पराच्या राज्याची भेट

क्रान्ति's picture
क्रान्ति in जनातलं, मनातलं
18 May 2009 - 9:43 pm

शीर्षक वाचून चमकू नका! क्रांतिबै बालकविता आणि ती पण जनातलं मनातलंमध्ये लिहितेय, झालंय काय तिला? असा विचारही करू नका! ही वार्ता आहे माझ्या अगदी अचानक झालेल्या पराच्या [मिपावरील परिकथेतील राजकुमाराच्या]राज्याच्या धावत्या भेटीची!
[प-यांच राज्य पराच्या राज्याच्या समोर आहे. म्हंजे सौन्दर्य संवर्धन/संगोपन केन्द्र, शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर!]
त्याचं असं झालं, लेकीची तब्येत ऐन परीक्षेच्या सुरुवातीला बिघडली. इकडे मायचा जीव खालीवर! शेवटी पुण्याला जाऊन प्रत्यक्ष लेकीला भेटून यायचं ठरवलं. जमल्यास पुण्यातल्या मिपाकरांना भेटण्याची संधी मिळाली, तर घ्यावी आणि बहिणीच्या मिपाप्रवेशासंबंधीच्या अडचणी कानावर घालाव्या, म्हणून तात्या अभ्यंकरांना फोन केला, आणि एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पण पाय जमिनीवर असलेल्या साध्या माणसाशी बोलण्याचं समाधान मिळालं. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे परा आणि अदिती यांना व्यनि करून मी येत असल्याचं कळवलं. शुक्रवारी सकाळी पुण्यात पोहोचले. लेकीची तब्येत शारिरीक कमी आणि मानसिक जास्त बरी नव्हती! बारावीपर्यंतच्या सवयीप्रमाणे इंजीनियरिंग फायनल परीक्षेला तरी आई जवळ असावी, किमान परीक्षेपूर्वी भेटून तरी जावी, असं थोडंसं दुखण्याचं स्वरूप होतं, बाकी थंडीताप, डोकेदुखी, पित्त हे परीक्षाकाळातले हमखास सोबती नुकतेच औषधानं कमी झाले होते. उरलासुरला आजार मायच्या भेटीनं गायब झाला. दुस-या दिवशी तिनं मला फिरून यायला सांगितलं. उन्हामुळे तिला येणं अवघड होतं.
पुण्यात आलं की प्रथेप्रमाणे प्रथम गणरायाचं दर्शन [दगडूशेठ हलवाई गणपति] घेतलं, लेकीच्या तब्येतीचं, परीक्षेचं, भवितव्याचं ओझं त्याच्या पायांवर घातलं आणि मग मिशन पराचं राज्य! पराला फोन करून त्याच्या राज्याचा पत्ता विचारून घेतला. कोणतीही अडचण न येता अगदी आरामात तो मिळाला. परा वाट पहातच होता. अगदी कितीतरी वर्षांपासून आपली ओळख असावी, असं त्याला पाहून वाटलं. मग गप्पा सुरू झाल्या. माझ्या लेकी, घरची थोडी पार्श्वभूमी, माझं लिखाण, माहेरचं साहित्यिक वातावरण याबद्दल माझं बोलून झाल्यावर मग निघाला मिपाचा विषय! थंडगार आइसक्रीम आणि दूध कोल्ड ड्रिंकचा आस्वाद घेता घेता मिपावरच्या गप्पा सुरू झाल्या आणि मला एका अत्यंत संपन्न घरात आल्याचा अनुभव आला.
