जालिंदर जलालाबादी यांच्या भक्तांसाठी खुश खबर. त्वरा करा.

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in जनातलं, मनातलं
11 Apr 2009 - 11:16 am

जालिंदर जलालाबादी यांचे पूजनीय 'साहित्य'

जालिंदर जलालाबादी यांचा काही काळातच लोकांना आलेला अनुभव आणि त्यांची वाढत असलेली भक्तसंख्या आपण सारे जाणताच.
आम्ही आता त्यांचा फोटो असलेत्या व इतर काही वस्तू भक्तगणांना उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे.

खालील प्रमाणे वस्तू उपलब्ध आहेत.
लॉकेट ५००० रु
फोटोफ्रेम १००० रु
पेन २०० रु
टी शर्ट ९०० रु
(जालिंदर यांनी ओढलेल्या चिलिमितील पवित्र) अंगारा २०,००० रु तोळा
जालिंदर बाबांनी मंतरलेले मोक्षाचा दिव्य अनुभव देणारे 'तीर्थ' १०,००० रु लीटर.
जालींदर बयालीसाचे पुस्तक ले. धनंजय (मोठ्या टाइपातील) १०० रु

भक्तांनी संपर्क साधावा. वस्तू व्ही पी पी ने पाठवल्या जातील.

वि. सू. : 'अंगारा' व 'तीर्थ' मुबलक उपलब्ध. इतर वस्तू मर्यादित प्रमाणात उपलब्ध.

संस्कृतीशिफारसचौकशीसल्लामदतविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Apr 2009 - 11:21 am | अवलिया

वैधानिक इशारा -

वरती जाहिरात करणारे खराटा हे श्रद्धावानांच्या श्रद्धेवर हल्ला करणारे गृहस्थ असुन त्यांनी आजपर्यत केवळ आणि केवळ श्रद्धाळूंवर तथाकथित वैज्ञानिक तर्कदुष्टतेने प्रहार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. सध्या आलेल्या मंदीतुन केवळ पोट भरण्यासाठी त्यांनी हा उद्योग चालु केला आहे, त्यामुळे त्यांच्या मालाच्या प्रतिविषयी सर्वांनी सावध रहावे, आणि माल चोख असल्याची खात्री पटली तरच पैसे द्यावे. अन्यथा फसवणुक होवु शकते.

सर्व श्रद्धाळुंच्या माहितीसाठी जनहितार्थ हा प्रतिसाद दिला आहे.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 11:43 am | नितिन थत्ते

आम्ही पूर्वी अज्ञानातून अनेकदा श्रद्धाळूंवर सौम्य टीका केली आहे. पण जालिंदर यांचे शिष्यत्व पत्करताच आमचे सर्व अज्ञान दूर झाले आहे. आपणच आम्हाला जालिंदरबाबांची दीक्षा दिली होती हे आपण विसरलात की काय?.
आता पूर्वीच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून आम्ही हे (सत)कार्य अंगिकारण्याचे ठरवले आहे.
आपण वाल्याचा वाल्मिकी झाल्याची कथा ऐकली असेलच.
एखाद्याला सुधारण्याची संधी न देता त्याच्या पूर्वायुष्यातील चुकांचा पाढा वाचून टोचत राहण्याच्या प्रवृत्तीचा नम्र निषेध.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

11 Apr 2009 - 11:52 am | अवलिया

ठीक आहे. आम्ही तुम्हाला अजुन एक संधी देतो.
परंतु दिक्षाग्रहण समारंभाला तुमच्यापाशी नव्हती म्हणुन आम्ही आमची रेशमी लंगोटी तुम्हाला दिली होती.
ती पुन्हा स्वच्छ धुवुन परत आणुन देण्याचे आपण कबुल सुद्धा केले होते. ती अजुन पोहोचली नाही.
तसेच, त्या समारंभानंतर जी थाळी फिरवली होती त्यातील सुट्टे पैसे बंदे करुन आणुन देतो असे म्हणुन तुम्ही जे गेलात ते अजुन आला नाहित. तरी ते पैसे अधिक त्यावरचे व्याज असा हिशेब लवकरात लवकर आणुन देणे.

