मी?
अरे हा कालपरवाचा पोर परा ! त्यानं तर डायरेक्ट माझ्यावरच हल्ला चढवला. मला सांगा, आता यात माझा काय संबंध? चौपाटीने भेळवाल्याचा आणि त्याच्या स्तुतिपाठकांचा दंगा नाकारला आहे का? बडवला आहे का?
असो,
तूम्ही लोक समंजस म्हणून तुमच्याशी मनातलं बोललो झालं! साला, स्वत:च्या वेळेला खार लावून, एवढ्या मेहनतीने सगळीकडे प्रतिसाद लेखन केलं आणि पब्लिक साला त्याला बिनधास्त उचलली जीभ लावली टाळ्याला या न्यायाने इथेच येऊन त्याला नावं ठेवतात हे पाहून क्षणभर खेद होतो..
झक मारली आणि प्रतिसाद दिले!
असो..
अवलिया.
26 Jun 2009 - 6:24 pm | विसोबा खेचर
अरे नान्या, स्वत:चही काही लिही रे!
त्या बिपिनला लिहिलेली खरड इतकी आवडली तुला?!
अगदी सह्ही सह्ही कॉपी?! :)
असो,
आम्हीही एक गाडी काढली आहे. भेळेची नव्हे, मिसळीची! ज्यांना आवडेल ते खातील, नाय आवडणार ते गेले उडत..कुणालाच नाय आवडली तर ती आपोआपच बंद पडेल!
दुनिया साली फाट्यावर...!
तात्या.
26 Jun 2009 - 6:28 pm | अवलिया
काय ? स्वत:चही काही लिही रे? माझ्या सारख्या आशयगर्भ प्रतिसाद लिहिणार्या महामहीम थोर लेखकाने कधी लेखन केलेच नाही!
>>>त्या बिपिनला लिहिलेली खरड इतकी आवडली तुला?!
खतरनाक आवडली ;)
-- अवलिया
26 Jun 2009 - 9:15 pm | लिखाळ
हा लेख नक्की कुणाला उद्देशून आहे? मिपासदस्य निरपेक्ष असे हे लिखाण आहे की नाही?
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
27 Jun 2009 - 10:53 am | वेताळ
त्या भेळवाल्याची लोकप्रियता खटकली असावी किंवा त्या भेळवाल्यामुळे नानाकडे लोकाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नानाच्या पोटात बिघडले असावे.
बाकी इनो पोटदुकी किंवा पोट बिघडणे ह्यावर उत्तम उपाय आहे.
मलातर भेळेपेक्षा त्याबरोबर मिळणारी मिरचीच जास्त आवडते.
वेताळ
27 Jun 2009 - 4:47 pm | हरकाम्या
एकदम "यंगारभ "
26 Jul 2012 - 11:52 am | विजुभाऊ
सुधारणा नक्की कुणात झाली रे?
26 Jul 2012 - 11:56 am | स्पा
विजुभाऊ आवरा..
वेळ जात नाहीये का ?
जुने धागे वर आणता हात ते