परानं बिपिनभाऊंचं खोबार, अरब देशांबद्दलचा अभ्यास, क्लिंटन यांची ज्ञानलालसा आणि अभ्यासू वृत्ती, मेथांबा यांचं कार्यक्षेत्र, तिथलं त्यांचं वर्चस्व, त्यांची हुशारी याबद्दल सांगितलं. डॉ. दाढे यांच्या वाचनालयातल्या दुस-या महायुद्धाबद्दलच्या पुस्तकांबद्दल माहिती दिली. त्या विषयातील त्यांचा गहन अभ्यास, त्या संबंधातील सामुग्री यांचं वर्णन केलं. त्या दिवशी सर्जरी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. अदिती देखिल त्या दिवशी व्यस्त होती, तिनं माझ्या व्यनिला तसं उत्तरही दिलं होतं, आणि माझा मुक्कामही कमी होता. पण तिची आठवण मात्र काढली आम्ही. प्राजु, जागु, जयवीताई, मिंटीताई, धमु, प्रभु सर, प्रकाश घाटपांडेजी या सगळ्यांच्या आठवणी निघाल्या. भडकमकर मास्तरांच्या नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीची माहिती परानं दिली. धनंजय, टारझन, रंगाकाका, अवलिया, तात्या, श्रावण मोडक या सगळ्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल, त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांबद्दल, कार्याबद्दल मला जे कळलं, ते ऐकून मला माझा स्वतःचा अभिमान वाटायला लागला! या इतक्या समृद्ध, संपन्न, अद्वितिय परंपरा असलेल्या या सागरातील एक बिंदू होण्याचं भाग्य मला मिळालं, हे जाणवून मी धन्य झाले. त्या अवघ्या अर्ध्या-एक तासाच्या धावत्या भेटीनं मी अक्षरशः भारावून गेले.
मिपाकरांनी नेहमीच मला, अगदी नवीन असल्यापासून इतकं भरभरून कौतुक दिलं आहे, की मला मी नवीन आहे असं वाटलंच नाही. आपलेपणानंयोग्य ते बदल करण्याच्या सुचवण्या [सूचना हा शब्द शाळेत हे.मां. नी दिलेल्या जाचक बंधनांची आठवण करून देतो.] विडंबन असलं तरी त्यातली वेगळीच मजा घेण्याची इथली खास परंपरा, हसतखेळत, सगळे भेदाभेद विसरून एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं असलेलं इथलं निखळ आणि नितळ वातावरण पाहून मला नेहमीच आनंद होतो. आता तर या भेटीत परानं मला या कुटुंबियांच्या कौशल्याबद्दल अगदी आत्मीयतेनं दिलेल्या माहितीमुळे मला एक खास विश्व मिळाल्याचं समाधान मिळालं, मला माझं तालेवार माहेर भेटलं! पण परा आणि मिपाकरांचेही मी आभारप्रदर्शन नाही करणार! मी जन्मभर या आगळ्या ऋणात रहाणंच पसंत करेन! परानंच सुचवलं की मी गद्यही लिहायचा प्रयत्न करावा, म्हणून माझे हे वेडेवा़कुडे निरुपण माझ्या कुटुंबियांसाठी!