त्याचप्रमाणे आपल्या वरील धंद्यात २० टक्के बेनामी पार्टनरशिप देणे एवढे केले की तुमचा माल चोख आहे याची आम्ही स्वदस्तुराने साक्ष देवु. त्याचप्रमाणे आपल्याला हवा तो माल आमच्या गोवंडीमधील कारखान्यातुन तयार करुन देवु या बद्दल निःशंक असावे.

--अवलिया

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 12:04 pm | नितिन थत्ते

मी पैसे बंदे करून आणतो एवढेच म्हटले होते. आणून देतो असे म्हटले नव्हते. असो. ते मी जालिंदरजींचा प्रसाद म्हणून ठेवून घेतले आहेत.
(स्वगतः या अवलियाला अशा गोष्टी उघड लिहायच्या नाहीत हे ही कळत नाही. कसा याला भागीदार करून घ्यायचा?)

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

11 Apr 2009 - 12:29 pm | अवलिया

ते मी जालिंदरजींचा प्रसाद म्हणून ठेवून घेतले आहेत.

बर बर हरकत नाही घ्या ठेवुन.

(खुद के साथ बाता - च्यामारी हा आपल्याच जातकुळीतला दिसतोय...दिसले की घे ठेवुन. अजुन काय काय 'ठेवले' असेल जालिंदरबाबालाच माहित)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 2:45 pm | नितिन थत्ते

आम्ही आमची रेशमी लंगोटी तुम्हाला दिली होती

ती लंगोटी रेशमी नसून 'इटालियन क्रेप'ची असल्याचे समजले.

खराटा
(रंग माझा वेगळा)

दवबिन्दु's picture

11 Apr 2009 - 11:25 am | दवबिन्दु

अनिरुध्द बाबानची आठवन झाली. जय हो.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 11:43 am | परिकथेतील राजकुमार

भारत चंद्रावर जाउन पोचला आणी त्याचवेळी खराटा सारखी काहि माणसे भोळ्या भाबड्या जनतेच्या (अंध)श्रद्धेचा असा गैरफायदा घेउन स्वतःचे खिसे भरताना पाहुन मनाला अतिशय यातना झाल्या.
अनेक सुशिक्षीत लोक सुद्धा ह्या सगळ्यात फसवले जात आहेत हे बघुन हसावे का रडावे ते कळेना झाले आहे. अरे कुठे चालला आहे हा समाज ? काय मिळवणार आहोत आपण ह्या सगळ्यातुन ?

भोंदु जालींदर बाबा आणी त्याचे खराटा सारखे शिष्य अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याखाली अटकेत जातील तोच ह्या समाजसाठी सुदीन.

परेंद्र दाभोळकर.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 11:49 am | नितिन थत्ते

जालिंदरजी, प.रेंद्र रा.भोळकरांना क्षमा करा. ते काय बोलताहेत ते त्यांचे त्यांनाच कळत नाहिये.

(स्वगतः हम्म या 'परा'ला कमाईतला वाटा हवा असे दिसते.)

खराटा
(रंग माझा वेगळा)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 12:08 pm | परिकथेतील राजकुमार

(स्वगतः हम्म या 'परा'ला कमाईतला वाटा हवा असे दिसते.)

ह्या असल्या हिन आणी हिणकस आरोपाचा निषेध माझे कार्यकर्ते स्वतःच्या रक्ताने पत्रके लिहुन करतील.
मी, स्वस्ता सेटल्व्हा, भेगा फाटकर, आबा गाढाव, डॉ. साइराम भागु ह्यांच्यासह तुमच्या घरावर मोर्चा काढीन.
जनमानसा भोवती आवळलेला हा विषारी विळखा सोडवुच सोडवु.

परेंद्र दाभोळकर
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 12:27 pm | नितिन थत्ते

जरूर मोर्चा काढा.
भेगा फाटकर सुद्धा जालिंदरजींचे शिष्यत्व घेतील अशी मला खात्री आहे.
मी स्वगत म्हटलेले वाक्य तुम्हाला कसे कळले. मी असा आरोप जाहीर पणे केला नव्हता. यालाच खाई त्याला खवखवे म्हणतात काय?

खराटा
(रंग माझा वेगळा)

टारझन's picture

11 Apr 2009 - 12:12 pm | टारझन

मला ह्यांचा धंदा खराब करायची नाही ; पण या बाबतीत बोललेच पाहिजे.

