मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"दिलाचा दिलवर भेटला..."

शरदिनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला.. वृंदगान : अगं अगं येडे लवकर जाण शारूख हाये की इर्फ़ान खान कसा एकदम अंधार झाला मला दिलाचा दिलवर भेटला अंधाराची मजला वाटतेया भीती चोराचिलटाची चिंता गं किती वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान नक्कीच हाये ह्यो शारूख खान किती नवसानं तीर माझा बसला मला दिलाचा दिलवर भेटला ३० मे २००९, पुणे ____________________________________________________________

वाचन 7349 प्रतिक्रिया 0