जीवनमानसद्भावनाप्रतिसादअनुभवआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

18 May 2009 - 9:55 pm | प्राजु

यु हॅव ओनर्ड अस..!!
परा या प्राण्याला भेटलीस.. ! बरं झालं!! आता "मी पाहिलेला परा" असं एक व्यक्तिचित्रच लिहि. प्लेटॉनिक व्यक्तिचित्र लिहिलंस तर सोन्याहून पिवळे!! ;)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2009 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्रांतीताई, तुम्हाला भेटायला आवडलं असतं, पण व्यक्तीगत कारणांमुळे जमलं नाही. असो, जनातलं मनातलं अगदी मस्त उतरलं आहे.

या पर्‍याला भेटलंच पाहिजे आता!!

प्रमोद देव's picture

18 May 2009 - 10:52 pm | प्रमोद देव

अरे वा ही एक वेगळीच 'क्रान्ति' दिसतेय आम्हाला.
आता पद्याच्या बरोबरीने गद्यही नेमाने लिहीत जा.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

चतुरंग's picture

18 May 2009 - 10:54 pm | चतुरंग

धनंजय, टारझन, रंगाकाका, अवलिया, तात्या, श्रावण मोडक या सगळ्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल, त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांबद्दल, कार्याबद्दल मला जे कळलं, ते ऐकून मला माझा स्वतःचा अभिमान वाटायला लागला!
अहो क्रांतीतै, मिपावरच्या सगळ्या महानुभावांच्यात माझा समावेश करून तुम्ही मला लाजवता आहात! माझ्या कसल्या हो सामाजिक जाणिवा? तात्यानं उभ्या केलेल्या मिसळपावच्या गारुडला भुलून दोन घटका इथे टेकतो आणि विडंबनाच्या माध्यमातनं चार सुखाच्या घटका लोकांना द्यायचा प्रयत्न करतो, कधी जमतं कधी नाही! (ह्या परानं माझ्याबद्दल काहीबाही सांगून तुमची भलतीच फिरकी घेतलेली दिसते! ;))
असो तुमच्या भावना पोचल्या आणि खूप बरं वाटलं! तुम्ही गद्यही तितक्याच मनापासून लिहिता हे नक्की! :) अशाच लिहित्या रहा!

चतुरंग

धनंजय's picture

20 May 2009 - 10:35 pm | धनंजय

तरी भावना पोचल्या हे खरे - मिपावर अशीच देवाणघेवाण, आत्मीयता वाढत राहो.

आता असेच गद्यलेखनही येऊ दे : +१

विसोबा खेचर's picture

18 May 2009 - 11:18 pm | विसोबा खेचर

म्हणून तात्या अभ्यंकरांना फोन केला, आणि एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पण पाय जमिनीवर असलेल्या साध्या माणसाशी बोलण्याचं समाधान मिळालं.

धन्यवाद क्रान्तीतै!

मिपाकरांनी नेहमीच मला, अगदी नवीन असल्यापासून इतकं भरभरून कौतुक दिलं आहे,

मिपा तुमचं आहे आणि तुम्ही मिपाच्या आहात! बस्स!

सुंदर प्रकटन..

तात्या.

अवलिया's picture

19 May 2009 - 6:56 am | अवलिया

धनंजय, टारझन, रंगाकाका, अवलिया, तात्या, श्रावण मोडक या सगळ्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल, त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांबद्दल, कार्याबद्दल मला जे कळलं, ते ऐकून मला माझा स्वतःचा अभिमान वाटायला लागला!

अगगाआआग्गाआअआ !
अहो आज १ एप्रिल नाही हो..... :)
हे असले भलते सलते काय लिहीता ? कुणाला खरेच वाटेल...
छ्यां ! हा परा काहीही पुड्या सोड्ण्यात पटाईत आहे.
एकदा कॅफेवर जावुन पंख्याला लटकवुन मिरच्यांची धुरी दिल्याशिवाय सुधारणार नाही लेकाचा !!

बाकी लेख फक्कड जमला आहे. जियो !! :)

--अवलिया

टारझन's picture

20 May 2009 - 10:29 pm | टारझन

धनंजय, टारझन, रंगाकाका, अवलिया, तात्या, श्रावण मोडक या सगळ्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल, त्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक जाणिवांबद्दल, कार्याबद्दल मला जे कळलं, ते ऐकून मला माझा स्वतःचा अभिमान वाटायला लागला!

अगगाआआग्गाआअआ !
अहो आज १ एप्रिल नाही हो.....
हे असले भलते सलते काय लिहीता ? कुणाला चुक्कून खरे वाटणार नाय ...
छ्यां ! हा परा काहीही पुड्या सोड्ण्यात पटाईत आहे.
एकदा कॅफेवर जावुन अस्थिदंत विमा काढल्याशिवाय सुधारणार नाही लेकाचा

बाकी लेख फक्कड जमला आहे. जियो !!

- टार्‍या

सहज's picture

19 May 2009 - 7:18 am | सहज

सर्वप्रथम लेक बरी आहे हे उत्तम. तिला परिक्षेसाठी अनेकोत्तम शुभेच्छा!

२१ मिपाकरांची नावे (जणु दुर्वांची जुडी) लेखात दिसली. वाह वाह!!