एकविसाव्या शतकात , इन्टरनेटवरील एका फोरम मधे आपण असले वांझोटे धंदे करतो म्हंटले तर आपले हे म्हणणे विनोदी वाटेल . तसे ते सर्वांच्या बुद्धीमत्तेचा अपमान करणारे आहेसुद्धा ; पण दुर्दैवाने ते सामाजिकदृष्ट्या अंधश्रद्धा वाढवणारे , नडलेल्यांचे पोषण करणारे , आणि एकंदर समाजाला अज्ञान आणि अनाठायी भीतीच्या दहशतीमधे लोटणारे आहे. या दृष्टीने , कराटा आणि सावरिया यांसारखे लोक हे अल्पशिक्षित , गरीब , नाडलेल्या माणसांच्या अंधविश्वासाला खतपाणी घालणारे , त्यांच्यातील भोळेपणाचा फायदा घेणारे ठरतात.

अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तुम्हाला तुमचा व्यवसाय , त्यातील अनुभव वगैरे मांडण्याचा अधिकार आहेच. पण या व्यवसायाला एक गंभीर अशी नैतिक बाजू आहे हे इथे नमूद व्हायला हवे.

गंडा,ताईत,तिर्थ्,अंगारा वगैरेबद्दलचे किस्से आणि चर्चा या गोष्टी रंजनाच्या आहेत. त्याबाबत कुतुहल वाटणे , त्याबद्दल काय वाटते ते सांगणे इ. इ. गोष्टी या सामान्य बाबी आहेत. पण "व्यावसायिक विक्री" सारख्या गोष्टींबद्दल मी माझा तात्विक विरोध व्यक्त करतो. जो व्यवसाय तुम्ही उपजीविका म्हणून निवडला आहे तो अंधश्रद्धेचा , अनाठायी भितीची कास धरणारा , लोकांना लुटणारा आहे असे मला वाटते. अंधश्रद्धा णिर्मुलण समितीच्या समोर तुम्ही आपल्या व्यवसायातील तथ्य सिद्ध करावे असा सल्ला देतो.

- मुक्तटारझण

( संदर्भ इथे )

मुक्तसुनीत's picture

12 Apr 2009 - 3:01 am | मुक्तसुनीत

च्यामारी पब्लिक सोडायला तयार नाही ;-)

टारिंदर खवीसाबादी ,

तुमचे पोस्ट वाचले . माझे मूळ मत तुम्हाला दातांपाशी झोंबलेले दिसते . असे असले तरी त्याची रूट कनाल तुम्ही केली आहे असे वाटत नाही. तुमच्या दंतास्थिव्यवसायाबद्दल नेमके काय आक्षेपार्ह आहे हे मी लिहिले आहे. आता (तुमच्याच दंतभाषेत सांगायचे तर ) कशालाही दात वेंगाडून हसायचे म्हण्टले तर मग कसला आलाय वाद नि कसला आलाय प्रतिवाद म्हणा ;-)

तुम्हाला वाटेल तेच दात तुम्ही पाडणार आणि वाटेल ती हाडे मोडणर यात काही नवे नाही . येथील प्रत्येक जण त्याला वाटेल ती अंगे वापरत असतो. प्रश्न इतकाच आहे , की जे तोडले मोडले जाते आहे ते पुरेसे मजेदार आहे का ? तर तुमच्या बाबतीत आहे. त्याबद्दलचा माझा णिषेध मी व्यक्त केला आहे. तो काही बदलत णाही.

संदर्भ

निखिल देशपांडे's picture

11 Apr 2009 - 11:53 am | निखिल देशपांडे

भोंदु जालींदर बाबा आणी त्याचे खराटा सारखे शिष्य अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याखाली अटकेत जातील तोच ह्या समाजसाठी सुदीन.
असेच म्हणतो...
हे सर्व विकण्या पेक्षा .... जालिंदर बाबांचे साहित्य जर वाच्ण्यास उपलब्ध करुन दिले असते तर खुप बरे वाटले अस्ते.
लिहिते व्हा शोधणारा
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2009 - 1:14 pm | प्रकाश घाटपांडे

भोंदु जालींदर बाबा आणी त्याचे खराटा सारखे शिष्य अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याखाली अटकेत जातील तोच ह्या समाजसाठी सुदीन.

