कोकणच्या आख्यायिका
हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले.
Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner ..
याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.
परशुराम आणि समुद्रदेवाचे युद्ध होऊन परशुरामाने समुद्रदेवाला मागे ढकलून कोकणप्रांताची निर्मिती कशी केली, वासोटाच्या किल्ल्याची, महिपतगड, रत्नदुर्ग आणि कोकणातल्या इतर किल्ल्यांची, समुद्री चाचे आणि त्यांच्या लढायांची, शिवाजी महाराज आणि त्यांच्या आरमाराची, धोळप आणि इतर सरदारांची, मानवी स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या या गोष्टी.
मुळात Crawford चा plan भटजीबुवांकडून या पोथ्या Asiatic society किंवा तत्सम संस्थेसाठी विकत घेण्याचाच होता पण आपले भटजी बुवा पक्के. त्यांनी Crawford ला निक्षून सांगितले, “बाबा रे, हा आमच्या पूर्वजांचा ठेवा. तु लाख रुपये दिले तरी विकणार नाही. हवे तर तुला रोज थोडा थोडा भाग वाचून दाखवत जाईल आणि तू लिहून घेत जा.”
अशा प्रकारे या गोष्टी भटजीबुवांनी रोज Crawford ला सांगाव्यात आणि त्याने त्या लिहून घ्याव्यात.
पोथीमधल्या गोष्टींवर आधारित Crawford ने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे – Legends of Konkan.
हे मूळ इंग्रजी पुस्तक मी चुकूनही वाचले नसते, पण या पुस्तकाचा लेखिका नीलिमा देशपांडे यांनी मराठीमध्ये केलेला अतिशय सुंदर असा अनुवाद वाचायला मिळाला & it literally took me to a whole different world.
मुळात मला fantasy मध्ये रमायला प्रचंड आवडते. कोकणच्या आख्यायिका आपल्याला एका वेगळ्याच कल्पनाविश्वात घेऊन जातात. या पुस्तकातल्या गोष्टी म्हणाव्या तर काल्पनिक आणि म्हणाव्या तर अगदी पुराव्यानी शाबीत कराव्या अशा. अगदी पुराणकाळापासून सुरु झालेला हा प्रवास आपल्याला सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमधून फिरवून अगदी अलगद एकोणविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. सर्वांनी हा प्रवास एकदा तरी नक्कीच अनुभवावा..
--
प्रतिक्रिया
30 Jul 2022 - 3:40 am | मनो
पुस्तकाविषयी आणि खरेदीसाठी
https://www.legendsofkokan.com/
इंग्रजी पुस्तक pdf रुपात आंतरजालावर आहे नाव गुगलवर टाकून पहावे.
30 Jul 2022 - 6:57 am | कर्नलतपस्वी
@चिमी लेखाबद्दल धन्यवाद
@ मनो लिंक व चकटफू पडफ माहीतीसाठी धन्यवाद . उतरून घेतले सवडीने वाचतो. जास्त मोठे नाही फक्त ३३३ पाने आहेत.
30 Jul 2022 - 7:02 am | प्रचेतस
विषय एकदमच भारी दिसतोय. वाचायलाच हवे हे पुस्तक.
31 Jul 2022 - 11:51 pm | टर्मीनेटर
सहमत आहे!