एकदम प्रतिकात्मक लेख जेव्हा दोन मिपाकर प्रथम भेटतात तेव्हा अगदी असेच काहीसे होते! आय लव्ह मिपा!!

>>थंडगार आइसक्रीम आणि दूध कोल्ड ड्रिंकचा
मस्तानीची व्याख्या काय?
अवांतर - परा इतक्या लोकांच्या ख व वाचतो तर :-)

बाकरवडी's picture

19 May 2009 - 9:35 am | बाकरवडी

हा प रा भलताच फेमस झालाय.
लोकांना (प्लेटॉनिक)भेटायला बोलवतो....
चांगलय.......

:B :B :B बाकरवडी :B :B :B

नितिन थत्ते's picture

19 May 2009 - 11:24 am | नितिन थत्ते

छान वृत्तांत.
(पराच्या राज्यासमोरील पर्‍यांच्या राज्याबद्दल पण थोडे लिहिले असते तर आवडले असते)

खराटा
(रंग माझा वेगळा)

बिपिन कार्यकर्ते's picture

20 May 2009 - 11:09 pm | बिपिन कार्यकर्ते

घरी सांगू का रे? X(

बिपिन कार्यकर्ते

स्वाती दिनेश's picture

19 May 2009 - 11:26 am | स्वाती दिनेश

पराच्या राज्याची भेट मस्त लिहिली आहे,
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2009 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत चांगला झाला ! बरं माणूसही चांगला भेटला तुम्हाला. खरडवह्या हा 'पराचा' पीएच.डीचा चा विषय आहे.त्यामुळे मिपा परिवारातील माणसांचा उत्तम परिचय 'परा’ शिवाय अन्य कोणी करुन शकणार
नाही. ( परा ह. घे रे)

मिपा परिवारातील काही व्यक्तींची भेट मीही घेतलीय, त्याचा काय आनंद सांगावा !

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

19 May 2009 - 12:40 pm | नंदन

वृत्तांत आवडला.

>>> मिपा परिवारातील काही व्यक्तींची भेट मीही घेतलीय, त्याचा काय आनंद सांगावा !
- सांगा सर, लेखाची वाट पाहतो :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2009 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

येव्हडे मी सगळ्यांचे कौतुक केले, त्याचे काहीच नाही वर मलाच मारायला टपलेत सगळे ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

दशानन's picture

20 May 2009 - 11:25 am | दशानन

=))

तुच नक्की भेटला होतास ना क्रांति बैंना ?

नाय उगाच मनात शंका हो.. तुमचे पालथेधंदे आम्हाला थोडेफार माहीत आहेत ;)

थोडेसं नवीन !

सुबक ठेंगणी's picture

22 May 2009 - 8:46 am | सुबक ठेंगणी

ए काय रे पराचा कावळा चाल्लाय्....वां ssssss ;)

परा काळा की गोरा नं बघितलेली ...
सुबक ठेंगणी

ता.क. क्रांतीचा मनापासूनचा लेख आणि तुमच्या between the line उचापती वाचून तुमच्या अड्ड्यात आपण एकदम फिट्ट बसणार ह्यात शंकाच नाही.

ऋषिकेश's picture

22 May 2009 - 11:31 am | ऋषिकेश

गद्य चांगलं उतरलंय क्रांतिताई
मिपाकरांना प्रत्यक्ष भेटून फारच मस्त वाटतें हे मात्र अगदी सत्य!

अजून लिहा.. आम्हि वाचतोच आहोत

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

यन्ना _रास्कला's picture

22 May 2009 - 11:44 am | यन्ना _रास्कला

पण परा आणि मिपाकरांचेही मी आभारप्रदर्शन नाही करणार! मी जन्मभर या आगळ्या ऋणात रहाणंच पसंत करेन!

भाव्ना ह्रुद्यात पोचल्या.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

जागु's picture

22 May 2009 - 1:02 pm | जागु

आपण नक्कीच भेटू. गद्यही चांगलच लिहीतेस. लिहीत रहा.