अशा प्रकारे अटक करवुन घेण्यासाठी अनेक बाबा बुवा अंनिसकडे येतात. जो जास्तीत जास्त देणगी देईल त्याला अटक करवुन घेण्याची संधी मिळेल. जालिंदरबाबानी गुप्त बैठक घेउन अटक करवुन घेतल्यानंतर आलेल्या इष्टापत्तीतुन येणार्‍या संपत्तीचा पाव हिस्सा अंणिस ला देण्याचे कबुल केले आहे. त्यामुळे पुढील आव्हानाची रक्कम डायरेक्ट कोटी मधे जाईल. ती बी इनकम्टॅक्स फ्री. लवकरच अंणिस ला सुगीचे दिवस येणार आहे असे भाकीत आम्ही अंनिस वार्तापत्रात केले आहे.
ज्योतिषी अंनिस
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

अशा प्रकारे अटक करवुन घेण्यासाठी अनेक बाबा बुवा अंनिसकडे येतात. जो जास्तीत जास्त देणगी देईल त्याला अटक करवुन घेण्याची संधी मिळेल.
आमच्या एकेकाळच्या सहकार्‍यांना आज आमच्यावर अशी टिका करताना बघुन वैशम्य वाटले.
वेळोवेळी त्यांच्या विरुद्ध आंदोलने उभारुन , त्यांच्यावर वैयक्तीक टिका करुन आम्ही त्यांचे नाव मोठे होण्यास हातभारच लावला आहे. परंतु त्या उपकाराची फेड ते असे आमच्या धोतरास हात घालुन करतील असे वाटले न्हवते.

अवांतर :- मराठी माणसाचा मुद्दा मध्ये घुसडुन आता हे खराटा ह्या प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न करत आहेत.

परेंद्र दाभोळकर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2009 - 1:39 pm | प्रकाश घाटपांडे

मराठी माणसाचा मुद्दा मध्ये घुसडुन आता हे खराटा ह्या प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा प्रयत्न करत आहेत.

मराठी माणुस अंधश्रद्धेतही मागे आहे ते अशा पाय खेचण्यामुळेच. शनी शिंगणापुरला महिलांना प्रवेश मिळावा म्हणुन अंनिसला कोर्टाची पायरी चढावी लागली. का म्हणुन महिलांना चौथर्‍यावर जायला प्रवेश नाही. हा महिलांच्याही (अंध) श्रद्धेचा हा प्रश्न आहे![ निर्मुलन ही नंतरची गोष्ट आमची आम्ही बघुन घेउ.]पण महिलांना तो हक्क मिळाला पाहिजे. मराठी माणुस अंधश्रद्धेतही मागे आहे असे कोणी म्हणेल तर अंनिसचे कार्यकर्ते शनी शिंगणापुरला जाउन चोर्‍या करतील. त्यासाठी प्रसंगी जालिंदरबाबा व त्यांच्या शिष्यांची मदत घेउ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

योगी९००'s picture

11 Apr 2009 - 12:52 pm | योगी९००

आमच्याकडे गुरूवर्य जालिंदर जलालाबादी यांची ध्वनीफित आहे. याचा उल्लेख आम्ही येथे केला आहे. नुकतेच बरेचसे पैसे खर्च करून आम्ही ती तुटलेली ध्वनीफित व्यवस्थित जोडून घेतली आहे.

पण या गोष्टीचा आम्ही धंदा नाही केला. बरेचजण आमच्या पाठिमागे ह्या ध्वनीफितीसाठी हात धुवून मागे लागलेत. आजकाल लोकांपासून बचाव करण्यासाठी आम्हाला झेड सुरक्षा घ्यावी लागतेय. (तो रेशमिया पण चार दा हा ठो ठो आवाज ऐकण्यासाठी येवून गेला पण आम्ही त्यालाही हाकलवले).

खादाडमाऊ

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 12:57 pm | नितिन थत्ते

आम्ही भक्तांची सोय पहात आहोत तर त्याला धंदा म्हणून हिणवले जात आहे. पुन्हा मराठी माणसाला धंदा करायला नको म्हणून कांगावा करायला हे मो़कळे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

योगी९००'s picture

11 Apr 2009 - 3:23 pm | योगी९००

सोय म्हणता आणि भक्तांना लुटता..? मग हा धंदा नाहीतर काय..?

हिम्मत असेल तर आमच्या सारख्या परमभक्तांसारखे फुकट वाटा.

