"दिलाचा दिलवर भेटला..."

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
1 Jun 2009 - 12:13 am

वाटंला डोळे जीव थकला
धनी कधी हो येता घरला
साजण माझ्या स्वप्नीच आला
मला दिलाचा दिलवर भेटला

तगमग जिवाची होतेया भारी
रात सरली कधी येतेया स्वारी
वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान
हिच्चा नवरा शारूख खान

माझा डोळाच पटकन लागला
मला दिलाचा दिलवर भेटला

नणदेचा दादला डोळा मारी
इष्टेटीवरती नज्जर सारी
वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान
नण्देचा नवरा इर्फ़ान खान

हा ठेवा मी जपून ठेवला
मला दिलाचा दिलवर भेटला

राती अचानक खोलीत आला
मला पाहुनी दिवा मालवला..
वृंदगान : अगं अगं येडे लवकर जाण
शारूख हाये की इर्फ़ान खान
कसा एकदम अंधार झाला
मला दिलाचा दिलवर भेटला

अंधाराची मजला वाटतेया भीती
चोराचिलटाची चिंता गं किती
वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान
नक्कीच हाये ह्यो शारूख खान
किती नवसानं तीर माझा बसला
मला दिलाचा दिलवर भेटला

३० मे २००९, पुणे

____________________________________________________________

कलानृत्यसंगीतप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

1 Jun 2009 - 12:19 am | चन्द्रशेखर गोखले

लै भारी !!

टारझन's picture

1 Jun 2009 - 12:22 am | टारझन

बटाटे डोळे टमाटे कान
नण्देचा नवरा इर्फ़ान खान

=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))

इरफान खानचे आणि संजय नार्वेकरचे डोळे किती छान आहेत नै ? अगदी मृगणयनी सारखे ..

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 12:25 am | क्रान्ति

फर्मास लावणी! सुरेखा पुणेकर दिसल्या ठसक्यात नाचताना! वृंदगान तर खूपच धमाल! मजा आली.
=D> =D> =D> क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 12:35 am | बिपिन कार्यकर्ते

भारी लावणी.... शब्द नाहीत माझ्याकडे वर्णावयासी... क्रांतितै म्हणते तसं, सुरेखा पुणेकर वगैरे चमकून गेल्या डोळ्यासमोर...

=)) =)) =)) =)) =))

अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा...

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

1 Jun 2009 - 8:59 pm | टारझन

अवांतर: आजकाल शरदिनीबैंची कविता आली की एकदम टॉप प्रायॉरिटीवर बघतो धागा...

अतिअवांतर : परवा कोणा "मोकालाया दाही दिश्या" यांच्या धाग्यावर पण तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली होती का हो ? ;)

(प्लिज ह.घेणे)

-टारझन

अनामिक's picture

1 Jun 2009 - 1:46 am | अनामिक

मजा आली लावणी वाचून.
वृंदगान तर लै भारी!
(देवकाका लावणीला चाल लावतील का?)

-अनामिक

अवलिया's picture

1 Jun 2009 - 6:39 am | अवलिया

वा! मस्त !!
मजा आली वाचुन :)

--अवलिया

जयवी's picture

1 Jun 2009 - 9:33 am | जयवी

बाप रे...... सहीच !!
वृंदगान तर तुफान :)

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2009 - 9:55 am | भडकमकर मास्तर

प्रतिभेची गाडी १८० डिग्रीमध्ये वळालेली दिसते... :)
...
साधारणपणे कवी लोक एकाच प्रकारच्या रचना करताना दिसतात...
प्रेमकविता, निसर्गकविता वगैरे ... ( ज्या मला स्वतःला फारशा पसंत नाहीत असे आधीही म्हटले आहे)
आपल्या आधीच्या दुर्बोध ? काव्याशी आपल्या या प्रकारच्या काव्याचा काहीही संबंध लावता येत नाही , असे मात्र म्हणावेसे वाटते....

या लावणीचा विषय नेहमीचाच आहे... सजणाची वाट पाहणारी स्त्री , एक खलपुरुष , थोडा सस्पेन्स आणि माफक सूचक शिणगाराचा शिडकावा अर्थात साजण भेटल्याचा आनंद अशी गोष्ट क्रमाक्रमाने पुढे सरते... ते बरे वाटले...
पण आपण वृंदगान म्हणून जे काही लिहिलेले आहे, ते अफलातून आहे.... नायक आणि खलनायक यांच्यासाठी जी शाहरूख आणि इरफान यांची प्रतीके / उपमा ( की काय जे असते ते) त्यांच्या शारीरवैशिष्ट्यासकट वापरली आहेत , ती खास जमली आहेत.... या काव्यप्रकारासाठी मागे किनर्‍या आवाजात बायका नाचत हे वृंदगान करताना अक्षरशः दिसल्या. __/\__

..... मीटर मध्ये मला ही लावणी ( वृन्दगान वगळता)नीट म्हणता मात्र आली नाही... ते वृत्ताचे बघा बुवा...

अवांतर : हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते)....
या अर्थाने आपल्या लावणीला महाराष्ट्राची आजची लावणी म्हणावेसे वाटते.. :) (ह.घ्या)

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jun 2009 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>हल्ली तमाशामध्ये पूर्वीच्या प्रकाराने सादरीकरण न होता हिन्दी फिल्म्सचा त्यावर फार वाईट परिणाम झालाय ( असे कुठेतरीवाचले होते)

मास्तर आपल्या विचारांशी सहमत आहे. आम्ही नुकतेच ब-याच दिवसानंतर तमाशा पाहिला. संपूर्ण स्वरुप बदलले आहे.
नीव्वल धांगड-धिंगा........ :(

-दिलीप बिरुटे

अभिज्ञ's picture

17 Jun 2010 - 12:02 am | अभिज्ञ

अरे काय चाललेय हे?
एखाद्या माणसाने एवढे हxxट असावे?