(खराटा साहेब गेले चार दिवस माझ्यामागे ध्वनीफितीसाठी लागले आहेत. मला म्हणतात की बर्‍याच कॉप्या काढू आणि एक एक ध्वनीफित २००० ला विकू. टिसिरीजचा मालक सुद्धा भक्त असल्याने फुकट ध्वनीफिती देण्यास तयार आहे. पण हेच खराटा साहेब मात्र विकायच्या तयारीत..)

तेव्हा भक्तजनहो...उगाच कोणाचेही ऐकू नका.

खादाडमाऊ

नितिन थत्ते's picture

12 Apr 2009 - 10:47 am | नितिन थत्ते

तुटलेली ध्वनीफीत जोडलेली असल्याने त्यातून आवाज व्यवस्थित येतो की नाही हे पाहण्यासाठी ध्वनीफीत मागितली होती. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात ते असे.

खराटा
(रंग माझा वेगळा)

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 1:18 pm | नितिन थत्ते

रेवती उवाचः
मला एकदा थंडीच्या दिवसात पन्हे आणि डाळ करायची होती म्हणून बाजारात गेले तर कुठेच कैर्‍या मिळेनात. शेवटी निराश होऊन घरी आल्यावर जालिंदरजींनी मंत्रून दिलेले तीर्थ पाण्यात घालून घेतले तर काय आश्चर्य!! मला ते पाणी अगदी कैरीच्या पन्ह्यासारखेच लागले. खोटं कशाला सांगू? त्या पाण्याचे कैरीच्या पन्ह्यातच रूपांतर झाले होते. तुम्हीसुद्धा अनुभव घ्या.

खराटा
(रंग माझा वेगळा)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2009 - 1:26 pm | प्रकाश घाटपांडे

एका प्रथितयश कवीने सांगितले की तो नवकवी असताना पाडलेल्या कवितांचा संग्रह घेउन प्रकाशका गेला असता प्रकाशकाने ती साफ नाकारली. अशा कविता प्रकाशित केल्या तर आमचे दिवाळे वाजेल असेही सांगितले. काही दिवसांनी कविने त्याच कवितांचा संग्रह जालिंदरबाबांच्या २०० रु चा पेन ने लिहुन प्रकाशकाकडे गेला. आन काय आश्चर्य सांगु महाराजा! तोच कवितासंग्रह प्रकाशकाने छापला. आन लोकांनी डोक्यावर घेतला.तेव्हा पासुन तो प्रथितयश कवी झाला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

योगी९००'s picture

11 Apr 2009 - 3:53 pm | योगी९००

१०००० रु. लिटर असे देऊन खरेदी केलेले तीर्थ उद्या कोणाला अम्रुतासारखे (किंवा शिवास रिगल सारखे) जरी लागले तर आश्चर्य वाटायला नको.

खादाडमाऊ

योगी९००'s picture

11 Apr 2009 - 3:53 pm | योगी९००

१०००० रु. लिटर असे देऊन खरेदी केलेले तीर्थ उद्या कोणाला अम्रुतासारखे (किंवा शिवास रिगल सारखे) जरी लागले तर आश्चर्य वाटायला नको.

खादाडमाऊ

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 2:53 pm | नितिन थत्ते

व्यस्त अदितीने एकदा जालिंदरजींची फोटोफ्रेम अडगळीत टाकून दिली.
तर त्या दिवशी तिला साधा चहासुद्धा करायला जमले नाही.
दुसर्‍या दिवशी ती फोटोफ्रेम बाहेर काढून पूजा केल्यावरच चहा करता आला.

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

11 Apr 2009 - 3:27 pm | अवलिया

अदिती बै व्यस्त असल्याने खरे खोटे करणे शक्य नसल्याचा फायदा घेवुन त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या काहि कृत्याचा आपल्या हेतुसाठी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न करणा-या मतलबी, ढोंगी आणि पाताळयंत्री व्यापारी वृत्तीच्या माणसांचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे.

(बाकीची सेटलमेंट व्यनीतुन चर्चा करु. जाहिर नको)

--अवलिया

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 4:02 pm | नितिन थत्ते

चहा करता आला नाही हे अदितीतैनी मिपावरून जाहीरपणे सांगितले आहे.
(फोटोफ्रेमची गोष्ट आम्हाला जालिंदरजींच्या कृपेने अंतर्ज्ञानाने समजली)

खराटा
(रंग माझा वेगळा)

अवलिया's picture

11 Apr 2009 - 4:07 pm | अवलिया

>>>फोटोफ्रेमची गोष्ट आम्हाला जालिंदरजींच्या कृपेने अंतर्ज्ञानाने समजली

अंतर्ज्ञान वगैरे अंधश्रद्धा आहेत असे प.पु. अदितीदेवी दुर्बीटणे यांनी त्यांच्या प्रवचनातुन मागे सांगितल्याचे आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छितो. असो. यावर खुलासा अदितीदेवीच करतील, त्यांची आपण वाट पाहु.

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

11 Apr 2009 - 5:10 pm | भडकमकर मास्तर

काय वेळ आलेली आहे...
जालिंदरजीनी वापरलेल्या वस्तूंचा व्यापार पहायची वेळ ....
अरेरे...काय हा दैवदुर्विलास...
अरेरे...काय हा दैवदुर्विलास...काय हा दैवदुर्विलास...
अरेरे...काय हा दैवदुर्विलास...
अरेरे...काय हा दैवदुर्विलास...अरेरे...
अरेरे...काय हा दैवदुर्विलास...

इतकेच म्हणतो..

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

11 Apr 2009 - 5:16 pm | नितिन थत्ते

जालिंदरजींनी वापरलेल्या नाय हो. त्यांचा फोटो असलेल्या वस्तू.

खराटा
(रंग माझा वेगळा)

शिवापा's picture

12 Apr 2009 - 2:28 am | शिवापा

कुणितरी या थ्रेड बद्दल फोनवर सांगितले म्हणुन धावत आलो. पण जेवढ्या वस्तु ऐकण्यात आल्या तेवढ्या नाहियेत. मला खात्रीने आठवतय कि फोनवरील व्यक्ति जालिंदर जलालाबादी च्यवनप्राश आहे म्हणुन म्हटली होती. इथे येउन पहातो तर नाहिये :(. थ्रेड अद्यावत झालाय का? कि च्यवनप्राश दुस-या ठिकाणि आहे?

नितिन थत्ते's picture

12 Apr 2009 - 11:02 am | नितिन थत्ते

च्यवनप्राशची पाककृती कळवावी. अवश्य विचार करू. जालिंदरजींकडून मंत्रून घेवू.
पण तीर्थ एवढे पॉवरफुल आहे की तशी च्यवनप्राशची गरजच पडत नाही.

खराटा
(रंग माझा वेगळा)

Nile's picture

12 Apr 2009 - 4:32 am | Nile

येडा खवीस यांना जाहीर आव्हान: मिपा वरील हे "जाली"म भुत काढुन दाखवा तरच तुमच्या नसलेल्या भुतांना काढ्णाच्या "विद्ये"वर वश्वास ठेवू.

धनंजय's picture

12 Apr 2009 - 10:00 am | धनंजय

"बयालिसा" म्हणण्याची दोन कारणे :
अ. ४२ कडव्यांमध्ये प्रत्येकी १० शब्द आहेत. ४२*१०
आ. मुखपृष्ठावर "लिसा" बयेचे चित्र आहे.

(ही जालिंदरांची आद्य शिष्या. नऊवारी साडीत शिषोत्तमा बयालिसा अतिशय सोज्ज्वळ दिसतात. दुर्दैववश फोटो काढायच्या दिवशी शिषोत्तमा बयालिसांच्या कडे नऊवारी साडी नव्हती. त्यामुळे फोटो साडीविना आहे. तरीसुद्धा ज्या शिष्यांनी गुरुभगिनीचा फोटो प्रेमळपणे घेतला त्यांच्या दृष्टीतच सोज्ज्वळपणा आहे - ॥ जय जालिंदर ॥)

खुलासा : पुस्तकविक्रीतून रुपयातील सत्त्याण्णव पैसेदेखील लेखकाला मिळत नाहीत. विक्रीतून उत्पन्न मोठ्या प्रमाणात ही जालिंदर बाबांच्या भावी स्मारकासाठी जात आहे.

मुक्तसुनीत's picture

12 Apr 2009 - 10:20 am | मुक्तसुनीत

बया जिंकली ! बया जिंकली ! ;-)