;)

मास्तरांना दंडवतच.

अभिज्ञ.

प्रमोद देव's picture

1 Jun 2009 - 9:56 am | प्रमोद देव

मस्तच.

अवांतर: चाल तयार आहे.
वृंदगानासाठी भर्ती सुरु आहे, ;)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

धनंजय's picture

1 Jun 2009 - 10:02 am | धनंजय

(पण ते वृत्ताचे बघा. +१)

वेताळ's picture

1 Jun 2009 - 10:04 am | वेताळ

मस्तच लावणी आहे ही.खुपच छान लिहलि आहेत तुम्ही.
=D>
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अनंता's picture

1 Jun 2009 - 12:22 pm | अनंता

आणि या लावणीची फर्माईश कळवली आहे, झुमरुतलैयाहून अनंता यांनी..
मिपाकर शरदिनी शेळके यांनी लिहीलेली लावणी - दिलाचा दिलवर भेटला.
या गीताला स्वरसाज चढवलाय उषा मंगेशकर यांनी.
संगीतकार : श्री प्रमोद देव.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

मितभाषी's picture

17 Jun 2010 - 12:54 pm | मितभाषी

अब सुनिये शरदिनी को भडक मकर मास्तर के आवाजमें. =)) =))

श्रावण मोडक's picture

1 Jun 2009 - 12:23 pm | श्रावण मोडक

भारीच. चालू राहू द्या असे काम. शुभेच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

(येथे एक शीट्टी मारणारी व टोपी उडवणारी स्मायली कल्पावी)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 12:35 pm | नितिन थत्ते

सुंदर लावणी

खराटा
(रंग माझा वेगळा)

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2009 - 12:42 pm | स्वाती दिनेश

लावणी आवडली, वृंदगान तर भारीच..
स्वाती

जागु's picture

1 Jun 2009 - 12:45 pm | जागु

=)) =)) =))

मनिष's picture

1 Jun 2009 - 6:20 pm | मनिष

बटाटे डोळे टमाटे कान
नण्देचा नवरा इर्फ़ान खान

धो, धो हसलो! =)) =))
बेडकाचे protruding eyes शिकलो होतो शाळेत, इरफान खानला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तेच आठवले. मूळ लावणी सहीच!

त्या मेघनाने (भुस्कुटे) वाचले की नाही अजून? तिला भयानक आवडतो हा 'इर्फ़ान खान'!

मेघना भुस्कुटे's picture

2 Jun 2009 - 1:42 pm | मेघना भुस्कुटे

लावणी आवडली होती, पण याच कारणाकरता मी काही प्रतिसाद लिहिला नव्हता. निषेधार्थ.
असू देत हो त्याचे कान टमाटे, आणि डोळे गटाणे. त्याच्या भूमिका कसल्या एकाचढ एक आहेत पण. एक तरी चिकणाचुपडा माणूस आणा नि दाखवा असली वैविध्यपूर्ण (आणि तितकीच ताकदीची. नुसतं वैविध्य काय चाटायचंय?) कामं केलेला.
शरदिनी,
तुमच्या कविता मला आवडतात. पण इथे नकळत काही खाजगी आवडीनिवडींना धक्का लागल्यामुळे या लावणीचा निषेध. (ते खतरनाक वृंदगान नामक प्रकर्ण असूनसुद्धा. :() त्रिवार निषेध.

कसलं चाबूक काम करतो हा माणूस! बाकी स्क्रीनवरचे सगळे एकदम ऐरेगैरे वाटायला लागतात!
ह्यानं खर्जाचा रियाज उत्तम केला आहे! ;)

(तसं बघितलं तर हिंदी सिनेमात खरं उत्तम काम करणारे बरेचसे नट सर्वसाधारणच आहेत दिसायला नासिरुद्दिन, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, इरफान खान, परेश रावळ ....अजून बरेच सापडतील)

चतुरंग

उपास's picture

17 Jun 2010 - 8:21 pm | उपास

अहो या यादीत नाना ला कसं विसरलात?
उपास मार आणि उपासमार

ऋषिकेश's picture

1 Jun 2009 - 7:09 pm | ऋषिकेश

एकदमच मस्त!
वृ़ंदगान तर पेश्शल... एक नंबर!!!
:)
अजून असं काहितरी ठसकेबाज येऊ द्या

(लावणी फ्यान) ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

सँडी's picture

2 Jun 2009 - 9:06 am | सँडी

=))
जबरा! येऊ द्यात अजुन.

सुवर्णमयी's picture

2 Jun 2009 - 6:26 pm | सुवर्णमयी

वा वा! लावणी अतिशय आवडली.

नणदेचा दादला डोळा मारी
इष्टेटीवरती नज्जर सारी . . .

वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान
नक्कीच हाये ह्यो शारूख खान

बरं झालं , दुसर्‍याच्या 'ऐश्वर्या'वर डोळा ठेवणारा खान नाही टाकला लावणीत.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Jun 2010 - 1:06 pm | अविनाशकुलकर्णी

शरदिनी शेळके कि बाबर

कानडाऊ योगेशु's picture

17 Jun 2010 - 1:07 pm | कानडाऊ योगेशु

"दिलाचा दिलवर" शब्द वाचल्याबरोबरच पिंजरातील गाणे आठवुन गेले.("दिलाचा दिलवर जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला..दिसला गं बाई दिसला..इ.इ.) हे गाणे अजुनही डोक्यात वाजतेय.

बाकी शरदिनीतैंची इतकी सोपी कविता पाहुन पुन्हा डोके गरगरले.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.